ब्लॉग कसा बनवावा याचे सविस्तर मार्गदर्शन कुणी करेल का? त्याची मांडणी, भेटसंख्यादर्शक, वगैरे बद्दल माहिती दिल्यास अथवा अशा माहितीस्थळापर्यंत पोचवल्यास आभारी होईन.
माझ्या माहितीप्रमाणे इथे मिपावर "स्टार माझा" ने आयोजीक केलेल्या "ब्लॉग माझा" ह्या स्पर्धेचे विजेते हे इथले सन्माननीय सदस्य आहेत.
तेच योग्य प्रकारे "उत्तम ब्लॉग कसा बनवावा" ह्याची व्यवस्थित माहिती देऊ शकतील.
बाकी वर दिलेले देवकाकांचे दुवे आहेतच.
आमचाही तसा एक ब्लॉग आहे, वाचणासारखा अजिबातच नाही मग त्याच्या लुक्सची तर बातच सोडा !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
संकेतस्थळ काढण्याचे कसलेही विशेष तांत्रीक ज्ञान नसतांना आपले संकेतस्थळ ब्लॉगच्या स्वरूपात आपण बनवू शकतो. खरं तर ब्लॉग म्हणजे नेटवरची अनुदिनी. रोज काही तरी लिहीण्याची जागा. आपलं स्वत:चं जे लिहायचं असेल ते प्रकाशित करण्यासाठीची उत्तम सोय.
आपला ब्लॉग बनवण्यासाठी अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ब्लॉगस्पॉट आणि वर्डप्रेस हे दोन उत्तम पर्याय आहेत. ब्लॉगस्पॉटला जीमेलच्या खात्यानेच ब्लॉग बनवता येतो. वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. ब्लॉगस्पॉट हा गुगलचा असल्यामुळे गुगलची अनेक विजेट्स येथे लावता येतात. गुगल शोध मध्ये लेखन लवकर जोडता येते. येथे ब्लॉग बनवण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊन लॉग इन करा आणि create blog वर टिचकी मारून ब्लॉग्ग बनवा. प्रत्येक टप्यावर सोबत सुचना दिलेल्या आहेत. आणि अगदी सोप्पं आहे. फार काही अडचण येत नाही. आल्यास लोकायत.कॉम अडचण देऊ शकता.
वर्डप्रेस हा ब्लॉग बनवण्यासाठीचा दुसरा पर्याय आहे. वर्डप्रेस ही साहित्य व्यवस्थापन प्रणाली (CMS) आहे.
याचा वापर दोन प्रकारे करू शकतो. एक तर वर्डप्रेसच्या सर्व्हरवर मोफत ब्लॉग बनवू शकतो. किंवा वर्डप्रेस डाऊनलोड करून आपल्या सर्व्हरवर आपला ब्लॉग बनवू शकतो. वर्डप्रेस हे सामुदायीक भागीदारीने बनवलेले आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एडऑन्स येथे उपलब्ध आहेत. हवे तसे वापरता येतात. अनेक सुंदर थीम्स लावता येतात. वर्डप्रेसचे स्वतःच्या सर्व्हरवर इन्स्टॉलेशन असेल तर खुप काही करता येते. वर्डप्रेस च्या सर्व्हरवर ब्लॉग असेल तर थोड्या मर्यादा येतात.
चाचणी करायला कुठलेही एक चांगले आहे. मात्र पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या सर्व्हरवर ब्लॉग ठेवणार असाल तर मात्र वर्डप्रेसचा विचार करावा असे सुचवेन.
बाकी काही अडचण असल्यास नेमकी विचारा म्हणजे उत्तर द्यायल सोप्पं होईल.
अतिशय उत्तम आणि माहित नसलेली माहिती मिळाली !!
धन्यवाद लेखकाचं आणि प्रतिसाद्यांचही !!
* बाकी मचमचपुरी पहिल्यांदाच पाहिला ..(अर्थात मिभो कृपा) तिकडे आमचं नाव वाचून अंमळ करमणूक झाली :) तिकडे आमच्या नावा खाली लिहीलेली सही म्हणजे आमचं नाव वापरणार्याचा मम्मी ने त्याला सांगितलेली गोष्ट असावी काय ? *
हा विषय कालच वाचला आणि मलाही वाटले आपला ब्लॊग बनविण्याची काही तरी सोपी पद्धत शोधावी. माझ्या संग्रही गेल्या पाच वर्षांपासून मी लिहीलेले विविध विषयांवरचे लेख आहेत परंतू ते सर्व फोनेटीक कीबोर्ड व विविध फॊन्ट (शिवाजी, किरण व श्री लिपी इत्यादी) च्या साहाय्याने टंकलिखीत केलेले आहेत. ते कुठे मांडायचे तर पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करावा लागतो.
काल सहज शोध घेतला तर असे लक्षात आले की गुगल ने आपल्याला डॊक्युमेंट अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तिथे आपली पीडीएफ़ फ़ाईल टाकून त्याची लिंक दिली की आपला ब्लॊग आपण कुठेही सहज पोचवू शकतो.
म्हणून मी माझे ९ लेख टाकून त्याच्या लिंक्स मिसळपाववर दिल्या. त्यापैकी भारताला गरज भरताची, एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास हे विषय पुर्वीच मांडले होते परंतू भारताला गरज भरताची ह्या लेखाची लिंक दुस-या संकेतस्थळावरची होती. ती अनेक वेळा नीट दिसत नसे. एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास ह्या कथा ऒर्कूट वर मी पुर्वी मांडल्या होत्या त्या ऒरकूट वरील संदर्भासह दिल्यामुळे येथे पुन्हा संपादित करायला हव्यात असे इथल्या वाचकांनी सूचविले होते. परंतू मिसळपाववर संपादन न करता आल्याने मी त्या पुन्हा मांडल्या आहेत.
या पद्धतीने मांडणी केल्यामुळे माझे सर्व लेख / कथा एका क्रमात आल्या आहेत. (९५१९ ते ९५२७)
मला तरी ब्लॊग मांडायची ही सर्वात सोपी पद्धत वाटली.
यापुर्वी मी अनेकदा मिसळपाव वर इतरांचे लेख वाचून जात असे परंतू आपल्याकडे लिखाण उपलब्ध असूनही ते मांडता येत नसल्याबद्दल मला वाईट वाटे. आज मी लिखाण मांडले तर इतर अनेक सदस्यांना वाईट वाटले. मी माझे संपूर्ण खरे नाव लिहून इथे वावरतो तर अवलिया असे नाव धारण केलेल्याने *** वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित. *** माझ्या आडनावाचा अपमान केला. असो, हाथी चले बाजार तो कुते भौंके हजार हे सर्वश्रुतच आहे तेव्हा मी त्यावर आधिक काही भाष्य करणार नाही.
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 7:49 pm | प्रमोद देव
www.blogspot.com वर जाऊन खातं उघडा आणि सुरु करा. तिथे सगळ्या शंकांचे उत्तर मिळेल.
त्यातूनही जर काही कळलं नाही तर आम्ही आहोतच.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
23 Sep 2009 - 9:17 pm | बाकरवडी
मला पण सांगा
मी पण ब्लॉग तयार करत आहे.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
23 Sep 2009 - 10:39 pm | पाषाणभेद
मला पण मला पण
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
23 Sep 2009 - 11:11 pm | प्रमोद देव
माझी मराठी
ब्लॉग कसा बनवायचा ते वरच्या दुव्यावर वाचा.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
23 Sep 2009 - 11:14 pm | छोटा डॉन
माझ्या माहितीप्रमाणे इथे मिपावर "स्टार माझा" ने आयोजीक केलेल्या "ब्लॉग माझा" ह्या स्पर्धेचे विजेते हे इथले सन्माननीय सदस्य आहेत.
तेच योग्य प्रकारे "उत्तम ब्लॉग कसा बनवावा" ह्याची व्यवस्थित माहिती देऊ शकतील.
बाकी वर दिलेले देवकाकांचे दुवे आहेतच.
आमचाही तसा एक ब्लॉग आहे, वाचणासारखा अजिबातच नाही मग त्याच्या लुक्सची तर बातच सोडा !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
23 Sep 2009 - 11:24 pm | मिसळभोक्ता
माझ्या माहितीप्रमाणे मिसळप्रेमी आणि मचमचपुरी नावाचे उत्कृष्ट ब्लॉग तयार करणारे दोघेही मिपाचे सदस्य आहेत. ते तुम्हाला खूप माहिती देऊ शकतील.
-- मिसळभोक्ता
24 Sep 2009 - 12:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळप्रेमी आणि मचमचपुरी नावाचे उत्कृष्ट ब्लॉग तयार करणारे दोघेही मिपाचे सदस्य आहेत. ते तुम्हाला खूप माहिती देऊ शकतील.
मिभोशी सहमत आहे. :)
-दिलीप बिरुटे
24 Sep 2009 - 9:16 am | दिपक
ब्लॉग कसा बनवावा? आणि भेटसंख्यादर्शक इथे पहा.
24 Sep 2009 - 9:22 am | विशाल कुलकर्णी
wordpress.com देखील चांगले संस्थळ आहे ब्लॉग बनवण्यासाठी. माझ्या ब्लॉगसाठी मी त्याचाच वापर केला आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Sep 2009 - 10:40 am | नीलकांत
नमस्कार,
संकेतस्थळ काढण्याचे कसलेही विशेष तांत्रीक ज्ञान नसतांना आपले संकेतस्थळ ब्लॉगच्या स्वरूपात आपण बनवू शकतो. खरं तर ब्लॉग म्हणजे नेटवरची अनुदिनी. रोज काही तरी लिहीण्याची जागा. आपलं स्वत:चं जे लिहायचं असेल ते प्रकाशित करण्यासाठीची उत्तम सोय.
आपला ब्लॉग बनवण्यासाठी अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ब्लॉगस्पॉट आणि वर्डप्रेस हे दोन उत्तम पर्याय आहेत. ब्लॉगस्पॉटला जीमेलच्या खात्यानेच ब्लॉग बनवता येतो. वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही. ब्लॉगस्पॉट हा गुगलचा असल्यामुळे गुगलची अनेक विजेट्स येथे लावता येतात. गुगल शोध मध्ये लेखन लवकर जोडता येते. येथे ब्लॉग बनवण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊन लॉग इन करा आणि create blog वर टिचकी मारून ब्लॉग्ग बनवा. प्रत्येक टप्यावर सोबत सुचना दिलेल्या आहेत. आणि अगदी सोप्पं आहे. फार काही अडचण येत नाही. आल्यास लोकायत.कॉम अडचण देऊ शकता.
वर्डप्रेस हा ब्लॉग बनवण्यासाठीचा दुसरा पर्याय आहे. वर्डप्रेस ही साहित्य व्यवस्थापन प्रणाली (CMS) आहे.
याचा वापर दोन प्रकारे करू शकतो. एक तर वर्डप्रेसच्या सर्व्हरवर मोफत ब्लॉग बनवू शकतो. किंवा वर्डप्रेस डाऊनलोड करून आपल्या सर्व्हरवर आपला ब्लॉग बनवू शकतो. वर्डप्रेस हे सामुदायीक भागीदारीने बनवलेले आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एडऑन्स येथे उपलब्ध आहेत. हवे तसे वापरता येतात. अनेक सुंदर थीम्स लावता येतात. वर्डप्रेसचे स्वतःच्या सर्व्हरवर इन्स्टॉलेशन असेल तर खुप काही करता येते. वर्डप्रेस च्या सर्व्हरवर ब्लॉग असेल तर थोड्या मर्यादा येतात.
चाचणी करायला कुठलेही एक चांगले आहे. मात्र पुढे जाऊन आपल्या स्वतःच्या सर्व्हरवर ब्लॉग ठेवणार असाल तर मात्र वर्डप्रेसचा विचार करावा असे सुचवेन.
बाकी काही अडचण असल्यास नेमकी विचारा म्हणजे उत्तर द्यायल सोप्पं होईल.
नव्या ब्लॉग करीता शुभेच्छा ! :)
- नीलकांत
24 Sep 2009 - 12:05 pm | अमोल केळकर
ओगले साहेब,
काय माहिती पाहिजे आहे ते विचारा . मला देखील मदत करायला आवडेल.
माझ्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे.
आपला
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
24 Sep 2009 - 12:50 pm | टारझन
अतिशय उत्तम आणि माहित नसलेली माहिती मिळाली !!
धन्यवाद लेखकाचं आणि प्रतिसाद्यांचही !!
* बाकी मचमचपुरी पहिल्यांदाच पाहिला ..(अर्थात मिभो कृपा) तिकडे आमचं नाव वाचून अंमळ करमणूक झाली :) तिकडे आमच्या नावा खाली लिहीलेली सही म्हणजे आमचं नाव वापरणार्याचा मम्मी ने त्याला सांगितलेली गोष्ट असावी काय ? *
25 Sep 2009 - 4:11 pm | चेतन सुभाष गुगळे
हा विषय कालच वाचला आणि मलाही वाटले आपला ब्लॊग बनविण्याची काही तरी सोपी पद्धत शोधावी. माझ्या संग्रही गेल्या पाच वर्षांपासून मी लिहीलेले विविध विषयांवरचे लेख आहेत परंतू ते सर्व फोनेटीक कीबोर्ड व विविध फॊन्ट (शिवाजी, किरण व श्री लिपी इत्यादी) च्या साहाय्याने टंकलिखीत केलेले आहेत. ते कुठे मांडायचे तर पुन्हा सारा मजकूर टंकलिखीत करावा लागतो.
काल सहज शोध घेतला तर असे लक्षात आले की गुगल ने आपल्याला डॊक्युमेंट अपलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तिथे आपली पीडीएफ़ फ़ाईल टाकून त्याची लिंक दिली की आपला ब्लॊग आपण कुठेही सहज पोचवू शकतो.
म्हणून मी माझे ९ लेख टाकून त्याच्या लिंक्स मिसळपाववर दिल्या. त्यापैकी भारताला गरज भरताची, एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास हे विषय पुर्वीच मांडले होते परंतू भारताला गरज भरताची ह्या लेखाची लिंक दुस-या संकेतस्थळावरची होती. ती अनेक वेळा नीट दिसत नसे. एक अमेरिकन प्रेमकथा व फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास ह्या कथा ऒर्कूट वर मी पुर्वी मांडल्या होत्या त्या ऒरकूट वरील संदर्भासह दिल्यामुळे येथे पुन्हा संपादित करायला हव्यात असे इथल्या वाचकांनी सूचविले होते. परंतू मिसळपाववर संपादन न करता आल्याने मी त्या पुन्हा मांडल्या आहेत.
या पद्धतीने मांडणी केल्यामुळे माझे सर्व लेख / कथा एका क्रमात आल्या आहेत. (९५१९ ते ९५२७)
मराठी स्त्रीचं 'माहेर' बदलतंय
http://www.misalpav.com/node/9519
फक्त रुपये पाच हजारात जग प्रवास
http://www.misalpav.com/node/9520
एक अमेरिकन प्रेमकथा
http://www.misalpav.com/node/9521
सरकार कडून अपेक्षा
http://www.misalpav.com/node/9522
उत्तर
http://www.misalpav.com/node/9523
मल्लिका शेरावत चे उदाहरण आदर्श ठरावे.
http://www.misalpav.com/node/9524
भारताला गरज भरताची
http://www.misalpav.com/node/9525
तुम्ही दूध पिणे गाई म्हशींनाही हानिकारकच
http://www.misalpav.com/node/9526
आमिताभ आणि प्राण
http://www.misalpav.com/node/9527
मला तरी ब्लॊग मांडायची ही सर्वात सोपी पद्धत वाटली.
यापुर्वी मी अनेकदा मिसळपाव वर इतरांचे लेख वाचून जात असे परंतू आपल्याकडे लिखाण उपलब्ध असूनही ते मांडता येत नसल्याबद्दल मला वाईट वाटे. आज मी लिखाण मांडले तर इतर अनेक सदस्यांना वाईट वाटले. मी माझे संपूर्ण खरे नाव लिहून इथे वावरतो तर अवलिया असे नाव धारण केलेल्याने *** वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित. *** माझ्या आडनावाचा अपमान केला. असो, हाथी चले बाजार तो कुते भौंके हजार हे सर्वश्रुतच आहे तेव्हा मी त्यावर आधिक काही भाष्य करणार नाही.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
25 Sep 2009 - 8:30 pm | अविनाश ओगले
`एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे'
सर्व मिपाकरांचे आभार!