भारतात व्यक्तिपुजा कधी सम्पणार?

टिकाकार's picture
टिकाकार in काथ्याकूट
17 Sep 2007 - 2:45 pm
गाभा: 

भारतात व्यक्तिपुजा कधी सम्पणार?

प्रतिक्रिया

सहज's picture

17 Sep 2007 - 2:48 pm | सहज

स्वघोषीत टिकाकारांचा अंत झाला की मग

टिकाकार's picture

17 Sep 2007 - 2:53 pm | टिकाकार

म्हन्जे

टिकाकार

टिकाकार's picture

17 Sep 2007 - 2:57 pm | टिकाकार

आता बोला कि चान्गला विशय आहे.

टिकाकार

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:27 pm | इनोबा म्हणे

जसे स्वयंघोषीत टिकाकार तसेच स्वयंघोषीत साधू संत.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

जुना अभिजित's picture

17 Sep 2007 - 2:58 pm | जुना अभिजित

व्यक्तिपूजा कधीच कुठली संपत नाही. जगात सगळीकडे चालू असते.

अगदी सगळीकडे व्यक्तिपूजाच चालू असते. आपल्याइकडे जो मलिदा देतो त्याची पूजा. म्हणजे अगदी सातबाराचा उतारा देणार्‍या तलाठ्यापासून ते सोनिया गांधीपर्यंत. फक्त हेतू आणि कर्ते वेगवेगळे असतात.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रकाश घाटपांडे's picture

17 Sep 2007 - 3:00 pm | प्रकाश घाटपांडे

अभिजितशी सहमत
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2007 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंचायत समितीच्या सदस्यांनी भविष्यात चर्चेसाठी किमान ५० शब्दांची मर्यादा घातली पाहिजे.

जगन्नाथ's picture

18 Sep 2007 - 11:03 pm | जगन्नाथ

पंचायत समितीच्या सदस्यांनी भविष्यात चर्चेसाठी किमान ५० शब्दांची मर्यादा घातली पाहिजे.

ह्यामागची भावना बरोबर अाहे, पण असल्या मर्यादा वगैरे नकोत असं मला मनापासून वाटतं. अावडलं नाही तर दुर्लक्ष केलं, की झालं. जनतेने "नफरत" दाखवली की माणूस गप्प बसतो.

कायदे केले की साईट संपते हा अनुभव अाहे . . .

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:30 pm | इनोबा म्हणे

पंचायत समितीच्या सदस्यांनी भविष्यात चर्चेसाठी किमान ५० शब्दांची मर्यादा घातली पाहिजे.
सहमत.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

टिकाकार's picture

17 Sep 2007 - 3:21 pm | टिकाकार

सहमत
टिकाकार

विकास's picture

17 Sep 2007 - 7:04 pm | विकास

भारतात व्यक्तिपुजा कधी सम्पणार?

आधी व्यक्तीची पुजा होते. मग कालांतराने त्या व्यक्तीचा देव/संत होतो. मग देवाची/संताची पुजा चालू होते. ती नावारुपाला आणणारी व्यक्ती स्वतः नावारुपाला येते, मग तीची व्यक्तीपुजा इतर चालू करतात मग ...

हे असेच चालू राहते. अर्थात हे भारताच नाही, भारतात देव अथवा "लोकमान्य" ("चर्चमान्य" नव्हे) संत तयार होतात. इतर ठिकाणि ती "स्टेप" कदाचीत नसेल इतकेच. आणि हो ह्याचा संबंध कुठल्याही रीलीजनशी नाही आहे तर तो माणसाच्या स्वभावधर्माशी आहे. त्यामुळे आस्तिक, नास्तीक, धार्मीक, निधर्मी, वगैरे सर्वांचीच पुजा "अभिजीत" यांनी वर म्हणल्याप्रमाणे होत राहणार.

आपण कुणाची पुजा कशाने करायची, "फुलांनी" की "खेटरांनी", "हारानी" की "प्रहारानी" हा ज्याचा त्याचा प्रश्न!

याबाबत एक हिंदी लेख वाचला होता (लेखक बहुधा हरिशंकर परसाई)
विचारवंताचे बंड मोडण्यासाठी चार टप्पे असतात :
१. चेष्टा करायची
२. निंदा करायची
३. छळ करून जमल्यास मारून टाकायचे
४. त्याला देवाचा अवतार मानून पूजा करायची

एखद्या विचारवंताचे बंड पहिल्या तीन उपायांनी ठेचले जात नाही, पण चौथा उपाय हमखास चालतो म्हणजे चालतोच!

विकास's picture

17 Sep 2007 - 9:05 pm | विकास

एखद्या विचारवंताचे बंड पहिल्या तीन उपायांनी ठेचले जात नाही, पण चौथा उपाय हमखास चालतो म्हणजे चालतोच!

एकदम बरोबर. तसे पहाल तर प्रत्येक मोठ्या माणसांचा (अथवा त्यांच्या विचारांचा) पराभव (अथ्वा गैरफायदा) हा त्यांच्या अनुयायांकडूनच झाला आहे.

सखाराम_गटणे™'s picture

11 Jan 2009 - 8:05 pm | सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सृष्टीलावण्या's picture

19 Mar 2008 - 5:17 pm | सृष्टीलावण्या

मुंबईत अरोरा चित्रपटगृहात रजनीकांतचे चित्रपट लागतात. ज्या दिवशी त्याचा चित्रपट लागतो त्या दिवशी रजनी अण्णाचे पंखे

१) उपास करतात.
२) पूजा घालतात.
३) सर्वांना केशर भरपूर घातलेली खीर (पायसम्) वाटतात.
४) पहिला दिवस, पहिल्या खेळाला जातात.
५) पहिल्या खेळासाठी ५ पट महाग तिकिटे काळ्याबाजारात विकत घेतात.
६) स्वच्छ पांढरा शर्ट, त्याखाली स्वच्छ पांढरी लुंगी व पांढर्‍याधोप वाहाणा घालतात.
७) हातात रजनीचे पोस्टर, मृदुंग, टाळ, मोठ्ठे गुलाबाचे हार ह्यापैकी एक घेऊन मिरवणूकीने चित्रपट पाहायला जातात.
८) जाताना रजनीचा जयघोष करतात.
९) मिरवणूकीपुढे फटाके फोडतात.
१०) जाताना रस्त्यात वाटसरूंना प्रसादम् (शक्यतो केशरी शिरा) वाटतात.

दक्षिणेत तर ह्या चित्रतारे-तारकांची मंदीरे आहेत.

>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

इनोबा म्हणे's picture

19 Mar 2008 - 5:22 pm | इनोबा म्हणे

मुंबईत अरोरा चित्रपटगृहात रजनीकांतचे चित्रपट लागतात. ज्या दिवशी त्याचा चित्रपट लागतो त्या दिवशी रजनी अण्णाचे पंखे.....
पुण्यात नाही होत.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

देवदत्त's picture

19 Mar 2008 - 7:30 pm | देवदत्त

आणि बंगळूरू ला बघितल्याप्रमाणे
१. रजनीकांतच्या पोस्टर वर हार घालतात.
२. सिनेमागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कमानीचे प्रवेशद्वार बनवितात.
३. सिनेमाच्या पहिल्या दिवशी सिनेमा पाहण्यासाठी ऑफीस/कॉलेजला दांडी मारतात.
४. सकाळी(पहाटे) ३/४ पासून तिकिटाच्या रांगेत उभे राहतात.

मीनल's picture

19 Mar 2008 - 7:53 pm | मीनल

काय वावग आहे व्यक्तिपुजेत?
माता ,पिता हे ही व्यक्तिच.त्यांची पूजा नाही करत आपण? पूजेचे स्वरूप वेगवेगळे असू शकेल.
उदा: सेवा करणे,आदराने वागणे.त्यांचे म्हणणे एकणे.

निदान हिंदू धर्म तरी व्यक्तिपुजा मानतो.
साक्षात विठ्ठलही कमरेवर हात ठेऊन माता पित्याची सेवा संपण्याची वाट पाहतात.तेही साध्य विटेवर उभे राहून!
अगदी हार तुरे ,हळद ,कूंकू ,नैवेद्य असायला हवे असे नाही व्यक्तिपुजा करताना.

पूजन मानापासून हवे.दिखाऊ नको.
पूजन कोणी कोणाचे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मग तो शिक्षक असू शकेल आई वडिल किंवा चांगला मित्र.

आपण ज्याचे मनापासून पूजन करतो ती व्यक्ती सज्जन असेल तर आपले जिवन चां गल्या मार्गाने जाईल.ती व्यक्ती आपला आदर्श ठरेल.
चोर ,डाकू यांचे पूजन केले तर जिवनाला वाईट वळण मिळेल.