लंडन मधे एका भारतीय हॉटेल मधे हा पदार्थ खायला मिळाला...http://misalpav.com/node/1291
इथे याअगोदर चर्चा झाली आहे....पण हा प्रकार जरा वेगळा वाटला म्हणून जरा ओळख काढून, ज्या शेफ ने हा बनवला त्याला गाठला आणि त्याच्या कडून रेसिपी मिळविली (जरा मिन्त्या कराव्या लागल्या :))..पण मिळाली....त्याची कृती सुद्धा वेगळी आहे...ती खालीलप्रमाणे....
फोटो दिला तर कोणीतरी गचकेल...म्हणून सर्वांच्या तब्येतीच्या काळजी मुळे हा निर्णय घेतला... :)
साहित्यः
१ लिटर वेनिला आईस्क्रीम त्याचे ७-८ गोळे(स्कूप) करावेत.
१०-१२ ब्रेडचे स्लाईस छोटे तुकडे करावेत.
५ टे.स्पून कोणताही जॅम
३/४ कप कोकोनट पावडर (डेसिकेटेड कोकोनट)
१/२ कप तांदळाची पिठी
कृती:
१. वरील ब्रेडचे मिक्सर वापरून ब्रेडक्रम्स बनवा. मोठ्या बाउल मधे काढून घ्या.त्यात जॅम आणि कोकोनट पावडर मिक्स करा.
२.आईस्क्रीम चा एक स्कूप घेऊन हाताने गोल करून चट्कन वरच्या बाऊल मधे घालून व्यवस्थीत त्याला कोटींग करा म्हणजे थोडेवितळलेले आईस्क्रीम ब्रेड शोषून घेते. सर्व बॉल्स १ तास फ्रीजर मधे ठेवा.
३.तांदळाची पिठी घेऊन त्यात थोडे पाणी घालून पेस्ट करावी.
४.एका तासानंतर वरील बॉल्स पेस्ट मधे बुडवून सर्व्ह करेपर्यंत फ्रिजर मधे ठेवा.
५.सर्व्ह करताना, कढईमधे तेल घालून एका वेळी एकच असे सर्व तळून घेणे. सारखे सारखे परतवू नयेत, एक बाजून क्रीस्पी झाली कि वडा उलटावा.
६.सर्व्ह कराताना सुरीने मधे कापून त्यावर डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व्ह करावे....
अवांतरः हा पदार्थ त्या दिवशी इतका मस्त डेकोरेट करून ठेवला होता कि, कोणाला सुद्धा हा खायला मोह होईल....पण चव :(
प्रतिक्रिया
22 Sep 2009 - 7:06 pm | पर्नल नेने मराठे
....पण चव
पान्चट होति का :?
चुचु
22 Sep 2009 - 7:09 pm | रेवती
चव कशी होती सांगितले नाहीस त्यामुळे आमचा पचकावडा झाल्यासारखे वाटते आहे.:(
रेवती
22 Sep 2009 - 11:53 pm | प्राजु
हा प्रकार मी एकदा कोल्हापूरला शिवाजी स्टेडीअम वर आलेल्या खवय्या फूड फेस्टीव्हल मध्ये खाल्ला होता.
दिसताना हा भन्नाट दिसतो... तिथे तर त्यांनी तो वडा मधून कापून त्यावर चॉकलेट सिरप आणि रंगित टुटीफ्रूटी घातली होती. चव मात्र न विचारलेलीच बरी. अगदी प्रॉप्पर पचकाच वडा!!! धड ना भजी, ना जॅम ब्रेड.. ना आईस्क्रिम...! तेव्हापासून जेव्हा जेव्हा आईस्क्रीम वड्याचा बोर्ड पाहिला फूड फेस्टीव्हल्स मध्ये तेव्हा तेव्हा पाठ फिरवली.. :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2009 - 4:22 am | दिपाली पाटिल
छान पाकृ...फोटो द्यायला हवा होत...:)
मी एका ठिकाणी खाल्लेलं फ्राइड वनिला आइस्क्रिम केकक्रम्समध्ये घोळवुन वरुन डेसिकेटेड कोकोनट लावुन डिप-फ्राय केलं होतं आणि वरुन पिठीसाखर भुरभुरवली होती आणि सोबत मँगो शोर्बे दिलं होतं...आम्हाला मँगो शोर्बेच जास्त आवडलं होतं...पण पुर्ण काँबिनेशन छान लागत होतं...
(अवांतरः वेगासला wynn मध्ये मस्त मँगो शोर्बे मिळतं...)
खरंतर आइस्क्रिमवडयामध्ये आइस्क्रिमच्या चवीत काही खास बदल होऊ शकत नाही...फारफार तर जर थोडं क्रिस्पी कव्हर+ थंड आइस्क्रिम असं आवडत असेल तर आवडू शकतो...
असाच एक बनाना फ्लाँबे नावाचा थाइ पदार्थ माझ्या खाण्यात आला होता... त्यातही राजेरी केळ्याला वरिल बॅटरमध्ये घोळवून, परत डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून तळलं होतं आणी सर्व्ह करताना टेंडर कोकोनट आइस्क्रिमसोबत त्या केळ्यांना १-२ सेकंदासाठी आग लावून देतात...त्यामुळे ते खोबरं भुरुभुरु जळतं पण आग लावल्याने चवीत फारसा फरक पडत नाही, चव अगदीच किंचित बदलते, मग आग विझवायला वरुन मध घालतात... पण फक्त अंधुक प्रकाशात १-२ सेकंदासाठी बरं दिसतं...
पण खरं 'बनाना फ्लाँबे' अगदी वेगळं असतं...
दिपाली :)
23 Sep 2009 - 4:18 am | घाटावरचे भट
आईसक्रीम वडा कधी खाल्ला नाही. पण व्हॅनिला आईसक्रीमची एक स्लॅब आणि त्याच्यावर अत्यंत गरमागरम गुलाबजाम हे एक किलर काँबिनेशन आहे. मला टंकतानाच तोंडाला पाणी सुटलंय.
23 Sep 2009 - 4:27 am | दिपाली पाटिल
मी खाल्लंय हे -- कुल्फीच्या चकतीवर गरम-गरम गुलाबजाम...मस्त लागतं..
अजुन एक गुलाबजामच्या बॅटरची जीलेबी (मावा जिलेबी म्हणतात बहुतेक त्याला)...मस्त लागते...गुलाबजामसारखीच पण थोडी वेगळीच लागते चव...
मला तर हे सगळं डोळ्यांसमोर तरंगतंय आणि त्यात नवरात्रीचे उपास... :((
दिपाली :)
23 Sep 2009 - 6:47 am | विंजिनेर
येस्स्स... हे हैदराबादी काँबिनेशन आहे. :) जहबहर्या लागते...
बाय द वे, आइसक्रिम वड्याचे आईसक्रिम वापरून केलेल्या तेम्पुराशी साम्य वाटते... हे सुद्धा भारी लागते
23 Sep 2009 - 1:33 pm | सचीन जी
पण व्हॅनिला आईसक्रीमची एक स्लॅब आणि त्याच्यावर अत्यंत गरमागरम गुलाबजाम हे एक किलर काँबिनेशन आहे.
असेच काही खतरनाक काँबिनेशन्स -
१. गरम गरम जिलेबि घट्ट अशा बासुंदीत बुडवायची. जिलेबिच्या आत बासूंदीचा छानसा लेप तयार होतो!
२. मालपुहा + बासंदी !!
23 Sep 2009 - 1:42 pm | सहज
आईस्क्रीमचा "वडा" नावातच सगळे आले आहे. :-) आपला पास.
वॅनिला आईस्क्रीम विथ चॉक्लेट ब्राउनी एन्ड हॉट चॉकलेट सॉस, प्लीज!
23 Sep 2009 - 2:19 pm | सुबक ठेंगणी
अर्थात सिझलिंग हॉट चॉको ब्राऊनी + वर व्हॅनिला आइस्क्रीमचा गोळा आणि अलादिनच्या दिव्यासारख्या दिसणा-या भांड्यातून यथेच्छ ओतलेला चॉकलेट सॉस...सुख म्हणतात ते हेच हो! :)
23 Sep 2009 - 2:29 pm | फ्रॅक्चर बंड्या
जिलेबी + कांदा कधीतरी खाउन बघा
अंड्याची भुर्जी खाल्ल्यासारखे वाटते.. म्हणजे तशी टेस्ट जिभेवर येते
खरच ट्राय करुन बघा
23 Sep 2009 - 2:42 pm | सुनील
ठाण्यातील नमस्कार हॉटेलात गेल्या अनेक वर्षांपासून आइस्क्रीम वडा मिळतो. अर्थात तो कसा बनवितात ते त्यांच्या भटारखान्यात जाऊन मी पाहिलेले नाही. बाकी स्वाती राजेश यांची पाकृ मस्त, करायलाच हवी.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Sep 2009 - 5:21 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो..!
स्वाती, जियो...
तात्या.
23 Sep 2009 - 3:06 pm | प्रभाकर पेठकर
'आईस्क्रिम-वडा' नांवचे 'खेचर' मन आकर्षित करुन घेत नाही. क्षमस्व.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
23 Sep 2009 - 6:09 pm | स्वाती राजेश
त्याचे नाव होते..Fried Ice cream Balls
23 Sep 2009 - 10:37 pm | मदनबाण
फोटो दिला तर कोणीतरी गचकेल...म्हणून सर्वांच्या तब्येतीच्या काळजी मुळे हा निर्णय घेतला...
छ्या...काय व्हो ताई...अवं फोटु म्हणजी पाकृचा प्राण की व्हो...
फोटु नसल्यामुळे पाकृ वाचलेली नाही...
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
Indian Air Force fleet 'inadequate' compared to China: Air Chief Naik
http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=3242099