आणि तिथे भारतीय गरुड उतरला ....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
22 Sep 2009 - 4:19 pm
गाभा: 

चीनच्या अतिक्रमणाच्या पार्श्वभुमीवर भारतीय वायुदलाने लद्दाख येथील अत्यानुधिक न्योमा विमानतळावर एक नवीन धावपट्टी तातडीने बांधुन घेतली आहे. चीनच्या हेलिकॉप्टर्सनी नुकताच हवाई हद्दीचा भंग करत खडकांवर लाल अक्षरांत मँडरिन भाषेमधून साइनबोर्ड रंगवल्यानंतर तातडीने हालचाल करत भारताने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
आतापर्यंत इथे फक्त हेलिकॉप्टर्स उतरत असत. पण नुकतेच वायुदलाचा शौर्यचक्र विजेता चमू, ग्रुप कॅप्टन एस. सी. चाफेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ए एन ३२ जातीचे मालवाहु विमान न्योमा विमानतळावरील नव्याने बांधण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवले.
चिनी सीमारेषेपासून ही धावपट्टी अवघ्या २३ किमीवर अंतरावर आहे. मध्यम वजनाच्या मालवाहतुकीसाठी उपयुक्त असलेल्या या सुविधेमुळे सीमेवर गरज भासेल तेव्हा तातडीने कुमक पोहोचवणे शक्य होईल.
या त्वरीत कारवाई आणि कृतीसाठी भारतीय वायुदलाचे हार्दिक अभिनंदन.

मुळ संपुर्ण बातमी इथे वाचा.
म.टा. : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5028953.cms

किंवा ही बातमी इथेही वाचता येइल.
http://www.thaindian.com/newsportal/uncategorized/iaf-gets-new-base-for-...

जयहिंद.
विशाल.

प्रतिक्रिया

विकास's picture

22 Sep 2009 - 4:53 pm | विकास

चांगलीच बातमी आहे. ह्यात बर्‍याचदा आपण संदेश देत असतो तो इथे पण दिला गेला आहे असे वाटते.

बाकी आपले राजकीय नेते आणि उद्योगधंदे आंतर्राष्ट्रीय (राजकीय) मर्यादा पाळत चीनपासून कसे चार हात ठेवून वागतील यावर बरेच काही अवलंबून होते आणि राहणार आहे.

जिस मुल्क की सरहद के निगेबान हैं आँखे |
उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता ||

विशाल, तुमच्या सतर्क राहून कळीची माहिती इथे प्रसृत करण्याखातर तुम्ही कौतुकास पात्र आहात.

भारतीय हवाईदलाच्या/लष्कराच्या या भावी-आक्रमण-निरस्तक (pre-emptive) कारवाईखातर त्यांचे हार्दिक अभिनंदन.

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 5:44 pm | सुधीर काळे

वाssssssव! खरंच या अभिमानास्पद व जलद कारवाईबद्दल भारतीय वायुदलाचे अभिनंदन!
हल्ली चिनी लोक जरा जास्तच धीट होऊ लागले होते! अशा जलद व ठाम कारवाईमुळे त्यांच्या हिमतीचे खच्चीकरण होवो हीच इच्छा!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चीनच्या दबावाला न घाबरता पुढिल कारवाई झाली तर बर, कारण आपले राज्यकर्ते कुठे कशी टोपी फिरवतील सांगता येत नाही.

संजय अभ्यंकर's picture

22 Sep 2009 - 10:57 pm | संजय अभ्यंकर

"कारण आपले राज्यकर्ते कुठे कशी टोपी फिरवतील सांगता येत नाही.."

१९६२चे युद्ध या राजकारण्यांच्या नकर्तेपणामुळे हरलो.
ले.ज. थोरातांचे "रेवेली टू रिट्रिट" पुस्तकात याबाबत विवेचन आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दिलीप वसंत सामंत's picture

23 Sep 2009 - 12:04 pm | दिलीप वसंत सामंत

पण त्या गरूडाचा रिमोट बलदंड हातात आहे का ?

हो नक्कीच !!!
http://www.8ak.in/8ak_india_defence_news/2009/09/feature-facing-the-chin...

हे पण नक्की पहा :---
http://www.youtube.com/watch?v=j80E1mHAohU

http://www.youtube.com/watch?v=Zu5gzo_wXko&feature=related
मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

Indian-Made Stealth Frigate To Add To Navy’s Firepower
http://www.indiatvnews.com/main/newsdetails.php?id=3991&pg=index

चतुरंग's picture

23 Sep 2009 - 8:13 pm | चतुरंग

आपले हवाईदल अतिशय सशक्त आहे ह्यात शंकाच नाही. फक्त राजकारणी लोकांनी कणखरपणा दाखवला की सगळे काम फत्ते होते!

दोन-तीन आठवड्यांपूर्वीचा अनुभव. मी तैवानला निघालो होतो. बॉस्टनहून - एलए मार्गे तैवान असा प्रवास होता. बॉस्टन -एलए विमानात माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पायलट होती. तो सुट्टीला निघाला होता. त्याच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या. होताहोता गप्पांची गाडी भारतावर आली. त्याने सांगितलेली हकीगत अशी की त्याने फायटर पायलट म्हणूनही काम केलेले होते. काही वर्षांपूर्वी अमेरिका-भारत अशा संयुक्त हवाईदल कार्यक्रमात त्याचे काही सहकारी पायलट्स सहभागी झालेले होते. ते जेव्हां भारतातून परत आले त्यावेळी काय म्हणाले ते त्याच्याच शब्दात -
"इंडियन फायटर पायलट्स आर अमेझिंग! दे आर सो टॅलेंटेड, दॅट दे पिस्ड अस ऑफ ईवन विथ देअर ओल्डर फायटर प्लेन्स! नोबडी कॅन बीट दीज गाईज इन दि एअर!"

माझी छाती अभिमानाने भरुन आली आणि डोळ्यात पाणी आले!
'नभ: स्पृशं दीप्तं!'

चतुरंग

श्रावण मोडक's picture

23 Sep 2009 - 8:27 pm | श्रावण मोडक

चतुरंग, येस्स. त्या वेळच्या स्टोरीसाठी या कोटचा उपयोग अनेकांनी केला होता हे आठवलं.

संजय अभ्यंकर's picture

23 Sep 2009 - 11:09 pm | संजय अभ्यंकर

चतुरोवस्की, जरा अर्थ स्पष्ट करा!
मला संस्कृत कळत नाही!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

23 Sep 2009 - 11:21 pm | चतुरंग

हे भारतीय वायुसेनेचं घोषवाक्य आहे!
'नभाला तेजाने स्पर्श करा!'

चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

23 Sep 2009 - 11:31 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

24 Sep 2009 - 9:18 am | विशाल कुलकर्णी

डोळे भरुन आले चतुरंगजी !
परिस्थिती काही असो, मी तरीही हेच म्हणेन...
"मेरा भारत महान!"

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु's picture

23 Sep 2009 - 9:31 pm | प्राजु

भारतीय हवाईदलाला मानाचा मुजरा..!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उपाशी बोका's picture

24 Sep 2009 - 11:18 pm | उपाशी बोका

ही बातमी पण वाचा.

उपाशी बोका