कवी 'अनिल' (आ.रा.देशपांडे) ह्यांची 'कुणि जाल का, सांगाल का' ही अप्रतिम रचना ही आमचे स्फूर्तिस्थान. (अवांतर - हे काव्य पं.वसंतखां देशपांडे ह्यांनी स्वरबध्द केले आहे.)
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'?
आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा
आधीच कविजनांची बरसात आहे लांबली
दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला
समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला
'सांभाळुनी' त्या सार्या कवींना मी जरासे घेतले
इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले
सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी
सार्या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी
चतुरंग
प्रतिक्रिया
18 Mar 2008 - 9:42 pm | सर्किट (not verified)
आवडले !
हे गाणे आम्चे अत्यंत आवडते आहे, म्हणून आपले विडंबन त्या नितांतसुंदर चालीत लावून पाहिले. अधे मधे खडे लागताहेत.
- (वसंतरावांचा भक्त) सर्किट
18 Mar 2008 - 10:53 pm | मुक्तसुनीत
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'?
आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा
आधीच काव्यानदीतीरी ही रांग आहे लांबली
दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली
श्वास पूर्वी आमुचा हा 'काव्य' वाचुन थांबला
समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला
सांभाळुनी सार्या कवींना मी जरासे घेतले
इतक्यात हलके पाय ते मग 'केशवाचे' वाजले
सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी
'काळजी' आता कवींची घेई हा 'रंग्या' जरी
18 Mar 2008 - 2:54 pm | सर्किट (not verified)
विडंबनांतील खडे निवडण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे, सुनीत शेठ !
जियो !!
- सर्किट
19 Mar 2008 - 5:25 am | चतुरंग
जात्याला टाकी लावल्याने थोडी कचकच आली होती ती गेली!
चतुरंग
18 Mar 2008 - 10:59 pm | अविनाश ओगले
विडंबन आवडले. खडे वगैरे सोडा. पण विडंबनासाठी कुठल्या कविता निवडाव्यात किंवा निवडू नयेत यावर चर्चा चालू आहे. माझ्या जे खावे पचण्याचे वय निघून गेले या कवितेच्या निमित्ताने.. या चर्चेत भाग घ्या...
19 Mar 2008 - 5:57 am | विसोबा खेचर
'सांभाळुनी' त्या सार्या कवींना मी जरासे घेतले
इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले
वा रंगराव, वरील ओळी बाकी मस्तच! आमचा हा केशवा जिथ्थे तिथ्थे दबक्या पावलाने फिरत असतो! :)
तात्या.
19 Mar 2008 - 8:14 am | सृष्टीलावण्या
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला
समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला
आपली आणि केशवसुमारांची प्रतिभा अजरा + अमर आहे. त्याचा श्वास थांबणे कसे काय शक्य आहे?
लोक हो, मूळ काव्याची वसंतरावांच्या आवाजातील MP3 तुम्हाला इथे डाऊनलोड करता येईल.
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
19 Mar 2008 - 8:23 am | प्राजु
आवडले. खूपच छान.
सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी
सार्या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी
आवांतर : केशवसुमार नुसति विडंबनेच लिहित नाहित. ते सुंदर गझलाही लिहितात. फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा...
- (सर्वव्यापी)प्राजु
19 Mar 2008 - 8:42 am | बेसनलाडू
ते सुंदर गझलाही लिहितात.
--- हो का? कविता लिहितात, हे माहीत होते; पण मग प्रतिसादांनची, माला या प्रकारच्या शाब्दिक दिवाळखोरीत का कसे निघाले, हा इतिहास सर्वज्ञात असावा :)
फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा...
--- अहो पेराल तसे उगवेल :) :)
(शेतकरी)बेसनलाडू
19 Mar 2008 - 9:33 am | केशवसुमार
ह्या असल्या वैचारीक दिवाळखोळी पेक्षा शाब्दिक दिवाळखोरी परवडली
पण हे वैचारीक दिवाळखोरांना कळणार कसे..
(शाब्दिक दिवाळखोर्)केशवसुमार
19 Mar 2008 - 9:04 am | केशवसुमार
चुकीची माहिती..
जालावर नीट शोधल्यास आपल्याला आमच्याच गझलेंची आम्हीच केलेली विडंबने वाचायला मिळतील..
सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही..
आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या..
असो..
केशवसुमार
19 Mar 2008 - 9:33 am | विसोबा खेचर
सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही..
आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या..
केशवाशी सहमत आहे. कंपूबाजी असली की दुसर्याच्या गझला, कविता, विडंबने तिसर्याच नावाने चवथ्या संस्थळावर प्रकाशित करायची वेळ येते! :)
ज्ञानेश्वर महाराज की जय! :)
आपला,
(महान कंपूबाज) तात्या.
19 Mar 2008 - 6:38 pm | चतुरंग
दुवा द्याल का?
चतुरंग
19 Mar 2008 - 10:22 pm | प्राजु
खरंतर, तुमची इथलि विडंबने मस्तच असतात. आणि सुरेश भटांच्या साईटवर गझलाही सुंदर आहेत. त्याची विडंबने कुठे आहेत हे सांगितलेत तर वाचेन मी नक्की. पण तुमच्यावर सरस्वतिचा वरदहस्त आहे एवढंच मला म्हणायचं होतं आणि तुमच्या (ओरिजिनल)गझला मिपाकरांना वाचायला मिळाव्यात म्हणून मी इथे तसे लिहिले.
- (सर्वव्यापी)प्राजु
19 Mar 2008 - 6:37 pm | चतुरंग
असो.
विडंबन आवडून तसे सांगणार्या, खडे निवडणार्या आणि आवडून देखील आवडले नाही असे दाखविणार्या सर्वांना समान धन्यवाद!!;)
चतुरंग
19 Mar 2008 - 7:33 pm | मुक्तसुनीत
...मूळात आवडलेले होते. म्हणूनच "खडे" काढण्याचा प्रकार केला. राग नसावा.
19 Mar 2008 - 8:04 pm | चतुरंग
अहो कोपरखळी होती. तुमची भाषेवरची पकड नेमकी आहे आणि शब्दसंग्रह चांगलाच समृध्द आहे त्याचा माझ्यासारखाला फायदाच होतो.
चतुरंग
19 Mar 2008 - 8:31 pm | सुधीर कांदळकर
प्रतिभावंतांच्या या कोपरखळ्याच होत्या हे वाचून बरे वाटले.
चतुरगराव विडंबन चान आहे. आणखी येऊ द्यात.
केसु फक्त विडंबने लिहीत नाहीत, गजला देखील करतात हे वाचून आश्चर्य वाटले नाही. आम्हाला संशय होताच. दुवा जरूर द्या.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.