भविष्यवेत्त्याना त्याचे भविष्य ठाऊक असते काय?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
20 Sep 2009 - 12:11 pm
गाभा: 

आजकाल हिंदु धर्म व भविष्य ह्यावर मिपावर भरपुर चर्चा व काथ्याकुट चालु असतो.आज एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. सदर बातमी लिन्क खाली देत आहे.
http://beta.esakal.com/2009/09/20003121/national-divya-joshi-suicide.html
एका ज्योतिष्याला त्याचे भविष्य नीट समजु नये ह्याचा खेद वाटतोय.का ज्यादा पैसा मिळवण्याचा हव्यास नडला?
आजकाल प्रत्येकाला अशा तथागतित गुरुंची का गरज वाटते ते देखिल समजुन घ्यावे लागेल. फक्त ९० लाखात ५००० कोटीचे सोने मिळते ह्यावर विश्वास ठेवणार्‍या अनिवाशी भारतियाच्या बुध्दीची किव देखिल वाटते.शॉर्टकटच्या मागे लागुन लोक आपले इतके नुकसान का करुन घेतात?अशा माता,स्वामिनी,अम्मा,बाबा,स्वामीजी,महाराजांमुळे हिंदु धर्माची आता पुरती वाट लागायची पाळी आले आहे.खर तर संन्याशानी स्वःताची अशी काही वैयक्तिक मालमत्ता जमा करायची नसते , तरी देखिल भारतात कोणताच संन्याशी गरीब? नाही. त्याचे अलिशान आश्रम,पंचतारांकित कुटी बघुन डोळे दिपुन जातात.आता ह्या स्वामिनी नी जाताना वर काय नेले?

प्रतिक्रिया

टारझन's picture

20 Sep 2009 - 12:28 pm | टारझन

बाझवला तिच्यामायला !! आपल्याला काय *ट फरक पडत नाही असल्या बातम्या वाचून !! आणि वाट लागायची कशी काय पाळी आली रे बाबा ? माझी गाडी तर निट चाल्ली आहे ! जो मुर्ख आहे तो ते डिझर्व करतो .. त्यात वाट लागते ती त्या मुर्खाची :)

कृपया असल्या बातम्या वाचा .. (जमलं तर बोध घ्या) ... आणि सोडून द्या !
उगाच "धर्माची वाट" लागण्याचा विचार करू नका :)

-(हिंदु-सिख-इसाई-मसाई-लसाई) टारझन

अवांतर :

त्याचे अलिशान आश्रम,पंचतारांकित कुटी बघुन डोळे दिपुन जातात.आता ह्या स्वामिनी नी जाताना वर काय नेले?

"कोणाला नेले ? " असा प्रश्न असेल बहुदा .. बातमी पुन्हा वाचा पाहू !!

अवलिया's picture

20 Sep 2009 - 12:39 pm | अवलिया

फक्त ९० लाखात ५००० कोटीचे सोने मिळते ह्यावर विश्वास ठेवणार्‍या अनिवाशी भारतियाच्या बुध्दीची किव देखिल वाटते

तरीच माझा आंतरजालीय काका त्याच्यासाठी हवालाने पैसे फिरवशील का असे विचारत होता... हम्मममममम !!!

हा प्रतिसाद माझ्या काकाला समर्पित.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.