माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)
लोकांचे एका ओळीच्या कौलांची संख्या व गुणवत्ता बघून मला पण कौलं काढायची हौस झाली. त्यामूळे मी खालील आगामी कौलं माझ्या नावे राखून ठेवत आहे. गरजू कौल लेखक खालील एक एक कौल त्यांच्या एकास एक लेखाच्या बदल्यात माझ्याकडून मागून घेवू शकतात. गरजूंनी या पत्यावर संपर्क साधावा. (आमच्या येथे पाहिजे तसे कौलं पाडून मिळतील. किंमत व्यक्तिपरत्वे/ स्थान परत्वे बदलेले. महाराष्ट्रीय रहिवाश्यांना खास सवलत. त्वरा करा.)
१) कौलाचे अनेकवचन काय? कौल च/ कौलं / कौले/ कौल्स इ.
२) तुम्हाला मिपा आवडते काय?
३) तुम्हाला मिपा संकेतस्थळ आवडते काय?
४) तुम्हाला (खायची) मिसळपाव आवडते काय?
५) तुम्हाला मिसळ आवडते काय?
६) तुम्हाला मिसळ पावासहीत आवडते काय?
७) तुम्ही श्वास घेतात तेव्हा काय करतात?
८) तुम्ही श्वास घेतात काय?
९) तुम्ही वास घेतात काय?
१०) तुम्ही घरी शर्ट वर असतात की बनीयनवर? (महिला मंडळ प्रश्न (यापुढे : ममंप्र) : साडी - गाउन )
११) तुम्ही अंघोळ करतात काय?
१२) तुम्ही रोज अंघोळ करतात काय?
१३) तुम्ही चित्रकार / गायक/ नट / नर्तक / पाककला निपूण आहात काय?
१४) तुमचा कॉम्पुटर चांगला चालतो का?
१५) तुमचा मोबाईल चांगला चालतो का?
१६) तुमचा स्वयंपाकाचा गॅस चांगला चालतो का?
१७) तुम्हाला साडी आवडते की ड्रेस? (ममंप्र)
१८) तुम्ही बसने जाता की रिक्षाने? (भारतीयांसाठी)
१९) तुम्ही वॉलमार्ट मधून गव्हाचे पिठ आणतात की दुसरीकडून आणतात? (अनिवासी भारतीयांसाठी)
२०) तुम्हाला भविष्य पहायला आवडते का? व का? (उत्सूकांसाठी)
२१) महाराष्ट्र हा शब्द कसा बनला.
२२) भारत हा शब्द कसा बनला.
२३) तुम्हाला काका / काकू म्हटलेले आवडते का?
२४) तुम्ही ट्रक चालवता काय?
२५) आपण सगळे लेख वाचतात काय?
२६) वेळ जात नाही म्हणून कौल काढावा काय?
२७) कौल काढल्यावे वेळ जातो (टाईमपास) जातो काय?
२८) वेळ जाणे म्हणजे काय?
२९) या कौलाला (प्रत्यू)त्तर द्यायचे काय?
अशाच प्रकारे मिक्स अँन्ड मॅच करून मला पाककृतीत पण पंचविशी/ पन्नाशी/ शंभरावी/ हजारावी गाठायची आहे.
प्रतिक्रिया
20 Sep 2009 - 8:59 am | हैयो हैयैयो
उत्तरे
कौल
माहिती नाही
सांगता येत नाही
पाव सोडून मिसळ आवडते
होय.
नाही.
विचार करतो.
दुसर्यांचे श्वास घेत नाही.
कशाचा?
घरी सूट बूट कोट टाय वर असतो कारण आमचे घर हेच आमचे कार्यालय आहे.
कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवा, उत्तर देवू.
कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवा, उत्तर देवू.
होय.
अगदी उत्तम चालतो.
अगदी उत्तम चालतो.
कां?
उत्तर 'कोण परिधान करते आहे' त्यावर अवलंबून.
टॅक्सीने जातो.
लागू नाही.
मला चिकित्सकांशी चर्चा करायला आवडते.
जसा तमिळनाडू हा शब्द बनला तसाच.
बनवणार्यांनी तो जसा बनवला तसाच.
होय. मला माझ्यापेक्षा लहानमोठी मंडळी काका म्हणतात.
एचएमवी लैसंस काढून ठेवलेले आहे.
कोणाचे / कुठले
ह्याचे उत्तर तुम्हीच द्या.
ह्याचेही उत्तर तुम्हीच द्या.
अनेक व्याख्या असू शकतात.
प्रतिप्रश्न आहेत. देवू काय?
हैयो हैयैयो!
20 Sep 2009 - 9:51 am | पाषाणभेद
वा वा. हैयो हैयैयो आपण तर चांगलीच आघाडी घेतलीत. मी फक्त माझे आगामी कौल दिले आणि आपण उत्तरे पण दिलीत. नंतर कौल काढेल तेव्हा पण उत्तरे द्या हं.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
20 Sep 2009 - 11:31 am | हैयो हैयैयो
होय ना.
सकाळी सकाळी तुमच्या कौलाची थोडी गंमत करण्याची हुक्की आली होती.
हैयो हैयैयो!