गाभा:
मिसळपावकरिता बनवलेले हे वॉलपेपर.आपणही यात हातभार लावू शकता.
कृपया आपणा कोणाकडे स्वतःच्या मालकीची असलेली छायाचित्रे(निसर्ग,प्राणी,पक्षी वगैरे) असल्यास व ती मिसळपावच्या वॉलपेपरकरिता वापवरावयास द्यायची असल्यास vinayak(dot)anivase(at)yahoo(dot)com या पत्त्यावर विरोपाने पाठवा. छायाचित्रांसमवेत एखादी कविता किंवा काव्यपंक्ती (दूसर्यांची असल्यास त्यांच्या नावासह) .
प्रतिक्रिया
17 Mar 2008 - 8:09 pm | गोट्या (not verified)
वा दोन्ही कार्य सुंदर !!!!!!!!
जे पाठीमागे वापरलेले चित्र आहे तुम्ही तयार केले आहे की कोठून डाऊनलोड केले आहे ? जर तुम्ही तयार केले आहे तर कुठली प्रणाली वापरून तयार केले ह्याची माहीती देखील येथे लिहा ही विनंती.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
17 Mar 2008 - 8:12 pm | कोलबेर
वॉलपेपर आवडले.
17 Mar 2008 - 8:19 pm | इनोबा म्हणे
पार्श्वभागातील ग्राफीक्स निलकांत यांनी पुरवले आहे.मात्र ते आपण सुद्धा तयार करु शकता.त्याकरिता स्कॅनरचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो.
आधी वेगवेगळ्या नक्षी कागदावर काढा,नंतर त्या स्कॅन करा.सगळ्यात शेवटी फोटोशॉप या प्रणालीचा वापर करुन त्यात हवे तसे रंग भरा.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
17 Mar 2008 - 8:15 pm | प्राजु
अतिश्य सुंदर आहेत हे ...
तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे..
- (सर्वव्यापी)प्राजु
17 Mar 2008 - 8:53 pm | छोटा डॉन
विनोबा , विनोबा आत्तापर्यंत कुठे होता राव ?
पहिले वॉलपेपर तर लैच खतरनाक जमले आहे .... मानलं राव ...
एकंदरीत पाहता अशी चित्रे तयार करण्यात तुम्हास आता प्राविण्य प्राप्त झाले आहे [ च्यायला लैच पुणेरी झालं]
तात्या कुठे तरी डकवायचं बघा आता ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
17 Mar 2008 - 9:17 pm | चतुरंग
झकास झाले आहे.
ही सगळी कलाकुसर आधी कागदावर काढली होती की काय? तसे असेल तर भलताच छान हात आहे चित्रकाराचा.
सुरेख भित्तिचित्रे आहेत! मला दोन्ही आवडली.
चतुरंग
17 Mar 2008 - 9:36 pm | मुक्तसुनीत
प्रकार खूप आवडला !
17 Mar 2008 - 9:48 pm | आजानुकर्ण
भित्तीपत्रके आवडली.
(आस्वादक) आजानुकर्ण
17 Mar 2008 - 11:42 pm | नंदन
दोन्ही वॉलपेपर्स आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Mar 2008 - 12:57 am | इनोबा म्हणे
निलकांत यांनी हे ग्राफिक्स कुठून मिळवले,हे ते स्वतःच सांगू शकतील.मात्र अशाप्रकारच्या वॉलपेपरची ही संकल्पना त्यांचीच आहे.त्यामुळे या सार्याचे श्रेय त्यांनाच जाते.
याप्रकारचे वॉलपेपर आपणही तयार करु शकता.फक्त त्याकरता काही शेप्स डाऊनलोड करावे लागतील(स्वतः बनवता आले तर उत्तम). त्यानंतर फोटोशॉपमधे त्यांना हव्या त्या रंगसंगतीनुसार योग्य मांडणी करुन चिकटवता आले पाहीजे.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
18 Mar 2008 - 12:58 am | ॐकार
कल्पना, कृती आणि कार्यफल! तीनही छान!
18 Mar 2008 - 1:40 am | ब्रिटिश टिंग्या
इनायकभौ अन् नीलकांत,
लैच भारी बनलीयात वॉलपेप्रं......
तात्यांना विनंती, की मुख्यपृष्ठावर हे कुठेतरी झळकावे..
मी बी हेच म्हंतो......
18 Mar 2008 - 2:23 am | विसोबा खेचर
इनोबा,
आपली कलाकुसर पाहून खरोखरंच थक्क झालो! अतिशय सुरेख....!
लगेचंच नीलकांताला सांगून मुखपृष्ठावर चढवायची विनंती करतो...
आपला,
(ऋणी!) तात्या.
18 Mar 2008 - 7:26 am | पिवळा डांबिस
आयला, या अनिवश्यांच्या पोरामध्ये इतकं कसब असेल असं वाटलं होतं का राव!
मस्त, एकदम मस्त, इनोबा!
आपलं दिल खूष झालं रे...
पुढल्या वेळेला मुंबईला आलो ना की तुला माझ्याकडून एक पार्टी!!
-पिवळा डांबिस
ता.क.: आयला, तू शब्द लिहिण्यापेक्षा अशी चित्रंच का नाही इथे टाकत? :))))
नाय म्हणजे उगाच संडासातलं साहित्य गोळा करण्यापेक्षा ते बरं नाय काय?:))))))))))))))
18 Mar 2008 - 9:52 am | मनस्वी
कित्ती छान!
मला आवडले.
मनस्वी
18 Mar 2008 - 11:01 am | धमाल मुलगा
आयला इनोबा...
खत्तरनाक रे.
लगेच माझ्या पी.सी.वर चढवला पहिला वॉलपेपर !!!!!
एक सुचना : भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-)
18 Mar 2008 - 11:05 am | इनोबा म्हणे
भौ, तुझी चित्र॑ टाक ना अशीच. आपल्याला लै आवडेल वॉलपेपर म्हणून वापरायला. :-)
आरं येड्या,ती स्केचेस हायेत. २२ ला भेटलो की दाखवतो.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
18 Mar 2008 - 1:30 pm | माझी दुनिया
इनोबा, जरा नीट समाजवून सांगा ना कसं काय केलतं ते चित्र तयार. फोटोशॉप कुठून मिळेल फुकट :-) . ते नाहीतर दुसरं कोणतं फुकट सॉफ्टवेअर वापरता येईल ?
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
18 Mar 2008 - 4:18 pm | इनोबा म्हणे
फोटोशॉपची ट्रायल वर्जन मिळतील (Adobe Photoshop CS2 (9.0.2)/Adobe Photoshop CS (8.0)/Adobe Photoshop 7.0)
किंवा डाऊनलोड डॉट कॉम या संस्थळावर(फोटो/ग्राफिक्स संबंधी) अशी भरपूर सॉफ्टवेअर फुक्क्ट मिळतात.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
18 Mar 2008 - 1:39 pm | विवेकवि
आपली कलाकुसर पाहून खरोखरंच थक्क झालो! अतिशय सुरेख
विवेक वि.
18 Mar 2008 - 3:04 pm | संजय अभ्यंकर
इनोबाजी,
चित्रे आणी कविता, दोन्हीही झकास!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
18 Mar 2008 - 5:07 pm | प्रेमसाई
अतिशय उत्तम
हे काम कोरल मधिल वाट्त