स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी)
मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल
चला रेडी का?
करू सुरुवात?
तर कथा सूत्र असे ठेवायचे आहे की...........
एक चाळ आहे त्यात रहाणारे पोंबुरकर यांचा मुलगा मोहीत आणि कळस्कर यांची कन्या यांचे सूत जुळले आहे
घरी सांगितल्यावर चाळीत थोडासा दंगा होतो.घरची मंडळी तयार होतात्.लग्न थाटात झाले पहीजे या अटीवर.
चाळकरी लग्न थाटात करण्याचा घाट घालतात....( पुढचे कसे ते वेळ आल्यावर सांगतो)
तर मंडली करुया सुरुवात" स्पिन अ यार्न" ला................................
अरे तो पोंबुर्कर काय म्हणतो ते मला माहीत आहे. चाळीत थाटात लग्न काय झाली नाहीत? हजार जेवण झाले पहीजे म्हणतो...याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो. बाबा कळस्कर गर्जत होते. चाळीच्या दहा घरात तरी त्यांच आवज पोचत असेल. मुलीने परस्पर लग्न ठरवले याचे त्याना थोडे अश्चर्य थोडासा धक्काअणि थोडसा आनंद असे संमिश्र काहीतरी वाटात होते. माला बाईना मुलगी डोळ्यासमोर रहाणार याचे बरे ही वाटत होते आणि त्याच वेळेस मुलगी चाळीतच रहाणार याचे वाईट ही वाटत होते.
प्रतिक्रिया
18 Mar 2008 - 11:14 am | विजुभाऊ
अहो जरा हळु बोला ना.त्याना सगळे ऐकु येइल.इतके काही वाइट स्थळ नाही मोहीत चे. मालाबाई गॅसवर "नुस्तं" ढवळीत बोलल्या. आता वरपिता म्हंटला की काहीतरी अटी घालणारच की.
अग पण आपण कधी घातल्या होत्या अशा आटी. माझ्या लग्नात तर ....मला अजून आठवतेय ते ..नुसती मुलगी द्या आणि नारळ एव्ढच म्हंटले होते आम्ही.....बाबा कळस्कर .
काही सांगु नका तुमच्या लग्नाचे..माझ्याशीच झाले ना...मला माहीत आहे.दादानी समोर एक सांगीतले आणि माझ्या बाबांशी वेगळेच सांगितले.....आमची काहे मागणी नाही फक्त लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करा नवर्याचा सासु-सासर्यांचा पोषाख्..मान्पान एव्ढेच तुम्ही करा...मालाबाई शक्य तेवढा चेहेरा शांत ठेवत म्हणल्या
अहो आपण मंदाच्या लग्नाचे...आपल्या कन्येच्या लग्नाचे बोलत आहोत आपल्या लग्नातल्या गोष्ष्टींबद्दल नाही...बाबा कळस्कर
19 Mar 2008 - 12:59 pm | विजुभाऊ
स्पिन अ यार्न्......म्हणजे गोष्टी मधे वाक्ये ऍड करणे...आणि गोष्ट पुढे नेणे..
यात ठरवुन काहीच होत नाही...एखादी ओळ गोष्टीला काय मार्ग देइल हे सांगता येत नाही.मजा येते त्यामुळे.
भेळ बनवायला जातो आणि शिरा होतो ना तसे.......
मराठीत असा प्रकार वापरुन "काचापाणी.....एन " हे कादंबरी दहा लेखकानी मिळून लिहीली आहे. गंमत म्हणजे त्या दहा जणांचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हते आणि ते सगळे एक गावातही रहात नव्हते
बघा जमतय का.
18 Mar 2008 - 12:16 pm | मनस्वी
इकडे पोंबुरकरांच्या घरी :
पोंबुरकर : आंऽऽ आता खरी मज्जा येईल बाब्याची. एकेकाळी पगार जास्त म्हणून माज करायचा माझ्यावर.. घाल आता हजार जेवणं.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा.. काय म्हणे पराक्रम केलाय!
पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे..
18 Mar 2008 - 12:30 pm | सृष्टीलावण्या
अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा..
हजार जणांसाठी ३०० पत्रिका लई झाल्या. ५ जणांच्या कुटुंबासाठी घरटी १.
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
18 Mar 2008 - 2:05 pm | मनस्वी
सौ पोंबुरकर : हो हो.. मला नका शिकवू हो.. काय पण गणित मांडलय.. हिच हुशारी जर नोकरीत लावली असती (रडवेल्या होउन) तर आज माझ्यावर चाळीत रहायची वेळ नसती आली.. तरी बाबा म्हणत होते या पोंबुरकरापेक्षा मुटक्यांच्या दिनकराचे स्थळ चांगले आहे.. माझं नशिब दुसरं काय!
आणि काय हो... लग्न करून देउन बाकीचे गुंडाळायला कोणी सांगितले तुम्हाला.. चांगला इंजिनिअर आहे आपला मोहित. माझ्या बाबांना तर चांगले लुबाडले होते तुम्ही. तेव्हाच माहित असतं हे असं ध्यान गळ्यात पडणार आहे तर मुटक्याशीच लग्न केलं असतं मी.. माझं नशिब दुसरं काय!
18 Mar 2008 - 7:47 pm | विजुभाऊ
पोंबुरकर: (मनातल्या मनात) मुटकेंचे नशीब चांगले होते.दुसरे काय!
18 Mar 2008 - 12:14 pm | सृष्टीलावण्या
याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो.
तरी तुम्हाला सांगत होते की कमलचे अठरावे लागताक्षणी उरकून टाकू पण माझं मेलीचं ऐकायला वेळ कोणाकडे आहे पण तो बघतोय सर्व वरनं. बघा, काहीतरी चमत्कार होईल आणि कमल शेवटी वन्संच्या मावसबहिणीचा गोपू आहे त्याच्याच गळ्यात माळ घालेल. मी तसा सोन्या मारुतीला नवस सुद्धा बोललेय. गोपू भले दिसायला कसा का असेना पण आज रग्गड कमावतोय...
आपल्याला पै सुद्धा खर्च करावी लागणार नाही. तो हजार पानं लग्नात उठवील ती पण चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात.
>
>
आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
18 Mar 2008 - 2:17 pm | विजुभाऊ
पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे..
पण काय करायचे..हा लग्न पत्रिका छापायच्याच नाहित्...सरळ
वर्तमान्पत्रातच बातमी द्यायची.....नको....हा नाहीतर मी सरळ कळस्करानाच सांगतो एकत्रच पत्रिका काढुया म्हणुन् . नाहीतरी दोघांच्या ओळखी एकच आहेत.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): बाकी काही म्हणा आपल्या मोहीत ने मुलगी छान पाहिली हो . तुम्हाला सांगते मला मंदा लहान्पणापासुन आवडत होती. तेंव्ह कळले असते तर तेंव्हाच
लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता
पोंबुरकर : वा वा ! काय पण विचार आहेत म्हणे .....तेंव्हाच लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता आपल्या मोनीत बरोबर त्या मुलीला सांभाळण्याचा खर्चही
आला असता त्याचे काय?
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो एकुण एकच पडले असते जावै म्हणून मोहीतचा खर्च त्यानी नसता का केला? शिवाय सणावारी प्रसंगावारी काही केलं असते ते निराळेच.शिवाय
मला मालाबाईंची विहीण म्हणुन मी प्रत्येक वेळी मिरवले असते......चाळीतल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची मदत झाली असती ते वेगळच. झालेच तर
भांडणात सुद्धा त्या माझ्या बाजुने समर्थ उभ्या राहील्या असत्या...
पोंबुरकर: बास बास स्वप्न रंजन बास झाले.............लग्नाच्या तयारी चे बघा.....
18 Mar 2008 - 2:22 pm | धमाल मुलगा
बाबा कळसकरः ह॑...जे जे होईल ते ते पहावे झाल॑.कार्टीन॑ माझे जोडे झिजवण्याचे पैसे वाचवले खरे, पण हलकट पो॑बुर्या माझ॑ दिवाळ॑ काढणार दिसत॑य! बघू, निघेल काही मार्ग. शेवटी आपली काळजी त्या व्य॑कटेशाला.
मालाबाई: अहो, बसलाय व्य॑कटेश तिकड॑ तिरुपतीला निवा॑त, बसुदे की.क्काय बाई माझ॑ नशिब, असला नवरोबा कपाळी लिहिलाय.
जरा माझ॑ ऐका, त्या म॑देचे कान धरून उपटा चा॑गले! कसले मेलीला भिकेचे डोहाळे...काय तर म्हणे चाळीत काय माणस॑ नसतात का? त्या गोप्याशी लग्न कर म्हणाव॑. चा॑गल॑ खडसावा तीला.
(इकडे चाळीच्या गच्चीत मोहित आणि म॑दा कठड्याशी था॑बून गप्पा मारताहेत. नेहमीप्रमाणे मोहित कठड्यावर बसलेला आणि म॑दा शेजारी उभी, कठड्याला रेलून खालची रहदारी निरखत. गच्चीच्या दुसर्या कोपर्यात मोहितची मित्र-भुतावळ नेहमीसारखी राखणीसाठी हजर. अर्थात आता गरज नसली तरी सवयीने रे॑गाळलेले)
दिन्या (मित्र१): च्यामायला, मोहित्याच॑ झे॑गट फिक्स झाल्यापासन॑ लै बोअर होत॑य यार!
पक्या (मि.२): होणारच ना बे! म॑दीबरोबर किर्ती आणि राधिका यायच्या ना...साल॑ हल्ली त्या॑ची गरजच नाय उरली म॑दीला. फुक्काट आपली पण बो॑ब झाली ना बे! ती राधी काय जबरा लाईन द्यायची आपल्याला...
दिन्या:हा॑ !! लाईन द्यायची...बेन्या मग आता काय झाल॑य? बघत पन नाय ती तुझ्याकड॑
पक्या: अबे तिचा बा पोलिस हाय ना यार..घाबरतीये ती. म॑दीला सा॑गायला पायजे आनत जा बरोबर..तेव्हढ॑च आमच॑पन गाड॑ लागल॑ रा॑गेला तर बर॑च की!
दिन्या: हा॑ ना यार, आपला पण जीव त्या किर्तीपायी होतो वरखाली...किती पायर्या किती मजले वरखाली....
पक्या: ए..गप ना बे भैताड..साल॑ कुठुन चारोळ्या चारोळया खेळून येत॑ आणि इथ॑ आमची खोपडी झ...! गप साल्या गप नायतर रात्री तुला एक पेग कमी.
असा मित्रा॑चा प्रेमळ सुखस॑वाद चालला असताना मोहित आणि म॑दा मात्र गहन विषयावर बोलत आहेत. चेहेरे ग॑भीर, वातावरणात ताण.
म॑दा: असे कसे रे तुझे बाबा? वाट्टेल ते कस॑ मागतायत?
मोहितः मी तरी काय करु?
म॑दा: बस रडत.बाहेर नुसत्या फुशारक्या..मी य॑व करतो अन् त्य॑व करतो. बाबा॑पुढे मात्र न॑दीबैल.
मोहितः बाई ग, त्या॑नी लग्नाला परवानगी देताना मला किती छळल॑य तुला माहित नाही.सध्या घरी सीन टाईट आहे ग॑. तू जरा धीर धर. मी करतो काहीतरी...
म॑दा: काहीतरी म्हणजे? हे बघ, गेल्या दोन दिवसा॑पासून आपण नुसते भा॑डतोय. अरे लग्न ठरल॑य तर ही अवस्था, तर झाल्यावर काय होणार? जरा मोकळेपणाने बोल की काही. का असा बघतो आणि करतो अशी उडवाउडवी करतोस? जीव टा॑गणीला लागलाय माझा. माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑??
19 Mar 2008 - 9:40 am | मनस्वी
फडके काकू (आपल्या मुलीला) : पाहिलंस ना कार्टे.. जरा शिक त्या मंदीकडून.. कसा इंजिनिअर गटवलाय तिनं.. ते पण चाळीतल्या चाळीत.. हुंडा नाही नि काही नाही..
राधी : ह्याऽऽ आपल्याला काही चाळीत रहायचं नाही.. आपण डायरेक्ट तिकिट काढणार.. अमेरिका.. काय?
फडके काकू : कप्पाळ.. आधी ग्रॅज्युएट होउन दाखव.. २ वर्ष झाली विषय सोडवतीये.. अन् चाललीये अमेरिकेला.
राधी (मनातल्या मनात) : मोर्यांचा अमित जाणारे म्हटलं अमेरिकेला.. अमू ने फक्त मलाच सांगितलिये ही गोड बातमी.. हिला कळलं तर घेरी येउन पडेल.. साधं देशपांड्यांचं स्थळ नाकारलं कोकणस्थ नाही म्हणून.. एकदा जाउदे माझा अमू अमेरिकेला.. सगळ्यांचीच तोंडं गप्प करीन.
18 Mar 2008 - 3:37 pm | आनंदयात्री
हा मोहित नुसता रडकाच आहे काय करतोय कोण जाणे. उद्या मोर्यांच्या अमितने सी.सी.डी. मधे बोलावलेय, कित्ती दिवसांपासुन बोलावतोय तो ! जातेच कशी उद्या. ती राधी शेंबडी उगाच गुलुगुलु करत असते तिच्याशी, म्हणत होती अमेरिकेला जायच अन काय काय. ती काय करणारे अमेरिकेला जाउन ? धड बोलता तरी येते का चार लोकात ? बिच्चारा अमित, समजावते त्याला उद्या, चांगला मित्र आहे माझा तो. त्याला मीच सांभाळायला हवे !
18 Mar 2008 - 3:54 pm | विजुभाऊ
म॑दा:माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑??
मोहितः अरे वा माझे वडील असे वागतात ही जणु माझी च चूक असल्यासारखी बोल्तेस की.
मंदा: पण तू त्याना काहीही सांगु शकत नाहीस .असच ना?लग्नानंतर ते मला काही बोलले तरी तू असंच वागणार
मोहीतः अग मी तसे कुठे म्हंटले.
मंदा:म्हणायची काय गरज आहे?
मोहीतः अग बाई माझे आई....थांब मला जरा विचार करू दे.
मंदा: विचार करु दे विचार करु दे विचार करु दे..........काहीही विचारल तरी हेच उत्तर देतो आहेस तु....
कर नुसता विचार कर्........
मोहीतः दिन्या .....ए दिन्या....
दिन्या: काय रे....
मंदा: बीडी दे जरा.
पक्या/दिन्या: बीडी?
मंदा: बीडी?
मोहीतःहो बीडी.
दिन्या: मंदे किसिंग अ स्मोकर इज लाइक लिकींग ऍन ऍश ट्रे.....
मोहीतः दिन्या इथे मला जीव द्यायचे वेळ येणार आहे आणि तुला चेष्टा सुचतेय?
दिन्या: ओ सॉरी सॉरी.....कसले टेनशन आहे?
मोहीतः महाटेन्शन म्हण्...बाबा माझ्या लग्नाला एक पैसाही खर्च करणार नाहीत.
दिन्या: यात काय टेन्शन सारखे...........रजिस्टर मॅरेज करा की.
मोहीतः त्याना ते ही नकोय.लग्न थाटामाटातच कर म्हणतात.
पक्या: लग्न थाटामाटातच कर म्हणतात आणि एक पैसाही खर्च करणार नाहीत..तुझे बाबा गेल्या जन्मात काय अरेबियन
नाइट्स मधले सुल्तान होते की काय रे.....घडा फोडायचा नाही आणि अक्कल मात्र काढुन घ्या?
मंदा: काय?
दिन्या:त्यावेळी निदान त्यान प्रश्नाची उकल देणारे कोणीतरी असायचे दरबारात
मंदा: ए मला सांग की ती गोष्ट.
मोहीतः ए अरे गोष्टी कसल्या करताय्...........मार्ग काढा.मार्ग
काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....
18 Mar 2008 - 5:00 pm | धमाल मुलगा
आयडिया.....पक्या आवेशाने ओरडला.त्या आवाजाने दचकून मोहीतच्या हातातली सिगारेट त्याच्याच मा॑डीवर पडते..तोही केकाटतो. डबल धमाका झाल्याने म॑दा बावरते, काय करावे हे न सुचून पटकन मागे सरकते तर दिन्या पक्याकडे हात पसरुन बघत असताना त्याच्या हाता॑च्या मधोमध शिरल्याने म॑दा त्याच्या मिठीत जाऊन पोचते.
पक्या सुन्न...मोहीत सर्द आणि दिन्या ठार बधीर...म॑दी लाजून आणि बावचळून काय करावे हे न सुचल्याने तशीच दिन्याच्या मिठीत !
एव्हढ्यात आण्णा भे॑डे उर्फ समस्त चाळकरी पोरट्या॑चे लाडके आण्णाकाका किर्तीला घेऊन गच्चीत येतात.
आण्णा: शिव शिव शिव...रा॑डेच्च्याहो, अरे हे काय ध॑दे चाललेत? रवळनाथा, हे काय बघतोय मी!!!!
दिन्या: ओ काका, काहीतरी बोलू नका. चूकून झाल॑ अस॑.
आण्णा: चुकून? शि॑च्या मोहीत समोर दिसत असताना ही म॑दी रा॑डेच्ची तुझ्या मिठीत? आणि चुकून? अग गधडे, लग्न ना ठरल॑य तुमच॑? काय चाललय काय?
पक्या सगळी कथा आण्णा॑ना सा॑गतो तेव्हा कुठे ते शा॑त होतात.
दिन्या: ए किर्ते, तू काय करतेयस आण्णाकाका॑बरोबर? आणि ह्यावेळी? तेही इथे गच्चीत?
आण्णा: दिन्या, लेका माझ्या पोरीसारखी ती. कसले प्रश्न विचारतोस रे बैला! ती माझ्याशी बोलायला आली आहे. पण ते न॑तर बोलू आम्ही. पकूबाळा, कसली आयडिया आहे तुझी?
पक्या: ह्या मोह्यत्याच्या बापाला लग्न फुकटात करुन हव॑य. म॑दीचा तात पण पेटलाय. हे दोघ॑ फुल्ल्टू टे॑शन्मध्ये आलेयत. मग आपन एक आयडिया काढलिये. सरळ ह्या दोघा॑नी पळून जाऊन लग्न करायच॑. आपली टोटल सेटी॑ग आहे. काय टे॑शन घ्यायच॑ नाय. म॑त्र म्हणायला गुर्जीपासुन ते ऍफिडेव्हीट करणार्या वकिलापर्य॑त आपण सगळी एवस्था लाऊ शकतो.
मोहीतः हो! आयडिया चा॑गली आहे. त्यात थोडी ऍडिशन कर पकूबाळा, पळून जाऊन लग्न केल्यावर आमचा जमदग्नि आम्हाला घरात काही घेणार नाही, तेव्हा आमच॑ स्वतःच॑ घर होईपर्य॑त म्हणजे एक ३-४ वर्ष॑ आम्ही तुझ्या घरी रहायला यायच॑. कस॑?
आण्णा: ए कार्ट्या॑नो उगाच भा॑डू नका. मला विचार करु द्या.
दिन्या: घ्या आण्णा....बिडी घ्या ! ....(समोर किर्तीला बघून) म्हणजे माझी नाहेय्ये ती...पक्यान॑ ठेवायला दिल्यात.
आण्णा: दिन्या फोकलिच्या, हल्ली तू जास्तच मोकाट सुटलायस. बापसाला सा॑गायला पाहिजे.
आण्णा गहन विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना......
=========
च्छ्या...पुढच॑ टाका बॉ कुणितरी...आपल्याला तर मार्ग सुचत नाही काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....
18 Mar 2008 - 5:42 pm | विजुभाऊ
आण्णा विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना......
इकडे कळस्करांच्या घरात वेगळेच रामायण घडत होते.
बाबा कळस्कर :हजार पान जेवण घालणे ह्याच्या कोणी घातली होती एव्ढी जेवणे.....त्या पेक्षा मी म्हणतो की आमच्या
घरात तीन वर्षे एक वेळा जेवायला ये...तुलाच एकट्याला हजार जेवणं घालतो...
मालाबाई : एवढे वैतागु नका...
बाबा कळस्कर : वैतागु नको मग काय करु
मालाबाई: वैतागुन प्रश्न सुटत नसतात....
बाबा कळस्कर : हे मला माहीत आहे....मीच तुला सांगितलय हे...वैतागलेल्या माणसाला हे वाक्य ;न वैतागलेला माणुसच
सांगु शकतो.
मालाबाई: मग वैतागा....भरपूर वैतागा..........आम्ही मेलं काही सांगायला गेलो की वैतागायाचे उगाच्....कशाला
बायकांच्या जन्माला घातलस रे रवळनाथा.पुढचा जन्म पुरुषाचा दे रे बाबा.....आणि ह्यांचाच नवरा कर रे
रवळनाथा. आख्खा जन्म वैतागण्यात नाही घालवला तर शपथ.....
बाबा कळस्कर : जरा शांत बसता का?
मालाबाई : हम्म्म्म
बाबा कळस्कर : मी काय म्हणतो....
मालाबाई काहीच बोलत नाहीत
बाबा कळस्कर " मी काय म्हणतो...." हे वाक्य तीन वेळा म्हणुन आणखी वैतागले...अहो ऐकताय ना मी काय म्हणतोय ते
हो ...चांगले ऐकु येतय्.कान अजुन फुटले नाहीत माझे.इति मालाबाई.
मग हो नाही तरी म्हणा ना.बाबा कळस्कर
तुम्हीच म्हनालात ना की जरा शांत बसता का म्हणुन्...मालाबाई.
छे ! चूकले माझे. आता बोलतो ते ऐका जरा
सांगा
मी काय म्हणतो....
सांगा ना काय ते
आपण पोंबुरपेकराना एकदा सांगु का लग्न साधेपणी करुया म्हणून.
कशाला ? त्या पुष्पाबाई महीला मंडळात प्रत्येक वेळा उकरुन काढतील.....
मग मार्ग काढा यातून.........
18 Mar 2008 - 6:19 pm | इनोबा म्हणे
आयला! कधी लग्न लागायचं.हिथं वर्हाडी लोकं भुकंनं कोकलंत बसलेत. जेवण नाय तर एखादी चपटी तरी द्या.
असो,छान चालू आहे.किप गोईंग्.एकता कपूरच्या सिरीयलवानी अखंड चालू राहू द्या.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
18 Mar 2008 - 6:23 pm | धमाल मुलगा
आर॑ बाबा इनोबा, रिकाम्यापोटी चपटी मारु नये. आगडो॑ब उसळतो पोटात. वर ऍशिडिटी होते ती वेगळीच..
दम धर बाबा जरा...असा नको त्या मोहीतच्या गुढग्याला बाशि॑ग बा॑धू !!!
18 Mar 2008 - 7:43 pm | विजुभाऊ
इकडे पोंबुरकरांच्या कडे
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): लग्नाचे काय बघा...एकदा तारखा ठरू द्या....मग कमावन्सना कशी मस्त पैठणी नेसून जळवते
पोंबुरकर: तुम्ही नुसत्या पैठणीच नेसा बाकी काही विचार करु नका.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पैठणी म्हंटले की मला काही सुचत नाही.तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले. पण तुम्ही ........ह!
पोंबुरकर: लग्न आपल्या मुलाचे आहे....तुमचे नाही
पुष्पाताई (सौ पोंबुरकर):हो इतके काही वाकडे बोलायला नको
पोंबुरकर: मग किती बोलु? बर ते जाउदे लग्न मला वाटत होते की मोहीत ने एखादी करोड्पती नाहीतर किमान दशलक्षपतीच्या मुलीशी तरी जमवायला हवं होते.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तशी मुलगी चाळीत नसती राहीली. आणि मोहीत ने केले ते पूर्ण विचार करुन केले असावे. मंदा नाहीतरी एकटीच आहे. त्यांचा ब्लॉक आपल्या मोहीत्लाच
मिळेल ना.
पोंबुरकर: अरे माझ्या ते लक्षातच आले नाही. मी उगाच कळस्कराना अटी घातल्या.त्याला जमल्या नाहीत तर उगाच लग्न मोडेल.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तुम्हाला मुळी गोष्टी जरा उशीराच समजतात.
पोंबुरकर: "काहीही खर्च न करता थाटामाटात लग्नं..." ही अट कोणी मला घातली असती तर मी त्याला वेड्यातच काढले असते.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): हो ना
पोंबुरकर: काय?
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): काही नाही
पोंबुरकर : मला वाटते की आपणच त्याला काहीतरी मदत करायला हवी यात
पुष्पाताई (सौ पोंबुरकर):करा करा..आपणच अटी घालायच्या आणि आपणच त्या साठी मदत करायची........लोक हसतील..तोंडात शेण घालतील
पोंबुरकर: एवढे काही वाईट लागत नाही ते........
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): का ........य?
19 Mar 2008 - 12:01 pm | विजुभाऊ
पोंबुरकर: काही नाही काही नाही तुम्ही बोला
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): आपणच आटी घालायच्या आणि मोडायच्या ही आपणच?
पोंबुरकर: या आटीच्या घोळात अडकुन कळस्करानी लग्न मोडलं नाही म्हणजे झालं.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): कशाला मोडताहेत ....लग्न मोडणे म्हणजे चेष्टा नाही...शिवाय मुलीची जात
पोंबुरकर: त्याचं तुम्ही सांगु नका लग्न आपल्यामुळे मोडले हे जरी लोकाना कळले तरी मोहीत चे अवघड होइल्..स्थळे येणार नाहीत.
पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पण मग हा घोळ निस्तरायचा कसा.
इकडे चालीत सगळ्याना या अटीची कुणकुण लागली होती.
त्याचे असे झाले की "ही अशी अट मी घालतो आणि त्या कळस्कराची जिरवतो "असे पोंबुरकरानी पुष्पाताई ना कुजबुजत सांगीतले..
पोंबुरकर हे मेकॅनिकल इंडस्ट्री,मधे काम करायचे..त्यांचे साधे बोलणे सुद्धा जोरात कामगार सभेत घोषणा देत असावेत अशा आवाजात व्हायचे. त्यानी पुष्पाताई कानात कधी खाजगी प्रेमळ संवाद केला असेल त्या वेळी पुष्पाताईंच्या कानाचे काय झाले असेल अशी चाळीत नेहमी चर्चा चालायची.लहान मुले तर त्यांच्या आवाजला जाम टरकुन असायची. शोलेतल्या गब्बर सारखे " झोप नाहीतर पोंबुरकर काका हाक मारतील" येवढ्या दमावर मुले नुकतीच झोपेतुन उठली असली तरी पुन्हा झोपुन जायची.
या असल्या अवाजात झालेले गुप्त खलबततीन दारे पलीकडल्या फडकेंच्या राधा ने ऐकले. जणू आपलेच लग्न ठरले असावे अशा मोहोरलेल्या अवस्थेत तिने ते गुपीत आपल्या आईला अत्यंत खाजगी आवाजात सांगितले. अगोदरच फडके काकुना ऐकु कमी यायचे अन त्य्यत कानत खूस्फूस बोलणे म्हनजे वैताग्....त्यानी कार्टे नीट बोल की..आणि "काय म्हणलीस पोंबुरकरानी लग्नासाठी आटी घातल्या" असे कमी ऐकु येत असलेल्या कानाने ऐकु यावे अशा अवाजात आश्चर्य व्यक्त केले.
झाले चाळीला "प्रकट निवेदन " मिळाले...
पोरे सोरे सुद्धा "मार्ग काढा.मार्ग काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग ....रेडी का?" अशा घोषणा १०, २०, ३०, ४० ....८० ९० १०० रेडी का? या ऐवजी देउ लागली.
19 Mar 2008 - 12:17 pm | विजुभाऊ
सगळ्या चाळीत चर्चा लग्नाचीच होती.अणि लग्नापेक्षाही बाबा कळस्कर हा काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग कसा शोधतात यावरच होती. संसदेत असा चर्चेचा प्रस्ताव आला असता तर शेअर मार्केट नक्की ४००/५०० अंकानी कोसळले / वाढले असते.
मुलाना परीक्षा अभ्यास याही पेक्षाहा मोठा विषय वाटत होता. चाळीच्या गणेश मंडाळाने तर यंदाचा देखावा हा "काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग" नक्कीही केला . सगळे आपपल्या परीने यावर चर्चा करत होते.
लोकशाही नुसार बाबा काका नी विरोधी पक्षाकडे तक्रार करावी.चि.पराग ...वय वर्षे ११
लोकशाही पेक्षासुधा मला काय वाटते की बाबा कळस्कर काकानी हा विषय शिवसेनेकडे सांगावा ...कु.चिंगी वय वर्षे १०
त्यापेक्षा आपण हे सगळे त्या श्रीशांत ला सांगुया तो पोंबुरकराना मस्त दम देइल. आणि झालेच तर सायमंड आणि भज्जी ला पण बोलवुन ठेवु भांडण झालेच तर हे खूप महत्वची ठरतील्......चाळीचा क्रिकेट कॅप्टन अरिंदम वय वर्षे...८
तू काय लेका भांडणार ! पोंबुरकर काकु किती शक्तिमान आहेत माहीत आहे का तुला?इती ..बनी (खरे नाव शतसहस्रीका )खरे वय ६
छ्या माझे डॅडी त्यांच्या पेक्षा खूप शक्तिमान असतील्.....ते रोज बूस्ट पितात्......आणी मी सुद्धा बूस्ट पितो...मी मोठा झालो की पोंबुर्कर काकू ना पाठीत एक जोरात धपाटाच घालणार आहे....चे.चिरंजीव पानसरे उर्फ टिंकू.वय पाच च्या खाली.
ईकडे या अशा गप्पा चालल्या होत्या तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते.
19 Mar 2008 - 2:54 pm | विजुभाऊ
तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते.
आण्णा भे॑डे :काही तरी मार्ग काढायला हाव
मार्ग कसला काढताय? मागच्याच महीन्यात सगळा रस्ता उकरून ठेवला होता. रस्ते वाहने चालवण्यासाठी असतात का उकरण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी तेच कळत नाही...नाना पावशे
अहो नाना तो मार्ग म्हणत नाही मी. ह्या मोहीत च्या लग्नात जे विघ्न इभे राहीले आहे त्या बद्दल म्हणतोय..
विघ्न आणणारांना बाजुला करा.शेवटी चाळीचे एकी काय कामाची...एकीचे बळ हेच खरे बळ...
नाना खरे आहे तुमचे....त्या एकीमुळेच हे विघ्न उभे राहीले आहे
म्हणजे? नाना बुचकळ्यात पडले..
अहो त्या एकीमुळे म्हणजे सौ.पोंबुरकर त्यांच्यामुळे च हे घडले आहे.आणाना इथे सुद्धा जोक करावासा वाटत होता.पण मोनीत ची चिंता त्यांच्या चेहेर्यावर साफ दिसत होती. या वेळी बंडोपंत असायला हवे होते. बंडोपंत चालीतला हरहुन्नरी माणुस गेल्याच वर्षी वारले ते.अण्णांच्या गँग मधला खंदा वीर हरवला.चाळीचा गणेशोत्सव बंडोपंतानीच सुरु केला होता.
कोण्त्याही समस्ये वर बंडोपंत हमखास उपाय सुचवायचे
नाना आज बंडोपंत असते तर त्यानी काय सुचवले असते यावर्.नाना पावशे काहीतरी सांगतील असे वाटुन अण्णानी चौकशी केली.
मी पैजेवर सांगतो त्याना असला प्रश्न कधी पडला नसेल.
कसली पैज ? मीस सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले.
19 Mar 2008 - 6:39 pm | विजुभाऊ
कसली पैज ? मी सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले.
पैज म्हंतले की बर्वेंचा उत्साह नेहमीच ऊतू जायचा.ते कशावरही पैज लावयला तयार असयचे. साधा दगड फेकला तरी तो एक्झॅट कोठे पडेल यावर सुद्धा ते पैज लावायचे.
19 Mar 2008 - 7:52 pm | विजुभाऊ
मोहीत च्या लग्नावर ते काय पैज लावता याची सगळ्याना उत्सुकता होती. मी सांगतो हे लग्न होणार.....१००% होणार्.....बर्वे असे बोलल्यावर सर्वानाच जरा बरे वाटले.कारण बर्वे नेहमीच पैज जिंकायचे.
हे बघ बर्वे तू पैज जिंक तुला लग्नात दोन पाने वाढतो जेवायला....आण्णा भे॑डे. पण मला सांग ही पैज कशी पूर्ण होणार? पोंबरकरांची अत कशी पुर्ण होणार?
ते मलाकाय ठाऊक्...घोड्यावर पैजा लावणारे कधी स्वतः पळतात का?पैजा लावणारे एक असतात आणि पळणारे दुसरेच असतात.
मग पैज कशाला लावतोस?
मी पैज माझ्या आतल्या आवाजाला विचारुन लावतो...तो सांगेल तसे मी वागतो.या बाबतीत म्हणाल तर मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........
19 Mar 2008 - 8:46 pm | प्राजु
एका, रामलाल नावाचा वॉचमन कम हरकाम्या रहात असतो. चाळीच्या जिन्याच्या खाली त्याचं बाजलं आणि बाजूला एक ट्रंक एकवढंच त्याचं सामान. त्याची बायका मुलं गावी असतात. या रामलाल सगळ्यांची कामे करत असतो. या मंदा आणि मोहितच्या प्रेमपत्रांची ने-आण, त्यांचे निरोप पोचवण्याचं काम .. मोहितच्या मित्रांच्या बरोबरीने यानेही केलेलं असत. मंदा याला मुलि सारखी. लहानपणी तिला अंगावर खेळवलेली. मोहितसारख्या हुशार मुलाशी लग्न होतय हे पाहून हा आतुन सुखावलेला पण आत तिचं बालपण सरलं आता "काका" अशी हाक मारत पळतपळत येणारी मंदा त्याला नाहि भेटणार, तर एक गृहिणी मंदा त्याला दिसणार म्हणून थोडासा व्यथित झालेला.
रामलालने मंदाच्या लग्नासाठी मांडववाले, केटरिंगवाले स्वतः आणण्याची जबाबदारी घेतली. पत्रिका सुद्धा वाटायला जायला हा तयार आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
19 Mar 2008 - 9:42 pm | विजुभाऊ
प्राजु....धन्यवाद्...या प्रकारात केवळ कथेचा गोषवारा देउन चालणार नाहे..कथा पुढे न्यायला तु दिलेल्या दुव्याचा उप्योग होइल तो मी करुन घेइनच. पण मला अपेक्षा आहे ती कथा पुढे नेणार्या कन्टेन्ट ( याला मराठी शब्द्..........हा आठवला...मजकूर...बरोबर ना तात्या) ची. तसा मजकुर टाक्......कथेच्या अनुषंगाने येणार्या व्यक्ति / स्थळे ( दोन्ही अर्थानी) येउ दे.
19 Mar 2008 - 9:53 pm | विजुभाऊ
प्राजु हे असे येइल बघ...
मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........
मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना.
माझ्या डोक्यात एक आयडीया हाय साहेब बघा...आपन असं करुया का...
19 Mar 2008 - 9:27 pm | सुधीर कांदळकर
चालूद्या फुडे. उगीच आचरट फोडणी टाकत नाही. धन्यवाद.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
19 Mar 2008 - 9:52 pm | विजुभाऊ
सुधीर भाऊसाहेब धन्यवाद.उगीच आचरट फोडणी टाकली नाही त्याबद्दल .....( मला वाटते हा मि पा सदस्यांचा मोठेपणा आहे..कोणीच तशा कॉमेंट्स टाकल्या नाहीत्.कथा पूर्ण झाल्यावर बहुतेक कॉमेंट्स येतील) पण तुम्हीही लिहायला हरकत नाही...प्राजु ला जे सांगितलय तेच तुम्हालाही........यु आर ऑलवेज वेल्कम्.........भाऊ
19 Mar 2008 - 9:58 pm | प्राजु
विजुभाऊ.. अगदी बरोबर...
मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना.
त्याने ही पैजेची चर्चा ऐकलेली असते.
वॉचमन : अहो बर्वे साहेब, भेंडे साहेब... काय त्या दोन पोरांच्या लग्नाच्या पैजा लावताय?? अहो आपलीच लेकरं ती.. त्या दोघाच्या घरच्यांना जमेल तशी मदत करायच सोडून काय हे घेऊन बसलात?
भेंडे : गप रे... तुला काय करायचं आहे? तू जा तुझ्या कामाला.. तू नको शिकवू आम्हांला..
वॉचमन : कामाचं करायला आलो होतो. भेंडे वहिनीनी घरी बोलावलं आहे. तुमचा मुलगा मंगेश बहुतेक पुन्हा काहीतरी बाहेर मुलांशी मारामारी करून आला आहे.. त्याच्या अंगावर लागल्याच्या खुणा आहेत. तेव्हा चला आता.
(सगळ्यांचे चेहरे.. भेंडेंच्या चेहर्यावरील भाव पहात आहेत. भेंडे थोडे ओशाळून.. आणि मग चिडून)
भेंडे : काय?? मंगेशने पुन्हा.............! देवा देवा... काय होणार या मंगेशचं? ...(लगेच राग आवरून) .. अहो.. जरा भडकू आहे... चालायचंच.. नाही का हो??
उठून रामलाल सोबत निघतात घरी जाण्यसाठी.
- (सर्वव्यापी)प्राजु
20 Mar 2008 - 10:30 am | विजुभाऊ
अण्णा भेंडे रामलाल सोबत घरी जाण्यसाठी निघाले.त्या गडबडीत रामलाल काय सांगत होता ते कोणाच्या लक्षात च आले नाही.
रामलालचा मुद्द तसाच राहीला.
भेंड्यांच्या मंगेशला थोडे लागले होते हाताला खरचतले होते...कोठेतरी रस्त्यावर वाळुवरुन बाइक घसरली अन हाताला खरचटले.
पोंबुरकर त्याच रस्त्याने जात होते त्याने ते पाहीले आणि त्याल ते रिक्षात घालुन घेउन आले.
20 Mar 2008 - 1:08 pm | विजुभाऊ
मंगेश सुख्ररूप आहे हे पाहुन आण्णा भेंडे शांत झाले..पोंबुरकरना पाहुन रामलाल वॉचमन काहीतरी बोलणार इतक्यात त्याला आण्णांचे बोलणे आठवले..आणि तो गप्प बसला ....
तेवढ्यात आण्णानीच विषयाला तोंड फोडले........
पोंबुरकर तुम्ही म्हणे लग्नासाठी आटी घतल्या आहेत...
हो.....
ही सर्वस्वी तुमची खासगी बाब आहे मी काही विचारले तर रागावु नका. आपण सारे या चाळीत गेली सव्वीस वर्षे रहातो..एक्मेकांची सुखदुखे: वाटतो....मोहीत/ मंदा याना तर माझ्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.........मला दोघेही मुलांसारखीच आहेत.
मला माहीत आहे ते आण्णा .तुम्ही काय विचारणार आहत तेही माहीत आहे.....मी या अशा अटी का घातल्या म्हणुन विचारणार आहत ना? मला राग नाही येणार्.तुम्ही काय बाहेरचे आहत काय? पोंबुरकर आश्चर्य वाटावे ईतक्या सरळ्पणे बोलले.
आण्णा पहातच राहीले..त्याना हे अपेक्षीतच नव्हते.
मंदा चांगली मुलगी आहे. मला ती सून म्हणुन घरात आली तर आनंद्च आहे.
पण मग ही अशी अट का घातली.
आण्णा मी कामगार माणूस्..आयुष्यात जे काही मिळाले ते कष्ट करुन...आयुष्यात कोणतीही गोष्ट सरळ्पणे माझ्या वाट्यालाच आली नाही.
माझ्या मुलाना पण मी सगळे मिळव ते कष्ट करुन मिळव असेच सांगतो.
त्याचा आणी लग्नाचा काय संबंध?
आहे ना. प्रेम विवाहात सगळे अगदी सरळ पणे झाले तर त्याची काय गंमत्...काही तरी विरोध्..त्याचा सामना...काहीतरी उचापत्या..त्या निस्तारणे..धड्पणे यात मजा आहे...यातच मित्रांची / आणी स्वतःची सुद्धा खरी कसोटी लागते.. खर्याच्या कसोटीला उतरले की मग ते
प्रेम शुद्ध सोने होउन येते....त्याची मजा काही औरच असते......यावर माझा विश्वास आहे.
माझी अट कळस्कारांसाठी नाही.ती मोहीत आणि मंदा साठी आहे.... पाहुया ते कसे मार्ग काढतात " काही खर्च न करता थाटामाटात लग्न " या अटीतुन....
20 Mar 2008 - 2:00 pm | मनस्वी
मोहित, मंदा आणि मित्रमंडळी काहीतरी मार्ग शोधत असतात.
मोहित : आमचे बाबा म्हणजे जर चमत्कारीकच आहेत.. काय तर म्हणे काही खर्च न करता थाटामाटात लग्न.
मंगेश : म्हणजे नक्की काय म्हणायचय त्यांना.
किर्ती : काहीच कळत नाही काय आहे काकांच्या मनात आणि नक्की त्यांना काय म्हणायचंय.
मोहित : पहिल्यापासूनचंच आहे.. काहीतरी असंबद्ध बोलायचं. त्यांचं त्यांना तरी कळतंय का काही खर्च न करता थाटामाटात लग्न म्हणजे काय.. काहीतरी भंकस मारत असतात नेहेमी.
मंदा : (जोरात किंचाळते) एऽऽ मला एक जबरा आयडिया सुचलीये.. आपण नगरसेविका मंगलाताई उचलबांगडे यांच्या सामुदायिक विवाहसोहोळ्यात भाग घ्यायचा का.. काही खर्चही नाही आणि हजार काय चांगली ४-५ हजार जेवतील.. घ्या म्हणावं!
मोहित : वाऽ मंदे.. अगं आज पहिल्यांदा वाटलं तुझ्या डोक्यात अक्कल नावाचा प्रकार थोडातरी आहे ते!
20 Mar 2008 - 6:01 pm | विजुभाऊ
ए चल चल त्या मंगलाताई ना फोन करुया
ए पक्या लाव रे त्याना फोन
तुझा मोबाइल दे की
का
माझा बॅलन्स संपलाय.
तुझं नेहमीच असे कसं असते रे पक्या.कधीही विचारा तुझा बॅलन्स संम्पलेलाच्.कीर्ति..
मोबाइल च्या रीचार्ज चा विषय निघाला की पक्याचे डोके सटकायचे...ए कीर्ते हे बघ मी कोणाला मोबाइल मागत नाही...
आणि कोणाला करत पण नाहीस्..कीर्ति पक्याला आडवे बोलयचा एकही चान्स सोडायची नाही .तुझ्या हॅन्ड्सेट्ला सुद्धा फक्त मिसकॉल द्यायची सवय लागली आहे..
ए गप बसाकी ...भांडायला पण काळ्वेळ असतो.दिग्या वैतागला.काय चाललय काय कारताय ...
ए हा घे या वरुन लाव फोन. मंदाने तीचा मोबाइल पक्याकडे जवळ्जवळ फेकलाच तीला घाइ झाली होती. आणि तो स्पीकर ऑन कर म्हणजे सगळ्याना ऐकु येइल.
हं लाव रे. पक्या ने नंबर फिरवला
हॅलो..........कोण बोलतय
फोन तुमने घुमाया है..तुम बोलो ना कोन बोलताहै
मी मी प्रकाश प्रकाश बापट
तो
मंगलाताई आहेत का?
कौन मंगलाताई इधर कोइ मंगलाताई नही है..चंपा ,चमेली , पारो , हुस्ना,मेरी , फरीदा, काजोल इनमेसे कोइ चाहिये तो बोलो.
अ....अं...
अहो कोण बोलता आहत तुम्ही
मै..बाबू पिस्तूल जल्दी बोल कौन चाहीये?
काही नाही काही नाही सॉरी सॉरी रॉन्ग नंबर... पक्याने फोन कट केला.त्याला घाम फुटलाहोता
ए पक्या कोणता नंबर फिरवला होतास.
हा दिग्या ने दिला होता मला कालच
20 Mar 2008 - 6:44 pm | मनस्वी
पक्या : ए माकड्या कुठले नंबर देतोस्स्स्स्स्..
दिग्या : अरे तो नाही तुला अजुन एक नंबर दिलेला ना तो फिरव यड्या..
(पक्या नंबर फिरवतो.)
हॅलो, मंगलाताई उचलबांगड्यांचे ऑफीस का?
हो. आपण?
मी गपचूप चाळीतून दिगंबर डोईफोडे बोलतोय. मंगलाताईंना भेटण्यासाठी अपॉईंट्मेंट घ्यायची होती. आत्ता आले तर चालेल का?
मॅडम सुंदर मी होणार ब्युटीपार्लरच्या उद्घाटनाला गेल्यात.
मग.. उद्या सकाळी?
सकाळी मॅडमना प्रोग्रॅम आहे. हौसमौज महिलामंडळाच्या कबड्डी स्पर्धेच्या अध्यक्षा आहेत त्या.
तुम्हीच सांगा मग कधी येउ ते.
विषय काय आहे.
आपला तो सामुदायिक विवाहसोहोळा..
ओहोहो.. अस्सं अस्सं.. असं करा तुम्ही प्रत्यक्षच या इकडे. मी सगळी माहिती देतो. आणि मॅडमना भेटायचे असेल तर तेव्हाच अपॉईंट्मेंट फिक्स करू.
ओके.. आपलं नाव..
मी जनार्दन खोडमोडे.. मॅडमचा पीए.
ओके थँक्यू खोडमोडे साहेब.
पक्या : चला.. आता ठरवा.. कोण कोण जायचं खोडमोड्याला भेटायला आणि काय बोलायचं तिथं.. म्हंजे काय काय चौकशा करायच्या..
20 Mar 2008 - 7:23 pm | विजुभाऊ
पक्या मला वाटते आपण जाण्यापेक्षा भेंडे आण्णा ना घेउन जाउ. जरा मोठे कुणी बरोबर असेल तर बरे.दिगंबर कधी नव्हे तो मुद्देसूद बोलला
ही सगळी मंडळी आण्णांकडे गेली.
आण्णाने सगळ्यांचे शांतपणे ऐकुन घेतले.शांतपणे ऐकणे हा भेंडे आण्णांचा गुण त्यामुळेच चाळीतल्या तरुण मंडळाला आण्णा हे प्रत्येक्वेळी आधार वाटायचे.
मलासुद्धा हीच आयडीया आली होती.मी मंगलाताईंना फोन ही केला होता
काय म्हणाल्या त्या.सर्वानी जणू शाळेत एक साथ नमस्ते म्हणतो तसे एका सूरात विचारले..
त्या म्हणाल्या की सामुदायिक विवाहसोहोळा हा फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे.शिवाय त्यात जोडप्यांची संख्या १२१ पूर्ण झाली आहे.आता एकही जोडपे जास्त नोंदवले जाणार नाही.
फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे? मंदा बेशुद्ध्च पडायची बाकी होती.
लोक पूर्वी लग्न व्हावे म्हणून उसने ऐष्वर्य दाखवायचे....आता दारीद्र्यदाखवुन लग्ने जमवावी लागतात..हंम्म्म्म्म्म्म्म खरच कलीयुग आलय :दिग्या तोंड वाकडे करत म्हणाला
दिग्या यात कलीयुगाचा संबंध काय? कीर्तिने याही वेळा संधी सोडली नाही
दरीद्रीच व्हायचे ना? त्यात विषेश काय? पक्याच्या डोक्यात काही तरी नवी आयडीया आली असावी.त्याचे डोळे चमकत होते .सरळ नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील.
वा वा काय पण टाळके चालवलय्...दिन्या त्याचे वाक्य तोडीत म्हणाला..काय तर म्हणे नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील . आता तात्पुरते सिझनल दरीद्री आणि बेकार होणे ठीक आहे पण त्यानन्तर परिस्थिती तशीच राहीली तर? पोंबुरकर काकु मंदाला पांढर्या पायाची म्हणतील त्याचे काय्...म्हणतील की लग्ना अगोदरच सुनेने गुण दाखवले....
पण मग करायचे काय.........बराच वेळ सगळे गप्पच होते.
अस्वस्थ झालेल्या दिगुने काही तरी बोलायला तोंड उघडले पण कीर्ति कदडे पाहुन त्याने उघडलेले तोंड पुन्हा मिटले.
मला एक आयडीया सुचल्येय्......शांततेला तदा घालवत कीर्ति आणि मंदा दोघीही एकदम बोलल्या.अणि मग एकमेकांकडे पाहु लागल्या
तु सांग कीर्ति अगोदर मग मी सांगेन.
मला काय वाटते आपण असे करुया का
कसे..सगळे पुन्हा एका सुरात ओरडले
आपण असे करु या का ....आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया?कीर्ति ने तीची कल्पना मांडली.
वा! मी हेच म्हणणार होते कीर्ति.....मंदा उत्साहाने ओरडली
25 Mar 2008 - 3:44 pm | विजुभाऊ
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया?
कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजाळले.काहीतरी वेगळा पण मार्ग सापडला होता.
आपली फुल्ल तयारी आहे. मस्तच मंगलाष्टके म्हणणारे , बँडवाले , केटरर , सगळ्यातच बचत होइल ..आणि लग्नाला हजार पान सहज जेवेल ...दिग्या पक्याला एकदम उत्साह आला होता....कधी नव्हे ते खूप मोठी जबबदारी असलेले काम करयाला मिळणार होते.
लग्नात आपण विवीध गुणदर्शनाचा कर्यक्रम ही ठेउया........
ए विवीध गुणदर्शन नन्तर करुया...अगोदर सामुदायिक विवाह करयाला काय काय तयारी लागेल ते बघुया...कीर्ति ने सर्वाना जमिनीवर आणले......
काय काय म्हणजे? सर्वात अगोदर विवाह करणारी जोडपी आणि त्याहून महत्वाचे हॉल ,या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले..........
मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले.
23 Mar 2008 - 7:40 am | सृष्टीलावण्या
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करुया?
कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजळले
दिग्या, पक्याला तर ह्या वाक्याने धीर आला, कदाचित् आता सामुदायिक विवाह सोहळा एवीतेवी होणारच आहे तर आपली सुद्धा वाजंत्री वाजण्याचा योग आहे म्हणायचं असे दोघांनाही मनापासून वाटले.
इकडे मंदाला वाटले, कीर्तिलाच का अश्या छान छान कल्पना सुचाव्यात आणि दरवेळी चार लोकांसमोर तिचेच का कौतुक व्हावे. आता असूयेपोटी ती ह्या चांगल्या कल्पनेला विरोध करण्यासाठी सबबी शोधू लागली.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
25 Mar 2008 - 3:57 pm | विजुभाऊ
या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले..........
मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले.
तीला आठवले..बहीणीच्या लग्नात तिथी ही हॉल मिळण्यावर ठरवली होती.........त्यनन्तर बाकीच्या गोष्टी
हो ना खरे आहे...आण्णा म्हणाले अगोदर आपल्याला काय काय करावे लागेल त्याची यादी करुया
हॉल , पत्रिका , केटरर , पुरोहीत , फुले , कपडे , फोटोवाले......एक एक जण सांगु लागला.लीस्ट लांब होत होती
लीस्ट करता करता प्रत्येकजण मनोमन म्हणत होता...खरे आहे घर पहावं बांधुन आणि लग्न पहावं करुन
1 Apr 2008 - 9:54 am | विजुभाऊ
मनस्वी च्या आवाहनास जागुनः "स्पिन अ यार्न" पुढे सुरु करत आहे
लीस्ट संपतच नव्हती. काय काय म्हनून करायचे? नवर्या मुलाचा मेक अप नवरी चा हार मुंडवळ्या इथ पासुन ते वरातीत कोणत्या कॅसेट वाजवायच्या जेवण काय काय असेल.
य सगळ्या गोष्टी मिळतील पण या मुम्बई मधे लग्नाचा हॉल मिळणार नाही. आण्णा अजुन हॉल या एका मुद्द्यवरच अडकले होते
आण्णा आपण असे करु या का?आपण चाळीच्या चौकात मोठा मांडव उभा करुया. त्यात लग्ने होतील आणि वर्हाडी लोकांची जेवणाचे सोय चाळीच्या टेरेस वर करुया. पक्या
अरे वा पक्या काय मस्त सजेशन्...कीर्ति एक्दम म्हणाली. अन लागलीच तर शेजारच्या चाळीत ही गच्ची आहे.ते पण वापरता येइल.
पक्या ने जरा अविश्वासानेच पाहीले.कीर्ति ने त्याला मस्त म्हणणे हे जरा धक्कादायकच होते. तीने त्याला चांगले म्हणणे हे साप मुंगस मित्र होण्याइतके दुरापस्त होते.
मी त्या नामजोशीना सांगतो.ते देतील गच्ची. आण्णाना मुलांची ही आयडीया पटली.
आता लग्न आवाक्यात वाटत होते.
आरे ते सगळे खरे पण आपल्याला सामुदायीक लग्नासाठी जोडपी हवीत्.ती कोठुन आणणार ?
ह्या: त्यात काय सरळ एक बोर्ड लावायाचा. हे मुंबई आहे इथे काहीही करा लोक तयार असतात. आपण चाळीच्या नाक्यावर बोर्ड लाउया.लग्न करुन देउ म्हणुन....
हे बाकी खरे हो दिग्या..आपण आपल्याला पार्टी करायची होती तेंव्हा काय भन्नाट आयडीया केली होती. पक्याला आता उत्साह आला होता.कीर्ति ने त्याला चांगले म्हंटले याचा धक्का अजुन ओसरला नव्हता. आठवते ना तुला
तर रे. आडगाव च्या भैरोबा सन्स्थान १० /१० रु.ची पावती पुस्तके छापुन घेतली आणि लोकल मधे खपवली. लोकानी एकानीही विचारले नाही की हे आडगाव कुठे आहे म्हणुन.भरीत भर म्हणून आपण खडू चे भुकटी अंगारा म्हणुन लावत होतो.
खडु सुद्धा कॉलेज चे ढापलेले.
पण पार्टी काय जोरदार झाली होती नाही? भैरोबा ची यात्रा सुधा इतक्या जोरात होत नाय. भैरोबा ला जोरात चांगभले करुन चांगला तीर्थाचा नैवेद्य पण दाखवला होता आपण . मला वाटला नव्हते राव की आपले भीडु इतके "तीर्थन्कर" असतील म्हणुन इतकी जोरदार पार्टी त्या जी एस ने पण दीली नाही कोणाला.
त्याचा चेहेरा बघायला हवा होतास पार्टी झाल्यावर तू
ए गप्पा सोडा आधी लग्नाळु जोडपी शोधा मग पार्टी चे बघा. कीर्ति ने दोघाना ही चापले.
नाय तर असे करायचे का?
कसे?
मीकाय म्हणतो......
दिग्या तु काही म्हणु नकोस्.......पक्या जोरात ओरडला.
तो का ओरडला कोणालाच कळाले नाही........
1 Apr 2008 - 11:39 am | प्रमोद देव
कोळस्कर आणि पोंबुरकर टपरीवर चहा पीत आहेत.
काय म्हणा कोळस्कर... तुमची आयडियाची कल्पना बाकी झकास आहे..इति.पोंबुरकर!
आहे ना! मग! कसे सगळे चक्रावलेत बघा. पण जाऊ दे. आता आज सांगूनच टाकू या सगळ्यांना! काय? कळले ना तुम्हाला?... इति.कळस्कर!
अहो कळले म्हणजे काय? आपण दोघांनीच तर ठरवलंय ना? मग आज सांगितलेच पाहिजे!...इति. पोंबुरकर!
आणि दोघे ग्लासाला ग्लास(चहाचा)भिडवत ओरडतात.... एप्रिल फूलऽऽऽऽऽऽ!
2 Apr 2008 - 4:39 am | वरदा
पक्या ने ओरडून दिग्याला शांत बसवले...त्याची आयडीया हाणून पाडण्यत किर्ती आपला सगळा वेळ वाया घालवेल त्यापेक्षा त्याला गप्प बसवलेले बरे म्हणून त्याने ओरडून जाहीर केले.किर्ती आपल्या सगळ्यांची मुख्य तिच्या म्हणण्याप्रमाणे करुयात.
आता किर्तीला स्फुरण चढले.तिने ओळखीच्या दोन तीन ब्युटीपार्लर मधे जाहीराती लावल्या, जोडपी मिळाली तर मेकअप साठी इथेच घेऊन येईन ह्या प्रॉमिस वर.
तिथे मंदाचा जळफळाट होत होता.लग्न माझं आणि महत्व मात्र किर्तीला? तिने मंदारला आडून आडून बोलूनही दाखवलं तर त्याचं उत्तर एकच अगं कमीत कमी कष्टात आपल्याला लग्न करुन मिळतय तेही बाबांच्या अटीप्रमाणे कुणी का अरेंज करेना आपल्याला काय? आणि आपली मैत्रीणच आहे की ती. पण मंदाने ठरवलं काहीतरी करुन तिचं महत्व कमी करायचच. जरा अद्दल घडवलीच पाहिजे हीला.
महत्वाचा मुद्दा होता मुहुर्त निश्चित करण्याचा. कोळस्कर आणि पोंबुर्करांनी इथेही नाट लावली होती. कोळस्करांनी मुहुर्त सांगितला की पोंबुरकर नाही म्हणायचे आणि पोंबुरकरांनी ठरवला की लगेच काहीतरी न जमण्याचं कारण पोंबुरकरांकडे तयार असायचं. श्रावण महीना फार सण असतात उपासाच्या दिवसात काहींना जेवता येणार नाही. भाद्रपद खरा गणेशोत्सव असतो चाळीत तेव्हा कसं जमणार. नंतर दिवाळीची सुट्टी म्हणून लोक बाहेरगावी जातात तेव्हा नको. एक ना दोन हजार खुसपटं निघत होती. ह्यावेळी मंदाही त्यांना सामील झाली होती.