दोन चार दिवसांपुर्वी, आर्लिंग्टन व्हर्जिनियाच्या एका शाळेतील मुलाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांना एक प्रश्न विचारला की, तुम्हाला जिवंत अथवा ऐतिहासिक पैकी कशातही बसणार्या कुठल्या एकाच व्यक्तीबरोबर जेवायला आवडेल? ओबामांचे उत्तर होते महात्मा गांधी! :
"Dinner with anyone dead or alive? Well, you know, dead or alive, that's a pretty big list," Obama responded amidst laughter. The next moment he was serious.
"You know, I think that it might be Gandhi, who is a real hero of mine," Obama said. "Now, it would probably be a really small meal because he didn't eat a lot," he said amidst laughter. "But Mahatma Gandhi is someone who has inspire people across the world for the past several generations," he said. (दुवा)
तर या बातमीमुळे एक प्रश्न (थोडा बदलून) मनात घोळू लागला. जर आपल्याला कुणाएका ऐतिहासिक (हयात नसलेली) व्यक्तीबरोबर गप्पा मारायला मिळाल्या तर त्या कुणा बरोबर असतील? या काथ्याकुटा निमित्ताने काही निर्बंध घालूया: अशी ऐतिहासिक व्यक्ती १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेली अथवा नंतरची असावी. जास्तीत जास्त पाच व्यक्ती (कमीत कमी अर्थात एक) असू शकतील मात्र त्या विविध विस्तृत (ब्रॉड) क्षेत्रातील असाव्यात. प्रत्येक क्षेत्रातील एकचः राजकारण, साहीत्य, शास्त्र, कला, समाजकारण.
बोला कोण कोण येतात डोक्यात आणि नक्की त्यांच्यातील कशाचे आकर्षण वाटते?
प्रतिक्रिया
16 Sep 2009 - 9:45 am | निमीत्त मात्र
विकास, चर्चा प्रवर्तक ह्या नात्याने आधी तुला कुणाबरोबर जेवायला आवडेल ते सांग की. ;)
नुसतेच ४ ओळींचे चर्चा प्रस्ताव देण्यापूर्वी, प्रस्तावकाने त्यात आपले मतही द्यावे असे मिपाकरांचे मत असते :)
16 Sep 2009 - 9:48 am | विसोबा खेचर
अनुष्काशी गप्पा मारायला आवडतील! :)
तात्या.
16 Sep 2009 - 9:49 am | निमीत्त मात्र
अहो तात्या हे वाचलेच नाहीत काय? :)
16 Sep 2009 - 9:50 am | विसोबा खेचर
मग? अनुष्काचा जन्म १८५७ नंतरचाच आहे की!
16 Sep 2009 - 10:07 am | निमीत्त मात्र
बरोबर आहे पण त्याच वाक्यातील 'ऐतिहासिक' चे काय?
16 Sep 2009 - 10:35 pm | मिसळभोक्ता
तात्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा जिच्यावर "जीव", ती ऐतिहासिक नाही काय ?
-- मिसळभोक्ता
16 Sep 2009 - 9:49 am | अवलिया
अरेरे वाईट वाटले वाचुन...
कारण विकास ने म्हटले आहे... जर आपल्याला कुणाएका ऐतिहासिक (हयात नसलेली) व्यक्तीबरोबर गप्पा मारायला मिळाल्या तर त्या कुणा बरोबर असतील?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
16 Sep 2009 - 9:52 am | विसोबा खेचर
अरेच्च्या! 'हयात नसलेली' हा मुद्दा मी वाचलाच नाही!
ठीक आहे, मग माझा चॉईस मधुबाला! :)
तात्या.
16 Sep 2009 - 10:00 am | छोटा डॉन
(एकंदर चर्चा ही सिरीयस (पक्षी : राजकारण, साहीत्य, शास्त्र, कला, समाजकारण. इत्यादी इत्यादी ) न होता विरंगुळा मार्गावे जात असल्याचे पाहुन ...)
काय हो विकासराव, इथे "आंतरजालीय मॄत आयडी" चालतील काय ?
त्यांचा जन्म ५०० % १८५७ नंतरचा आहे व काही कलनीय / अनाकलनीय कारणाने त्यातले बरेच आयडी आज हयात नाहीत त्यामुळे हे नियमात बसते आहे ...
आमचा फर्स्ट चॉईस "मॄत आंतरजालीय आयडी " ....
मनोरजंन आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी ह्याहुन दुसरे उत्तम साधन नाही ...!!!
------
(कल्पनेतला)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
16 Sep 2009 - 10:06 am | निमीत्त मात्र
"मॄत आंतरजालीय आयडी "
अहो पण कोणते तेही लिहाना..नुसतेच काय मृत आयडी?
16 Sep 2009 - 10:32 am | छोटा डॉन
>>अहो पण कोणते तेही लिहाना..नुसतेच काय मृत आयडी?
हा हा हा, लै भारी शेठ, चांगली आयडिया आहे आम्हाला गोत्यात आणण्याची.
अहो ती नाव इथे आम्ही "जाहिरपणे" लिहली तर आमचाच आयडी "मॄत" होणार नाही का ;)
असो, जोक्स अपार्ट, धाग्याला चांगले वळण लागल्याने काही सिरीयस मत सांगतो ...
* माझ्या पसंतीतल्या व्यक्ती :
राजकारण / समाजकारण : अॅडोल्फ हिटलर , बॅरिस्टर जीना , नथुराम गोडसे , सद्दाम हुसैन, आचार्य अत्रे ,
साहीत्य : भाईकाका , गोनिदा ,
शास्त्र : लै मोठ्ठी लिस्ट आहे. तुर्तास आईस्टाईन , न्युटन ही २ नावे देतो, ह्यातला कोणी १ ठरवणे शक्य नाही ...
( १८५७ च्या आधीचे नको असल्यामुळे कोपर्निकस नाव कटाप )
कला : गोची केलीत राव, १८५७ नंतरचे म्हणजे अवघड आहे कारण त्याआधीच्या कलाकारांनी त्यांच्या कलांमधुन समाजकारण केले असे आम्हाला वाटते च म्हणुन ते आम्हाला आवडतात.
असो, तुर्तास आम्ही "राज कपुर" चे नाव देऊ इच्छितो ...!!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
16 Sep 2009 - 7:44 pm | चतुरंग
न्यूटन १८५७ नंतर होऊन गेला हे माझ्यासाठी नवीनच आहे, हां कदाचित रिलेटिविटीमुळे असं झालं असेल! ;)
(आयझॅक)चतुरंग
16 Sep 2009 - 10:02 am | सुनील
उत्तर देणे फारच अवघड बॉ!
राजकारण - महंमद अली जीना
साहित्य - पु ल देशपांडे
शास्त्र - सी व्ही रामन
कला - राजा रविवर्मा
समाजकारण - महात्मा फुले
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Sep 2009 - 10:11 am | विष्णुसूत
ग दि मा
खानोलकर
मार्क ट्वेन
16 Sep 2009 - 11:06 am | सखाराम_गटणे™
वरील यादी +
शाहुराजे, लोकमान्य टिळक्क, चिवी जोशी इ.
16 Sep 2009 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
फारच अवघड काम. माझे काही पर्याय
१. वसंतराव देशपांडे २. नथुराम गोडसे ३. रॉकी मार्शियानो (rocky marciano ) 4.हिटलर ५.चर्चिल
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
16 Sep 2009 - 10:11 am | Nile
हरितात्यांसारखंच आम्ही पण सनावळी,क्रमवारीच्या पलिकडे आहोत, त्यामुळे खालील पर्याय.
(बर्याच पर्यायात आम्ही श्रोतेच आहोत असे समजा)
१. सॉक्रेटीस.
२. पीजीडब्ल्यु.
३. पु.ल.
४. भगतसिंग
५. किशोर
६. ज्ञानेश्वर
७. गालिब
८. विवेकानंद
९. लोकमान्य
.
.
.
.
क्ष. जमलंच तर पुराणं लिहणारे लेखक! ;)
16 Sep 2009 - 10:16 am | सुनील
१८५७ च्या नंतरच्या ऐतिहासीक व्यक्तींपैकी निवडायचे आहेत हो. नाहीतर आम्हीही क्लिओपात्राला निवडले असते की! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Sep 2009 - 10:20 am | ब्रिटिश टिंग्या
१. भगतसिंग
२. राजगुरु
३. सुखदेव
४. लो.टिळक
५. सावरकर
16 Sep 2009 - 10:25 am | घाशीराम कोतवाल १.२
१. थोरले आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज
२. नेताजी पालकर
३. प्रतापराव गुजर
४. संभाजी राजे
५. थोरले माधवराव
६. पु.ल.
७. भगतसिंग
आणी अशी बरिच नावे आहेत राव
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
16 Sep 2009 - 10:26 am | आशिष सुर्वे
माझी काही आदराची स्थाने आहेत
खरेतर ह्या विभूतींशी 'गप्पागोष्टी' करण्याची माझी पात्रता नाही.. पण तशी एक सुप्त कामना आहेच!!
राजकारण : स्वातंत्र्यवीर सावरकर
साहीत्य : रवींद्रनाथ टागोर
शास्त्र : अल्बर्ट आईनस्टाईन
कला : चार्लस चॅप्लिन
समाजकारण : गाडगेबाबा
-
कोकणी फणस
16 Sep 2009 - 11:07 am | सखाराम_गटणे™
>>पण तशी एक सुप्त कामना आहेच!!
कामना सुप्त नसावी, उघड असावी.
ह. घेणे
16 Sep 2009 - 10:27 am | विंजिनेर
रिचर्ड फाईनमनशी गफा मारायला आवडेल - असा शास्त्रज्ञ + कलाकार = हरहुन्नरी माणूस होणे विरळा...
16 Sep 2009 - 10:37 pm | मिसळभोक्ता
मला पण !
-- मिसळभोक्ता
16 Sep 2009 - 10:29 am | निमीत्त मात्र
अल्बर्ट श्वाइट्झर शी गप्पा मारायला आवडतील
16 Sep 2009 - 10:32 am | घाटावरचे भट
राजकारण - लोकमान्य टिळक / महात्मा गांधी
साहित्य - संत ज्ञानेश्वर / पु. ल. देशपांडे
शास्त्र - होमी भाभा / विक्रम साराभाई
कला - पं. विनायकराव पटवर्धन / पं. रामकृष्णबुवा वझे
समाजकारण - बाबा आमटे / महात्मा फुले
16 Sep 2009 - 10:40 am | घाटावरचे भट
प्रकाटाआ
16 Sep 2009 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजकारण - लोकमान्य टिळक
साहित्य - बर्ट्रांड रसल
शास्त्र - लुई पाश्चर
कला - दादासाहेब फाळके
समाजकारण - महर्षी कर्वे
अदिती
16 Sep 2009 - 11:06 am | विसोबा खेचर
राजकारण - मोहन गांधी
साहित्य - चि वि जोशी
शास्त्र - न्यूटन
कला - चार्ली चॅप्लिन
समाजकारण - गाडगे महाराज
16 Sep 2009 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे
राजकारण- यशवंतराव चव्हाण
साहित्य- प्र के अत्रे
शास्त्र-आईनस्टाईन
कला-राज कपुर
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
16 Sep 2009 - 1:38 pm | दत्ता काळे
साहित्य : रविन्द्रनाथ टागोर, पु.ल. देशपांडे, विश्राम बेडेकर, कुसुमावती देशपांडे, विजय तेंडुलकर
राजकारण : यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन
धर्म : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी , रजनीश (ओशो )
समाजकारण : बाबा आमटे
कला : सत्यजित रे, चार्ली चॅप्लिन
16 Sep 2009 - 1:57 pm | गणपा
चांगला विषय. हयात नसलेल्या / १८५७ नंतच्याच या अटी असल्याने
थोरल्या आबासाहेबांच नी शंभुराजांच नाव टाकता आल नाही.
राजकारण - बाळ गंगाधर टिळक
साहित्य - भाई काका
शास्त्र - होमी भाभा
कला - चार्ली चॅप्लिन
समाजकारण - साईबाबा / मदर तेरेसा
16 Sep 2009 - 3:51 pm | सूहास (not verified)
राजकारण - एन.टी.आर / एम.जी.आर
साहित्य - बाळ गंगाधर टिळक
शास्त्र - विश्वसरैय्या
कला - आर.डी.बर्मन
समाजकारण - बाबासाहेब आबेंडकर
सू हा स...
16 Sep 2009 - 4:04 pm | सुनिल पाटकर
राजकारण - ईन्दीरा गान्धी
साहित्य - वि.स.खान्डेकर
शास्त्र - एडिसन
कला - निळु फूले
समाजकारण - बाबा आमटे
16 Sep 2009 - 4:58 pm | वेदश्री
माझ्या आबांशी (वडलांचे वडील) गप्पागोष्टी करायची माझी खूप इच्छा आहे.
16 Sep 2009 - 5:06 pm | तर्री
विसोबा खेचर
टारझन
विक्षिप्त आदिती
प्रमोद देव
नंदन
सुधीर काळे साहेब.
18 Sep 2009 - 9:10 am | सुधीर काळे
तुमचा फोन नं. द्या. दहा मिनिटात फोन करतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
16 Sep 2009 - 5:19 pm | दशानन
ह्म्म्म्म !
मला....
मिस्टर ओक.
सर्किटराव आपलेच.. ते ते.. वाले सर्कीट ;)
देव साहेब... चाल अस्त्र वाले !
काळे साहेब.... तेच लोखंड वाले !
एन्ड वन एन्ड ओन्ली.... विकास सेठ .. तेच ते लै मोठे प्रतिसाद वाले =))
16 Sep 2009 - 7:09 pm | विकास
कुणाला भेटायला आवडेल असा प्रश्न आहे. ;)
18 Sep 2009 - 9:12 am | सुधीर काळे
तुमचा फोन नं. द्या. दहा मिनिटात फोन करतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
16 Sep 2009 - 5:28 pm | अनामिक
माझा जन्म माझे आजी आजोबा (आईची आई आणि बाबा) निर्वतल्यवरचा, त्यामुळे त्यांची भेट घ्यायला, त्यांच्याशी बोलायला, लाड करून घ्यायला खूप आवडेल!
-अनामिक
16 Sep 2009 - 6:16 pm | धमाल मुलगा
तात्याराव सावरकर....उपरोल्लेखीत सगळ्याच गटांसाठी हे एकमेव नाव पुरेसे नाही काय? :)
त्याशिवाय :
श्री.नथुराम गोडसे, डॉ.हेडगेवार, गोळवलकर गुरुजी हे देखील.
सु.शि.ना भेटायची इच्छा अपुरीच राहिली :(
आणि सगळ्या महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे कसे विसरणार :)
शास्त्रज्ञांमध्ये डॉ. होमी भाभा.
16 Sep 2009 - 7:07 pm | धनंजय
राजकारण - इंदिरा गांधी
साहित्य - होर्हे लुईस बोर्हेस
शास्त्र - बर्ट्रांड रसल
कला - पु ल देशपांडे (नाटककार म्हणून)
समाजकारण - भीमराव आंबेडकर
(चर्चाप्रस्तावकानेही स्वतःची यादी द्यायला पाहिजे :-) )
16 Sep 2009 - 7:18 pm | नाना बेरके
कला, साहित्य : भाईकाका, जजबन्दो दोलबी ( जयवंत दळवी ), बा.भ.बोरकर, मामा वरेरकर
संगीत : मदन मोहन
राजकारण : जयप्रकाश नारायण, पंडीत नेहरु
समाजकारण : संत गाडगेबाबा
16 Sep 2009 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारण- पंडित नेहरु
साहित्य- प्र. के. अत्रे
शास्त्र - निरंक
समाजकारण- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
कला- माधुरी दिक्षीत :)
16 Sep 2009 - 7:32 pm | विकास
वर उल्लेखलेल्या सर्वच व्यक्तींना भेटता आले तर आवडेल. सावरकर आणि टिळक ह्यांना भेटलो नसलो तरी कायमच भेटत असतो की काय असे वाटते... वर जशी डॉ. हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींची नावे आहेत तशीच त्यांच्याच पंथातील अजून एक व्यक्तीमत्व हे दत्तोपंत ठेंगडी होते. सुरवातीच्या काळातील काही कम्युनिस्ट नावे पण चांगली होती राजकारणात (अहील्या रांगणेकर) आणि समाजकारणात (अनुताई वाघ). तसेच समाजवाद्यांमधील एस एम जोशी हे नाव विशेष, जयप्रकाश आहेतच आणि भूदान चळवळीमुळे समाजकारणातील म्हणता येतील असे वास्तविक गांधीजींचे तत्वज्ञानाने वारस समजले जाणारे विनोबा.
(६+५ ओळींची) चर्चा टाकताना मुद्दामूनच कालाचे निर्बंध घातले होते (१८५७ नंतर आणि हयात नसलेली व्यक्ती).
आता भारतातील उल्लेखलेल्या व्यक्तींसंदर्भात - एकच एक व्यक्ती सांगता येऊ नये हे आपले परमभाग्य आहे. याचा अर्थ खूप चांगली व्यक्तीमत्वे भारतात जन्माला आली - एकाच नाही तर विविध क्षेत्रात...
बाकी वर तुम्ही सर्वांनी उल्लेखलेल्या (भारतीय) व्यक्तींशिवाय अजून काही मला भेटायला आवडतील अशा व्यक्ती: (माझ्याच नियमाप्रमाणे एकच नाव देतो, पण मनात अनेक आहेत):
राजकारणः सरदार पटेल
समाजकारण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साहीत्यः दुर्गा भागवत (तसेच तितक्याच शांताबाई शेळके)
शास्त्रः श्रीनिवास रामानुजन
कला: बाल गंधर्व (आणि तसेच व्हि. शांताराम)
16 Sep 2009 - 7:49 pm | sujay
सावरकर, भगतसिंग, मधुबाला, वसंतराव,हिटलर.
16 Sep 2009 - 7:53 pm | श्रावण मोडक
एकेक नाव देणार नाही. तीन देतो. त्यापैकी कुणाशीही बोलायचे आहे, प्रत्येकाला एकच प्रश्न -
राजकारण
१. हिटलर - मागं वळून पाहताना काय वाटतं? खेद, स्वतःची घृणा की जे केलं ते बरोबरच होतं?
२. स्टालीन - एक माणूस-नेता म्हणून, कम्युनिझ्म तुमच्यामुळं अपयशी ठरला की, तुम्ही कम्युनिझ्ममुळं?
३. लादेन - का, का हे सारं?
साहीत्य
१. शिवराम कारंथ - आजच्या आजीची स्वप्नं लिहाल?
२. गदिमा - सर्वच रसातील लीलया संचाराचं रहस्य काय?
३. टागोर - आत्ताचे राष्ट्रगीत, खरंच, का लिहिले होते?
शास्त्र
१. आईनस्टाईन - जे झालं आहे ते पाहता आजच्या या काळात पुन्हा संधी मिळाली तर तसंच संशोधन कराल की वेगळा मार्ग पत्कराल?
२. न्यूटन - "सफरचंद पडलं नसतं तर?"
३. मर्फी - तसा लॉ परत गवसेल असं वाटतं?
कला
१. कुमार - एक इच्छा आहे - सुनता है गुरू ग्यानी, उड जायेगा आणि अवधूता ऐकण्याची. पुरवाल? (त्यांनी फक्त होकार भरला तरी बास्स).
२. गुलाम अली - परफॉर्मन्स थोडा बाहेर ठेवून केवळ शास्त्रीय आधाराच्या गझलांचा (हुई है शाम, ले चला जान मेरी यासारख्या) कार्यक्रम का करत नाही?
३. जी. कांबळे - 'त्या' छत्रपती शिवरायांची प्रेरणा आज दिसतीये कुठं?
समाजकारण
(ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, पण त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा म्हणून समाजकारणात त्यांना घेतलं आहे).
१. कार्वर - आजच्या जगाकडं कसं पाहू?
२. लिओपोल्ड - आजच्या जगाकडं कसं पाहू?
३. आंबेडकर - आजच्या जगाकडं कसं पाहू?
16 Sep 2009 - 9:47 pm | ऋषिकेश
राजकारणः महात्मा गांधी
समाजकारण: महात्मा फुले
साहीत्यः पु.ल., शांताबाई शेळके, गालिब
शास्त्रः लोकमान्य टिळक
कला: पिकासो
ऋषिकेश
------------------
रात्रीचे ८ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काहि...."
16 Sep 2009 - 10:15 pm | पिवळा डांबिस
फील्ड मार्शल मानेकशॉ....यांच भाषण ऐकलंय पण गप्पा मारायला, त्यांच्या आठवणी ऐकायला आवडतील...
नारायणराव बालगंधर्व...सुजन कसा मन चोरी!!!!
जे. आर. डी. टाटा.....असामान्य नेतृत्व!!!
विन्स्टन चर्चिल..... राजकारणाचा आणि वक्तृत्वाचा अर्क!
आणि अर्थातच आम्हा शास्त्रज्ञांसाठी ज्ञानियांचा राजा....
अल्बर्ट आईन्स्टाईन!!!!
16 Sep 2009 - 10:54 pm | अमित बेधुन्द मन...
राजकारण - बाळ गंगाधर टिळक / सावरकर
साहित्य - ग. दि. माडगुळकर / पु. ल.
शास्त्र - आईनस्टाईन / सी व्ही रामन
कला - भक्ति बर्वे / काशिनाथ घाणेकर /
समाजकारण - बाबा आमटे / प्रबोधनकार ठाकरे
17 Sep 2009 - 12:27 am | shekhar
तात्या टोपे - मला अशी आशा आहे की आपल्या सैन्यातले प्रमुख पदाधिकारी तात्यांच्या डावपेचांचा अभ्यास करत असतील.
- शेखर
17 Sep 2009 - 2:08 am | अडाणि
हि बातमी पेपर मधे वाचून फार छान वाटले..
परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले...
असो... प्रत्येकाची आवड-निवड...
-
अफाट जगातील एक अडाणि.
17 Sep 2009 - 5:36 am | विकास
परंतु, प्रतिक्रियांमधे काही जणांनी गोडसे बरोबर गप्पा मारायला आवडेल असे वाचून अंमळ दु:ख झाले...
मला वाटते की गोडसे, हिटलर, स्टॅलीन अशा प्रकारची नावे ही काही वैयक्तिक हिरो म्हणून कोणी डोक्यात ठेवून लिहीली नसावीत. अशा प्रकारच्या मनोवृत्ती (विकृती?) कशा विचार करतात हा डोक्यात आलेला विचार असावा... उ.दा. तेंडूलकरांनी फाशी जाणार्या गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुधीर गाडगिळांकडून जक्कलच्या मुलाखतीसाठी ते आणि मोहन गोखले ("माफीचा साक्षिदार" काढण्याआधी) गेले होते त्यावेळेला गजाआडचा जक्कल कसा रानटीपणे वागला हे सांगितले होते. त्याच पठडीतील हा विचार आहे.
17 Sep 2009 - 8:22 am | सखाराम_गटणे™
+१
कोणतीही विचारसरणी समजुन घेणे नक्क्कीच वाईट नसते. भले ती वाईट असो वा चांगली.
17 Sep 2009 - 10:53 pm | अडाणि
विकास भौ तुमचि प्रतिक्रियेतील भावना समजली, पण तोच भाव तुमच्या प्रश्नात 'वरिजनली' नव्हता.... तुमच्या प्रश्नातील आणि ओबामांना विचारलेल्या प्रश्नातील भाव (मला समजलेला) नक्कीच वैयक्तिक हिरो म्हणून होता.
तुम्ही दिलेले प्रस्तुत उदाहरण नक्कीच चुकीचे आहे आणि इथे गैरलागू आहे. सुधीर गाडगीळ (त्यांच्या बद्दल संपूर्ण आदर राखून) यांचा संपूर्ण जन्म लोकांच्या मुलाखती घेण्यात गेला (आणि ति गोष्ट ते फार सुंदर करतात) ... त्यात त्यांनी जक्कल ची मुलाखत घेतली तर काही वेगळे नाही केले. जर त्यांना विचारले असते कि आयुष्यात एका व्यक्तीला भेटायचे, ती कोणती आणि त्यावर त्यांनी जक्कलचे नाव सांगीतले असते तर ते ईथे लागू झाले असते....
बराचश्या प्रतिक्रियांवरून मला तरी समजले कि सर्वांनी आपले व्यक्तिगत आदर्श डोळ्यासमोर ठेवून नावे दिलेली आहेत, त्यात गोडसे हे नाव प्रकर्शाने खटकते.
@गटणे -
कोणतीही विचारसरणी समजुन घेणे नक्क्कीच वाईट नसते. भले ती वाईट असो वा चांगली.
मुद्दा बरोबर आहे पण तो विचारसरणीला लागू आहे, जिथे काही विचारसरणीच नाही तिथे गैरलागू आहे. विचारसरणी वैगेरे अवघड शब्द वापरून उगाचच गोडसेचे उदात्तीकरण करू नका.
-
अफाट जगातील एक अडाणि.
17 Sep 2009 - 11:17 pm | निमीत्त मात्र
विकास, मला नाही वाटत गोडसे, हिटलर ह्यांचे नाव घेतलेले सभासद त्यांना विकृत मानतात. त्यांची पसंती हिरो म्हणूनच आहे.
17 Sep 2009 - 11:48 pm | विकास
हे उदाहरण पहा: (मोडकसाहेबांचा प्रतिसाद)
यातून काय तुम्हाला ही त्रयी त्यांची होरो वाटते?
बाकी अडाणींचा मुद्दा बरोबर आहे. पण प्रत्येक प्रतिसाद हा माझ्या मूळ प्रश्नाला (आणि त्यात घातलेल्या मर्यादांना) संदर्भ ठेवून दिला आहे असे वाटत नाही. नाहीतर हयात नसलेल्या व्यक्तीत विसोबा, मिभो, विकास आणि माधुरी दिक्षित दिसले नसते. :-)
18 Sep 2009 - 1:56 am | निमीत्त मात्र
मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
18 Sep 2009 - 5:41 am | विकास
मोडक हे अपवाद असतील. पण इतर मिपाकर गोडसे आणि हिटलरला विकृत समजत नसावेत असा माझा अंदाज आहे. त्यांनी तसे स्पष्ट इथे लिहिले तर माझे शब्द मागे घेईन.
असतील? अंदाज? हे काय स्पष्ट शब्द आहेत का? यात एकच गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे तुम्ही वेगळ्या चष्म्याने प्रत्येकास बघत आहात आणि फुकाचे आरोप करत गैरसमज पसरवत आहात.
बाकी तुमच्यासारखा, मला जर विकृतीलाच हिरो समजणार्यांच्या समुदाययाचा अनुभव आला तर मी स्वतःच्याच चपला घालून, रामदासांनी म्हणल्याप्रमाणे, "नसे राम* ते धाम सोडूनी द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे" असे आचरणे योग्य समजेन.
* येथे "राम" या शब्दाचा अर्थ आपला (जो काही) आदर्श (असला तर), त्याचा जिथे अभाव आहे तेथे न राहणे पसंद करणे असा आहे.
18 Sep 2009 - 6:55 am | निमीत्त मात्र
आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा? फुकाचे आरोप करत गैर समज पसरावयचे असते तर ह्या लोकांना असेच म्हणायचे आहे असे खात्रीने ठोकून दिले असते ना! (टिळकांचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असे तू मागे म्हणाला होतास तसे.)
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा.
पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन.
पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती :)
18 Sep 2009 - 8:07 am | विकास
आता माझा अंदाज मांडला तर त्यात काय इतकं चिडण्यासारखं बुवा?
चिडतोय कोण? मी फक्त इतरांकडून स्पष्ट शब्द मागणारा स्वतः मात्र अंदाज म्हणजेच वास्तव असे म्हणतो तेंव्हा त्यातील विरोधाभास दाखवून दिला.
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे.
परत तेच अंदाज! कशाची खात्री म्हणून दिसत नाही :)
पण तसा प्रतिसाद न आल्यास तू मात्र चपला घालून राम म्हणू नयेस एवढीच विनंती
मी त्यांच्याकडून कुठल्याच प्रतिसादाची वाट पहात नाही आहे. विकृत वगैरे तुम्हाला वाटले आहे, मला नाही.
18 Sep 2009 - 8:12 am | निमीत्त मात्र
फ्लिप फ्लॉपींग नको!
हे तूच म्हणाला आहेस..नथुराम, हिटलर हे विकृत मनोवृत्तीचे लोक नव्हेत काय?
मी कधी कुणाला अंदाज नोंदवू नका म्हणालो? 'हा माझा अंदाज आहे' असे 'स्पष्ट' लिहावे इतकाच माझा आग्रह असतो. फरक लक्षात आला असेल..
18 Sep 2009 - 10:25 am | विशाल कुलकर्णी
मला देखील नथुराम गोडसेना भेटायला आवडेल. त्यांनी जे काही केलं ते केवळ असमर्थनीयच होतं. कुठल्याही मानवाचा खुन किंवा हत्येचे समर्थन मी कधीही करणार नाही. गांधींच्या तर नाहीच नाही. कारण कुणी कितीही म्हणो आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीत त्यांचा मोलाचा वाटा होता आणि आहे. पण म्हणुन मी नथुरामला विकृत मनोवृत्तीचा नाही म्हणणार. कारण एवढी एक घटना सोडली तर नथुरामच्या आयुष्यात कोणी बोट दाखवावे असे काही घडलेले नाही. तो विकृत असता तर त्यापुर्वीसुद्धा त्यांने कर्तव्याच्या नावाखाली आणखी काहीजणांना मारले असते किंवा प्रयत्नतरी केला असता. पण तसे कुठेच आढळत नाही. मग म. गांधींसारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्वासच जिवे मारण्याचा निर्णय त्याने का घेतला असेल? गोपाळ गोडसेंनी त्यांच्या पुस्तकात भले नथुरामचे समर्थन केले असेल. पण या निर्णयाप्रत येण्याचे नक्की कारण काय होते? ते नथुरामकडुनच जाणुन घ्यायला मला आवडेल.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Sep 2009 - 12:09 pm | llपुण्याचे पेशवेll
मलाही असे वाटते की हे निमित्तमात्र साहेबाना जे जे त्याना पटते ते ते खरे बाकी सगळे विकृत.
आमचे गुरु दत्तात्रेय आहेत. त्यानी स्वतः २४ गुरु केले. त्यानीच हे शिकवले आहे की ज्याच्याकडे जे जे चांगले आहे ते ते उचला.
विकृती प्रत्येकामधे असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करुन जमले तर त्याचे गुण बघावे. त्यामुळे रामायणाचा व्हिलन रावण वैदिक संस्कृतीत अजूनही मानला जातो (पूजला नव्हे) ते त्याच्या बुद्धीमत्तेमुळे. वेदांच्या पठण पद्धतीमधील घनपठणाच्या आधीचे क्रम आणि जटा हे प्रकार रावणाने निर्माण केल असे आजही मानले जाते. (आता या गोष्टीत तुम्हाला रस नसेल तर तो माझा दोष नाही).
शेवटी प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात आणि प्रकृती-विकृतीही कालसापेक्ष असतात. त्यामुळे तुम्ही जरी
असो..पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांना नथुराम गोडसे विकृत मनोवृत्तीचा वाटण्याची शक्यता कमी आहे असा माझा त्यांच्या लिखाणावरुन अंदाज आहे. आणि आपल्याला एखाद्याचे विचार विकृत वाटले म्हणून सगळ्यांना तसे वाटलेच पाहिजेत असेही नाही. प्रत्येकाची मते असतात आणि त्याचा सर्वांनी आदर करावा हे लिहीले असले तरी पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा इ. सदस्यांनी त्यांना नथुराम विकृत विचारसरणीचा आहे असा प्रतिसाद दिल्यास मी माझे शब्द मागे घेऊन सर्वांची माफी मागेन. ह्यातून तुमचे म्हणणे असे वाटते की माझ्या पेक्षा वेगळी आणि विरुद्ध मते असतील तरी सर्वांनी माझीच मते मानली पाहीजेत.
बाकी हिटलर आणि नथुराम विषयी त्या धाग्यांवर लिहीनच.
पुण्याचे पेशवे
Since 1984
18 Sep 2009 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मोडक अपवाद आहेत तर मीही अपवाद आहे. मलाही गोडसे आणि हिटलर हीरो वाटत नाहीत. आणि श्रावण काकांना प्रश्नांची उत्तर मिळाली तर मला श्रावण काकांशी या विषयावर बोलायला आवडेल.
धमु आणि/किंवा पुण्याचे पेशवे यांना काय आवडेल हे त्यांनी लिहावं ना, तुम्ही का त्यांच्याबद्दल बोलताय? शिवाय हे दोघं म्हणजे सगळे मिपाकर नव्हेत.
(खरंच नवे लोकं मिपा नीट वाचत नाहीत आणि वर सरसकट, सर्वसमावेशक विधानं करतात.)
अदिती
18 Sep 2009 - 2:02 pm | धमाल मुलगा
असं कसं? त्याशिवाय का मजा पहायला मिळणार?
=)) =)) =))
नवे?????? ...............आर यु शुअर??? ;)
18 Sep 2009 - 11:01 am | श्रावण मोडक
प्रत्येकाला काय विचारतो आहे ते लिहिलं हे एक बरं झालं. एरवी कुठून या धाग्यावर प्रतिसाद दिला अशी स्थिती झाली असती. माझ्या मूळ प्रतिसादातील जी. कांबळे यांच्यासाठी केलेल्या प्रश्नाचाही खुलासा आत्ताच करतो - 'त्या' छत्रपती शिवरायांची प्रेरणा आज दिसतीये कुठं? असा हा प्रश्न आहे. प्रश्नाचा सूर उघडच ती प्रेरणा आज दिसत नाही असा आहे. तो तसाच आहे. आज ती प्रेरणा दिसत नाही. त्याचा अर्थ शिवरायांची प्रेरणा संपली असा आता काढू नका. ती धारण केली जात नाही असा त्या प्रश्नाचा सूर आहे.
18 Sep 2009 - 9:03 am | सुधीर काळे
मला असे वाटते की "Hmmmm" याचे मराठीकरण "हम्म्म्म्म" असे न करता "हंssssss" असे करावे! जसे मी "WOW"चे मराठीकरण "वाsssssव" असे केले तसे.
जस्ट एक सूचना! हम्म्म्म्म म्हटले की लहानपणच्या "हम्मा"चीच (गाय) आठवण येते!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
17 Sep 2009 - 8:11 am | लवंगी
भरपूर गप्पा मारायला आवडतील
17 Sep 2009 - 9:11 am | हैयो हैयैयो
नांवे.
- हैयो हैयैयो!
17 Sep 2009 - 11:07 am | विशाल कुलकर्णी
माझी चॉईस...
राजकारण - लोकमान्य टिळक, शास्त्रीजी, स्वा. सावरकर, एसेम जोशी, नथुराम गोडसे
साहित्य - शेक्सपिअर, भाईकाका, वपु, पी.जी.वुडहाऊस
शास्त्र - जगदिशचंद्र बोस, रामानुजन, डॉ. भाभा, विक्रम साराभाई, डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
कला - दादासाहेब फाळके, मदनमोहनजी, तलत मेहमुद्,संजीवकुमार आणि पंचमदा
समाजकारण - महर्षी कर्वे, बाबा आमटे, मदर टेरेसा..........
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Sep 2009 - 10:06 pm | विश्वेश
त्यांच्याशी बोलायला आवडेल
18 Sep 2009 - 7:51 am | सहज
बर्याच मोठ्या लोकांनी निदान गेल्या शंभर-दोनशे वर्षात केलेले कार्यत्यांच्या व त्यांच्यावरच्या साहीत्य, शोधनिबंध, काहींचा दृक्श्राव्यफिती माध्यमातुन उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना भेटण्यात तसा फारसा इंटरेस्ट नाही.
तर अश्या त्यांना भेटण्यापेक्षा इंटरेस्ट आहे तो ह्या मोठ्या लोकांची उमेदीची वर्षे कशी होती, त्यांना आपल्यातल्या उर्जेची, श्रेष्ठत्वाची जाणीव, आकलन कसे झाले ते उमजुन घेण्यात.
त्यामुळे (प्रसिद्ध व्यक्तिंपेक्षा) आता भेटायचे म्हणले तर बरेचदा आपल्याला आपल्याच पणजोबांपेक्षा मागल्या पिढीतले कोणीच माहीती नसते तर त्या लोकांना, पारतंत्र्याच्या काळात त्यांची रहाणी, विचारसरणी, त्यांच्यावरचे पगडे, ज्या गोष्टी-विचार आपण अगदी गृहीत धरुन चालतो तीच गृहीतके त्याकाळात कशी होती. आपले डिएनए जिथुन आले त्या आपल्याच खानदानातील लोकांबद्दल जास्त माहीती /समाजातील/समुहातील, प्रगती/अधोगती समजुन घ्यायला जास्त आवडेल.
तरी अगदीच विकासरावांच्या धाग्याला धरुन नाव सांगायचे म्हणल्यास महाराष्ट्रातील कुठलाही एक मोठा संत महात्मा व लिओनार्डो दा विंची (बराच जुना काळ)
18 Sep 2009 - 10:25 am | तेन्नालीराम
सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर मी या निर्णयास पोचलो आहे कीं मिपावर फक्त तीन लोक प्रामाणिक आहेत!
१. विसोबा खेचर
२. अमित अभ्यंकर
३. प्रा. बिरुटे
कुणाहणापुरुषाने मेरीलिन मन्रो, जॅकी केनेडी, मीनाकुमारी, नूतन, महाराणी गायत्री देवी यांच्यासारख्या सुंदर स्त्रियांची नावे का दिली नाहीत? बरे दिसत नाही म्हणून?
बायकांनीही क्लार्क गेबल, चार्ल्स्टन हेस्टन, गेरी कूपर, ग्रेगरी पेक, रॉबर्ट मिचम, राजकुमार, मा. विनायक, राज कपूरसारख्या पुरुषांची नावे का नाही दिली?
खरे बोलायला का लोक घाबरतात बॉ?
ते. रा.
18 Sep 2009 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सगळेच लोकं वन-ट्रॅक विचार करत नाहीत म्हणून! त्यातून तुम्हाला राज कपूर, राज कुमार, मा. विनायक, ग्रेगरी पेक फारच आकर्षक वाटत असतील तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ... लवकरात लवकर मास्तरांना भेटा.
अदिती
(अधिक माहितीसाठी ३०% लोकांना विचारा.)
18 Sep 2009 - 12:17 pm | तेन्नालीराम
ठीक आहे. गोरे तर गोरे!
ते. रा.