चकाट्या पिटायला या!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
16 Mar 2008 - 6:49 am
गाभा: 

कधीकधी मिपावर आल्यावर काहीच वैचारीक/ सामाजिक/ साहित्यिक बडबड करायची (व ऐकायची!) इच्छा नसते. थोडा वेळ इथं रहावं, चकाट्या पिटाव्यात, मंडळींची थोडी निर्विष थट्टा करावी, त्यांनी केलेल्या आपल्या थट्टेचा आस्वाद घ्यावा, थोडक्यात काय तर कट्ट्यावर आपण ज्या गोष्टी करतो त्या कराव्यात असं वाटतं. तेंव्हा केवळ गफ्फा हाणण्यासाठी, टवाळक्या (निंदा नव्हे) करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.
इथे या धाग्यावर चकाटया पिटणार्‍या सर्व टोळभैरवांचं आणि टोळभैरवींचं (?) स्वागत आहे. सिरियस वैचारिक वा सामजिक लेखन इथं नसावं. म्हणजे कोणी करायला आमची हरकत नाही पण टारगट प्रतिक्रिया आल्या तर रागेजू नये!! इरसाल मिपाकरांच्या चकाट्या पिटण्याच्या गुणाला (?) वाव मिळावा हा या धाग्याचा हेतू!
इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))

मात्र भाग घेणार्‍यांनी सदअभिरुची पाळावी. कारण नसतांना अपशब्द, व्यंगावर टीका करणे वगैरे टाळावे. भाग घेणार्‍या महिलासदस्यांना संकोच वाटेल असे काही लिहू नये. थोडक्यात थट्टा आणि धुळवड यातील फरक ध्यानात घ्यावा...

तद माताय, मग करा सुरुवात!
पहिला स्फोटक विषय पाहिजे? मी देतो,
आजकाल पोरी कशी पटवतात? आमचं नॉलेज फार जुनं आहे म्हणून विचारतो.....:)))
पोरं कशी पटवतात हे सुध्धा मुलींनी सांगायला हरकत नाही!!

-पिवळा डांबिस

प्रतिक्रिया

डांबिसकाका काहीतरी टीप द्या आम्हाला. नाहीतरी जुन्या फॅशनच परत परत येत असतात. तुम्ही तुमच्या ट्रीक सांगा की. आम्हाला पण जरा फायदा होईल.
(सज्जन डॅनी)

इनोबा म्हणे's picture

16 Mar 2008 - 11:25 am | इनोबा म्हणे

एक मुलगी घ्यावी.(व्यवस्थीत पारखून घ्यावी,उगाच घ्यायची म्हणून घेऊ नये.)
तिला नजरेच्या मंद आचेवर काहीवेळ तापवत ठेवावे.
व्यवस्थीत गुलाबी रंग चढल्यानंतर कॉमेंट्सचा मसाला आवश्यकतेनुसार टाकावा.
त्यानंतर प्रपोसिंगची फोडणी द्यावी.
झाली पोरगी पटवून तयार.
(टिपः ही रेसिपी कधी कधी पचायला फार जड जाते,आपली पचनशकक्ती पाहूनच वापरावी.)

डांबीसकाका याबाबतीतले 'खादाड' असल्याने त्यांनीच चव घेऊन रेसिपी कशी आहे ती ठरवावी.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

16 Mar 2008 - 12:02 pm | विसोबा खेचर

डांबिसा, तुझ्या नापिक (!) मेंदूतून बाकी वरचेवर बर्‍यापैकी कल्पना निघत असतात हे मात्र खरं हो! चकाट्या पिटायची ही कल्पना पण एकदम मस्त....! :)

तेंव्हा केवळ गफ्फा हाणण्यासाठी, टवाळक्या (निंदा नव्हे) करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.

उत्तम रे!

'धागा धागा अखंड विणुया..' असं काहीसं कुणीतरी म्हटलेलंच आहे ना? मात्र फक्त चकाट्यांचेच धागे विणा हो! नाहीतर लेको इथेही त्या चारोळ्यांचे धागे सुरू कराल! छ्या..! या चारोळ्यांनी बाकी मिपावर नक्को जीव केला आहे! :)

बघ रे डांबिसा, मी चकाट्या पिटणे सुरू केले की नाही?! :)

सिरियस वैचारिक वा सामजिक लेखन इथं नसावं.

हेच म्हणतो! हेच म्हणतो!! हेच म्हणतो!!! :) आम्हाला तर काय बॉ ते वैचारिक का काय म्हणतात ते लेखन जमतच नाही! ते सगळं उपक्रमावर आणि मनोगतावर...!

इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))

हा डिस्क्लेमर टाकलास ते बाकी उत्तम केलंस! :)

मात्र भाग घेणार्‍यांनी सदअभिरुची पाळावी. कारण नसतांना अपशब्द, व्यंगावर टीका करणे वगैरे टाळावे. भाग घेणार्‍या महिलासदस्यांना संकोच वाटेल असे काही लिहू नये. थोडक्यात थट्टा आणि धुळवड यातील फरक ध्यानात घ्यावा...

वा! क्या बात है...

आजकाल पोरी कशी पटवतात? आमचं नॉलेज फार जुनं आहे म्हणून विचारतो.....:)))

काय कल्पना नाय बा! बाय द वे, नकोत ते अप्रिय, जुन्या जखमा भळभळून वहायला लावणारे विषय! :)

आपला,
(फुकटच्या चकाट्या पिटणारा!) तात्या.

विजुभाऊ's picture

17 Mar 2008 - 12:27 pm | विजुभाऊ

तेंव्हा केवळ गफ्फा हाणण्यासाठी, टवाळक्या (निंदा नव्हे) करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.
'धागा धागा अखंड विणुया..' असं काहीसं कुणीतरी म्हटलेलंच आहे ना? मात्र फक्त चकाट्यांचेच धागे विणा हो! नाहीतर लेको इथेही त्या चारोळ्यांचे धागे सुरू कराल! छ्या..! या चारोळ्यांनी बाकी मिपावर नक्को जीव केला आहे! :)

तात्या.इथे त्या सगळ्या धाग्यांचा गुंता(गुत्ता नव्हे...उगाच गैर समज नको) झालाय....
सगळे गुत्ते आय मीन गुंते कापून टाकावे म्हणून मी कात्री शोधतोय्......ती कोणीतरी पळवली आहे.....
चकाट्या चे यमक फुकट्या शी चांगले जुळते............
उ सू : चारोळ्यांच्या आरोळ्या ऐकवणार्‍यांसाठी मिसळपाव ने काव्यठेप ही शिक्षा जारी करायचे फर्मान काढावे
उ उ सू : याचे नियंत्रण केशवराव ठोकरे आणि धमाल मुलाकडे द्यावे

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 1:46 pm | धमाल मुलगा

उ सू : चारोळ्यांच्या आरोळ्या ऐकवणार्‍यांसाठी मिसळपाव ने काव्यठेप ही शिक्षा जारी करायचे फर्मान काढावे
उ उ सू : याचे नियंत्रण केशवराव ठोकरे आणि धमाल मुलाकडे द्यावे

वा वा!! लय भारी काम दिल॑य मला.
अहो पण विजुभाऊ, ठोकरेशेठ तर एकदम झकास कविता/विड॑बने करतात. त्या॑चे साहित्य काव्यठेपेत सामिल करण्यात अर्थ नाही. ती शिक्षा न होता बक्षिस होईल सगळ्या॑ना. त्यापेक्षा काव्यठेप म्हणून माझ्या 'स्वरचित' आरोळ्या, कविता आपण ऐकवू...कशी वाटते कल्पना?

प्रमोद देव's picture

16 Mar 2008 - 12:51 pm | प्रमोद देव

मध्यंतरी एका गृहस्थांशी महाजालावर बोलत होतो. विषय संगीताचा(मुलगी नव्हे) सुरु होता.
त्या दिवशी एका कार्यक्रमाला जायचे होते पण जाता नाही आले..... असे मी म्हणालो.
त्यावर... कोण कलाकार होते?... असा त्यांचा प्रश्न!
अरूण कशाळकर.... माझे उत्तर.
उल्हास कशाळकर त्यांचे बंधु आहेत ना?...... त्यांचा प्रश्न.
माहित नसताना मी हो म्हटले ते फक्त अंदाजाने. अर्थात ते बरोबर निघाले. इथे थांबलो असतो तर मग माझी हुशारी ती काय?
मी म्हटले .... खरे तर माझ्या माहिती प्रमाणे अरूण कशाळकर संतुर वाजवतात. पण इथे जाहिरातीत त्यांचे गायन आहे असे लिहिलेय. काही कळत नाही.
दोन क्षण ते गप्प बसले. नंतर त्यांनी मला एक दुवा दिला आणि म्हणाले..... ते गायकच आहेत आणि इथेही त्यांची माहिती गायक म्हणूनच दिलेय. त्यात संतुरचा कुठेच उल्लेख नाहीये. तुम्हाला उल्हास बापट तर नाही ना म्हणायचे?
मी म्हटले ....बरोबर. झाला खरा घोळ. माफ करा हं. मी उगाच शायनिंग मारत होतो.
खरे तर उल्हास कशाळकर(गायक) आणि उल्हास बापट(संतुर वादक) ह्या दोघांमध्ये माझा नेहमी घोळ होतो. पण इथे ते दोघे राहिले बाजूला. आणि मी अरूण कशाळकरांनाच संतुर वादक करून टाकले.
अस्सा झाला माझा पोपट.

विसु: विषयांतराबद्दल माफ करा! पण माझ्याकडे तसला काही अनुभव नाहीये. आणि इथे कुणी काहीच लिहीत नाहीये हे पाहून मी आपली गाडी पुढे काढली झाले. तसेही चकाट्या पिटतांना कोणताही विषय चालतो आणि केव्हाही विषयांतर होऊ शकते. हो की नाही?

प्राजु's picture

16 Mar 2008 - 11:18 pm | प्राजु

साधा नाही... सप्तरंगी झाला.
पं.अरूण कशाळकर हे उत्तम गायक आहेत. आणि सगळ्यात म्हणजे त्यांनी "स्वर अर्चना" नावचे एक पुस्तक लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी सगळ्या रागातल्या स्वरचित बंदिशी त्यांच्या नोटेशन सकट लिहिल्या आहेत. अतिशय सुंदर आणि रसाळ बंदिशी त्यांनी लिहिल्या आहेत. आग्रा घराण्याच्या गायकीसाठी ते प्रसिद्ध आहेत. ते इथे अमेरिकेत आले होते तेव्हा माझ्या घरी आले होते. माझे शेजारीच आहेत ते(त्यांचा मुलगा आणि सून). इप्रसारण साठी मी त्यांची मुलाखतही घेतली होती.
खूप काही शिकायला मिळाले.

- (सर्वव्यापी)प्राजु

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2008 - 11:06 pm | पिवळा डांबिस

डांबिसकाका काहीतरी टीप द्या आम्हाला.
कायरे धनंजय, तुम्ही हल्लीची पोरं! मी तुम्हाला नव्या गोष्टी विचारतो आणि तुम्ही माझ्याकडेच टिप मागताय!:)) आमची टिप वापरलीत ना तर नऊवारी साडी नेसणारी बायको करावी लागेल बहुतेक!!:))

तिला नजरेच्या मंद आचेवर काहीवेळ तापवत ठेवावे.
इनोबांची रेसिपी झकास! मात्र ही रेसेपी वापरून त्यांनी जी बायको मिळवली ती आता त्यांना तिच्या नजरेच्या तीव्र आचेवर उकळत ठेवते. त्यांच्या ज्वलंतपणाचे तेच गुपित आहे!!:))

तुझ्या नापिक (!) मेंदूतून बाकी वरचेवर बर्‍यापैकी कल्पना निघत असतात हे मात्र खरं हो
जमीन अगदीच नापीक नाही, पण आमची 'काँग्रेस गवताची' शेती असल्यामुळे तुम्हाला तसं वाटलं असेल. आजकाल कुठल्याही पिकापेक्षा काँग्रेस गवताला आज जास्त भाव मिळतो राव!!:))
या चारोळ्यांनी बाकी मिपावर नक्को जीव केला आहे! :)
नाय तर काय! अगदी अजीर्ण व्हायची वेळ आलीय!!:)))))

आमचं नॉलेज फार जुनं आहे म्हणून विचारतो.....:)))
काय कल्पना नाय बा! बाय द वे, नकोत ते अप्रिय, जुन्या जखमा भळभळून वहायला लावणारे विषय! :)
अरे बाबा, असं म्हणून कसं चालेल माझ्या राजा! आपल्याला अनुष्कावहिनीला (म्हणजे आमच्या वहिनीला) घरी आणायचंय ना! धीर सोडू नको बाबा!!:)))

विषयांतराबद्दल माफ करा! पण माझ्याकडे तसला काही अनुभव नाहीये.
प्रमोदराव, अहो चकाट्यांना कसलं आलंय विषयांतर! चकाट्या पिटतांना असेच विषयांतून विषय निघत नाहीत का! तेंव्हा तुम्ही असं काही वाटून घेऊ नका!
आम्ही आपलं डोकं खाजवून सगळ्यांना बोलता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न केला होता, पण त्यालाच धरून राहिलं पाहिजे असं मुळीच नाही हो...
अजून आपले डॉन, धमु वगैरे आलेले नाहीत. वीकेंड आहे ना, ओल्या पार्ट्या असतात! एकदा आले की पहा कसे धडाधड विषय निघतात ते!!!:)))

इनोबा म्हणे's picture

17 Mar 2008 - 2:32 am | इनोबा म्हणे

इनोबांची रेसिपी झकास! मात्र ही रेसेपी वापरून त्यांनी जी बायको मिळवली ती आता त्यांना तिच्या नजरेच्या तीव्र आचेवर उकळत ठेवते. त्यांच्या ज्वलंतपणाचे तेच गुपित आहे!!:))
आमच्या रेसिपीला पसंती दिल्याबद्दल धन्यवाद! मात्र आमच्यासारख्या आजन्म अविवाहीत राहण्याचे व्रत पाळणार्‍यास आपण विवाहीत म्हटल्यामुळे आम्ही आपला जाहीर निषेध करतो. :)

कारणे दाखवा नोटीस
आमच्या ज्वाजल्य महाराष्ट्रप्रेमाची त्यांच्या ज्वलंतपणाचे तेच गुपित आहे!! या विधानाद्वारे अशाप्रकारे जाहिर थट्टा केल्याबद्दल आपल्यावर (बे)कायदेशीर कारवाई का करु नये? :)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Mar 2008 - 11:35 pm | llपुण्याचे पेशवेll

कायरे धनंजय, तुम्ही हल्लीची पोरं! मी तुम्हाला नव्या गोष्टी विचारतो आणि तुम्ही माझ्याकडेच टिप मागताय!:)) आमची टिप वापरलीत ना तर नऊवारी साडी नेसणारी बायको करावी लागेल बहुतेक!!:))
अहो चालेल हो आम्हाला नऊवारीतली पण मिळत नाही ना!! ..... आणि तसेही पुण्याच्या पेशव्याना नऊवारीवालीच पाहीजे ना! 'तद् माताय' मिनी किंवा मिडी वाली कशी चालेल. असो तर डांबिसकाका तुमच्या टीप्स आवश्यक आहेतच.. :))
पुण्याचे पेशवे

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Mar 2008 - 2:03 am | ब्रिटिश टिंग्या

काय हे डांबिसकाका, काकुंना सांगु का तुम्ही इथे कसल्या कसल्या चकाट्या पिटताय ते........
आता आम्ही (म्हणजे मी, इनोबा, धमु, डॉन्या, पेशवे इ.इ.) पडलो बिचारे सुसंस्कृत, निष्पाप अन् निरागस बालके (कोण रे तो दात काढतोय मगापासुन).....अन् आमच्यावर हे संस्कार? ........शिव शिव शिव......
आम्हाला काय माहिती की पोरी (सध्याच्या भाषेत आयटम) कशा पटवाव्यात ते?.....

असो, आता तुम्ही पडलातं वडिलधारी माणसं.....तुमची आज्ञा कशी मोडणार आम्ही (आम्ही म्हणजे परत तेच वरती कंसात दिलेले)........
काकाश्री, चला तर मग तुम्ही दिलेल्या आज्ञेचे आम्ही (या वेळेस आम्ही म्हणजे मी) पालन करतो.......

हा आमचा स्वत: अनुभवलेला अन् फसलेला अल्गोरिदम (फसलेला म्हणजे अनुभव....पोरगी नाय काय).......

१. आवडलेल्या पोरीशी बादरायण संबंधाने ओळख काढा.......
२. पोरगी ऑलरेडी बुक असेल तर नाद सोडा.......(उगाचच वेटिंग लिस्ट अन् आर.ए.सी.च्या भानगडीत पडू नका)
३. काही दिवसांनंतर पोरीला डायरेक्ट जाउन भिडा (भिडा म्हणजे फक्त समोर जाउन उभे रहा हो).....
४. डायरेक्ट लवशिप देशील का विचारा?
५. नाही म्हटली तर तात्कालमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करा.....(थोडा खर्चिक मार्ग आहे पण तरीही).....हो म्हटली तर प्रश्नच संपला......अन् जर का नाहीच म्हटली तर......
६. पुढच्या पोरीशी बादरायण संबंधाने ओळख काढा.......

आपला,
(एक आज्ञाधारक) पुतण्या ;)

पिवळा डांबिस's picture

17 Mar 2008 - 4:35 am | पिवळा डांबिस

अहो चालेल हो आम्हाला नऊवारीतली पण मिळत नाही ना!! ..... आणि तसेही पुण्याच्या पेशव्याना नऊवारीवालीच पाहीजे ना!
हा! हा! हा!:))
खरंच मघाशी तुम्हाला विचारायचं राहून गेलं की तुम्ही "आजकालच्या" पोरी पटत नाहीत म्हणालात ते काय? नाही म्हणजे तुम्ही जर "आजचे" असाल तर तुम्हाला "आजच्या" पोरी पटण्यात अडचण पडू नये!! हां, तुम्ही जर आमच्यासारखे "कालचे" असाल तरमात्र "आजच्या" पोरी तुम्हाला पटणं कठीण!! :)))
त्यासाठी अमेरिकेला यावं लागेल, काय?:)))
जॉन मक्केनची (सध्याची) बायको त्याच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहे, राव! तुम्ही पण इथे या, मग तुमच्यासाठीही एखादी बघू वीस वर्षांनी लहान, पाळण्यातली!! मग काय ठरवता? :)))

काय हे डांबिसकाका, काकुंना सांगु का तुम्ही इथे कसल्या कसल्या चकाट्या पिटताय ते........
तुला काय वाटतं मी तिच्या अपरोक्ष इथे लिहितो? बाबारे, मग तुला संसार या गोष्टीविषयी काहीच माहिती दिसत नाही...
तिला मिपा माहीती आहे. ती नियमितपणे इथे वाचत असते. पिवळा डांबिस म्हणजे कोण हे तिला समजायला काहीच अडचण पडणार नाही. आपलं "बेनं" काय आहे हे तिला चांगलंच माहीती आहे!!
मला तर असा डाऊट आहे की ती माझ्या अपरोक्ष माझाच आय्.डी. वापरून इथे माझ्या नकळत प्रतिक्रिया टाकते! कारण नाहीतर मी इतका चावट मुळीच नाही...:)))

या विधानाद्वारे अशाप्रकारे जाहिर थट्टा केल्याबद्दल आपल्यावर (बे)कायदेशीर कारवाई का करु नये? :)
आरं आरं! आसं काय करताय!
भर बाजारात हात पकडून कारवाईची धमकी देता!
नगं, नगं, आसं करु नका राव!

पब्लिक बघतंय, दात विचकतंय,
मनगट ओढू नका|
इनोबा मला,
चौकीवर नेऊ नका!!!:))))

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Mar 2008 - 11:55 pm | llपुण्याचे पेशवेll

खरंच मघाशी तुम्हाला विचारायचं राहून गेलं की तुम्ही "आजकालच्या" पोरी पटत नाहीत म्हणालात ते काय? नाही म्हणजे तुम्ही जर "आजचे" असाल तर तुम्हाला "आजच्या" पोरी पटण्यात अडचण पडू नये!!
अहो तसा मी आजचाच आहे. पण आमची आवड एकदम हटके आहे हो... (लक्षाच्या 'आवडी' सारखी :)) त्याच्या बर्‍याचशा सिनेमामधे त्याची 'आवडी' नऊवारीत असायची.. आणि तो म्हणायचा "आवडे, इकडे बघ ना!" )

हां, तुम्ही जर आमच्यासारखे "कालचे" असाल तरमात्र "आजच्या" पोरी तुम्हाला पटणं कठीण!! :)))
त्यासाठी अमेरिकेला यावं लागेल, काय?:)))

अहो तसा मी अमेरीकेतच आहे सध्या तर आपणही त्वरा करा आणि आपल्या आयडीया सांगा. :) आणि मी सध्या ब्रम्हचारी असलो तरी एकपत्नीव्रताची शपथ नाही घेतलेली त्यामुळे एक इकडे आणि एक पुण्यात केली तरी चालणार आहे..... नाहीतरी लोक डाव्हर्सीफाईड पोर्टफोलीओ नाही का बनवत!

पुण्याचे पेशवे

सर्किट's picture

17 Mar 2008 - 10:55 pm | सर्किट (not verified)

अरे मस्त !

तुम्ही मस्त विषय काढला बघा..

आम्हाला एक विषय इथे काढावासा वाटतो, तो म्हणजे.. येथील पुरुष (अर्धे देखील चालतील) सदस्यांनी आजवर त्यांच्य बायकांना "अगं एक मिनीट, जरा आफिसचं काम करतोय" अस< सांगून कटवण्यसाठी आधी किती मेहनत करावी लागली ?

तद्माताय, आम्हाला जमतच नाही....

- सर्किट

ॐकार's picture

18 Mar 2008 - 1:04 am | ॐकार

अर्धे पुरुष?? की इथल्या पुरुषांपैकी निम्मी लोकसंख्या?

नन्दु's picture

17 Mar 2008 - 11:23 am | नन्दु

पब्लिक बघतंय, दात विचकतंय,
मनगट ओढू नका|
इनोबा मला,
चौकीवर नेऊ नका!!!:))))


वा काका तुम्हि पण चारोळि केली
वा छान

मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

एकतर आम्ही या फन्दात पडलोच नाहि आणि चुकुन आम्हाला एखादी पोरगी आवडलीच तर ती कोणाशीतरी "एन्गेजच" असायची :(. तर अशावेळी आमच्या सारख्या होतकरू तरुणानी काय कराव?????

मी इन्जीनीरींग ला असताना.एक मुलीने मला प्रपोज केले होते...का कोणास ठाउक मला तिच्यात फारसा इंट्रेस्ट नव्हता.सबमिशन वगैरे मुळे वेळ ही नसायचा.
ती शेजारच्या आर्ट्स कॉलेज मधली होती.... कॉलेज ला जाताना त्या कॉलेज्मधुन शॉर्ट्कट होता.
ती आणि तिच्या मैत्रिणींची गॅंग मी जाताना रोज कॉलेज कॉरीडोर मधे उभ्या रहायच्या आणि मला टॉन्ट्स मारायच्या.
काही वेळा माझा रस्त्यात उभ्या रहायच्या......आणि कॉरीडोर संपे पर्यन्त काही तरी माझ्या मागे आणि पुढुन चालायच्या.
चिडवण्या साठी गाणी ही म्हणयाच्या
अस्मादीक एकटेच असायचे आणि मान खाली घालुन कॉरीडोर पार करायचे...रोजचे हे दिव्य पार झाले के हुश्श्श करायचे.
शेवटी त्या मुलीला मी एक दिवस घरी बोलवले...
.....................................................आणि तिच्या हाती ओवाळणी ठेवली..........
एक पिडीत
विजुभाऊ

प्रसन्न's picture

17 Mar 2008 - 11:57 am | प्रसन्न

नशिब जोरदार आहे राव तुमच, मुलीच तुमच्या मागे आहेत नाहीतर आम्ही ??????

नशिब जोरदार आहे राव तुमच, मुलीच तुमच्या मागे आहेत नाहीतर आम्ही ??????

अरे बाबा तुला काय कळणार माझ्या व्यथा. सांगता येईना आणि सहन ही होइना.....अशी गत.
माझ्या ग्रुप मधे तर मला मुली सतवतात असे सांगणे हे समस्त "पोरे" जमातीचा अपमान होता.एक आख्खी टर्म सहन केलं.
ओवाळणी सुद्धा मला महागात पडेल अशी भीती वाटत होती ( हन ओवाळणी दे..और वो तोह्फा ना समझ बैठे.....) शेवटी त्याच ग्रुप्मधल्या एक सज्जन मुलीला पटवुन ( कोण हसला रे तो?) मी ते जमवले
एक गरीब पीडित
विजुभाऊ

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 2:11 pm | धमाल मुलगा

ह॑...
विजुभाऊ, च्यामारी एकदाच त्यातल्या एखाद्या कार्टीला हाताला धरुन ओढल॑ असत॑ तर हे एव्हढ॑ सोसाव॑ लागल॑ नसत॑ की हो!

जाऊदे, मी नव्हतो ना बरोबर, नायतर एकेकीला अस॑ ठीक केल॑ असत॑ ना, आप्ल्या भौ ला टे॑शन देतात म्ह॑जे काय ?
असो.
पण भाऊ, नशिब जोरदार आहे राव तुमच, मुलीच तुमच्या मागे आहेत नाहीतर आम्ही ?????? १००००% सहमत हा॑. तुम्ही जरा धाडस केल॑ असत॑ ना राव, तर....... जाऊ द्या!!!!!

प्रमोद देव's picture

17 Mar 2008 - 2:23 pm | प्रमोद देव

ऐसी कोई हमारे पीछे पडती?

हाहाहा. हे वाक्य हिंदीतच बोलले पाहिजे नाही काय?
असेच असते हो. जिथे दात असतात तिथे चणे नसतात आणि चणे असतात तिथे दात नसतात.
मिळते त्याला इतके मिळते की अजीर्ण होते आणि नाही मिळत त्याला अजिबात नाही.
हाच खरा नियम आहे हो.
ह्या क्षेत्रात साम्यवाद नाही काय आणता येणार? काय रे धमु? कशी आहे आयडियाची कल्पना?
कल्पना म्हणजे कल्पना कार्तिक किंवा कल्पना अय्यर नाही बरं का!

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 2:52 pm | धमाल मुलगा

ह्या क्षेत्रात साम्यवाद नाही काय आणता येणार?
वा काका, क्या बात है!!!! तस॑ झाल॑ तर लाखो आशिक दुवा देतील. बाकी साम्यवाद आणि त्या चळवळीचा फारसा ग॑ध नाही, इथे काही काळापुर्वी एक कॉम्रेड वावरायचे ते कुठे आहेत? कॉ.ब्रदर जरा लक्ष घालाल काय ह्यात? :-))

काश ऐसी कोई हमारे पीछे पडती?
हाहाहा. हे वाक्य हिंदीतच बोलले पाहिजे नाही काय?

एकदम बरोबर काकाश्री. ह्यावरुन सु.शि.च्या दुनियादारीतला एक प्रस॑ग आठवला.

श्रेयस, दिग्या, नितीन, अश्क्या सगळे अमृततुल्यला चहाच्या नावाखाली टी.पी.करताना साईनाथ येतो आणि मारामारी चालू.....
दिग्या आवाज टाकतो...."गेम करता है गा॑डू....चल मैदानमे आ.........." आता हे हि॑दीतच हव॑, उगाच "खेळी करतोस भ्याडा...चल मैदानात उतर.." कस॑ वाटत॑ ????

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 12:17 pm | धमाल मुलगा

वा डा॑बिसकाका, किती हो चा॑गले आहात तुम्ही !
ही चकाट्या॑ची आयडियाची कल्पना झकास.

अजून आपले डॉन, धमु वगैरे आलेले नाहीत. वीकेंड आहे ना, ओल्या पार्ट्या असतात! एकदा आले की पहा कसे धडाधड विषय निघतात ते!!!:)))

निषेध निषेध...आम्हास बदनाम करणार्‍या समस्त प्रस्थापिता॑चा जाहिर निषेध !!!
मायला, आख्ख्ख्खा विक-ए॑ड मिपाच्या पुणे भेटीपायी गरागरा फिरत होतो आम्ही. भर उन्हात बो॑बलत हि॑डून जीव जायची वेळ आली. त्यातून तिर्थरूपा॑च॑ पुण्यात आगमन झालेल॑...श्रमपरिहाराचीही बो॑ब !!!

सर्किटराव,
येथील पुरुष (अर्धे देखील चालतील) सदस्यांनी....
तद् माताय, अर्धे पुरुष म्हणजे ? :-)))) आणि मग त्या॑ना बायको कशी काय?

इनोबा,
रेशिपी झक्कास रे! आता बघतो ट्रायल घेऊन. (गुपचूप, आमच्या 'ही'च्या नकळत हो! नायतर साला लगिन मोडायच॑)

प्रमोदकाका,

तुमचा पोपट झाला असेलही, पण च्यामारी आपल्याला मात्र काही कळल॑ नसत॑ त्यातल॑.म्हणजे गाढवापुढ॑ गायली गीता...

ह्म्म्म्म...आता मुळ मुद्द्याकडे वळूया.

पोरी कशा पटवाव्यात?
विषय तसा बराच गहन आहे (आणि ग॑भीरही! तिचा भाऊ डे॑जरस असेल कि॑वा बाप खविस असेल तर) .
तर, शक्यतो गरीब बिचार्‍या बापाची मुलगी निवडावी.
जमल्यास तिच्या सहोदरास चहा / नाष्टा / चखणा / बाटली / .. ह्यापैकी योग्य ते मार्ग निवडून खिशात घालावे.
आणि इतर कृती इनोबा कपूरच्या पटना-पटाना प्रमाणे.

एकच फॉर्म्युला सगळ्या॑ना लागू पडेल असे नाही. पोरीप्रमाणे स्वतःची "स्पेशिफिकेशन्स" बदलावीत.

आमचा दारुण अनुभव पुढीलप्रमाणे :
आमचे एक ब॑धू स.प.महाविद्यालयात असताना दर महिन्याप्रमाणे एका सप्टे॑बरात प्रेमात सा॑डले.आता दर नव्या प्रेमपात्राशी आमची भेट घडवण्याची ह्या॑ना मोठी आवड. तर ह्या पात्राला भेटवण्यासाथी त्या॑नी आम्हास स.प. येथे बोलावले.
तर, ब॑धूच्या ह्या प्रेमपात्रास॑गे एक सखी होती....आणि पाहताच ती बाला कलिजा खलास झाला !!!!!

मग काय विचारता म्हाराजा, एकदम टैट फिल्डि॑ग लावली. आमच्या त्या महिन्याच्या वहिनीस विश्वासात घेतल॑, माहिती काढून घेतली. त्यात कळल॑ की ह्या बालेस एक भाऊ असतो...तद् माताय, आल॑ का झे॑गाट! पण लवकरच तोही प्रश्न दूर झाला. हा भाऊ नक्त आठवीत असतो हे कळल॑. म॑ग काय राव टाकला त्याला खिशात. हळूहळू तिच्या सगळ्या मैतरिणी फितूर केल्या.
एव्हढी सगळी सेटी॑ग लावल्यावर काय देवा, त्या॑च्या ग्रुपमध्ये सगळ्या मुली सतत माझाच विषय चघळायच्या...हळूहळू आमची ही प्रिया आमच्याशी स॑वाद साधू लागली. म्हणल॑ गोळी बरोब्बर बसली आहे.

एक दिवस ठरवल॑, आता बास, आर या पार करूनच टाकू. S.S. मध्ये बसलो असताना ठरल॑, आज सोक्षमोक्ष लावायचा.
एक मित्रवर्य त्या॑ची गिटार घेऊन आलेच होते. मस्त रोमॅ॑टीक गाणी वाजवत होते. वातावरणनिर्मिती उत्तम झाली होती, फक्त बॉ॑ब टाकायचा बाकी होता.
एका॑त शोधून मी तिला गाठल॑. हातात 'जरबेरा'च॑ फूल! तसा मी धोरणी ह॑. गुलाब अज्याबात नग॑ म्हनल॑. अडकलो तर गेलोच.
जरबेरा कस॑ कुणालाही देता येत॑ :-) तिला म्हणालो, My Dear, I cherish you......Love वगैरेचा उच्चारच नको...
पुन्हा खबरदारी. तर उत्तर "अरे पण मी तुझ्याहून ५ वर्षा॑नी लहान आहे." म्हणजे स॑मती आहे पण आढेवेढे..."असु दे" इति मी.

ह॑....ते॑व्हापासून गेली सव्वातीन वर्ष॑ त्या गाढवपणाची फळ॑ भोगतोय.
आज काय 'माझ्या ह्या बहिणीचा साखरपुडा आहे, तू यायच॑यस.' उद्या 'माझ्या त्या बहिणीच॑ डोहाळजेवण आहे तू यायच॑यस'
'अरे? डोहाळजेवणात पुरुषा॑च॑ काय काम? ते तर केव्हा॑च झालेल॑ असत॑ ना? ' इति आमचे भावी सासरेबुवा. एकुणच ह्या माणसाबद्दल मला जरा जास्तच लोभ आहे. बिचारा चा॑गला आहे हो. देव माणूस.
असो.
तर म॑डळी, अशी आमची रामकहाणी. ह्यातून पोरगी कशी पटवायची ह्याच॑ उत्तर मिळाल॑ असेल अशी आशा करतो.

धमाल मुलगा's picture

17 Mar 2008 - 1:28 pm | धमाल मुलगा

आयला, हे म्हणजे लैच अवघड झाल॑य.
जिथे सगळे चा॑गल्या, विद्वत्ताप्रचुर, शहाण्या प्रतिसादा॑ची अपेक्षा करत असतात, तिथे आम्ही आमची फुटकळ अक्कल पाजळतो, आणि इथे मनमुराद हैदोस घालायला आ॑गण दिल॑य तर हे असल॑ काहीतरी बडबडतोय! काय तर डोस्क॑ आमच॑.
ह्यावर म्हणावस॑ वाटत॑य,
अक्कल देता का अक्कल...कोणि अक्कल देता अक्कल.
चिमुटभरही चालेल, शिळीपाकी उरलीसुरलेलीही चालेल, पण कोणि अक्कल देता अक्कल !!!

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2008 - 12:01 am | llपुण्याचे पेशवेll

आम्हाला तर वापरलेली अक्कल पण चालेली. :)

पुण्याचे पेशवे

मनस्वी's picture

17 Mar 2008 - 2:13 pm | मनस्वी

जो मुलगा / जी मुलगी पटवायची आहे तिच्या मैत्रिणीशी / त्याच्या मित्राशी मैत्री करून त्या मुला(ली)कडे अगदी दुर्लक्ष्य करावे.
आपोआपच ती/तो आपणहून आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करेल!
नाही केला तर... ती/तो इंटरेस्टेड नाही असे समजून पुढील शोधमोहीमेस लागावे.

अवांतर : ज्याचाशी खरंच चांगलं जमतं त्याला पटवायला उपाय करावे नाही लागत.. आणि ज्याला "पटवावं" लागतं त्याच्याशी जमेलच असं नाही.

मनस्वी

प्रसन्न's picture

17 Mar 2008 - 2:25 pm | प्रसन्न

आपोआपच ती/तो आपणहून आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करेल!
हल्ली हा प्रकार मुलीना ही कळायला लागला आहे. त्यामुळे जरा अवघडच आहे.
ज्याचाशी खरंच चांगलं जमतं त्याला पटवायला उपाय करावे नाही लागत.. आणि ज्याला "पटवावं" लागतं त्याच्याशी जमेलच असं नाही.
हे १०० % पटल.

धमाल्या अक्कल अशी मागुन मिळाली असती तर...................
अहाहा..............
१)र ला ट न जुळवता चारोळी लिहा अशी आरोळी मी ठोकली नसती
२)प्रायोगीक नाटके बसविली नसती (तू सहमत १००% असणारच)
३) ती बसवुन फक्त परिक्षकांसाठी सादर केली नसती(तू यालाही सहमत १००% असणारच)
४) मुलगी पटणे यात आनंद मानला नसता ( खरे तर तू कसली फिल्डींग लावलीस्............शिकारी स्वतःच सावज असतो)
५) प्रेम पात्र स प महाविद्यालयात शोधले नसते ( मला अनुभव आहे)
६) प्रेम पात्र स प महविद्यालय परीसरात शोधायच्या अगोदर बादशाही मधल्या सगळ्या पाट्या एकदातरी आठवल्या असत्या ( हो अगदी "हा येण्याजाण्याचा रस्ता आहे अघळ्पघळ गप्प मारवयाची जागा नव्हे" सकट सगळ्या)
७)स्वतः अगोदर प्रपोज करण्याच्या भानगडीत अडकला नसतास ( आता भोग आपल्या कर्माची फळे....."मी आले नव्हते...तूच आला होतास" ई.)
..........येवढे म्हणून वेताळ उडाला आणि पुन्हा नव्या झाडावर जाउन बसला..
शेवटी काय.........
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते...तुमचे आणि आमचे सेम असते.
आपल्या कर्माची फळे भोगत असलेला विक्रमादित्य
विजुभाऊ.....

"आजकाल पोरी कशी पटवतात"
खल्लास, डांबिसकाका काय "हाफ्-वॉली" बॉल टाकलात राव, आता ह्यावर जर पोरांनी फटाकेबाजी केली नाही तर त्यात काही अर्थ आहे का ?
बाकी "अजून आपले डॉन, धमु वगैरे आलेले नाहीत. वीकेंड आहे ना, ओल्या पार्ट्या असतात! एकदा आले की पहा कसे धडाधड विषय निघतात ते!!!:)))"
च्यायला हे काय आम्हाला बदनाम करायचे धंदे ? साधी, सरळ, देवभोळी पोरं आम्ही कशाला असल्या फंदात पडतो राव ?
आमच्यावर असले धांदात खोटे (?) आरोप केल्याबद्दल डांबिसकाकांवर "ओली पार्टी देण्याचे" समन्स का बजावण्यात येऊ नये ?
अवांतर : यामुळे आमच्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडाल्या असे आम्ही मानत नाही ...

असो.....

मग "हाण तिच्यायला" म्हणून सुरु करतो ...
मुळात प्रश्न असा आहे की "आजकाल पोरगी कशी पटवतात ?", मग त्यात आजकाल हा भाग अलहिदा ठरतो कारण कुठल्याही काळात ह्या गोष्टीसाठी तेवढेच "पापड बेलने पडते है [ ह्याला पर्यायी मराठी मला माहित नाही ....]. तर आजच्या घडीला "पोरगी पटवायला" साधारणपणे महत्वाच्या व कंपल्सरी ३ गोष्टी आहेत ज्या "एम्" पासून सुरु होतात, त्या म्हणजे मनी , मोबाईल व मोबाईक. ह्यातली एकसुध्धा गोष्ट जर नसेल तर प्रकरण थोडे अवघड व गंभीर होते ...

आता "पटवणे" म्हणाजे नक्की काय करायचे हे सुध्धा पहिल्यांदा व्यवस्थित "डिफाईन करावे" लागेल....

१. म्हणजे पुढे तुम्हाला लग्न करून सेटल व्हायचे आहे,
२. नुसते आख्ख्या गावभर माज करत हिंडाय्चे आहे,
३. कॉलेजमध्ये कोणी गर्लफ्रेंड नसेल तर मुर्ख समजतात म्हणून " नगाला नग" हवा म्हणून ,
४. आपल्या दोस्तमंडळीत छाप करायची आहे,
५. आपल्या बरोबर "कॉफी पिण्यासाठी , सिनेमे बघण्यासाठी , बागेत हिंडण्यासाठी , फोनवर तासनतास गप्पा मारण्यासाथी , शॉपींगला जाण्यासाठी, डिस्कोला जाण्यासाठी " कोणीतरी "स्त्री जातीतले" पाहिजे .... वगैरे वगैरे ....

आता "टाईप १" ची पोरगी पटण्यासाठी प्रथम तुम्ही "सभ्य " असणे गरजेचे आहे कारण लग्नाच्या वेळी तुमच्या भुत़काळातील "चुका " तुमच्यासमोर दत्त म्हणून उभ्या राहतील. अश्या परिस्थितीत पोरीचा बाप तुम्हाला दारात सुध्ध्दा उभा करण्याची शक्यता नाही उलट तुम्हाला पळवून लावण्यासाठी तुमच्या अंगावर कुत्रे सोडण्याची शक्यता असते. [ यातून बाप जर पुणेरी असेल तर तुम्ही मेलाच ...] आणि वर पोरगी सुध्धा तुम्हाला भीक घालणार नाही. त्यामुळे हे व्रत जरा अवघड समजले जाते ... जर तुम्ही "सभ्य" नसाल तर तुम्ही अगदी "कर्तुत्ववान " आसणे सुध्धा चालू शकते कारण त्यापुढे बाकीचे अवगूण थोडे फिक्के पडतात ....

आता "टाईप २ " ची पोरगी पटवण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे "तशी फटाका पोरगी" हुडकणे. पोरगी मुळातच "फटाका" असल्यामुळे तिच्यात अकलेचा भाग तसा कमीच असतिओ त्यामुळे "विनोबांची रेसिपी आधिक वर सांगितलेले ३ एम् " वापरून पोरगी पटू शकते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकदा ही पोरगी पटल्यावर तिला सांभाळणे कारण अख्खा गाव टपून असतो ना तिच्यावर. .. योग्य काळजी न घेतल्यास हाती आलेली "चिडीया " ऊडून जाऊ शकते ... अजून एक महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला "मजबूत मित्रमंडळ " हवे कारण ह्या पोरीच्या लफड्यात अनेक हाणामार्‍या होतात व तुम्हाला त्यासाठी सदैव तयार असणे गरजेच आहे ....
[ टीप : शक्यतो राजकारणी, गावगुंड, बिल्डर, सरकारी कंत्राटदार, पैदायशी रईस यासारख्याच वर्गातल्या लोकांच्या पोरांनी या फंदात पडावे, मध्यमवर्गाला झेपणारी ही गोष्ट नाही .....]

आता "टाईप ३ व ५ " ची पोरगी पटवण्यासाठी फार असे कष्ट करावे लागत नाहीत. फक्त थोडीशी हिंम्मत व ३ एम् असले व त्या पोरीमुळे आपल्या डॉक्याची मंडई करून घेण्याची तयारी असली की झालेच काम. साधारणता या गोष्टीसाठी सुध्धा तुमच्यात कोणते ना कोण्ते कर्तुत्व वा गुण असणे आवश्यक आह, नुसत्या साध्यासरळ लोकांची ही कामे नाहित.... फक्त प्रोब्लेम म्हणजे यासाठी तुम्हाला पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो कारण ती "पटलेली पोरगी" कुठेही आपली "पर्स" बाहेर काढत नाही कारण तिलाही साधारणता कल्पना असते की तुम्ही तिला का पटवले आहे ते ...
पण हा एकंदरीत सोईस्कर मार्ग आहे. कारण पोरगी गळ्यात पडत नाही, वेळ आली की घरचे माझे लग्न ठरवत आहेत म्हणून [एकदाची] निघून जाते ...

आता "टाईप ४" ची पोरगी ही जनरली आपल्या "कॉलेजमध्ये असलेल्या ग्रूपमधूनच" पटवतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रूपपासून "थोडे हटाके" असणे गरजेचे आहे. त्या मुलीला तिच्यावर तुमची "लाईन आहे" हे वारंवार अप्रत्यक्ष रित्या कळवणे महत्वाचे आहे, त्यानंतर "तवा गरम असला की १४ फेब. चा वगैरे मुहुर्त बघून "लाल गुलाबाचा हातोडा मारायचा". या प्रकारात जास्त खर्च होत नाही कारण बाकीचे पब्लिक काय बोंबलेल याची भिती असते. शक्यतो कॉलेजचा काळ व त्यानंतर फारतर १ वर्ष चालणारे हे व्रत आहे पण यापासून "फळ" मात्र हवे ते मिळू शकते... पुन्हा महत्वाचे म्हणजे यामुळे होण्यार्‍या चेष्टेला तोंड देण्याचा "दम असणे" गरजेचे आहे...

आता थोडे जनरल ...
"विनोबांची रेसिपी " - गोल्ड मेडल .....

"जो मुलगा / जी मुलगी पटवायची आहे तिच्या मैत्रिणीशी / त्याच्या मित्राशी मैत्री करून त्या मुला(ली)कडे अगदी दुर्लक्ष्य करावे.
आपोआपच ती/तो आपणहून आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करेल!"

मनस्वी . तोडलसं अगदी ... आम्ही हाच मार्ग सुचवतो ....

". आवडलेल्या पोरीशी बादरायण संबंधाने ओळख काढा.......
२. पोरगी ऑलरेडी बुक असेल तर नाद सोडा.......(उगाचच वेटिंग लिस्ट अन् आर.ए.सी.च्या भानगडीत पडू नका)
३. काही दिवसांनंतर पोरीला डायरेक्ट जाउन भिडा (भिडा म्हणजे फक्त समोर जाउन उभे रहा हो).....
४. डायरेक्ट लवशिप देशील का विचारा?
५. नाही म्हटली तर तात्कालमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करा.....(थोडा खर्चिक मार्ग आहे पण तरीही).....हो म्हटली तर प्रश्नच संपला......अन् जर का नाहीच म्हटली तर......
६. पुढच्या पोरीशी बादरायण संबंधाने ओळख काढा......."

टिंग्याचा मार्ग म्हटला तर उत्तम म्हटला तर "कानफाटात खावा" लागणारा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Mar 2008 - 12:32 am | ब्रिटिश टिंग्या

आम्ही आधीच वर नमूद केल्याप्रमाणे आमचा मार्ग फसलेला होता.....
नशीब पोरगी जरा समंजस होती.....कानफटात वगैरे खाण्याचा प्रसंग नाही आला.....
असो, आयुष्यात पहिल्यांदाच ६ फुट उंचीचा फायदा झाला....

- उंच टिंगी ;)

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 1:23 am | इनोबा म्हणे

आयुष्यात पहिल्यांदाच ६ फुट उंचीचा फायदा झाला....
आयला मंग टिंगी कोण रे! तू तर टांगा आहेस(माझ्यासारखा).

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

18 Mar 2008 - 4:49 pm | छोटा डॉन

" तू तर टांगा आहेस(माझ्यासारखा)."
च्यायला विनोबा , आपल्याकडे "टांगा असणे " हा वाक्यप्रचार वेगळ्या कारणासाठी वापरतात तो म्हणजे " दारू पिऊन टांगा पल्टी , घोडे फरार " याचा शॉर्टफॉर्म " टांगा झाला" असा होतो ...

आता तुम्ही जर "२४ बाय ७ " टांगा असाल तर आमची काही हरकत नाही ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 4:58 pm | इनोबा म्हणे

अरे टांगा किंवा टंगाळा म्हणजे लंबू माणूस

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 1:24 am | इनोबा म्हणे

आयुष्यात पहिल्यांदाच ६ फुट उंचीचा फायदा झाला....
आयला मंग टिंगी कोण रे! तू तर टांगा आहेस(माझ्यासारखा).

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सुधीर कांदळकर's picture

18 Mar 2008 - 5:56 am | सुधीर कांदळकर

पोलीस असेल तर? आणि भाऊ कोर्टात असेल तर?

डरो मत यार. आपला मार्ग बिनधास्त आपणच निवडावा. आगे बढो.

मी केले. तेव्हा काही वाकडे झाले नाही. आयुष्यच वाकवले. टगे दोस्त नसतांना.

ती शक्तिमान महिला झोपली असल्यामुळे लिहू शकतोय.

५५ वर्षाचा न वाकलेला
सुधीर कांदळकर.

चतुरंग's picture

18 Mar 2008 - 8:28 am | चतुरंग

>>ती शक्तिमान महिला झोपली असल्यामुळे लिहू शकतोय.>>

"आय ऍम दि बॉस इन माय हाऊस अँड आय हॅव माय वाईफ्स परमिशन टु से सो!"

चतुरंग

सृष्टीलावण्या's picture

18 Mar 2008 - 6:57 pm | सृष्टीलावण्या

मला एकजण याहू ग्रुपवर भेटला. चांगला मुलगा होता. नंतर याहू मेसेंजरवर कधी कधी असायचा.

एकदा त्याने पुणे पुराण चालू केले (पुणे राहायला किती छान हे आडून आडून सुचवायला). पुण्याची हवा किती छान, रस्ते किती छान, माणसे किती छान (पण नोकरी मात्र मुंबईतच करत होता बिचारा).

हे दळण कितीतरी वेळ संपेचना. शेवटी मला आला वैताग. त्याला एकच म्हटले, "मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार". तो बसल्या जागी खुर्चीतच कोसळला (अजून उठला नसावा बहूतेक).

>
>
नुसते बाटलीबंद खनिज पाणी पिऊन तोल जाऊ शकणारी... सृला.

छोटा डॉन's picture

18 Mar 2008 - 7:05 pm | छोटा डॉन

"मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार"
हा हा हा .... [ विनोबा / धमु ऐकताय ना ? ]
कोण म्हटले तुम्हाला असे ?
पुण्यात रात्री वा दुपारी २.३० सोडा , तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते "गरम अथवा थंड पेय" मिळू शकते ... हा आमचा वैयक्तीक अनुभव आहे, पण त्यासाठी तुम्हाला आपली नेहमीची "सोफास्टीकेटेड" ठिकाणे सोडून दुसरीकडे जावे लागेल ....

आहे तयारी ? बाकी तुम्हाला [ वा कोणालाही ] पाहिजे ते मिळवून देन्याची जबाबदारी आमची ....

स्वाभिमानी पुणेकर छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

18 Mar 2008 - 7:19 pm | मनस्वी

पुण्यात रात्री वा दुपारी २.३० सोडा , तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते "गरम अथवा थंड पेय" मिळू शकते

अगदी खरे!

बाय दी वे.. या अनुभवाचा पोरी पटविण्याशी काय संबंध??

मनस्वी

इनोबा म्हणे's picture

18 Mar 2008 - 7:19 pm | इनोबा म्हणे

डॉन्या,जाऊ दे च्यामारी! बारकी पोरं माझे 'बाबा','माझी आई' आणि 'माझी खेळणी'च्या पलीकडे जात नाहीत. ही माझी मुंबईच्या पलीकडे जात नाही.
हिला कोणीतरी पाळणाघरात सोडून या रे! तिकडे नसतील इकडे या,पुण्यात भरपूर आहेत.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2008 - 11:36 pm | llपुण्याचे पेशवेll

पुणे तिथे काय उणे.....
पुण्यात येऊन कविची बासुंदी खायची सोडून 'चहा' कसला मागताय!!!
आणि तशीही चहाची चाहत पुण्यातही २४ तास पूर्ण करता येते..
पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा's picture

19 Mar 2008 - 11:43 am | धमाल मुलगा

पुण्यात रात्री चहाच काय, सृष्टीताई,

कॉफी
ब्रेड बटर
सॅ॑डविच
सामोसा
पोहे
अ॑डा / चिकन बिर्याणी
ऑम्लेट
भुर्जी पाव
चिकन मसाला
चिकन कलेजी
कटलेट
लस्सी
प॑जाबी डिशेस
खर्डा-झुणका भाकरी
आणि सर्व प्रकारच्या दारवा
मी स्वतः खिलवण्यास /पिलवण्यास तयार आहे. तेही रात्री १२ न॑तर सकाळी ६ च्या आधी.

ब॑धो....आठवली का ठिकाण॑? 'जय महाराष्ट्र अ॑डा भुर्जी', नळस्टॉप (पोहे..रात्री २:४५ वा. मिळायला सुरुवात),दाणे आ* ,प्यासा...........हुश्श्य !!!! खाण्यासाठी वाट्टेल तिथे .... :-))))

अट एकच. नाजुक साजुक ठिकाणा॑चा हट्ट नसावा !!!

आपला
- (चिमुटभरच खाणारा पण हौशी खवय्या) ध मा ल

वरदा's picture

19 Mar 2008 - 7:09 am | वरदा

खरंच कधीकधी चर्चा करायचा मूड नसतो नुसत्या चकाट्या पिटायच्या असतात्..तिथे भारतात पटकन मैत्रीणीला फोन करता यायचा इथे सगळे "बिझी" असतात्..म्हणून तर मी इथे पडीक असते..आता माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट करता येईल गप्पा ठोकणे...:)))
हे वरचे बरेच पोरी पटवायचे अनुभव वाचुन वाटलं असे काही लोकांनी ट्राय केल्याचं आठवतं कॉलेजमधे..पण त्यांचा पोपट झाला..मला कळलेच नाहीत...:))))
"जो मुलगा / जी मुलगी पटवायची आहे तिच्या मैत्रिणीशी / त्याच्या मित्राशी मैत्री करून त्या मुला(ली)कडे अगदी दुर्लक्ष्य करावे.
आपोआपच ती/तो आपणहून आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करेल!"

असा प्रयत्न करणार्‍या आमच्या ग्रुप मधल्या एकाचं शेवटी त्या मैत्रीणीशी लग्न झालं गेल्याच आठवड्यात.....आता बोला????
तेव्हा सगळ्या रेसिपि कस्टमाईझ करायला विसरू नयेत...
बाकी रेसिपी झकासच....

धमाल मुलगा's picture

19 Mar 2008 - 11:47 am | धमाल मुलगा

असा प्रयत्न करणार्‍या आमच्या ग्रुप मधल्या एकाचं शेवटी त्या मैत्रीणीशी लग्न झालं गेल्याच आठवड्यात.....आता बोला????

अरे तिच्यामारी, हे भलतेच अवघड असते...
म्हणजे मिरि॑डा लेमनच्या ऍडसारख॑ झाल॑ की वरदाताई...
'प्रेमपत्र की डाक देनेवाले डाकियाके साथ ही...शुभ म॑गल !!!!!!'

लय भारी...

जे होते ते भल्याकरिताच असे मानणारा
-ध मा ल.

वरदा's picture

21 Mar 2008 - 9:19 am | वरदा

एकाच विषयावर मारून चकाट्या संपल्या? मुलगी पटवून तिथेच थांबायचं नसतं नंतर लग्न करायचं असतं आणि मग तीच ती सुंदर मुलगी तितकीच सुंदर रहाते का?

वरदा मला एक गाणे आठवते............नंदू भेंडेने गायले होते
खरे म्हणजे आपण एकटे सूखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला दिसतो
अक्कल गहाण पडते..भेजा कामातुन जातो
लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो
आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो
त्या चेहेर्‍याचे असली रूप मग आपल्याला कळते
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्या पुढे येते....

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Mar 2008 - 3:23 pm | ब्रिटिश टिंग्या

छ्या..च्यामारी इथे पोरगी पटवायची मारामार......
लग्नको तो अभी भौत टैम हे....

मग तीच ती सुंदर मुलगी तितकीच सुंदर रहाते का?
मला न पटलेली लग्न झालेली मुलगी तितकीच सुंदर रहाते हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे.....

न पटलेली मुलगी् /हाटेलात न मागवलेली डिश........या चांगल्या का वाटतात हे कळत नाही.
मुलगी पटल्यावर तीची मैत्रिण तिच्यापेक्षा चांगली आहे हा शोध का लागतो. मी तर मझ्या लग्नातला एक फोटो पहात असतो
त्यत माझ्या एका बाजुला बायको आहे आणि माझ्या दुसर्‍या बाजुला बायकोची मैत्रिण आहे. अधुन मधुन फोटोची आलटुन पालटुन डावी आणि उजवी बाजु झाकुन पहात असतो. कोणतीही बाजु झाकली तरी तीच चांगली वाटते.( देवा रे हे लग्नाचे फोटो का असे छळत असतात्....) ( बघ धमाल्या काहीतरी बोध घे यातुन)

वरदा's picture

31 Mar 2008 - 11:52 pm | वरदा

विजुभाऊ भाभींना सांगू का येऊन? :)))))

:)))))
तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्...... "पुरुष स्वतंत्रपणाने निर्णय घेउ शकतात का?' या परिसंवादत भाग सुद्धा तिला विचारुनच घेतला होता. त्यात मी आणि मानसीबाईंचे येज्मान डॉ दाढे दोघे विभागुन दुसरे आलो होतो. त्यानी सुद्धा त्यांचे भाषाण घरुन पाठ करुन घेतले होते म्हनुन नंबर आला असेच सांगितले.शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा) .कोणीतरी पुढचे चाक असतो कोणी मागचे.
चालायचे...........
ट्रॅक्टरचे एक चाक असणारा विजुभाऊ

त्यातही ट्रॅक्टरची पुढची चाके खालच्या बाजूने आतल्या बाजूला जरा तिरपी असतात, जास्ती लोड ओढताना नीट चालावीत म्हणून;))

चतुरंग

मनापासुन's picture

1 Apr 2008 - 4:48 pm | मनापासुन

शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात.( हे लिहीणाराने आयुश्यात कधी ट्रॅक्टर पाहीला नसावा)
काय काय लिहितील हे लोक.

पुढची चाके खालच्या बाजूने आतल्या बाजूला जरा तिरपी असतात, जास्ती लोड ओढताना नीट चालावीत म्हणून;))
तुम्हाला असे म्हाणायचे आहे काय की दोघांपैकी कोणीतरी एकटाच जास्त जोर लावत असतो.
चालयचेच " बळी तो कान पिळी" (ही म्हण बळी देताना कान्पिळुन बळी द्यावा.अशा अर्थाने आहे का हो?)

अगदी तशाच अर्थाने असावी...माझ्या लग्नात नवर्‍याने त्याच्या बहीणीना माझाही कान पिळायला लावला होता....
शेवटी काय स्त्री आणि पुरुष ही रथाचे दोन चाके असतात खरं आहे आला दिवस ढकलत रहातात रथासारखा अजुन काय....

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 6:24 pm | धमाल मुलगा

बघ धमाल्या काहीतरी बोध घे यातुन
कसला बोध घेऊ, डो॑बलाचा? आता सगळ॑ पक्क॑ झाल॑य. आता नाही म्हणालो तर आबा गा॑*वर लाथ घालून हाकलून देतील

असो, आलीया भोगासी, असावे सादर...अ॑थरुनी चादर !!!!

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 7:57 pm | प्रमोद देव

आलीया भोगासी, असावे सादर...अ॑थरुनी चादर !!!!

आलीया भोगासी, असावे सादर।
निवांत झोपावे, पांघरोनी चादर॥

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 10:32 am | धमाल मुलगा

क्या बात है काका!!!

एकदम फर्मास!
पण झोपायला निवा॑तपणा मिळेल का? हा प्रश्न जरा त्रास देतोय.

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 10:54 am | मनस्वी

आलीया भोगासी, असावे सादर।
पांघरोनि चादर, मनसोक्त घोरावे||