रंगकर्मी.कॉम

रंगकर्मी's picture
रंगकर्मी in काथ्याकूट
14 Sep 2009 - 8:32 am
गाभा: 

सुप्रभात,रंगकर्मीचा सर्व मिपाकराना मनापासुन नमस्कार. नाटक्,मराठी जीवनाचा एक अविभाज्य घटक.महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या संगीत नाटके,त्यानंतर पुरषोत्तम दारव्हेकर, वि. वा शिरवाडकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागु, विजय तेंडुलकर आणि आजच्या काळात प्रशांत दामले, भरत जाधव यांची नाटके पहातच वाढल्या. याशिवाय प्रायोगिक रंगभुमीदेखील सत्यजीत दुबे,चेतन दातार यांमुळे जोरात होती आणि आजही आहे. नाटक हा मराठी मनाला भावणारा विषय असल्याने ही नाट्यचळवळ जोमाने वाढली व गावागावात रंगकर्मी मंडळी तयार झाली. या सार्‍यामुळे नाटक हे मराठी माणसाचे अविभाज्य अंग बनुन गेले.

साहजीकच, या सार्‍या रंगकर्मीना व्यक्त व्हायचे होते,त्यांच्यातल्या लेखकाला नाटके,एकांकिका लिहायच्या होत्या. काहीना आपले अनुभव व्यक्त करायचे होते, तर काहीनां आपले अनुभवाचे बोल इतराना सांगायचे होते. त्यामुळे हळुहळू नाटकावर लिहिणार्‍यांची संख्या वाढु लागली. आजतर आघाडीच्या एक दोन साप्ताहीकात दर आठवड्याला नाटकावर लेख येतो ,याशिवाय नाटकाला वाहिलेले त्रैमासिकदेखील आज जोरात चालु आहे. यामुळे नाटक ही गोष्ट सामान्यांपर्यंत पोहोचत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र रंगकर्मींच्या संख्येच्या मानाने हे व्यासपीठ तोकडे आहे,आणि इथे काही ठराविक विभागाचा वरचष्मा असतो असे काहींचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे ज्याला आपण आजची आणि उद्याची संवादाची भाषा म्हणतो त्या इंटरनेटवर मात्र रंगकर्मींसाठी असे एकही संपुर्ण मराठी संस्थळ नव्हते जीथे त्यांना व्यक्त होता येईल.जगभरातल्या मराठी रंगकर्मींसाठी ते एक माध्यम होईल्.याच गोष्टीचा विचार करुन आम्ही एक नवे मराठी संस्थळ सुरु करत आहोत. या संस्थळाचे नाव "रंगकर्मी "असे आहे. ते तुम्हाला www.rangkarmi.com येथे पाहता येईल.

या संकेतस्थळाचे उद्दिष्ट हे रंगकर्मीना एकत्र आणणे ,त्यांना घडणार्‍या घडामोडींची माहिती देणे आणि त्या सर्वाना व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्द्ध करणे हे आहे. या संस्थळावर थेट भेट, स्क्रीप्टींग,नाट्यानुभव,गप्पा,परीक्षण इ विभागाद्वारे रंगकर्मी व्यक्त होऊ शकतात. याशिवाय काही मान्यवरांनीदेखील या संस्थळावर आपले अनुभव शेअर करायचे मान्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशीही लोकाना थेट संवाद साधता येईल. याशिवाय सदर या विभागातुन त्या त्या विभागातील दर्दी लोक नाटकाच्या विविध अंगांची लोकाना ओळख करुन देतील्.सांगायला विशेष अभिमान वाटतो का या संस्थळावर सर्व नवीन आणि उत्तमोत्तम सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे हे संस्थळ युजर फ्रेंडली होईल. कालच कोल्हापुरात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेते मा. डॉ. गिरिष ओक यांच्या हस्ते या संस्थळाचे उदघाटन झालेले आहे.

मी आपणा सर्वाना हे संस्थळ पाहण्याची विनंती करतो. हे संस्थळ आपल्या सहकार्यानेच चालु राहणार आहे.तेव्हा आपण आपले अभिप्राय जरुर द्या ,आपल्याला कुठला लेखक वाचायला आवडेल ते जरुर कळवा. आणि हो आपले लिखाण marathinatak@gmail.com वर पाठवायला विसरु नका. ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वाद व सहकार्याने हे संस्थळ यशस्वी होवो अशी प्रार्थना करतो.

आपले नम्र,

रंगकर्मी व्यवस्थापन.

प्रतिक्रिया

दशानन's picture

14 Sep 2009 - 8:56 am | दशानन

छान साईट !

रुपरंग आवडले व तुम्ही ब्लॉगरच्या थीमचा चांगला वापर केला आहे ह्या बद्दल अभिनंदन.

काही ढोबळ चुका आहेत त्या कडे लक्ष वेधावे ह्यासाठी काही अगाऊ सुचना ;)

१. व्यक्तियों ने 3.0 रेट किया [?]
सर्वात आधी हे खटकलं ! अहो सर्व काही मराठीमध्ये केलं तर रेंटींग रिपोर्ट मराठि मध्येच ठेवा ना.. नाही तर उगाच मिठाचा खडा....

२. सर्वात महत्वाचे फ्री सर्वरवर (जसा तुम्ही ब्लॉगस्पॉटचा वापर केला आहे) जास्त विश्वासू नसतात तेव्हा जेव्हा जमेल तेव्हा स्वतःच्या सर्वरवर शिफ्ट व्हा, ह्याला दोन कारणे आहेत संकेतस्थळावर पुर्ण कंन्ट्रोल तुमचा नाही तो ब्लॉगस्पॉटचाच राहिल व दुसरा तुम्हाला काही बदल मनासारखे करायचे असतील तर तेथे बंधने येतात.

३. प्रशासन / व्यवस्थापक ह्यासाठी एकच इमेल आयडी ठेवा पाचलग साहेब ;)

बाकी सुरवात छान झाली आहे... !

शुभेच्छा !

विनायक पाचलग's picture

14 Sep 2009 - 9:08 am | विनायक पाचलग

सांगावयास अत्यंत आनंद होतो की या संस्थळाचे डीझाईन मी करुन दिलेले आहे.
मला मराठीत फ्री रेंटींग सीस्टीम मिळाली नाही,मात्र त्या रेटींगवाल्यांकडे अर्ज केला आहे. आठवड्याभरात मराठीत रेटींग सुरु होईल.
ब्लॉगस्पॉटचा वापर मुद्दामच केला आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे माझा या संस्थळाशी डीझायनर वगळता काहीही संबध नाही. आणि याचे जे संपादक आहेत ते टेक्नोक्रॅट नाहीत.त्यामुळे त्याना संपादन करायला जमावे यासाठी ते तिथे ठेवलेले आहे. आणखी एक कारण म्हणजे पैशाचे, सध्या तरी आम्ही कोणत्याही जाहिराती ठेवायच्या नाहीत असे ठरवले आहे, आणि एवढे लेख जतन करायला लागणारी जागा मिळवण्यासाठी तितका पैसा सध्यातरी घालणे शक्य नाही आहे.
दोन मेल आय डींचे कारणही तेच आहे.
टेक्नीकल बाबींसाठी एक- जो मी वापरतो
व दुसरा संपादक बघतील
बाकी फोटो मिळाले की टाकेनच
आभार
बदल देखील नक्की सुचवा.

दशानन's picture

14 Sep 2009 - 9:20 am | दशानन

ब्लॉगरच्या थीम (ब्लॉगस्पॉट) मध्ये एक अडचण आहे सदस्य निर्माण सुविधा नाही आहे ना... :) ज्यांना लिहायचे आहे त्यांना थर्ड सपोर्ट (एडमीन) घेऊन मग लेख प्रसिध्दीसाठी द्यावा लागेल हा सर्वात मोठा वीक पॉइन्ट आहे.

बाकी चालू दे ;)

कल्पना छान आहे.... जो पैसाने समृध्द आहे अश्या कुठल्या ही एका मित्राची मदत घेऊन (कोल्हापुरात तुला जर मित्रांची कमी असेल तर भाउ रंकाळा गाठा ;) ) पण तु सहजच ५-६ हजार उभे करु शकशील... नाही तर कुठल्याही गणेश मंडळाला गाठ व त्यांच्याकडून मदत घे... एवढी वर्गणी गोळा होते तर त्यांच्या जाहिरातीसाठी एक ब्लॉक साठी ते करु शकतील एवढा खर्च... ट्राय !

विनायक पाचलग's picture

14 Sep 2009 - 10:51 am | विनायक पाचलग

एवढा वेळ कुठे आहे बॉस
मी काही याचा कर्ता करविता नाही.
माझे काही मित्र मला म्हणाले की जरा मदत कर ..मी केली..
बाकी बारावी झाली की मग करु की
आत्ता माझ्या परीने मी चांगले द्यायचा प्रयत्न केलेला आहे.
बघु लोकाना आवडते का?
बाकी रेटींग सीस्टीम सगळ्या साईटनाच (मी मराठी सह) इंग्लीशमध्ये होती ,आहे.ती मराठीत आणण्यासाठी प्रयत्न चालु आहे.
Inspiration - www.ffive.in

अजय भागवत's picture

14 Sep 2009 - 10:02 am | अजय भागवत

शुभेच्छा!

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2009 - 11:43 am | प्रभाकर पेठकर

संस्थळ आणि त्या मागिल उद्देश स्तुत्य आहे. शुभेच्छा..!

इच्छा खुप आहे, प्रश्न फक्त वेळेचा आहे.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

नीलकांत's picture

14 Sep 2009 - 12:07 pm | नीलकांत

विनायक,

संकेतस्थळ सुंदर आहे. उत्तम प्रकल्पास हार्दीक शुभकामना.

-- नीलकांत

विनायक पाचलग's picture

14 Sep 2009 - 12:37 pm | विनायक पाचलग

नेलकांत आभारी आहे

विशेष सुचना- राजे यांच्या विनंतीला मान देऊन व डोक्याला ताण देऊन अवघ्या दोअन तासात मी मिठाचा खडा बाजुला काढला आहे,
येतुन पुढे रेटींग सिस्टीम मराठीत असेल,
कोणत्याही साईटवर पहिल्यांदाच

विसोबा खेचर's picture

14 Sep 2009 - 1:28 pm | विसोबा खेचर

संस्थळ सुंदर आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता शुभकामना...

तात्या.

Dhananjay Borgaonkar's picture

14 Sep 2009 - 1:28 pm | Dhananjay Borgaonkar

विनायक सर्वप्रथम तुमचे आणी रंगकर्मी च्या टीमचे अभिनंदन. अतिशय छान उपक्रम आहे. तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा.

एक दोन गोश्टी आढळ्ल्या त्या सांगतो..
१. मेनु मधे गडबड आहे जरा. उदा. थेट भेट मधे गेलो तर सबमेनु येतो पण तो तसाच एक्टीव रहातो. तुम्ही जरी वेब पेज वर क्लिक केलत तरी सुद्धा.
२. नेवीगेशन मधे पण थोडी गड्बड आहे.

एकदा पुर्ण नेवीगेशन चेक करुन घ्या.

बाकी सगळ एक नंबर :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2009 - 2:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेबसाईट उत्तम.

पटकन एक चूक दिसली:
http://natykarmi.blogspot.com/2009/08/blog-post_29.html या लिंकवर एक वाक्य असं आहे ... मिसळपाववरच्या दोस्तांसाठी ही मुलाखत सो एक्स्क्लुजीव केदार कुलकर्णी विथ विनायक पाचलग

अदिती

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2009 - 3:02 pm | भडकमकर मास्तर

या साईटचा एकूण लूक छान आहे.
सुरुवात छान झालेली आहे.
शुभेच्छा

फक्त एक भीती वाटते की हे संस्थळ असेच चांगले चालू राहावे... नाटकाशी रिलेटेड आरंभशूर पण नंतर विनाअपडेट झोपी गेलेली खूप संस्थळे आहेत तसे याचे हो ऊ नये ...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विनायक पाचलग's picture

14 Sep 2009 - 6:13 pm | विनायक पाचलग

फक्त एक भीती वाटते की हे संस्थळ असेच चांगले चालू राहावे... नाटकाशी रिलेटेड आरंभशूर पण नंतर विनाअपडेट झोपी गेलेली खूप संस्थळे आहेत तसे याचे हो ऊ नये ...

यासाठी तुमच्यासारख्यांची मदत हवी आहे बाकी काही नाही.
जेव्हा तुमच्यासारखे लोक आपले नवीन लिखाण तेथे देत जातील तेव्हाच हे संस्थळ यशस्वी होईल.

बाकी आदिती ताई
चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद, कारण टेस्ट आर्टिकल जेव्हा कायम ठेवायचे ठरले तेव्हा मी हे करायला विसरलो होतो .

टारझन's picture

14 Sep 2009 - 8:49 pm | टारझन

अर्रे वा ... छाणंच साईट आहे ;)

मुलाखत व श्ब्दांकन-विनायक पाचलग

'श्ब्दांकन' हा शब्द हृदयाला भिडला :)

-(संकेतस्थळप्रेमी) टारोबा सर्वर

प्राजु's picture

15 Sep 2009 - 1:45 am | प्राजु

साईटची रंगरूप छान आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

15 Sep 2009 - 8:24 am | मदनबाण

व्वा !!! छान संकेतस्थळ आहे.
विनायक तुझे अभिनंदन रे... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha