गट्टे की सब्जी..
( साहित्य २ व्यक्तीना पुरेसे आहे. लागणारा वेळ- साधारण ४० मिनिटे)
१. गट्टे तयार करणे:
साहित्य : एक वाटी बेसन, १/२ चमचा मेथी, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे, २ चमचे टोमॅटो सॉस, लसूण पेस्ट १/२ चमचा, आल्याची पेस्ट १/४ चमचा, १/२ चमचा हळद, पाणी
वरील सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट मळून एक गोळा करावा. साधारण चकलीच्या पिठापेक्षाही थोडे घट्ट मळावे. नन्तर या गोळ्यापासून १/२ इन्च व्यासाचे साधारण ५ इन्च लाम्बीचे लाम्बट आकार हातावर मळून तयार करावेत. एवढ्या साहित्याचे साधारण ४-५ आकार तयार होतील.
पाणी उकळ्ण्यास ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात हे आकार एक एक करून सोडावेत. पाणी थन्ड असतानाच त्यात पिठाचे हे गोळे सोडू नयेत, अन्यथा ते तळाला चिकटतील. गोळ्याच्या वर साधारण दोन बोटे पाणी राहील याची दक्षता घ्यावी. ८ ते १० मिनिटात गोळे शिजतात. शिजले की ते पाण्यावर तरन्गायला लागतात आणि खडबडीत होतात.
शिजलेले लाम्बुळके आकार प्लेट मध्ये काढून घ्यावेत. त्यान्चे चाकूने लहान दन्डाकार तुकडे करावेत.. गट्टे तयार झाले.
२. सब्जी तयार करणे:
साहित्य : १ टोमॅटो आणि १/२ काकडी यान्च्या बारीक फोडी, २-४ चमचे तेल, १/२ वाटी कान्दा कापलेला, लसूण पेस्ट १/२ चमचा, आले पेस्ट गरजेनुसार, मीठ १/२ चमचा, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा मोहरी , १/२ चमचा जिरे,१/२ चमचा हळद, २-३ वाट्या पाणी
तेल तापवून मोहरी, जिर्याची फोडणी करावी. त्यात कान्दा, लसूण, आले घालून परतावे. हळद घालावी. खमन्ग परतले गेले की टोमॅटो आणि काकडीच्या फोडी टाकव्यात. त्यात मीठ आणि तिखट टाकावे. शिजलेले टोमॅटो उलथण्याने क्रश करत रहावे. गरजेनुसार २ वाटी पाणी टाकावे. काकडीच्या फोडी शिजत आल्या की त्यात गट्टे ही टाकावेत. एक वाफ येईल इतपत शिजवावे. केशरी रन्गाच्या प्यूरी मध्ये गट्टे शिजत असताना सुन्दर दिसतात... अगदी तन हुआ, मन हुआ केसरिया आठवते. केसरिया बालमाची आठवण करून देणारा हा राजस्थानी पदार्थ- गट्टे की सब्जी..
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
खरे तर हा पदार्थ दह्यामध्ये तयार करतात.. गट्टे तयार करतात. सब्जीची फोडणी झाली की त्यात पातळ दही , गट्टे घालतात व शिजवतात. याच पद्धतीने गट्टे की कढी करता येते. दही उपलब्ध नसल्याने वरील प्रकारे केली आणि छान झाली.. ( १ वाटी पाण्यात मिल्क पावडर एक चमचा आणि बेसन पीठ १ चमचा यान्च्या मिश्रणात गट्टे सोडण्याचा प्रकार करून बघितला, पण तो फसला.. ) आयुर्वेदानुसार बेसन पीठ अतिशय वातूळ आहे, त्यामुळे दही, दूध, ताक, लोणी, तूप यापैकी काही तरी बरोबर असणे अतिशय आवश्यक.. गट्टे थन्ड दह्यात क्रश करून कोशिम्बिर करता येईल.. पुलावात गट्टे घालून गट्टे पुलावही करता येतो.
प्रतिक्रिया
8 Sep 2009 - 9:56 am | अवलिया
फटु नसल्याने प्रतिक्रिया काढुन टाकली आहे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Sep 2009 - 9:59 am | JAGOMOHANPYARE
फटू काढले आहेत.. सिस्टीम एरर आहे, ऑफिसमध्ये.. :(
8 Sep 2009 - 10:07 am | ऋषिकेश
वा वाचून तोंडाल पाणी सुटले आहे
या विकांताला ट्राय करेन म्हणतो.
फोटूची वाट पाहतोय
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "केसरिया बालमा ओ री ... कि तुमसे लागे नैन...." आणि त्यानंतर येत आहे गीत "केसरिया बालम पधारो म्हारे देस"
8 Sep 2009 - 11:14 am | JAGOMOHANPYARE
हे घ्या आणखी काही फोटो.........
१. गट्टे गोळे:
२. शिजलेले गोळे पाण्यावर तरन्गतात..
३. गट्टे..
४. केसरिया बालमा पधारो म्हारो देस.........
8 Sep 2009 - 11:20 am | पर्नल नेने मराठे
१ वाटी पाण्यात मिल्क पावडर एक चमचा आणि बेसन पीठ १ चमचा यान्च्या मिश्रणात गट्टे सोडण्याचा प्रकार करून बघितला, पण तो फसला..
=))
चुचु
8 Sep 2009 - 12:30 pm | खादाड
छान आहे !!! करुन पाहिन!!!! फोटो सुरेख !!!
8 Sep 2009 - 12:43 pm | बिपिन कार्यकर्ते
हा प्रकार खाल्लाय बहुतेक. पण नाव माहित नव्हते. कोणत्यातरी मध्य भारतातील शहरात खाल्लाय असे आठवते.
बिपिन कार्यकर्ते
8 Sep 2009 - 4:13 pm | विजुभाऊ
हा राजस्थानी प्रकार आहे.
याचा मराठी भाऊ /बहीण म्हणजे शेंगोळ्याची/गोळ्याची आमटी
खानदेशात याच प्रकारात येणारा पदार्थ करतात शेवभाजी
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
8 Sep 2009 - 6:49 pm | रेवती
मला गट्टे की सब्जी आवडते पण कृती थोडी वेगळी आहे. फोटू असल्यामुळे प्रतिसाद दिला आहे.;) बाकी सब्जी छानच!
रेवती
8 Sep 2009 - 7:23 pm | प्राजु
रंग काय मस्त आला आहे!!
खूपच छान दिसते आहे सब्जी. होईल जा विकेंड्ला आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Sep 2009 - 11:02 pm | अनिल हटेला
रविवारीच हा प्रकार हादडून झालाये...
आमचा एक मित्र जोधपूर चा आहे...नवनवीण पदार्थ त्याने बनवावेत आणी आम्ही वाह-वाह करत चापावेत ....:-)
थोडंसं दही गराजेचंच आहे...;-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
11 Sep 2009 - 9:55 pm | दिपाली पाटिल
सचित्र पाकृ छान आहे...करुन बघणार नक्की...
दिपाली :)
12 Sep 2009 - 11:37 am | मसक्कली
पाणीच घलवे का थोड दही पन घालायच :?
आनी हे न तळताच घालायच का??
मला वाट्त आहे कि तळले तर आजुन छान लागेल नहीका :)
बघु उद्या करुनच बगव आता.... :)
6 May 2014 - 10:20 am | पोटे
टोम्याटो प्युरी ऐवजी दही ताक घालता येते.
जाड असल्याने तळण्यापेक्षा शिजवणे जास्त सोपे जाते.
12 Sep 2009 - 12:11 pm | सहज
करुन पाहीला पाहीजे.
12 Sep 2009 - 4:19 pm | राजू
छान आहे ! फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले आहे
=P~ =P~
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.
24 Sep 2009 - 7:19 pm | खादाड
नमस्कार
काल भाजी करुन पहिली मस्त झालि होती ! धन्यवाद !
6 May 2014 - 3:09 pm | मुक्त विहारि
आणि आमच्या शेजारच्या मारवाड्याला खिलवणार.