मला माझ्या धंद्याबद्दल बेसीक शंका विचारायची होती. ति कुठे विचारावी असा प्रश्न मला पडला होता. माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राने हा धागा दाखवला व माझा हुरूप वाढून धंद्याची लाज न बाळगता हा धागा काढला.
भादव्याच्या महिन्यात घरगुती पित्रांच्या निमीत्ताने जेवणाची सोय झाल्याने माझा जीभेचा आणि तब्येतीचा प्रश्न हे कळीचे मुद्दे निकाली निघाले आहेत. आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी! नंतर भादवा संपल्यावर कोणत्या देवळापुढे बसावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नाहितरी आजकाल लोक जेवणाच्या बाबतीत फारच कॉस्टींग बघत जेवण बनवत असून त्यांचे जेवण फार कमी उरते. त्यातच त्यांना काही लोक शिळ्या अन्नाच्याही डिश करायला सांगतात. कोणी गरीब लोकांना अन्न दान करतात व त्यांचा दुवा घेवून पुण्य मिळाल्याचे समाधान मानतात. पण माझ्यासारख्या भिकार्याला कोणी "जेवून जा रे. पोटभर जेव, स्वयंपाक येत असेल तर उद्या स्वयंपाक करायला व जेवायलाच ये, मस्त मटण करू, नाहीतरी मला जेवण घरी बनवायचा कंटाळाच येतो." असे म्हणत नाही. असो. काय हा भिकार्याला लेखनाचा हव्यास. आता देवळाच्या समोर लावलेल्या फलकावर लेखन केले पाहीजे. पर्वतीच्या टेकडीवर जाणारे टेकडे लोक आहेतच तेथे. देतील दोन, आपल घास म्हणायचे होते. घासानेच पोट भरते. काय हा विपर्यास. आता अंतीम असो.)
तर आर्थिक दृष्टीने बघता खर्च व दगदगही कमी झाली आहेच (असे वाटतेय सद्ध्यातरी!) पण तो नक्की किती टक्क्याने कमी झाला हे समजण्यासाठी रोजच्या एकवेळच्या भिक मागण्याचे कॉस्टींग काढून गणित मांडून फायद्याचे (मला तर फायद्याचेच वाटते. कोणी काही म्हणो भिक मागणे फायद्याचेच असते. आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही ? काहीच नाही. काय म्हणताय, तुम्ही येताय आमच्यात? (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?) ) प्रत्यक्ष गणित काढायचे असे ठरवले.
कॉस्टींग हा प्रकार मला नविन (वेब डिझायनरला प्रोगामींग जड या न्यायाने ) असल्याने अख्खा शनिवार भिकार्या मारुतीच्या मंदिरात यासंदर्भात माहिती ईतर समवयस्क भिकार्यांबरोबर (आय टी मधून ते मंदीच्या काळात हाकलले होते) बुकलत बसलो होतो पण नक्की कल्पना येईल कॉस्टींगची असे काहीच मिळाले नाही. (अगदी मायक्रोसॉफ्ट मनी, टॅली, ईतर ओपन सोर्स पॅकेजेस, राजे नावाच्या माणसाने दिलेली बजेटींगसाठीची एक्सेल फाईल, मिपावरचा हा धागा सर्व पाहून झाले होते. (हे काय, पुन्हा अवांतर लेखन? माझ्यासारख्या चांगल्या भिकार्याला भिकेचे डोहाळे लागलेत मला असे वाटते.) असो. असो. (तुम्हीच कंस सोडवा. गणितातले तज्ञ ना तुम्ही?))
कोणाला याबाबत माहिती असल्यास अथवा अभ्यास असल्यास मार्गदर्शन करू शकाल का?
Toll Free No.: 1800-365-24365
माझा फोन नं: 92 -020 -2365 24 365 Extn: 365 (ईंटरनॅशनल कॉल साठी पहिले ० लावा), मोबाईल: 91365 24 365, 91365 24 365 (कधीही फोन करा. 24 x 7 x 365 days service available.) (होलसेल भिक घेतली जाईल. (जुने कपडे/ वस्तू पण चालतील.) ट्रांसपोर्ट चा खर्च पार्टीला करावा लागेल. त्यासाठी ट्रक भाड्याने मिळेल. (वरचाच फोन वापरा.) )
व्य. नि. साठी email ID: it-exiled@cut-copy-paste-jobworker.org
visit us at: www.cut-copy-paste-jobworker.org
प्रतिक्रिया
2 Sep 2009 - 9:55 am | विजुभाऊ
भिक मागणे फायद्याचेच असते. आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही ?
असे कसे म्हणता. तुम्ही जो वेळ त्यात घालवता त्याचे कॉस्टिंग कराना. तुमची कॉस्ट जर गृहीत धरली नाही तर ते गणीत नेहमीच चुकीचा फायदा दाखवत राहील. त्यापेक्षा ते काम आउटसोर्स केलेले बरे.
बरेचसे श्री श्री श्री ,दादा, बापू ,साहेब असे करतात. काही ठिकाणी तर प्रॉक्सी म्हणून त्यांच्या इतर शाखात स्वतःच्या ऑडीऑ व्हीडीओ सीडी लाऊन ठेवतात.
तुम्हाला पोलिटिकल भीकारी व्हायचे आहे सोश्यलीस्ट भिकारी व्हायचे आहे की कम्युनिस्ट भिकारी व्हायचे की रीलीजीअस भिकारी व्हायचे आहे त्यावर गुंतवणूक किती करायची ते ठरते. कॉम्पिटीशन ही प्रत्येक क्षेत्रात भरपूर आहे.
अर्थात तुम्ही जितकी गुंतवणूक कराल तीतकी तुम्हाला परत मिळते.
प्रत्यक्ष किंवा अनुभव या रूपात. गुंतवणूक जेवढी जास्त तेवढे रीटर्न्स जास्त हे तत्व नेहमीच लक्षात ठेवावे. प्रकल्प अहवाल हा कधीच कागदावर उतरवू नये
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
2 Sep 2009 - 10:14 am | पाषाणभेद
चला, कोणीतरी बोलले.
मी ट्र्क ट्रांसपोर्ट चे काम आउटसोर्सच केले आहे. त्यात जरा वेळ जातो म्हणा. तुम्हाला ट्रक लागत असेल तर वरील फोन नं वर फोन करा.
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
2 Sep 2009 - 10:58 pm | टारझन
कास्टिंग काऊच चा काही संबंध आहे का ह्या कॉस्टिंग शी ?
-(रिझर्वंवर लागलेला) टारझन
लवकरच प्रतिक्रिया/लेख पाडणे बंद होईल :)
3 Sep 2009 - 9:42 am | पाषाणभेद
आपण सामुपदेशन करणारे दिसतात. (फ्रेंच कट वैग्रे राखता काय? नसेल तर राखा. मी नाही का दाढी , केस कमी ठेवायची ईच्छा असूनही ६ /६ महिने दाढी , केस काढत नाही. कपड्यांचेही तसेच. ६/६ महिने कपडे बदलत नाही. धंद्याला बरे असते ते. असो. )
तर आपण सामुपदेशन करत असाल तर मिस कॉल द्या. बर्याच शंका विचारायच्या आहेत. आमच्या ईन्कम वर टिडिएस कट होतो का? मी पॅन कार्ड काढलेले आहेत पण मी आयटी (Income Tax हो, आपली नेहमीची IT नाही.) रिटर्ण भरत नाही. त्यामुळे काही लोच्या होईल काय? पोलिटिकल, सोश्यलीस्ट, कम्युनिस्ट, रीलीजीअस भिकार्यांत काय मुळ फरक असतो? ईन्कम कुठे जास्त असतो?
आपल्या अनूभवाचा फायदा मला, या धंद्यात येवू ईच्छिणार्यांना व ईतरांना (ईतर धंदेवाईकांना) व्हावा ही ईच्छा.
ता. क. -आता पाऊस चालू आहे त्यामुळे हाल होत आहे. मेकप उतरून जावून चांगले दिसायला लागतो व ईन्कम कमी होतो. चालायचेच. पावसाने झोडले काय व राजाने मारले काय आपण काय करू शकतो.
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
2 Sep 2009 - 7:07 pm | नितिन थत्ते
>>आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही
असं कसं म्हणता? अहो गाण शिकायला लागतं, पेटी वाजवल्यासारखं करता यायला लागतं आणि काचेच्या किंवा फरशीच्या तुकड्यांचा ठेका धरता यायला लागतो.
गेला बाजार चेहर्यावर अजिजी आणण्याचं ट्रेनिंग तर घ्यायलाच लागतं
त्याखेरीज दादा लोकांना हप्ता द्यायला लागतो.
(आता दिल्लीला कॉमनवेल्थ आहे त्यामुळे भिकार्यांना हटवणार असे आजच रेडिओवर ऐकले. कसं व्हायचं तुमचं?)
तुमचा लेख वाचून तुम्ही भीक मागताना 'ए ***च्या, ५ रुपये भीक घाल बे!' असं म्हणणार बहुधा. =))
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
2 Sep 2009 - 10:25 pm | पाषाणभेद
आमच्या धंद्यातली बरीच माहिती आहे तुम्हाला हे वाचून आनंद झाला. आधी कुठल्या मंदिरात होतात? किंवा आय टी त आहात काय?
आता मी जी काही गुंतवणूक यात केली आहे त्याचे रिटर्ण किती मिळाले याचा जमाखर्च करतो आहे सध्या. घंद्यात पार्टनरशीप ची पण गरज आहे. नवीनच एक मंदीरही उभे राहते आहे. त्यामुळे जेवणाचा खर्च पण मिटेल. नवरात्रीत स्लिम टिव्ही घेवू म्हणतो. बघू कसे जमेल ते.
पण यंदा पाऊस नसल्याने थोडी चिंता आहे म्हणा. माझे दोन्ही हात मोडून व डोळा बंद करून घ्यावा लागेल असे दिसतेय. चालायचेच घंदा म्हटले की चढणे आले आणि बुडणे आलेच. असो. काही गरज लागली तर फोन करा.
प्रायव्हेट नंबर हवा असेल तर व्य.नी. करा.
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."
"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
2 Sep 2009 - 10:30 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
2 Sep 2009 - 11:33 pm | अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
3 Sep 2009 - 10:43 am | चतुरंग
उधार घेतलाय की भीक मागून आणलाय हे स्पष्ट करा आधी! ;)
चतुरंग(झेंडे)
3 Sep 2009 - 10:45 am | अवलिया
=))
उसना आणलाय... टारझन सध्या सत्काराचे नारळ, शाल घेण्यात गुंतलाय !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
3 Sep 2009 - 6:45 pm | नितिन थत्ते
>>नवीनच एक मंदीरही उभे राहते आहे
मंदिरात फिरता रंगमंच (आपलं गाभारा) ठेवून वाराप्रमाणे देव बदलण्याची सोय ठेवणे. भक्तांची रोज गर्दी होऊन भीक जास्त जमा होईल. :D
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
3 Sep 2009 - 10:38 am | विजुभाऊ
पोलिटिकल, सोश्यलीस्ट, कम्युनिस्ट, रीलीजीअस भिकार्यांत काय मुळ फरक असतो? ईन्कम कुठे जास्त असतो?
पोलीटीकल भिकारी : हे दर पाच वर्षानी तुमच्याकडे मते मागतात.
गुंतवणूक : आणि रीटर्न्स : प्रकल्प अहवाल भडकमकर मास्तरांकडे उपलब्ध
इन्कम टॅक्सः दाखवले जाणारे इनकम जवळ जवळ नगण्य
कम्युनिस्ट भिकारी: हे मते मागत नाहीत पण सतत कोणाच्याना कोणाच्या विराधात जळजळीत बोलत असतात.
गुंतवणूकः मोठ्याने बोलण्याची कला अवगत.
रीटर्न्स : छुप्या अवतारात सत्ता मिळाल्यासच आवक होते
रीलीजीअस भिकारी: अत्यंत सन्माननीय व्यवसाय. रीटायरमेन्ट ची अट नसते.
पात्रता :रामायण महाभारत ही किमान मुलांसाठीच्या आवृत्त्या वाचलेल्या .उत्तम वक्तृत्व असावे लागते. ते नसेल तर मौन राखता येणे आवश्यकसते. ( मौनी गुरु यांच्या एखाद्या शब्दालासुद्धा फार मोठी किम्मत येते) एखादे शारीरीक व्यंग असेल तर त्याचा फायदाच होतो.
( पुण्यात एक शेपटीवाले बाबा होते. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी)
टेक्सेस : जे काही आहे ते तुमचे नाही असा सतत जप केल्याने जे काही जमा केलेले असते त्यावर टॅक्स कोणीच आकारत नाही
सोश्यालीस्ट भिकारी: ही जमात फारशी कोणाला उमजत नाही कोणी त्याना मवाळ कम्युनीस्ट समजतात कोणी उजवे कम्युनिस्ट.
भांडवलदारांची तरफदारी आणि गरीबांचा कळवळा असा एक समशीतोष्ण प्रवाह यांच्या कडे असतो.
मला वाटते तुमचे शंका निरसन झाले असावे
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
3 Sep 2009 - 9:00 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
हे पहा द.फो....भिक मागणे ही पण एक कला आहे..ती मिपावर प्रतिसाद मागण्याईतकी सोपी नाही आपला ह्या वर काय अभ्यास आहे का.मागे प्रतिसाद मागण्याकरिता अदिती ने एक पाक (http://www.misalpav.com/node/9026)शिकविली होती .त्यातील क्लुप्त्या आपण ध्यानात धरल्या का? ..कॉस्टींग चे भुत उतरताना आपला त्याने फायदा होउ शकतो का ?
सू हा स...
3 Sep 2009 - 9:47 pm | sujay
आहो गुंतवणूक काय लागते, सांगा तुम्ही ?
भिक मागण्या करता हि गाणि येण अत्यावश्यक आहे-
१. देखा हे पेहली बार साजन कि आखों में प्यार ( ट ट्ट ट्ट्ट्र्र ट ट्ट ट्ट्ट्र्र)
२.परदेसी परदेसी जाना नहिं, हमे छोड के हमे छोड के
३. शिर्डी वाले साई बाबा
आम्ही अत्यंत माफक दरात ही गाणी शिकवतो. ३ महिन्यात रोज ५० रुपये भिक नाहि मिळायला लागली तर संपूर्ण फी परत केलि जाईल.
तसेच आपल्या हाताच्या आकारा प्रमाणे "स्पेशल फरशीचे तुकडे" करून मिळतील.
आपण जर अमेरिकेत असल व ह्या धंद्यात यायला उत्सुक असाल तर अम्हाला व्यनी करा. आम्हि आपणांस धंद्यात भागीदारी देउ.
आम्हि गाउ आणी आपण वाजवा, धंदा जोरात चालेल.
(हलके घ्यालच)
(शिकाऊ भिकारी)
सुजय