सूर्य नमस्कार

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in काथ्याकूट
2 Sep 2009 - 7:14 pm
गाभा: 

सूर्य नमस्कारांचे शारीरिक तसेच मानसिक फायदे काय आहेत?
विशेषतः १२ सूर्य नमस्कार घातल्यास अंदाजे किती कॅलरीज वापरल्या जातात ह्याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?
नसल्यास, त्या दृष्टीने प्रयत्न करणे शक्य आहे का?

जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Sep 2009 - 7:17 pm | अवलिया

चतुरंग शेटने एक लेख लिहीला होता... त्यांना जरा जागे करुन विचारा.

http://www.suryanamaskar.info ही साईट बघा

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्राजु's picture

2 Sep 2009 - 8:30 pm | प्राजु

सूर्य नमस्कार हा सर्वांग व्यायाम आहे.
त्याने कॅलरीज किती बर्न होतात माहिती नाही.. मात्र पोट कमी होतं, वजनही कमी होतं. पण नुसतेच सूर्यनमस्कार न घालता त्या सोबत श्वास आणि उत्श्वास यांचेही गणित जमले पाहिजे. नमस्कार घालताना केव्हा श्वास घ्यायचा केव्हा सोडायचा याचेही नियम आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2009 - 8:32 pm | बिपिन कार्यकर्ते

मलाही ही माहिती कळून घ्यायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

2 Sep 2009 - 9:06 pm | निमीत्त मात्र

इथे कुणाला उलटे सुर्यनमस्कार माहित आहेत का? माझ्या माहिती प्रमाणे वासूची सासू ह्या नाटकात त्याचा उल्लेख होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2009 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>इथे कुणाला उलटे सुर्यनमस्कार माहित आहेत का?
विकिपीडियावर माहिती वाचायला मिळेल.

टारझन's picture

2 Sep 2009 - 11:50 pm | टारझन

घ्या ... लोकांना "उलटे" उद्योग करायला "निमीत्त मात्र' लागतं !

- (सरळ) आंबेचोख्ता

मिसळभोक्ता's picture

2 Sep 2009 - 11:21 pm | मिसळभोक्ता

त्यांना चंद्र नमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारांपेक्षा जास्त क्यालरी खर्च होतात. त्याचेही बरेच नियम आहेत, कधी श्वास घ्यायचा कधी सोडायचा वगैरे. पुरातन भारतात त्याविषयी खूपच संशोधन झाले होते. आता संशोधन मागे पडले, पण अद्यापही सर्व जगात हे लोकप्रिय आहेत. पाश्चिमात्यांनी भारतीयांकडून चोरलेली आणखी एक कला/विद्या.

-- मिसळभोक्ता

निमीत्त मात्र's picture

3 Sep 2009 - 12:41 am | निमीत्त मात्र

चला निदान एकाला तरी माझा प्रश्न समजला म्हणायचा! :)

दिपाली पाटिल's picture

2 Sep 2009 - 10:20 pm | दिपाली पाटिल

छान धागा आहे, मलाही फायदा होइलसे वाटतय... :D

अवांतर : इकडे मी २४ तास फिटनेसमधे योगाच्या क्लाससाठी गेली होती पण तो ट्रेनर इतका काय मृदुपणे बोलत होता की मला सॉल्लिड डुलक्या यायला लागल्या आणि इतके भयानक आसनं पण दाखवत होता की जणू त्याला मला करता येऊ नये असंच वाटत असावं...मग काय अर्ध्यातुन घरी यावंच लागलं :D

दिपाली :)

विकास's picture

2 Sep 2009 - 10:50 pm | विकास

चतुरंगचा (अग्र)लेख

सूर्यनमस्कार डेमो (या मधे पटकन १० भाग बघता येऊ शकतील).

अमेरिकेत गेले तीन वर्षे होत असलेला जानेवारी मधील सूर्यनमस्कार यज्ञाचे संकेतस्थळ

सूर्यनमस्कार (पुणेरी आणि अमेरिकन) माहीतीपटः (त्यात विशेष करून चौथ्या मिनीटावरून अधिक माहीती मिळू लागते).

क्रान्ति's picture

3 Sep 2009 - 8:01 am | क्रान्ति

छान धागा आहे. सगळे दुवे अतिशय उपयुक्त आहेत.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

चतुरंग's picture

4 Sep 2009 - 4:17 am | चतुरंग

व्यायाम सर्वांगसुंदर आहे. बर्‍याच आसनांचा त्यात सहज अंतर्भाव आहे. एका नमस्काराने नेमक्या किती कॅलरीज खर्च होतात माहीत नाही पण भरपूर होत असाव्यात. बारा सूर्य नमस्कार व्यवस्थित घातले तर मला बारीक बारीक घाम यायला सुरुवात होते असे माझे निरीक्षण आहे.
मुख्यतः सर्व सांधे, मेरुदंड, पोट, मान, कंबर, हात, पाय असा चौफेर व्यायाम आहे.
सर्वसामान्यपणे दिवसभरात आपल्या ज्या प्रकारच्या हालचाली होत नाहीत त्या आपसूकच नमस्कारात घडतात त्यामुळे शरीरात चैतन्य येते याची जाणीव तुम्हाला नमस्कार संपताच होते.
अतिशय नव्याने व्यायाम सुरु करीत असाल तर सुरुवातीला जरा सांधे मोकळे करुन घ्या. बेतानेच सुरुवात करा. एकदम आसनाच्या शेवटल्या अचूक स्थितीला शरीर दामटवू नका त्याने अपायच होतो. पहिल्या आठ्वड्यात चक्क ३ नमस्कारांपासून सुरुवात करा. दुसर्‍यात ५, मग ७, ९, १२ असे सावकाश वाढवा. २४ नमस्कार मजबूत व्यायाम देतात. मानसिक फायदे म्हणजे मन शांत होते. मेरुदंडाचे आणी मानेचे व्यायाम असल्याने डोक्याकडचे रक्ताभिसरण सुधारते, सर्व जाणीवा तरतरीत झाल्याचे कळते. लास्ट बट नॉट लीस्ट २४ नमस्कार घातलेत तर थोड्याच वेळात चांगली भूक लागते! ;)

(अय्यंगार)चतुरंग

टारझन's picture

4 Sep 2009 - 7:32 am | टारझन

च्यामारी ...
आम्ही याम करताना कधी कॅलरी फिलरीचा इचार केला नाय ... याम करायचा तं एकदम रगाट ... पण येवस्थित ... बाझवला तिच्यामायला त्या कॅलरीच्या मंग ...
चला आमची येळ झाली यामाला जायची !!! कॅलरी मोजकयंत्र कुठे आहे बरे माझे ? अरे .. कोण आहे रे तिकडे .. माझे नाईकीचे पादत्राणं ,कपाळावर आणि मनगटावर लावायचे अदिदासचे घाम पुसण्याचे वस्त्र, रिबॉक ग्लब्ज आणि प्युमाचे सॉक्स कुठे आहेत ? अंमळ ट्रेडमिलवर कॅलरी मोजत मोजत पळू म्हणतो आज ? आपण पण उच्चभ्रु होणार :)

-(अंमळ पै) टारझन
संपले ..... आता प्रतिसाद संपले !!

(मानव)चतुरंग

टारझन's picture

4 Sep 2009 - 11:45 am | टारझन

छ्या ... तुम्ही तुच्छ मानव केंव्हा सुधारणार ? व्यायामापेक्षा त्या व्यायामात किती कॅलरी जळाल्या हे मोजण्यात अधिक कॅलरी जाळता :)

-(महामानव) टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2009 - 9:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला बराच वेळ खुर्चीत बसलं की पाठदुखी होते, खरंतर व्हायची. ताठ बसायचं हे कितीही ठरवलं तरीही दिवसभरात कधी ना कधी ते विसरायला होतंच. गेली काही वर्ष (अ)नियमितपणे सूर्यनमस्कार घालत आहे, आणि पाठदुखीही झाली नाही. मला वाटतं याचं कारण आपण नेहेमीच्या कामांमधे पुढे वाकतो पण मागच्या बाजूला वाकत नाही. सूर्यनमस्कारामधे तेही होतं. शिवाय व्यायामाचे इतरही अनेक फायदे असतात ते तर होतातच.

लास्ट बट नॉट द लीस्टः चांगली भूक लागली तरी चीज-बटाटा रोल खाण्यापेक्षा सातूचं पीठ खावं.

अदिती

मुक्ता's picture

4 Sep 2009 - 10:24 am | मुक्ता

अतिशय उपयुक्त माहीती..

वेगवेगळ्या हार्मोन च्या संतुलीकरणाशी निगडीत कोणी काही आसने सुचवु शकेल
का ?

../मुक्ता