“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
2 Sep 2009 - 12:33 am
गाभा: 

मित्र हो,
आज मला एक फोन आला. तुम्ही आपल्या नाडीग्रंथावरील लेखनाच्या एका भागात अंनिसला सर्कस म्हणून हिणवले आहेत. ती नुसती झलक आहे असेही म्हणता मग त्या पुर्ण पत्राची मांडणी का करत नाही? आपण कोण बोलताय? हे समजून घेईपर्यंत फोन कट झाला किंवा केला गेला.
नाडी ग्रंथावरील माझे काही विचार मिपावर या आधी आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ते पत्र पाठवावे असे वाटून ते संपुर्ण पत्र खाली देत आहे. आशा आहे की मिपाकार फोन करणाऱ्या वाचकाच्या विनंतीचा मान राखून ते प्रकाशित करायला व मनमोकळेपणाने अंनिसचे अतरंग पहायला परवानगी देतील.
परिशिष्ट क्रमांक 4-14 बोध अंधश्रद्धेचा पान 180
“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र
डॉ. नरेंद्र दाभोळकरांना, तांबरम, दि. 25 -11-1995
स.न.वि.वि.
दि. 21-11 चे आपल्या हस्ताक्षरातील, साध्या लेटर पॅडवरील कागदाचे - बॉन्डपेपरवर नव्हे- पत्र मिळाले. असे पुर्वी दिसून आले आहे की, आपलेय पत्रातील शेवटची ओळ मला जास्त लिहायला प्रवृत्त करते. त्या पत्रातील शेवटची ओळ की ... ‘सत्य तपासण्याच्या रिंगणात यावे ही विनंती’…. अशीच स्फूर्ती देऊन गेली.
असे वाटले की, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ही एक सर्कस आहे. त्यात विविध तऱ्हेचे अंधश्रद्धेच्या विरुद्ध खेळ खेळले जातात व सभोवताली जमलेल्यांचे त्याद्वारे मनोरंजन केले जाते. अर्थातच अंनिससर्कस मधील खेळाडू विविध (मखलाशीपूर्ण) कसरती करण्यता तरबेज असतात. नंतर हुकमी टाळ्या मिळवण्याच्या तंत्रात अत्यंत प्रवीण असतात.
सर्कसचे सर्वात मोठे आकर्षण हे त्यांचा ‘जनावरखाना’ असून त्यांना रिंगणात आणून हातातील जबरदस्त आसूडाद्वारे सर्व हिंस्त्र व क्रूर श्वापदांना आपल्या हुकुमावर नाचवायचे जोखमीचे व दिमाखाचे काम त्या सर्कसचा कार्यवाह – “रिंगमास्टर” करतो. या रोलमधे आपण स्वतः रिंगणात हजेरी लावता व आसूडाच्या व काठीच्या दरडावणीने अवघड व जीवघेण्या कवायती लीलया करवून टाळ्या मिळवता. आत्ता पर्यंतचा हा आपला अनुभव असल्याने आणि आपणच या सर्कसचे रिंमास्टर असल्याने, ‘माझा रिंगणात या, मग मी तुम्हाला कसे लोळवतो ते पहा’ असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीयपायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार होण्यास सोईचा आहे.
तथापि ‘नाडी भविष्य’ हा काही तुमच्या पिंजऱ्यात बाळगलेला सिंह नाही. त्यामुळे त्याने ‘गपगुमान’ तुम्ही रचलेल्या रिंगणात यावे व चुपचाप तुमच्या तालावर नाचावे असे स्वप्न बाळगून असाल तर ती आपली घोर चूक आहे.
या इथे ‘नाडी भविष्यकर्ते महर्षी’ हे “रिंगमास्टर” आहेत. भविष्याच्या आसूडाला तो ‘थोतांड’ म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात. वर्तमानपत्रातून परिपत्रके व लेख लिहून व मला मधे घालून, ‘पहा या रिंग मास्टरची कशी ऐशी की तैशी करतो. नाहीतर 5 लाख देतो’ असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी करता. या सर्व परिस्थिती मी रिंगणात कसा? नाडीकेंद्रे जेथे आहेत तेथे कूटलिपी वाचणारे उपलब्ध आहेत. अशा विविध केंद्रांना भेटून एकच पट्टी विविध नाडीवाचकांनाकडून वाचवून घेऊन त्यातील मजकुरातील सत्यता, अर्थवत्तता अचूक व तात्काळ काढता येते. हे आपणांस चांगलेच ठाऊक आहे. एरव्ही मीच रिंग मास्टर, माझीच सर्कस, माझेच रिंगण आणि माझेच टाळ्या पिटू प्रेक्षक याच कूपात राहून मग शास्त्रीय संशोधनाचे नाटक कशाला?
याचे साधे कारण हे की नाडी केंद्रास भेट देण्यास यायचे नाही व अंनिसचे तोंडकाळे करून घ्यायचे नाही. आपल्या अंनिस सर्कसचे चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरतपटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षांत आला आहे. वर्तमानपत्रवाले एकजात आपल्या विविध क्लुप्त्यांना आपल्या मागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात, मात्र तोंडावर व वर्तमानपत्रातून नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही.
आपण माझ्या लांबलचक पत्रे पाठवण्याची टिंगल करता पण आपल्या पत्रातील पोकळ व खोटारड्या मुद्यांची खबर घेणे क्रमप्राप्त होते. असो, आता आपल्या 21-11 च्या पत्रातील मुद्यांकडे वळतो.
मुद्दा क्रमांक 3 मध्ये आपल्या ... ‘भाषा कूट तमिळी जाहीर करून आमच्या प्रतिपादनालाच पुर्ण बळकटी मिळते’ हे आपल्या लक्षात येत असेलच... या विधानाला मी फार महत्वाचे मानतो. या वाक्यावरून 30-9 (1995) च्या सभेत उपस्थित 3 तमिळांनी नाडीपट्यातील भाषा तमिळच आहे या पुराव्याला आपण मान्य केले आहे हे सिद्ध होते. कारण ज्या डॉ. नारळीकरांनी नाडीपट्ट्यातील भाषा (देखील) तमिळ नाही असे म्हणून नाडीभविष्याला Hoax असा शिक्कामोर्तब केले ते विधान खोटे होते हे सिद्ध होते. हे सिद्ध झाले. असे आपण मानता असे म्हणावे लागेल. ज्या नारळीकरांच्या दोन निष्कर्षांवर अवलंबून आपणही नाडीभविष्याला फसवाफसवी वा थोतांड मानता त्यातील They could not ( a) read the script as Tamil- हे विधान त्यांनी परत घ्यावे असे आपण त्यांना आवाहन करावे. उरला प्रश्न त्या पट्टीतील मजकूराचा की ज्यात आपल्याला फोटोत शशिकांत असा मजकूर आहे असे मी किंवा नाडीवाचक म्हणतात त्याची खात्री करणे. अशी खात्री करण्याची वेळ आलीच तर, ‘ओरिजनल पट्टया-पुरावा पहायला दि. 2-4च्या पत्राप्रमाणे येण्याचे आपण मान्य केले होते. दि. 9-5च्या पत्रात “माहिती अचुक निघाल्यावर तमिळनाडूला येऊन पट्ट्या तपासणे (करावे लागेल)”.... असे मान्य केले आहेत. मात्र आपण पाठवत असलेल्या ठशांच्या संदर्भात नाडीपट्यांची माहिती-फोटो पाठवण्याचे मी कधीच मान्य केलेले नाही. तरीही एका उपलब्ध नाडीपट्टीचा फोटो व त्यातील मजकूराचे रोमन स्क्रीप्ट व इंग्रजी अर्थ आपणांस पाठवला होता. आता तो मजकूर तमिळमधलाच असूनही खुद्द तमिळनाडूतील तमिळांना वाचता येत नसताना (पुण्यातील तमिळांनी तर तसे लेखी दिल्याने) आता येथे न येण्याचे एकही कारण आपणांस राहत नाही. उलट मुद्दा क्रमांक 1 मधे ... “आमचा प्रतिनिधी मद्रासला येणे पूर्ण गौण आहे”... असे निर्लज्ज विधान करून विलंब का? असा जाब मलाच जाब विचारता? खरेतर हा विलंब का असे विचारण्याची हक्क माझा आहे.
‘नाडी भविष्य’ हा चमत्कार आहे याची आपणांस संपुर्णतः खात्री झालेली आहे. त्यामुळे आता कसेही करून पळवाट काढून नाडीकेंद्रांस भेट देण्याचे टाळण्याचे तंत्र वापरायला कितीही खालच्या थराला जावे लागले तरी चालेल असा आपला पवित्रा आहे. यासाठी नाडीपट्यात माहिती आपणांकडून काढून ती परत सांगितली जाते हे कारण (आपण)पुढे करता. मग असे शेकडो वर्षे लाखो लोकांच्या संदर्भात होत असूनही आत्तापर्यंत कोणीही या फसवणूकीची पोलिस केस का केलेली नाही? Alive या मासिकाच्या किरकोळ स्तंभावरील एक कात्रण व कोवूर यांचा अंदाज हेच जर आपले याबाबतचे पुरावे असतील तर त्यांचा सच्चेपणा आपणांस ताडून पहायला नको का? 30-9 च्या सभेत डॉ. बोरकरासह सर्व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नाडीकेंद्रास भेट देण्यास येणे अत्यंत आवश्यक आहे व ठसे पाठवून ओकांवर हे काम सोपवण्याचे धोरण मुळातच चुकीचे आहे असे मान्य केले आहे. आता माझ्या नाही तरी निदान आपल्याच कार्यकर्त्यांचा मान नको का राखायला? आपल्याच साथिदारांची आपण किती वेळ प्रतारणा करणार? त्यांच्यातील काहींनी येथे येऊन तपासणीकरून चमत्कार असल्याचे मान्य केले तर त्यांना काय आपण समितीतून काढणार?
मुद्दा क्रमांक 2 कडे आता आता वळतो.
शनिवार दि. 30-9(1995) ची साप्ताहिक (बैठक?) सभा ‘मामुली’ होती असा टोन ध्वनित करून, पत्रकार परिषद घेणे व वर्तमानपत्रात बातमी छापवून आणि त्यावरही या सभेला आपण गौण महत्व दिलेत. मात्र बरेच पत्रकार व उपस्थित श्रोत्यांना आपल्या उपस्थितीची खात्री होती. अशा वातावरणांत आपली अनुपस्थिती असभ्यतेचे लक्षण होते. या उलट मी या सभेला एक प्रेक्षक म्हणून आवर्जून उपस्थित होतो. सभेचे कामकाज सुरु झाल्यावर मग डॉ. बोरकरांशी ओळख करून नाडी भविष्य या पुस्तकाचा लेखक म्हणून मी त्यांच्या सर्वसंमतीने भाषणास सुरवात केली. मात्र सभेच्या मुख्यकार्याला त्यामुळे मुळीच बाधा आली ऩाही. उलट श्रोत्यांना या सभेच्या व उपस्थित पुणेरी तमिळांनी त्या फोटोवाचन करण्यामागचा महत्वाचा उद्देश व पुर्व पीठिका सर्व विदित झाली. आपल्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या व श्रोत्यांच्यावतीने डॉ. बोरकरांनी माझे आभार मानून धन्यवाद दिले. आपण मात्र मी सभेत ‘घुसलो’ असा मनघडंत आरोप केलात. यावरून आपली मानसिक स्थिती बरीच खालावलेली वाटते. पत्र लिहिताना जरी ‘थोडे हसू व बरीच कीव’ आली असली तरी माझ्या त्यासभेतील भाषणाने व पुणेरी तमिळांनी पट्टयातील भाषा तमिळच असल्याचा लेखी पुरावा सादर केल्याने आपला बराच तिळपापड झाला हे त्या एका शब्दाने चांगलेच लक्षात येते.
आपण स्वतः हजर न राहण्याचा ‘पळपुटेपणा’ केला असताना तुमच्या अपरोक्ष मी सभेत ‘वाद घालायला गेलो’ हा (ओकांचा) पळपुटेपणा म्हणण्याचा साळसूदपणा आपली बुद्धी चक्रम झाल्याचे द्योतक आहे. असे दुःखाने म्हणावे लागते.
By the way, पुर्वीच्या 27-7(1995)च्या पत्रात व 16-7च्या पुढारीमधील लेखात रेडिओ कार्बन टेस्टबद्दल मला ‘आपण अगदीच कसे विसरलात?’ असा प्रश्नार्थी टोमणा मारता आहेत. मी Mr. Marvin Mills यांना पाठवलेले पत्र (कॉपी) आपणांस मिळाले असेलच. आता आपण आपल्या माहितीच्या संस्थांचे पत्ते व त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी मला ते पत्ते पाठवण्याचे अगदीच कसे विसरलात? मात्र यासाठी होणाऱ्या टेस्टसाठी नाडीपट्ट्यांचे प्रूफ घेण्यास आपण स्वतःजातीने हजर असलेच पाहिजेत. कारण त्याशिवाय कार्बन 14टेस्टचा निकाल काहीही लागला तरी तो अमान्य करण्याची मखलशी आपण लीलया करू शकता.
तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल.
आपला स्नेहाभिलाषि,
शशिकांत ओक

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

2 Sep 2009 - 12:46 am | भडकमकर मास्तर

कोणी केला होता फोन? ~X( ~X(
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Sep 2009 - 12:50 am | बिपिन कार्यकर्ते

त्याला आधी घ्या कोपच्यात...

असो. लेख नीट वाचता नाही आला.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

2 Sep 2009 - 1:13 am | टारझन

तरी ... तरी सांगत होतो... चष्म्याला णाडी बांधत चला ... पण तुम्ही काकालोक आमचं ऐकाल तेंव्हा ना ?

असो ..
अ‍ॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो

-(अतिउद्धट) टारलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Sep 2009 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अ‍ॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो

=)) =)) =))

सेम हियर टार्‍या! कोण कोण भांडण-भांडण खेळत आहेत बघायला आले. रहावलं नाही म्हणून लोळून हसणारे इमोटीकॉन्स ठेवून जात आहे.

अदिती

ता.क.: पत्र वाचलं. भांडण-भांडण कोण खेळत आहे तेही समजलं! एवढी जहरी टीका मिपावर संपादक टीकू देत नाहीत एवढंच वाटलं. बाकी चालू द्या.

अदिती

भडकमकर मास्तर's picture

2 Sep 2009 - 3:05 pm | भडकमकर मास्तर

रिंगमास्टर, आसूड, कवायत, सिंह, सर्कस असे काही शब्द वरती वाचनात आले, त्यानुसार विषयाचे अधिक स्पष्टीकरण होण्यासाठी काही सुसंगत फोटो चढवत आहे...


_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

सहज's picture

2 Sep 2009 - 7:42 am | सहज

१९९५ मधील सर्कस!!! वा क्या बात है!!

चालू द्या!

----------------------------------------
१९९५ की उस थप्पड कि गुंज तुम्हे २००९ मे भी सुनाई दे गी राणा ठाकूर!

(हतबुद्ध)चतुरंग

दशानन's picture

2 Sep 2009 - 9:11 am | दशानन

नाडीवाद ;)

* डोक्यावरुन केले सर्व काही.... माझी नाडी सटकली आहे... :| त्यामुळे काही समजले नाहि... बाकी,

तुमचे चालू द्या.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2009 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे

तरी आम्ही सांगतोय विल्यॅष्टिक वापरा.पन डिजाईनच घावना!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2009 - 4:47 pm | प्रकाश घाटपांडे

दोन्हीतील सीमारेषा पुसट आहे. पण ओकसाहेबांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. ते त्यांच्या मताशी प्रामाणिक आहेत. ओक साहेबांचे लेखन इथे पहा.

युयुत्सु's picture

2 Sep 2009 - 8:07 am | युयुत्सु

अनिंस ही एक करमणूकीचे कार्यक्रम करणारी सर्कस आहे या विधानाशी एकदम सहमत. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टाळायची कशी याचे धडे घेण्यासाठी मी दाभोळकराना गुरूस्थानी मानतो...

विजुभाऊ's picture

2 Sep 2009 - 10:05 am | विजुभाऊ

सोयीस्कर कांगावा
खरेतर या बाबतीत सनतनप्रभात फार मोठी मदत करेल साधकांना त्रास दिला म्हणून नाटकांच्या शो ला सुतळी बॉम्ब फोडेल.
ओक साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो. की तुमचा तुमच्या प्रणालीवर/नाडीपट्ट्यांवर ठाम विश्वास असेल तर अंनिस ची त्याला मान्यता हवी हा अट्टाहास कशाला?
जसे आय एस आय मानका पेक्षा वरच्या प्रतीची मानके असतात म्हणून आय एस आय मानांकीत वस्तु उत्तमच असतील असे नाही.
तसेच उल्हासनगर ला बनणार्‍या वस्तु अगदीच बंडल असतील असेही नाही. प्रत्येक वस्तुच्या ग्राहकाच्या गरजेनुसार मानके बदलत असतात.
समजा त्या पट्ट्या खर्‍या आहेत अशी अंनिस ने मान्यता दिली म्हनुन असा किती फरक पडणार आहेत. ज्यांचा विश्वास आहे ते तुमच्या कडे येतीलच आणि ज्यांचा नाही ते येणारच नाहीत.
"येनकेनप्रकारेण पुरुषो प्रसिद्धो भवेत " य्ता तत्वावर जास्त भर असल्याने ज्याची वर्तमानपत्रत कायदेशीर रित्या झैरात करता येत नानी तशा गोष्टींची मिडीयामधून वाद उभे केल्यानन्तर जास्त प्र॑सिद्धी होते आणि बघुयातरी काय प्रकार आहे ते असे बघे मात्र जाळ्यात सापडतात.
एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि यूयूत्सु साहेबाना सुद्धा
समजा माझ्या भविष्यात अमूक एक घटना होणारच असे लिहिले आहे ती गोष्त मी स्वतःटाळण्याचा प्रयत्न केला तर ती टळू शकते का?
या प्रश्नाच्या पोटात उपप्रश्न आहे की तसे प्रयत्न मी करेन किंवा नाही हेदेखील विधीलिखित असेल तर माझ्या हातात काहीच उरत नाही.
अशा परिस्थितीत मी ज्योतिष्/भविश्य बघितले काय किंवा नाही बघितले काय फरक पडणार आहे?

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2009 - 10:19 am | प्रकाश घाटपांडे

विजुभाउंशी सहमत आहे
संकष्टी चतुर्थीला तिरंगा या नॉनव्हेज हॉटेलची जाहीरात असते.
"प्रवेश बंद".
या एका दिवशी अशा प्रकारची निगेटिव्ह जाहिरात करुन जो परिणाम साधतो तो अन्य दिवशीच्या अनेक जाहीरातींनी साधत नाही.
शिवाय अनेक प्रतिक्रिया या जाहीरातीच्या वाहकच बनतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

2 Sep 2009 - 10:37 am | युयुत्सु

ज्योतिषाच्या संदर्भात घटनांचे दोन प्रकार सांगता येतात. १ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही. आलीया भोगासी ... असे म्हणून गप्प बसावे लागते.

प्रत्येकाची अनिश्चितता हाताळायाची क्षमता सारखी नसते म्हणून ज्योतिष बघायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न ठरतो.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2009 - 10:41 am | प्रकाश घाटपांडे

प्रत्येकाची अनिश्चितता हाताळायाची क्षमता सारखी नसते म्हणून ज्योतिष बघायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न ठरतो.

खरयं! पण अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांतुन सामाजिक समस्या/प्रश्न निर्माण होतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

2 Sep 2009 - 1:09 pm | युयुत्सु

सामाजिक समस्या हाताळायला creative problem solving नावाचे स्किल वापरता येते. अनिंसवाल्याना ते बहूधा ठाऊक नसावे. त्यांच्या शब्दकोशात "थयथयाट" एवढा एकच शब्द आहे.

विजुभाऊ's picture

2 Sep 2009 - 10:47 am | विजुभाऊ

१ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही.
यात पहिला प्रकार हा दुसर्‍या प्रकारावर अवलंबून असतो.
उदा : लग्न करणे किंवा टाळणे यात आपला जाणीवपूर्वक सहभाग असतो. नन्तरचे टाळता येत नाही.
किंवा गावाला जाताना जावे की नाही यात आपला जाणीव पूर्वक सहभाग असतो. पण गेल्यानन्तर बसला/ रेल्वेला अपघात हा आपण टाळू शकत नाही.
अवांतरः सॉफ्टवेअरचा प्रोग्राम लिहिताना If.....Else....Then असा शक्यता अशक्यता वर आधारीत कंडिशनल प्रोग्राम लिहिला जातो

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

JAGOMOHANPYARE's picture

2 Sep 2009 - 11:05 am | JAGOMOHANPYARE

ज्योतिषाच्या संदर्भात घटनांचे दोन प्रकार सांगता येतात. १ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही. आलीया भोगासी ... असे म्हणून गप्प बसावे लागते.>>>>>>>>>>>>>>..

हा विचार कधीच केला नव्हता.... आपण एक तर पूर्ण १ मानतो किन्वा २ तरी........ पण दोन्ही थोडे थोडे असू शकते, धन्यवाद ! आज सकाळी याला समान्तरच विषय घोळत होता म्हणायचा..... सापशिडी हा खेळ सन्त ज्ञानेश्वरानी शोधला असे काल कुठेतरी वाचले.त्याबद्दल विचार करत होतो... .. त्या खेळाचे मूळ नाव होते मोक्षपटल..... १. फासे टाकून मिळालेला परिणाम म्हणजे आपण उल्लेखलेले १...... २. त्या घरात त्या वेळी आपण केलेले सद्विचार किन्वा दुर्विचार म्हणजे शिडी आणि साप... म्हणजे आपण उल्लेखलेले २........ धन्यवाद... छान सन्गती लावून दिलीत......

अजुन कच्चाच आहे's picture

2 Sep 2009 - 10:39 am | अजुन कच्चाच आहे

विजुभाऊंशी सहमत.
सारे भविष्य जर आधिच ठरलेले असेल तर आपल्या प्रयत्नांना काही अर्थच उरत नाही.
(कशाला काय काम करायचे मग? ... असेल माझा हरी तर.....)

एक सल्ला : मी पट्टी बघणार की नाही हेही पट्टीत असेलच की. मग ती पट्टी त्या ठिकाणी हजर का ठेवत नाहीत? शोधाशोधीचा केवढा व्याप वाचेल.
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी हे शोधायला पट्टी पहावी काय?)

तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल.
आपला स्नेहाभिलाषि,

यावर अद्याप कोणी अंनिसच्या लोकांना विचारत नाही - वा आपणासारखे अंनिसच्या कार्याला सहानुभूती असलेले लोक योग्य व्यक्तींशी संपर्क करून या विषयाला वाचा न फोडता अन्य लिहिण्यात का वेळ गालवताय?
अंनिसने सर्टीफिकेट दिले तरच नाडी महर्षींचा गौरव होतो आणि नाही दिले तर त्यांच्या कार्याला बट्टा लागतो असे नाडी प्रेमींना वा अन्य लोकांना कोणालाही वाटत नाही. मात्र जे लाखो रुपयांची जाहीर आव्हाने देऊन गप्प बसतात त्यांच्या गप्प बसण्याच्या कृतीच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला आहे इतकेच.

शशिकांत

मदनबाण's picture

2 Sep 2009 - 10:43 am | मदनबाण

नाडी ग्रंथा विषयीची आपली चर्चा मागे वाचली होती...तेव्हा या संबंधी कुठे तरी काही तरी पाहिल्याच किंवा वाचल्या सारख आठवत होत...नंतर लक्षात आले की सुरभि या मालिकेत बहुधा साऊथ मधले नाडी ग्रंथावाले दाखवल्यासारखे वाटते...
बाकी या विषयावर अजुन वाचावे का ? या विचारात सध्या आहे...

बाकी ओकसाहेबांच्या चिकाटीला दाद देतो.

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

JAGOMOHANPYARE's picture

2 Sep 2009 - 10:52 am | JAGOMOHANPYARE

अनिस वाल्यान्ची अवस्था दारूड्या माणसासारखी झालेली आहे... हळूहळू दारू वाढते आहे, हे त्याला कळतच नाही.... आधी अन्धश्रद्धा निर्मूलन करत होते... मग हे लोक श्रद्धा निर्मूलनाच्या मागे लागले.... आणि आता हिन्दु धर्म निर्मूलनाच्या मागे लागलेत.........

विजुभाऊ's picture

2 Sep 2009 - 11:02 am | विजुभाऊ

हिन्दु धर्म निर्मूलनाच्या मागे लागलेत.........
हे म्हण्जे कैच्याकैच. ओढून ताणून यात धर्म कशाला आणलात.
अर्रर्र्.तुम्ही सनातन वाले आहात हे विसरलोच .

अवांतर : तुम्ही लिहिलेल्या या प्रतिसादावर् काही प्रतिक्रीया आल्या तर त्याला तुम्ही साधकांच्या साधनेत मिपा सदस्या च्या रूपात पिशाच्चानी आणलेला व्यत्यय असे म्हणता का?

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल.
आपला स्नेहाभिलाषि,

यावर अद्याप कोणी अंनिसच्या लोकांना विचारत नाही - वा आपणासारखे अंनिसच्या कार्याला सहानुभूती असलेले लोक योग्य व्यक्तींशी संपर्क करून या विषयाला वाचा न फोडता अन्य लिहिण्यात का वेळ गालवताय?
अंनिसने सर्टीफिकेट दिले तरच नाडी महर्षींचा गौरव होतो आणि नाही दिले तर त्यांच्या कार्याला बट्टा लागतो असे नाडी प्रेमींना वा अन्य लोकांना कोणालाही वाटत नाही. मात्र जे लाखो रुपयांची जाहीर आव्हाने देऊन गप्प बसतात त्यांच्या गप्प बसण्याच्या कृतीच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला आहे इतकेच.

शशिकांत
शशिकांत

विजुभाऊ's picture

2 Sep 2009 - 2:57 pm | विजुभाऊ

ओक साहेब आपली चिकाटी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.
अंनिस; त्यानी दिलेले आव्हान कोणी स्वीकारले की पळ काढते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ते तसे वर्तमानपत्रात लिहा. निदान अंनिसचा पर्दाफाश तरी होईल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

निमीत्त मात्र's picture

3 Sep 2009 - 12:50 am | निमीत्त मात्र

अहो शशिकांत ओक हे एक थोतांड आहे.

तुमच्या लिखाणावरुन तुम्ही सुशीक्षीत वाटता तरीही असल्या नाड्या वगैरे घेऊन काय बसलाय २१व्या शतकात?