राम राम मंडळी,
आपण नेहमीच शिणेमे पाहतो, त्याचा बरावाईट काय असेल तो शेवट पाहतो आणि घरी येतो.. त्यानंतर त्या कथेचं पुढे काय झालं असेल याचा विचार सहसा करत नाही. माझ्या मात्र मनात पुढील कथेबद्दल, त्यातील पात्रांबद्दल पुढे काय झालं असेल या बद्दल उत्सुकता असते.
आता शोलेचंच उदाहरण घ्या आणि द्या पाहू आपापल्या कल्पनाविलासाप्रमाणे खालील प्रश्नांची उत्तरे - :)
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
वगैरे वगैरे...
द्या पाहू उत्तरं.. :)
आपला,
(गब्बरप्रेमी) तात्या.
प्रतिक्रिया
30 Aug 2009 - 5:56 pm | अवलिया
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
अर्थातच, ठाण्यातच मुंबई आणि म्हाराष्ट्राच्या सीमेवर.
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
विमा विकणे आणि शेअर ट्रेडिंग
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
नाही, साबणाची फॅक्ट्री काढली
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
कल्पना नाही, पण ठाकुरला मनी आर्डर वेळेवर पाठवतो. त्याच्या अमेरिकेतील मित्राने सांगितले, भेटायला गेला नाहीस तरी चालेल पण मनी आर्डर वेळेवर गेली पाहीजे
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
का ? तुम्हाला का विंटरेस्ट !! :?
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
तुरुंगवास झाला आणि नंतर चांगल्या वर्तणुकीमुळे लवकर सोडले. आता एका मराठी संकेतस्थळावर लेखन करतो ... महान लेखक आहे आता तो.
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
बांधली, सध्या तिथेच पत्ते कुटायला जातो मी अधुन मधून
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
वक्फ बोर्ड.
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
मौसी काशीयात्रेला गेली. सध्या काही पत्ता नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 6:21 pm | विसोबा खेचर
वीरू जयचं श्राद्ध दरवर्षी न चुकता घालत असेल का?
ठाकूरच्या पश्चात विधवा राधा आधारासाठी वीरूकडेच रहायला गेली असेल का? आणि वीरूच्या मुलाबाळांना कहान्या सांगून जयचाचाची कमी भरून काढत असेल?
रामलाल आधी वारला असेल की ठाकूर?
की ठाकूर अजून हयात असून त्याने आता वीरू-बसंतीलाच आपला मुलगा-सून मानून वाड्यावर रहायला बोलावले असेल?
तात्या.
30 Aug 2009 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते
नक्की माहित नाही. पण, रामलाल आधी वारला असेल तर बिच्चारा ठाकूर. असो.
बिपिन कार्यकर्ते
30 Aug 2009 - 9:22 pm | अवलिया
वीरू जयचं श्राद्ध दरवर्षी न चुकता घालत असेल का?
वीरु जयचे श्राद्ध अगदी न चुकता घालतो. दोघांचेही अनाथ असल्याने गोत्र माहित नव्हती, तर कश्यप गोत्र मानतात. या पितृपक्षात जेवायला येणार असाल तर तुमचे नाव सुचवतो. पाच ब्राह्मण लागतात ... चार आधीच फिक्स आहेत.
ठाकूरच्या पश्चात विधवा राधा आधारासाठी वीरूकडेच रहायला गेली असेल का? आणि वीरूच्या मुलाबाळांना कहान्या सांगून जयचाचाची कमी भरून काढत असेल?
रामलाल आधी वारला असेल की ठाकूर?
की ठाकूर अजून हयात असून त्याने आता वीरू-बसंतीलाच आपला मुलगा-सून मानून वाड्यावर रहायला बोलावले असेल?
राधा सध्या म्हाता-या ठाकुरला आणि रामलालला संभाळते. वीरु बसंतीला बोलावले आहे पण पोरांच्या शाळेमुळे ते येत नाहीत. त्यांना असे वाटते की जगातील सगळी हुशारी ठाण्यात आणि ठाण्यातल्याच शाळेत आहे.
अजुन काही ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 11:59 pm | विसोबा खेचर
त्या चारात तू आणि युयुत्सू असालच! :)
तात्या.
31 Aug 2009 - 6:49 am | अवलिया
मी आहे, मास्तर आहे, धमु आहे आणि बिका आहे. सगळे दगडाला देव मानणारे बिनडोक लोक आहेत. हुशार लोक श्राद्धाचे जेवण करत नाहीत, ते अनाथाश्रमात बर्गर वाटतात.
बर... हे युयुत्सु कोण?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Aug 2009 - 1:26 pm | विनायक प्रभू
तारीख कळवा अवलिया तात्यांना.
ते अंमळ बिझी असतात.
मला पण प्रश्न पडला आहे तुमच्या सारखा.
कोण बरे हे युयुस्त्सु.
31 Aug 2009 - 10:57 am | प्रदीप
हे म्हटले तर अवांतर, म्हटले तर नाही!
<अर्थातच, ठाण्यातच मुंबई आणि म्हाराष्ट्राच्या सीमेवर.
मुंबई महाराष्ट्रात येते, साहेब. १०५ हुतात्मे देऊन मिळवली आहे ती आम्ही.
आणि ते मुखपृष्ठावरील आजचे छायाचित्र ( सात दिवसांच्या विसर्जनाचे)
हे कुणी घेतले आहे, माहित नाही. पण हे सगळे भय्ये व भय्यिणी आहेत. अख्ख्या मुंबईत विसर्जनाचे चित्र काढण्यास एकही मराठी कुटुंब सापडले नाही?
बाकी तुमचे चालू द्या.
(उद्विग्न) प्रदीप
31 Aug 2009 - 11:04 am | अवलिया
अरेरे ! मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कनुसार मुंबई महाराष्ट्राची सीमा म्हणुन ठाणे म्हटले. कारण, मुंबईला जातांना येतांना ठाण्यात सीमोल्लंघन होते. असो.
आपल्या महाराष्ट्राविषयीच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व !
आणि हो, १०५ हुतात्म्यांचा आदर तर आम्हाला आहेच... पण त्याबरोबर आम्ही महाराष्ट्रातच राहुन भारताच्या भल्याबु-या प्रगतीत खारीचा वाटा उचलत आहोत. तेव्हा आमच्या भारतप्रेमाबद्दल तसेच महाराष्ट्रप्रेमाबद्दल निःशंक असा. देव देश आणि धर्मासाठी वेळ पडेल तेव्हा जीव घ्यायला आणि जीव द्यायला आम्ही तयार असु.
बाकी चालु द्या !
असो. :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Aug 2009 - 7:47 pm | विंजिनेर
मजेदार कल्पना विलास :)
सॉमरसेट मॉमच्या एका गोष्टीचा शेवट त्याने असाच केला आहे. गोष्टीचा नायक सुंदर, खट्याळ, लोभसवाण्या स्वभावाच्या नायिकेला घेऊन रेस्त्राँ मधे जातो. ऑर्डर देणार तिथे गोष्ट थबकते. त्यानंतर बीफ स्टेकच्या रेअर/वेल डन/बर्न्ट ह्या रुपकाचा आधार घेऊन तीन प्रकारे गोष्टीचा शेवट केला आहे.
रेअर म्हणजे नायिकेचा नवरा येतो - एकूण फद्या होतो.
"वेल डन" शेवटात नायक बाजी मारून नेतो आणि नायिकेचे हृदय जिंकून लग्नाची मागणी घालतो - सुखांत शेवट.
"बर्न्ट" शेवटात नायिकेचा कर्दनकाळ बाप येतो आणि बिचार्या नायकाला पळता भुई थोडी होते.
30 Aug 2009 - 11:41 pm | विकि
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
वो बंबईको आया रहेगा.
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
बंबई मे आया मतलब वो इधरका डॉन बन गया होगा.
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
बसंती अब खुद की गाडी चलाती होगी क्या.
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
ठाकूर के पास अभी फोन आया रहेगा वीरू फोन पर ही उस के बात करता है.
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
राधा को अकेली जीने की आदतसी पड गयी है.वीरू और बसंती के लाख समझानेपर उसने शादी नही की ज्योतीष ने बताया वो मंगलीक है.
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
वीरू ने गब्बर को कोर्ट मे जाते समय अपने लोगों करवे उसका गेम बजा दिया होगा.
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
जरुर बनाया होगा,उस समाधी का दर्शन लेनेको वीरु पोलीस से बचके भेस बदलके आता रहेगा.
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
इमाम साहब भगवान को प्यारे हो गये.
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
मौसी को लेके वीरू दुबई जाने वाला है.
वीरू देश को बाहर जानेमे पुलीस का बहुत बडा हात है
आपला
फील्मी चक्कर वाला
विकि
31 Aug 2009 - 6:55 am | अवलिया
इमाम साहब भगवान को प्यारे हो गये.
अरेच्या ! म्हणजे मरतांना त्यांनी हिंदु धर्म स्वखुशीने स्विकारलाच तर. जात काय घेतली होती त्यांनी ? आणि गोत्र ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Aug 2009 - 7:03 am | दिपाली पाटिल
>>इमाम साहब भगवान को प्यारे हो गये.
>>>>अरेच्या ! म्हणजे मरतांना त्यांनी हिंदु धर्म स्वखुशीने स्विकारलाच तर. जात काय घेतली होती त्यांनी ? आणि गोत्र ?
बापरे.."आपकी बारकी नजर आणि (निरमा सुपर)........ :D
दिपाली :)
30 Aug 2009 - 11:59 pm | टारझन
प्रकाटाआ
31 Aug 2009 - 12:47 am | sujay
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
महाराष्ट्रात, सगळे भैय्ये ईकडेच येतात.
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
वीरु पाण्याचा टाकीवर चढण्यात तरबेज होता सो त्याने "वीरु'ज सर्वीसेस" हा टाक्या धुण्याचा धंदा काढला असेल.
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
धन्नो वर अवलंबून आहे, धन्नो जर लग्न करून सासरी गेली असेल तर नाही.
रामलाल आधी वारला असेल की ठाकूर?
आधी ठाकूर, रामलाल आधी वारला तर ठाकूर चे खाण्या पासून धुण्या पर्यंत सगळ्याचेच वांदे होतील.
ठाकूर के पास अभी फोन आया रहेगा वीरू फोन पर ही उस के बात करता है.
ठाकूर फोन कैसे उठाता होगा???
(बसंती प्रेमी) सुजय
31 Aug 2009 - 1:44 am | अनुप कोहळे
ठाकूर फोन कैसे उठाता होगा???
हँड्स फ्रि.
31 Aug 2009 - 6:16 am | पाषाणभेद
तुम्ही चित्रपट पाहून विचार करतात हेच खुप झाले. फार मोठी ताकद दिसते चित्रपटात, नाही?
"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
31 Aug 2009 - 8:09 am | हर्षद आनंदी
हे म्हंजे घरचं झालं थोडं आनि जावयाने धाडलं घोडं अशी गत झाली...
च्यायला, त्या वीरुच्या, ठाकुरच्या & बसंतीच्या बैलाला .....घो घो घो
31 Aug 2009 - 11:05 am | नाना बेरके
भारी कल्पना विलास केलाय प्रतिसादकर्त्यांनी.
च्यायला, त्या वीरुच्या, ठाकुरच्या & बसंतीच्या बैलाला .....घो घो घो
हे खरं असं पाहीजे :
च्यायला, त्या वीरुच्या, ठाकुरच्या बैलाला.....घो घो घो
& बसंतीच्या घोडीला . . . .बै बै बै.
31 Aug 2009 - 1:25 pm | कानडाऊ योगेशु
तात्याभाऊ,तुम्हाला राम गोपाल वर्मा चाव्ला की काय?
31 Aug 2009 - 2:43 pm | सूहास (not verified)
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
स्ट्रिट न, १२, शिकागो, यु.एस.
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
"सॉफ्टवेयर ईजींनियर"
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
नाही ..पिवळी टॅक्सी
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
होय, अनिवासी भारतीय असल्याने...
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
नाही, वाडा भाड्याने दिला असेल ..व स्वत , रामलाल बरोबर......
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
माहीत नाही पण ..कोणीतरी म्हणत होते तो एक लग्नविधी लावणारा लई गबर आहे ते....
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
हा हा हा हा हा पुतळ्यांची कथा फक्त उ.प. मध्ये , महाराष्ट्रात काय माहीत नाही ब्वा...
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
छ्या.. काहीतरीच काय...अहमद असो नाहीतर नसो...आठवा जरा ते सौताच म्हणत होते की " मुझे और दो-चार बेटे क्युं नही दिये शहीद होने के लिये..मग ते गप बसले असते का ???
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
नाही ...कारण अनिवासी भारतीय परत फक्त डिजीटल कॅमेरा घेऊन येतात्...सेवा करायसाठी नाही...
आपला,
सू हा स...
31 Aug 2009 - 7:08 pm | नाना बेरके
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
. . अर्थात आपल्या मुंबैत.
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
. . स्वतः पिठाची चक्की टाकली आणि आपली अर्धा डझन मुलेबाळे पिक्चरमध्ये पाठवली.
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
. . नेमबाजी बिरूकडून शिकल्यामुळे, तिने आणि बिरुने नेम धरून दोन कैर्या पाडल्या आणि नंतर आपण जाहीरात विश्व आणि राजकारणात रमून गेली.
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
. . एकदाच सपत्नीक गेला होता त्यावेळेला ठाकूरच्या मुला नातवांची उणीव भरून काढण्यासाठी आपली पिक्चरमधली सद्दी संपलेली दोन पोरे तिथे टाकून आला.
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
. . दरवर्षी 'जय' मिळावा म्हणून छटपूजा करत असते.
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
. . त्याला खरं फाशीची शिक्षा सुनावली आहे, पण सरकारच्या धोरणानुसार कसाबसारखाच तो ही वाट पहात आहे. कदाचित सुटेलही.
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
. . पैसे कुठून आणणार ? धान्य संपत्ती गब्बर खाऊन बसला आणि स्वतःच्या तिजोरीची चावी बिरूला देऊन बसला.
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
. . ह्याचे उत्तर अवलियांप्रमाणेच . . वक्फ बोर्ड.
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
. . नाही. मौसी आजकाल पत्रिका बघण्याचा धंदा करते. एकीकडे लोकांच्या धर्माची आणि गोत्राची माहिती जमा करत गांवभर हिंडते.