हा चर्चाविषय गेल्या आठवड्यात आलेल्या न्यूजवीक मधील एका लेखा संदर्भात आहे. लेखाचे शिर्षक होते: "We are all Hindus now". लेखिकेचे नाव आहे, "Lisa Miller".
सर्वप्रथम ह्या लेखाचा दुवा आणि संक्षिप्त-स्वैर भाषांतर देण्याचे कारण हे "कसे आम्ही ग्रेट आहोत!" असे म्हणायचे नाही, याची खात्री असावी.
अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे. २००८ च्या एका सर्वेक्षणाप्रमाणे ७८% जनता आजही स्वतःला ख्रिश्चन समजते (जरी ते आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक आकड्यापेंक्षा प्रमाण कमीच आहे)....मात्र तसेच नजीकच्या काळात घेतलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे, आपण ख्रिस्तीधर्मापेक्षा जास्त हिंदू मनाने विचार करू लागलो आहोत - देवाबद्दल, स्वतःबद्दल, एकमेकांबद्दल, आणि अनंताबद्दल.
ऋग्वेदात म्हणले आहे, "सत्य जरी एकच असले तरी साधूसंत ते विविध प्रकारे सांगतात." हिंदू समजतात की देवाकडे जायचे अनेक रस्ते असू शकतात. येशू हा एक, महंमद हा दुसरा, (निव्वळ) योगसाधना हा तिसरा. सर्व समान आहेत आणि कुठलाच एक दुसर्यापेक्षा अधिक चांगला नाही. धार्मिक ख्रिस्ती व्यक्तीस असे कधीच शिकवले गेलेले नसते..."
२००८ सालच्या प्यू सेंटरच्या सर्वेक्षणाप्रमाणे, ६५% जनता समजते की ईश्वराकडे जाण्याचे भिन्न मार्ग असू शकतात. चर्चच्या (चाकोरी) बाहेर अंतिम सत्य शोधणार्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. २००९ च्या न्यूजवीकच्या सर्वेक्षणाप्रमाणे, २००५ मधे जे २४ % प्रमाण होते ते वाढून ३०%जनता स्वतःला धार्मिक म्हणण्यापेक्षा अध्यात्मिक समजू लागली आहे. प्रा. स्टिव्हन प्रोथेरो, बॉस्टन युनिव्हर्सिटी, यांच्या मते सहज विविध गोष्टी उपलब्ध असलेल्या प्रकारात हिंदू धर्म मोडतो. परीणामी ते भावते. "हे कर्मठपणा बद्दल नाही पण काय चालू शकतेया बद्दल आहे. चर्च मधे जाण्याचा फायदा असेल तर तो घ्या. योगशिक्षणाचा असेल तर ते घ्या, दोन्ही चालले तर काय उत्तमच!"
अंत्यसंस्कारासंदर्भात पण दफनविधी सोडून एक त्रितियांश ख्रिश्चन हे आता दहनविधिकडे वळू लागले आहेत. हार्वर्ड विद्यापिठाच्या प्राध्यापिका डायना एक म्हणाल्या, "(धार्मिकतेपेक्षा) आध्यात्मिक (तत्वज्ञान) विचारांनी अनेकदा पुस्तकीपद्धतीने धार्मिक समजुतीं डोक्यात ठेवून वागणे कमी होते. तेंव्हा आता आपण सारे "ओम" म्हणूया." (मूळ इंग्रजी लेखाचा दुवा)
सुरवातीस म्हणल्याप्रमाणे चर्चेचा उद्देश हा "गर्वसे कहो.." म्हणूया असा नाही मात्र "ओम म्हणूया" असे म्हणायला काय हरकत आहे असे वाटते. आज हिंदू धर्म म्हणला की हिंदूनाच फक्त त्यातील कर्मकांडे आणि अंधश्रद्धा दिसणार, जातीयता आहे म्हणणार, देव-देवता दिसणार... फिलॉसॉफी बोलायला लागले तर यातले कुठले कधी झाले, कुठे झाले, मग गीता खरेच कृष्णाने सांगितली का वगैरे विचारत चर्चा करणार?... ह्यातील कुठलीच गोष्ट गैर आहे असे मला म्हणायचे नाही. पण जे चांगले आहे ते तसे आहे म्हणून आत्मसात करण्यात काय गैर आहे? जशी "मी हिंदू आहे" हे गर्वाने म्हणायची गरज नाही, तसेच त्यात काय केवळ लाजेने मान खाली घालायला लावण्यासारख्याच गोष्टी आहेत का?
आज ह्या लेखिकेस तसेच त्यात उल्लेखलेल्या प्राध्यापकांना स्वत:ला हिंदू म्हणताना लाजही वाटत नाही, पॉलीटीकली इनकरेक्टही वाटत नाही आणि कुठल्याच देवाचा, कर्मकांडाचा उल्लेख अथवा व्यवहारात न आणता देखील हा हिंदू धर्मच वाटतो. आपण मग का कमी पडतो? का उद्या एखाद्या अमेरिकन अथवा युरोपिअन माणसाने सांगितले की मग सगळी लाज गळून पडणार?
प्रतिक्रिया
28 Aug 2009 - 2:46 am | संदीप चित्रे
बराच अर्थ आहे आणि बहुतेक तसेच होणार !
चांगल्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्स.
मिपावर तुझे लेख वाचणं म्हणजे विचारांना ट्रेड मिलवर टाकल्यासारखा व्यायाम असतो :)
28 Aug 2009 - 3:03 am | विकास
मिपावर तुझे लेख वाचणं म्हणजे विचारांना ट्रेड मिलवर टाकल्यासारखा व्यायाम असतो
धन्यवाद. फक्त यावरून मला अवांतर असले तरी आर. के. लक्ष्मण यांचे एक चित्र आठवले. मोह टाळता येत नसल्याने सांगतो: त्यात (नव्याने पंतप्रधान झालेले) राजीव गांधी हे ट्रेडमिलवर जोरात चालताना दाखवलेत. आणि कॉमनमॅनची बायको त्याला म्हणत असते की हे चालताहेत तर जोरात पण तिथेच राहताहेत, पुढे जातच नाहीत. :-)
28 Aug 2009 - 2:58 am | धनंजय
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या देशातली माहिती मिळते तेव्हा बरे वाटते. भारताबाहेरचे लोक भारताबद्दल चांगले बोलतात तेव्हा चांगले वाटते. लेखाचा अनुवाद आणि दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
- - -
पण त्याखालील चर्चेचे उद्दिष्ट्य नीटसे कळले नाही.
लोक हिंदू धर्माबद्दल कधीच चांगले बोलत नाहीत, आणि नेहमी वाईट बोलतात हा बहुधा पूर्वग्रह आहे. फारफारतर लोक पोटतिडकेने हिंदूधर्माला विशिष्ट चर्चांच्या संदर्भात दूषणे देताना मला दिसतात - त्या सर्व चर्चा कराण्यालायक आहेत असे तुमचेही मत आहे. तुम्ही म्हणता :
असा संदर्भ नसताना वाईट म्हणणे म्हणजे असते तरी काय?
मात्र इथे तुमचा आधीचा वाक्यांश कळीचा असावा असे वाटते :
यात आश्चर्य ते काय? जे लोक स्वतः हिंदू समाजात जगले, किंवा ज्यांचे प्रियजन हिंदू समाजात जगतात, त्यांनाच चांगल्या आणि वाईट गोष्टी अधिक जवळून दिसतील. अधिक वैयक्तिक नजरेने दिसतील. मला हिंदू आणि ख्रिस्ती समाजातल्याच चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल अधिक ओळख आहे. हिंदू समाजातल्या वाईट गोष्टींबद्दल त्यातल्या त्यात जास्त भावनिक रस आहे, ख्रिस्ती धर्मातल्या वाईट गोष्टींबद्दल (थोडे प्रियजन त्या समाजात वाढल्यामुळे) थोडीशी भावना आहे. आता मला कुठल्या नेटिव्ह अमेरिकन समाजाबद्दल विचारलेत तर मी वाईट गोष्टी पोटतिडकेने का सांगणार? फारतर वाईटसुद्धा "हं - अॅझ्टेक नेटिव्ह समाजात पूर्वी नरबळी देत होते, असे वाचले आहे" असे तटस्थपणे सांगणार. फारशा चांगल्या गोष्टी कुठून सांगणार? तेसुद्धा लीसा मिलर यांच्यासारखे "या ओनायडा नेटिव्ह अमेरिकनांच्या स्त्रीहक्कांबाबत रूढी छानच हां! आपणही शिकायला पाहिजे" असे तटस्थ-कौतुकाने सांगणार. तटस्थ का म्हटाले - कारण उद्या बिस्तर बांधून मी ओनायडा वसाहतीत जायला निघालो नाही. (आणि लीसा मिलर तरी स्वतःला कितपत हिंदू समाजात गोवू शकणार? याबद्दल साशंक आहे.)
ओनायडांबाबत फक्त ओनायडा लोकांना पोटतिडकेने, रोजरोजच्या जीवनात अंधश्रद्धा, गैरव्यवहार दिसेल. त्यातही आश्चर्य ते काय?
मला खरे तर तुम्ही म्हणता तो प्रकार समजलेला नाही. जातपातीबद्दल मुद्दाम विषय काढून टीका करणारे बहुतेक लोक गणपतीपुढे आरती म्हणतात, नाहीतर दिवाळी साजरी करतात, नाहीतर राखी बांधतात... काहीतरी शुभप्रसंग साजरा करतातच. (म्हणजे लीसा मिलर यांच्या आणि तुमच्या शब्दांत सांगायचे, तर कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी "ॐ" म्हणतात.) कित्येक "स्युडो-सेक्युलर" आमदार-खासदार साधुबुवांकडे जाऊन निवडणुकीपूर्वी (रडीच्या खेळासाठी) प्रसाद वगैरे घेतात, त्याचे फोटो प्रसिद्ध करतात. हे लोक तर चांगल्या-वाईट दोन्ही ठिकाणी ॐ म्हणतात!
मग मला भेटणारे बहुतेक हिंदू लोक कमीतकमी चांगल्या ठिकाणी ॐ म्हणायचे ते म्हणतातच (म्हणजे खिरापत वाटायला, किंवा राखी बांधायला). हे कधीच चांगले न म्हणणारे लोक तुम्हाला भेटतात तरी कुठे? त्यांच्याबद्दल विषाद वाटण्याइतपत सामान्यपणे तुम्हाला भेटत असावेत. आणि मला तर शोधून-शोधून भेटत नाहीत. आपण लोक वेगवेगळ्या देशांत वाढलो की काय! :-)
28 Aug 2009 - 4:34 am | काळा डॉन
चांगल्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्स.
मिपावर तुझे लेख वाचणे म्हणजे मला मेंदूला धुवायला टाकल्या सारखे वाटते. :)
काळू
28 Aug 2009 - 5:11 am | हर्षद आनंदी
तुम्ही काही म्हणा मी म्हणणार एकदा नाही, दोनदा नाही, त्रिवार म्हणणार, शतवार म्हणणार,
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है" O:)
28 Aug 2009 - 8:31 am | काळा डॉन
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
"गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
30 Aug 2009 - 12:27 am | विजुभाऊ
गर्व से कहो, हम हिंदू है" "गर्व से कहो, हम हिंदू है"
हे म्हणून काही उपयोग नाही. त्यानी काहीच होणार नाही.
तुम्ही हिन्दु असल्याने किंवा नसल्याने किती फरक पडतो.
धर्माबद्दल अभिमान बाळगुन धर्माचे भले अजिबात होणार नाही झालेच तर बुरेच होईल. ( त्यात कोणत्याच सुधारणा होणार नाहीत)
ज्या अर्थाने आपन हिंदु म्हणवून घेतो त्या अर्थाने आपण हिंदु सारखे काहीच आचरत नाही विचरत ही नाही.
हिंदुच काय पण जगातले बहुतेक धर्म ज्या काळात निर्माण झाले त्या त्या काळासाठी कदाचित सुयोग्य जीवनपद्धती असतील पण आता ते पूर्ण कालबाह्य झालेले आहेत.
उदा: वयाच्या दुसर्या वर्षातच प्ले गॄप ला जाणार्या मुलाच्या बाबतीत मुंज या संस्कारात कितीसा अर्थ उरलाय आता?
मला नेहमी पडणारी एक शंका :
समजा एखाद्या अहिंदूने हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला जात कोणती मिळते? त्याचे गोत्र काय सांगायचे?
अवांतरः मराठीत गर्वाचे घर खाली अशी एक म्हण आहे. असो.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
28 Aug 2009 - 8:07 am | शाहरुख
या गोष्टी फक्त हिंदू धर्मातच सांगितल्या असतील तर हिंदू धर्माचा अमेरिकेत प्रसार होतोय असे म्हणायला हरकत नाही..तसे नसावे असा माझा कोणत्याही वाचनावर आधारित नसलेला अंदाज.
माझ्यामते तरी जगात कोठेही सर्वेक्षण केल्यास असाच ट्रेंड (मराठी ?) दिसेल. लोकांना हळूहळू धर्माची बांधिलकी नको आहे..माझाच धर्म "लै भारी" असे वाटण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे आणि अजुन होत राहील. हिंदू धर्मियांत सर्वेक्षण घेतल्यास त्यांच्यातही असे वाटणार्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसेल असा माझा अंदाज आहे.
अनिवासी भारतीयांचा लोंढा वाढल्याने तर नाही टक्केवारी वर-खाली झाली ? ;-)
28 Aug 2009 - 8:18 am | बिपिन कार्यकर्ते
उत्तम चर्चाविषय. स्वैर रूपांतर आवडले. तुमच्या लेखात / प्रतिसादात वैचारिक खाद्य असतेच. याही लेखात तसे आहेच.
@धनंजय: मला वाटते या लेखाचे दोन पैलू कळीचे ठरू शकतात. एक तर जो तुम्ही म्हणताय तो की, "आज हिंदू धर्म म्हणला की हिंदूनाच फक्त त्यातील (...वाईट गोष्टी...) दिसणार". त्यावरचे तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. पण काही लोकांना हिंदू धर्माची फक्त वाईटच बाजू दिसते अशा लोकांप्रती विकासरावांचा रोख आहे असे वाटते. तसे असल्यास ही टीका अस्थानी ठरत नाही. त्यातूनच दुसरा मुद्दा येतो. जेव्हा काही चांगले बोलले गेले तर त्यावरून मुद्दे / चर्चा / प्रश्नच उकरले जातात. (डिबेट फॉर द सेक ऑफ डिबेट). थोडक्यात सांगायचे तर विकासरावांना स्वतः जे सांगायचे आहे ते असे वाटते, "चांगले तेवढे आनंदाने स्वीकारा, वाईट सोडून द्या अथवा संपवा.... धर्मापुरतेच नव्हे तर एकंदरीत कोणत्याही विचारधारेत."
बिपिन कार्यकर्ते
28 Aug 2009 - 9:25 am | ऋषिकेश
काय योगायोग आहे. हीच बातमी गेल्या आठवड्यात डी.एन.ए मधे आली होती तेव्हा त्यातही याच लेखाचा संदर्भ दिला होता. तेव्हा मी ह्याच विषयावर चर्चाप्रस्ताव टाकणार होतो, पण कामाच्या गडबडीत राहून गेला.
हिंदू धर्माच्या (स्युडो) प्रगतीवरील हा लेख वाचून (खरंतर उगाच) बरं वाटलं आणि (पुन्हा उगाच) मुठभर मांस चढले ;)
असो. आता चर्चा वाचण्यास उत्सूक आहे
ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून २४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हिंदुस्तान हिंदुस्तान आमुचा प्रियकर हिंदुस्तान...."
28 Aug 2009 - 9:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी हिंदू आहे असे सांगायला मी संकोच करीत नाही. धार्मिक विधी कोणत्याही चिकित्सेशिवाय पूर्ण करतो. पण धर्माचे आधार,आचार, नियम, अवडंबरे म्हटले की आवडत्या नावडत्या गोष्टींविषयी मनमोकळेपणाने बोलतो. याचा अर्थ हिंदू धर्माचा द्वेष असतो असा मुळीच नाही. चांगले ते स्वीकारतो वाईट त्यावर तडकून बोलतो .
अवांतर पण सांगतो आमच्या घरातील देवघर देवांनी गच्च भरुन गेले आहे. नमस्कार करुन निघालो की, दिवसभराच्या कामात उत्साह टीकून राहतो. ही झाली आमच्या आनंद, उत्साह, आणि धार्मिकतेची गोष्ट.
दुसरी गोष्ट याच देवघरातल्या एका देवांची गोष्ट आहे. आमचे खापरपणजोबा कुठल्या तरी तिर्थ क्षेत्राला दर्शनाला गेले दर्शन वगैरे झाले आणि येतांना लहान म्हसोबांवजा चार दगडी गोटे त्यांच्या मागे लागले म्हणे, त्यांनी त्या गोट्यांना विहिरीत टाकले, फेकून दिले तरी ते त्यांच्या मागे येतच राहिले. परंपरेने आज ते आमच्या देवघरात शांतपणे बसून आहेत. आता त्यांची आम्ही नित्यनेमाने पुजा करतो, आता सांगा हे जर मी कोणाला सांगितले तर लोकांची काय प्रतिक्रिया राहील !
असो, असे असले तरी, जे चांगले त्याला नमस्कार करावा नै का !
-दिलीप बिरुटे
28 Aug 2009 - 9:44 am | अवलिया
आता त्यांची आम्ही नित्यनेमाने पुजा करतो, आता सांगा हे जर मी कोणाला सांगितले तर लोकांची काय प्रतिक्रिया राहील !
माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या देवावर तसेच तुमच्या कथेवर. खंड पडु देवु नका पूजेत... माझा नमस्कार पोहोचवा. :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 9:47 am | मुक्तसुनीत
लेख रोचक आहे खरा. इथे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
जास्त जास्त अमेरिकन - किंवा पाश्चात्य जगातले लोक - हे दिवसेंदिवस देवाधर्माच्याबाबतीत अनाग्रही, सहिष्णु , विश्वास न ठेवणारे - म्हणजे नास्तिक- बनत चालले असावेत या बद्दलच्या लेखिकेच्या मताशी सहमत होण्यासारखे आहेच. विवेक आणि विज्ञानाच्या वाटेने परंपरागत जन्म-मरण-देव-स्वर्ग-नरक या सगळ्या संकल्पना ढवळून निघत आहेत आणि तुम्ही जितके जास्त विवेकवादी तितके या संकल्पनांकडे relics म्हणुन पहाण्याची प्रवृत्ती बळावते यात मला शंका वाटत नाही.
मात्र या सार्याचा अर्थ , राष्ट्रीय स्तरावर हिंदूधर्माकडे अमेरिकेचा ओढा बनतो आहे हे मला जरा तर्काच्या धाग्याला ताणल्यासारखे वाटले खरे. पुरण्याऐवजी जाळण्याकडे कल आहे हे खरे मानले तर , त्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींपेक्षा आर्थिक गोष्टींशी असला पाहिजे अशी मला (रास्त) शंका आहे. resurrection या बायबलप्रणित संकल्पनेचा पर्याय हिंदुधर्म असला तर आपल्याकडेही कर्मविपाक सिद्धांत , चौर्याएंशी लक्ष योनी वगैरे वगैरे पुनर्जन्मावर आधारित संकल्पना (आणि तज्जन्य गोंधळ ) आहेतच की.
थोडक्यात सांगायचे तर , हिंदु धर्मामधला अमेरिकन - किंवा पाश्चात्यांचा - interest हा एकंदर plurality , peace and co-existence या विभागात मला बसवणे सोपे वाटते. मात्र काही मूठभर धर्मशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांचे विद्वान वगळता, एकंदर जनमानसाचा ओढा हा ख्रिश्चिअॅनिटीच्या कडवेपणापासून , भौतिकवाद-विवेकवाद-नीरीश्वरवाद - म्हणजे पर्यायाने एकंदर ईश्वरी सत्तेच्या विरुद्ध दिशेने होत असावा असे माझे मत आहे...
28 Aug 2009 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे
गर्व से असो कि शरम से असो मुलतः हिंदु असण म्हणजे नेमक काय असणं? असा आम्हाला मुलभुत प्रश्न पडतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
28 Aug 2009 - 9:49 am | यशोधरा
लेख आवडला. आता अमेरिकनांनी स्वतःला हिंदू म्हणायला सुरुवात केल्यावर भारतीय वंशाच्या बर्याच लोकांना हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटणार नाही, अशी आशा करावी का?
28 Aug 2009 - 11:56 am | Nile
"अश्या बर्याच लोकांनी" स्वतःला "हिंदु म्हणवुन" घेतलं तर तुम्हाला अभिमान वाटेल अशी आशा(!) करावी का?
28 Aug 2009 - 9:12 pm | यशोधरा
हो. आशा कशाला? खात्री बाळगा, मला अभिमानच वाटेल. हिंदू लोकांनी स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात काही कमीपणा नाही. हिंदू म्हणवलं जाणं, याचा कोणत्याही धर्माशी/ पंथाशी काहीही संबंध नाही.
28 Aug 2009 - 9:27 pm | निमीत्त मात्र
अहो असं कसं काय? हिंदू हाही एक धर्मच नाही का?
28 Aug 2009 - 10:07 pm | मिसळभोक्ता
हिंदू हा धर्म नाही. ही एक जीवन पद्धती आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. शोधा म्हणजे सापडेल.
-- मिसळभोक्ता
28 Aug 2009 - 10:09 pm | अवलिया
सहमत आहे. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 10:21 pm | विकास
असेच म्हणायचे आहे. हिंदू नावाचा इतर संप्रदायांसारखा संप्रदाय आणि त्या अर्थाने धर्म नाही आहे. केवळ धारयते इति धर्म या अर्थाने धर्म आहे.
28 Aug 2009 - 10:45 pm | निमीत्त मात्र
अर्थातच बाकीच्या धर्मांसारखा नाही म्हणूनच तो एक वेगळा धर्म आहे ना?
म्हणजे तुम्हाला निदान हिंदू हा मूळात धर्मच नाही असे तरी वाटत नाही.
28 Aug 2009 - 11:02 pm | विकास
म्हणजे तुम्हाला निदान हिंदू हा मूळात धर्मच नाही असे तरी वाटत नाही.
मुळात मी वर दिलेल्या व्याख्येत बसेल असा फक्त हिंदू धर्मच आहे बाकी सगळे संप्रदाय आहेत. त्यामुळे तुम्ही हिंदू धर्म आणि इतर संप्रदाय हे एकाच पद्धतीने तोलत आहात.
29 Aug 2009 - 10:10 pm | निमीत्त मात्र
पुन्हा शब्दछल!
म्हणजे हिंदू धर्म आहे पण बाकीचेच धर्म धर्म नाहीत तेही तुमच्या व्याख्येप्रमाणे?
माफ करा पण 'तुम्ही' कोण? शंकराचार्य? असे विचारायचा मोह होतो आहे.
28 Aug 2009 - 10:33 pm | निमीत्त मात्र
तुम्ही म्हंटताय म्हणून शोध घेतला थोडा. हे सापडले..
In 1995, while considering the question "who are Hindus and what are the broad features of Hindu religion", the Supreme Court of India highlighted Bal Gangadhar Tilak's formulation of Hinduism's defining features
"Acceptance of the Vedas with reverence; recognition of the fact that the means or ways to salvation are diverse; and the realization of the truth that the number of gods to be worshipped is large, that indeed is the distinguishing feature of Hindu religion. "
दोन्ही ठीकाणी रिलिजन असे स्पष्ट लिहिलेले आहे.
तसेच डिक्शनरी.कॉम वरती रिलिजनची शब्दाची ही व्याख्या दिलेली आहे.
a specific fundamental set of beliefs and practices generally agreed upon by a number of persons or sects: the Christian religion; the Buddhist religion.
तेव्हा हिंदू हा काही धर्म नाही म्हणण्यात काय हशील आहे?
28 Aug 2009 - 10:44 pm | यशोधरा
थोडं मागे जाऊयात १९९५ च्या..
The word Hindu first appeared in the Old Persian language which was derived from the Sanskrit word Sindhu, the historic local appellation for the Indus River in the northwestern part of the Indian subcontinent. The usage of the word Hindu was further popularized by the Arabic term, al-Hind, referring to the land of the people who live across river Indus.
By 13th century, Hindustan emerged as a popular alternative name of India, meaning the "land of Hindus". Towards the end of the 18th century, the European merchants and colonists referred collectively to the followers of Dharmic religions in Hindustan — which geographically referred to most parts of the northern Indian subcontinent — as Hindus. Eventually, any person of Indian origin who did not practice Abrahamic religions came to be known as a Hindu, thereby encompassing a wide range of religious beliefs and practices.
One of the accepted views is that ism was added to Hindu around 1830 to denote the culture and religion of the high-caste Brahmans in contrast to other religions. The term Hinduism was soon appropriated by the Hindus in India themselves as they tried to establish a national, social and cultural identity opposed to European colonialism in India.
आता युरोपिअन लोकांनी त्यांच्या समजूतीप्रमाणे जे मानले तेच शिरोधार्य असेल, तर काहीच म्हणणे नाही. त्यांआ जसे सोयीचे होते, तसे त्यांनी मानले, म्हणून हिंदूना त्यांचा यथायोग्य इतिहास माहित नसण्याचे काहीच कारण नाही!
28 Aug 2009 - 10:57 pm | निमीत्त मात्र
पण मग सुप्रिम कोर्टाचे काय? मी दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा..
तसेच लोकमान्य टिळक? ते तरी युरोपियन लोकांना शिरोधार्य मानत नसावेत.
आणिक हिंदू नावाच्या धर्माला युरोपियनच नाही तर ब्राह्मण लोकांनी देखिल मान्यता दिली आहे असेही वरील लेखनातुन समजते.
28 Aug 2009 - 11:02 pm | मिसळभोक्ता
हे वाच रे:
'Hindutva' is used as Synonym of Indianisation: Supreme Court Judgement
The Supreme Court in the course of deciding an appeal in an election
petition, has interpreted the meaning of 'Hindutva' and 'Hinduism' as a
"synonym of 'Indianisation' -- i.e. development of uniform culture by
obliterating the differences between all all cultures co-existing in the
country."
The unanimous judgement given by the three-judge bench consisting of
Justices J.S. Verma, N.P. Singh and K. Venkataswami, on December 11, 1995,
has quoted earlier Supreme Court judgements and opinions of Dr. S.
Radhakrishnan, Dr. Toynbee and others in coming to the conclusion that
Hinduism represented a way of life. The appeal no. 2836/1989 was filed by
Dr. Ramesh Yashwant Prabhoo, a Shiv Sena candidate, against a judgement of
the Bombay High Court which had set aside his election under Section 123
(3 & 3a) of the Peoples Representation Act holding him guilty of use of
religion in his election campaign.
The interpretation given by the Constitution Bench is a constitutional as
well as a political landmark in which Justice J.S. Verma, writing on
behalf of the Bench, discussed the meaning of 'Hindutva' and 'Hinduism'.
-- मिसळभोक्ता
28 Aug 2009 - 11:09 pm | यशोधरा
>>मी दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा..
LOL! मी दिलेली माहिती नीट वाचलीत?
हिंदू ह्या शब्दाची उत्पती आणि मूळ अर्थ काय आहे ते, आणि नंतर त्याचा अर्थ, अपभ्रंश कसा झाला, हेही त्यात आहे. असो. तोच तोच मुद्दा काय बोलायचा? मिसळभोक्ता ह्यांनी दिलेली माहितीही वाचा.
29 Aug 2009 - 10:43 pm | श्रावण मोडक
तुम्ही दिलेल्या उद्धृतात रिलिजन हा शब्द दोन्ही ठिकाणी अवतरणांमध्ये आलेला आहे. हा संदर्भ कुठला आहे? तेव्हा अवतरणातील म्हणणे सुप्रीम कोर्टाचे आहे असा त्याचा अर्थ होत नाही. सुप्रीम कोर्टाने कोणाला तरी उद्धृत केले आहे तिथे. ते श्रेय/अपश्रेय त्यांचेच.
टिळकांनी केलेली हिंदुत्व या कल्पनेची रचना सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे का? की केवळ तिच्यावर भर देत/ती अधोरेखीत करीत पुढे ती खोडून काढली आहे? तेही जरा स्पष्ट केलेत तर उत्तम होईल.
खाली एके ठिकाणी पाचव्या वेदाचा शोध मी दाखवून दिला आहे. अशा चुका असू शकतात हे ध्यानी यावे यासाठी हे लिहितोय.
29 Aug 2009 - 12:08 am | Nile
कोणी स्वतःला काय म्हणावं ह्याकडे निर्देश नसुन, आधी स्वतःला हिंदु म्हण्वुन घ्यायला लाजणारे आता (इतरांचे अनुकरण करुन) स्व्तःला हिंदु म्हणवुन घेत आहेत आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहे/वाटतो ह्याकडे आहे.
29 Aug 2009 - 12:48 pm | यशोधरा
मला जे म्हणायचे होते त्याचा कृपया विपर्यास करु नका. मला एवढेच सुचवायचे होते की निदान, आता (जेव्हा) पाश्चात्यांकडून 'हिंदू' पणाची भलावण सुरु झाली आहे, तेह्वा पाश्चात्य वाक्यं प्रमाणम् वाल्यांना पण ह्यात काही अर्थ आहे असे दिसू लागेल. मुळातच तुम्ही चुकीचा अर्थ काढला आहे, किंवा मला योग्य रीतीने लिहिता आले नसेल. असो.
आणि मला अभिमान वाटेल की ह्याचबद्दल तुम्हांला जाणून घ्यायचेच असेल, तर मी म्हणेन, की बहुत देरसे का होईना, पण बर्यापैकी दुरुस्त आनेको सुरुवात हो गयी की! : )
28 Aug 2009 - 11:27 am | स्वाती दिनेश
विकास,
लेख आवडला,
स्वाती
28 Aug 2009 - 12:10 pm | दत्ता काळे
त्यावरच्या प्रतिक्रिया देणार्यांचे विचारही आवडले. मी स्वतः डॉ.बिरूटे ह्यांच्याशी सहमत आहे.
पण हे नक्की कि, धर्म, जातपात इ. बाबतीत अती टोकाची भूमिका ( आस्तिकवादाच्या बाबतीत बोलायचे झाले तर सनातनी / कर्मठ /आग्रही आणि नास्तिकवादाच्या बाबतीत अगदी त्याच्या विरुध्द - म्हणजे सर्व प्रकारच्या धार्मिक बाबींची - अगदी पूर्वांपार चालत आलेल्या रितीरीवाजांपासून ते थेट आत्तापर्यंत 'जमेल तसे' देवधर्माचे करणे- इत्यादींची पायमल्ली करणे ) हि सामान्यपणे कुणालाच पटत नाही.
श्री. विकास ह्यांचा लेख वाचल्यावर असा मनात प्रश्न आला आहे कि, ओम् हा हिंदुत्ववाद आणि अध्यात्मवाद ह्यांना जोडणारा दुवा आहे कां ?
28 Aug 2009 - 12:16 pm | sneharani
लेख आवडला
28 Aug 2009 - 2:37 pm | अभिज्ञ
लेख आवडला.
चर्चा वाचण्यास उत्सुक.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
28 Aug 2009 - 2:40 pm | अवलिया
विकास भौ.... लेख आवडला. चर्चा वाचण्यास उत्सुक.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 4:23 pm | लिखाळ
लेख आणि चर्चा आवडली.
आपण मग का कमी पडतो?
आपण म्हणजे कोण? कमी कुठे पडतो? मला समजले नाही.
-- लिखाळ.
आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो. ;)
28 Aug 2009 - 7:31 pm | विकास
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार. प्रतिसादात अनेक उपस्थित झालेत त्यांचे माझ्या लेखी उत्तरे देयचा प्रयत्न करतो.
धनंजय - भारताबाहेरचे लोक भारताबद्दल चांगले बोलतात तेव्हा चांगले वाटते.
हा उद्देश नक्कीच नव्हता. केवळ कोणी बाहेरील व्यक्तीने (विशेष करून अमेरिकन, बुद्धीवादी आदी) यांनी सांगितल्यावरच हिंदू धर्माला सर्टीफिकेट मिळाले असे वाटत नाही. तशी गरजही नाही.
धनंजय - लोक हिंदू धर्माबद्दल कधीच चांगले बोलत नाहीत, आणि नेहमी वाईट बोलतात हा बहुधा पूर्वग्रह आहे.
अजिबात नाही. चांगले बोलणे म्हणजे "गुडी गुडी" बोलणे अथवा "गर्वसे कहो" असे होत नाही. किंबहूना ते दुसरे टोक झाले.
धनंजय - कित्येक "स्युडो-सेक्युलर" आमदार-खासदार साधुबुवांकडे जाऊन निवडणुकीपूर्वी (रडीच्या खेळासाठी) प्रसाद वगैरे घेतात, त्याचे फोटो प्रसिद्ध करतात.
माझ्या लेखी त्यातील काही "स्युडो-सेक्युलर" असतील पण बरेचसे "स्युडो-हिंदू" असतात. बुवाबाजी आणि तत्सम कर्मकांडे म्हणजे हिंदू धर्म नाही पण तसे त्याचे चित्रिकरण झालेले आहे. आणि तोच भाग या लेखात मला दिसला नाही. त्यांच्या लेखी हिंदू धर्म म्हणजे सर्वांना समान वागवणारे तत्वज्ञान आहे. थोडक्यात नीरक्षिर बुद्धीने त्यातील पाणी वेगळे करून जे चांगले दिसते तितकेच. ते इतर धर्मांच्या बाबतीत शक्य होत नाही का? तर होऊ शकते. ख्रिश्चन संप्रदायातील करूणा आणि सेवा जरी हिंदू तत्वज्ञानात दिसली तरी त्याचे व्यावहारीक जगात वापरणे ख्रिस्ती धर्मियांना जास्त शिकवले गेले आणि त्यांच्याकडून आत्मसातही केले गेले. (जरी त्याचा गैरवापर ही खूप केला गेला असला तरी). पण एकंदरीत हे पुस्तकी संप्रदाय आहेत आणि एका विशिष्ठ संस्थात्मक पद्धतीने चालत असल्याने तेथे स्वतंत्र मनाला अडकल्या सारखे होते. हिंदूंच्या बाबतीत एक सत्य आहे आणि ते अनेक पद्धतीने सांगता येते आणि "जसा स्वभाव जो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडला जीव, जशी श्रद्धा तसाची तो" या पद्धतीने प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी त्यात गैर समजले गेलेले नाही. हा मोठेपणा पण आहे आणि मर्यादा पण.
काळा डॉन - मिपावर तुझे लेख वाचणे म्हणजे मला मेंदूला धुवायला टाकल्या सारखे वाटते.
मी कुठलीही गोष्ट ब्रेन वॉशिंगसाठी लिहीत नाही. मला वैविध्य आवडते. सर्वच एकसारखे असले तर बोअर होईल. तसे असते तर येथे आलो असता का? :-)
शहारूख: या गोष्टी फक्त हिंदू धर्मातच सांगितल्या असतील तर हिंदू धर्माचा अमेरिकेत प्रसार होतोय असे म्हणायला हरकत नाही..तसे नसावे असा माझा कोणत्याही वाचनावर आधारित नसलेला अंदाज.
एकम सत हा प्रकार केवळ हिंदू धर्मातच आहे. केवळ हिंदू तत्वज्ञानात "ऑल्सो" म्हणतात इतरत्र "ओन्ली".
शहारूख - लोकांना हळूहळू धर्माची बांधिलकी नको आहे..माझाच धर्म "लै भारी" असे वाटण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे आणि अजुन होत राहील. हिंदू धर्मियांत सर्वेक्षण घेतल्यास त्यांच्यातही असे वाटणार्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसेल असा माझा अंदाज आहे.
मान्य आहे. योगसाधना आणि कर्मकांडविरहीत तत्वज्ञान हे हिंदू धर्मात सहज साध्य होऊ शकते असे त्यामुळे अशा लोकांना वाटत असावे.
बिका: थोडक्यात सांगायचे तर विकासरावांना स्वतः जे सांगायचे आहे ते असे वाटते, "चांगले तेवढे आनंदाने स्वीकारा, वाईट सोडून द्या अथवा संपवा.... धर्मापुरतेच नव्हे तर एकंदरीत कोणत्याही विचारधारेत."
अगदी बरोबर.
प्रा. बिरूटे - पण धर्माचे आधार,आचार, नियम, अवडंबरे म्हटले की आवडत्या नावडत्या गोष्टींविषयी मनमोकळेपणाने बोलतो. याचा अर्थ हिंदू धर्माचा द्वेष असतो असा मुळीच नाही.
असेच असावे. टिका करायला कोणी नाही म्हणत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीत जेंव्हा बुद्धीभेद करण्याचा जाणते-अजाणतेपणी प्रयत्न होतो तेंव्हा पटत नाही.
मुक्तसुनीत - हिंदु धर्मामधला अमेरिकन - किंवा पाश्चात्यांचा - interest हा एकंदर plurality , peace and co-existence या विभागात मला बसवणे सोपे वाटते.
अगदी बरोबर आहे आणि सहमत आहे (आपल्या उर्वरीत प्रतिसादाशीही).
प्रकाशरावः हिंदु असण म्हणजे नेमक काय असणं?
ह्याचीच पुढची पायरी म्हणजे घाटपांडे असणे म्हणजे नेमके काय? :-) मराठी असणे म्हणजे नेमके काय? भारतीय असणे म्हणजे नेमके काय? असे ही प्रश्न विचारत आपण जागतिक होण्याचा प्रयत्न करत निव्वळ स्त्री-पुरूष असेच (चांगल्या अर्थाने) भेद ठेवूया. पण तसे होऊ शकेल का?
दत्ता काळे - पण हे नक्की कि, धर्म, जातपात इ. बाबतीत अती टोकाची भूमिका ...हि सामान्यपणे कुणालाच पटत नाही.
अगदी सहमत. फक्त त्यामुळे कधी कधी टिका करणार्याचे अथवा बाजू घेणार्याचे कितीही प्रामाणिक विचार असतील तरी त्याचे परीणाम हे उलट, म्हणून समाजाला घातक होऊ शकतात असे वाटते.
दत्ताकाळे - श्री. विकास ह्यांचा लेख वाचल्यावर असा मनात प्रश्न आला आहे कि, ओम् हा हिंदुत्ववाद आणि अध्यात्मवाद ह्यांना जोडणारा दुवा आहे कां ?
मला तसे वाटत नाही. अर्थात मी काही तज्ञ नाही. किंबहूना हिंदूत्ववाद हा राष्ट्रवादाच्या संदर्भात होता/आहे (जरी त्यातून अनेक उलटे अर्थ काढून अनेकजण वापरत असले तरी), हिंदू धर्म आणि अध्यात्मवाद यांच्यात ओम् समान असू शकतो...
लिखाळः आपण म्हणजे कोण? कमी कुठे पडतो? मला समजले नाही.
आपण म्हणजे जे जन्माने का होईना हिंदू आहेत ते. कमी पडतो म्हणजे दृष्टीकोनात. एक बाजू केवळ त्यातील चुकीच्या कर्मकांडात अडकून पडते, अगदी जातीपातीत ही. म्हणजेच अनिष्ठ प्रथांमधे. दुसरी बाजू त्यावर कितीही योग्य असली तरी टिकाच करत राहते. पण त्यातील चिरंतन आणि तरीही आचरणात आणता येईल अशा तत्वज्ञानाबद्दल मात्र काहीच बोलले जात नाही. आचरणात आणणे तर लांब राहूंदेत. थोडक्यात हिंदू धर्म-तत्वज्ञानाची अवस्था ही कुठे तरी, "जितके मालक तितकी नावे, हृदये जितकी त्याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ, अनाम" अशी आहे असे वाटते.
धन्यवाद.
29 Aug 2009 - 7:50 pm | नितिन थत्ते
>>हा प्रकार केवळ हिंदू धर्मातच आहे. केवळ हिंदू तत्वज्ञानात
हिंदू की वैदिक की सनातन धर्मात/तत्त्वज्ञानात?
नाही... हिंदू म्हणजे काय यावर बराच शब्दच्छल झाला आहे म्हणून विचारतोय.
>>हिंदू धर्म-तत्वज्ञानाची अवस्था ही कुठे तरी, "जितके मालक तितकी नावे, हृदये जितकी त्याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ, अनाम" अशी आहे असे वाटते
निश्चित काहीच सांगितलेले नाही हा तर प्रॉब्लेम नसेल?
>>बुवाबाजी आणि तत्सम कर्मकांडे म्हणजे हिंदू धर्म नाही पण तसे त्याचे चित्रिकरण झालेले आहे.
मग बुवाबाजीवरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरची टीका असे का मानता?
दुसरी बाजू त्यावर कितीही योग्य असली तरी टिकाच करत राहते ही दुसरी बाजू हिंदूंवर/हिंदू धर्मावर टीका करीत नाहीये असे तुम्ही का समजत नाही .
नितिन थत्ते
29 Aug 2009 - 8:38 pm | बिपिन कार्यकर्ते
मी (माझ्याच मते) एक अज्ञानी माणूस आहे. तरीही मला हे वाक्य जरा खटकलेच. भावनिकदृष्ट्या नव्हे तर वैचारिकदृष्ट्या. मला जे काही हिंदू (म्हणजेच प्राचीन भारतिय) तत्वज्ञानाबद्दल माहिती आहे थोडेफार अथवा जे काही मी ऐकले आहे थोडेफार, त्यावरून तरी या तत्वज्ञानात निश्चित असे काही सांगितले नाहीये हे विधान मला चक्रावून गेले. थत्त्यांनी यावर अधिक प्रकाश टाकावा किंवा एखादा नवीन धागा टाकून थोडे अधिक विवेचन करावे अशी माझी त्यांना विनंति आहे. शिवाय, हे विधान काही विशिष्ट अभ्यासाद्वारे बनवलेल्या मताद्वारे केले आहे का? हेही समजून घ्यायला आवडेल.
याचे कारण हे तर नसावे, की ही जी टीका चालते ती जे लोक हिंदू धर्माच्या आवरणाखाली अथवा हिंदू धर्माशी संबंधित असल्याचे दाखवून गैर कृत्ये करतात त्यांच्यावरच होते? जे लोक इतर काही धर्मांच्या आवरणाखाली असे करतात तिथे ही टीका फारशी दिसत नाही. एक साधे उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी, मूळ विदेशी असलेल्या परंतु भारतात केलेल्या समाजसेवेमुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या एका थोर इ. व्यक्तिचे निधन झाले. नंतर त्या व्यक्तिच्या धर्मातील लोकांनी त्या व्यक्तिला संतपद बहाल करण्याबाबत त्या धर्माच्या प्रमुखांकडे मागणी केली आणि तशी कारवाई सुरू झाली. आता, त्या धर्माच्या नियमांप्रमाणे, ज्या व्यक्तिला संतपद बहाल करायचे आहे त्या व्यक्तिने केलेल्या कमीत कमी दोन चमत्कारांचे सिध्द होणे गरजेचे असते. आणि त्या प्रमाणे बरेच लोक पुढे आले. ही कारवाई अजूनही बहुतेक चालू आहे. या चमत्कारांत, साहजिकच, काही अनैसर्गिक घटनांचा समावेश आहे. पण किंचितही कुठूनही कोणाहीकडून काहीही विरोधाचा सूर आलेला नाही.
धर्माच्या नावाखाली बुवाबाजी, अनिष्ट प्रथा, लुबाडणूक, पिळवणूक चालतेच. त्यात काहीच संशय नाही आणि त्या विरूध्द आवाज उठवायलाच पाहिजे. त्रिवार सत्य. पण जिथे मऊ लागतंय तिथेच खणलं जातंय हा समज जर लोकांच्या मनात असेल (भले तो गैर असेल) तर तो हटवणे, विचारातून आणि महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून, हे महत्वाचे नाही का? मग वरच्या प्रमाणे प्रश्न वगैरे पडणार नाहीत.
बिपिन कार्यकर्ते
29 Aug 2009 - 8:52 pm | यशोधरा
अनुमोदन बिपिनदा.
ह्याच विदेशी संत व्यक्तीच्या कार्यपद्धतीबद्दल श्री अरुण शौरी ह्यांचे पुस्तक जरुर वाचण्यासारखे आहे! ते वाचल्यावर ह्या व्यक्तीच्या संतपणाची आणि निव्वळ "समाजसेवा " म्हणून केलेल्या कामाची पांघरलेली झूल किती बेगडी आहे/ होती, हे लक्षात येते.
29 Aug 2009 - 9:13 pm | नितिन थत्ते
दुसर्याभागाचे उत्तर धनंजय यांनी दिले आहे. मदर तेरेसांच्या संतपदाच्या निमित्ताने जे चालू आहे ती ऑफिशिअल गोष्ट चालू आहे. त्या गोष्टीमुळे त्यांना प्रत्यक्ष जीवनात संत मानले जाण्यात काही फरक पडत नाही. (भीमसेन जोशींना भारतरत्न दिले की नाही यावर त्यांची थोरवी ठरत नाही). त्यांना संतपद द्यावे म्हणून भारतातल्या अंनिस किंवा तत्सम लोकांनी वॅटिकनसमोर जाऊन आंदोलन करावे (किंवा टीका करावी) ही अपेक्षा हास्यास्पदच आहे.
(चमत्कार केला असेल तरच संत मानावे असे वॅटिकनचे समर्थन करणारे आमच्यातले* कोणी आपल्याला भेटले आहेत काय?)
पहिल्या भागाविषयी:
सांख्यांनी, वैशेषिकांनी, अद्वैतवाद्यांनी वगैरे वेगवेगळे आणि निश्चित असे काही सांगितले होतेच. पण त्यातील अमूकच बरोबर असे न ठरल्यामुळे हिंदूंचे तत्त्वज्ञान म्हणजे नक्की काय असा प्रश्न निर्माण होऊन 'कुणी न ओळखे तरीही याला' असे झाले असेल का असे मला म्हणायचे होते
*आमच्यातले = हिंदूंच्या(च फक्त) रूढींवर टीका करणारे
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Aug 2009 - 9:29 pm | बिपिन कार्यकर्ते
थोडा गोंधळ होतो आहे का आपला? नाही म्हणजे,
जर का एखाद्या व्यक्तिला अंधश्रध्देचा फायदा होत असेल तरच टीका करावी असे काही आहे का? जर का उद्या एखाद्या मृत व्यक्तिबद्दल एखाद्या समूहाने त्या व्यक्तिने केलेले चमत्कार, त्यायोगे त्या व्यक्तिची थोरवी आणि संतत्व वगैरे बद्दल खूप काही असे मांडले तर त्यावर अंनिस (हे नाव तुम्ही घेतले आहेत, ते मी एक प्रतिक म्हणून वापरतोय) अथवा तत्सम मंडळी काहीही आक्षेप घेणार नाहीत? व्यक्ति मृत झाली तर निगडित अंधश्रध्दा या दखल घेण्याच्या लायकीच्या राहत नाहीत का?
वॅटिकनसमोर जाऊन निदर्शने करणे वगैरे कोणी म्हणले आहे? माझे म्हणणे फक्त इतकेच, की एका गावात केवळ गंमत म्हणून चालणारी शिविगाळी सारख्या अनिष्ट पण परंपरेने चाललेल्या प्रथांना, केवळ त्या परंपरागत आहेत म्हणून त्याविरूध्द अगदी खूप मोठी राळ उडवणार्या लोकांना, एका जागतिक चर्चेत असलेल्या असल्या प्रकारात तोंडही उघडावे वाटले नाही. गेला बाजार, एखादे पत्रक किंवा कुठे भाषणात वगैरे उल्लेख वगैरे काहीच नाही. निदर्शने वगैरे जाऊच द्या हो. आता तुम्हीच ठरवा हास्यास्पद आहे का नाही.
बिपिन कार्यकर्ते
30 Aug 2009 - 11:31 am | नितिन थत्ते
तुमचाच गोंधळ होतोय.
१. शिवीगाळीच्या रूढीला विरोध करणे अजिबात आवश्यक नाही असे मी तरी माझ्या त्या धाग्यावरील प्रतिसादात लिहिलेच होते.
२. मदर तरेसांनी चमत्कार केले म्हणून त्या संत होत्या असे म्हणून जर पुढे त्यांचे स्तोम माजवले (त्यांच्या सेवाकार्याबद्दल फारसे न बोलता) तर निश्चित आक्षेप घ्यायला हवा. तो अंनिसने घ्यावा असे माझे मत आहे.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Aug 2009 - 8:44 pm | विकास
हिंदू की वैदिक की सनातन धर्मात/तत्त्वज्ञानात?
हिंदू धर्मातील सर्व तत्वज्ञानात (कर्मकांडात नव्हे) - त्यात वैदीक आणि सनातन सगळेच आले.
हिंदू म्हणजे काय यावर बराच शब्दच्छल झाला आहे म्हणून विचारतोय.
भारतीय संस्कृतीतून तयार झालेल्या एकूण सर्वच तत्वज्ञानास परकीयांनी सिंधू-हिंदू वगैरे विविध पद्धतीने जे उच्चार होतात (जसे अनेक ठिकाणी "ज" चा उच्चार "ह" होतो) त्यामुळे म्हणायला सुरवात झाली. आजही अनेक जण भारतातील लोकांना "हिंदू"च म्हणतात असा प्रत्यक्ष अनुभव आहे. या अर्थाने "हिंदू" हा परकीय नजरेतून स्वतःची ओळख करून देणारा जरी शब्द असला तरी जसा "इंडीया" हा परकीय शब्द आपण मनाने आणि घटनेने/कायद्याने आपला केला तसाच "हिंदू" शब्दाचे आहे. त्यामुळे आपण म्हणत असलेल्या शब्दच्छलाचा येथे काही संबंध नाही.
निश्चित काहीच सांगितलेले नाही हा तर प्रॉब्लेम नसेल?
नाही आहे. अभ्यास केला तर समजेल.
मग बुवाबाजीवरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरची टीका असे का मानता?
बुवाबाजी हिंदू धर्मात आली आहे आणि त्यावर (हिंदूधर्मातील बुवाबाजीवर) टिका होणे महत्वाचे पण याचा उलट अर्थ "हिंदू धर्म म्हणजे बुवाबाजी" असे करणे चुकीचे आहे. ते होताना दिसते. एक वेगळे उदाहरण - कॅथलीक चर्चेस मधे अमेरिकेत ६०-७० च्या दशकापासून (रेकॉर्डेड आणि अजून हयात असलेले) अनेक जण मिळाले - ज्यातील पाद्र्यांनी अनेक लहानमुलांवर लैंगिक अत्याचार केले. बॉस्टन आणि कॅलीफोर्नियात विशेषकरून ह्या गोष्टी या दशकाच्या सुरवातीस बाहेर येऊ लागल्या. त्याचा श्रद्धाळू लोकांना धक्का बसला. (कॅथलीक नसलेले) अश्रद्ध आणि इतरांनाही बसला. त्यावर टिका झाली. त्या पाद्र्यांना शिक्षा झाली वगैरे... मात्र त्या बुवाबाजीवरून श्रद्ध-अश्रद्ध कोणीच ख्रिश्चॅनिटीवर वाटेल ती टिका केली नाही. (बर्याचदा होणारी टिका ही त्यातील श्रद्धेपेक्षा संस्थात्मक राजकारणाशी संबंधीत असते).
29 Aug 2009 - 1:27 pm | Nile
धनंजय आणि मुक्तसुनित यांच्याशी सहमत.
या अनुषंगाने काही विचार मनात आले ते खालील प्रमाणे.
१. हिंदु धर्म हा त्यामानाने बराच विकसित धर्म आहे, अनेक वर्षं व विचारवंतांच्या मुळे यात अनेक सुधारणा वेळोवेळी झाल्या आहेत तसेच काही प्रमाणात(?) भेसळ्ही झाली आहे. अनेकांची मानसिकता ही "जे धर्मात (म्हणजे नक्की कुठे हा पुन्हा वादच अहे) सांगितलं आहे ते शिरसावंद्य" अशी असते, अनेकदा सुयोग्य टिकेला "धर्मांध आहात" इ. वळण देउन 'इश्यु केला जातो.
२. हिंदु धर्मा इतक्याच जुन्या धर्मांमध्ये असे अनेक मार्ग नाहीत?
३. आपल्या इतिहासात असमान वागणुकीची अनेक उदाहरणं आहेत असं मला वाटतं यावरुन समान वागणुक तत्वज्ञान हे जर कालानुरुप आत्मसात केलेलं आहे असं म्हणलं तर जास्त योग्य होईल?
29 Aug 2009 - 7:09 pm | नितिन थत्ते
सर्वोच्च न्यायालयाने (मुळात टिळकांनी) हिंदुत्वाच्या व्याख्येत
हे तीन निकष दिले आहेत. (वर दिलेल्या माहितीवर विसंबून लिहिले आहे)
या व्याख्येनुसार मी लोकांकडून हिंदू म्हणवल्या जाणार्या पालकांच्या पोटी जन्माला आलो असलो तरी
(कायदेशीर दृष्ट्या) हिंदूच नाही. त्यामुळे गर्वसे काही म्हणण्याचा प्रश्न येत नाही.
टीकेचे म्हणावे तर माझ्या आसपास राहणार्या लोकांच्या श्रद्धांमुळे त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांचे नुकसान होताना दिसत असल्याने टीका करणारच. 'कोणाच्या श्रद्धांवर टीका' याबाबत धनंजयशी सहमत.
एखाद्या प्रश्नाच्या मुळावर घाव घालणे चांगले असे मानत असल्याने या श्रद्धा जेथून उद्भवतात त्या धर्म या कल्पनेपासून टीका सुरू करणारच.
एकूण लेखाचा रोख आम्ही असले गर्वसे कहो टाइपचे लेख लिहित राहणार पण तुम्ही मात्र टीका करणे सोडा असा आहे.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Aug 2009 - 7:28 pm | निमीत्त मात्र
अतिशय सुंदर प्रतिसाद थत्ते! मी माझ्या प्रतिसादात वरील निकष स्पष्ट दिलेले असताना, कुणा शिवसेनेच्या उमेदवाराने प्रचारातील आरोप मागे घेण्यासाठी काढलेल्या कायदेशीर पळवाटेला मिसळभोक्ता ह्यांनी पुढे केले. हिंदू धर्म आहे की लाईफ स्टाईल आहे असले निरर्थक शाब्दिक छल करत मूळ मुद्द्याला बगल द्यायचे हे बर्याचदा दिसून येते.
सुप्रिम कोर्टाच्या (टिळकांनी दिलेल्या) हिंदुत्वाच्या व्याख्येत कुठेही भारतीय संस्कृतीशी बांधला गेलेला तो हिंदू अशी व्याख्या केलेली नाही. हिंदुत्व हा धर्म नसुन ही निव्वळ एक ओळख (आयडेंटीटी) असेल तर मुसलमान-हिंदू, ख्रिश्च्नन-हिंदू असे लोक का बरे दिसत नाहीत? मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक हे वर दिलेले ३ निकष कधीच मान्य करणार नाहीत आणि त्यांनी का करावेत? हिंदुत्व म्हणजे निव्वळ प्रखर राष्ट्राभिमान, संस्कृतीचा अभिमान असे ठसवुन देण्यामागे एकच हेतू दिसतो तो म्हणजे इतर धर्मियांमधे हे गुण नाहीत. वरती काळा डॉन ह्यांनी (कदाचीत अनवधानाने) म्हंटल्याप्रमाणे हा सिस्टमॅटीक ब्रेन वॉशींगचाच प्रयत्न आहे.
हे अगदी १००% खरे आहे.
29 Aug 2009 - 8:19 pm | विकास
सर्वोच्च न्यायालयाने (मुळात टिळकांनी) हिंदुत्वाच्या व्याख्येत
टिळकांनी हिंदूत्वाची मुळात व्याख्या केली ही मला नवीनच माहीती आहे. अधिक माहीती/तपशील/संदर्भ मिळाला तर आवडेल - टिळक आणि हिंदूत्व याचा तसेच आपण जे काही वेदप्रामाण्य वगैरे वर लिहीले आहे त्यासंदर्भातही...नाहीतर आपल्या वरील विवेचनात तॄटी आहेत असे समजावे.
माझ्या माहीतीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी हिंदूत्वाची व्याख्या आणि संकल्पना तयार केली. आणि तसा ही ह्या लेखाचा/चर्चेचा विषय हा हिंदूत्व नसून हिंदू धर्म आहे. त्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
एकूण लेखाचा रोख आम्ही असले गर्वसे कहो टाइपचे लेख लिहित राहणार पण तुम्ही मात्र टीका करणे सोडा असा आहे.
तुम्हाला तसे वाटत असेल तर वाटूंदेत. माझा तसा उद्देश नाही. टिका करताना अभ्यासपूर्ण करा. मात्र त्या उद्देशाने पण हा लेख नव्हता. बाकी कशाबद्दल आहे ते आधी लिहून झाले आहे.
29 Aug 2009 - 8:42 pm | नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादातच मी 'वर दिलेल्या माहितीवर विसंबून' लिहिले आहे त्यामुळे ती व्याख्या टिळकांनी केली की अजून कुणी हे माहिती नाही. सध्या आपण सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेली व्याख्या असे म्हणू. कारण ती व्याख्या कोणी केली हे माझ्या प्रतिसादासाठी मुळीच महत्त्वाचे नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Aug 2009 - 8:48 pm | विकास
माझ्या प्रतिसादातच मी 'वर दिलेल्या माहितीवर विसंबून' लिहिले आहे त्यामुळे ती व्याख्या टिळकांनी केली की अजून कुणी हे माहिती नाही.
मग तुमच्या माहीतीत नक्कीच तृटी आहे. टि़ळकांचा आणि हिंदूत्वाचा संबंध नाही. तसेच त्यातील वेदप्रामाण्य वगैरे जे काही आपण मुद्दे लिहीले आहेत त्यांचा आणि सुप्रिमकोर्टाचा शाब्दीक संबंध दिसत नाही
29 Aug 2009 - 9:59 pm | नितिन थत्ते
निमित्तमात्र यांनी लिहिलेल्या प्रतिसादावरून लिहिले होते. त्रुटी असेलही.
नवी माहिती: त्रुटी नसावी कारण
http://www.hindubooks.org/scj/ch18.htm
या दुव्यावर रमेश प्रभू खटल्याचे निकालाचे टेक्स्ट आहे. (ते डॉक्टर्ड नसेल तर सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे टिळकांनी गीतारहस्यात ही व्याख्या केली आहे. (reverence to Vedas याचा वेदप्रामाण्य असा अर्थ मी केला आहे.)
नितिन थत्ते
29 Aug 2009 - 10:07 pm | निमीत्त मात्र
धन्यवाद थत्ते! तुम्ही लिहिलेले तृटी 'असेलही' असे विधान विचारांचा समतोल दाखवते. मीही तसेच म्हणतो. तृटी 'आहेच' म्हणणारे मात्र तो समतोल दाखवत नाहीत.
29 Aug 2009 - 10:33 pm | श्रावण मोडक
As Dr. Radhakrishnan has observed: "The Hindu civilization is so called, since its original founders or earliest followers occupied the territory drained by the Sindhu (the Indus) river system corresponding to the North-West Frontier Province and the Punjab. This is recorded in the Pig Veda, the oldest of the Vedas, the Hindu scriptures which give their name to this period of Indian history, The people on the Indian side of the Sindhu were called Hindu by the Persian and the later western invaders" (The Hindu View of Life by Dr. Radhakrishnan, p. 12). That is the genesis of the word Hindu.
थत्ते यांनी दिलेल्या दुव्यावर गेलो तर तिथं हा पाचवा वेद सापडला. आता आली का पंचाईत? याचा दुवा मिळेल का कुठं? :)
29 Aug 2009 - 9:59 pm | निमीत्त मात्र
हा तर विनोदच आहे. गितारहस्य लिहिलेल्या टिळकांचा आणि हिंदुत्वाचा संबध नाही?
बाकी तूर्तास हिंदू धर्म म्हणजे काय त्या विषयी इथे सविस्तर वाचा:
http://www.omnipelagos.com/entry?n=hinduism
सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या हे त्यांचे हिंदू धर्मावरील वैयक्तिक मत आहे. ह्याच अर्थ ते जे म्हणतात तो हिंदू धर्म नव्हे.
29 Aug 2009 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते
विकास यांची आजवरची जालिय वाटचाल पाहता हे वाक्य पटत नाही. किंवा उपरोक्त लेखात तसे कुठेच जाणवलेही नाही.
बिपिन कार्यकर्ते
29 Aug 2009 - 9:55 pm | नितिन थत्ते
>>विकास यांची आजवरची जालिय वाटचाल पाहता हे वाक्य पटत नाही
असहमत.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
29 Aug 2009 - 10:34 pm | निमीत्त मात्र
वाटचाल पाहिली. तीव्र असहमत!
29 Aug 2009 - 9:55 pm | कालिन्दि मुधोळ्कर
>>एकूण लेखाचा रोख आम्ही असले गर्वसे कहो टाइपचे लेख लिहित राहणार पण तुम्ही मात्र टीका करणे सोडा असा आहे.
१००% बरोबर बोललात.
अगदी अचूक!
29 Aug 2009 - 10:32 pm | तेन्नालीराम
विकासराव,
आपला लेख आवडला. हा दुवा मी वाचला होता पण तुमचे परीक्षण वाचेपर्यंत तितका अपील झाला नव्हता. आताच डोक्यात ट्यूब पेटली.
धर्म या विषयावरचे माझे वाचन तुटपुंजेच आहे तरी कांहीं चुकीचे असल्यास क्षमस्व व कृपया जरूर दुरुस्त करावे.
मी असे वाचले आहे कीं जे धर्म जेरुसलेममध्ये उगम पावले ते सर्व धर्म त्यांनी सांगितलेलाच "देव"च खरा आहे असे मानतात आणि बाकीचे देव हे देव नाहींत व त्यांना भजणे चुकीचे आहे अशी शिकवण देतात. ख्रिश्चन व मुस्लिम मित्रांशी बोलताना व वाचनावरून असे आहे असे वाटते पण ज्यू धर्मही तसंच सांगतो का याबद्दल खात्री नाही. (माझे कोणीही ज्यू मित्र नाहीत.) याबद्दल कुणी सांगेल कां?
फक्त हिंदु धर्मच हे मान्य करतो कीं देव एक नसून अनेक (३३ कोटी) आहेत व शिवाय ब्रह्मदेव निर्मिणारा (creator), विष्णु सांभाळणारा (savior or who maintains) व शिव संपवणारा (destroyer) अशी कामाची रीतसर विभागणीही आहे. सगळेच देव आपल्याला चांगल्या रस्त्यावर नेतात असे हिंदु धर्म सांगतो. म्हणूनच आपला धर्म सहिष्णू समजला जातो. मग तो का लोकप्रिय नाही?
मी तूलनात्मकपणे हमखासपणे सांगू शकत नाहीं पण इतर धर्मांपेक्षा हिंदुधर्मात rituals जास्त असतात का? त्यामुळे आपला धर्म हास्यास्पद होतो का?
इतर धर्मातही उपजाती आहेत, पण हिंदु धर्माला वाईट नाव मिळायला चातुर्वर्णाचे खूप योगदान असावे असे वाटते. त्याचे एका बाजूने बरेच निर्मूलन झाले आहे पण आता विरुद्ध दिशेने चातुर्वर्णाचा प्रसार वाढतोय.
जोवर दोन्ही दिशांचे चातुर्वण्य संपुष्टात येत नाहीं तोवर हिंदु धर्म लोकप्रिय होणे कठीण. स्त्री-पुरुषांना दिलेली समानता असे अनेक चांगले मुद्दे हिंदु धर्माला जास्त गुण मिळवून देऊ शकतात. हे चांगले मुद्दे सांभाळून व चातुर्वणासारख्या वाईट प्रथांचा नि:पात करून आपण आपला धर्म बळकट केला पाहिजे.
चूक-भूल द्यावी-घ्यावी.
ते. रा.
30 Aug 2009 - 7:06 am | शाहरुख
मी भारतीय असण्यासाठी हिंदू असणे गरजेचे आहे का ?
कुठल्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यावा हे न समजल्याने डायरेक्ट मुळ धाग्याला प्रतिसाद देतोय..खरं तर कौल टाकायची इच्छा झाली होती. :-)
(धागा वाचून डोक्यात जाळ झालेला) शाहरुख
30 Aug 2009 - 8:06 am | विकास
मी भारतीय असण्यासाठी हिंदू असणे गरजेचे आहे का ?
अजिबात नाही. मी तसे कुठे म्हणले असे वाटत नाही.
(धागा वाचून डोक्यात जाळ झालेला) शाहरुख
काळजी घ्या, नाहीतर त्यामुळे नंतर डोक्यात राख जाईल :-)
30 Aug 2009 - 8:16 am | तेन्नालीराम
अजीबात नाहीं. असे आपण विचारताच कामा नये.
भारतियाने भारताशी (आणि फक्त भारताशी) १०० टक्के एकनिष्ठ असले पाहिजे व भारताच्या हितापेक्षा दुसरे काहीही श्रेष्ठ नाही यावर त्याचा विश्वास असला पाहिजे.
नोकरी, कुटुंब, ऐश्वर्य, धर्म, जात असल्या वैयक्तिक गोष्टी भारताच्या हिताआड येत असतील तर त्यांचा त्याग करण्याची तयारी असली की पुरे.
ते. रा.
30 Aug 2009 - 9:06 am | शाहरुख
आपण माझ्या प्रश्नातील 'मी' ला जर "मी" ( खरं तर २ दुहेरी अवतरण चिन्हं द्यायला पाहिजेत ;-) ) घेतले असेल तर माझा तो हेतू नव्हता...मी सर्व भारतीयांबद्दल प्रश्न विचारायला हवा होता.
माझा रोख जे लोक इथे हिंदू हा धर्म मानत नाहीयत त्यांच्यावर होता.जर हिंदू हा धर्म नसेल आणि एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ??
30 Aug 2009 - 9:11 am | विकास
माझा रोख जे लोक इथे हिंदू हा धर्म मानत नाहीयत त्यांच्यावर होता.जर हिंदू हा धर्म नसेल आणि एका प्रदेशाची (भारत देशाची) जीवनपद्धती असेल तर तर सर्व त्या प्रदेशाचे सगळे लोक (भारतीय) हिंदूच असले पाहिजेत...आहे का तसे ??
माझे उत्तर या आणि अजून हवे असल्यास व्यक्तीगत संदर्भातही बदलत नाही.
30 Aug 2009 - 10:28 am | यशोधरा
शाहरुख, कळीचा मुद्दा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून तरी होय असेच आहे. हिंदू ही जीवन पद्धतीच आहे, केवळ चौकटबद्ध रिलिजन वा पंथ नव्हे. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या कोणत्याही पंथाचे अनुयायी असलात, तरीही तुम्ही भारतीय असाल तर, भारतवर्षाची जी जीवनपद्धती आहे, ती तुम्हाला मान्य असेल, त्यामागचे तत्वज्ञान आणि भूमिका तुम्हाला मान्य असेल व जर तुम्ही ती मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात.
30 Aug 2009 - 4:37 pm | निमीत्त मात्र
यशोधराजी,
अहो गोंधळ झालय तुमचा.
ह्याचे उत्तर होय असेल तर हिंदू = भारतीय हे समानार्थीच शब्द झाले की. तसे नाही आहे हे लक्षात घ्या.
तसेच हिंदूंवर टीका केली तर ती समस्त भारतीयांवर टीका आहे, ख्रिश्चन, मुस्लिम सगळ्यांवर. मग हिंदूंवरच का टीका करता? ख्रिश्चन लोकांच्या अंधश्रद्धा दिसत नाही का असे विधान करणारे विकास सारखे लोक चुकिचे आहेत का?
30 Aug 2009 - 5:14 pm | श्रावण मोडक
बहुदा यशोधरा यांचा गोंधळ नसावा. हिंदू या शब्दासंदर्भात त्यांनी आधी दिलेल्या संदर्भांकडे पाहिले तर गोंधळ नाही. त्यांच्यालेखी आजकालचा भारतीय म्हणजेच हिंदू असा व्यापक संदर्भ आहे, असा माझा त्या वाचनातून निष्कर्ष आहे. कारण त्यांनी हिंदू शब्दाची जी उत्क्रांती दिली आहे तीच मुळात जिओ-पॉलिटिकल आयडेंटिटीच्या अंगाने जाते. त्यामुळे त्या काळात त्या आयडेंटिटीमध्ये किमान बौद्ध, जैन हे तर अ-वैदिक असतीलच, इतरही असंख्य कालौघात समाविष्ट होत गेले असतील. पण त्यांची तशी स्वतंत्र नोंद झालेली नसेल. शिवाय या सगळ्यांच्या धर्म म्हणून डिफायनिंग फॅक्टर ठरणाऱ्या चालीरीती बऱ्याचशा एकमेकांशी मिसळलेल्या असल्याने ते सारेच एक असेही मानले गेले असण्याची शक्यता अधिक आहे. त्याहीपलीकडे या साऱ्यांमागील विचारांविषयी (म्हणजे बुद्धाचा वैदिकांपेक्षा वेगळा विचार, महावीराचा वेगळा विचार, चार्वाकाचा वेगळा विचार, उपनिषदे आणि वेद यातील भेद वगैरे) या 'हिंदू' म्हणून तेव्हा उल्लेख करणाऱ्यांनी काही अभ्यास करून ठेवला आहे का, हेही त्यांच्या एकूण 'हिंदू' या आकलनाविषयी काही प्रमाणे मानण्याआधी तपासून पहावे लागेल.
आता यशोधरा यांनी दिलेल्या संदर्भांवरून त्यांच्या मताविषयी मी काढलेला निष्कर्ष चुकीचा असेल तर गोष्ट निराळी.
30 Aug 2009 - 5:46 pm | निमीत्त मात्र
आणि मग मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू लोकांचे काय? तेही (कालौघात) हिंदू धर्मात समाविष्ट झालेले आहेत का?
30 Aug 2009 - 8:38 pm | श्रावण मोडक
आणि मग मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू लोकांचे काय? तेही (कालौघात) हिंदू धर्मात समाविष्ट झालेले आहेत का?
(जाड ठसा मी केला आहे)
छ्या... मी कुठं तरी 'हिंदू धर्म' असं म्हटलं आहे का?
यशोधरा यांनी मांडलेल्या मुद्यांचा* विचार करता, हिंदू ही संज्ञा जिओ-पॉलिटिकल आयडेंटिटी या अंगाने जाते असे माझे म्हणणे आहे. मी तिथं कुठंही धर्म हा विषय आणलेलाच नाही. धर्म ही जातकुळी हिंदू या शब्दाला जोडली नाहीत तर त्यात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू वगैरेही समाविष्ट होतील, पण कालौघात. अर्थात, इथे कालौघात हा शब्द फसवा आहे. कारण काळाच्या ओघात हिंदू हा शब्दच मुळी वैदिक धर्मासाठी अप्रोप्रिएट झालेला दिसतोय.
बाकी चर्चा चालू द्या.
*यासाठीचा संदर्भ त्यांनी द्यायला हवा होता.
30 Aug 2009 - 11:12 am | तेन्नालीराम
शाहरुखसाहेब,
माझ्या मते जो माणूस भारताला "पहिला देव" (देवासारखा) मानतो तो भारतीय, मग तो घरी कुठल्याही देवाची पूजा वा प्रार्थना करो. भारतीयत्व ही सार्वजनिक किंवा राष्ट्रीय निवड असून धर्म ही वैयक्तिक निवड आहे.
त्या दृष्टीने मी श्री. ए. पी.जे. अब्दुल कलाम याना सच्चा भारतीय मानतो.
यावरून आपल्याला पुरेसा बोध झाला असेल व आपल्या डोक्यातला जाळ विझला असेल अशी आशा आहे.
ते. रा.
30 Aug 2009 - 12:55 pm | सुधीर काळे
सुंदर, अतीशय सुंदर युक्तिवाद, तेन्नाली-जी.जीते रहो!
मी पण अब्दुल कलाम यांना दैवतच मानतो व त्यांच्याबद्दल खूप अभिमानही आहे. केवढे उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रपती म्हणून निवडून द्यायला पाहिजे होते!
ते राष्ट्रपती असतांना इथे जकार्ताला एंबसीत त्यांची व्याख्याने आपले राजदूत वाचून दाखवायचे. ती भाषणे कुठे व त्या आधीच्या किंवा नंतरच्या राष्ट्रपतींची भाषणे कुठे? एपीजे अगदी "इंद्राचा ऐरावत"च होते.
व्वा भाई व्वा!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
30 Aug 2009 - 12:39 pm | JAGOMOHANPYARE
१. हिन्दु धर्म हा एक स्वतन्त्र धर्म नसून अनेक सम्प्रदाया.म्चे व धर्मांचे मिश्रण आहे. प्राचीन भारतात शिव पूजक असा शैव धर्म होता.. ( आपण याला आज सम्प्रदाय म्हणतो.) शन्कर व पार्वती हे मुख्य दैवत, लिन्ग पूजा, शोडष्पचार मूर्तीपुजा करणे, म्रूत्यू नन्तरचे जीवन, ८४ लक्ष योनी, त्यात फिरणारा आत्मा या सन्कल्पना याच धर्मातल्या.
२. याच्या इतकाच जुना दुसरा प्रमुख धर्म म्हणजे 'वैदिक धर्म' . हा आर्यांचा धर्म... हा मुळचा भारतातला की उत्तर ध्रुवावरचा हा मुद्दा आता विचार करण्याचे आता कारण नाही... इन्द्र, वरूण, मित्र, सविता,प्रजापती, भग, पूषण, रुद्र, आश्विनी अशा काही यातल्या देवता... मुळात या देवता निराकार असल्याने त्यान्च्या मूर्ती, देवळे न्व्हती... यज्ञ रुपात उपासना होती, ८४ लक्ष योनी- फिरणारा आत्मा वगिरे सन्कप्लना मात्र या धर्मात नव्हत्या.. तीर्थक्षेत्र ही सन्कल्पना नव्हती.. मूळ धर्म ग्रन्थ तीन वेद... रुग, यजु, साम
३. याखेरीज ब्रम्हदेव, मूर्तीरुप विष्णू व लक्ष्मी, गणपती, दत्त... याना मानणारे असे अनेक छोटे छोटे सम्प्रदाय ( की धर्म?) होते.
४. वर्षानु वर्शे हे सम्प्रदाय- धर्म आपापसात भान्डत होते.... व्यासानी जेन्व्हा पुराणे लिहिली ( सन्कलीत केली) तेन्व्हा मुख्य उद्देश होता... सगळे मिळून एक्सन्ध एक धर्म करणे.... यात वैदिक देवाना सारख्या अशा देवतान्चा प्रामुख्याने विचार झाला... प्रजापती= ब्रह्मा, वैदिक विष्णू= मूर्तीरूप विष्णू, रुद्र= शिव ... अशा सन्कल्पनातून मूळ वैदिक देव बाजूलाच राहिले... वेद देखील बाजूला राहिले.... वेदातील काही रुचा या यान्चे स्तवन करताना वापरल्या जाऊ लागल्या आणि मूर्ती व देवळे मात्र मूर्ती पूजक धर्मातून उचलले गेले... हे सर्व पौरोहित्य करणारे ब्राह्मण मात्र मूळचे वैदिक... अशा प्रकारे धेडगुजरी पुराणोक्त हिन्दु धर्म तयार झाला.... अथर्ववेद हा साधारण याच काळात झाला.. त्यात दोन्ही धर्मान्चे मिश्रण स्पष्ट दिसते... त्यामुळे अथर्ववेदाला पूर्वी वैदिक धर्मात स्थान नव्हते.. तेन्व्हा चतुर्वेद नव्हते--- वेद त्रयी ही सन्कल्पना होती.. गणपती अथर्व शीर्शात हे पहायला मिळते... एकीकडे मूर्ती रूप गणेशाचे वर्णनही आहे. आणि त्याच वेळी तू ब्रह्म, इन्द्र, विष्णू, अग्नि, रुद्र, वायू, सूर्य, चन्द्र आहेस, असेही लिहिलेले आढळते..
५. पण व्यासानी जरी दोन धर्म मिसळले असले, तरी त्यापूर्वीही अनेकानी दोनी धर्मान्चा आदर केलेला दिसून येतो... उदा : राम- अश्व्मेध यज्ञ- वैदिक परम्परा... रामेश्वर लिन्ग स्थापना- शैव परम्परा...
६. आज सावरकरानी केलेली हिन्दु धर्माची व्याख्या वापरली जाते...
७. त्यामुळे हिन्दु धर्माला एक ईश्वर, एक पुस्तक, एक प्रेशीत असा प्रकार नाही... याचा गैर फायदा घेऊन 'इतर धर्माचे लोक' हिन्दु धर्माला एक पुस्तक नाही, एक प्रेशीत नाही.. त्याची व्याख्या नाही अशा कुटाळक्या करत असतात... पण त्याचा विचार करण्याचे कारण नाही... धर्म ठरव्ण्यासाठी या सगळ्या गोष्टी एक एक च असाव्यात असा कुठेही नियम नाही...
30 Aug 2009 - 12:49 pm | सुधीर काळे
प्यारे-जी,
सुरेख! आपली विधाने बरोबर आहेत कीं नाहींत (accuracy of statements) हे माहीत नाहीं , पण एकंदरीत आपला युक्तिवाद/मुद्दा आवडला.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
30 Aug 2009 - 2:04 pm | JAGOMOHANPYARE
माझी विधाने माझ्या मते बरोबरच आहेत... अनेक पुस्तकांचा सन्दर्भ यात आहे.... १. हिन्दु धर्माचे शैव रहस्य .. लेखक सन्जय सोनावणी ( या पुस्तकातील वेद विरोधी -ब्राम्हण विरोधी सूर मात्र पटणारा नाही... इतर इतिहास समजून घ्यायला चान्गले पुस्तक.)
२. सनातन प्रभात ची देवता विज्ञान आणि हिन्दु देवता यावरची पुस्तके वाचा.. त्यातील उल्लेख :
देवता निर्मिती बाबत ४ काळ आहेत : १. वेद कालीन - देवता अमूर्त होत्या.. देव या निसर्गातील शक्ती असून त्या उदर निर्वाह चालवत असतात.. २. ब्राम्हणे आरण्यके- देवाना मानवी भावना मिळाल्या... उदा देव कोपतो.. देव आनन्दतो... ३. उपनिशदे- देवाना मूर्त शरीर मिळाले... ४. पुराणे- देव पूर्णपणे माणसाळले... त्यांची लग्ने झाली.. त्याना मुलेही झाली.. ( रेशन कार्ड चा पुरावा माझ्याकडे नाही , क्षमस्व !)
म्हणजे त्यान्च्या मते अमूर्त ते मूर्त देव हा एकाच धर्माचा प्रवास आहे...
पण काही लोकान्च्या मते अमूर्त देव मानणारे आणि मूर्त देव मानणारे
हे दोन स्वतन्त्र धर्म होते.... मला देखील असेच वाटते....
ऋग्वेदात शन्कराचा किती तरी ठिकाणी शिस्न देव, लिन्ग देव असा निर्भत्सना पूर्वक उल्लेख आहे, तो यज्ञात येऊ नये अशी अग्नीला प्रार्थना आहे.. ... आणि रुद्राचा मात्र आदर पुर्वक उल्लेख आहे.. म्हणजे शिव व रुद्र वेगळे, हे नक्की... ( त्या काळात) शैव लोक हे यज्ञ विरोधी लोक होते... म्हणूनच शन्कराचे एक नाव स्मरारी आहे.. म्हणजे यज्ञाचा नाश करणारा... ( अर्थात हा नाश शन्कर नव्हे तर त्या धर्मातील लोक करत होते हे सान्गणे नको!)
टिळकान्च्या आर्क्टिक होम ऑफ वेदाज मध्ये ही काही उल्लेख आहेत... पूर्वी प्रजापती, विष्णू, रुद्र हे त्रि देव होते आणि ते अनुक्रमे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा यान्चे प्रतिक होते... ( रुद्र = रडवणारा... त्राही माम करणारा) कालान्तराने ब्रम्हा, विष्णू, महेश आले... तेव्हा आज रुद्राच्या जागी शन्कर हा समानार्थी शब्द झाला..
ब्रम्हदेवाला मानणारा सम्प्रदाय देखील ५ तोन्डाचा ब्रम्हदेव मानत होता ... तेव्हा वेद तर ३ होते... म्हणजे 'तो' ब्रह्म्देव आणि वेद याण्ची सान्गड बसत नाही... आज मात्र आपण चार तोन्डे चार वेदान्चे प्रतिक मानतो... वेदात ब्रह्म आणि ब्रह्मदेव असे दोन्ही उल्लेख आहेत, पण ते विश्व या अर्थाने... चार मुखे आणि चार वेद यान्चा उल्लेख ( बहुधा ) नसावा... एका पुराणकथेत शन्कराने त्याचे पाचवे तोन्ड उडवले असा उल्लेख आहे... सध्या त्यामुळे चार मुखान्चा ब्रम्हदेव आपण मानतो...
विष्णू हा ऋग्वेदात आदित्याचे मूर्त रूप मानला जातो.. ( दोघाना आजही नारायण हा कॉमन शब्द आहे ! ) तेज आणि तीन पावलात तीन लोक पादाक्रान्त करणारे,पालन पोषण करणारे ... हे त्यान्चे कॉमन फॅक्टर्स ! इन्द्र या पर्जन्य देवतेला सहाय्य करणारा असे त्याचे स्वरूप होते... वेदात विष्णूच्या नावाने फारशी सुक्ते नाहीत.. कारण इन्द्र हा पर्जन्य देवता आणि निसर्गातील अन्नसाखळीचा निर्माता म्हणून अधिक महत्वाचा आहे.. विष्णू एक उप देव होता.. सन्ध्ये मध्ये म्हणूनच विष्णूचे नाव उपेन्द्र म्हणून येते.. विष्णू लक्ष्मी हे व्यापार करणार्या लोकानी वाढवलेले दैवत... पुराणोत्तर काळात विष्णू हे दैवत अधिक लोकप्रिय झाले...
वेदकालीन लोक मूर्ती पूजक नव्हते आणि अचानक आपला धर्म मूर्ती पूजक कसा झाला हा किडा माझ्या डोक्यात अडीच वर्षे वळवळत होता... त्यातून त्यादृष्टीने मी मुद्दाम सन्दर्भ गोळा केले... या बदलामुळे आपण वेद वान्गमयाला मात्र पारखे झालो, हा मात्र माझा पक्का समज झालेला आहे... मला तरी वेद आणि अमूर्त निसर्गदेवता अधिक भावल्या.. अर्थात ३३ कोटीपैकी आपण काय निवडावे हा चॉईस आपल्याला आहेच की !
थोडक्यात, अमूर्त देव ते मुर्ती रुप देव हा हिन्दुन्चा प्रवास आहे... हा धर्म एकच की मिश्रण हा तसा वादाचा मुद्दा आजही आहेच..
यजुर्वेद सान्गतो : न तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच इतके मोठे आहे, त्याची प्रतिमा असू शकत नाही.. ) गम्मत म्हणजे काही लोक याच वाक्याचा अर्थ लावतात : नतस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद यशः ( ज्याचे नावच मोठे आहे, त्याची नत म्हणजे नम्र माणसाने प्रतिमा करावी !)
आणि इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मानी मात्र याच काळात मूर्ती रूप देव ते अमूर्त देव असा प्रवास केलेला आढळतो...
हजारो वर्षे मूर्ती न बसवणारे वैदिक हिन्दु मूर्त्या आणि देवळे उभारायला लागले.. आणि मूळच्या मूर्ती पूजक रोमन संस्कृतीत निर्माण झालेले मुस्लीम मात्र मुर्ती नसणार्या मशिदी उभारायला लागले, हे सगळे गूढ आणि चमत्कारीक आहे..
30 Aug 2009 - 2:53 pm | सुधीर काळे
Accuracyबद्दलचा माझा कॉमेंट माझ्या अज्ञानामुळे होता, आपल्या नाहीं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.