ही पाक कृती http://misalpav.com/node/8968 या पेठकरकाकांच्या पाककृतीचे एक व्हरायन्ट आहे
लालबुंद टोमॅटो ४ मध्यम आकाराचे.
चण्याचे पिठ (बेसन) मावेल इतके.
कांदे २
आलं १ "
कोथिंबीर आवडीनुसार.
काश्मिरी तिखट १ टीस्पून
मीठ चवीनुसार.
चटणी साठी:
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
चिरलेला पुदीना १ वाटी
हिरव्या मिरच्या ३
मीठ चवीनुसार
लिंबू रस १ टेबलस्पून
इतरः
पोळ्या ,टोमॅटो केचप
अमूल बटर
कृती:
चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून मुलायम वाटून चटणी करून घ्या.
कांदे बारीक चिरुन घ्या.
आल्याचे बारिक तुकडे करून घ्या.
टोमॅटोची प्यूरी करून गाळून घ्या. त्यात मावेल इतके चण्याचे पीठ (बेसन) घाला.थोडेसे पातळच करावे त्यात एक कांदा (बारीक चिरलेला), आले (बारीक चॉप केलेले), बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची ,मीठ इत्यादी साहित्य घालून नीट मिसळा. आवश्यकता भासल्यास थोडे पाणी घाला.
फ्राय पॅन मध्ये एक चमचा तेल घालून तापवा. तेल तापले की त्यावर पोळी टाकावी. पोळीच्या वरील बाजूस वरील मिश्रण घाला. फ्रायपॅन फिरवून ते नीट पसरवून घ्या. फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवल्यास फ्रॅन्कीज लवकर तयार होईल परन्तु पोळी जळण्याची किंवा फार कडक होण्याची शक्यता असते. थोडे शिजले की पोळी रोल करावी.आणि व्यवस्थित शेकावी.
मायक्रोवेव्ह ओव्हन मध्येही फ्रॅन्कीज उत्तम प्रकारे करता येतात. तसे करायचे असल्यास पोळीला मिश्रण लावीन रोल करावी आणि ओव्हन मध्ये ठेऊन द्यावी.
वाढताना सोबत केचप आणि हिरवी चटणी द्यावी. फ्रॅन्कीज गरम असतानाच खाणे योग्य.
प्रतिक्रिया
17 Aug 2009 - 10:04 am | अवलिया
पाककृतीला फटु नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार.
--अवलिया
17 Aug 2009 - 10:18 am | सुनील
बरी वाटतेय पण फोटू पायजेल राव!!
आमच्या जुन्या कंपनीतील कँटीनवाला अंडा डोसा करीत असे, त्याची आठवण झाली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Aug 2009 - 1:59 pm | मसक्कली
पाक.तर मस्तच पण फोटो पहिजे..म ग मजा ....खयला पन इन्त्रेस्ट येतो ना....
22 Aug 2009 - 2:04 pm | दशानन
पाककृतीला फटु नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार.
22 Aug 2009 - 2:19 pm | अवलिया
पाककृतीला फटु नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार.
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
22 Aug 2009 - 5:16 pm | भोचक
विजुभौ, फोटो हवाच राव.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? /
23 Aug 2009 - 5:19 am | चकली
फोटो हवा पाककृतीचा!!
चकली
http://chakali.blogspot.com
26 Aug 2009 - 5:48 pm | सागर
फोटुशिवाय कोणतीही पाककृती व्यवस्थापन समितीने मान्य करु नये
आणि असे धागे उडवले जावेत असा एक नियमच करायला हवा...
फोटु पाहून कसे मस्त खाव खाव सुटते.. नुसती पाककृती वाचून कसे इमॅजिन करणार... एका जाहिरातला डायलॉग आठवला.... "तुम रंग कैसे सोचते हो यार?"... तद्वातच ... पाककृती ही बघून करायची गोष्ट हाय... जळवायचे तर पूर्ण जळवायचे .... अर्धे जळून काय उपयोग ? ;)
बाकी पाककृती भन्नाट दिसते आहे ;)
फोटु लावा लवकर
(खादाडमाऊ) सागर
26 Aug 2009 - 9:54 pm | आंबोळी
पाक्रु छान वाटतेय....
लवकरात लवकर फोटू टाकण्याची यवस्था करावी.
अवांतरः हा पदार्थ गादीवर बसून खाल्ल्यास चव खुलून येते असा काही अणुभव आहे का?
(
धारी)आंबोळी
23 Aug 2009 - 11:14 pm | विजुभाऊ
पेठकरकांच्या पाकृतीचे वर्णन वाचतान एकदम आठवली म्हनून ही पाककृती दिली. फोटो टाकणे अवघद होते. श्रावण संपला की एगफ्रॅन्कीचे फोटो टाकेन
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
27 Aug 2009 - 5:17 am | लवंगी
फोटू कुठे??