चारोळी म्हणजे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
11 Mar 2008 - 3:36 pm

चारोळी म्हणजे
चारोळी म्हणजे चारोळी म्हणजे चारोळी असते
तुमची आमची आणि सर्वंचि सेम असते
चारोळी म्हणजे एक स्वप्न असते.
चारोळी म्हणजे गुलबकावलिचे फूल असते
मिळाले तर कूल नाही तर भूल असते
चारोळी म्हणजे एक श्वास असतो....
आवडेल त्याला दरवळणारा धूंद सुवास असतो
आवडली नाहितर भपकारयाचा वास असतो.....
चारोळी असते एक घरटे
आवडती साठी महाल
आणि नावडती साठी खुरटे
चारोळी म्हणजे एक सफर असते
ज्यात दोन ओळींच्या मधे
भावनेचे बफर असते...
चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते
ज्यातल्या भावनेचे चित्र नेहमीच अती भव्य असते
दोन तुझ्या दोन माझ्या असा काही सौदा नसतो
देण्या घेण्याचा काही एक वादा नसतो
स्वप्ना अलीकडचे जग कवेत घ्यायचा ध्यास असतो
जागेपणीच स्वप्नपूर्तीचा भास असतो..
चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो....
जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो
चारोळी म्हणजे मस्त सॉफ्ट्ड्रींक असते
मिक्स न करता प्याले तरी मस्त झिंग देतं....

आपला चारोळी बाज
.....................विजुभाऊ

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 3:48 pm | केशवसुमार

विजुभाऊ,
चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या..(ह्.घ्या)
केशवसुमार

चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या? हो...
चारोळी म्हणजे प्रेमा सरखेच....साधा अडीच अक्षरांचा शब्द्....शतकानुशतके लिहीलं जातंय त्या वर......
हा हन्त हन्त्......केशवसुमार्...हे तुम्हा कवी लोकाना सांगावं लागावं.? अं!.....( काहीतरी सुमार असावा या बोलण्याला....बॉ...)

आपला चारोळी बाज
.....................विजुभाऊ

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 5:56 pm | इनोबा म्हणे

चारोळी म्हणजे काय सांगायला २४ ओळी घेतल्या
हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

11 Mar 2008 - 11:04 pm | छोटा डॉन

"हे म्हणजे अगदी(आचार्य बाबा बर्व्यासारखं)'मौनाचं महत्व या विषयावर तासभर बोलावं' तसं झालं."
खरे आहे विनोबा ...

बाकी आम्हाला चारोळीतले वा काव्यातले जास्त गम्य नाही ... तरीपण चालू द्यात

मौनीबाबा आचार्य छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा's picture

11 Mar 2008 - 10:39 pm | वरदा

चारोळी म्हणजे शब्दांचा खेळ असतो....
जित्या जागत्या भावनांचा प्रदर्शनाशी मेळ असतो

हे विशेष आवडलं...

प्राजु's picture

12 Mar 2008 - 1:01 am | प्राजु

आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 9:21 am | विसोबा खेचर

चारोळी म्हणजे चार ओळींचे एक नाजूक महाकाव्य असते

वा! ही ओळ लै भारी!

आपला,
(चारोळी-बेदाण्यातला) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2008 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते मस्तच बांधलय रे कवितेत :)
सर्वच ओळी चांगल्या आहेत.
प्रेम काय असते,
तुमचे आमचे सेम असते, याची आठवण झाली.

वरदा's picture

12 Mar 2008 - 6:24 pm | वरदा

आम्ही चारोळ्या चारोळ्या खेळत होतो तेव्हा आपण यायला हवे होतात.. :)

प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 6:49 pm | विसोबा खेचर

प्राजु पुन्हा खेळु ना नव्या विषयावर चारोळी चारोळी.....:)))

म्हणजे पुन्हा तुम्ही तो र ला ट जोडण्याचा भयानक बोअर खेळ खेळणार की काय?!! :)

असो, चालू द्या! आपली काय कशाला ना नाय बा! आपण ते पानच उघडून न पाहिल्याशी कारण! :)

आपला,
(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2008 - 9:53 pm | पिवळा डांबिस

अय्याऽऽऽ, चारोळीऽऽ?
कित्ती, कित्ती छान!!
चला नं विजुकाका, आपण चारोळी-चारोळी खेळू या!!
कित्ती मज्जा येते!!!
-प्राजुकाकू, वरदाकाकू आणि खापरगाव भगिनीसमाज

आयला, चारोळी आली रे आली, पळा रे पळा!!
झाली का ही पीडा परत सुरु!!:)
-तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन आणि किंचित इनोबा.

ह.घ्या. (जसं काही हे मुद्दाम सांगायची जरूर आहे! पण काय करणार, प्रथा पाळली पाहिजे!!)

धमाल मुलगा's picture

14 Mar 2008 - 11:40 am | धमाल मुलगा

ओ डा॑बिसकाका, जरा येडे आहात का हो तुम्ही?
च्यामायला, कै च्या कै प्रतिसाद टाकता राव,
आयला, आख्ख॑ हापिस खुळ्यागत लागल॑ ना बघायला माझ्याकडे...पाsssर दक्षिणात्य शिणेमातल्या व्हिलनसारखा जोरजोरात खदाखदा हसत सुटलो ना मी...एकटाच. शेजारच्या डेस्कावरच॑ तामिळी येड॑ डोस्क॑ धरुन बघायलाच लागल॑ माझ्याकड॑ !!!!!

धन्य आहात हो!!!!

कोन रं तो आमाला येडं म्हंतोय फोकलीचा?
च्यामारी, येड्यासारकं हसा तुमी आनी त्येचा दोष आमच्यावर?
आमच्या पर्तिसादात काय चुकी हाये? मिपावर दोन ग्रुप हायेत, चारोळी खानारे आनि न खानारे! त्येंच्या मणात काय आलं आसंल त्ये म्या लिवलं तर काय चुकलं?
आनी ही आम्ची वैय.. वैयक... वैयक्तिक (आयला जमलं!) पर्तिक्रिया हाये. त्ये मिपावर अलौड हाये. पायजे तर जर्नेल डायरियाला इचारा...
-पिवळा डांबिस

(चंद्रशेखर गोखल्यांसारखी उत्तम, बहुत सारा अर्थ सांगणारी पानातल्या वेलची सारखी एखाद् दुसरीच दर्जेदार चारोळी सहन होणारा!) तात्या.
तात्यानु ह्यां बाकी खरा नाय हां....आंओ कोकणी असा....अच्च गोयेकांर.....
माझ्या गोयंच्या कोनाक पन पुसुन मगे उलय......
तो मोरोपंत मण म्हणलय
की जगी चालणे राजहंसाचे ....म्हणोन कोणि चालोची नोहे काय..
....रागावु नको तात्या.पोरे आपलीच आहेत्.....जरा सहन कर....
जरा प्रॅक्टीस होउ देत त्यान...मग बघ कशा सिक्सरी हाणताहेत ते.

मराठी माणसे मराठी माणसाला कसे मागे खेचतात हे तुम्हीच दाखवुन दिले तात्या......पोरे बघा कशी घाबरली
आणि तुमच्या बरोबर डांबिस काका.....त्याना चॅलेंज्. त्यानाच काय अगदी केशवसुमाराना सुद्धा....
र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?
स्रूश्टीलावण्या च्या संस्क्रुतातही र ल ट न जुळावता चारोळी लिहीता येइल का?

केशवसुमार's picture

14 Mar 2008 - 11:56 am | केशवसुमार

१.ओ भाऊ, तुमच्या गमज्या चल्यात चालू द्या ...
२.ही समदी काठावर बस्लित गुमान..बसु द्या त्यांना..उगाच कशाला चिखलात दगड मारताय..
३.तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,
४.घ्यारं त्या भाऊला राऊंडात
केशवसुमार ठोकरे

बघा लिव्हल्याकी नाही चार ओळी
आनि कुठ बी र ला ट नाय जोडला..
उगा आपल्याल चालेंज नाय द्ययाचा..
काय कलं की नायं

ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

विसोबा खेचर's picture

14 Mar 2008 - 6:42 pm | विसोबा खेचर

ततमाताय.. परत चार ओळि झाल्या..

हा हा हा. सही है भिडू तत् माताय! :)

बाय द वे, 'फोकलिच्या' या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! :))

असो...

सर्वमाताय नमोनम: :)

आपला,
तत् तात्याय! :)

विजुभाऊ's picture

17 Oct 2008 - 5:06 pm | विजुभाऊ

त्रिवेणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आस्वाद घेउयात