पूर्वतयारी: प्रथम एक विषय घ्यावा. वर्तमानपत्र, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर हा कच्चा माल सहजगत्या सापडतो. आता संपूर्ण खात्री करून घ्यावी आपल्याला त्या विषयातलं एक अक्षरही कळत नाही. मग त्या विषयावर गूगल वापरून माहिती मिळवावी. एकाच वेळा चार वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडून चारही ठिकाणचे वेगवेगळे परिच्छेद एक आड एक वाचावेत. अर्थातच ती आपल्याला कळणार नाही याचीही खात्री करावी. आता पूर्वतयारी पूर्ण झाली.
किंवा आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी. ही खात्री करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यासाठी आपल्या जाणीवा, नेणीवा अतिशय बोथट असणं गरजेचं आहे; महत्त्वाची आहे ती आपल्यातली उणीव. शिवाय महत्त्वाचं आहे ते लांबुळकं नाक असणं. अर्थात प्रत्यक्षात तुमचं नाक लांबुळकं आहे का चपटं याला महत्त्व नाही, ते नाक फक्त चष्म्यासाठीचा स्टँड असतो. या चष्म्याचा (बदलण्याची गरज असलेल्या) 'त्या' चष्म्याशीही काही संबंध नाही. तर 'तो' चष्मा घ्यावा, जो बदलण्याची गरज आहे.... हं हं हं, एक मिनीट बदलू नका. फक्त बदलण्याची गरज असलेला चष्मा घ्या आणि वापरा. आणि आता मुख्य पदार्थ, पक्षी: जन्मापूर्वी घडलेली घटना, घ्या. ती 'ह्या' चष्म्यातून पहा. अर्थातच सगळंच धूसर, फिकट दिसेल आणि काहीही समजणार नाही.
यापैकी कोणतीही एक पूर्वतयारी केली असेल तरीही आणखी महत्त्वाचे घटक म्हणजे 'मला सगळं समजलंच पाहिजे', 'मला अमकी-फलाणी गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगायचीच आहे' किंवा 'पहा मला कित्ती कित्ती माहिती आहे हे मी सगळ्यांना ओरडून सांगितलंच पाहिजे' यातले एक किंवा जास्त घटक.
मुख्य कार्यः मिपावर ही पाकृ करण्याची मुख्य ठिकाणं दोन आहेत: एकतर काथ्याकूट किंवा दुसरा कौलं फोडणं. तर 'लेखन करा'वर टिचकी मारायची, माऊसाने हो, बोटांनी नव्हे! मग आपल्या तेव्हाच्या मूडप्रमाणे एकतर काथ्याकूट नाहीतर कौल बनवा. काथ्याकूट अंमळ सोपा असतो, कारण त्यात एकच ओळ देऊन पुरते. कौलं फोडायची असतील तर आधी पर्याय काय द्यायचा याचाही विचार करावा लागतो. म्हणजे काथ्याकूटात टाकण्याची एक ओळ कौलाची पार्श्वभूमी बनते आणि वर पर्यायांचा विचार करावा लागतो. हरकत नाही, कौलारू लोकं जास्त प्रसिध्द पावतात. तर या एका ओळीत हा न समजलेला विषय किंवा माहिती नसलेली घटना यांच्यावर लिहा. शक्यतोवर अशुद्धच लिहा, म्हणजे काही प्रतिसादकर्ते तुमच्याबद्दल थोडी सहानुभूती ठेवू शकतील. अर्थात त्यासाठी तुम्ही खूप जुने सदस्य असून चालणार नाही. तेव्हा एकतर नवे सदस्य असा किंवा नवा आय.डी. घ्या, तो शक्यतोवर प्रसिद्ध व्यक्ती (उदा: महमंद अली जिना) अथवा व्यक्तीचित्रांच्या (उदा: शुभ्रा) नावे नको.
मुख्य काम असतं की या धाग्याचं शीर्षक बनवणं, ते अतिशय कॅची असलं पाहिजे. म्हणजे काय होतं की मिपावर पडीक असणारे आद्यटवाळ प्रतिसादक, ज्यांना काही लोकं ७०% कंपूबाजही म्हणतात, ते लोकं हा धागा उघडतील. (अर्थात, या लोकांना तसंही काही काम नसतं, म्हणूनच ते पडीक असतात ना! त्यामुळे ते तसाही तुमचा धागा एकदातरी उघडून भोचकपणा* करून पहाणार.) तर अशा लोकांनी हा धागा पाहिला की त्यात त्यांना टवाळी करण्याचा अगदी हुकमी मूड आला पाहिजे. आता हे काम अगदी सोपं आहे. थोडं अशुद्धलेखन, थोडी आक्रमक भाषा, आणि थोडा आगाऊ नम्रपणा पाहिला की हे लोकं अगदी हटकून प्रतिसाद देतात. म्हणजे सुरूवातीला एखादा तास एखाददुसरा टवाळच, सॉरी पडीक मिपाकर, प्रतिसाद देईल. पण या लोकांना एकाने केलं म्हणून दुसर्याने केलं अशी काहीशी डॉमिनो इफेक्टसारखी सवय असते. त्यामुळे एकजण काहीसं संबद्ध प्रतिसाद लिहेल. मग दुसरा येऊन जास्त असंबद्ध, पण मोठा आणि गप्पाटप्पा टाईप प्रतिसाद लिहेल. आणि इथेच सुरूवात होते डॉमिनो इफेक्टची.
.... कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। त्यामुळे आधी धाग्याची शिकवणी पूर्ण करू या, नंतर जमलं तर या टवाळखोरांची, सॉरी पडीक मिपाकरांची, मानसिकता सांगते मी! तर एक ओळ कशी व्यवस्थित लिहावी हे मी सांगितलंच. जमलं तर सुरूवातीला नमस्कार-चमत्कार हेही म्हणून घ्यावं, आणखी एक पॉईंट सहानुभूती मिळवण्याचा! आता पुढे विचार करू या, कौलं फोडली तर पर्याय कसे आणायचे. ही जी काही माहिती असेल, जी खरंतर आपल्याला नाही आहे, त्याची आपण एक ओळ बनवली आहे, तिला व्याकरणाची थोडीशी फोडणी घालायची आणि तिचा बनवायचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शक्यतोवर 'हो', 'नाही' किंवा 'माहित नाही' असं असेल असाच प्रश्न बनवायचा, सोपं पडतं. शिवाय कोणाचं उत्तर आणखी काही असेल तर तो माणूस (माणूस म्हणजे पडीक मिपाकराचा आय.डी. पण म्हणायची पद्धत म्हणून माणूस म्हटलं) प्रतिसादात ते ही लिहीतो. त्यानुषंगिक आणखी दोनचार प्रतिसाद येतात. असो, प्रतिसाद खेचण्याच्या गप्पा इथे अवांतर ठरतील म्हणून त्याबद्दल जास्त लिहीत नाही. खरंतर अवांतर ठरणार नाही, कारण प्रतिसादांमधे गप्पा-टप्पा झाल्या तरच धाग्याचा खफ पूर्ण होईल.
अशा तर्हेने आपला धागा बनला की त्याचं पूर्वपरीक्षण करून, प्रकाशित करून टाकायचा धागा!
उपसंहारः खरंतर मीच लिहीणार होते, पण एक मीटींग आहे आत्ता, तिकडे फुकट चहा मिळणार आहे, तो कसा सोडायचा? फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून! तेव्हा लवकरच तिकडे पळालेलं बरं. पण हरकत नाही, काही पडीक मिपाकर या धाग्याला प्रतिसाद देतीलच. त्यातूनच तुम्हाला उपसंहार कळेल. शिवाय या पडीक लोकांकडून प्रतिसाद कसे 'खेचावेत' याचंही एक टूटोरीयल आणि धाग्याचा खफ कसा बनवावा याचं प्रात्यक्षिक याच धाग्यात होईल.
या भोचकपणाचा आपले मिपाकर भोचक यांच्याशी काहीएक संबंध नाही.
प्रतिक्रिया
20 Aug 2009 - 4:16 pm | अवलिया
प्रकाटाआ
--अवलिया
20 Aug 2009 - 7:07 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रकाटाआ.. हेच म्हणतो ..
=)) =)) =))
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
21 Aug 2009 - 2:52 pm | विजुभाऊ
http://www.misalpav.com/node/1354 हा घ्या एक पूर्ण ख फ झालेला एक आदर्श धागा
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
20 Aug 2009 - 4:28 pm | बिपिन कार्यकर्ते
:D
बिपिन कार्यकर्ते
20 Aug 2009 - 4:33 pm | चतुरंग
पण फोटू न दिल्याबद्दत अवखळकर पाटील बाईंचा निषेध! >:)
(तरिही लेख वाचनखूण म्हणून साठवला आहे.)
(फळा)चतुरंग
20 Aug 2009 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रंगाशेट, आज पोळ्याच्या दिवशी तुम्ही पोळ्या करणार नाहीत याची खात्री आहे मला! पण उद्यापासून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतील, तेव्हा तुम्हाला या पाकृचा नक्की उपयोग होईल. तेव्हा तुम्ही ही पाकृ नक्कीच बनवून पहा. कशी झाली ते आम्हा लोकांना खव उचकपाचक करून पराशेट सांगतीलच.
फोटू दिला नाही कारण कॅमेर्याच्या ब्याट्रीचा चार्जर सध्या माझ्याकडे नाही आहे. सहजकाकांना कळला असेलच यातला जोक!
(प्रात्यक्षिकातून शिक्षणप्रेमी) अदिती
20 Aug 2009 - 4:35 pm | सूहास (not verified)
=))
=))
काल मी मेडीकल स्टोअर मध्ये जाऊन एक बियर मागीतली तर त्या दुकानदाराने मला दोन किलो पोहे का बांधुन दिले ते समजले नव्हते..हा लेख वाचल्यावर समजले ... :P
सू हा स...
20 Aug 2009 - 5:15 pm | निखिल देशपांडे
वा उत्तम... पाककृती आवडली.
लवकरच करुन बघणार...
मेलो... खपलो... वारलो... निर्वतलो..
पण फोटू न दिल्याबद्दत अवखळकर पाटील बाईंचा निषेध!!!!!
निखिल
================================
20 Aug 2009 - 5:32 pm | अनामिक
हॅ हॅ हॅ... अदिती बै म्हणजे हास्यठसके लागतील याची खात्री आहे... म्हणून आधीच प्रतिसाद देतो आणि मग वाचतो.... हॅ हॅ हॅ
-अनामिक
20 Aug 2009 - 9:48 pm | ऋषिकेश
हा हा हा!!!! तैंना अगदी जोकर करून टाकलंत होऽ ;)
असो. :P
तर पाककृती वाचली. श्रावण संपला तरी चातुर्मास चालु असल्याने करता इतक्यात येणार नाहि.
अनामिकरावांनी अँटीसिपेट केल्याप्रमाणे मला हास्यठसके, हास्यउचक्या, हास्यतुषार, हास्यभुईनळे, हास्य.. वगैरे असे बरेच काहि लागले/उडाले/वाजले याची नोंद अदितीतैंच्या भावी "मराठी आंतरजालावर आवश्यक १०१ (एकसौएक) पाककृती" च्या वाचकांच्या प्रतिक्रीयामधे घ्यालच.
ऋषिकेश
------------------
रात्रीचे ९ वाजून ४६ मिनीटे झालेली आहेत. हास्यउचक्या चालू असल्याने निवेदकाची बोलती आणि गाणी बंद आहेत
21 Aug 2009 - 6:47 am | अनामिक
ऋषिकेश... तुमी ना कैच्याकै अनुमान काढला. मला अदितीला जोकर म्हणायचं नव्हतं कै... पण आता तुमीच बोल्ला अन आमच्या समोर सर्कशीतल्या जोकरा सारखी तोंड रंगवलेली अन नाकाच्या शेंड्यावर लालबुंद चेंडू लावलेली अदिती समोर उभी राहिली.... (अदिती ह.घे.)... आणि अजून एक हास्य ठसका लागला.
-अनामिक
20 Aug 2009 - 5:44 pm | लिखाळ
१९४ वाचने आणि फक्त ७ प्रतिसाद !!
ह्म्म .. आपल्या लेखाचा खफ करणे सोपे नाही हे अदिती बाईंना उमगले असेलच. लेखाचा खफ होण्यामध्ये भराभर येणार्या बाष्कळ प्रतिक्रियांचा मोलाचा वाटा असतो. असो.
या लेखाला पुढे अश्या प्रतिक्रिया आल्या तर तुम्ही दिलेले नियम ठीक आहेत असे वाटेल.
-- लिखाळ.
20 Aug 2009 - 6:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही उद्या पहा लिखाळपंत! काय होतं, वेळेचं महत्त्व लिहायला मी अंमळ विसरलेच. नेव्हर माईंड, आता लिहीते ते!
सर्वसामान्य, बहुसंख्य आणि पडीक मिपाकर निवासीच आहे, तेव्हा हे लोकं भारताच्या सकाळी जेव्हा हापिसात येतात तेव्हा पहिले काय करतात तर मिपाची वेबसाईट उघडतात. त्यामुळे अदमासे ७०% प्रतिक्रिया भारतातल्या सकाळी येतात. अर्थात प्रतिक्रिया सकाळी आल्या की त्यांना उत्तरंही त्यानंतरच येणार. प्रतिक्रियाच आल्या नाहीत तर त्यांना उत्तरं येणार नाहीत, अर्थात धाग्याचा खफ ही पाकृ फसेल.
तेव्हा ही पाकृ शक्यतोवर भारतातल्या सकाळी किंवा परदेशातल्या (परदेश म्हणजे अमेरिका हे गणित तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, हॅ हॅ हॅ) अपरात्री करावी. पडीक मिपाकर त्वरित प्रतिक्रिया तर देतोच, शिवाय कोणी अनिवासी भारतीय जागे असतील तर तेही थोडा वेळ मिपा-मिपा खेळतात. असा दुहेरी फायदा होतो.
भारतातल्या दुपारपर्यंत या निवासी मिपाकरांचे बॉसेसही हापिसात येतात आणि त्यांना आपल्या बॉसपदाची जाणीव होते. त्यामुळे आपले निवासी मिपाकर मनात असूनही मिपा-मिपा खेळू शकत नाहीत.
तेव्हा टायमिंगही महत्त्वाचंच! ही पाकृ सकाळच्या न्याहरीचीच आहे, दुपारी जेवायला ठीक लागते, आणि संध्याकाळच्या खादाडीच्या वेळेस अगदीच पचक होते. उदाहरणार्थ हाच धागा घ्या ना!!
अदिती
20 Aug 2009 - 7:50 pm | रेवती
चुकलेल्या वेळेचे स्पष्टीकरण पटले, आवडले.......ह्रदयाला भिडले.
(परदेश म्हणजे अमेरिका हे गणित तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, हॅ हॅ हॅ)
हे वाक्य म्हणजे नुसते गणितच नाही तर भूगोलाचाही पक्केपणा दाखवणारे आहे.;) अदिती मला तुझा अभिमान वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे.
रेवती
20 Aug 2009 - 8:05 pm | लिखाळ
गणित चुकले हे मान्य करण्याचा मोठेपणा पाहून भारवलो तसेच रेवतीताईंनी नजरेस आणून दिलेला भूगोलातला पक्केपणा वाचून लै हासायला आले.
--(काही निवासी भारतीयांच्या नकाशावर नसलेल्या भूभागात राहणारा) लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
21 Aug 2009 - 10:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चला काही ना काही कारणामुळे असंतुष्ट लिखाळपंतांना लै हासायला आलं हे बरं झालं. लिखाळा, नकाशावर नसलास तरी हरकत नाही, आयडीरुपाने आहेस ना, ते महत्त्वाचं! मरावे परी कीर्तीरूपे उरावे असं म्हणतात तसंच, नकाशात नसावे परी आयडीरुपे असावे असं आपण त्याचं १.० व्हर्जन बनवू या!!
लिखाळसाठी बनवलेल्या या स्पेशल म्हणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.
अदिती
21 Aug 2009 - 11:01 am | विजुभाऊ
अदिती मला तुझा अभिमान वाटतो. मी तुझ्या पाठीशी आहे.
हे वाक्य एक वेळ चंद्रावरच्या माणसाने म्हंटले तर ते शक्य आहे.
भुमीतीच्या/भुगोलाच्या कोणत्याही नियमानुसार अमेरीकन माणूस भारतीय माणसाच्या पाठीशी राहु शकत नाही.
राजकीय दृष्ट्याही हे शक्य असेल असे वाटत नाही.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
21 Aug 2009 - 11:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो इजाभौ, रेवतीताई अलंकारीक भाषेत बोलत आहेत, तुम्ही काय शब्दशः अर्थ घेतलात का काय?
आणि हो, रेवतीताई अमेरिकन आहेत असा अप्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर केल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध (त्या अनिवासी भारतीय आहेत), तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्हाला गेट वेल सून! यावेळेला पहिल्यांदाच चूक केली आहेत म्हणून माफ करत आहे, पुढच्या वेळेस असे आरोप कराल तर बेरकेवाडीच्या महिला मंडळाचा मोर्चा येईल तुमच्या ऑफिसावर!!
अदिती
21 Aug 2009 - 12:00 pm | श्रावण मोडक
ही सुसाट सुटली आहे... :)
21 Aug 2009 - 1:30 pm | विशाल कुलकर्णी
आमच्याकडे मोर्चासाठी बायका, माणसे... लाटणी, तुटलेल्या चपला,सडलेले टोमेटो, डांबर, चपलांचे हार, गाढव ई. रास्त दरात पुरवले जाईल.
पुर्ण रिक्वायरमेंट नीट कळवल्यास (क्वांटिटी जास्त असेल तर )दरात भरघोस सुटीचे जाहीर आश्वासन !
१०० पेक्षा जास्तीच्या ऑर्डरवर एक गाढव फुकट सप्लाय केले जाईल. (मर्यादीत कालावधीकरता)
(धंदेवाईक) विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 5:08 pm | रेवती
वा!! काय पण बोललीस अदिती! टाळ्या!
कायदेशीर दृष्ट्या मी भारताची नागरीक आहे आणि हा हक्क माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मला अमेरिकन नागरीक म्हणवून घेण्याची जराही हौस नसताना लोकांनाच काय एवढा सोस मी म्हणते?
अगं अदिती, तू मोर्चा नेण्याबद्दल बोलतीयेस खरी......पण तुला माहितीये ना परवाच्या मोर्चात विरोधी पार्टीची कशी फजिती झाली ते! विजूभाऊ मिपाकर असल्यामुळे तू एकडाव माफ करतीयेस तेच बरं झालं!
रेवती
21 Aug 2009 - 5:40 pm | विजुभाऊ
पुढच्या वेळेस असे आरोप कराल तर बेरकेवाडीच्या महिला मंडळाचा मोर्चा येईल तुमच्या ऑफिसावर!!
चालेल. मोर्चेकरी महिलाना निदान थोडासा मेकअप करून यायला सांगा. हापीसात आमची थोडीशी वट वाढेल.
आमच्या मोठ्या साहेबाच्या साठीसुद्धा एक मोर्चा आला होता. त्या मोर्च्यातला सगळ्या बायका बॉबकट आणि छानदार लिपस्टीक लावून आल्या होत्या.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
21 Aug 2009 - 5:49 pm | बिपिन कार्यकर्ते
आता तर तुमची वाट लागलीच भौ...
बिपिन कार्यकर्ते
21 Aug 2009 - 6:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बेरकेवाडीच्या महिलांमधे तुमच्या हापिसातली कंप्यूटर अॅडमिनवाली मामीपण आहे, जिने हापिसात मिपाचा अॅक्सेस दिला नव्हता. शिवाय या महिलांच्या संरक्षणासाठी अवखळवाडी आणि भोसरीतले काही पैलवानही येतात. या सर्व महिलांना श्रीमती मल्लेश्वरी आणि कुंजुराणीदेवी ट्रेनिंग देतात.
विशालभौ, तुमची मोर्चा-सामानाची एजन्सी कुठे आहे, तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे.
अदिती
21 Aug 2009 - 6:49 pm | रेवती
बॉबकट आणि छानदार लिपस्टीक लावून आल्या होत्या.
अदिती, आणखी एक काम झालं. सर्व मोर्चेकरणींचे बुरखे शिवून तयार झाल्याचे आत्ताच समजले.
चला.....एकेक तयारी पूर्ण होत आलीये. आजकाल 'मध्ययुग स्टाईलचे ' बुरखे शिवून घेण्याची फॅशन आहे. 'कोल्हापूरी गोंडेदार लेडीज चपला विथ जरीच्या फुल्यांचे नक्षीकाम' तयार आहेत.
रेवती
20 Aug 2009 - 5:48 pm | रेवती
फोटू नसला तरी पाकृ चविष्ट असणार याची खात्री आहेच.
पुढच्या अठवड्यात हा प्रयोग करावा म्हणते.;)
इतक्या चांगल्या कृतीबद्दल धन्यवाद! अशी पाकृ पुन्हा होणे नाही.
रेवती
20 Aug 2009 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार
*हिन व हिणकस प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे*
जाता जाता :- 'मला अमकी-फलाणी गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगायचीच आहे' हे वाक्य हृदयाला भिडले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
20 Aug 2009 - 5:54 pm | ब्रिटिश टिंग्या
वरील वाड्मयचौर्याचा आम्ही तहे दिलसे निषेध करतो!
-टिंग्याराम कोतवाल ३.१४
20 Aug 2009 - 6:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टिंग्या, "वरिल वाङमयचौर्य" म्हणजे तू पर्याच्या प्रतिसादाबद्दलच लिहीत आहेस असा सोयीस्कर समज करून घेऊन मी तुला +१ लिहीलं आहे.
अदिती
21 Aug 2009 - 11:20 am | ब्रिटिश टिंग्या
अदिती म्यॅडम, ते आपल्यालाच उद्देशुन होतं!
असो! अद्याप संपादकांनी (म्हणजे बिकांनी) हा वाड्मयचौर्यित लेख उडवला का नाही याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटिस देणेत येत आहे!
ढुम ढुम ढुम ढुम ढुम......
21 Aug 2009 - 11:23 am | निखिल देशपांडे
आम्ही वाड्मयचौर्याचा निषेध करतो...
पण टिंगोजी राव ह्यांना विनंती आहे कि त्यांनी मुळ लेखाचा दुवा द्यावा. अथवा स्कॅन करुन येथे टाकावा...
जर साम्य आढळल्यास... लवकरात लवकर हा लेख उडवावा
निखिल
================================
21 Aug 2009 - 11:29 am | ब्रिटिश टिंग्या
पूर्वतयारी: प्रथम एक विषय घ्यावा. वर्तमानपत्र, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर हा कच्चा माल सहजगत्या सापडतो. आता संपूर्ण खात्री करून घ्यावी आपल्याला त्या विषयातलं एक अक्षरही कळत नाही. मग त्या विषयावर गूगल वापरून माहिती मिळवावी. एकाच वेळा चार वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडून चारही ठिकाणचे वेगवेगळे परिच्छेद एक आड एक वाचावेत. अर्थातच ती आपल्याला कळणार नाही याचीही खात्री करावी. आता पूर्वतयारी पूर्ण झाली.
किंवा आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी. ही खात्री करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यासाठी आपल्या जाणीवा, नेणीवा अतिशय बोथट असणं गरजेचं आहे; महत्त्वाची आहे ती आपल्यातली उणीव. शिवाय महत्त्वाचं आहे ते लांबुळकं नाक असणं. अर्थात प्रत्यक्षात तुमचं नाक लांबुळकं आहे का चपटं याला महत्त्व नाही, ते नाक फक्त चष्म्यासाठीचा स्टँड असतो. या चष्म्याचा (बदलण्याची गरज असलेल्या) 'त्या' चष्म्याशीही काही संबंध नाही. तर 'तो' चष्मा घ्यावा, जो बदलण्याची गरज आहे.... हं हं हं, एक मिनीट बदलू नका. फक्त बदलण्याची गरज असलेला चष्मा घ्या आणि वापरा. आणि आता मुख्य पदार्थ, पक्षी: जन्मापूर्वी घडलेली घटना, घ्या. ती 'ह्या' चष्म्यातून पहा. अर्थातच सगळंच धूसर, फिकट दिसेल आणि काहीही समजणार नाही.
यापैकी कोणतीही एक पूर्वतयारी केली असेल तरीही आणखी महत्त्वाचे घटक म्हणजे 'मला सगळं समजलंच पाहिजे', 'मला अमकी-फलाणी गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगायचीच आहे' किंवा 'पहा मला कित्ती कित्ती माहिती आहे हे मी सगळ्यांना ओरडून सांगितलंच पाहिजे' यातले एक किंवा जास्त घटक.
मुख्य कार्यः मिपावर ही पाकृ करण्याची मुख्य ठिकाणं दोन आहेत: एकतर काथ्याकूट किंवा दुसरा कौलं फोडणं. तर 'लेखन करा'वर टिचकी मारायची, माऊसाने हो, बोटांनी नव्हे! मग आपल्या तेव्हाच्या मूडप्रमाणे एकतर काथ्याकूट नाहीतर कौल बनवा. काथ्याकूट अंमळ सोपा असतो, कारण त्यात एकच ओळ देऊन पुरते. कौलं फोडायची असतील तर आधी पर्याय काय द्यायचा याचाही विचार करावा लागतो. म्हणजे काथ्याकूटात टाकण्याची एक ओळ कौलाची पार्श्वभूमी बनते आणि वर पर्यायांचा विचार करावा लागतो. हरकत नाही, कौलारू लोकं जास्त प्रसिध्द पावतात. तर या एका ओळीत हा न समजलेला विषय किंवा माहिती नसलेली घटना यांच्यावर लिहा. शक्यतोवर अशुद्धच लिहा, म्हणजे काही प्रतिसादकर्ते तुमच्याबद्दल थोडी सहानुभूती ठेवू शकतील. अर्थात त्यासाठी तुम्ही खूप जुने सदस्य असून चालणार नाही. तेव्हा एकतर नवे सदस्य असा किंवा नवा आय.डी. घ्या, तो शक्यतोवर प्रसिद्ध व्यक्ती (उदा: महमंद अली जिना) अथवा व्यक्तीचित्रांच्या (उदा: शुभ्रा) नावे नको.
मुख्य काम असतं की या धाग्याचं शीर्षक बनवणं, ते अतिशय कॅची असलं पाहिजे. म्हणजे काय होतं की मिपावर पडीक असणारे आद्यटवाळ प्रतिसादक, ज्यांना काही लोकं ७०% कंपूबाजही म्हणतात, ते लोकं हा धागा उघडतील. (अर्थात, या लोकांना तसंही काही काम नसतं, म्हणूनच ते पडीक असतात ना! त्यामुळे ते तसाही तुमचा धागा एकदातरी उघडून भोचकपणा* करून पहाणार.) तर अशा लोकांनी हा धागा पाहिला की त्यात त्यांना टवाळी करण्याचा अगदी हुकमी मूड आला पाहिजे. आता हे काम अगदी सोपं आहे. थोडं अशुद्धलेखन, थोडी आक्रमक भाषा, आणि थोडा आगाऊ नम्रपणा पाहिला की हे लोकं अगदी हटकून प्रतिसाद देतात. म्हणजे सुरूवातीला एखादा तास एखाददुसरा टवाळच, सॉरी पडीक मिपाकर, प्रतिसाद देईल. पण या लोकांना एकाने केलं म्हणून दुसर्याने केलं अशी काहीशी डॉमिनो इफेक्टसारखी सवय असते. त्यामुळे एकजण काहीसं संबद्ध प्रतिसाद लिहेल. मग दुसरा येऊन जास्त असंबद्ध, पण मोठा आणि गप्पाटप्पा टाईप प्रतिसाद लिहेल. आणि इथेच सुरूवात होते डॉमिनो इफेक्टची.
.... कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। त्यामुळे आधी धाग्याची शिकवणी पूर्ण करू या, नंतर जमलं तर या टवाळखोरांची, सॉरी पडीक मिपाकरांची, मानसिकता सांगते मी! तर एक ओळ कशी व्यवस्थित लिहावी हे मी सांगितलंच. जमलं तर सुरूवातीला नमस्कार-चमत्कार हेही म्हणून घ्यावं, आणखी एक पॉईंट सहानुभूती मिळवण्याचा! आता पुढे विचार करू या, कौलं फोडली तर पर्याय कसे आणायचे. ही जी काही माहिती असेल, जी खरंतर आपल्याला नाही आहे, त्याची आपण एक ओळ बनवली आहे, तिला व्याकरणाची थोडीशी फोडणी घालायची आणि तिचा बनवायचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शक्यतोवर 'हो', 'नाही' किंवा 'माहित नाही' असं असेल असाच प्रश्न बनवायचा, सोपं पडतं. शिवाय कोणाचं उत्तर आणखी काही असेल तर तो माणूस (माणूस म्हणजे पडीक मिपाकराचा आय.डी. पण म्हणायची पद्धत म्हणून माणूस म्हटलं) प्रतिसादात ते ही लिहीतो. त्यानुषंगिक आणखी दोनचार प्रतिसाद येतात. असो, प्रतिसाद खेचण्याच्या गप्पा इथे अवांतर ठरतील म्हणून त्याबद्दल जास्त लिहीत नाही. खरंतर अवांतर ठरणार नाही, कारण प्रतिसादांमधे गप्पा-टप्पा झाल्या तरच धाग्याचा खफ पूर्ण होईल.
अशा तर्हेने आपला धागा बनला की त्याचं पूर्वपरीक्षण करून, प्रकाशित करून टाकायचा धागा!
उपसंहारः खरंतर मीच लिहीणार होते, पण एक मीटींग आहे आत्ता, तिकडे फुकट चहा मिळणार आहे, तो कसा सोडायचा? फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून! तेव्हा लवकरच तिकडे पळालेलं बरं. पण हरकत नाही, काही पडीक मिपाकर या धाग्याला प्रतिसाद देतीलच. त्यातूनच तुम्हाला उपसंहार कळेल. शिवाय या पडीक लोकांकडून प्रतिसाद कसे 'खेचावेत' याचंही एक टूटोरीयल आणि धाग्याचा खफ कसा बनवावा याचं प्रात्यक्षिक याच धाग्यात होईल.
या भोचकपणाचा आपले मिपाकर भोचक यांच्याशी काहीएक संबंध नाही
21 Aug 2009 - 11:42 am | निखिल देशपांडे
ला लेख लवकरात लवकारत उडवण्यात यावा...
निखिल
================================
21 Aug 2009 - 12:13 pm | श्रावण मोडक
मानसिकता सांगते मी
खरंतर मीच लिहीणार होते
ऑं? टिंग्या, तूही?
कधी झाली शस्त्रक्रिया? पुण्यातच की बाहेर? अचानक रे/गं सगळं?
21 Aug 2009 - 12:16 pm | निखिल देशपांडे
कधी झाली शस्त्रक्रिया? पुण्यातच की बाहेर? अचानक रे/गं सगळं?
काय रे टिंग्या हा लेख तुच लिहिला होतास ना??? मग हे रे/गं चे काय प्रकरण आहे???
निखिल
================================
21 Aug 2009 - 12:19 pm | बिपिन कार्यकर्ते
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंदी झाला!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
21 Aug 2009 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टिंगीचा टिंग्या झाला का टिंग्याची टिंगी झाली?
अदिती
21 Aug 2009 - 12:40 pm | कवटी
ब्रिटिश जॅक्सन / मायकल टिंग्या यांचे हार्दीक अभिनंदन....
त्याना वाढदिवसाच्या शुभेछ्छा!!
गेट वेल सून (येवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेतून गेलाय... जरा आराम करा.)
अभारी आहे!
(कंपूबाज)कवटी
21 Aug 2009 - 2:48 pm | ब्रिटिश टिंग्या
वर्जिनल प्रतिसादाचा विषय पहा अन् मगच अकलेचे तारे तोडा!
21 Aug 2009 - 5:30 pm | श्रावण मोडक
मूळ विषय आणि त्याखालोखाल तुमचे नाव. हे पहा -
स्कॅन प्रत :
प्रेषक ब्रिटिश टिंग्या ( शुक्र, 08/21/2009 - 11:29) .
यापुढे काहीही खुलासा नाही. म्हणजे लेखक तुम्हीच.
तुम्ही पुरूष आहात अशी समजूत होती. त्यामुळं बाकी सगळं आपोआप आलंच ना.
21 Aug 2009 - 6:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ, हे टिंग्याचं पहिलं नाव टींगी होतं!
अदिती
21 Aug 2009 - 8:09 pm | छोटा डॉन
>>हॅ हॅ हॅ, हे टिंग्याचं पहिलं नाव टींगी होतं!
हॅ हॅ हॅ, +१, सहमत आहे ...
आता ह्या निमीत्ताने मी आमचे सो कॉल्ड परममित्र (म्हणजे ते मला परममित्रच मानतात, मी मानत नाही हा भाग अलहिदा ) श्री टिंग्या लॉर्ड यांच्या आंतरजालीय कारकिर्दीबद्दल ४ शब्द लिहणार आहे ...
त्यांना "मिसळपाव.कॉम"चा शोध अगदी चुकुन लागला, विदेशात असताना काही "विशिष्ठ सेवांच्या" शोधात त्यांना चुकुन पुर्वी इथे घडलेल्या त्या शब्दाचा वापर असलेल्या धाग्यांची लिंक गुगलकॄपेने मिळाली.
काही दिवस ते वाचनमात्र होते ( आता खुप काही लिहतात अशातला भाग नव्हे , असो.)
मग त्यांनी इथे कायदेशीर आय डी घ्यायचे मनात योजले, त्या काळी मिपावर "छोटा डॉन" नामक एक तडफदार, हुशार, व्यासंगी (जहांबाज कोण म्हणला बे भां** ? ) व्यक्तिमत्व होते , आजही आहे.
त्यांनी मग टिंग्यारावांना दिक्षा देऊन आपल्या नावातले "छोटा" हे विषेशण त्यांना प्रसाद म्हणुन दिले, त्याचे त्यांनी "टिंगी" पुढे लाऊन मातेरे केले हा भाग अलहिदा ...
तर पुढे मग त्यांनी खास "पुणे-३०" शैलीत तिरकस प्रतिसादांची मालिका सुरु केली व हळुहळु आंतरजालावर जम बसवण्यास सुरवात केली.
हळुहळु "छोटी टिंगी" हे नाव सर्वोमुखी झाले, ह्या आयडीची एक स्वतःची ओळख बनली. मात्र ह्याचा तोटा असा झाला की त्यांना "माझ्याशी मैत्री करणार का ? ए एस एल ( एज सेक्स लोकेशन ) ? " अशा खरडी येउ लागल्या व त्यांच्या डॉक्यावर पार शॉट निघाला.
वैतागुन त्यांनी पुन्हा नाव बदलुन घ्तले व ते "ब्रिटीश टिंग्या" असे करुन घेतले ...
मित्रांनो, नाव आणि पोषाख बदलला तरी आतले व्यक्तिमत्व तेच आहे / असते.
त्यात भारतात पुन्हा "कलम ३७७" का काय त्याला .... जाउ देत ...
असो, आज नकळतपंणे त्यांच्या निखार्यात विझुन चाललेल्या कोमल भावनांना कुठुन तरी फुंकर घातली गेली व त्यांनी उपरोक्त चुक केली व पुन्हा खर्या स्वरुपात ते प्रकट झाले.
असो.
तर असे हे आमचे मित्र "ब्रिटिश टिंग्या ... मागी असावी टिंगी " ...
------
(टिंगीचा मित्र )छोटा डॉन
14 Sep 2010 - 11:37 pm | Pain
त्यांनी मग टिंग्यारावांना दिक्षा देऊन आपल्या नावातले "छोटा" हे विषेशण त्यांना प्रसाद म्हणुन दिले, त्याचे त्यांनी "टिंगी" पुढे लाऊन मातेरे केले हा भाग अलहिदा ...
:D :D
20 Aug 2009 - 6:01 pm | सहज
पाकृ हटके आहे. खरे तर "एक्वायर्ड टेस्ट" आहे. करुन पाहील्याशिवाय कळणार नाही. मिपाकर सुनील यांना हा पदार्थ खायला तसेच इतरांना करुन घालायला भारीच आवडू लागला आहे व लिखाळपंतानी नुकताच केला होता.
जंकफूडला कितीही नावे ठेवली तरी त्यांचा खप व लोकप्रियता नाकारता येत नाही हेच खरे.
20 Aug 2009 - 6:12 pm | लिखाळ
हॅ हॅ हॅ .. कसे बोल्लात !!!!
जंकफूड ही काही पाश्चिमात्य देशांची खाद्यसंस्कृतीच आहे असा पूर्वेकडच्या काही देशांतल्या लोकांना वाटते असे आम्ही ऐकून आहोत. ;)
-- लिखाळ.
वाटते आहे, कुठेतरी वाचले आहे, अशी संदिग्ध विधाने करणार्याला म सं वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
20 Aug 2009 - 6:42 pm | चतुरंग
वाटते आहे, कुठेतरी वाचले आहे, अशी संदिग्ध विधाने करणार्याला म सं वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते
अगदी अगदी! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या लिखाळाशी चांगले सूत जमवून ठेवायला हवे चर्चेच्या रणधुमाळीत कधी सापडलास तर पाठिंब्याची चार हक्काची वाक्ये तरी लागू होतील! ;) )
(अस्पष्ट)चतुरंग
20 Aug 2009 - 9:52 pm | मिसळभोक्ता
जंकफूड वरून आठवले:
संगीत आणि काव्य यांच्या व्याख्या इथे पुर्या होतात...!
पुर्या हे एक पौर्वात्य जंकफूड आहे. त्यापेक्षा पोळ्या चांगल्या.
-- मिसळभोक्ता
21 Aug 2009 - 10:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खप हा शब्द खफ असा वाचला, आणि बराच वेळ काहीच टोटल लागली नाही. अर्थात टोटल न लागण्याची अवस्था बर्याचदा येते!!
अदिती
21 Aug 2009 - 10:54 am | छोटा डॉन
>>अर्थात टोटल न लागण्याची अवस्था बर्याचदा येते!!
खल्लास, अधोरेखित शब्दाने मनाला जोरदार टक्कर दिली ( ते भिडणे वगैरे जुने झाले भौ, टारु कसा आहेस बे , मोजा चांदण्या तिच्यायला )
बाय द वे, आमची ही अशी अवस्था बर्याचदा होते पण आम्ही ते "मान्य करत नाही" ...
अदिती, तुझा अभिमान वाटला, मीसुद्धा तुझ्या पाठीशी आहे ( आणि आणिबाणीची वेळ आली तर केव्हाही उलट्या पायाने पतल्या गलीत पळुन जाण्यासाठी सज्ज आहे ) ...!!!
------
छोटा डॉन
21 Aug 2009 - 10:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव हे वाक्य अगदी फ्लोटरपर्यंत भिडलं! अहो, शेवटी रा.को. असल्यामुळे रा.को.धर्म पाळावाच लागतो नाही का?
डान्राव, तुम्हाला माझा अभिमान वाटला या वाक्याने अगदी भरून आलं, एवढं भरून आलं की शेवटी अति झालं आणि हसू आलं!
अदिती
20 Aug 2009 - 6:07 pm | मन
चालु द्या धो धो.......
पा कृ प्रत्यक्षात बनली, की चढवा इथच.
वाट बघतोय.
आपलाच,
मनोबा
20 Aug 2009 - 6:17 pm | भोचक
(त्यामुळे ते तसाही तुमचा धागा एकदातरी उघडून भोचकपणा* करून पहाणार.)
आदिती तै, हे वाक्य वाचलं नि त्यापुढे स्टार पाहून स्वारी अंमळ धास्तावलीच होती. पण खाली डिस्क्लेमर टाकलेलं पाहिलं नि जीव भांड्यात पडला बघा. बाकी
''आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी. ही खात्री करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यासाठी आपल्या जाणीवा, नेणीवा अतिशय बोथट असणं गरजेचं आहे; महत्त्वाची आहे ती आपल्यातली उणीव.''
हे झकास. आवडलं.
प्रतिसाद देण्यासाठी रिकाम्या वेळाच्या शोधात असलेला
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
20 Aug 2009 - 7:09 pm | विनायक प्रभू
लेखावर रसेल ची अविट छाप दिसते.
20 Aug 2009 - 8:19 pm | बिपिन कार्यकर्ते
एकदा किनई म्याडम किनई इंग्लंडात असताना किनई रसेलला भेटायला गेल्या होत्या म्हणे. तेव्हा तिथे त्या कायतरी बोलल्या तर रसेल साहेबांना राग आला म्हणे. मग त्यांनी म्याडमना वीट फेकून मारली, म्याडमनी ती चपळाईने चुकवली, तेव्हापासून अशी अविट छाप आहे.
बिपिन कार्यकर्ते
20 Aug 2009 - 8:29 pm | चतुरंग
३_१४ विक्षिप्त रसेल असं ठेवलंय म्हणे! ;)
(पूर्ण विक्षिप्त)चतुरंग
21 Aug 2009 - 11:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही नाही, रसल नाही. मी इंग्लंडात गेले त्याच्या आधीच रसलसाहेबांनी चिरनिद्रा घेतली होती. मी इंग्लंडात असताना, प्रो. ब्राऊन यांना भेटायला गेले. त्यांनी मला संध्याकाळी फिरायला जायच्या वेळेस लेक डिस्ट्रीक्टमधेच बोलावलं. तेव्हा त्यांनी मला रसलविषयक तत्त्वज्ञान सांगितलं आणि मी त्यांचं म्हणणं अमान्य केलं म्हणून मला त्यांनी एक चिखलाचा गोळा फेकून मारला. तो नेमका माझ्या फ्लोटर्सना लागला. तेव्हापासून मी प्रो. ब्राऊन यांचं नाव प्रो. काळे असं ठेवलं.
अदिती (सामंत)
20 Aug 2009 - 8:16 pm | वेताळ
+१ सहमत.
वेताळ
20 Aug 2009 - 8:43 pm | उमराणी सरकार
सदर लेख गर्दी खेचण्यात यशस्वी होणार असे वाटते आहे. पण आपल्याला काय तडकते फडकते सापडले नाही राव यात.
उमराणी सरकार
20 Aug 2009 - 8:48 pm | छोटा डॉन
>>काही चित्रपट सुमार असुनही गर्दी कशी खेचतात याचे आकलन करतो आहे.
=))
अहो, व्यवसायिकतेची गणिते वेगळी असतात सरकार ...
त्याचे रसायन अद्याप कुणालाच समजले नाही ;)
असो, लेख उत्तम आहे.
हा प्रतिसाद केवळ "पोच" समजावी, बाकी सविस्तर आणि अवांतर उद्या "ऑफीसच्या वेळेत" खरडेन कारण तेव्हा मी पडिक मिपाकर असतो ...
हा प्रतिसाद १ / २० समजावा .. ;)
------
(क्रमश : मार्केट अॅनालिस्ट ) छोटा डॉन
21 Aug 2009 - 4:34 am | उमराणी सरकार
डॉन, २/२० ची वाट पाहतो आहे.
उमराणी सरकार
20 Aug 2009 - 9:50 pm | मिसळभोक्ता
ह्या नात्याने, विषयांतरासाठी प्रतिसादाची जागा राखून ठेवत आहे.
आणि चांदण्यांचा सात-बारा ही कविता लिहायला घेतो.
-- मिसळभोक्ता
21 Aug 2009 - 12:03 am | पिवळा डांबिस
:)
:)
:)
अय्या!!
मस्तच आहे गं तुझी पाककृती!!!
करायलाही अगदी सोप्प्पी दिसते आहे!!
आमच्या घरी पण ही होते पण ती अशी खमंग कधी होत नाही. कदाचित कौलांचं प्रमाण कमी पडत असावं...
आता तुझ्या रेसेपीप्रमाणे करून बघीन हं!!!
:)
21 Aug 2009 - 1:11 am | अनामिक
काका.. "चला या विकांताचा प्रश्न सुटला बाई!" हे राहिलंच की.
-अनामिक
21 Aug 2009 - 8:53 am | विंजिनेर
=)) =)) =))
21 Aug 2009 - 9:38 am | पिवळा डांबिस
हो, ते राहिलंच बाबा!!!!
:)
21 Aug 2009 - 10:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या,पिडाकाका तुम्हीपण प्रयोग करणार या पाकृचा? नक्की करा हं, आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा अनुभव नक्की सांगा!
अदिती
21 Aug 2009 - 8:44 am | पाषाणभेद
पाकक्रुती मस्त. दुपारपर्यंत शिळी होवू नये म्हणून लगेचच खाल्ली.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
21 Aug 2009 - 9:34 am | विशाल कुलकर्णी
अदितीतै...
बालकाचा साष्टांग दंडवत ! आपण धन्य आहात!
अशी सर्वांगसुंदर पाकृ दिल्याबद्दल आम्ही आपले तहहयात ऋणी राहू!
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 11:32 am | स्वाती दिनेश
शिळी पुपो जशी जास्त छान लागते तशी ही शिळी पाकृ ही छान लागली,
मस्त लिहिले आहेस अदिती,
स्वाती
21 Aug 2009 - 11:36 am | महेश हतोळकर
५० वा प्रतीसाद माझा!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
21 Aug 2009 - 11:58 am | शाहरुख
बाई चावट, मिश्किल, अवखळ, कडक तसेच हुशार दिसतायंत !!
(घाबरलेला) शाहरुख
21 Aug 2009 - 5:30 pm | चित्रा
गाय मोकाट सुटलेली दिसते आहे!
पाककृती छान आहे. पूर्वतयारी झालेलीच आहे ;) आता करून पाहीन.
21 Aug 2009 - 6:06 pm | स्वाती२
झकास पाककृती .
14 Sep 2010 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
सध्याचे काही धागे पाहुन ह्या पाकॄची प्रकर्षाने आठवण होत आहे.
14 Sep 2010 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही पाकृ कशी करावी याचं सोदाहरण, स्पष्ट प्रात्यक्षिक देणार्या सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
14 Sep 2010 - 10:56 pm | राजेश घासकडवी
मस्त लेख. तरल विनोद.
जुना लेख दिसतोय... तेव्हा गाड्या, डायवर, स्टेपन्या, सैपाक, पूजा असे विषय नव्हते बहुतेक. :)
17 Sep 2010 - 11:50 pm | चतुरंग
'दिवे' लागलेले नव्हते! ;)
17 Sep 2010 - 4:24 pm | पैसा
आणखी एक वर्षाच्या अनुभवानंतर अदिती म्याडमनी पुढचा धडा शिकवावा अशी मी सगळ्या नव्या अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांतर्फे विणंती करते.
(इतर कोणाला धाग्याचा खफ/धाग्याचं बंडल करायचं असेल तर "आम्हाला" फक्त पॉपकॉर्न पुरवावे लागतील. भराभर ८/१० प्रतिसाद आलेले पाहून इतर मंडळी तिकडे आकर्षित होतीलच होतील. "आमची" ग्यांग सध्या लहान असलेमुळे पेश्शल डिस्काउंट देण्यात येईल)
10 May 2012 - 3:59 pm | परिकथेतील राजकुमार
सतत ह्या धाग्याची आठवण येत असल्याने धागा वर काढला आहे. काही उपप्रतिसादी लेखकुंना प्रतिक्रियांची संख्या वाढवण्यासाठी अजून हातभार लागावा अशा निर्मळ इच्छेने धागा वर आणतो आहे.
10 May 2012 - 5:13 pm | कवितानागेश
जर सर्वांचं जमत असेल तर मग कोणत्याही परिस्थितीत सभासद एकमेकांना त्रास देतील कारण दोघातलं भांडण हीच तर आंतर्जालावरची मजाये.
आंतर्जाल हा समग्र जीवनाचा (सकाळ ते संध्याकाळ) विचार करून माणसानं लावलेला अत्यंत बुद्धीमान शोध आहे असं मी मानते.
तुम्हाला इंटरेस्ट असेल तर याविषयीचे माझे विचार मी इथे मांडलेत http://www.misalpav.com/comment/reply/9026/
______________________
जे चावते तेच गिळते