गाभा:
इषय नाजूक हाय. पण समद्यांस्नी निगडित हाय. म्हून म्हटलं पाह्य जरा मिपावर टाकून. म्हंजी कलंय समद्यास्नी. म्हंजी इषय तसा आपल्या पुरषांच्या बाजूचाच हाय. त्या तिकडं पार अफगाणिस्तानात म्हणं बायकांस्नी नवऱ्याला "नाय' म्हटली की तिला पार काइच खायला द्यायचं नाय. म्हंजी तसा कायदाच पास झालाय म्हंत्यात. खरं काय त्ये म्हाइत नाई बुआ अपल्येला.
पण असं असल, तर जरा वाइट म्हणावं की. नाइ का?
http://beta.esakal.com/2009/08/16231320/international-new-sharia-law-i.html
प्रतिक्रिया
17 Aug 2009 - 12:02 am | शाहरुख
समद्यांस्नी निगडित कसा वो ?? अफगानचं कोन हाय हिथं ?
आनि आपल्याकडं बाप्यानी "नाय" ला "नाय" केलं तर खायाला बी नाय मिळायचं :D
17 Aug 2009 - 12:05 am | अन्वय
आर्रर्र चुकलं वाटत्ये.
17 Aug 2009 - 12:21 am | टारझन
वेळ जात नाहीये का अन्वय राव ?
* अवांतर : काय टिकीट काय आहे अफगाणिस्तानच ? *
-(चमत्कारी) टारझुद्दीन अल्लाऊद्दिन फकिरुद्दिन मोहोम्मदुद्दिन हिनकसुद्दिन ग्यासुद्दिन तात्याउद्दिन डॉनुद्दिइन बिपिनुद्दिन डांबिसुद्दिन नानुद्दिन धमुद्दिन खलबत्ते ( पाटिल )
17 Aug 2009 - 12:28 am | अन्वय
वेळ जात नाहीये का अन्वय राव ?
* अवांतर : काय टिकीट काय आहे अफगाणिस्तानच ? *
-(चमत्कारी) टारझुद्दीन अल्लाऊद्दिन फकिरुद्दिन मोहोम्मदुद्दिन हिनकसुद्दिन ग्यासुद्दिन तात्याउद्दिन डॉनुद्दिइन बिपिनुद्दिन डांबिसुद्दिन नानुद्दिन धमुद्दिन खलबत्ते ( पाटिल )
यावर हसण्यापलिकडे काहीच उत्तर नाही माझ्याकडे
तुझं टायमिंग कमाल आहे राव
17 Aug 2009 - 2:14 am | अनामिक
बघा.... भारतातल्या प्रमाणे ते लोक सप्तपदी करत असते तर प्रश्नच नव्हता ना राव!
-अनामिक
17 Aug 2009 - 6:46 pm | घोडीवाले वैद्य
बघा, आले भारतीय संस्कृतीचे कैवारी
17 Aug 2009 - 7:16 pm | अन्वय
लंडन - शरीरसंबंधास नकार देणाऱ्या पत्नीला उपाशी ठेवण्याचा अधिकार अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांना आता कायद्याने प्राप्त होणार आहे. नव्या कायद्यानुसार, मुलांचे पालकत्वही केवळ वडील आणि आजोबांना देण्यात येणार असून, महिलेला काम करण्याची परवानगी पतीकडून घ्यावी लागणार आहे.
बलात्कार करणाऱ्यांनाही नव्या कायद्यानुसार मोकळे रान मिळणार आहे; कारण बलात्कारित मुलीला विशिष्ट रक्कम (ब्लड मनी) देऊन खटला टाळता येणार आहे. या कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. अमेरिकेतील "ह्युमन राइट्स वॉच' या संस्थेच्या हवाल्याने "द गार्डियन'ने याबाबत वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. या कायद्याच्या प्राथमिक मसुद्यात विवाहांतर्गत बलात्कार कायदेशीर करण्याची तरतूद होती. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी जगभरातील नेत्यांच्या सुरात सूर मिसळून या मसुद्याचा निषेध केला होता. अशा तरतुदी कायद्यातून वगळण्याची तयारी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई यांनी त्या वेळी दिली असली, तरी नव्या कायद्यात अनेक तरतुदी कायम असून, या तरतुदी अफगाणिस्तानची घटना; तसेच देशाने स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय करारांच्याही विरोधात असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
येत्या गुरुवारी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने काही समुदायांना संतुष्ट करण्याचा करझईंचा प्रयत्न आहे. कट्टर शियापंथीय नेता आयातुल्ला मोहसेनी याचा या कायद्याच्या मसुद्यावर प्रभाव असून, शियापंथीयांच्या सुमारे वीस टक्के लोकसंख्येची मते त्याच्या हातात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दुवा जोडण्यात अडचणी येत असल्याने ही बातमी.