गाभा:
महाराष्ट्र राज्याचे शेती मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी मर्दुमकी दाखवण्याचा सोसापायी नागपूरच्या महाराजबागेत केलेल्या या अचाट शक्तीच्या पुचाट प्रयोगाविषयीची वार्ता इथे पाहिली. या मंत्रीमहोदयांनी म्हणे वाघाच्या कक्षात प्रवेश करून त्याच्या अंगावरून हात फिरवतांना फोटो काढवून घेतले, अर्थात त्यासाठी बरोबर सशस्त्र रक्षक आणि इतर पित्ते न्यायला ते विसरले नाहीत! या प्रकारात वन्यप्राणीविषयक कायदे तर नक्कीच धाब्यावर बसवले गेले आहेत, पण त्या वाघाने हल्ला केला असता तर त्याला काय गोळी घातली असती?
भेदरलेला वाघ, आणि त्याच्याशी जवळीक 'दाखवणारे' मंत्रीमहोदय!
प्रतिक्रिया
17 Aug 2009 - 8:32 am | दशानन
मला त्या बिबळ्याचे नवल वाटत आहे..... रोजचेच चिकन / मटण सोडून नवी डिश स्वतः त्याच्या जवळ आली असताना तो का पुळचटासारखा गप्प बसला :?
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
17 Aug 2009 - 8:46 am | प्रभाकर पेठकर
कदचित बिबळ्याला, मंत्री महोदयांच्या भावनिक निब्बरते बरोबरच शारीरिक निब्बरताही आली असावी असा, संशय आला असावा.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
17 Aug 2009 - 8:54 am | दशानन
हा हा !
खरं आहे काका..
व हा बिबट्या काय ह्या नेते मंडळी सारखा निर्ढावलेला नाही आहे ना... जे समोर आले ते खा खा.. तो बेचारा पोट भरल्यामुळे गप्प बसला असेल ;)
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
17 Aug 2009 - 9:36 am | विशाल कुलकर्णी
त्या बिबळ्याचा झायीर णिषेद ! उभ्या महाराष्ट्रावर डोंगराएवढे उपकार करुन ठेवण्याची संधी उपलब्ध झाली असताना निष्क्रिय राहणार्या त्या मुर्ख बिबळ्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!
17 Aug 2009 - 9:27 am | शैलेन्द्र
बाळासाहेब थोरातांची खासियत म्हणजे नेहमी हातात असलेला मोबाईल फोन. इथेही पहा...
मला वाटतं फक्त बाथरुममध्ये ते त्याला डाव्या हातातुन ऊजव्या हातात घेत असावेत.
17 Aug 2009 - 9:53 am | झकासराव
मित्रहो फोटोत बिबळ्या दिसत नाहिये.
तो पट्टेरी वाघ आहे. त्याच वय देखील बरच कमी असाव. छोटा दिसतोय.
बाकी बातमीबद्दल काय बोलणार?
एक आठवल ह्यावरुन.
आमच्या कोल्हापुरचे (मौनी)माजी खासदार साहेब श्री उदयसिंगराव (इच्छुकानी नावाची खात्री करुन घ्यावी. मी शाळेत असल्याच्या वेळची गोष्ट असल्याने मला नाव अंधुकस आठवतय) गायकवाड ह्यांच्या घरी वाघोबा होते. त्यानी पाळलेला बाघोबा होता तो. पुर्ण वाढ झालेले. पट्टेरी. त्यावेळी वन्यजीव कायदा काय होता ते माहित नाही.
अजुन एक आठवलं. आईने सांगितलेली एक आठवण.
माझ्या जन्माच्या देखील आधीची. १९८० पुर्वीची. पन्हाळा तालुक्यात आमच गाव. तिकडे गावाशेजारच्या डोंगरात बिबट्या दिसला होता. एखादी गाय, म्हैस देखील त्याने मारली असावी. गावतल्या बर्याच धाडसी तरुणानी त्यावेळी मिळेल ते हत्यार घेवुन त्या बिबट्याला मारला होता. त्यावेळी पन्हाळ्याच्या फौजदार साहेबानी सगळ्या गड्यांच लयी कौतुक केल. आणि तुमची हत्यारं दाखवा अस सायेब बोल्ले. सगळे गडी लयी खुष. सगळी हत्यारं दुनाळी बंदुकीसहीत नंतर पन्हाळ्याच्या चौकीत जमा झाली होती. परत मिळाली नाहित कधीच.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Aug 2009 - 10:17 am | चिरोटा
भेदरलेला दिसतोय. सध्याच्या काळात माणसे(त्यातही राजकारणी)वन्य प्राण्यापेक्षाही हिंसक झाल्याने तो घाबरला असावा.
पुण्यात वि.ग्.पुर्णपात्रे ह्यांच्याकडे 'सोनाली' नावाची सिंहिण होती. पॉमेरियन कुत्री रुपाली,नात दिपाली आणि सोनाली एकत्र खेळत(सुरक्षारक्षकांशिवाय!).सोनाली मोठी झाल्यावर तिला पेशवे पार्कमध्ये नेण्यात आले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
17 Aug 2009 - 12:58 pm | शैलेन्द्र
पुर्णपात्रे पुण्यात नाही तर जळ्गावला रहायचे... एक धडा होता मराठी पुस्तकात, " सोनाली"
17 Aug 2009 - 6:59 pm | विकास
पुर्णपात्रे पुण्यात नाही तर जळ्गावला रहायचे... एक धडा होता मराठी पुस्तकात, " सोनाली"
मला आठवते त्याप्रमाणे चाळीसगावची ही "कहाणी" आहे.
17 Aug 2009 - 7:08 pm | चिरोटा
माझ्यामते गावाचा उल्लेख नव्हता. पण तिला पेशवे पार्कमध्ये सोडले असे होते.म्हणुन वाटले पुर्णपात्रे पुण्याचे!.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
18 Aug 2009 - 9:37 pm | शैलेन्द्र
चाळीसगाव शक्य आहे, पण पुणे नाही...
पण तिला पेशवे पार्कला सोदले हे खरे.
(बघा किति अभ्यास करयचो मी)
17 Aug 2009 - 11:38 am | तिमा
अहो, मूर्ख नाहीत, हुशार आहेत ते! त्यांना हे दाखवायचे आहे की राजकारणातले (कागदी) वाघ पण आमच्याच कह्यात आहेत. किंबहुना, आम्हीच त्यांना पाळले आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
17 Aug 2009 - 1:03 pm | अविनाशकुलकर्णी
वाघाला वराह फ्लु झाला का बघायला हवे
17 Aug 2009 - 7:01 pm | विकास
हे अजून वर... ~X(
"मी ज्या वाघाच्या पिंजऱ्यात गेलो तो वाघ माणसाळलेला आहे. तेथील कर्मचारी त्याची अतिशय प्रेमाने देखभाल करतात. अगदी त्याचे केस विंचरण्यापासून सर्व कामे ते करतात. मीही त्या वाघाला कसलाच त्रास दिला नाही. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. वाघावर प्रेम केल्याने कोणत्याच कायद्याचा भंग होत नाही. तरीही टीका का झाली हे मलाही समजलेले नाही,'' अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी 'ऍग्रोवन'शी बोलताना व्यक्त केली.. (उरलेली बातमी हौस असल्यास येथे वाचावी!)
17 Aug 2009 - 11:21 pm | विकास
वरील बातमीत असेही म्हणले आहे:
मला कळत काय नाही की, कृषीमंत्र्यांचा आणि प्राणिसंग्रहालयाच्या समस्यांचा नक्की काय संबंध? (ते जर आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात गेले असले तर, मग समजू शकते...)
18 Aug 2009 - 12:02 am | श्रावण मोडक
एक संबंध जोडलेला आज वाचला - थोरात हे कृषी मंत्री आहेत. नागपूरच्या त्या उद्यानाची व्यवस्था करण्याची जबाबदारी पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आहे. या विद्यापीठाचा काही कार्यभार कृषी मंत्र्यांकडे त्यांच्या पदानुसार येतो. त्यामुळे...
सबबीच या, बाकी काही नाही. झालाय तो घोळच.
18 Aug 2009 - 12:26 am | विकास
या विद्यापीठाचा काही कार्यभार कृषी मंत्र्यांकडे त्यांच्या पदानुसार येतो. त्यामुळे...
पिंजर्यात जाणे नाही पण बाकी त्यांचा काय संबंध हे थोडे तरी योग्य आहे. It makes sense असे निदान तेव्हढ्यापुरते बोलता येऊ शकते. :-)
17 Aug 2009 - 7:39 pm | ऋषिकेश
तो वाघ खरा आहे का ? मला तर पेंढा भरलेला वाटतो आहे ;)
बाकी महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांचे नाव माहित नव्हते ते सांगितल्याबद्दल आभार
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ३८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बालगीत "शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा...."
17 Aug 2009 - 9:05 pm | अनिल हटेला
बाकी महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांचे नाव माहित नव्हते ते सांगितल्याबद्दल आभार
अगदी सहमत......
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
18 Aug 2009 - 12:59 pm | मिसळभोक्ता
पण वाघाला जर काहीच प्रॉब्लेम नाही, तर टीकेचे कारणच काय मी म्हणतो ?
बकरीच्या पिंजर्यात तो मंत्री गेला, तर चर्चा होईल का ?
-- मिसळभोक्ता
18 Aug 2009 - 1:05 pm | सहज
>बकरीच्या पिंजर्यात तो मंत्री गेला, तर चर्चा होईल का ?
डिपेंड्स
तो फोटो कसा येइल यावर
18 Aug 2009 - 1:07 pm | मिसळभोक्ता
महाराष्ट्राच्या शेतीमंत्र्याला बकरीच्या पिंजर्यापेक्षा वाघाच्या पिंजर्यातच डिपेण्ड्सची गरज अधिक भासेल.
-- मिसळभोक्ता
18 Aug 2009 - 1:09 pm | सहज
चर्चा सुरू. तरीच तुम्हाला छायाचित्रांशी दुश्मनी...
18 Aug 2009 - 4:08 pm | रेवती
ही ही ही!
काहीपण....
रेवती
19 Aug 2009 - 1:16 am | Nile
कोण म्हणतं वाघाला प्रॉब्लेम नाही?
18 Aug 2009 - 1:12 pm | छोटा डॉन
काय हो, समजा वाघाला लिहता वाचता येत असते तर त्याने एका छायाचित्राचे १००० शब्दात वर्णन करणारा प्रतिसाद लिहुन मा.मंत्रींसाहेबांची तंतारली असती का ?
तशीही त्याचे "प्रतिसाद देण्यासाठी वाघ असणे गरजेचे आहे" ही प्रिरिक्वसिट पुर्ण केली आहे ;)
------
छोटा डॉन
वाघ प्रतिसाद देत नाही, तो फक्त फोटो काढुन घेतो.
प्रतिसाद कोण देतात हा मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.
18 Aug 2009 - 1:15 pm | मिसळभोक्ता
डान्या,
तुझी हिष्ट्री बघता, तू वाघालापण १००० शब्दांचा प्रतिसाद देऊ शकशील. पण त्यासाठी वाघाने साद देण्याची वाट बघ. आणि डिपेण्ड्स विसरू नकोस.
-- मिसळभोक्ता
19 Aug 2009 - 7:38 am | बहुगुणी
NDTV च्या वृत्तानुसार, केंद्रीय पर्यावरणमंत्री जयरामन यांनी थोरातांना वाघोबाचं साहस महागात पडेल असं म्हंटलय! सहा महिने तुरुंगवास आणि २००० रु. दंड!
19 Aug 2009 - 8:00 am | पाषाणभेद
आता थोरात जेल मध्ये असतांना वाघाच्या बछड्याला त्याची भेट घ्यायला पाठवायला पाहिजे अन तो फोटो काढायला पाहिजे.
अवांतर: सलमानच्या काळवीट शिकारीच्या केसचे व बाबाराव(??) अत्रामच्या शिकारीच्या केस चे काय झाले?
न्यायदेवता (??) डोळस आहे काय? की तिला जाणून बुजून आंधळी बनवलीय?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
19 Aug 2009 - 11:50 am | झकासराव
ह्या बातमीवरुन स्टार न्युज काल जागी झाली. त्यानी तो व्हिडिओ दाखवला. त्यात तुम्ही बघा एका क्षणी वाघाचा बछडा (अहो पुर्ण वाढ झालेला वाघ बघुनच ततपप होत. फोटु काय काढुन घेणार)थोडासा हलला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर मंत्रीमहोदय एका सेकंदाच्या आत त्यांच्या जागेवरुन उठुन ५ फुट लांब गेले होते आणि त्या वाघला शांत करण्यासाठी त्या संग्रहालयातील व्यक्ती लग्गेच सरसावली.
खरच तो व्हिडिओ बघाच. त्या क्षणात मंत्री महोदयांच्या चेहर्याकडे लक्ष द्या की झाले. :)
19 Aug 2009 - 9:04 pm | नितिन थत्ते
भारत: माणसाच्या हक्कांपेक्षा प्राण्यांच्या हक्कांविषयी जागरूक असणारा आणि त्यांची अंमलबजावणीसुद्धा करणारा देश. :)
नितिन थत्ते
19 Aug 2009 - 9:09 pm | अविनाश ओगले
वाघाबरोबर फोटो काढायची हौस होती तर महाराष्ट्रात विठ्ठल वाघ, मोहन वाघ होतेच की! तिकडे गोव्यात विष्णु सूर्या वाघ नावाचा ढाण्या वाघ आहेच. या बिबळ्याला त्रास का?
23 Aug 2009 - 9:20 am | विकास
कृषिमंत्री नव्हे अधिकारी दोषी - सचिव शर्मा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 23rd, 2009 AT 12:08 AM
Tags: nagpur, tiger, balasaheb thorat, zoo
Close...
नागपूर - "वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन फोटोसेशन करणे अयोग्यच तथापि या प्रकरणात कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची चूक नाही, तर व्यवस्थापनाने त्यांना तेथे नेऊन चूक केली आहे.' असे मत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे सचिव पी.आर. शर्मा यांनी नोंदविले. अधिकाऱ्यांचा बळी घेऊन मंत्र्यांना मोकळे सोडले जाण्याची शक्यता या विधानावरून व्यक्त होत आहे.
राज्याचे कृषिमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात स्वातंत्र्यदिनी महाराज बागेतील वाघाच्या पिंजऱ्यात गेले. तेथे त्यांनी वाघाच्या पिल्ल्याला गोंजारले. त्यांच्या या कृतीचा वन्यजीव प्रेमींनी निषेध केला होता. हे प्रकरण पेटले होते. प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने चौकशी सुरू केली होती. तथ्य जाणून घेण्यासाठी सचिव शर्मा आज नागपुरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. (अधिक बातमी)
23 Aug 2009 - 10:00 am | बहुगुणी
आधी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम यांनी 'आम्ही नागपूर झू च्या आधिकार्यांचा खुलासा ऐकणार नाही, central zoo authority (CZA) तर्फे चौकशी होईलच, आणि दोषी आढळले तर थोरातांना शिक्षा होईल' असं सांगितलं. काल थोरातांनी जयरामांना दूरध्वनी करून चूक केल्याचं मान्य करून दिलगिरी व्यक्त केली, आज CZA ने चौकशीअंती थोरातांची चूक नसल्याचा निर्णय देऊनही टाकला! धत् तेरी तो!!सगळेच चोर! आता त्या आक्षेप घेणार्या नागपूरच्या प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचार्याची परवड झाली नाही तर नशीब!
23 Aug 2009 - 10:54 am | देवदत्त
आता त्यांनी चूक मान्य केली आहे. एक एक राजकारणी... आणखी काय....
येथे वाचा.