एक प्रश्न माझाही .....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in काथ्याकूट
13 Aug 2009 - 5:23 pm
गाभा: 

विमुक्तांचं एक कोडं वाचताना मलादेखील लहानपणी कायम पडणारा एक प्रश्न आठवला. (त्याचं उत्तर मला आजही अज्ञात आहे)
प्रश्न असा आहे.

पाण्याची रासायनिक संज्ञा आहे H2O, यापैकी ऑक्सीजन हा ज्वलनास मदत करतो आणि हायड्रोजन स्वतःच ज्वलनशील आहे.
मग हे दोघेही ज्वलनाला मदत करणारे असे घटक असताना पाणी जळत का नाही?

(इथे थट्टेचा विचार नसुन ही एक प्रामाणिक शंका आहे.)

विशाल.

प्रतिक्रिया

टारझन's picture

13 Aug 2009 - 5:40 pm | टारझन

साधं आहे ... हायड्रोजनला (अ‍ॅटॉमिक नंबर १) ऑक्टेट पुर्ण करण्यासाठी पहिल्या कक्षेत १ अणु लागतो , आणि ऑक्सिजनला (अ‍ॅटॉमिक नंबर ८) (पहिल्या कक्षेत २ , दुसर्‍या कक्षेत ६ ) ऑक्टेट पुर्ण करण्यासाठी दुसर्‍या कक्षेत दोण अणु लागतात , आता दोन हायड्रोजन्स आणि एक ऑक्सिजन मिळाले की दोघांची कमी पुर्ण होते .. आणि ते "कंप्लिट्ली सॅटीस्फाईड" होतात .. आणि त्यांना आता विनाकारन जळण्याची गरज भासत नाही , तात्पर्य दोघे एकमेकांत तल्लीण होतात ... आणि ज्वलणाला मदत करत नाहीत ...

बोळा तुंबला की माणुस अशीच जळजळ करतो म्हणे ;)
प्रतिसादसार :- पुरक गोष्टी मिळणे आवश्यक

- (पाणीप्रेमी) टारोबा वॉटर

लिखाळ's picture

13 Aug 2009 - 5:45 pm | लिखाळ

हि& हि पणातून विज्ञान शिकवणार्‍या टार्‍याचे कौतुक :)
>>प्रतिसादसार :- पुरक गोष्टी मिळणे आवश्यक<<
हा हा हा ... :)

(जास्त आगीमध्ये थोडे पाणी टाकले तर कार्ब मोनोक्साईड की कायतरी तयार होऊन ज्वलनाला अधीक मदत होते असे शाळेत शिकलेले स्मरते आहे.)
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

विजुभाऊ's picture

14 Aug 2009 - 9:12 am | विजुभाऊ

(जास्त आगीमध्ये थोडे पाणी टाकले तर कार्ब मोनोक्साईड की कायतरी तयार होऊन ज्वलनाला अधीक मदत होते असे शाळेत शिकलेले स्मरते आहे.)

त्याला कोल ग्यास म्हणतात. तो स्वतःच ज्वलनशील असतो

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 5:45 pm | विशाल कुलकर्णी

डोक्यावरुन गेलं देवा ! थोडं सोपं करुन सांगाल का?

(१२ वी चेमिस्ट्री कसाबसा पास झालेला)
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

हेरंब's picture

13 Aug 2009 - 7:58 pm | हेरंब

अणु नव्हे इलेक्ट्रॉन्स् !!

टारझन's picture

13 Aug 2009 - 9:28 pm | टारझन

हो हो तेच ते ... घाईघाईत प्रतिक्रिया दिली होती , संभाळून घेणे ...
ते काय आहे ना .. अणु-रेणु डोक्यात आल्या .. :) तेंव्हा मी लहाण होतो ,.... अणु-रेणु ची आई मला राजकुमार म्हणे ...
मीच तो राजपुत्र.
मला पहील्या पावसाचे खुपच आकर्षण होते.
चाळीतल्या गजाच्या खिडकीवर उभा राहुन मी पहील्या पावसाची वाट बघायचो.
राजपुत्राचे शेजारी पंजाबी घर होते.
फाळ्णीत कराचीमधुन पळुन आलेले.
त्या घरात अणू - रेणु रहायच्या
राजपुत्राच्या जिवलग मैत्रीणी.
आणू-रेणुच्या आईच्या पायात एक जाड तांब्याचे कडे होते. राजपुत्राला ते फार आवडायचे. जणु शंकराचाच अवतार ..
अणु-रेणूच्या आईलासुद्धा राजपुत्रावर खुप लोभ होता. ११ इंच उंचीच्या चांदीच्या पेल्यात जाड जाड लस्सी मिळायची राजपुत्राला.
'जमाइ राजा' म्हणायची आणू-रेणूची आई.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र .... हे कुठे सुरू झालं अणु-रेणूच्या नादात ?
सांगण्याचा मुद्दा असा हेरंब साहेब... अणु-रेणू ह्या दोन हायड्रोजन्स होत्या आणि मी बापडा ऑक्सिजन !! H2O ... H2O आलं हो ...... डोळ्यातुन ...
आणि तुम्ही कसले शब्द पकडून बसलात ?

- तेरंभ

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 10:53 pm | मिसळभोक्ता

अणुरेणिया थोकडा, टार्‍या आभाळा एवढा...

-- मिसळभोक्ता

शैलेन्द्र's picture

13 Aug 2009 - 11:05 pm | शैलेन्द्र

अरे पण मग बत्ती कशी लागली? पाण्याची वाफ कशी झाली? झाली तर झाली, जळाली का नाही?

आणि आता परत तु दोन हायड्रोजन शोधतोयेस कि एक पुरेल?

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2009 - 11:59 pm | llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

हाण च्यामायला. टार्‍या त्या तिथे दुवा लावण्यापेक्षा 'टर्बू खाज्तर'ला भेटा असे लिहायचे होतेस रे....

पुण्याचे पेशवे
या प्रतिसादाला ४ चांदण्या मिळायलाच पाहीजेत.
Since 1984

टारझन's picture

14 Aug 2009 - 12:30 am | टारझन

टार्‍या त्या तिथे दुवा लावण्यापेक्षा 'टर्बू खाज्तर'ला भेटा असे लिहायचे होतेस रे....

टर्बू खाज्तर णव्हे ... 'भयानक भुभु" म्हणा पेशवे साहेब . . . . दुवा न दिल्याने नविन पब्लिकला आपण काय बोलतो ह्याचे संदर्भ लागत नाही असं जनरल डायर म्हणतो रे ;)

-भयानक भुभु

विजय भांबेरे's picture

13 Aug 2009 - 8:57 pm | विजय भांबेरे

झकास ..................!

शैलेन्द्र's picture

13 Aug 2009 - 11:15 pm | शैलेन्द्र

पण सरकारने हल्लि दोन हायड्रोजनपण कायदेशिर केलेत.. ते "कंप्लिट्ली सॅटीस्फाईड" होतात का?

(बेकायदेशिर शैलेंद्र.)

कपिल काळे's picture

13 Aug 2009 - 5:42 pm | कपिल काळे

जय टारोबा, जय गूगल!!

टारझन's picture

13 Aug 2009 - 5:45 pm | टारझन

ख्या ख्या ख्या मी आठवी णव्वीत असताना गुगल जणमला नव्हता ;)

असो .. जय काळोबा , जय जळोबा !
(ह.घ्या हो .. )

- (हिणकस) टारझन

स्वाती दिनेश's picture

13 Aug 2009 - 6:07 pm | स्वाती दिनेश

पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या २ मूलद्रव्यांपासून बनलेले संयुग आहे आणि संयुग तयार होताना घटक मूलद्रव्याचे मूळ गुणधर्म लोप पावतात व नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो.पाण्याप्रमाणेच मीठ,साखर ह्या संयुगांबाबतही असेच म्हणता येईल.
स्वाती

अवलिया's picture

13 Aug 2009 - 6:26 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

टारोबांचा दणदणीत विजय असो... :)

--अवलिया

कानडाऊ योगेशु's picture

13 Aug 2009 - 6:35 pm | कानडाऊ योगेशु

एखाद्या गोष्टीचे ज्वलन झाल्यानंतर ज्याप्रमाणे राख बनते तसाच प्रकार हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यावर होतो.
हायड्रोजनचे ऑक्सिडायझेशन होते आणि पाणी तयार होते.
म्हणजेच हायड्रोजन जळाल्याने जी राख बनते ते म्हणजे पाणी..

हेरंब's picture

13 Aug 2009 - 7:55 pm | हेरंब

यातले टारझन व स्वाती यांचे उत्तर बरोबर आहे.
टारझन यांनी रसायनशास्त्राच्या थिअरी प्रमाणे पण नर्मविनोदी उत्तर दिले आहे तेच स्वाती यांनी सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.दोघांचेही अभिनंदन.

---- हेरंब(रसायनशास्त्रात शून्य नसलेला)

दादा कोंडके's picture

13 Aug 2009 - 9:46 pm | दादा कोंडके

हो स्वाती यांचे उत्तर बरोबर आहे. रासायनिक संरचना बदलली की गुणधर्म बदलतात.
याच्याच पुढं जाउन, विश्वातल्या (आत्तपर्यंत ज्ञात असलेल्या) प्रत्येक पदार्थ काही "फंडामेंटल पार्टीकल्स" पासून बनला आहे. म्हणजे समजा तुमच्या कडे काही प्रोटॉन, ईले़ट्रॉन वगैरे आहेत. तर प्रिन्सिपली, त्यातून तुम्ही पाहिजे तो पदार्थ बनवू शकता.
हिरा आणि कोळसा हे दोन्ही कार्बन पासून बनलेले आहेत.

"I always win, except when I loose. But then I just don't count" :D

Nile's picture

14 Aug 2009 - 12:01 am | Nile

LMGIFY-D.

बेसनलाडू's picture

14 Aug 2009 - 1:25 am | बेसनलाडू

त्याच्या घटक मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात, ही संयुगाची मूलभूत 'कॅरॅक्टरिस्टिक्' आहे. ती तशी का याचे उत्तर अधिक शोधून सापडेलच. पाणी हे संयुग; घटक मूलद्रव्ये ऑक्सिजन् व हायड्रोजन्. उत्तर मिळाले असेल, अशी आशा आहे.
(भौतिकशास्त्री)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

14 Aug 2009 - 9:14 am | विजुभाऊ

पाणी हे हायड्रोजनचे ऑक्साईड आहे. बहुतेक ऑक्साईडस ज्वलनाला मदत करीत नाहीत

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

विशाल कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी

ठांकु बर्का मंडळी !

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!