भारतीय सैन्याचे, आणि पर्यायी, भारताचे अभिनंदन !!!
http://www.nytimes.com/2009/08/11/world/asia/11korea.html
उत्तर कोरियाचे एक जहाज अंदमान निकोबार जवळ भारतीय सागरी सीमेत आल्यामुळे भारतीय सैन्याने ते अडवून धरलेले आहे, आणि किरणोत्सारी पदार्थांसाठी त्या जहाजाची चाचणी सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाचे जहाज अडवू म्हटल्यानंतर, किम जाँग इल ने ती कृती युद्धसापेक्ष मानली जाईल, असे म्हटले होते. असे असताना देखील, भारताने हे जहाज अडवले.
अर्थातच काही प्रश्न पडले आहेतः
१. उत्तर कोरियाचे जहाज अडवून भारत अमेरिकेला मदत करीत आहे, असे जगाला वाटल्यास, भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात मदत होईल, की धोका संभवतो ?
२. अमेरिकेला मदत करणारा देश म्हणून अतिरेक्यांच्या भारतातील घातपाती कारवायांना बळ मिळेल का ?
३. चीन आणि उत्तर कोरियातील सलोख्याचे संबंध बघता, ह्या घटनेमुळे भारत-चीन संबंधाना खीळ बसेल का ?
प्रतिक्रिया
11 Aug 2009 - 6:21 am | विकास
दक्षिण कोरीयाने जहाज अडवायचा प्रयत्न केला तो आंतर्राष्ट्रीय सागरात. भारताने अडवले (प्रयत्न करायचा प्रश्नच नाही) ते आपल्या हद्दीत, जे पूर्णपणे आंतर्राष्ट्रीय करारात बसू शकते.
तरी देखील आपल्या गस्त घालणार्या नौदलाच्या तुकड्यांनी अचूक कामगिरी केली त्यामुळे त्यांचे अभिनंदन.
१. उत्तर कोरियाचे जहाज अडवून भारत अमेरिकेला मदत करीत आहे, असे जगाला वाटल्यास, भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात मदत होईल, की धोका संभवतो ?
Who cares! आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करायचे असते. त्यात मुत्सद्दीपणा सोडू नये पण असल्या धोक्यांचा विचारही करू नये असे वाटते.
२. अमेरिकेला मदत करणारा देश म्हणून अतिरेक्यांच्या भारतातील घातपाती कारवायांना बळ मिळेल का ?
यात आपण भारत आणि अमेरिकेचे जे काही दहशतवादी शत्रू आहेत त्यांचा आणि उ. कोरीयाचा संबंध आहे असे म्हणत असल्यासारखे होते. हे म्हणजे सद्दामने ९/११ घडवून आणले म्हणण्यासारखे होईल! :-) (तो साधूसज्जन नव्हताच पण त्याने ते केले म्हणणे हे पण दिशाभूल होती. अर्थात तुम्ही दिशाभूल करत आहात असे नाही म्हणायचे!)
३. चीन आणि उत्तर कोरियातील सलोख्याचे संबंध बघता, ह्या घटनेमुळे भारत-चीन संबंधाना खीळ बसेल का ?
मला वाटते जर त्या जहाजात काही गडबड असली तर चीन आणि उ.कोरीया दोघेही नमते घेतील, दिल्लीतील मित्रांना आनंदी करतील आणि पुढे निघून जातील... तसे म्हणाल तर दोनचार दिवसांपुर्वी गुगल मॅप्स मधे अरूणाचल प्रदेश चीन मधे दाखवले होते त्यात चीनचा कितपत हात होता माहीत नाही! (अर्थात गुगलने नंतर चूक झाली असे म्हणून दुरूस्तीपण केली!)
-----
अवांतरः
बाकी आज अजून एक गोष्ट होता होता टळली. अंदमान आणि आंध्र वगैरे भागाला युएसजीएस ने त्सुनामीची शक्यता वर्तवली होती (७.७. अंदमान आणि ६.४ टोकीयो येथे भुकंप झाल्याने). पण आता ती शक्यता नाही म्हणून सांगितले गेले आहे.
11 Aug 2009 - 1:25 pm | ऋषिकेश
सहमत
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून २४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक समरगीत "अजिंक्य भारत अजिंक्य जनता...."
11 Aug 2009 - 8:06 pm | लवंगी
अगदि सहमत
11 Aug 2009 - 6:58 am | सुनील
Who cares!!
भारतीय नौदलाचे अभिनंदन!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Aug 2009 - 7:02 am | _समीर_
सहमत आहे!
11 Aug 2009 - 8:23 am | घाटावरचे भट
अमेरिकेला मदत असो वा नसो, ते जहाज भारताच्या सागरी सीमेत विनापरवानगी नांगरून ठेवले होते. भारतीय अधिकार्यांना ते जहाज थांबवून तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. शिवाय म्यानमारवरती उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रे आणि/किंवा त्यासंबंधातील तंत्रज्ञान मिळवण्याचा किंवा त्यांची तस्करी करण्याचा आरोप आहे. आपल्याला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबण्याचा अधिकार आहेच, त्यामुळे -
१. केवळ या एका घटनेमुळे अमेरिकेला मदत करणारा देश म्हणून भारताची प्रतिमा तयार होण्याची शक्यता वाटत नाही.
२.भारतातील अतिरेकी कारवायांचे स्वरूप पूर्वीपासूनच बहुतांशी पाकिस्तान पुरस्कृत आणि टेरिटोरियल डिस्प्यूट्स मध्ये वापरावयाचे अनाधिकृत अस्त्र असे राहिलेले आहे. वर म्हटल्याप्रमाणेच उत्तर कोरियाशी संबंधित घटनेमुळे त्यात वाढ किंवा घट होईल असे वाटत नाही.
३. भारताने ते जहाज थांबवून कोणतीही बेकायदेशीर कृती केलेली नाही, त्यामुळे चीन उघड उघड त्या कृतीला आव्हान देईलसे वाटत नाही.
11 Aug 2009 - 10:30 am | सुधीर काळे
विकास-जींचे समतोल विश्लेषण आवडले.
माझ्या मते ते जहाज आपण अडवले नसते तर मात्र "कणा नसलेले राष्ट्र" अशी आपली प्रतिमा झाली असती. आपल्या सागरी हद्दीत असे 'चुकार' जहाज पकडल्यास "कुणाला काय वाटेल" याची कदर करण्याची गरजच नाहीं. अर्थात विनाकारण उर्मटपणा करून नवे शत्रू निर्माण करायचीही गरज नाहीं.
Just let's play it cool! (हे मराठीत योग्य अशा 'ठसक्यात' कसे लिहायचे?)
धन्यवाद
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
11 Aug 2009 - 12:11 pm | आशिष सुर्वे
भारतीय नौदलाचे अभिनंदन!!
पण मी भारताचे आणि आपण सर्व भारतीयांचे मनर्पूवक अभिनंदन केवळ खालील घटना घडल्यासच करीन:
१) आपण 'दाऊद'ला जिवंत पकडून त्याला एका महिन्याच्या आत शिक्षा करू शकू!
२) भारतीय जवानांच्या देहाचा अपमान करून, देह 'छिन्न-विछिन्न' अवस्थेत परत करणार्या पाकिस्तानला आपण योग्य धडा शिकवू.
३) भारतात 'बॉम्ब-स्फोट' करणार्या सर्व अपराध्यांना ताबडतोब शिक्षा करू.
४) काश्मीर प्रश्न ताबडतोब आपल्या पध्दतीने सोडवू.. अमेरीका आणि तत्सम देशांना फाट्यावर बसवून!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
11 Aug 2009 - 2:17 pm | मनीषा
ही कृती म्हणजे फक्त आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे या उद्देशाने केलली होती.. त्या मुळे मला नाही वाटत कि भारत कुठल्या गटात सामील आहे असे म्हणता येईल..
भारताचे पाकिस्तान, चीन, रशीया, आणि अमेरिकेशी असलेले आंतरराष्ट्रीय संबध बघता असा निष्कर्ष कोणी काढणार नाही ..
फक्त अमेरिकेचा पूर्व इतिहास पाह्ता --- ते ह्या घटनेचा उपयोग त्यांच्या सोयीनूसार करुन घेण्याची (तसा प्रयत्न करण्याची) शक्यता नाकरता येत नाही ..
11 Aug 2009 - 11:54 pm | विसोबा खेचर
जियो...!
तात्या.
--

आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!