आज ऑगस्ट ९. ६७ वर्षांपुर्वी आजच्या दिवशी मुबईतील ऑगस्ट क्रांतीमैदानावर अरूणा असफली यांनी झेंडा उंचावला आणि ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध चलेजाव ची घोषणा झाली. आज हा चर्चा प्रस्ताव केवळ विंदांच्या भाषेत "इतिहासाचे अवजड ओझे घेऊन डोक्यावर ना नाचा" या उद्देशानेच म्हणजे केवळ उर भरून येऊन लिहीण्यासाठीचा नाही आहे. त्यावेळेस कोण बरोबर आणि कोण चूक, चळवळ यशस्वी होती का अयशस्वी वगैरेचा काथ्याकुट करायला देखील नाही आहे. मात्र विंदांच्या त्याच काव्याच्या ज्या पुढच्या ओळी आहेत, "करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा" या हेतूने आहे.
लवकरच ब्रिटीश जाऊन आणि स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. (ढोबळ मानाने) तीन चतुर्थांश विरुद्ध एक चतुर्थांश असे १५ ऑगस्ट १९४७ चे दोन तुकडे पाहीले तर नक्किच आपल्या ३/४ने खूप काही मिळवले असे म्हणता येते आणि त्याबद्दल अभिमानपण वाटावा अशी नक्कीच परीस्थिती आहे. पण दुसरीकडे अशा बर्याच गोष्टी आजही आपण कुठेतरी कशाच्या तरी विरुद्ध लढतच राहीलो आहोतः तनाने अथवा मनाने अथवा धनाने. हे मी केवळ व्यक्तिगत म्हणत नाही आहे तर अगदी समाज म्हणून पण बोलत आहे. जहॉं डाल डाल पर सोने की चिडीयॉ करती है बसेरा, असे म्हणायच्या ऐवजी "जहाँ डाल डाल के भाव सोने के, आम आदमी भी कैसे करे बसेरा" अशी काही तरी अवस्था आहे. आणि हे एकच उदाहरण आहे....
तरी देखील गोष्टी चांगल्या सारख्या बदलू शकतील, आपण विकसीत राष्ट्रपण होऊ, बलसागर भारत होऊ आणि विश्वात पण शोभून राहू, जर आपण ...ला चलेजाव म्हणले तर. तर मंडळी आता सांगा आजच्या घडीला नक्की तुम्हाला अशी कुठली गोष्ट वाटते की त्याला आपल्या देशातून, राज्यातून, समाजातून आणि स्वत:तून "चले जाव" म्हणायची गरज आहे?
(आणि हो, हा लेख सगळ्या मिपासदस्यांसाठी आहे. कृपया, "आम्ही", "तुम्ही", "इकडचे", "तिकडचे" करू नये ही विनंती!)
प्रतिक्रिया
10 Aug 2009 - 4:01 am | Nile
चपला! (विरंगुळा राहीलं का हो?)
10 Aug 2009 - 8:32 am | विकास
चपलांना चले जाव केलेत तर नंतर "अनवाणी" ठराल हो ;)
10 Aug 2009 - 4:40 am | प्राजु
अहंकार, आणि इतिहासाच्या कुबड्या!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Aug 2009 - 8:34 am | दशानन
सरकारी अरेरावी गेली की जवळ जवळ ९५% प्रश्न संपल्यात जमा होतील !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
10 Aug 2009 - 8:55 am | प्रकाश घाटपांडे
मला वाटते 'आपलेपण' सिद्ध करताना येणार्या त्राग्यातुन हे होत असाव.
अवांतर- गावाकडे बाहेर जाताना 'चपला' घालुन जा अस आई सारख सांगायची. कारण काटे पायात मोडतील या काळजी पोटी. आम्ही मात्र विसरतील या काळजी पोटी चपला घालायचो नाही. हळु हळु चपला घालुनच बाहेर पडायची सवय लागली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Aug 2009 - 9:59 am | विकास
(माझ्याच लेखाला मीच अवांतर करत असल्याने, कुणालाही चांदणी मिळणार नाही!)
आम्ही मात्र विसरतील या काळजी पोटी चपला घालायचो नाही.
या वरून आठवले. तत्कालीन माहीती आणि प्रसारण मंत्री विठ्ठलराव गाडगीळ ह्यांच्या काँग्रेसकचेरीच्या बाहेर काढून ठेवलेल्या चपला कोणीतरी पळवून नेल्या. नंतर ईद अथवा तत्सम मुस्लीम सणानिमित्त त्यांना कुठल्याशा मशिदीत येण्याचे निमंत्रण होते. हा (चपलाचोरीचा) प्रकार कुणाला माहीत नसेल असे त्यांना वाटत होते. पण मशिदीच्या बाहेर (नवीन) चपला काढताना ते जरा कुरकुर करू लागले. ती पाहून त्यांना निमंत्रीत केलेल्या यजमानांपैकी एक विठ्ठलरावांना म्हणाला, अहो काढा काढा चपला इथे ही काही काँग्रेस कचेरी नाही आहे!
10 Aug 2009 - 9:03 am | सहज
अहो एक गोष्ट असेल तर ना? एव्हाना झालो असतो की महासत्ता ;-)
इतकेच म्हणेन की "चलता है/ असच असत " एटीट्युड स्व:तापुरती चले जाव केली तरी मोठा फरक पडेल.
10 Aug 2009 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रशासनातील कामकाजाची संथगती, प्रशासनातील भ्रष्टाचार, न्यायव्यवस्थेतील अविश्वास आणि राजकारणातील गुन्हेगारीने गेलेच पाहिजे.
"जहाँ डाल डाल के भाव सोने के, आम आदमी भी कैसे करे बसेरा"
लै भारी !
अवांतर : स्वाइन फ्लू ने चालते व्हावे :)
-दिलीप बिरुटे
10 Aug 2009 - 12:17 pm | मन
भाज्यांमध्ये तूफान अन्नभेसळ करुन आपल्याच बांधवांचे हाल करणार्यांनो ..
चले जाव.
दुधात भेसळ करुन विष बनवणार्यांनो...
चले जाव....
मृत सैनिकाच्या प्रेताच्या टाळुला लोण्यात तळुन खाणार्यांनो...
चले जाव.
टोकाचा, जीवघेणा अपहार करणार्यांनो, भ्रष्टाचार्यांनो....
चले जाव......
स्त्री भ्रूण हत्या करणार्यांनो...
चले जाव.
अंमली-मादक द्रव्यांचा , अफू चरस कोकेनच्या व्यापारातुन असंख्य तरुणांना गारद करणार्या पशुंनो...
चले जाव......
इथलच खाउन बाहेरच्यांचे पाय चाटणार्या स्वार्थांधांनो...
चले जाव........
खोटी आमिषं दाखवुन पैसा/जमीन हडापणार्यांनो...
चले जाव.......
जुनाट आणि खोटारड्या विचारांचं भय दाखवुन प्रगतीला आडकाठी करणार्यांनो...
चले जाव.
बेसुमार आश्वासनांची नुसतीच खैरात करणार्यांनो ...
चले जाव.
मृतास दिलेल्या शासकीय मदतीतही "चीरिमिरी" मागणार्यांनो चले जाव....
स्वतःच्या फायद्यासाठी गोर गरिबाची रोजी-रोटी आणि जमीन लुबाडणार्या नर पिशाच्चांनो...
चले जाव.
आपल्यासारख्याच हाडा-मासाच्या माणसाला (बाइ माणसाला) विकायला ठेवणार्या भडाव्यांनो चले जाव.
थोड्याशा दमड्यांसाठी अडाणी पेशंटची किडनी चोरणार्यानो....
चले जाव....
खाल्ल्या ताटात हागणार्यांनो चले जाव....
रस्त्यावरच्या विष्पाप जिवांना चिरडुन बिनदिक्कत हिंडणार्या खुन्यांनो......
चले जाव......
आइच्या छाताडावर शत्रु थयथयाट करत असताना,मस्त चहाचे घुटके घेत मैत्रिच्या गप्पा ठोकणार्यांनो...
चले जाव.
बेसुमार वृक्षतोड करुन आख्ख्या भूभागाचं पर्यावरणच धोक्यात आणणार्यांनो ..
चले जाव....
अफाट वेगानं जंगलं च्या जंगलं चोरुन खाणार्या सैतानांनो
चले जाव.
टेकड्याच्या टेकड्या फस्त करणार्या भुक्त अळ्यांनो......
चले जाव.
आपल्या कंपनी साठी अगणित पाणी उपसा करुन दक्षिण भारतातील शेकडो गावं ओसाड,वाळवंट करणार्या मानवताहीनांनो......
चले जाव..........
श्रद्धेचा बाजार मांडाणार्यानो, शरद्धेचा गैर फायदा घेणार्या किळसवाण्या जंतुंनो.......
चले जाव..........
धर्माच्या नावावर निष्पाप जीव घेणार्या धर्मांधांनो........
चले जाव.....
साठ वर्षानंतरही गरिबाला गटारीत रहायला भाग पाडणार्यांनो .....
चले जाव......
देशाचे लचके तोडायला निघालेल्या विघातक शक्तिंनो.....
चले जाव........
एकमेकांना जातीवैविध्यातुन कमी-अधिक लेखणार्या, गुणवत्ता नाकारणार्या प्राण्यांनो......
चले जाव.......
उघड्या वरच्या दरिद्र्याला नागडं करणार्यांनो......
चले जाव....
आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणार्या षंढांनो......
चले जाव......
आपलाच,
मनोबा
10 Aug 2009 - 1:38 pm | प्रकाश घाटपांडे
मनोबा आम्हाला पाडगांवकरांची सलाम आठवली या निमित्ताने
ऐका
Get this widget | Track details | eSnips Social DNA
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Aug 2009 - 4:43 pm | विकास
अधुनिक काळात तशीच कविता खरे साहेबांची आहे:
Get this widget | Track details | eSnips Social DNA
10 Aug 2009 - 9:04 pm | मन
अगदि माझ्याच मनातलं कुणीतरी आधीच बोलुन गेलेत!
सहि सहि .....
अगदी हेच म्हणायचय.....
बाय द वे ; हे प्रकाश राव येव्हढे अचुक संदर्भ देतात कसे काय हर टायमला?
आपलाच,
मनोबा
10 Aug 2009 - 4:49 pm | मस्त कलंदर
सगळं एका दमात नि असंच लिहिलं नसतं मी कदाचित.. पण प्रतिक्रिया वाचून वाटलं की मलाही यापेक्षा वेगळं काही वाटत नाहीये..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
10 Aug 2009 - 7:15 pm | हरकाम्या
यादी संपली का अजुन काही शिल्लक आहे ?
"यादी वाचुन झोपलेला हरकाम्या '
11 Aug 2009 - 3:14 pm | मराठी_माणूस
इथलच खाउन बाहेरच्यांचे पाय चाटणार्या स्वार्थांधांनो...
चले जाव........
हे खुप आवडले
10 Aug 2009 - 1:41 pm | ऋषिकेश
चांगला चर्चा विषय. चले जाव कशाला म्हणावं का हा प्रश्न पडला.. बर्याच प्रश्नांना फारतर फार "बाजुला हो आमच्या वाटेत येऊ नकोस" असे म्हणावेसे वाटले. मात्र काही वृत्तींना मात्र चले जाव म्हणावेसे वाटते:
ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "अजिंक्य भारत अजिंक्य जनता...."
10 Aug 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर
लोकसंख्यावाढीच्या बेसुमार कॅन्सरला 'चले जाव' केले पाहिजे! या बाबतीत अत्यंत म्हणजे अत्यंत कडक शिक्षा असलेला कायदा (डिटेल्स पुन्हा केव्हातरी) अंमलात आला पाहिजे. माझ्या मते बेसुमार लोकसंख्यावाढ एवढा एक जरी आजार कंट्रोलमध्ये आला तरी भारत कायच्या काय सुखी होईल, पुढे जाईल...!
आपला,
(लोकसंख्यावाढीत कोणतीही औरस,अनौरस भर न टाकलेला) तात्या.
नाय करणार! साला, नंदनला सबुत दिला आहे. आणि नंद्या म्हणजे माझा वीक प्वॉईंट! :)
आपला,
(वचनबद्ध) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
11 Aug 2009 - 12:58 am | पक्या
+१ , तात्या
१)अनेक वाई ट गोष्टींचं मूळ बेसुमार लोकसंख्या वाढीत आहे.
२) भ्रष्टाचार
३)अस्वच्छता / सार्वजनिक आरोग्याबद्द्लची अनास्था
छान धागा . आवडला.
11 Aug 2009 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी १००% सहमत.
अदिती