नमस्कार,
आम्ही काही लोक मराठी लिहीलेली टीशर्ट्स विकत घ्यायचं असं ठरवतोय. मात्र ती तशी तयार विकत मिळत नाही असं माहिती पडल्यावर मग ती छापून घ्यावी असं ठरतंय. या संदर्भात मिपाकरांची मदत हवी आहे. खाली दिलेलेले प्रश्न आम्हाला पडलेले आहेत. कृपया मदत करा.
१) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का?
२) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा? )
३) रंगसंगती सुचवता येईल का?
४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव?
५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का?
याबाबत तुमच्या सर्व सुचनांची आम्हाला गरज आहे.
- नीलकांत
ईमेल : neelkant[dot]akl [at] gmail [dot] com नीलकांत.एकेएल @ जीमेल . कॉम ( :) )
माझा भटक्या : अठ्ठ्यान्नव तेवीस पन्चावन्न पंचवीस तेवीस ( हा प्रकार स्पॅम टाळण्यासाठी आहे. )
प्रतिक्रिया
8 Aug 2009 - 3:27 pm | विजुभाऊ
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती?
भले देऊ कासेची लंगोटी;नाठाळाचे माथी हाणू काठी
केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
5 Sep 2009 - 8:36 am | पारंबीचा भापू
भले तर देऊ कासेची लंगोटी;नाठाळाचे काठी देऊ माथा!
8 Aug 2009 - 3:41 pm | प्रमोद देव
१)मराठी तितुका मेळवावा !
२)मराठी असे आमुची मायबोली !
३)रुजवू मराठी । फुलवू मराठी ।
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
9 Aug 2009 - 2:37 pm | दशानन
हे तीन्ही छान वाटत आहे... खास करुन...
रुजवू मराठी । फुलवू मराठी ।
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
10 Aug 2009 - 11:50 am | विशाल कुलकर्णी
तिन्ही पंचलाईन्स छानच वाटताहेत.
कॉलर आणि खिसा हवाच ! ठाण्यात राम मारुती रोडवर श्री. उन्मेश जोशी यांचे एक दुकान आहे. राज एंटरप्राइजेस किंवा असेच काहीतरी. ते अशाप्रकारचे टी शर्टस बनवतात / बनवुन घेतात. ठाणेकर जास्त प्रकाश पाडु शकतील असे वाटते.
शिवरायांची मुद्रा असलेले टी शर्टही मार्केटमध्ये आहेत, ते देखील छान वाटतात.
अवांतरः ऑर्डर कुठे नोंदवायची ते आत्ताच सांगुन ठेवा? :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
8 Aug 2009 - 3:43 pm | मस्त कलंदर
माझा मराठाची बोलु कौतुकें.....
मराठा तितुका मेळवावा...
हा मायबोलीवरचा दुवा.. पुणे-मुंबईच्या आयोजकांचे दूरध्वनी क्रमांकही आहेत इथे
http://www.maayboli.com/node/2489
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Aug 2009 - 3:48 pm | टारझन
निलकांता ... माझ्यासाठी एक टि-शर्ट बुक करता येईल कारे ?
नाही ही पंचलाईन नाही .. विणंती आहे ..
8 Aug 2009 - 4:53 pm | रामदास
टी शर्ट ठाण्यात तयार मिळतात.
हवे तसे तयार करून मिळतात.
8 Aug 2009 - 5:21 pm | शिप्रा
पुण्यात चॅम्पियन स्पोर्टस मध्ये छापुन मिळतील
8 Aug 2009 - 5:28 pm | लिखाळ
बरोबर. आम्ही महाविद्यालयात तेथूनच तयार करुन घेतला होता. त्यावरचा रबर-छाप अनेक धुण्यानंतरही चांगला टिकला आहे. टिशर्ट आणि छपाई (इंग्रजी) दोन्ही तेथेच.
ठसकेदार वाक्याचा विचार करतो :)
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
9 Aug 2009 - 12:48 pm | शिप्रा
एक स्टिकर होता ज्याच्यावर लिहिले होते
'शिव्याहि द्या पण मराठित' .. :)
10 Aug 2009 - 12:29 pm | सुधीर काळे
सुंदर मराठी, समृद्ध मराठी
मुंबई विमानतळावर लावा मराठी फलक
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
8 Aug 2009 - 5:35 pm | स्वाती२
मायबोलीचे असे टी शर्ट आहेत. त्यांनी पुण्यात करुन घेतले. अॅडमिन ना विचारल्यास इतर माहीती मिळेल.
8 Aug 2009 - 8:08 pm | ऋषिकेश
शर्टावर लिहा:
"..... तेव्हाच मी डिसाईड केलं यु नो... आता मी मराठी पंचलाईन असलेलाच टीशर्ट घालणार"
;)
(मराठी यु नो) ऋषिकेश
------------------
इंग्रजी गाण्याच्या शोधात
8 Aug 2009 - 7:52 pm | विचारी मना
तीर्थ विठ्ठ्ल..क्शेत्र विठ्ठ्ल...
8 Aug 2009 - 8:06 pm | दादा कोंडके
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
'मराठी पाउल पडते पुढे।'
'माझा मराठाचि बोलू कौतुके।'
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
8 Aug 2009 - 8:25 pm | मदनबाण
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
अगदी दादांसारखच वाटत.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
10 Aug 2009 - 12:56 pm | हर्षद आनंदी
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
आपणास माहित असेलच ही आपल्या लाडक्या राज्याची 'राजमुद्रा'.
ती राजमुद्रा आत्ता वापरात नसेल, पण त्याचा "लोगो, अंगठी, लॉकेट,साईन बोर्ड" अश्या ठिकाणी वापर करणे किती योग्य?
10 Aug 2009 - 1:11 pm | विशाल कुलकर्णी
ही मुद्रा अभिमानाने छातीवर मिरवायला काय हरकत आहे. एका मराठी माणसाने मराठियाच्या हितासाठी केलेल्या महत्प्रयासांची, महापराक्रमाची साक्ष म्हणुन, आठवण म्हणुन ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
8 Aug 2009 - 8:19 pm | प्राजु
लाभले अम्हांस भाग्य्..बोलतो मराठी..
मराठी पाऊल पडते पुढे..
माझी माय मराठी!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2009 - 1:11 am | राघव
लाभले अम्हांस भाग्य्..बोलतो मराठी..
आणि हो, जर आपला राष्ट्रध्वज छापून घेणार असलात तर कृपया केवळ ३ रंग उतरवून घ्या. पूर्ण ध्वज नको. कारण ध्वज हा अंगाभोवती गुंडाळणे तसे योग्य नव्हे. अवमान होण्याची भिती असते.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
8 Aug 2009 - 8:25 pm | टुकुल
"वाचाता काय? चपला घाला आणी चालु पडा !!!"
ही पंचलाईन म्हणुन घेने... (परस)नली नको !!
--टुकुल
8 Aug 2009 - 8:48 pm | अजय भागवत
चामुंड्राये करवियले
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
~कविवर्य सुरेश भट
अमृतवाहीनी मराठी । ज्ञानईश्वरी मराठी
मी मराठीच बोलेन
काय? तुम्हाला मराठी बोलता येत नाही?
8 Aug 2009 - 11:00 pm | पार्टनर
जैशी हरळामाजी रत्नकिळा | कीं रत्नामाजी हिरा निळा |
तैशी भाषामाजी चोखळा | भाषा मराठी ||१||
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी | कीं परिमळांमाजी कस्तुरी |
तैशी भाषांमाजी साजिरी | मराठिया ||२||
पक्ष्यांमध्ये मयुरू | वृक्षांमध्ये कल्पतरू |
भाषांमध्ये मानूं थोरू | मराठियेशी ||३||
तारांमध्ये बारा राशी | सप्त वारांमध्ये रविशशी |
ह्या द्वीपीच्या भाषांमध्ये तैशी | बोली मराठी! ||४||
यापैकी गडद केलेली माझी आवडती ओळ आहे.
तशी शक्यता बरीच कमी आहे, पण स्वतःला काही सुचलंच तर तेही नंतर व्य.नि ने कळवेन.
बाकी अनेक वेबसाईट्स आहेत, जिथे तुम्हाला टी शर्ट हवे तसे बनवून पाहता येतात. एक उदाहरण म्हणून हिचा उपयोग करून पाहा.
अधिक माहिती गूगल केल्यावर मिळावी.
शुभेच्छा.
- पार्टनर
9 Aug 2009 - 12:17 am | आशिष सुर्वे
मी तर्र ह्या ओळी वापरीन!!:
''हर् हर् महादेव''
''मराठी पाऊल पडते पुढे''
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
9 Aug 2009 - 12:58 am | कशिद
मराठी पंच लाइन ची टी शर्ट मिळतात मार्केट मधे पण छापून घ्याची असतील तर मग मला उलहास्नगर मधली माहित आहई...मज्या मंदलाची टी शर्ट दही हंडी ची उलहास्नगर मध्ये विकत घेवौं छापून घेतो ...अणि जर तुम्हाला ५०० च्या वर टीशर्ट हवे असतील तर सांगलीत ला एक पता माहित आहे...
माजी कड़े छान पंच लाइन च मराठी टीशर्ट आहे ..नंतर ईमेल करथो...
मराठी टी शर्ट घालून मिरवानारा मनसे चा पदाधिकारी (अक्षय)
9 Aug 2009 - 10:29 am | विसोबा खेचर
नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही..
सुचलं की सांगतो रे!
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
9 Aug 2009 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही..
सुचलं की सांगतो रे!
-दिलीप बिरुटे
(संपामुळे डोक्याचा भुगा झालेला प्राध्यापक)
12 Aug 2009 - 1:29 pm | शैलेन्द्र
"नीलकांता, अद्याप काही खास सुचलेलं नाही..
सुचलं की लिहीतो रे!"
ही जबरदस्त पंचलाइन आहे....
9 Aug 2009 - 10:54 am | प्रमोद देव
मराठी पंचलाईन म्हटल्यामुळे मला खालील ओळी सुचल्या.
रॉक स्टाईल संदेश हवा असेल तर....
बोल बेबी बोल,मराठी बोल
बोल बाबा बोल मराठी बोल
आणि मला चाल लावायची जरूर देखिल नाही. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
9 Aug 2009 - 10:55 am | ज्ञानेश...
१) मराठी केंद्रस्थानी ठेऊन काही पंचलाईन हवी आहे. सध्या तरी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा एकमेव पर्याय समोर आहे. कुणाला आणि काही सुचवता येईल का?
"मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले"
"मराठी पाऊल पडते पुढे"
"जय जय महाराष्ट्र माझा"
"आमच्या नसानसात वाहते मराठी" (लाभले अम्हास्..या कवितेतीलच एक ओळ)
२) टीशर्टचा प्रकार पोलो आहे. म्हणजे कॉलर आणि शक्यतो डाव्या बाजुला खिसा असावा. (की नसावा?)
प्रिंटेड टी शर्ट्स शक्यतो राऊंड नेक किंवा व्ही नेक असतील तर चांगले वाटतात. खिसा तर नकोच. अर्थात, ही वैयक्तिक मते आहेत.
३) रंगसंगती सुचवता येईल का?
आवड आपली आपली!
४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव?
ऑर्कुटवरील काव्यांजलीच्या कार्यक्रमात आम्ही असे टीशर्ट्स बनवले आणि वापरले आहेत. माझा एक नेट मित्रच असे टी शर्ट बनवतो. एकदा बनवल्यावर १ वर्ष तरी वांधा नाही.
५) अशी टीशर्ट छापून देणारं पुणे परिसरात कुणी ओळखीचं आहे का?
मुंबईत आहे. डीटेल्स आज रात्री कळवतो.
"Great Power Comes With Great Responsibilities"
9 Aug 2009 - 12:21 pm | दत्ता काळे
माझी मराठी . . . .
मायबोली मानतो
मी माऊली
9 Aug 2009 - 12:29 pm | दत्ता काळे
माझी मराठी मायबोली
मानतो मी माऊली
9 Aug 2009 - 1:37 pm | श्रीयुत संतोष जोशी
ठाण्यात मिळतात बुवा. " सुलेखनकार अच्युत पालव " यांनी तयार केलेले.
समतानगर येथे दुकान आहे.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
9 Aug 2009 - 3:08 pm | विसोबा खेचर
सुचली, सुचली - पंचलाईन सुचली.....!!
"दिल्लीचेही तख्त राखितो...!"
कशी वाटली बॉस? :)
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
10 Aug 2009 - 10:53 am | विश्वेश
"दिल्लीचेही तख्त राखितो...!" ++
त्रिवार ++
10 Aug 2009 - 3:15 pm | धमाल मुलगा
दिल्लीचे तख्त राखतो? नको बॉ! आपण काय सालं हुजरे आहोत का दिल्लीचे? आपली नेतेमंडळी करताहेत ती हुजरेगीरी पुरेशी आहेच ना?
त्यापेक्षा भटसाहेबांनाच शरण जाऊया का?
'शेवटी मदांध तख्त फोडते मराठी! '
हे कसं वाटेल?
11 Aug 2009 - 12:02 am | मिसळभोक्ता
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
हे सर्वात बेष्ट आहे, असे माझे मत आहे.
-- मिसळभोक्ता
9 Aug 2009 - 3:36 pm | प्रमोद देव
"दिल्लीचेही तख्त राखितो...!"
सद्द्याचे महाराष्ट्राचे कणाहीन नेते पाहिले की नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते...
दिल्लीचेही 'तस्त' राखितो...... :(
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
9 Aug 2009 - 3:42 pm | दशानन
=))
मस्तच ... देवा !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
रक्ता शेवटचा थेंब करेल मृद स्पर्श !
10 Aug 2009 - 2:50 pm | टारझन
होय ना . . . . अगदी ...
आणि हिणकस भाषेत म्हणायचं झालं तर
"दिल्लीचेही तळवे चाटतो.... "
10 Aug 2009 - 2:51 pm | टारझन
होय ना . . . . अगदी ...
आणि हिणकस भाषेत म्हणायचं झालं तर
"दिल्लीचेही तळवे चाटतो.... "
5 Sep 2009 - 10:17 am | सुधीर काळे
ब्राव्हो, प्रमोद-जी, ब्राव्हो!
"तस्ता"ची कल्पना मस्त!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
10 Aug 2009 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शनिवारवाड्याच्या परिसरात सायकलींची दुकानं आहेत, तिकडे फडके हौद या भागात पोरवाल ट्रेड लिंक नावाचं दुकान आहे (गुगल लिंक देऊ शकते किंवा तोंडी नीट पत्ता देता येईल), तिकडून जी.एम.आर.टी.साठी चांगल्या प्रतीचे टीशर्टस छापून घेतले होते. फेब्रुवारीत ते टीशर्ट्स छापले. आत्तापर्यंत कलीग्जपैकी एकाचाही टीशर्ट खराब दिसत नाही आहे.
आमच्यासाठी, लेडीज साईझमधे, काही टीशर्ट्स बनवणार आहात का?
अदिती
5 Sep 2009 - 6:57 am | सुबक ठेंगणी
आणि त्याला पण खिसा असणार आहे का?
10 Aug 2009 - 2:52 pm | सुनील
तात्याच्या मापाचा टीशर्ट बनवून घेणार काय? ;)
हा प्रतिसाद अवांतर आहे. "चांदनी बार" वाल्यांचे लक्ष आहे ना?
(अनवाणी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Aug 2009 - 10:07 pm | अश्विनीका
१) (पुरषांसाठी ) मर्द गडी मी मराठी .
२) आहे मी मर्द मराठा
उंच फडकवीन भगवा झेंडा
३) (स्त्रियांसाठी )- मराठमोळी
रुजवू मराठी । फुलवू मराठी ;
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
हे दोन्ही पण छानच आहे.
- अश्विनी
10 Aug 2009 - 4:16 pm | पक्या
१) होय, मी मराठी आहे.
२) जय महाराष्ट्र जय मराठी
10 Aug 2009 - 4:19 pm | शशिधर केळकर
इये मराठीचिये नगरी!
किंवा
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा!
टी शर्ट ला खिसा कॉलर हवीच. टी शर्ट चा रंग? पीच कलर किंवा फिक्कट भगवा.
हे कसे वाटते?
10 Aug 2009 - 4:31 pm | सूहास (not verified)
नक्की काहीतरी सुचेल आणी तेच लिहील..
सध्यातरी विचारात..
सू हा स...
10 Aug 2009 - 4:35 pm | नम्रता राणे
मराठा गडी यशाचा धनी.
लष्कर्-ए-शिवबा.
10 Aug 2009 - 5:22 pm | फ्रॅक्चर बंड्या
रायगडावर शिवमुद्रा छापलेले t shirt मिळतात
काळ्या रंगाचा t shirt
आणि पिवळ्या रंगामधे शिवमुद्रा
मस्त आहे तो t shirt
पुण्यात कुठे मिळेल का ?
10 Aug 2009 - 5:47 pm | अनामिक
मागे एक गाणं ऐकलं होतं... तेच वापरलं तरी चालेल वाटते...
महाराष्ट्रभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची |
महावंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमुची ||
-अनामिक
10 Aug 2009 - 5:56 pm | सागर
१. जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
२. बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
३. गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
(महाराष्ट्रगीतातील पहिले कडव्यातील ३ ओळी)
४. हर हर महादेव
५. जय भवानी जय शिवाजी
(महाराष्ट्रप्रेमी) सागर
11 Aug 2009 - 12:31 pm | नियती
असा महिलानकरिता उपक्रम करायचा असल्यास?????
11 Aug 2009 - 1:21 pm | मि माझी
व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची||
11 Aug 2009 - 1:30 pm | मि माझी
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!
11 Aug 2009 - 1:30 pm | मि माझी
अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ..!
11 Aug 2009 - 4:43 pm | जिवाणू
माय मराठी माऊली, जणु प्रेमाची सावली.
आम्ही मराठीचे सरदार, भगवा फडकवु सातासमुद्रापार.
मराठी आमची शान, वाढवु तिचा सन्मान.
12 Aug 2009 - 1:35 pm | शैलेन्द्र
अच्युत पालव यांची ही साइट पहा..
सुंदर आहे...
6 Sep 2009 - 9:33 am | पक्या
कोणती साईट? दुवा द्याना.
5 Sep 2009 - 6:17 am | अश्विनीका
इथे एवढ्या लोकांनी इतक्या पंच लाईन्स सुचवल्या. मग शेवटी कोणती निवडली? काही कळवले नाही.
- अश्विनी
6 Sep 2009 - 12:55 am | संतोष सतवे
मी मराठी ती मराठी
6 Sep 2009 - 6:15 pm | उदय ४२
काही मराठी कवीतांच्या ओळी देता येतील
ऊदा. डोळे हे जुल्मी गडे रो़खुनी मज पाहू नका
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
6 Sep 2009 - 8:15 pm | अविनाश ओगले
४) कुणी असा प्रकार आधी केला आहे का? काही अनुभव?
वरती अनेकांनी सुचवले आहे. अच्युत पालव यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी बनवलेला एक टी शर्ट मी पाहिला होता. त्यावर श्रावणमासी ही कविता होती.
7 Sep 2009 - 8:20 am | प्रभाकर पेठकर
जय भवानी, जय शिवाजी.