गाभा:
ए.डी.एच.डी. = अटेंशन डेफिसिट हाईपरेक्टिविटी डिसाअर्डर
एका सात वर्षाच्या मुलाबद्दल त्याला ए.डी.एच.डी. आहे असे सागितले आहे,
ह्या आजार मेडिसीन ने ठीक होऊ शकतो की फक्त काउंसलिंगद्वारे पण ठीक होऊ शकतो :?
जर कोणाकडे योग्य माहीती असेल तर मदत करावी ही विनंती.
प्रतिक्रिया
10 Aug 2009 - 4:34 pm | पक्या
मायकेल फेल्प्स ला लहानपणी ए.डी.एच.डी. होता. त्याच्या अतिउत्साहाला योग्य मार्ग (आऊट्लेट) देण्यासाठी त्याच्या आईने त्याला पोहायला शिकायला पाठवले. आणी आता आपण पहातोय एकापेक्षा एक जागतिक विक्रम नावावर असलेला मायकेल फेल्प्स.
www.webmd.com औषधांची माहिती आहे
10 Aug 2009 - 5:04 pm | स्वाती२
ए. डी. एच. डी. चे निदान करणारे डाक्टर तज्ञ आहेत ना हे प्रथम पहावे. शक्यतो second opinion घ्यावे. सेलिअॅक डिसीज वगैरे असेल तरी ए. डी. एच. डी. सारखी लक्षणे दिसून येतात. औषधे आणि काऊंसेलिंग( मुलाचे व पालकांचे) दोन्हीचा वापर केला जातो.
पालकांनी व शिक्षकांनी अशा मुलाशी योग्य पद्धतीने वागल्यास मुलाची प्रगती व्यवस्थित होते. खरी परीक्षा पालकांचीच असते. म्हणून सपोर्ट ग्रुप नसेल तर अशा परीस्थीतील इतर पालक जमवून सुरु करावा. किंवा online तरी शोधावा. दुसरे म्हणजे ही condition आहे ती manage करावी लागते. गोळी घेतली आणि ताप उतरला असे नाही.
10 Aug 2009 - 5:07 pm | अवलिया
हा आजार नक्की काय आहे ?
--अवलिया
10 Aug 2009 - 5:58 pm | बहुगुणी
ADHD बद्दल आधिक माहिती इथे आणि इथे मिळेल.
कारणे: हा आजार अनुवांशिक किंवा सभोवतालाचा परिणाम (environmental effect) म्हणुन मुख्यतः उद्भवत असला, तरी मेंदूला इजा होण्याचाही (traumatic brain injury) काही प्रमाणात असा परिणाम होऊ शकतो. [मुलाचा/मुलीचा आहार आणि ADHD यांचा संबंध अजून स्पष्ट झालेला नाही, पण आईच्या गर्भवती असतांनाच्या आहाराशी थोडासा संबंध असल्याबद्दलचे संशोधन चालू आहे.]
उपायः वर स्वाती२ यांनी लिहिलेले मुद्दे योग्य आहेत. औषधे की काउन्सेलिंग (की दोन्ही) गरजेचे आहेत, ते आजाराच्या तीव्रतेवर/इतिहासावर अवलंबून आहे.
ToI मध्ये एक चांगला लेख आला होता ते आठवले, म्हणून शोधून इथे लिंक देत आहे.
10 Aug 2009 - 6:34 pm | अवलिया
लिंक्सबद्दल धन्यवाद !
--अवलिया
10 Aug 2009 - 6:38 pm | दशानन
धन्यवाद.
उपयुक्त माहीती !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
10 Aug 2009 - 6:21 pm | दाते प्रसाद
मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा येथे ADHD
वर चाचण्या आणि समुपदेशन केले जाते, त्याचा चांगला उपयोग झालेला आहे.
प्रसाद दाते
10 Aug 2009 - 6:21 pm | वेताळ
सर्वसाधारण सगळी कडे आढळतात.वरील लक्षणे वाचताना मला देखिल ए.डी.एच.डी. = अटेंशन डेफिसिट हाईपरेक्टिविटी डिसाअर्डर
असावा, असा माझा ग्रह झाला.ह्यातुन हानी काही होत असावी असे मला वाटत नाही. पालकानी योग्य ती मुलांची काळजी घेतली तर त्याना देखिल त्याचा त्रास जाणवणार नाही.
वेताळ
10 Aug 2009 - 6:29 pm | विनायक प्रभू
राजे मास्तरांचा लय भारी अटेंशन असायचा. कारण तो त्यांना टेंशन द्यायचा.
मग त्याला पळुन जायची डीसॉरडर झाली.
10 Aug 2009 - 8:53 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
10 Aug 2009 - 8:58 pm | गोगोल
निश्चित डायग्नोसिस असे काहीच करता येत नाही. डॉक्टर डायग्नोसिस करतात ते फुटकळ प्रश्न विचारून. काहीच नक्की प्रूव करता येत नाही. आज काल तर जरा कॉन्सेंट्रेट होत नसेल तर ए डी एच डी डायगनोस करायचे असेच चालू आहे. मुलांना ही असे बरेच पडते कारण की त्यांच्या अपयाशाचे कारण एका आजार वर फोडता येते.
एक लक्षात ठेवा की याला ट्रीट करण्यासाठी देता येणारि औषधे मेंदू मध्ये डोपमाईन चा स्त्राव वाढवतात. दुसर्या शब्दात "They stimulate pleasing centers of the brain, hence cause similar effects like drugs such as drug seeking behaviour, withdrawl symptoms etc etc"
काय आहे ना की औषध कंपन्यांना पण पैसे मिळवायला मार्ग पाहिजे ना :)
आता हे सर्व सांगितल्यावर हे पण सांगतो की मी स्वत: मला ए डी एच डी डायगनोस करून घ्यायच्या विचारात आहे. अहो prescriptions वर ड्रग्स (amphetamines) मिळवायचा हाच सर्वात सोप्पा उपाय आहे. मला लोकांनी ड्रग्स मिळवायला स्वत: ला ए डी एच डी डायगनोस करून घेतले तर काही हरकत नाही. पण स्वत:ची फसवणूक करून घ्यायची की "मला ए डी एच डी आहे म्हणून मला हे येणार नाही हा गाढव पणा आहे. असो या विषयावर मी एकेकाळी इतका रिसर्च केला होता की मिनी पी एच डी घेता येईल ;)
10 Aug 2009 - 9:23 pm | प्राजु
या विषयावर मी एकेकाळी इतका रिसर्च केला होता की मिनी पी एच डी घेता येईल
आपले अनुभव सविस्तर लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडतील.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Aug 2009 - 11:04 pm | स्वाती२
>>मी एकेकाळी इतका रिसर्च केला होता की मिनी पी एच डी घेता येईल.
मग वाट कसली बघता घेऊन टाका.
>>मला ए डी एच डी आहे म्हणून मला हे येणार नाही
असे ही मुलं म्हणतच नाहीत. 'मलाच का जमत नाही?' असा त्यांचा प्रश्न असतो. माझ्या मुलाबरोबर Tae Kwon Do च्या वर्गात एक ए.डी.एच.डी. असलेला मुलगा होता. त्याचं झगडण मी पाहीलय. साधं अर्धा तास शांत बसणही त्याच्या साठी मोठी गोष्ट असायची. 'Today he did good' असं जेव्हा शिक्षक त्याच्या आईला सांगायचे तेव्हा त्याचा चेहरा इतका फुलायचा. इथे मिडल स्कुलला दर तासाला वर्ग बदलायला लागतात. पहील्या दिवशी he had a total meltdown. दर तासाला योग्य ते पुस्तक वगैरे घेऊन वेगवेगळ्या वर्गात जाणेही त्याच्यासाठी कठिण होते. मग काऊंसेलरच्या मदतीने हळू हळू जमू लागले.
11 Aug 2009 - 12:06 am | नंदा
गोगोल यांच्याशी सहमत! या तथाकथित आजारावर अॅंफेटमिनसारखी अतिशय जहाल आणि मेंदूचे कार्य कायमसाठी बिघडवून टाकणारी ड्रग्ज देतात. लहानपणी अशी ड्रग्ज घेणारी मुले मोठेपणी मेथँफटमिनसारख्या विनाशकारी स्ट्रीट ड्रगच्या व्यसनाधीन होण्याची मोठी शक्यता असते. यापेक्षा समुपदेशन, फेल्प्सच्या आईने मुलाच्या अतिउत्साहाला पोहोण्याकडे वळ्वण्याचा सुजाणपणासारखा उपाय जास्त संयुक्तिक! मेथँफटमिनच्या व्यसनामुळे उध्वस्त झालेले एका अमेरिकन मुलाचे आयुष्य मी जवळून पाहिले आहे.
1 Sep 2009 - 12:11 pm | अजुन कच्चाच आहे
माझ्या मुलाला ए.डी.एच.डी. आहे.
लहानपणी त्याच्यावर जे औषधोपचार झाले त्यात बर्याच अंशी सेडेटिव्हजचा भाग होता.
मात्र त्याला त्या औषधांचा उपयोग झाला नाही. शाळेतही तो मागे पडत गेला. चौथीत दोनदा नापास झाल्यावर शाळेने त्याला काढून टाकले!!
पुण्यात प्रभात रोड, सिम्बायोसिस स्कूल शेजारी 'फिनिक्स स्कूल' आहे. हि शाळा अशा व इतर कारणांनी शैक्षणीक दृष्ट्या मागे पडणार्या मुलांसाठीच आहे. या शाळेने त्यांच्या शाळेतील वातावरण व काउन्सिलींग द्वारे त्याला खूप छान आत्मविश्वास मिळ्वून दिला आहे.
'फिनिक्स स्कूल' ची माहीती खुपच उशीरा मिळाल्याने शैक्षणीक दृष्ट्या तो फार काही करू शकला नाही पण सध्या तो पुण्यात एका डान्स क्लास मध्ये डेमोन्स्ट्रेटर आहे.
ए.डी.एच.डी. बद्दलचे माझे अनुभव पुन्हा कधीतरी.
.................
अजून कच्चाच आहे.
2 Sep 2009 - 3:35 pm | अजुन कच्चाच आहे
अवांतरः
@बिका
खव चालू नाहीये. चालू झाल्याबरोबर डिटेल्स देईन.
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)