काय ?कुठे ? कसे? का? कोण? केव्हा?

ॐकार's picture
ॐकार in काथ्याकूट
18 Sep 2007 - 8:53 pm
गाभा: 

प्रत्येकाला लहानपणापासून हे असं का? तसं का नाही? एखादी गोष्ट इथे का आहे? तिथे का नाही? हे कोणी केलं? असं कसं झालं? असे प्रश्न पडत असतात. कधीकधी प्रश्न कठीण तर उत्तर अगदी सोप्पं असतं पण ते काही केल्या सापडत नाही. तर कधी प्रश्न साधाच पण उत्तर मात्र बर्‍याच विचाराअंती सापडतं.
अशा अडलेल्या, सुटलेल्या, कठीण, साध्या, पांचट, आचरट,पोरकट प्रश्नोत्तरांकरता हे मेनुकार्ड!

मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;)

प्र. रंगांना लाल, पिवळा, काळा इ. इ. नावे असतात. पण वासांना नावे का नाहीत?
उ.
घाण, उबस, कुबट वास असतात. पण ही वासाची विशेषणे झाली. जसे फिक्क्ट रंग, मळखाऊ रंग, भडक रंग इ. इ.
गुलाबाच्या वासाला काही नाव का नाही? जसे गुलगंध :)
केरोसिनच्या वासाला काही नाव का नाही?
शेणाच्या वासाला काही नाव का नाही?
अपवाद - मृद्गंध.

साधारण समर्पक उत्तरः
एकापेक्षा जास्त वस्तू, पदार्थांना एकच रंग असतो. त्यामुळे रक्त, गुलाब, कुंकू इ. इ. सगळ्यांचा रंग म्हणजे - लाल.
परंतु एकापेक्षा जास्त वस्तूंना, पदार्थांना एकच वास असल्याची उदाहरणे कमी आहेत. त्यामुळे वासांना वेगळी नावे देण्याची गरज मनुष्याला कधी वाटली नसावी.

मग भरून जाऊ दे मेनुकार्ड!

आजची शोधाशोध - साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 9:04 pm | आजानुकर्ण

असंख्य चवी असल्या तरी चवींना नावे आहेत
रसास्वाद षट् मधुराम्ललवण कटु तिक्त कषायाः अशी.

मस्त चर्चा आहे.

कोलबेर's picture

19 Sep 2007 - 11:31 am | कोलबेर

हो पण एकाच चवीचे अनेक पदार्थ असल्याने चवींना नावे देणे सोपे आहे...जसे आंबाही गोड आणि कलिंगड पण गोड. पण वासांचे तसे नाही.मोगर्‍याचा वास हा मोगर्‍याचाच आहे तो आंब्याला नाही

आजानुकर्ण's picture

19 Sep 2007 - 11:38 am | आजानुकर्ण

आंब्याचा गोडवा आणि कलिंगडाचा गोडवा यात मोगर्‍याचा वास आणि गुलाबाचा वास इतकाच फरक नाही का?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2007 - 11:08 am | प्रकाश घाटपांडे

मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;)

वा! मस्तच ओंकारराव, आपल्या गमभन चे गमक समजले
प्रकाश घाटपांडे

ॐकार's picture

19 Sep 2007 - 5:31 pm | ॐकार

भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ?

लिखाळ's picture

23 Sep 2007 - 9:14 pm | लिखाळ

वा वा... फार छान विषय आहे. वासांना नावे का नाहित हा प्रश्नच फारच उत्तम. आणि त्यावर आपले मत सुद्धा.

कावळ्यांबद्दल खालच्या प्रतिसादात 'ईत्यादी' लिहितात तसेच मला सुद्धा वाटते.

केवळ पुणे परिसरात पहाल तरी शहरी कावळा (मान फिकी आणि अंग काळे), डोंब कावळा आणि शहराबाहेर थोडे गेल्यास रावेन हा आकाराने मोठ्ठा कावळा अश्या तीन जाती दिसतात. त्यांचे आवाज सुद्धा थोडे वेगळे असतात. पण मोठा फरक मला इकडे युरोपात दिसला. इथे भरपूर प्रमाणात दिसणारे असे जे कावळे आहेत त्यांना इंग्रजी सामान्य नाव जॅक डॉ असे आहे. त्यांचा आवाज अतिशय मधूर आहे. आणि इतर सुद्धा तीन जाती इकडेतिकडे दिसतात. त्यामुळे आपल्या कावळ्यांना इकडे आल्यावर इथली भाषा शिकावी लागेल हे नक्कीच. (तसेच त्यांना स्वेटर सुद्धा लागेल बरं :)
-- (निरिक्षक) लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2007 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

भारतातला कावळा, युरोपात नेला तर तो तिथल्या कावळ्यांशी संवाद साधू शकेल काय? स्थलपरत्वे जशी मनुष्याची भाशा बदलत जाते तसे प्राणी, पक्षी यांच्या संकेत-संवादात बदल संभवतात का ?

खरचं हा प्रश्न अनेकांच्या पीएचडी चा विषय असु शकतो.
प्रकाश घाटपांडे

ईत्यादि's picture

23 Sep 2007 - 10:45 am | ईत्यादि

सर्वसाधारणपणे सर्व माणसे ही एकाच जातिची असतात, homo sapiens, तसे मात्र सर्व कावळे हे Corvus genus चे पण वेगवेगळ्या species चे असतात. सर्वच कावळे काळे असतात असेही नाही. ह्या अधारवर आपण असे म्हणु शकतो कि भारतातिल कावळे आणी युरोपमधिल कावळे निश्चितच एकमेकानशी सम्भाषण करु शकत नसतील.
सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे.
ईत्यादि

किंवा मांजरांचे???

वेगवेगळ्या जातींतले कुत्रे किंवा विभिन्न देशांतील एकाच किंवा विभिन्न जातींतील कुत्रे एकमेकांशी संभाषण करू शकतील काय? किंवा मांजरे???

('ऍस्टेरिक्स'प्रेमींसाठी 'ऍस्टेरिक्स अँड द ग्रेट क्रॉसिंग'मधील डॉगमॅटिक्स आणि व्हायकिंगमंडळींचा कुत्रा यांच्यातील संवादाकडे निर्देश करू इच्छितो. गॉल आणि व्हायकिंगमंडळींना एकमेकांना समजून घेताना नाकी नऊ येत असताना त्यांचे कुत्रे मात्र वेगवेगळ्या 'भाषा' [म्हणजे भुंकभाषा] असूनसुद्धा त्यांच्यातील पॅटर्न ओळखून आणि एकमेकांच्या [भुंक]भाषा इंटरचेंजिएबली वापरून गंमत करत असतात, हा प्रसंग अत्यंत मजेशीरपणे रंगवला आहे. सुरुवातीला मुळात हा कुठला प्राणी आहे, याबद्दलही दोघांना एकमेकांबद्दल काहीही कल्पना नसताना, 'अरेच्या! हाही आपल्यासारखा कुत्राच आहे की! फक्त किंचित वेगळा भुंकतो!' हे लक्षात आल्यावर त्यांच्यात मस्त संवाद जमून जातो. मग एकमेकांसारखे भुंकून बघतात आणि गंमत करतात, दोस्ती जमते. इथे ही माणसे मात्र एकमेकांची भाषा समजत नाही म्हणून डोकेफोड करताहेत!

'ऍस्टेरिक्स' कधीही हाती न धरलेल्यांना याहून चांगले वर्णन करून सांगणे महाकठीण आहे. वाचल्याशिवाय संदर्भही लागणे कठीण. पढो़ तो जानो!)

"ऍस्टेरिक्स"किति वर्षे झाली. नवीन येतात का तिच जुनी आहेत? उद्याच लायब्ररीत शोधतो.

टग्या's picture

24 Sep 2007 - 3:17 pm | टग्या (not verified)

... येतात अजूनही अधूनमधून... उडेरझो (उच्चाराबद्दल खात्री नाही) काढतो कधीकधी... पण त्यांना ती मजा नाही. जुन्या ऍस्टेरिक्सच्या तुलनेत स्पष्टच सांगायचं तर काहीच्याकाहीच असतात. एवढ्यात 'ऍस्टेरिक्स अँड द फॉलिंग स्काय' आले... बकवास आहे. तीनचार वर्षांपूर्वी 'ऍस्टेरिक्स अँड द ऍक्ट्रेस' आले... ठीक आहे पण खास नाही... संग्रह करायचाच म्हणून विकत घेतली, पण विन्टाज ऍस्टेरिक्सची मजा नाही.

उपलब्धता आणि नवीन रिलीझेससाठी ऍमेझॉन.कॉम किंवा नवरंग.कॉम पहावे.

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 5:58 am | स्पंदना

नुसती त्यांची दाढी अन डोळ्यातले भाव पाहुन जे ह. ह. पु. वा. होते ती मजा डिजिटली मस्टर केलेल्या चित्रात खरच नाही, अन कथेतही नाही. मलापण हवय विंटेज कलेक्शन. कुठे मिळेल?
मला तर टीनटीन पण विंटेज आवडतं.
धम्माल येते बघता वाचताना.

आजानुकर्ण's picture

24 Sep 2007 - 2:54 pm | आजानुकर्ण

ऍस्टेरिक्सचे चित्रपटही धमाल होते. एखादा बघितल्याशिवाय त्यातली गंमत कळणे अवघड आहे. ऍनिमेशनपटांपेक्षा लाईव्ह प्रकारातले चित्रपट तर अगदीच धमाल. ;)

टग्या's picture

24 Sep 2007 - 3:20 pm | टग्या (not verified)

ऍस्टेरिक्सची कॉमिक्स वाचली त्यामानाने चित्रपट बघितले नाहीत. एखादाच (बहुधा 'क्लिओपात्रा') तोही फार पूर्वी व्हिडियोटेप भाड्याने आणून बघितलाय. बघायला पाहिजेत.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2007 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे

सर्व धर्मात मात्र कावळ्यान्चा आत्म्याशी सम्बन्ध असतो असे समजले जाते अर्थात पण ही अन्धश्रद्धा आहे.

फक्त हिंदु धर्मात.
प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण's picture

24 Sep 2007 - 10:12 am | आजानुकर्ण

पक्ष्यांच्या भाषेविषयी येथे थोडेसे वाचता येईल

मस्त धागा अन प्रतिसादही.

शेणाच्या वासाला गोठ्यातला वास म्हणतात.
तुपकट, धुरकट अशी वासांचीपण वर्गवारी होते.

हुप्प्या's picture

18 Apr 2013 - 7:04 am | हुप्प्या

माझ्या परीने उत्तर हे असे
रंग ही जाणीव ही विद्युतचुंबकीय लहरींची लांबी एका ठराविक आकारांची असेल तर माणसाला होते. (रंगांधळे लोक अपवाद म्हणून सोडू).
म्हणजे अमुक ते अमुक तरंगलांबी असेल तर आपल्याला लाल रंग दिसतो. अमुक ते तमुक असेल तर नारिंगी आणि असेच जांभळ्या रंगापर्यंत.
तर अशी एका डायमेन्शनमधे असणारी ही रंग ही संवेदना तशी सरळ सोपी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणाहून निर्माण होणारे रंग सारखे दिसणे शक्य आहे. कारण दृष्टीला जाणवणारे रंग हे ह्या रेंजमधे असणारच.

याउलट वास म्हणजे विशिष्ट रसायनांचे अस्तित्त्व. आता रसायन ही काही अशी एक डायमेन्शनमधे मांडता येणारी संवेदना नव्हे. असंख्य रसायने, त्यांची असंख्य प्रकारची मिश्रणे निसर्गात आढळतात. तेव्हा दोन वेगळ्या गोष्टींचे वास सारखे असण्याची शक्यता कमी. अपवाद आहेत म्हणजे उकडलेल्या अंड्याचा वास आणि काही नैसर्गिक उष्ण झर्यांच्या जवळ येणारा वास हा सल्फरच्या कुठल्याशा संयुगाच्या अस्तित्वामुळे सारखा वाटतो. पण असे अपवाद अगदी कमी आहेत.
त्यामुळे वासांना नावे देण्याची गरज पडली नाही असे मला वाटते.

सुबोध खरे's picture

18 Apr 2013 - 9:39 am | सुबोध खरे

एल एस डी घेतल्याने मेंदूच्या तार जाळ्यात(circuit ) गडबड होते आणि दृष्टीचे संकेत कानाच्या केंद्रात जातात आणि आवाजाचे संकेत दृष्टीच्या केंद्रात जातात इ त्यामुळे तो माणूस मला रंग ऐकू येतात आणि आवाज दिसतो असे म्हणतो (हि वस्तुस्थिती आहे) त्यामुळे तरंग लांबी काय किंवा रासायनिक संकेत काय सर्व आपल्या मेंदूचे खेळ आहेत.

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 5:26 pm | बॅटमॅन

चर्चाप्रस्ताव रोचक आणि प्रतिसादांतले विषयही तितकेच रोचक!

एकच एक कावळा, भारत किंवा युरोपात गेला तर भाषेचा प्रॉब्ळम होतो का?

सोबतच मला पडलेला एक प्रश्नः

फक्त भारतातल्याच कावळ्याच्या भाषेत कालपरत्वे फरक पडतो का? जसे संस्कृत-प्राकृत-मराठी??

माणसाचे ओल्फॅक्टोरी सेन्सेस फारसे समृद्ध नाहीत - माणसे २०/२५ वास ओळखतात - कुत्रे हजारो वास ओळखतात.
माणसाचे रंगांचे द्यान ही मर्यादित आहे - म्हणून एकाच रंग निरनिराळी माणसे निरनिराळ्या प्रकारे व्यक्त करतात. ( लालसर , विटकरी , करडा , तपकिरी , राखाडी असे संदर्भ दिले जातात ) पुरुष हया मध्ये फारच ढोबळ असतात , बायका जरा जास्त स्पष्ट असतात.