वाचकांच्या सोयीसाठी नवा धागा उघडत आहे. जुन्या धाग्यासाठी पहा :
http://www.misalpav.com/node/8846
सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती.
तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते. आणि परदेशी नागरीक: मूळचे, म्हणजे जन्मतः भारतीय, परंतु सध्या परदेशी नागरीक)
प्रश्नः
समजा आपण रहात असलेल्या देशाचे भारताशी (काही कारणामुळे) वितुष्ट आले, किंवा युद्ध झाले, तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल (युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?) ?
येऊ द्यात.
माझे उत्तरः मी ज्या देशाचा नागरीक आहे, मग रहात कुठे का असेना, त्याचे समर्थन करीन, त्या देशाकडून लढीन. तुमचे काय ?
प्रतिक्रिया
6 Aug 2009 - 5:51 pm | दशानन
:|
6 Aug 2009 - 5:52 pm | टारझन
नविन शोध लागला ... मुक्तसुनित हेच खरे मिसळभोक्ता आहे !!
- (स्पाय) मिसळसुनित
6 Aug 2009 - 6:49 pm | छोटा डॉन
>>नविन शोध लागला ... मुक्तसुनित हेच खरे मिसळभोक्ता आहे !!
व्वा टारझनराव, मला तुमचा अभिमान वाटला.
वास्तविक पहाता ह्या शोधाबद्दल आपल्याला खचितच "शांततेसाठीचे नोबेल प्राईज" मिळालले हवे पण आपण ते पुन्हा "फेकलेल्या परदेशी तुकड्यांची औकाद ती काय ?" म्हणुन फाट्यावर माराल ह्याची खात्री आहे ...
म्हणुन निदान आपल्याला "ज्ञानपीठ" द्यावे अशी शिफारस मी करतो ...
------
छोटा डॉन
6 Aug 2009 - 6:43 pm | विकास
मुळ धागा मिसळभोक्तांनी सुरू केल्या मुळे विशेष करून हा त्यांना प्रश्न आहे.
आपण विचारत आहात की: तर तुम्ही कोणत्या देशाचे समर्थन कराल...युद्ध समयी, कोणत्या देशाकडून लढाल ?
समर्थन आणि लढणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहील्याच्या बाबतीत नुसता कळफलक बडवावा लागतो तर दुसर्याच्या बाबतीत शत्रूला बडवावे लागते. तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? "त्या देशाकडून लढीन" असे म्हणताना नक्की तुम्ही कसे लढणार?
बाकी आम्ही लहानपणा पासून असेच शिकत आलो आहे युद्ध एकच आहे आणि बाजूही ठरलेली: "माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू!" ;) (ऐकीवात आहे: आचार्य अत्रे हे गाणे ऐकल्यावर म्हणाले की बहुतेक मरूच!8} कदाचीत त्यांना टिस्टा, शबाना, महेश भट्ट सारखी मंडळी तयार होणार हे माहीत असावे...:-) )
6 Aug 2009 - 9:53 pm | मिसळभोक्ता
माझ्या दृष्टीने समर्थन आणि युद्ध करणे फारसे वेगळे नाही. कळफलक हा दुधारी तलवारीपेक्षा अधिक इफेक्टिव्ह असतो. सायबर वारफेअर मध्ये कळफलकानेच युद्ध होते.
माणुसकीचे वगैरे कविता म्हणून ठीक आहे. पण माणुसकीच्या बाजूने तुमचा देश नसला, तर तुम्ही स्वतःच्याच देशाशी युद्ध कराल का ?
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:25 pm | Nile
=)) =)) =)) =))
त्यासाठी 'ते' युद्ध होण्याची वाट कशाला पहायला पाहीजे? मराठी 'संकेत'स्थळांवर तर नेहमीच अशी युद्ध चालु असतात. =))
6 Aug 2009 - 6:51 pm | विनायक प्रभू
विकास भौ- एकदम सहमत
पुन्हा कशाल अवतरतोस, मरुच नको ना असे कोणी का सांगत नाही.
6 Aug 2009 - 7:23 pm | विकास
>>>मरुच नको ना असे कोणी का सांगत नाही.<<<
वर माझ्या विधानात अत्र्यांना कुठल्या अर्थाने म्हणायचे होते ते लिहीले आहेच. "मरूच नको ना" हा मुद्दा बरोबर आहे पण त्याच बरोबर लढणे, जबाबदारी पार पाडणे हे विसरू नको हे सांगणे देखील महत्वाचे आहे. दुर्दैवाने ते सांगितले जात नाही. त्यामुळे तसे व्यवहारात मग वागताही येत नाही...
माझ्या इथल्या एका भारतीय मित्राने (तत्कालीन इथल्या विद्यालयातील प्राध्यापकाने) सांगितलेले एक पंधराएक वर्षांपुर्वीचे उदाहरणः "सबवे ला (दोन डब्यांची रस्त्यावरची आणि भुयारात पण जाणारी ट्राम) अचानक कसला तरी हादरा बसला आणि सर्वजण जागीच हलले अथवा पडले. ताबडतोब दारे उघडली गेली (कारण रस्त्यावर होती) आणि मी बाहेर जीव वाचवायला पळत आलो. नंतर बघितले तर लक्षात आले की दुसरापण एक बाहेर पळत आला आणि तो ही भारतीयच होता. बाकी त्या डब्यातील काळे-गोरे (वर्णीय, आडनाव नाही!) स्वतःला सावरून झाल्यावर इतरांना मदत करत होते..."
मला माहीत आहे, असे सगळेच नसतात, सगळीकडे असे होत नाही आणि याला जिथे गरज आहे तिथे उलट उदाहरण पण मी देऊ शकेन. पण तरी देखील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे...
6 Aug 2009 - 9:55 pm | मिसळभोक्ता
विकासभौ,
आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ?
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:15 pm | विकास
आपण दिलेल्या उदाहरणावरून "भारतीय हे माणुसकीचे शत्रू आहेत" असे दिसते, कारण संकटात सापडलेल्यांना मदत करणे, हीच माणुसकी. आता तुमचे युद्ध कुणाशी ?
तसे म्हणायचे नाही. एक अब्ज बिंदूंमधील हे केवळ दोन बिंदू आहेत. बाकीचे एक्स-वाय अॅक्सिस वर मांडून मग लाईन होते, की कर्व्ह, पॅराबोला की हायपरबोला (अॅसेम्प्टोटीक - इव्हर अॅप्रोचेस बट नेव्हर रिचेस) होतोय ते समजेल...
बाकी, हे म्हणजे केवळ ९/११ झाले म्हणून सर्वच मुसलमान (आणि मुस्लीम राष्ट्रे) वाईट म्हणण्या सारखे झाले. आपल्याला माहीतच असेल की आपल्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुडूप ने इस्लाम इज रीलिजन ऑफ पीस असे सातत्याने म्हणले होते (त्याने हल्ला केलेले, अटकेत टाकलेले अपराधी आणि निरपराधी हे मुस्लीम धर्मीय होते हा निव्वळ योगायोग! ;) )
6 Aug 2009 - 9:59 pm | मिसळभोक्ता
गीतेच्या पहिल्या अध्यायात भगवंताने "स्वकीयांशी लढताना ते स्वकीय आहेत ह्याचा विचार करू नये" असे सांगितले आहेच. त्यामुळे बाय लॉ, तुम्हाला स्वतःच्या देशाविरुद्ध लढण्याची परवानगी आहे.
(अवांतरः भग = भोक, वंत = असलेला.)
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:45 pm | _समीर_
अवांतरः भग = भोक, वंत = असलेला
होका? मग मिसळभोक्ता म्हणजे भोकातून तर्री पडणारा का?
6 Aug 2009 - 10:14 pm | एक
यातून काहीतरी वेगळच तर सुचवायचं नसेल? :W
आम्ही कुठल्या बाजूने लढणार हे आमच्याकडे कोण मदत मागायला येणार आणि ते कुठे बसणार यावर ठरवलं जाईल..
-(तो पर्यंत पहुडलेला कॄष्ण)
6 Aug 2009 - 10:17 pm | विकास
हा धागा औषधोपचार/चौकशी या सदरात का आहे?
खूप मिसळ खाल्ली की असा औषधोपचार अधूनमधून लागतो म्हणून हे औषधोपचार सदरात आहे ;)
6 Aug 2009 - 10:19 pm | मिसळभोक्ता
मिसळपावावरील एका गटाची चौकशी, आणि विरोधी गटाला औषधोपचाराचा सल्ला.
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:14 pm | नितिन थत्ते
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात.
(अरे हे काय? धागा माझ्यासाठी नाहिये) :)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
6 Aug 2009 - 10:18 pm | मिसळभोक्ता
इंग्लंड किंवा वेस्टइंडिज मधले भारतीय त्यांच्या संघाविरुद्ध भारतीय संघाला पाठिंबा देतात आणि विजयाचा जल्लोषही करतात.
मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ?
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दुसरी इनिंग सुरू झालेली दिसते ... चला, झाडावर चढण्याचा टाईम झाला माझाही!
अदिती
6 Aug 2009 - 10:31 pm | मिसळभोक्ता
झाडावर चढलीस, तर डॉन्याला खाली पाठव. त्याची इथे गरज आहे म्हणाव.
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:32 pm | Nile
ते तर कवापासुन मि.भो आला रे आला ओरडताहेत. ;) (डॉ. ह. घे..च! )
6 Aug 2009 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तसंही माझ्या वजनाने फांदी मोडेल! पण तो पिंपळावर चढला आहे आणि मी हरबर्याच्या झाडावर त्यामुळे भेटणार नाही तो मला!!
डान्राव, या हो, तुम्हाला हे काका बोलावत आहेत. आल्यावर तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. ज्यांना कोणाला डान्राव दिसतील त्यांनी कृपया त्यांना त्वरित मिपावर पाठवून द्यावे.
अदिती
6 Aug 2009 - 10:51 pm | टारझन
काय चढाचढी चाल्लीये रे मुलांनो ??
गुढग्याचे त्रास संभवतील आं ! मंग नानावटीत टाकावं लागेल आणि तिकडेही वराहज्वर आला आहे म्हणे !!
-(फुटबॉल एल्बो ने त्रस्त) टचिन टेंडुलकर
6 Aug 2009 - 10:56 pm | _समीर_
टारू, गुढग्याच्या त्रासाची चिंता तुला असणे स्वाभाविक आहे रे! पण सगळ्यांचेच तुझ्यासारखे नसते काही. (हलके घे हो!)
6 Aug 2009 - 10:53 pm | प्राजु
मग दंगली मस्जिद बंदर, भायखळ्यात का होतात ?
तिथलेच बहुतेक सगळे लोक अनिवासी इंग्रज अथवा वेस्टइंडिज असावेत.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Aug 2009 - 10:28 pm | Nile
थत्ते काका (की आजोबा म्हणु?) कुठल्या 'देशात' आहात? की मंगळावर आहात? =))
6 Aug 2009 - 10:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
का रे, कुठल्या देशात किंवा ग्रहावर आहेत त्याप्रमाणे तू काका का आजोबा ते ठरवणार का?
अदिती
6 Aug 2009 - 10:55 pm | Nile
हॅ हॅ हॅ. त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर दुर्बीण रोखुनच सांगा ना आम्हाला. ;)
6 Aug 2009 - 10:41 pm | इनोबा म्हणे
तेजायला आमच्या प्रतिसादांचं आणि ह्या मॉनीटरांचं काय वाकडं आहे कळत नाही. दिसला प्रतिसाद की उडव.
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
6 Aug 2009 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय रे, आत्ता खरंच प्रतिसाद उडवला का उगाच वावड्या उडवत आहेस रे?
अदिती
6 Aug 2009 - 10:48 pm | इनोबा म्हणे
काय रे, आत्ता खरंच प्रतिसाद उडवला का उगाच वावड्या उडवत आहेस रे?
इनोबावर आरोप करणं ही फ्याशनच झालीये हल्ली. असो.
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
6 Aug 2009 - 10:43 pm | _समीर_
इनोबा, आता ऐन राखी पोर्णीमेला तू भांचोत भांचोत करत बसलास तर उडणारच की रे प्रतिसाद! :)
बाझवला तिच्यायला!!
6 Aug 2009 - 10:46 pm | Nile
संभाव्य कारणे:
१. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता
२. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?)
३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात
वगैरे वगैरे वगैरे.
6 Aug 2009 - 11:11 pm | इनोबा म्हणे
१. तुम्ही अमेरीकन कंपनीत काम करता
नाही
२. तुमच्या चपलेचा ब्रँड अमेरीकन आहे (घातल्या आहेत का?)
नाही
३. अमेरीकन कम्पु शी निगडीत आहात
आमचा स्वतःचाच कंपू आहे.
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
6 Aug 2009 - 10:58 pm | नंदन
खालीलपैकी एक प्रतिसाद निवडावा आमचा प्रतिसाद म्हणून -
१. काय ट्यँवट्यँव लावलं आहे. आहे हे असं आहे. ज्यांना इथलं वातावरण आवडत नाही, त्यांनी चालू पडावे. सगळे गेलात नि XX बंद पडले तरी बेहत्तर (हे बाळासाहेब ठाकरे अधूनमधून निवृत्तीची घोषणा करत तसं. )
२. बरं बाबांनो. तुमच्या मनासारखं होऊ देत. काय कवतिकं करायची ती करा अमेरिकेची. आपण साला एक शब्द बोलणार नाही. XX मारली आणि पदरचे पैसे खर्चून संकेतस्थळ काढलं. (पडलो तरी नाक वर)
३. आपलं घर, आई-बाप सोडून सुखासुखी कुणी परदेशी जात नाही, हे मला ठाऊक आहे. पण दुर्दैवाने माझ्या ओळखीत दहा तरी असे लोक आहेत जे.... सगळ्यांचा मित्र. (हा आधी तीनदा येऊन गेलेला प्रतिसाद)
४. साला मजा आली. एक काडी टाकली की हे लोक कसे भांडत बसतात ते बघायला. &#$@ (प्रतिवादाचे मुद्दे संपल्याने निरुत्तर झालो आहोत हे कबूल न करण्याचा एक मार्ग)
या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आपल्याला उद्देशून तर नसेल अशी शंका कोणी घेऊ नये :). त्यामुळे या प्रतिसादाला "माझ्या लेखनाचा बराच बारकाईने अभ्यास केला आहेस, हो. छान, छान" अशी ठेवणीतली प्रतिक्रिया आली तर आश्चर्य वाटेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Aug 2009 - 11:03 pm | _समीर_
वावावा! असाच अभ्यास चालू राहू दे हो नंदन! शेवटी क्रेडीट मलाच जाते ;)
कोकणात म्हशीला रेडकू झाले तरी क्रेडीट सरपंचाला म्हणतात बहुतेक =))
6 Aug 2009 - 11:07 pm | विसोबा खेचर
आयला नंद्या आमचा फुल्ल फॉर्मात! :)
समर्थ भोजनालय नक्की रे! :)
तात्या.
6 Aug 2009 - 11:14 pm | _समीर_
तात्या आज नेमकी गुरुवार रात्र आहे!! आजची खादाडी गुरुवारचा उपास तिच्यायला...
बुधवार रात्र असती तर तुमी पण फॉर्मात..मग लैच मज्जा!! :)
6 Aug 2009 - 11:10 pm | Nile
=)) =)) =))
(सध्या स्केट-बोर्डासहीत बुट घालुन तयार)