गाभा:
आज सकाळी पुणे मं.पा. येथे जमावाने ५० पेक्षा जास्त पी.एम्.टी. फोडल्या.
कारण काय तर एक १२ वर्षाचा मुलगा सायकलवरून जात असताना पी.एम्.टी. च्या चाकाखाली आला.
रस्त्यावर सगळीकडे काचाच काचा होत्या.
खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर?
भारताबाहेरही लोक असेच वागतात का?
शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते?
राजमुद्रा :)
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 2:43 pm | मनस्वी
असे करून काही साध्य होत नाही.
बशी फोडून नागरीकांचाच खोळंबा होतो. दंगलीत ज्येष्ठांना दुखापत होते.
पी.एम्.टी. ड्रायव्हर मात्र हवी तशीच घोडदौड चालू ठेवतात. सेवेत खंड नको!
त्यांना फार फार तर मेमो देउन सोडत असतील. परत घोडदौडीला मोकळे.
अशावेळी पी.एम्.टी.ला / ड्रायव्हरला काय बरे शिक्षा करावी हा प्रश्णच आहे.
(घोडदौडीला घाबरणारी) मनस्वी
11 Mar 2008 - 6:12 pm | शेखर
जमावाची क्रुती ही बिनडोक पणाची आहे. असे करुन आपण आपल्याच संपत्तीचा नाश करतो. त्याची भरपाई पकडलेल्या लोकांकडून घेतली पाहिजे.
- (अहिंसेचा पुजारी ) शेखर
11 Mar 2008 - 6:50 pm | छोटा डॉन
मी आधीच कबूल करतो की बसच्या चाकाखाली मुल येणे ही खरच वाईट व गांभिर्याने घेण्यसारखी घटना आहे...
जर त्या मयताच्या बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी हा मोठ्ठा धक्का आहे. त्यामुळे चिडून कदाचित जमाव तोडफोड करत असावा ....
पण आपण कधीतरी त्या "बसड्रायवरच्या" बाजूने पण विचार करायला हवा. माझा अनुभव तर असा आहे की अशा प्रकारच्या अपघातात शक्यतो चूक बस ड्रायवरची नसतेच. तोच आपला बिचारा जीव मुठीत घरून बस चालवत असतो. मला सांगा "पुणे , मुंबई , बेंगलोर ,दिल्ली " अशा प्रचंड वाहतूक असनार्या रस्त्यावर बस चालवणे काय जोक आहे का ? त्याला तेवढा अकलेचा भाग व माणूसकी नाही का की तो ऊगाच आपले कुणाच्या अंगावर बस चढवेल? तो काय विकॄत आहे का ? आपण हा का विचार करत नाही की चूक गाडीखाली आलेल्या माणसाची असू शकेल. आजकाल जो तो ट्राफीक मधून पुढे पळण्यासाठी पायजे तसे टर्न घेत असताना चूक एकट्या त्या बसड्रायवरची मानून फोडाफोड करण्यात काय हाशिल ?
माझी थेअरी सांगतो, हे असे करणारे लोक जनरली "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" असतात किंवा अशा परिस्थितीचा फायदा उठवण्यात वाकबगार असे "समाजविघातक गुंडे-मवाली" असतात. सामान्य माणूस यात कधीही उतरत नाही. यांना "फुकटचे , आयते व हरामचे खाऊन" माज आलेला असतो, रक्तात एक रग निर्माण झाली असते मग ती उत्रवणार कुठे ? मग फायदा ऊठवा असल्या संधींचा , करा तोडाफोड .....
ह्यात ह्यांचा फायदा म्हंजे आपला हात धूऊन घेता येतो, जमलेच तर चार पैसे मिळवता येतात, आपल्या नेत्यांच्या डोळ्यात भरंयासारखे कार्य (???) करता येते [ कारण हे तर समाजासाठी चालले आहे ना ?] व वर फूकटची प्रसिद्धीही मिळते कारण आपल्यासारखा "सवंग व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारा मीडिया" आख्या जगात नाही....लगेच हे लोक कॅमेरे व माईक घेऊन धावतात, कुणाचीही मुलाखत घेतात, तोडफोड करणार्या महाभागांचे कव्हरेज घेतात व ते टीव्हीवर हजारदा दाखवतात ....आणि एकदा का ह्या "रिकामटेकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते" वा "समाजविघातक गुंडे-मवाली" लोकांना टीव्हीवर मिरवून त्यांच्या कार्याचे सार्थक झाले की ते आयुष्यभर "समाजसेवक" म्हणून मिरवायला मोकळे मग पुढच्या निवडणूकीत कमीतकमी "नगरसेवकाचे " तिकीट तरी कुठे जात नाही , झाला राजकारणाच्या गटारीत त्यांचा प्रवेश. मग अशी ही सुवर्णसंधी हे लोक का सोडतील हो ?
राहता राहिला प्रश्न देशाच्या संपतीचा , तर त्याची काळजी आहे कुणाला ? काय संमंध आमचा त्याच्याशी ? तुम्ही आमाला विचारणारे कोण ? देशाची संपत्ती म्हणजे शेवती जनतेचीच ना ? मग आम्ही बघू त्याचे काय करायचे ते , ती फोडून टाकायची का लोटून खायची ........
जय महाराष्ट्र , भारत माता की जय ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Mar 2008 - 8:11 pm | टिउ
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं? रस्त्यावर पी.एम.टी. बसच्या आकाराच्या बाकी गाड्या सुद्धा धावत असतात. त्यांच्या अपघाताच्या बातम्या इतक्या वेळा ऐकल्या आहेत का?
पुण्यात येउन बघा राव! अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर.
रस्तावर गर्दी असतांना, बस स्टॉप जवळ आल्यावर बसचा स्पीड कमी करावा हे समजण्यासाठी ट्रेनिंगची गरज नसते.
बाकी पी.एम्.टी.ची तोडफोड करुन काही साध्य होत नाही. गाड्या काही त्या ड्रायव्हरच्या मालकीच्या नसतात. देशाचीच संपत्ती असते. गाडी दुरुस्तीसाठी शेवटी आपल्या खिशातनंच पैसे जातात.
12 Mar 2008 - 8:18 am | विसोबा खेचर
गेल्या वर्षा दोन वर्षात पी.एम.टी. बस अपघातांचं प्रमाण खुप वाढलंय. प्रचंड प्रमाणात वाहतुक वाढ हे कारण तर त्यामागे आहेच. पण 'गाडीखाली येउन मृत्यु' ह्या मथळ्याखालच्या बातम्यांमध्ये ९०% वेळा पी.एम.टीचंच नाव का असतं?
हम्म्म! वरील मुद्दा जर ग्राह्य धरला तर जमावाचं बरोबरच आहे. निदान जमावाच्या या वर्तणुकीमुळे भविष्यात तरी आपण म्हणता त्याप्रमाणे पी एम टी आणि तिचे माजोरी बस ड्रायव्हर सुधारतील!
आणि तशीही जमावाची मानसिकता हे जमावाची मानसिकता असते. ती चूक की बरोबर हे ठरवणं मुश्कील आहे!
आपला,
(रक्तरंजित क्रांतीवर ठाम विश्वास असलेला) तात्या.
12 Mar 2008 - 9:22 pm | प्रभाकर पेठकर
जमावाची कृती कुठल्याही कोनातून पाहिले तरी समर्थनिय नाही. पण खोलात विचार करीता काही मुद्दे समोर येतात, ते असे.
समाजात वैफल्यभावना (फ्रस्ट्रेशन) उच्च कोटीची आहे. गरीब -श्रीमंत दरी वाढतेच आहे. महगाई, भ्रष्टाचार, आरोग्य सेवा, वाढता जातीयवाद, धर्मवाद ह्या समस्याही आहेतच. राजकारणी आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपल्याला कोणी वाली नाही ही असुरक्षिततेची भावनासुद्धा माणसास कायदा स्वतःच्या हातात घेण्यास भाग पाडतात. जमावाकडे ताकद असते, बुद्धी नसते. जमावाच्या हिंसाचारात जबाबदारी कुणा एकट्याची नसल्यामुळे प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित मानतो आणि अक्षरशः 'हात धुवून घेतो'. प्रत्यक्ष 'त्या' घटनेने तो चिडलेला असेलही किंवा नसेलही. समाजावरील, राजकारण्यांवरील, प्रशासनावरील त्याचा समर्थनीय राग काढण्याचे साधन, संधी म्हणून तो अशा घटनांमध्ये भाग घेतो. (इतर, गुंड प्रवृत्ती, स्वार्थ, राजकारण इत्यादी मुद्दे आहेतच).
अतिशय माजोरी करत, आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखे गाड्या चालवतात हे पीएमटी ड्रायव्हर
हे बाकी अगदी खरे आहे. मी ही अनेकदा अनुभवले आहे. बसस्टॉप पासून अंतर सोडून, मागची रहदारी अडवून बस थांबविणे, इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने दाबणे, ट्रॅफिक सिग्नल न पाळणे, बसमध्ये जागा असूनही स्टॉपवर बस न थांबविणे, क्लच न दाबता गिअर बदलणे आदी सवयी पुण्यातील बस ड्रायव्हर्सना आहेत. भांडायला गेलात तर अत्यंत माजोर्या शब्दात तुमचा अपमान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. ट्रॅफिक पोलीसही त्यांचीच साथ देतात.
बसची तोडफोड करून काही साध्य होत नाही. ड्रायव्हरला शिक्षा झालाखेरीज त्याची मानसिकता बदलणार नाही.
वाहतुकीला शिस्त लावणे हे पोलीसांचे आणि शिस्त लावून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. बाहेरच्या देशात शिस्त पाळणारा, शिस्तीचे गोडवे गाणाराही भारतात आला की कोणीच शिस्त पाळत नाही म्हणून स्वतःही शिस्त पाळणे सोडून देतो.
पुण्यात वाहतुकीची/रहदारीची शिस्त न पाळणारे ९९% नागरीक हे तथाकथित सुशिक्षित आहेत. त्यांना पुणे हे विद्येचे/संस्कृतीचे माहेरघर आहे ह्याचा अभिमान आहे. परंतु, रहदारीचे नियम तोडणे, बेदरकार आणि बेजबाबदारपणे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळत वाहन चालवणे, उद्दामपणे/उर्मटपणे बोलणे ह्याला पुणेकर स्वतःचे कौशल्य आणि हुशारी मानतात, हे पुणे शहराचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
पुण्याच्या रहदारीला मुंबईसारखी शिस्त लावण्यात पुण्याचे राजकिय नेते आणि प्रशासन कमालीचे उदासिन आहे.
11 Mar 2008 - 11:22 pm | सचिन
अशा पद्धतीने कायदा हातात घेणे केव्हाही चूकच!!
त्या तोडफोडवाल्या कितीजणान्ना रस्त्यावर गाडी चालवण्याची अक्कल आहे ? त्यान्नी कितीदा सिग्नल पाळले आहेत ?
त्यान्नी कितीदा झेब्राच्या आधी गाडी थाम्बवली आहे ? त्यान्नी कितीदा स्पीड लिमिट्स पाळली आहेत ?उजव्या बाजूने कधी तरी ओव्हरटेक केलय ? मामाने पकडल्यावर त्याच्या हातात नोटा कोम्बणारे हेच !! सामजिक शिस्तीची जाण आपल्याला कधी येणार ...बिचार्या ब्रम्हदेवाच्या बापालाही ठाऊक नसेल !!
12 Mar 2008 - 5:25 pm | प्रेमसाई
जमावाला अक्कल नसते हे दिसुन येते
12 Mar 2008 - 7:00 pm | व्यंकट
>>खूप विचार करूनही ठरवता येईना जमावाची ही क्रुती चूक की बरोबर?
कृती चूक, भावना सहज.
>>भारताबाहेरही लोक असेच वागतात का?
काही ठिकाणी हो, काही ठिकाणी नाही.
>>शक्य असल्यास सांगा तुम्हाला काय वाटते?
आपल्याला सिव्हीक सेन्स नाही.
व्यंकट
12 Mar 2008 - 8:25 pm | स्वाती राजेश
मी भारताबाहेर (इंग्लंड) मधे राहते. मी दोन्ही कडचे ट्रॅफिक अनुभवले आहेत.
लंडन मधे..
१.सिग्नल्स सर्व चालू अवस्थेत असतात. जर खराब झाले तर २४ तासाच्या आत दुरुस्त होतात.
२.९०% लोक नियम पाळतात.
३.लेन सोडायची/चेंज करायची असेल तर इंडिकेटर चा वापर करतात.
४.मोटर वे (हाय वे)वरसर्व गाड्या चांगल्या कंडिशन मधे असतात.(मॉट )
५.सर्व डायरेक्शन असलेले बोर्ड असतात व्यवस्थीत, स्पष्ट, आणि जाहिरात नसलेले...
६.मोटर वे वर जर अपघात/रस्ता दुरुस्तीचे काम मुळे जर ट्रॅफिक जाम असेल तर अगोदर ५-१० किमी वर तुम्हाला त्याचे साइन्स दिसतील.जेणेकरून तुम्ही तुमचा रूट चेंग करू शकता.
७.राउंड अबाउट हा प्रकार सर्वात चांगला. तिथे सिग्नल नसतो पण लोक व्यवस्थीत नियमाप्रमाणेच जातात.
८.ड्रायव्हिंग लायसन्स व्यवस्थीत १ रीटन-१ प्रॅक्टीकल ने च घेता येते. तिथे वशिला इ... चालत नाही.
९.माझ्या अनुभवाने भारतापेक्षा भारताबाहेर गाडी चालवणे सोपे आहे.
१०. इथे २ व्हीलर/सायकल क्वचितच दिसतात म्हणून कदाचित असेल ....
११. गावमधे रस्ते छोटे असतात मग तुम्ही एका मागून एकच जायचे तिथे ओव्हर टेक करायला जाग नसते.
१२.लोकांना जायला सगळीकडे फुटपाथ असतो. लोक त्याचा उपयोग जाण्या-येण्यासाठीच करतात्.(काही ठीकाणी अपवाद सोडला तर कारण ती भाजी/फळे ची दुकाने असतील तर. पण ती दुकाने एशियनचीच असतात.
१३.भारतात लोकसंख्येचा उल्लेख करावाच लागतो. कारण हे सर्व व्हायला जेवढी लोकसंख्या तेवढ्या त्यांना सोयी करून देणे कठीणच आहे.
तरी सुद्धा इथे(भारताबाहेर) अपघात होतातच, नाही असे नाही, पण संख्या कमी असते कदाचित लोक कमी म्हणून असेल..
१४.अपघात झाला तर ५ मिनिटात पोलीस, एम्ब्युलन्स येते. तसेच अपघाताच्या ठिकाण चे ताबडतोब वाहन बाजुला करतात.
१५.पोलिस गाडी, एम्ब्युलन्स यांना रोडवर नेहमी पहिला प्रेफरन्स असतो..
१६. रस्त्यावर काम करणार असतील तर ते पाटी लावून/साधे कंपाउंड लावून आपली जागा निश्चीत(जायला यायला जागा देऊन) करतात.
तरीही मला माझा भारत देश आवडतो.कारण तिथे जी भांडायची (गाडी धडकल्यावर, जागा दिली नाही जायला तर..)मजा असते ती इथे नाही. तसेच जी मदत, आपलेपणा तो इथे दिसत नाही..असुदे शेवटी नाण्याला दोन बाजू असतात..
काही फायदे काही तोटे....
चु.भू.द्या.घ्या.
12 Mar 2008 - 10:28 pm | सुधीर कांदळकर
पटत नाही. आपल्याकडे आहेत ते नियम कोठे पाळले जातात? आहेत त्या सोई कोठे वापरल्या जातात. सिग्नल तोडणे नेहमीचे. तीनचाकी, दोनचाकी वाहने तर विचारूच नका. मी इतर देश पाहिले नाहीत. पण दक्षिण मुंबईतील (वांद्रे व शीवपर्यंत) रहदारी पाहा व इतर कोठलीहि रहदारी पाहा. जमीन अस्मानाचा फरक आहे. इतर ठिकाणचे ड्रायव्हर लोक कायदे खासकरून सिग्नल सर्रास मोडतात. साधा हॉर्नच पाहा कसा वाजवतात. द. मुम्बईत तेसे फारसे होत नाही.
तरीहि लंडनमधे १० टक्के लो़ कायदे पाळत नाहीत हे वाचून धक्काच बसला.
12 Mar 2008 - 11:50 pm | स्वाती राजेश
ही ड्र्ग्ज घेणारी, दारू पिऊन चालवणारी, रात्री रस्त्यावर दंगा घालणारी ही असतात.