पुण्यभूमीत डोंगराआड उगवणार्या सूर्याने दिलेले दर्शन :)
ही वाट दूर जाते...
माझिया पाषाणहृदयी वेदनेचे झाड आहे.
सूर्यकिरण सोनेरी हे...
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही...
झाडाआडून कोण पाहतो?
तेजोमय
सूर्य उगवला ,प्रकाश पडला, आडवा डोंगर...
पानांच्या कुशीत...
सोनेरी मुशीत...
आलाय खुशीत..
नारायण!
उत्तिष्ठोऽत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरूडध्वज । उत्तिष्ठ कमलाकान्त, त्रैलोक्यम् मंगलम् कुरू ॥
त्या तरूतळी...
रानफुला...
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 10:39 am | केशवसुमार
ॐकारशेठ,
अप्रतिम प्रकाशचित्रे..
केशवसुमार
11 Mar 2008 - 12:00 pm | विसोबा खेचर
सगळीच छायाचित्रे सुरेख! केवळ अप्रतिम...
तात्या.
11 Mar 2008 - 12:06 pm | सर्किट (not verified)
खूपच छान छायाचित्रे.
अनेक दिवसांपासून सूर्योदय बघण्याचे मनात होते. पण आज योग आला.
सकाळी खूपच लवकर होतो म्हणतात..
(शेवटच्या चित्रातील फुलांचे नाव कुणाला आठवते का ? ह्या झाडाला पांढरा चीक असतो, आणि तो डोळ्याला अपायकारक असतो असे ऐकले आहे.)
- सर्किट
11 Mar 2008 - 12:09 pm | धनंजय
मारुतीला रुईची पाने वाहातात. याच्या फळांत रुईसारखा कापूस असतो.
फोटो मस्तच. काही चित्रांत सूर्याभोवती खालच्या बाजूला कडे आहे... कॅमेर्यामुळे?
11 Mar 2008 - 12:11 pm | सर्किट (not verified)
धन्यवाद..
- (शतशः आभारी) सर्किट
11 Mar 2008 - 1:14 pm | इनोबा म्हणे
जबरदस्त! मन प्रसन्न जाहले...
अवांतर: ही प्रकाशचित्रे लॉ कॉलेजमागच्या हनूमान टेकडीवरुन घेतली आहेत काय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
11 Mar 2008 - 1:19 pm | नंदन
आलीत छायाचित्रे. 'त्या तरुतळी' विशेष आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Mar 2008 - 7:31 pm | कोलबेर
तसा प्रत्यक्ष सुर्योदय पहाण्याचा फारच कमी वेळा योग आला आहे ;) .. तुमच्या ह्या चित्रमालेने एक प्रसन्न सुर्योदय पहायला मिळाला! धन्यवाद!!
11 Mar 2008 - 7:47 pm | llपुण्याचे पेशवेll
चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का?
पुण्याचे पेशवे
11 Mar 2008 - 7:48 pm | llपुण्याचे पेशवेll
चित्रे मस्तच आहेत. हा परिसर वेताळ टेकडी आणि ए.आर्.ए.आय. चा आहे का?
पुण्याचे पेशवे
11 Mar 2008 - 8:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रे सुंदर.
11 Mar 2008 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रे सुंदर. अनुक्रमे चार नंबरचे लै भारी.
11 Mar 2008 - 8:42 pm | प्राजु
अप्रतिम चित्र.... एका झुडुपा मागे... खूपच सुंदर.. मानलं तुम्हाला...
- (सर्वव्यापी)प्राजु
11 Mar 2008 - 8:59 pm | चतुरंग
त्यासोबतची अवतरणेही खासच.मन अगदी प्रसन्न झाले.
चतुरंग
12 Mar 2008 - 11:07 am | प्रमोद देव
चतुरंगरावांशी पूर्णपणे सहमत आहे.
12 Mar 2008 - 10:57 am | ॐकार
ही टेकडी वानवडी आणि महंमदवाडी च्या मध्ये आहे. ही जमीन वनखात्याच्या ताब्यात असल्याने सद्ध्या तरी हे सुख अनुभवता येते. माझे घर इथून १० मि. वर असल्याने मनात येईल आणि वेळ मिळेल तसे मी कधीही इथे भटकायला जातो.
4 Apr 2008 - 3:02 pm | शैलेश दामले
अप्रतिम चित्र
4 Apr 2008 - 3:14 pm | मनस्वी
फँटॅब्युलस! जबरदस्त आहेत छायाचित्रे. खूप आवडली.
4 Apr 2008 - 4:28 pm | सुवर्णमयी
छायाचित्रे तर सुंदर आहेतच पण गाण्यांची निवडही आवडली.
रुईची झाडे सध्या शहरात एवढ्या सहज दिसत नाहीत. मला तर या भारत भेटीत अगदी दूर जिथे वस्ती नाही तिथे एखादे रुईचे झाड दिसले असेल. बाकी या झाडाशी निगडीत सगळया आठवणी लहानपणच्या आहेत.
सोनाली
4 Apr 2008 - 4:58 pm | मदनबाण
सर्वच चित्रे सुंदर आहेत्,रुई च्या झाडाचे चित्र तर फार आवडले. या झाडाचा कापुस जेव्हा आकाशात उंच उडतो तेव्हा तेही पहायला मजा वाटते.
( ॐ सुर्यय नमः )
मदनबाण
5 Apr 2008 - 8:04 am | सोम
ग्रेट.
5 Apr 2008 - 8:53 am | ऋषिकेश
झकास.. सगळी प्रकाशचित्रे खूप आवडली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश