बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता विडंबन लिहिण्याचे ओपन च्यालेंज मिळ्याल्या पासून विडंबनासाठी कच्चा माल शोधत होतो आणि आज पहाटे पहाटे बेसनलाडू यांची भाउबंदकी वाचनात आली..
म्हणल बघू जमतय का आपल्याला...
किनार्या'वरी शिजलेला कट
त्यांची निष्ठा, जगास कटकट!
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
चिलटांची त्या कशाच चिंत्ता?
वशिंड भरले, शिंगे दणकट!
काका पिटला ! पुतणा उठला!
भाउबंदकी आहे बळकट
विडंबने ही सुटली नाही
"केश्या" मेला आहे, हलकट
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 7:01 am | विसोबा खेचर
किनार्या'वरी शिजलेला कट
त्यांची निष्ठा, जगास कटकट!
खरं आहे रे बाबा! अरे मिसळपावच्या दुसर्याच दिवशी इथे येऊन पोष्टमनने पोष्टखाते सुरू केलेन! :)
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
हा हा हा! क्या बात है केशवा! खल्लास लिहिलं आहेस! :)
काका पिटला ! पुतणा उठला!
भाउबंदकी आहे बळकट
हा हा हा! मस्त..
विडंबने ही सुटली नाही
"केश्या" मेला आहे, हलकट
असू देत, परंतु केश्याचा हा हलकटपणा आवडला आपल्याला! :)
आपला,
(नॉर्थ कॅरोलिनाचा पोष्टमास्तर जनरल) तात्यागजानन!
11 Mar 2008 - 8:00 am | बेसनलाडू
नेहमीचा मसाला नसला, तरीही शब्द किंवा ओळी खालीवर होणे चालूच आहे. तरी नशीब पोटदुखी नि कसलेकसले वास आलेले नाहीत :) एक शेर तर जवळजवळ जसाच्या तसा आलाय. अतिपरिचयादवज्ञा म्हटले होते, ते हेच. पण यालाही रसिकांची मस्त दाद आल्यास नवल वाटायचे नाही.
बेटर लक नेक्स्ट टाइम!
(शुभेच्छुक)बेसनलाडू
11 Mar 2008 - 8:26 am | केशवसुमार
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी..
पोटदुखी नाही कशी.. झालेली दिसते आहे.. आणि वास ही येता आहे ..
असो..बेटर लक साठि धन्यवाद..
(आभारी) केशवसुमार
11 Mar 2008 - 8:30 am | बेसनलाडू
अगदी अपेक्षित प्रतिसाद.. ..होत अस कधी कधी..
लिहीत रहा.
(वाचक)बेसनलाडू
11 Mar 2008 - 8:34 am | केशवसुमार
एक ओळ तर जशीच्या तशी आलीय.
(लेखक) केशवसुमार
11 Mar 2008 - 8:47 am | बेसनलाडू
वाण नाही पण गुण लागला :)
किंवा जशास तसे? :) :)
ऐकलंय का/ना?
(ऐकीव)बेसनलाडू
11 Mar 2008 - 9:28 am | केशवसुमार
'गिर्या तो भी टांग उप्पर' अस काहीस ऐकल्यागत वाटतय
(बागवानी)(स्मरणशील )केशवसुमार
11 Mar 2008 - 9:51 am | बेसनलाडू
हे सुद्धा अगदी चपखल बसतंय की :) :)
(चपखल)बेसनलाडू
11 Mar 2008 - 10:12 am | केशवसुमार
मग वाटल काय..
(चप-खल)केशवसुमार
11 Mar 2008 - 10:17 am | बेसनलाडू
कदाचित हेही अपेक्षित? :) :)
(अपेक्षित)बेसनलाडू
11 Mar 2008 - 10:19 am | केशवसुमार
हेच अपेक्षित! :):)
(अपेक्षित) केशवसुमार.
11 Mar 2008 - 10:27 am | बेसनलाडू
(बरोबर)बेसनलाडू
11 Mar 2008 - 10:33 am | केशवसुमार
(चूक) केशवसुमार..:););):)
11 Mar 2008 - 10:57 am | बेसनलाडू
(अगदी)बेसनलाडू
11 Mar 2008 - 11:04 am | केशवसुमार
अता कस..
(बेस)केशवसुमार..):):):)
11 Mar 2008 - 11:07 am | बेसनलाडू
म्हणजे प्रश्नच मिटला :) :)
(लई बेस)बेसनलाडू
11 Mar 2008 - 11:12 am | केशवसुमार
म्हणजे हे बाकी लई बेस..
(नुसता बेस) केशवसुमार
11 Mar 2008 - 8:36 am | प्राजु
किनार्या'वरी शिजलेला कट
त्यांची निष्ठा, जगास कटकट!
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
सॉलिड.....आवडले...
- (सर्वव्यापी)प्राजु
11 Mar 2008 - 10:56 am | विसोबा खेचर
जाऊ दे रे केशवा,
शेवटी बेलाने,
माउलीसुधा सुटली नाही
लेकरे अशी दिवटी, हलकट
हे जे म्हटलं आहे ते योग्यच आहे. आहेत खरी माऊलीची लेकरे दिवटी आणि हलकट!
माऊली माऊली म्हणून ऊर बडवणार्या काकाने (माऊलीच्या सो कॉल्ड लाडक्या लेकराने!) मिपाच्या सुरवातीच्याच काही दिवसात मिसळपाववरील एका सन्माननीय स्त्री सभासदासंदर्भात जुनी म्हण वापरून एक अत्यंत तुच्छतापूर्वक व्य नि मला पाठवावा आणि वरती शिवाय :)) असा स्माईली टाकावा याचे मला राहून राहून वाईट वाटले!
च्यामारी आमचे पाय तर चिखलाने भरलेलेच आहेतच परंतु माऊलीच्या ओव्यांची पारायणे करणार्या माणसाने मिपावर असे धंदे करावेत यावरून त्याचे पाय चिखलात नव्हे तर मैल्यात अगदी घट्ट रुतलेले आहेत हे समजते!
हम्म! काय करणार? त्या माऊलीचं दुदैव म्हणायचं आणि गप्प बसायचं! दुसरं काय!!
वास्तविक ज्या माणसाचा माऊलीचा अभ्यास आहे अश्या माणसाने अद्याप व्यक्तिगत स्वार्थाच्या, तुच्छतेने भरलेल्या व्य निं च्या आणि हेवादाव्याच्या मैल्यातून बाहेर पडू नये हे पाहून माऊलीचा रेडादेखील दु:खी झाला असेल.
बेला म्हणतो ते अगदी खरं आहे!
कट्ट्यावरचे वासू तर्कट
वाचा विष्ठा, मनही मळकट!
असेच मला तो व्य नि वाचून वाटले होते!
असो...
आपला,
(नॉर्थ कॅरोलिनाच्या कट्ट्यावरचा वासू!!) तात्या.
--
बेटा श्याम, ठेव ते गीतेचे पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते! पण आपण नाही ना एवढे थोर!
--इति काकाजी (नाटक - तुझे आहे तुजपाशी)
11 Mar 2008 - 11:38 am | विसोबा खेचर
आमच्याच वरील प्रतिसादावरून आम्हालाही दोन ओळी सुचल्या आहेत आणि आम्हीही किंचित कवी झालो आहे! नक्की सांगा बरं का कश्या वाटल्या ते!
काय करावे अता माउली
विचार बुरसट, निरोप कुचकट
:))
आपला,
(निरोप्या) तात्या.
11 Mar 2008 - 11:40 am | सर्किट (not verified)
तात्या,
तुम्ही पुतण्याचा व्यनि जाहीर करून एक चूक केली, आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते.
असो,
मुळात केशवसुमारांचे विडंबन, त्यांच्या नेहमीच्या विडंबनाइतके खास नाही.
कारण विडंबन चांगले व्हायला आधी मूळ कविताच अधिक चांगली असावी लागते.
इथे तर मूळ कविताच विडंबनत्म्क होती, त्यामुळे विडंबन हे गंभीर हवे होते, असे वाटते.
आता च्यालेंज पूर्ण करायला केसुंना दुसरी भरभक्कम कविता घ्यायला हवी.
पसायदान कसे वाटते ?
- (सत्कर्मी रती वाढलेला) सर्किट
11 Mar 2008 - 11:46 am | केशवसुमार
पसायदान कसे वाटते ?
ह.ह.पो.दु.
(मुर्कुंडी वळलेला)केशवसुमार
11 Mar 2008 - 11:49 am | विसोबा खेचर
आणि दुसरी काकांचा व्यनि जाहीर करून घोडचूक करताहात, असे वाटते.
नाही, पुतण्याचा व्य नि जाहीर करून आम्ही जी चूक केली होती ती यावेळेस केलेली नाही. पुतण्याचा व्य नि आम्ही जसाच्या तसा शब्दश: जाहीर केला होता. काकांचा व्य नि आम्ही जाहीर केलेला नसून त्याचा फक्त ओझरता उल्लेख येथे केला आहे. त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही...
तात्या.
11 Mar 2008 - 11:57 am | सर्किट (not verified)
त्याचे डिटेल्स काहीच जाहीर केलेले नाहीत आणि करायची इच्छाही नाही..
चांगला निर्णय...
जो जे वांछील तो ते लाहो
विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो...
- (प्राणिजात) सर्किट
11 Mar 2008 - 9:23 pm | धोंडोपंत
हा हा हा हा हा,
'मांड्यां'ची चव नका विचारू
जरा तंगडी आहे जळकट!
वा वा क्या बात है!!
काका पिटला ! पुतणा उठला!
भाउबंदकी आहे बळकट
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा.
केश्या,
अरे ! फार हाणलंस रे ढवळ्या पवळ्याला.
आपला,
(गाडीवान) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Dec 2014 - 4:49 pm | उडन खटोला
:)
16 Dec 2014 - 5:10 pm | सूड
रोचक प्रतिसाद !! =))))
16 Dec 2014 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले
आज जुने धागे वर काढायची स्पर्धा लागलीये का ?
16 Dec 2014 - 6:34 pm | सूड
काय की बुवा!! :)