विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
31 Jul 2009 - 4:45 pm
गाभा: 

विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा

" मिळून सा-याजणी" मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विवाह परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.त्याची सुरवात राज्यस्तरीय निबंधस्पर्धेपासुन करीत आहोत.

निबंधस्पर्धेचे विषय
१) विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा
२) विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता
३) विवाहबंधन गरज कि सक्ती
४) विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक
५) आंतरजातीय विवाह जातींचा मेळ कि झळ
६) विवाह असुनही एकाकी
७) एक पालकत्व- संकट कि स्वातंत्र्य
८) अविवाहित स्त्री-पुरुषांचे सहजीवन (लिव्ह इन) - निरुपाय कि उपाय
९) घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे
१०) अनाथांच्या विवाहाचा प्रश्न

निबंधस्पर्धेचे नियम
१) या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषा स्पर्धकाला भाग घेता येईल.
२) प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन विषयावर निबंध पाठवता येतील.
३) निबंधाची कमाल शब्दसंख्या १२०० (बाराशे) असावी.
४) निबंध मराठी/ हिंदी/ इंग्रजी भाषांमधुन स्वीकारले जातील.
५) निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २००९ आहे.
६) स्पर्धकाने निबंध लेखन फुलस्केप पेपरवरच करणे आवश्यक आहे. तसेच पेपरच्या फक्त एका बाजुला तसेच पुरेसा समास सोडुन केलेले असावे.
७) लेखनावर स्पर्धकाचे संपुर्ण नाव व पत्ता, तसेच संपर्क फोन नंबर आणि स्पर्धकाची जन्मतारीख असल्याशिवाय निबंध स्वीकारला जाणार नाही,
८) जरुर तिथे स्पर्धकाचे नांव व पत्ता याबाबत गुप्तता बाळगली जाईल.
९) स्पर्धेसाठी पारितोषिके- पहिले ३०००/- रुपये, दुसरे २०००/- रुपये, तिसरे १०००/- रुपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५००/- रुपयांची पाच पारितोषिके
१०) स्पर्धेचा निर्णय निवडसमिती नेमुन घेतला जाईल.
११) स्पर्धेतुन यशस्वी क्रमांक निवडण्याचा परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१२) निबंध स्पर्धेचा निकाल जानेवारी २०१० मध्ये विवाह परिषदेमध्ये जाहीर केला जाईल आणि त्याच दिवशी पारितोषिक वितरण होईल.

निबंध पाठवण्याचा पत्ता
प्रति
आयोजक, विवाह-परिषद- निबंधस्पर्धा
'मिळुन सा-या जणी'.४०/१/ब भोंडे कॊलनी, कर्वे रोड पुणे ४
संपर्क- मिळुन सा-या जणी (०२०) २५४३३२०७, विमेन्स नेटवर्क - ९३७१३२५४११, ९८५०९५४५०२
सहभागी संस्था- साथ साथ विवाह अभ्यास मंडळ* कबीर कलामंच* समाजस्वास्थ्य ट्रस्ट

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2009 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कागदाच्या एकाच बाजूला प्रिंट आऊट असेल तर टंकित निबंध चालेल का?

माहितीबद्दल आभार.

अदिती

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jul 2009 - 5:39 pm | प्रकाश घाटपांडे

टंकित प्रिंट आउट नक्कीच चालेल.
विमेन्स नेटवरक च्या मंगला सामंत व मिळुन सार्‍या जणी च्या विद्या बाळ यांच्याशी मी बोललो आहे. हे नियम जालावरील लोकांना कसे लागु करणार? या बद्दल. डोळ्यासमोर प्रिंट मिडिया असल्याने त्या दृष्टीने ही नियमावली बनवली आहे. नाव /वय/ पत्ता या अडचणी (?) कशा सोडवणार? जाललेखकांना स्पर्धेव्यतिरिक्तही भाग घेता येईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

31 Jul 2009 - 4:52 pm | विसोबा खेचर

अविवाहित स्त्री-पुरुषांचे सहजीवन (लिव्ह इन) - निरुपाय कि उपाय

बोंबला तिच्यायला! :)

आपला,
(बारा भानगडींचा) तात्या.

टारझन's picture

1 Aug 2009 - 5:03 pm | टारझन

.

टारझन's picture

1 Aug 2009 - 5:02 pm | टारझन

विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक

बाझवला तिच्यायला! :)

सर्वांचा,
(महा बाराचा) टार्‍या

* आणि हो , उत्तम संधी आहे निबंध लेखकांसाठी , मात्र वरिल विषयांवर बोजड अलंकारिक भाषा कसा णिबंध रंगवेल ह्याची कल्पनाच करवत नैये *

विनायक प्रभू's picture

31 Jul 2009 - 4:56 pm | विनायक प्रभू

दहापैकी किमान ६
बोंबला तिच्यायला
(बिन भानगडीचा विप्र)

वेदश्री's picture

31 Jul 2009 - 6:23 pm | वेदश्री

अरे वा! उत्तम आहेत राज्यस्तरीय निबंधस्पर्धेसाठीचे विषय. राज्यस्तरावरचे याबाबतचे समाजमन कळायला यातून बराचसा हातभार लागेल असे वाटते.

अदितीने विचारलेला प्रश्न माझ्याही मनात तरळून गेला पण तिच्या प्रश्नाला मिळालेले उत्तर पाहून तो आपोआपच सुटला. असो.

पुढील गोष्टी मात्र कळल्या नाहीत -

१.स्पर्धेच्या पहिल्या नियमात सांगितलेय की कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरूषांना या स्पर्धेत सहभागी होता येईल मग पुढे सातव्या नियमात स्पर्धकांनी जन्मतारीख सांगण्याची अट ठेवण्याचे कारण काय?

२. मोघमपणे निबंधाच्या विषयाचा रोख कळला असला तरी -
'विवाह असुनही एकाकी' व 'घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे' या विषयांमध्ये नक्की काय अपेक्षित आहे ते कळले नाही.
'विवाह असुनही एकाकी' च्या ऐवजी 'विवाह झालेला असूनही एकाकी' असे आणि 'घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे' च्या ऐवजी 'घटस्फोट - कुटुंब घडविणे की न घडविणे' असे काही अपेक्षित आहे का?

या निबंधस्पर्धेत भाग घ्यायला मला आवडेल बहुतेक.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jul 2009 - 7:24 pm | प्रकाश घाटपांडे

१) या मागे सर्व्हे घेणे हा हेतु आहे. १६ वर्शाच्या व्यक्तीचे विचार व ६० वर्षाच्या व्यक्तिचे विचार यात काही फरक असेल ना?
२) मलाही समजले नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वेदश्री's picture

31 Jul 2009 - 9:01 pm | वेदश्री

१. सर्व्हेचा हेतू असावा असा कयास बांधला होताच मी पण त्याकरता वयोगटानुसार विवेचन करण्याचे योजले असेल असे काही मात्र वाटले नव्हते. धन्यवाद.
२. विषय समजले नाहीत म्हणून विचारले. त्या विषयांमध्ये मला रुची असती तर मी दिलेल्या फोन नंबरवर चौकशी केली असती पण माझी रुची तर आहे पहिल्या आणि सातव्या विषयात जे मला स्पष्ट कळलेत. असो.

निबंधस्पर्धेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

सहज's picture

1 Aug 2009 - 9:31 am | सहज

>या मागे सर्व्हे घेणे हा हेतु आहे

कृपया प्रश्नावली द्या. निबंध वगैरे कठीण आहे. लेखनाची आवड असलेलेच लोक लिहणार त्यामुळे हा जर सर्व्हे असेल तर चाचणी विदा कितपत खरा मानायचा?

बघा विचारा त्यांना एक मोठी प्रश्नावली द्या, उत्तरे देउ.

युयुत्सु's picture

1 Aug 2009 - 1:28 pm | युयुत्सु

बक्षिसाच्या आमिषाने सर्व्हे करणे हे मला संशयास्पद वाटते, कारण त्यात होणार्‍या मतप्रदर्शनावर आमिषाचा नक्कीच प्रभाव पडतो.

त्यामुळे स्त्रीवाद्याना सोयीच्या मतप्रदर्शनालाचा बक्षिसाठी निवडले जाणार हे भाकीत आत्ताच वर्तवतो.

भडकमकर मास्तर's picture

1 Aug 2009 - 3:49 pm | भडकमकर मास्तर

यावर उपाय म्हणून एक मिळून सारेजण नावाचे नियतकालिक काढून त्यातर्फ़े "सप्तपदीचा धोका" या विषयाची एक निबंधस्पर्धा घ्यावी काय?....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2009 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निबंधस्पर्धेत जमलेच तर भाग घ्यायला आवडेल !

घाटपांडे साहेब, माहिती दिल्याबद्दल आभारी !

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2009 - 7:25 pm | बिपिन कार्यकर्ते

माहितीबद्दल आभार. जमेल का लिहायला? असा विचार चालू आहे. बघुया.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

1 Aug 2009 - 2:50 pm | नंदन

निबंधस्पर्धेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सहभागी स्पर्धकांनी इथे निबंध दिल्यास (स्पर्धेच्या नियमांत बसत असेल तर नाही तर निकालानंतर) वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 6:24 pm | प्रकाश घाटपांडे

नियमात पुर्वप्रकाशित असु नये असे कुठेही लिहिले नाही. त्यामुळे ते चालायला हवे. प्रतिक्रियातुन आलेल्या मुद्यांमुळे लेखनाची धार वाढेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

3 Aug 2009 - 7:05 pm | ऋषिकेश

हा धागा वाचलाच नव्हता. धन्यवाद!

निबंध (जर लिहायला जमता तर) इमेल करता येतील का?

(आळशी)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "त्या तिथे पलीकडे तिकडे...."

प्रदीप's picture

3 Aug 2009 - 7:26 pm | प्रदीप

८) जरुर तिथे स्पर्धकाचे नांव व पत्ता याबाबत गुप्तता बाळगली जाईल.

!! 'जरूर तिथे?' म्हणजे काय? '[गुप्ततेची] जरूरी आहे' हे कोण आणि कसल्या निकषांवर ठरवणार?

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 8:07 pm | प्रकाश घाटपांडे

म्हणजे संयोजकांना एखादे लिखाण हे बोल्ड वाटले व त्यामुळे लेखकाचे नाव -पत्ता देणे संयुक्तिक वाटले नाही तर लेखकाने जरी नाव पत्ता संयोजकांना दिले तरी ते गुप्त राखु शकतात किंवा लेखकाने विनंती केल्यास
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

4 Aug 2009 - 5:44 am | युयुत्सु

मग बक्षिस कसे देणार? आणि असा निबंध प्रसिद्ध कसा करणार?

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 1:35 pm | ऋषिकेश

बक्षिस लेखकाचे नाव जाहिर न करताही देता येते.. (घरपोच पाठवता येते... नाव-पत्ता आयोजकांना माहित आहे/असेल फक्त तो उघड केलेला नाहि/नसेल)
फक्त ते कोणत्या निबंधाला मिळाले तेच जाहिर करायचे

विसोबा खेचर's picture

4 Aug 2009 - 1:10 am | विसोबा खेचर

हीच स्पर्धा आपण मिपाकरताही घेऊया का?

घाटपांडे साहेब, तुम्हीच व्हा परिक्षक...

बोला, करता का अनाउन्स? :)

वाटल्यास अजून एक विषय अ‍ॅड करा...

" विवाहीत पुरुषांचा बाहेरख्यालीपणा - एक समस्या - कारणे व उपाय " :)

आपला,
(कार्यकारी संपादक) मिळून सारेजण! :)

सूहास's picture

4 Aug 2009 - 4:13 pm | सूहास (not verified)

काही अनुभवाची अट आहे का ?? =)) =))

सू हा स...

विनायक प्रभू's picture

4 Aug 2009 - 3:08 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.
त्यात जोडप्याचा बाहेर खाल्ले पणा हा विषय जोडावा.