गाभा:
अनेक चित्रपट, बहुतेक सर्व भारतीय भाषांमधली नाटकांना संगीत देणार्या भास्कर चंदावरकर यांचे काल रात्री दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
जगभरातले संगीत त्यांना माहीत होते. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबर पाश्चिमात्या शास्त्रीय संगीतावरही त्यांची उत्तम पकड होती.
चित्रपट संगीताचे मर्म त्यांच्याइतके क्वचित कुणाला कळत असेल.
खूप वाईट वाटतंय त्यामुळे नीट काही लिहीता येत नाहीये.
भास्करजींकडून वेळोवेळी जे शिकायला मिळालं ते अतिशय मोठं आणि महत्वाचं आहे.
प्रतिक्रिया
26 Jul 2009 - 2:13 pm | विसोबा खेचर
माझीही श्रद्धांजली..
निळूभाऊ, गंगूबाई आणि आता भास्कर चंदावरकर!
कला क्षेत्रातले तीन दिग्गज असे एका मागोमाग एक गेले याचंही वाईट वाटतं!
तात्या.
26 Jul 2009 - 2:18 pm | घाटावरचे भट
भास्कर चंदावरकरांना विनम्र आदरांजली. त्यांच्या संगीताच्या रूपाने त्यांची स्मृती चिरकाल टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने अत्यंत वाईट कालावधी. आधी विदुषी डी. के. पट्ट्मल, मग गंगूबाई आणि आता भास्कर चंदावरकर. या महान व्यक्तींच्या जाण्याने शास्त्रीय संगीतात खरोखर एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
- भटोबा
26 Jul 2009 - 2:17 pm | प्रदीप
'घाशिराम'चे संगीत, त्यांच्या अनेक चित्रपटांचे संगीत--- एकदम वेगळे होते, चंदावरकरांनी मराठी संगीतजगतावर स्वतःची मुद्रा उमटवली आहे. माझ्या आठवनीनुसार ते अनेक वर्षे एफ. टी. आय. आय. मधे कार्यरत होते.
26 Jul 2009 - 2:20 pm | नीधप
१९६५-८० ते एफ. टी. आय. आय. ला शिकवत होते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
26 Jul 2009 - 2:32 pm | केशवराव
विनम्र श्रद्धांजली. संगीत विश्वातील एक एक तारें निखळायला लागले.
ईश्वरी ईच्छे पुढे ईलाज नाही.
26 Jul 2009 - 2:39 pm | विकास
निळू भाऊ, गंगुबाई आणि आता भास्कर चंदावरकर ही सर्व त्यांच्या क्षेत्रातील ऋषितुल्य माणसे होती. आता पण नवीन गाणे, संगीत,अभिनय आवडणे असे नवीन कलाकारांबद्दल साहजीक होत असले तरी त्यांच्यात त्यांच्या क्षेत्रासाठी "रोल मॉडेल" म्हणता येतील असे फार कमी असू शकतील असे वाटते.
26 Jul 2009 - 3:10 pm | प्रशांत उदय मनोहर
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
- प्रशांत
26 Jul 2009 - 6:15 pm | क्रान्ति
क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्वाला माझीही भावपूर्ण आदरांजली.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
26 Jul 2009 - 6:50 pm | अवलिया
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
26 Jul 2009 - 7:12 pm | स्वाती२
विनम्र श्रद्धांजली.
26 Jul 2009 - 7:44 pm | प्रमोद देव
भास्कर चंदावरकरांना माझीही विनम्र आदरांजली.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
26 Jul 2009 - 7:53 pm | वाटाड्या...
माझीही श्रद्धांजली...
एक एक तारे निखळत चालले..
- वा
26 Jul 2009 - 7:54 pm | मुक्तसुनीत
अतिशय दु:खद बातमी. त्यांच्या निकटवर्तीयांना कदाचित त्यांच्या कॅन्सरबद्दल कल्पना असेल ; परंतु ज्याना काही कल्पना नव्हती त्या माझ्यासारख्याना जबर धक्का बसला.
त्यांची अनेकानेक गाणी चिरस्मरणीय आहेत. "अजब सोहळा , माती भिडली आभाळा " , "सख्या रे घायाळ मी हरिणी" , "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" , "थोडासा रुमानी हो जाएं" , "बांधले मी बांधले" ...कितीतरी आणखी.
सतारीबरोबरच सूरबहार नावाचे , अतिशय कठीण वाद्य वाजविण्यात निपुण असणार्या थोड्या लोकांपैकी ते एक.
शरीराने ते गेलेत इतकेच. त्यांच्या कामामुळे आणि त्यांनी ज्या लोकांना घडविले , ज्यांच्या आयुष्याला स्पर्श केला अशा कलावंत-रसिकांच्या मनात ते नेहमीच रहातील. विनम्र श्रद्धांजली.
26 Jul 2009 - 8:06 pm | टारझन
"कुणाच्या खांद्यावर .. कुणाचे ओझे" हे बहुद्देशिय गाणं माझंही फार आवडतं आहे ... माझी ही श्रद्धांजली
धन्यवाद सुनित आणि नी !
- टारझन
26 Jul 2009 - 8:27 pm | नीधप
>>त्यांच्या निकटवर्तीयांना कदाचित त्यांच्या कॅन्सरबद्दल कल्पना असेल<<
मे महिन्यात आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते रिकव्हर होतोय असं म्हणाले होते. आधीचं दीड वर्षं जवळजवळ त्यांनी सगळं सहन केलं होतं तेव्हा.
त्यांच्याच घरात, त्यांच्याच कपड्यात होते आणि आवाज त्यांचाच होता म्हणून केवळ ओळखू शकले मी त्यांना पण ते तेव्हा आनंदी होते. पांढरे केस, पांढरी दाढी त्यामुळे एखाद्या ऋषिमुनीसारखे दिसत होते. सांगितल्यावर नेहमीचं प्रसन्न हसले.
आमच्या नवीन फिल्मचं म्युझिक करण्याबद्दल एक्सायटेड वाटले.
नेहमीप्रमाणेच भरपूर वेळ वेगळ्या चित्रपट, नाटक, विचारांबद्दल काय काय सांगत होते खूप शिकायला मिळत होतं.
लवकरच स्क्रिप्टचं सिटींग करायचं ठरवू असं म्हणून ती मिटींग संपली.
तेव्हा काय कल्पना की हे शेवटचंच..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
26 Jul 2009 - 11:19 pm | बिपिन कार्यकर्ते
खरोखरच एक अतिशय मोठा माणूस गेला... अतिशय अजरामर गाणी देणारा कलावंत गेला. मला त्यांच्याबद्दल त्यांच्या संगिताशिवाय काहीच माहित नाही. पण आज एक तपशील कळला... साक्षात अन्नपूर्णादेवींकडून सतार शिकले होते ते.... बाब्बौ!!!
आज घाशिराम कोतवाल आणि सामना परत बघणार. त्यांच्या संगिताच्या आठवणी जागवणार.
बिपिन कार्यकर्ते
27 Jul 2009 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आज घाशिराम कोतवाल आणि सामना परत बघणार. त्यांच्या संगिताच्या आठवणी जागवणार.
येस! आज दिवसभर गाणी ऐकणार ते भास्कर चंदावरकरांचीच.
अदिती
27 Jul 2009 - 9:41 am | विशाल कुलकर्णी
भास्कर चंदावरकरांना भावपुर्ण आदरांजली. त्यांच्या संगीताच्या रूपाने त्यांची स्मृती चिरकाल टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सस्नेह
विशाल
27 Jul 2009 - 4:41 pm | दशानन
भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
+++++++++++++++++++++++++++++
28 Jul 2009 - 10:09 am | JAGOMOHANPYARE
अजब सोहळा म्हणजे गारम्बीचा बापू मधले का? छान आहे ते गाणे..
अजब सोहळा अजब सोहळा
माती भिडली आभाळाला...