कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.
नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.
मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.
सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.
तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.
हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.
मला फ़क्त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.
कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.
----------------------------------------------------------------
तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत
तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.
गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.
तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.
असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.
शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.
मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.
कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.
प्रतिक्रिया
10 Mar 2008 - 5:19 pm | धमाल मुलगा
महाराज,
कविता कोणाची आहे त्याचा कृपया उल्लेख करावा ही विन॑ती.
बाकी
सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.
आवडल॑ हो.
10 Mar 2008 - 5:44 pm | छत्रपति
चुिक बद्दल माफी असावी....
़किव कोण आहे ते मिहती नाही....
10 Mar 2008 - 7:16 pm | विवेकवि
भाषा सुधारावी
हि कळकळीची विन॑ती...
विवेक वि.
10 Mar 2008 - 9:57 pm | सुधीर कांदळकर
पुर्वार्ध तसा रंगला नाही. कवी चाचपडतोय असे वाटले.
तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.
गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.
कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.
या द्विपदी आवडल्या.
शुभेच्छा.
11 Mar 2008 - 12:57 am | प्राजु
तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.
ही द्विपदी आवडली.
आणि आपल्याला किवता या ऐवजी कविता म्हणायचे आहे का? खुलासा करावा.
- (सर्वव्यापी)प्राजु