राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
अलिकडे असे निदर्शनास आले आहे की काही सभासद प्रत्येकच ठिकाणी मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेले अवांतर प्रतिसाद देत असतात, प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन गप्पा मारत असतात, एखाद्या सभासदाच्या सहीवरून चर्चा करताना आढळतात.
सबब, हे निवेदन -
"अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे"
असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल.
कृपया अवांतर प्रतिसादाचा दुवा आम्हाला या पत्त्यावर पाठवावा. प्रतिसादाचा बराचसा भाग मूळ विषयाशी सुसंगत असून एखाद् दुसरे वाक्य अवांतर असल्यास समजण्यासारखे आहे!
जी मंडळी सातत्याने अवांतर प्रतिसाद देत आहेत असे निदर्शनास येईल, त्यांचे सभासदत्व कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे रद्द होण्याची शक्यता आहे..
अवांतर प्रतिसादांबद्दल अनेक तक्रारी आमच्याकडे आल्यामुळे हा धागा काढण्याचा लाजिरवाणा प्रसंग आमच्यावर आला आहे. ज्यांना मनापासून काही एक लिहायचे आहे, वाचन करायचे आहे अश्या मंडळींना बर्याचश्या धाग्यात येणार्या अवांतर चर्चांमुळे खूप त्रास होतो आणि तो वाजवी आहे असे आम्हाला वाटते. शिवाय त्यामुळे प्रतिसादांची संख्याही विनाकरण वाढत जाते व मिपावरील तांत्रिक आणि पर्यायाने आर्थिक भारही वाढतो..
कृपया सहकार्य करावे. मिपावरील स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये. मिपा व्यवस्थापन आणि संपादक मंडळ आपापले उद्योगधंदे सांभाळून काहीही मानधन न घेता मिपाचे दैनंदिन कामकाज सांभाळत आहेत. कृपया त्यांचे काम वाढवू नये..
निवेदन संपले.
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
प्रतिक्रिया
23 Jul 2009 - 10:39 am | रेवती
ठीक आहे. मी कळवीन. एक प्रश्न आहे.
नुसते सहमती दर्शवणारे प्रतिसाद 'विषयाला धरून' असल्यास ते जर चालत असले तर अवांतराला आलेली सहमती कळवल्यास दोन स्टार्स मिळतील ना?
काही मागण्या:
बरेच धागे हे निरर्थक असतात त्यामुळे त्याला येणारे प्रतिसादही भरकटलेले असतात ते आधी कळवल्यास आम्हाला जास्त स्टार्स मिळायला हवेत अशी मागणी आहे.
काही धाग्यांवर चर्चा भरकटत जाते व कोणत्याही (लाजर्याबुजर्या, पक्षी :आमच्यासारख्या) स्त्री सदस्याला तिथे प्रतिसाद देणे अवघड बनते. असा धागा लक्षात आणून दिल्यास, ते कळवणार्या पहिल्या स्त्री सदस्यांना एक स्टार जास्त मिळाला पाहिजे. अश्याप्रकारे ती सदस्या लवकरात लवकर मानद संपादिका बनून विचित्र प्रतिसादकर्त्याचे टाळके कोल्हापूरी लेडीज चपलेने सडकू शकेल.
आपले संस्थळ जर अनिवासी भारतीयांनी न येण्यासाठी असेल तर तसे संस्थळ चालक मालकांनी स्पष्टपणे नमूद करावे. जरा कुठे पृथ्वीवरच्या इतर देशांचा उल्लेख झाल्यास ज्या लाह्या फुटतात त्या सहन करण्यास परदेशी असल्याचा भाव न खाणारे (पक्षी : आमच्यासारखे) निष्कारण अपमानित होतात. हे अनेकवेळा होते, ते लक्षात आणून दिल्यास जास्त स्टार मिळायला हवेत.
(तात्पुरत्या संपादकपदासाठी हपापलेली)रेवती
23 Jul 2009 - 10:52 am | आणिबाणीचा शासनकर्ता
ते चालतील..
हो, मिळतील. क्ल्पना चांगली आहे..
अवश्य विचार करण्यात येईल..
निश्चित मिळेल..
आमच्या माहितीप्रमाणे आपण स्वत:च अनिवासी भारतीय आहात, सबब प्रश्न गैरलागू..
नक्की मिळतील आणि संबंधित प्रतिसादही (विसोबा खेचरांसकट अगदी कुणाचाही असला तरी!) संपादित होईल. खात्री बाळगावी.
असो, एकंदरीत आपला उत्साह पाहता तो वाखाणण्यासारखा असे म्हणावेसे वाटते. आपण लवकरात लवकर कामाला लागावे अशी विनंती..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
23 Jul 2009 - 11:02 am | रेवती
आपण लवकरात लवकर कामाला लागावे अशी विनंती..
असा प्रतिसाद लिहिणे हे कामाला लागणेच होते.
अंमळ सुट्टीवर जाऊन येते व प्रतिसाद वेचण्याचे काम सुरु करते.
आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे.
रेवती
23 Jul 2009 - 11:09 am | नितिन थत्ते
>>आपले संस्थळ जर अनिवासी भारतीयांनी न येण्यासाठी असेल ...
हे संस्थळ अनिवासी निवासी असा भेद करते असे कुठे दिसले नाही. पण लेख लिहिणार्या आणि प्रतिसाद लिहिणार्याच्या लेखनातून तो भेदभाव प्रकटला तर त्यावर तीव्र प्रतिक्रिया येणे साहजिक आहे.
नुकत्याच उडवल्या गेलेल्या मुंगी-टोळ लेखात 'मुंगी अमेरिकेत गेली आणि कष्ट करून श्रीमंत झाली' अशा अर्थाचा परिच्छेद होता. त्यावर निवासी भारतीयांच्या लाठ्या पडणारच.
>>कोणत्याही (लाजर्याबुजर्या, पक्षी :आमच्यासारख्या) स्त्री सदस्याला तिथे प्रतिसाद देणे अवघड बनते.
हे मात्र निषेधार्हच आहे. आणि त्यावरचा उपाय मान्य.
नितिन थत्ते
23 Jul 2009 - 11:11 am | आणिबाणीचा शासनकर्ता
सहमत आहे...
23 Jul 2009 - 11:17 am | आणिबाणीचा शासनकर्ता
हा धागा मुख्यत्वेकरून 'अवांतर प्रतिसाद' या विषयाशी संबंधित आहे. कृपया कुणी निवासी-अनिवासी भारतीय वा अन्य कुठला विषय काढून चर्चा भरकटवू नये. त्या संदर्भात आम्हाला स्वतंत्र पत्र पाठवावे..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
23 Jul 2009 - 11:44 am | छोटा डॉन
"अनावश्यक" अवांतर प्रतिसादांवर गदा आणणारी अभिनव कल्पना आवडली.
भविष्यातील "आठवड्याच्या उत्स्फुर्त संपादकांना" आमच्या मनापासुन शुभेच्छा ...
आता काही मुद्द्याचे ...
( वास्तविक पाहता हे प्रश्न प्रशासनास व्यनी करुन विचारावेत की जाहिरपणे मांडावेत ह्याबद्दल बराच काळ गोंधळ झाला, शेवटी व्यासपिठावर चर्चा व्हावी असे वाटल्याने ते प्रश्न इथेच देत आहे.
आय होप, संपादक किंवा शासनकर्ते सुयोग्य आणि पटतील अशी उत्तरे देतील ...
अवांतर : इथे कुणीच कशाला बांधील नाही ह्याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे मात्र ह्यांची उत्तरे मिळाल्यास आनंद होईल, नव्हे आमच्या प्रश्न विचारण्या मागच्या हेतुचे सार्थक होईल असे वाटते )
१. मुळ निवेदनात मांडलेले विचार हे बर्याच सिरीयस व सर्वांसाठी असलेल्या धाग्यांना योग्य ठरतात. पण काही धागे असे असतात की जे मिपाच्या धोरणातही बसतात पण "सर्वांसाठी नसतात" किंवा काही जणांनी/जणींनी त्या धाग्यावर प्रतिसाद देणे अथवा मतप्रदर्शन करणे हे योग्य वाटत नाही.
उदा : गटारीच्या शुभेच्छा, आंतरजालीय शिमगा वगैरे ...
तर अशा धाग्यांवर ऑफकोर्स चर्चा बहुदा भरकटत जाते कारण हे धागेच त्या उद्देशाने अथवा करमणुक म्हणुन काढले जातात ..
आता ज्यांना हे "आवडत नाही" त्यांनी अशा धाग्यांविषयी तक्रार केल्यास काय ?
२. काही विषय हे काही जणांना निषिद्ध किंवा नावडते असु शकतात, तेव्हा ह्या विषयांबाबत चाललेल्या चर्चांमध्ये विषयाला धरुनच परंतु वहावत जाणारे प्रतिसाद काहिंना न आवडल्यास व त्यांनी तक्रार केल्यास कसे ?
उदा : दारु किंवा कॉकटेल्सचा धागा, पोरगी पटवणे वगैरे ...
३. तक्रार करणार्याची "वाटचाल अथवा कारकिर्द अथवा वागणुक" ग्रहित धरली जाईल अशी अपेक्षा आम्ही ठेवावी का ?
अन्यथा काहिच स्वतः काहीच भरिव असे न करता केवळ दुसर्याला त्रास देण्याच्या भावनेतुन "फुक्कटची फौजदारी" करणार्यांच्या बाबतीत आपले काय धोरण आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.
४. धाग्याच्या लेखकाच्या परवानगीचे काय ?
समजा धागाच अशा खास करमणुकीसाठी काढला असेल व त्यावर तेच चालत असेल व हे बाकीच्यांना माहित असेल तर त्या धाग्यावर " न फिरकण्याचा पर्याय" उपलब्ध असु शकतो.
मग केवळ आपल्याला वैयक्तिकरित्या पटत नाही म्हणुन तक्रार करण्यांचे काय ?
५. एखाद्या चर्चेत अथवा माहिती देणार्या लेखात बहुतेक वेळा अनेक संदर्भ निघतात व त्याचीसुद्धा चर्चा होते.
प्रत्येक वेळी हे मुळ चर्चेला धरुन असेलच असे नाही मात्र त्याला फालतु आणि अनावश्यकही म्हणता येणार नाही.
आता अशा ठिकाणी धोरण काय असेल ?
६. एखाद्या मुद्द्यावर जर २ किंवा अधिक सदस्यांचा एखाद्या धाग्यावर बर्यापैकी विषयालाच धरुन "वाद चालु" असेल जर इतर सभासद ह्याला वैतागले असतील तर धोरण काय असेल ?
कारण जरी वाद आणि प्रतिसादांची जंत्री लागली असली तरी ते "अवांतर" आहेतच असे नसते, अर्थात "सापेक्षता" असल्याने काहिंना ते वाटु शकते हा भाग वेगळा ...
तर तेव्हा धोरण काय असेल ?
तुर्तास एवढेच, बाकी सुचेल तसे ...
------
( प्रश्नार्थक ) छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
23 Jul 2009 - 12:06 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
आम्हाला अवांतर प्रतिसादाबद्दल माहिती कळणे अपेक्षित आहे. ती कुणी कळवली हा मुद्दा गैरलागू आहे. आलेल्या तक्रारीवरून संबंधित प्रतिसाद हा अवांतर आहे किंवा नाही इतकेच पाहिले/ठरवले जाईल आणि त्यानुसार कारवाई होईल..
असे फुकटचे फौजदार असतील तर फारच उत्तम! त्यांनी अवांतर प्रतिसाद कळवल्यास त्याची मिपा व्यवस्थापनाला मदतच होईल. मग तो फौजदार फुकटचा असो, वा पगारी!
अश्या प्रकारचा प्रतिसाद कुणी आमच्या निदर्शनास आणून दिल्यास तो प्रतिसाद पाहून ऐन वेळेस योग्य तो निर्णय घेतला जाईल..
विषयाला धरून वाद चालू असल्यास त्या प्रतिसादांस हरकत नाही..
आपले अन्य प्रश्न हे धाग्यांविषयी आहेत. ही चर्चा धाग्याविषयी नसून अवांतर प्रतिसादाबद्दल आहे. धाग्यांबद्दल त्या त्या वेळी आम्हाला पत्र पाठवून आपले म्हणणे कळवावे..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
23 Jul 2009 - 12:58 pm | छोटा डॉन
सुस्पष्ट उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती आणि ती पुर्ण झाली.
आम्ही मिपा व्यवस्थापनाचे आभारी आहोत. धन्यवाद ..!!!
बाकी आपण म्हणता तसे "धाग्याविषयक प्रश्न" आम्ही पत्र पाठवुन कळवुच ...
बाकी तुर्तास सर्व काही स्पष्ट आहे :)
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
23 Jul 2009 - 1:01 pm | लिखाळ
चांगले आहे. चांदण्या देण्याची कल्पना छान आहे :) या मजेदार कल्पनेमुळे उगीच तेढ न वाढता अवांतराला आळा बसावा अशी आशा वाटते.
थोडा काळ यावर चर्वण झाले की आपोआप अवांतर कमी होतील असे वाटते.
या विषयावर मी मागे एकदा अवांतर प्रतिसाद आणि गप्पा असा चर्चाप्रस्ताव मांडला होता. त्यात अनेकांनी याबाबत लिहिले होते. अवांतर म्हणजे काय याचा शोध घेणार्यांना इतरांची मतेही वाचता येतील.
शासनकर्त्यांचा प्रस्ताव पाहून आनंद झाला.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही ! :)
23 Jul 2009 - 1:22 pm | Nile
लिखाळ साहेब धाग्याबद्द्ल धन्यवाद. अत्यंत माहीतीपुर्ण दुवा. त्यात अनेक उद्बोधक प्रश्नांवर झालेली चर्चा वाचुन माझ्या ज्ञानात फारच भर पडली आहे. असे उहापोह हे संस्थळाच्या, समाजाच्या व पर्यायाने देशाच्याही प्रगतीस चालनादायक ठरतात. खरंतर अशा अजुन अनेक चर्चा वाचायला आवडतील (हो उगाच आमचे अवांतर नको त्यात) पण आता अश्या चांदण्याच्या खेचाखेचीत कीती लोक अश्या चर्चेला 'अंतर' देतील हे न बोलणेच इष्ट. असो.
-घायाळ
आपण कमी बोलतो म्हणजे अवांतर बोलतच नाही असे नाही ;)
23 Jul 2009 - 1:06 pm | Nile
अरे वा! उत्तम! सही! लई भारी! सुरेख!
(चांदण्यांत नांदणारा)
चंद्र. :)
23 Jul 2009 - 2:06 pm | inoba mhane
Nile yancha awantar pratisad kalawalya baddal 1 star aamachya khatyat jama kara pahu. <:P
23 Jul 2009 - 2:32 pm | अवलिया
चांगला निर्णय.
अनावश्यक वाटलेला मजकूर संपादित
-आणिबाणीचा शासनकर्ता.
--अवलिया
===================================
हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास इथे तक्रार करु शकता !
23 Jul 2009 - 5:03 pm | टारझन
* डॉण्याचा प्रतिसाद मनातल्या भावना व्यक्त करून गेला !! त्यावर मिळालेल्या प्रतिसादाने त्याचं जरी समाधाण झालं असालं तरी माझं झालं नाही ... तरीही असो :) बर्याच मुद्द्यांना का बगल दिली हे कळलं नाही .. असो !! *
का कसं कधी काय घडलं त्यामुळे हा फतवा काढण्यात आला ?
फडतुस आणि छपराड धागे काढणार्यांचंही खातं डिलीट करण्याचा फतवा निघाला तर आणंदी होऊ :)
- टारझन
23 Jul 2009 - 8:33 pm | सूहास (not verified)
X( सुहास
23 Jul 2009 - 11:29 pm | अंतु बर्वा
मी खालील वेबसाईट वर एक प्रोसेस पाहीला. इथल्या परिस्थितीत तो किती apply होइल सांगता येत नाही, पण इथे सांगितल्या वाचुन राहवलं नाही...
ह्या फोरमवर सदस्य deals पोस्ट करतात... कुठल्याही धाग्याला reply करताना जर एखाद्या सदस्याने out of context प्रतिसाद दिला, तर इतर सदस्य त्या सदस्याच्या नावाशेजारी असलेल्या + आणी - buttons वर क्लिक करुन त्याचा reply अवांतर आहे की नाही ते ठरवतात... आणी त्याप्रमाणे मग त्याचा प्रतिसाद green किंवा red होतो...
आता हे टेक्निकली कितपत शक्य आहे महीत नाही... पण हा एक ऑप्शन उपलब्ध आहे...
24 Jul 2009 - 10:08 am | आशिष सुर्वे
' आणिबाणीचा शासनकर्ता ' ह्यांचे निवेदन आत्यंति़क महत्वाचे आहे..
ह्याच धाग्याच्या अनुशंगाने मलाही एक मत नोंदवावेसे वाटते..
आजवर 'मिपा'वर 'खेळीमेळीचे वातावरण' टेवण्यात सर्व माननीय 'मिपा'करांना आणि 'तात्या' व संकेतस्थळाच्या ईतर माननीय संचालक मंडळावरील अधिकार्यांना यश आलेले आहे.
यापुडेही असेच हलकेफुलके वातावरण कायम टेवण्यासाटी आपण सगळे कटीबद्ध होऊयात...
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
(स्वाक्शरी आताच सुचली... अधिकार प्रतिबंधित :) )
25 Jul 2009 - 3:03 am | प्रियाली
मुझे चांद चाहिये . चांदण्या घेऊन काय करू?
कृपया, अर्धचंद्र देण्याच्या भानगडीत पडू नये.
बाकी, चालू दे. ;)
25 Jul 2009 - 5:17 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
काही सभासदांनी आपल्या सह्यांमधून मिपाविषयी/मिपाच्या धोरणांविषयी चालवलेली टिंगलटवाळी पाहून यापुढे त्या सभासदांची प्रतिसादातील सहीची सुविधा लौकरच बंद करण्यात येईल..
--आणिबाणीचा शासनकर्ता.
25 Jul 2009 - 5:40 pm | इनोबा म्हणे
स्वाक्षरीची सुविधा बंद होणार म्हटल्यावर आता, प्रत्येक प्रतिसादात स्वाक्षरी कॉपी पेस्ट करावी लागणार. :(
-अती खाणार त्याला...जुलाब होणार
30 Jul 2009 - 8:34 am | काळा डॉन
काय तात्या ह्या आठवड्याचा विनर कोण? सांगा की...
मला वाटतय विजुभाई असावा..