लक्ष लक्ष सलाम.
शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत.
धन्यवाद.
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम!
तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :)
एक होती गाय, तिला कमी काय?
दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))
नवकविता 10 Mar 2008 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!!
महान कवीला आमचाही सलाम.
प्रतिक्रिया
10 Mar 2008 - 7:21 am | सुधीर कांदळकर
लक्ष लक्ष सलाम.
शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत.
धन्यवाद.
10 Mar 2008 - 8:57 am | विकास
जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम!
तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :)
एक होती गाय, तिला कमी काय?
दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))
10 Mar 2008 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!!
महान कवीला आमचाही सलाम.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
10 Mar 2008 - 9:51 am | भडकमकर मास्तर
आमच्याही शुभेच्छा...
........कुणास्तव कुणीतरी या यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्राची आठवण झाली...
10 Mar 2008 - 3:19 pm | सर्वसाक्षी
ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10 Mar 2008 - 4:47 pm | आनंद घारे
कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.
11 Mar 2008 - 11:10 am | विसोबा खेचर
पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम!
तात्या.
--
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!