कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
लागणारे जिन्नस:
कुलूच्या ३-४ जुड्या (ह्यातील वरची हिरवी पात घ्यायची मध्ये जर दांडा, काडि असेल तर काढायची व खालील पांढरा भाग चिरताना घ्यायचा नाही. ही भाजी धुवून, चिरून घ्यावी)
२ कांदे चिरून
पाव वाटी कोणतीही डाळ. (चणाडाळ असेल तर भिजवून घ्यावी)
२-३ ओल्या मिरच्या चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग,
अर्धा चमचा हळद
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
खवलेले ओले खोबरे पाव वाटी
२ मोठे चमचे तेल
क्रमवार पाककृती:
प्रथम तेल गरम करुन त्यात लसुण मिरचीची फोडणी द्यायची मग हिंग, कांदा हळद घालून परतवायचे. लगेच चिरलेला कुलू आणि डाळ घालून परतवून वाफेवर ही भाजी शिजवत ठेवावी. डाळ शिजत आली की मिठ, साखर घालावी. परत परतवून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालून गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
ही भाजी पिठ पेरूनही करता येते
डाळ न घालता साधीही चांगली लागते.
ही भाजी कोवळीच घ्यावी खालील फोटोतील भाजी उशीरा घेतल्याने जरा जून आहे.
प्रतिक्रिया
18 Jul 2009 - 2:24 pm | सहज
अजुन एक!
जागुताई एका पाठोपाठ एक अश्या रानभाज्यांची सचित्र पाकृ देण्याच्या तुमच्या उत्साहाचे फार कौतुक वाटते.
:-)
18 Jul 2009 - 4:49 pm | सुनील
छान दिसतेय. कधी खाल्ली नव्हती. करून बघायला हरकत नाही. ही भाजी इतर कोणत्या वैकल्पिक नावानेही ओळखली जाते का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Jul 2009 - 5:38 pm | विसोबा खेचर
वा!
जागूनं तर मिपावर रानभाज्यांचा महोत्सवच भरवला आहे! :)
जियो...
तात्या.
18 Jul 2009 - 6:03 pm | रेवती
खमंग भाजीमाला चालू आहे गं जागु!
ही भाजी कधी पाहिली नव्हती. कांद्याच्या पातीसारखी दिसतेय.
तुझ्यामुळे आम्हाला कितीतरी नविन भाज्या बघायला मिळताहेत.
धन्यवाद!
रेवती
18 Jul 2009 - 6:11 pm | धनंजय
नव्यानव्या रानभाज्यांची ओळख होते आहे. जागु यांचे आभार मानावे तितके कमीच.
या भाज्यांच्या पाकृमधले काही तत्त्वसुद्धा लक्षात येते आहे. म्हणजे आता चिनी-फिलिपिनो वगैरे दुकानांत ज्या अगम्य नावांच्या भाज्या दिसतात, त्याही आणून अशाच करायला हरकत नाही.
18 Jul 2009 - 6:39 pm | अनिरुध्द
पिक मिपावरही यायला लागलंय.
19 Jul 2009 - 8:13 pm | क्रान्ति
तुझ्या सगळ्या रानभाज्यांच्या पाकृ एकदम मस्त आहेत. आमच्या मेन ऑफिसच्या मैदानात अशाच काही भाज्या पावसाळ्यात उगवतात, आणि काही जाणकार सख्या लंचमध्ये त्या तोडून घरी नेतात. त्यांचे गुणधर्मही या सख्यांना चांगलेच माहिती असतात. तुझ्या रानमेव्यामुळे त्याची आठवण झाली. [माझ्या आताच्या ऑफिसला मैदानच नाहीय!]
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
19 Jul 2009 - 8:21 pm | प्राजु
ही भाजी कध्धी म्हणजे कद्धीच पाहिली नव्हती.
कांद्याच्या पातीसारखी म्हणण्यापेक्षा, गवती चहा सारखी दिसते आहे.
मस्त!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jul 2009 - 8:25 pm | कपिल काळे
अरे वा!
रान भाज्या महोत्सव सुरु आहे की काय?
ह्या रान भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे वर्षात एकदा अवश्य खाव्यात असे म्हणतात!!
बाकी आम्हाला कुलू - मनाली माहित होती. कुलु ची भाजी पहिल्यांदाच बघितली. छान!
19 Jul 2009 - 9:54 pm | चित्रा
सगळ्या भाज्यांवर प्रतिक्रिया एकदाच देते.. छान कल्पना आणि पाठोपाठ दिल्यामुळे कौतुक वाटते.
आधीच्या भाजीवरची प्रतिक्रिया - टाकळ्याला स्वतःचा स्वाद असतो, याही सर्व भाज्यांना तो असावा. लोणी लावून भाकरीबरोबर गरमागरम खाण्यातली मजा औरच.
आमच्या गावच्या मैदानात पावसाळयात टाकळा उगवला की तो कोवळा कोवळा असताना आजी काढून आणायला सांगत असे. भरपूर गोळा केलेल्या पाल्याची भाजी मात्र एवढीशी होते. पण चव मात्र छान असते.
20 Jul 2009 - 2:24 am | सँडी
नविन भाज्यांची ओळख झाली. :)
छान कल्पना!
20 Jul 2009 - 5:45 am | स्वाती२
जागू, तुमच्यामुळे एक नवीन भाजी माहीत झाली. मी ही भाजी कधीच बघीतली नव्हती. छान उपक्रम आहे तुमचा.
20 Jul 2009 - 10:53 am | जागु
धन्यवाद सगळ्यांचेच. अजुनही काही भाज्या आहेत त्यांचा क्रमही चालू ठेवणार आहे.
20 Jul 2009 - 9:16 pm | लिखाळ
रानभाज्यांची लेखमाला वाचनीय आहे. भाज्यांची चित्रे देत आहात त्यामुळे अजूनच चांगले. अजून वाचायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.
1 Aug 2009 - 2:22 am | अश्विनीका
रानभाज्यांवर हा एक छान लेख सापडला
http://www.loksatta.com/lokprabha/20090731/khadya01.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20090731/khadya.htm
- अश्विनी
3 Aug 2009 - 6:15 pm | सूहास (not verified)
माहीती साठवतो आहे..
सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...