ओरिजिनल वॉल्डन माझ्याकडे आहे, नितांतसुंदर पुस्तक आहे. ते लॅंड्मार्कमधे २ महिने आधी बघितल्याचे स्मरते. गेल्या दिवाळी अंकात (कुठल्या ते आठवत नाही, बहुदा मौज) अनिल अवचट ह्यांनी ह्या पुस्तकावर लिहिले होते.
थोरो हा एकोणिसाव्या शतकातला विचारवंत. वयाच्या तिशीत, शहरापासून दूर वॉल्डन नावाच्या तळ्याकाठी काही वर्षे जाऊन राहिला होता. तिथल्या रहिवासाचे, चिंतनाचे त्याचे 'वॉल्डन' हे पुस्तक दुर्गाबाईंनी मराठीत आणलं.
प्रतिक्रिया
17 Jul 2009 - 12:30 pm | नंदन
'वॉल्डनकाठी विचारविहार' हे पुस्तक का? पुण्यात रसिकमध्ये मिळावे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jul 2009 - 12:42 pm | राकेश वेंदे
मि पुण्यालाच राहतो, रसिक मध्ये ते पुस्तक नाही आहे.
पुस्तकाचे योग्य नाव 'वॉल्डनकाठी विचारविहार' आहे हे सांगितल्याबद्द्ल हि धन्यवाद.
17 Jul 2009 - 12:49 pm | नीलकांत
साधना मध्ये चौकशी करा. शनिवारपेठ पोलीस चौकी समोर शनिवार पेठ पुणे.
- नीलकांत
17 Jul 2009 - 1:20 pm | लिखाळ
पुणे मराठी ग्रंथालयातून आणून मी हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता :)
(पुणे मराठी ग्रं. पत्र्या मारूतीजवळ आहे.)
पुस्तकातले विचार मननीय !
-- लिखाळ.
17 Jul 2009 - 1:27 pm | अभिज्ञ
राकेश,नंदन व लिखाळ
ह्या पुस्तकाबद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल.
कोणत्या विषयावर आहे वगैरे..
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
17 Jul 2009 - 1:41 pm | राकेश वेंदे
हेन्री डेविड थोरो ह्यांच्या ‘वॉल्डन; लाइफ इन वूड्स’ ह्या कांदबरीचा मराठी अनुवाद आहे.
ह्या विषयी अधिक माहिती येथे वाचू शकतात
17 Jul 2009 - 6:33 pm | मनिष
ओरिजिनल वॉल्डन माझ्याकडे आहे, नितांतसुंदर पुस्तक आहे. ते लॅंड्मार्कमधे २ महिने आधी बघितल्याचे स्मरते. गेल्या दिवाळी अंकात (कुठल्या ते आठवत नाही, बहुदा मौज) अनिल अवचट ह्यांनी ह्या पुस्तकावर लिहिले होते.
17 Jul 2009 - 1:36 pm | नंदन