गाभा:
१४ जुलै हा दरवर्षी "बॅस्टील डे" (Bastille Day parade उच्चार?) - राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. १४ जुलै १७८९ ला बॅस्टील किल्ल्यावर हल्ला करून तेथील तुरूंग जनतेने १६ व्या लुईच्या ताब्यातून मिळवला आणि राज्यसत्तेविरुद्ध प्रथमच एकत्रित आवाज उठवला. फ्रेंच राज्यक्रांतीची ही सुरवात समजली जाते.
दरवर्षी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सपत्निक निमंत्रित केले होते आणि भारतीय सैन्याला पण संचलनात भाग घेण्यासाठी विशेष अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यात भारतीय सैन्यदल आणि मराठा रेजिमेंट अशांचा सहभाग होता.
मराठा रेजिमेंट
भारतीय सैन्यदल
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 1:38 am | llपुण्याचे पेशवेll
वाह छानच.. मराठा रेजिमेंट फ्रान्स मधे जाणार हे वाचले होते म.टा. मधे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
15 Jul 2009 - 1:46 am | बिपिन कार्यकर्ते
वा!!!
बिपिन कार्यकर्ते
15 Jul 2009 - 2:05 am | धनंजय
छानच. कवाइती चाल म्हणजे सुद्धा एक तालयुक्त कलाप्रकार आहे.
मराठा रेजिमेंट आणि नौदलाच्या तुकडीचे दर्शन पॅरिसमध्ये झाले हे छानच.
15 Jul 2009 - 5:04 am | मदनबाण
मराठा रेजिमेंटचे अभिनंदन.आणि त्यांच्या वेळी वाजणारे संगीत बहुधा कदम कदम बढाये जा चे होते. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
15 Jul 2009 - 6:55 am | सुनील
खूपच छान माहिती. ह्या परेडसाठी भारतीय सैन्य (विशेषतः मराठा रेजिमेन्ट) निवडण्यामागे काय कारणे होती?
Bastille चा फ्रेंच उच्चार बास्तियं.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Jul 2009 - 7:17 am | विंजिनेर
१४ जुलैच्या आधी आठवडाभर भारतीय स्थल/वायु/नौसेनेच्या विविध तुकड्यांनी फ्रेंच सैन्याबरोबर सराव/युद्ध-प्रात्यक्षिके केली होती(फ्रान्समधेच). त्याचाच समारोप अशा पध्दतीने केला गेला.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
15 Jul 2009 - 7:44 am | विकास
या माहीतीसाठी तसेच सुनील यांनी बरोबर उच्चार सांगितल्याबरोबर तसेच सर्वांचेच आभार. धन्यवाद!
17 Jul 2009 - 12:38 pm | जे.पी.मॉर्गन
मराठा लाईट इंफंट्री ही भारतीय लष्कराच्या सर्वांत जुन्या रेजिमेंट्सपैकी एक आहे. तब्बल २४० वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या रेजिमेंटच्या जवानांनी चीन, बर्मा, अॅबिसिनिया, आफ्रिकेबरोबरच पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये देखील पराक्रम गाजवलेला आहे.
बास्तिय डे च्या ह्या संचलनाचे नेतृत्त्व लष्कराचे कॅप्टन विवेक खंदुरी, वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर आलोक शर्मा आणि नौदलाचे कमांडर राजीव शर्मा ह्यांनी केलं. 'सारे जहाँसे अच्छा', 'हस्ते लुशाय' (उच्चार ?) आणि 'कदम कदम बढाये जा' च्या तालावर ४०० जवानांनी पॅरीसच्या 'आर्क द ट्रायोंफ' पासून 'प्लेस द ला काँकोर्ड' पर्यंत झालेल्या "बॅस्तिय डे परेड" चे नेतृत्त्व केले.
ता.क. बॅस्तिय डे परेड ही जगातली सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी वार्षिक परेड आहे.
15 Jul 2009 - 7:31 am | छोटा डॉन
ह्या परेडबद्दल बर्याच वेळा ऐकले होते, आता इथे हिंदुस्थानी जवान झळकले हे पाहुन बरे वाटले.
बाकी विंजिनेरसाहेबांची माहिती बरोबर आहे.
काही का असेना, मराठा रेजिमेंटच्या झेंडा डौलाने फडकला ह्यातच आम्हाला आनंद झाला ..
------
ब्रिगेडियर छोटा डॉन दामले
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
15 Jul 2009 - 1:47 pm | mamuvinod
दिल्लीतील राजथावर होनार्या सचलनात मराठा रेजिमेंटने गेली दोन वष जगी पलटन हा सचलनाचा बहुमान पटकावला आहे म्हूनन हा मान मिळाला
15 Jul 2009 - 1:59 pm | विशाल कुलकर्णी
वा, छान वाटले पाहुन !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
15 Jul 2009 - 2:53 pm | लिखाळ
वा .. छान वाटले .. जालावर इतरही छायचित्रे पाहिली.
-- लिखाळ.