पुन्हा पुन्हा..........काहि चमत्कारिक अनुभव.

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in जनातलं, मनातलं
9 Mar 2008 - 3:02 am

मि काहि वयाने फ़ार मोठा नाही,परन्तु अत्तापर्यन्त बरेचसे गमतिदार अनुभव माझ्या वाटेला आले आहेत.
पण हेच अनुभव जर पुन्हा पुन्हा य़ायला लागतात तेन्व्हा मात्र हे काहितरि वेगळॆच घडते आहे असे लक्शात येते.
मिच मुर्ख का बनतो असा मला नेहमिच प्रश्ना पडतो.
त्यातलेच हे काहि चमत्कारिक अनुभव............

(अनुभव १)
एखाद्याने होटेलात जावे आणि लगेच वेटरने येउन सम्पुर्ना होटेल झाडायला घ्यावे,असा अनुभव प्रत्येकास कधि ना कधि तरि नक्किच आला असेल.
परन्तु हा असा अनुभव मला किति वेळा यावा?
गेले १० वर्षे हा प्रकार मि सातत्यने अनुभवतोय.जवळपास ९०% वेळा मला हा अनुभव येतो.
आपण चहा प्यायला एखाद्या अमृततुल्या मध्ये जावे,आणि लगिच वेटरने झाडु हातात घेउन अख्खे
होटेल झाडत आपल्यापाशि येउन आपल्याला हुकुम सोडावा "साब पाव उपर करो"!
मि प्रथम असल्या घटनान्कडॆ दुर्ल्क्श करायचो,परन्तु असा अनुभव जेन्व्हा मला सारखा येउ लागला तेन्व्हा मात्र मि हादरलो.
बर हा अनुभव फ़क्त पुणे शहरातच नाहि तर समस्त भारतवर्षात येउ लागला होता.
किम्बहुना अजुनहि येत्तोय.
मुंम्बई,बेन्गलोर,दिल्लि,कोएम्बतूर अशि अगदि आसेतुहिमालय शहरे धरलित तरि अनुभव हा एकच.
मग ते साधे अमृततुल्या असो कि एखादा चान्गले रेस्टोरन्ट असो,माझ्या अवतिभवति येउन साफ़सफ़ाई करायचि वेटर लोकाना
भारि होस असते.
एकतर मि अगदि गबाळा राहतो म्हणुन कि काय़ किन्वा ह्या जनतेला मि कोणितरि मॊठा साहेब आहे असे वाटत असावे,
कि लगिच येउन साफ़सफ़ाई सुरु होते?हे आजपर्यन्त मला न उलगडलेले कोडे आहे......................

(अनुभव २)
तेन्व्हा मि नोकरिला लागुन जेमतेम २ वर्षेच झालि असतिल,नोकरिनिमित्त आमचा मुक्काम कोएम्बटुर नामक
तामिळदेशातिल एका शहरात पडला होता.मराठि/हीन्दि बेल्टच्या बाहेर राहण्य़ाचा माझा हा पहिलाच अनुभव......

आपण रस्त्याने चालताना आपल्याला "साब आपको हिन्दि/मराठि आति है क्या?" असा प्रश्न कानावर पडावा...
मि चमकुन वळुन पाहिले तर एक पस्तिशितिल पुरुष,बरोबर त्याचि बायको,तिच्याकडेवर एक मूल,बरोबर एक
विशितला तरुण,आणि एक म्हातारि असे एक कुटुम्ब माझ्यापुढे उभे.हि जनता मराठि आहे हे लगिच माझ्या लक्शात आले.
"साहेब सगळे पैशे काकान्कडे होते,ते स्टॆशनवर पाणि प्य़ायला उतरले होते आणि तेव्हद्य़ात गाडी सूटलि,
आमच्याकडे खायला पण पैशॆ नाहीत हो.काहितरि मदत करा."
अशि विनन्ति करण्यात आलि.मि नाव गाव पुसले तर हि जनता मराठवाडयतिल बीड नामक जिल्ह्यातिल होति असे कळलॆ.
आपल्या राज्याबाहेर कोणितरि मराठि माणुस भेटला कि काय आनन्द होतो म्हणुन सान्गु! मला एकदम भरुन आले.
मि कसलाहि विचार न करता त्या कुटुम्बाला माझ्याकडचे २०००रु काढुन दिले.
काय करणार?आम्हि पडालॊ सिह राशिचे..उदार...भाबडेच म्हणा हवे तर.
मला तेन्व्हा अगदि कृतकृत्य वाटले होते.
परन्तु हि असलि जनता नन्तर मला जागोजागी भेटु लागलि,हेदेरबाद,चेन्नै,बन्ग्लोर वगैरे....तेन्व्हा मात्र माझा भ्रमनिरास झाला.
काहि लोकान्चा हा व्यवसाय असल्याचे माझ्या लक्शात आले.आपण मुर्ख बनलो होतो हे समजले.फ़ार चीडचिड झालि.
हल्लि बेन्गलोर मध्ये हि असलि बरिच जनता फ़िरताना सापडते.पण मि मुळिच भिक घालत नाहि....................................

(अनुभव ३)
इथे बेन्गलोर मध्ये चहा अनि सिगारेट हे बेकरि मध्ये मिळायचे पदार्थ आहेत अशि पद्धत किन्वा समजुत आहे.
तर अशाच एका बेकरि समोर उभा राहुन माझे धुम्रपान व चहापान चालु होते.अशातच माझ्या बाजुच्या एका तरुण मुलाने माझ्याशि बळेच
बोलायला सुरुवात केलि.तुम्हि कुठले,मि कुठला वगैरे त्याने सुरुवात केलि.मि पूण्य़ाचा आहे हे पाहुन बळेच माझ्यापुढे पुण्य़ा-मुम्बै चे कवतिक केले.घसटण......तो कूठल्या तरि बिपिओ मध्ये कामाला होता.मग माझा मोबाइल नम्बर मागुन घेतला वगैरे..
मि त्या माणसाला पार विसरुनच गेलो होतो.एक २ आठवडयानन्तर ह्या माणसाचा मला रात्रि फोन आला.
जरा अघळ पघळ गप्पा मारल्या.मग हळुच ह्याने विषयाला हात घातला.
अरे मि तुला फ़ोन अशा करिता केला होता कि actually मि आणी माझे ४ मित्र मिळुन एक business सुरु करतोय.
शनिवारि सन्ध्याकाळि अशा अशा ठिकाणि आमचि पहिलि "Kickoff Meeting" आहे.
प्रत्येकि ५००० रु घालतोय आणी हा BUSINESS फ़ार फ़ायद्याचा आहे वगैरे.त्याने बरिच फ़लन्दाजि केलि.

मि त्याला विचारले कि बाबारे तुम्हि कसला Business सुरु करत आहात?जरा सविस्तर सान्गशिल का?
तो-"अरे तु या मीटिन्गला येच,तिथे तुला सगळे सविस्तर सान्गतो.तु कसलिहि काळजी करु नकोस."
मि-"मित्रा,जो पर्यन्त मला एकन्दरित काय प्रकार आहे हे कळत नाहि तो पर्यन्त मि असल्या कुठल्याहि मिटिन्ग्स्ला वगैरे येणार नाहि."
तर हा so called मित्र माझ्यावर बराच नाराज झाला.तुला उद्या फ़ोन करुन सगळे सविस्तर सान्गतो म्हणुन ह्याने फ़ोन ठेवुन दिला.

सकाळि एक ११ वाजता या माणसाचा मला परत फ़ोन.
"अरे आम्हि जरा programe change केलाय.५००० रु ऐवजि आम्हि आता १०००० रु घालायचे ठरवले आहे.
तु शनिवारच्या Meeting ला येणार आहेस ना,तेन्व्हा येताना चेकबूक घेउनच ये."
मी तर जाम उडालोच.म्हन्टले च्याइला हा काय प्रकार आहे.हा माणुस मला confirmed धरुन कसा काय बोलतोय?
मग त्याला जरा दमात घेउनच सान्गितले,कि "मित्रा मि तुला कालपासुन काय विचारतोय आणि तु त्याबद्दल एका शब्दाने पण
बोलायाला तयार नाहिस आणि पैशे कसले मागतोस?मला तुमच्या ह्या असल्या कुठल्याहि BUSINESS मध्ये काहिहि interest नाहि.sorry"
असे म्हणुन फ़ोन ठेवुन दिला.शनिवारि रात्रि ह्या माणसाने मला बरेच फ़ोन केले,पण मि एकालाहि response दिला नाहि.
रविवारि सकाळि परत ह्याचा मला फ़ोन आला.मि पण हि कटकट ऎकदाचि सम्पवून टाकु म्हणुन फ़ोन उचलला.
ह्याने लगिच सुरु केले कि अरे कालचि Meeting खुप छान झालि.तु मिस केलिस वगैरे.
हि जनता AMWAY का JAPAN LIFE असला कुठला तरि व्यवसाय करण्याच्या बेतात होति.
मला हया असल्या CHAIN MARKETING च्या प्रकारात अजिबात Interest नाहिये.उगाच आपण मुर्ख बनलो म्हणुन बाकिच्या लोकाना मुर्ख बनवायचे हे मला अजिबात पटत नाहि.
मि त्याला तसे स्प्ष्टपणॆ सान्गुन टाकले आणि हा विषय तिथेच बन्द केला.

नन्तर एक २-३ महिन्यान्नतर मि एका MALL समोर सिगारेट आणि चहा पित उभा होतो.
तिथे पण हाच अनुभव.बाजुच्या एका बर्यापैकि दिसनार्या मुलाने माझ्याशि ओळख करुन घेतलि.
तिच style.मग फ़ोन नम्बर मागुन घेतला.मला थोडेसे click झाले.गम्मत वाटलि.
म्हन्टले बघुयात हा हिरो काय करतोय ते.
मग परत १०-१२ दिवसानि ह्याने मला फ़ोन केला.सुरुवात तिच.इकडच्या तिकडच्या गप्पा.
मग ह्याने अगदि professional english मध्ये सुरु केले.
"Abhijit,I forgot to tell you something.actually I am very much impressed by your
personality and your profile.I discussed this with my friends and they are also very much
impressed with you and we have decided to offer you partnership in our business.
actually all of us wanted to meet you sometime.can we meet this sunday at MG Road?"
मार्केटिन्गवालि जनता जसे गोडगोड बोलते ना तसेच ह्याने सुरु केले.
मि मागचा अनुभव आठवुन जरा सावध झालो.मग मिच त्याला सुनावले,कि जर का तुम्हि कुठला तरि AMWAY किन्वा
JAPAN LIFE वगैरे business करत असाल तर मि आधिच असल्या २ कम्पनित पार्टनर आहे.तेन्व्हा sorry.
माझा अन्दाज खरा ठरला होता.त्याने फ़ोन तिथेच कट केला.

आता हि घटना होऊन पण २ महिने झाले असतिल.परत तसाच प्रकार!
BANGALORE CENTRAL माल समोर पण अशाच एका नमुन्याने माझ्याशि बळेच ऒळ्ख काढलि.
पुन्हा तोच प्रकार.गप्पा.वगैरे.
अत्तापर्यन्तच्या अनुभवाने मि लगिच सावध झालो.मला दाट सन्शय आला कि हा प्राणि पण ह्याच पन्थामधला
आहे.जसा त्याने माझ्याकडे फ़ोन नम्बर मगितला,तसा मि त्याला एक BALL टाकला.
"तु हे 'AMWAY' वगैरे कधि पासुन करतोस?"
माझा हा प्रश्ना ऐकुन तो उडालाच.त्याला तो ball योर्कर पडाला हॊता.
तो-"तुम्हाला कसे कळ्ले कि मि AMWAY करतोय म्हणुन?"
मि-"मित्रा मि पण गेले बरेच वर्षे AMWAY करतोय.ह्या सगळ्या STYLE मला माहिति आहेत."
त्या बिचार्याचा चेहरा अगदि पहाण्यासारखा झाला होता.परत भेटु वगैरे करुन तो तिथुन पसार झाला.
माझ्या ball वर हि wicket पडलेलि पाहुन मला काय आनन्द झाला म्हणुन सान्गु महाराजा.
मग तोच अत्यानन्द मि एक फ़क्कड चहा (विथ सिगारेट) मारुन साजरा केला.

पहिल्यान्दाच मि कोणाला तरि मुर्खात काढले होते..................................

तर असो....

मि तुम्हा सगळ्य़ाना बोर केले असेल तर जाहिर माफ़ि.
माझा हा पहिलाच लेखन प्रपन्च.तेन्व्हा ज्या काहि चान्गल्या वाइट सुचना असतिल तर
त्या जरुर कळवाव्यात,हि विनन्ति.

(एक अनुभवग्रस्त) अबब

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

9 Mar 2008 - 3:18 am | इनोबा म्हणे

तुमचे अनुभव वाचून अबब म्हणायचीच वेळ आली.तसा हा प्रकार आम्हाला नविन नाही,काही काळापुर्वी आमच्या चाळीतही या चेन मार्केटिंगची टूम निघाली होती.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्राजु's picture

9 Mar 2008 - 3:18 am | प्राजु

मि.पा.वर आपले स्वागत.
हे आणि असे अनुभव मलाही आलेले आहेत. पण तुम्ही सुंदर शब्दबद्ध केले आहे. असेच आणखिही येऊदेत..(अनुभव नव्हे हो... असे लेखन तुमचे :)))

- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 3:26 am | स्वाती राजेश

लेख मस्त जमला आहे. यावरून इतर लोक ही शहाणे होतील.

काही थोड्याफार चुका (मि, असतिल ...)अशा झाल्या आहेत.पण तुम्ही जर रोज मि.पा.वर आलात कि त्यासुद्धा सुधारतील कारण इथे येणारा प्रत्येक जण विद्यार्थी आहे..आणि शिक्षकही आहे.खूप काही शिकायला मिळेल.

पहिल्यान्दाच मि कोणाला तरि मुर्खात काढले होते..................................
पण मिसळपाव वरील सदस्यांना मुर्खान काढू नका.:))))))

मिसळपाव वर स्वागत.:))))

सचिन's picture

9 Mar 2008 - 3:36 am | सचिन

श्री. अबब,
आपले अनुभव प्रान्जळपणे माण्डून इतरान्ना सावध केल्याबद्दल आभार !
अनुभव २ आणि ३, मला दिल्लीतही आले. पण मला अनुभव देणारे नवशिके असावेत, त्यामुळे, काहीतरी "झोल" असल्याचे जाणवले, अन मी वेळीच सावरलो. वाचकान्नो ! रहा सावध...बनू नका सावज...!

कोलबेर's picture

9 Mar 2008 - 4:51 am | कोलबेर

अबब राव,
हे चेन मार्केटींग/बिझनेस वाले नुसते हैदराबाद आणि बेंगलोरच नव्हे तर १०,००० मैलावर अमेरिकेत देखिल गावोगावी फिरताना दिसतात.
"तुम्ही मराठी दिसताय/ भारतीय दिसताय" अशी सुरुवात करुन हळू हळू आपल्या जाळ्यात ओढून घ्यायचे.. आपण धंदा करण्यात कसे मागे पडतो.. धंदा करण्यातच कसे सगळे फायदे आहेत.. असं सांगत ह्या मिटींगच्या अक्षता दिल्या जातात! मला तरी हे लोक तुम्हाला रस्त्यावर भेटलेल्या (बस चुकलेल्या) लोकांच्या इतकेच भामटे वाटतात!
परदेशात आलेले उच्चशिक्षीत भामटे इतकाच काय तो फरक!

ह्यावरती इथे एक सुंदर लेख अनामिका जोशी ह्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळेल अगदी परफेक्ट वर्णन केले आहे.. जरूर वाचा!
-कोलबेर

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 7:10 am | सुधीर कांदळकर

बनला हे ऐकून बरे वाटले. मी पण पंचविशीत असतांना असाच एकदोन वेळा फसलो होतो. पहिल्यांदा अनोळखी इसमाकडून व दुस-यांदा ओळखीच्या प्राण्याकरून.

चेन मार्केटिंगवाले मात्र माझे वय वाढल्यानंतर आले.

कोइंबतूरला 'रोस्ट' खाता की नाही? गच्चीतील हॉटेल ओरायन मध्ये स्वाद घेतला की नाही? आणि निलगिरी मॉल मधले पफ्फ खाले की नाही? आर्य मधील टोमॅटो राईस वगैरे शाका. पदार्थ? आमचा एक मित्र तेथे वर्ष दीड वर्ष होता. आम्ही मित्र मित्र त्याच्याकडे कोईम्बतूरला चार पाच दिवस असे दोन वेळा जाऊन आलो आहे. तेथून मुन्नार, कोडाई व यरकॉड ही थंड हवेची ठिकाणे जवळ आहेत. महाबळेश्वरच्या मानाने स्वस्त आहेत.

छोटा डॉन's picture

9 Mar 2008 - 6:45 pm | छोटा डॉन

मस्त मिहले आहेस "अबब", झक्कास !!!
अनुभवाचे पहायला गेलातला तर भारतातल्या कुठल्याही औद्योगिक शहरात मग ते पुणे असो की बेंगलोर की हैद्राबाद वा दिल्ली , तुम्हाला असे फसवणारे लोक भेटतिलच. पहिल्यांदा ते अंदाज घेतात की "पाखरू" जाळ्यात सापडण्यासारखे आहे की नाही ? मग ते आपले जाळे विणतात ...
मला आत्तापर्यंतच्या ६ महिन्याच्या बेंगलोर मधल्या काळात कमीत कमी ४ वेळा "राम राम, तुम्ही मराठी आहात का ? " अशी सुरवात करून मग " मी येथे औशधौपचारासाठी आलो आहे, पैसे संपले/चोरीला गेले, बॅग हरवली, नातेवाईक सोडून गेले, बायको / मुलगा आजारी आहे" हे रडगाणे गाऊन शेवटी बात "मला ५०० ते ५००० रुपये पर्यंत कितीही मदत करा" उआ गोष्टीवर येते ...
सामान्यता असे लोक बरोबर त्यांची बायको म्हणवणारी एक बाई, एक लहान मुल [ जे नेहमी आजारी वाटते ] व हातात एकदम भिकार पिशवी, गाठोडे अथवा तत्सम गोष्टी घेऊन आढळातात.[ मला मी रहात असलेल्या भागात एक असे जोडपे ३ वेळा भेटले, माझा मित्र म्हणाला की नेहमी असेच लोकांना टोप्या घालत असते ] आपली भाषा बोलणारी व्यक्ती असल्याने आपण माणूसकीच्या भावनेने मदत करतो पण ती योग्य कारणासाठी वापरली जात नाही ...
"चेनमार्केटिंग " चे जाळे तर बरेच मोठे आहे. ते लोक आधी तुमची व्यवस्थीत माहिती काढतात, गोड गोड बोलतात व शेवटी मिटिंग ला येण्याची गळ घालतात. आश्चर्य म्हणजे ह्यात "विप्रो , आय बी एम , टी सी एस" यासारख्या प्रतिष्ठीत कंपन्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारे लोक आहेत [ हा माझा वैयक्तीक अनुभव आहे ...] , त्यांच्या सफाईदार बोलण्याला, व्यक्तीमत्त्वामुळे आपण त्यांना डायरेक्ट जागेवर नकार पण देऊ शकत नाही ...

तर तात्पर्य काय , सावध रे !!!!!!!!!

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

विद्याधर३१'s picture

9 Mar 2008 - 9:43 pm | विद्याधर३१

विचित्र अनुभव आला.
एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले. नन्तर काही दिवसानी एक फोन आला. " तुम्हाला लकी ड्रॉमध्ये बक्शीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी यावे लागेल. मला थोडी शन्का आल्यामुळे मी गिफ्ट बद्दल विचारणा कर्ताच "तुम्हाला एक सेमिनार अटेन्ड करावा लागेल " असे उत्तर आले. मी आल्यानन्तर गिफ्ट मिळाले नाही तर पोलीस कम्प्लेन्ट करेन असे सन्गित्ल्यवर फोनवर खुसुरफुसुर होउन फोन बन्द झाला.
नन्तर कळाले की सेमिनार मध्ये काही हजार भरुन वर्शातून एकदा ३-४ दिवस हॉलीडे ट्रिप अशी कहिशी स्कीम होती....

विद्याधर

भडकमकर मास्तर's picture

10 Mar 2008 - 1:13 am | भडकमकर मास्तर

एका प्रदर्शनामध्ये "फ्री पर्किन्ग फक्त लकी ड्रॉ कूपन भरा" असे गळ्यात पडून फॉर्म भरून घेतले.
हल्ली मी कोणत्याही दुकानात /प्रदर्शनामध्ये / मॊल मध्ये फ़ोर्म भरत बसत नाही... " मी फ़ॊर्म भरत नसतो, त्याचा काहीही फ़ायदा होत नाही ,"असे माजोरडे उत्तर द्यायला मजा येते

विद्याधर३१'s picture

10 Mar 2008 - 7:01 am | विद्याधर३१

मी पण हेच करतो.

पण सगळ्यात मजा येते ती कॉल सेन्टरच्या फोनला " मीटीन्गमध्ये आहे एक तासानन्तर फोन करा असे २-३ वेळा सान्गणे."

विद्याधर

अभिज्ञ's picture

10 Mar 2008 - 8:56 pm | अभिज्ञ

नमस्कार मन्डळी.
शाळेतिल निबन्ध सोडला तर त्यानन्तर एवढे सारे लिहण्याची माझि हि पहिलिच वेळ.
आपण सर्वानि जो काहि प्रतिसाद दिला तो पाहून माझा हुरुप खुपच
वाढला आहे.मुख्यतः प्राजुताई,स्वाती राजेश ,ईनोबा दादा ह्यानि तर
पहिल्या १५ एक मिनिटातच प्रतिक्रिया देउन माझा जीव भान्ड्य़ात पाडला.
मुख्यतः स्वाती राजेश ह्यानि तर अगदि कान पकडून चुका दाखवल्या.मला तर
त्यान्चे जास्त आभार मानावेसे वाटतात.
बाकिच्या प्रतिसाद दिलेल्या लोकान्चे अनुभव जब-याच आहेत.
कोलबेर ,तुम्हि दिलेलि लिन्क तर फ़ारच अप्रतिम आहे.जनतेने तर ती जरुर वाचावि अशिच आहे.
छोटा डॉन तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि अनुभवाबद्दल धन्यवाद.
सुधीरजी,तुम्हि तर सान्गितलेलि नावे ऎकून तर जुन्या आठवणी जाग्य़ा झाल्या.
सगळ्यान्चे पुन्हा एकदा आभार.
चला आता पुढच्या लिखाणाला सुरुवात करायला हरकत नाहि.
(आपल्या प्रोत्साहनाने उपकॄत ) अबब.

एम एल एम च्या मार्केटिंग टॅक्टीस....
अँम वे : हे लोक सर्व प्रथम स्वतःच्या मिशा काढतात( भादरतात) .चेहेर्‍यावर हसू असते...म्हणतात साहेब मी एक व्यवसाय सुरू करतो आहे संध्याकाळी वेळ आहे का?
टीपिकल शब्दः रेसेड्युअल इनकम मिळेल...
आयुष्य स्वतःसाठी जगणार की दुसर्‍यासाठी?(वाजपेयी सुद्धा अँम वे चे मेंबर आहेत. असेही सांगतात)
जपान लाईफ : माझे एक काम आहे मला तुमचा सल्ला हवा आहे. आपल्याला पुण्याला/कोल्हापूर ला जायचे आहे. का ते तिथे गेल्यावर सांगेन. माझ्या साठी चला.
टीपिकल शब्दः साहेब मयतीला पाच माणसे लागतात्...तुम्ही आयुष्यात पाच माणसे जमवु शकत नाही?
व्हर्साटाईल : एक जबर्दस्त प्लॅन आहे....
टीपिकल शब्दः काय कसा वाटला प्लॅन्...मस्त की फँटास्टीक
हे लोक खालील पुस्तके वाचतात.
अँम वे : पॅरॅबल ऑफ पाईप लाईन / हू मुव्ह्ड माय चिज.
जपान लाईफ : माजिक ऑफ थिंकींग बीग.( हे खरेच खूप मस्त पुस्तक आहे)

मनस्वी's picture

13 Mar 2008 - 7:54 pm | मनस्वी

अहो अबब काका

मला अनुभव क्र. १ काही अजून अलेला नाही.

अनुभव क्र. २ : मी एकदा हैद्राबादमधे फुटपाथवर कंपनी बसची वाट बघत थांबले होते. १ बाई, १ ईसम, बाईच्या कंबरेवर १ मूल आणि १ आजी असे चौघेजण माझ्याकडे आले. बाई माझ्याकडे येउन म्हणाली "मराठी येते का?"
मी लगेच प्रकार ओळखला आणि खूप विचित्र तोंड केले म्हणजे आपल्याला कोणी कन्नडमधून काही प्रश्ण विचरल्यावर आपण कसे तोंड करू.. अगदी तसे.. म्हणजे (मनातल्या मनात) "ए बाई तू काय म्हणतीयेस मला अजिबात कळत नाहीये!"
ती बाई काही न बोलता पुढे निघुन गेली. मी बघितले तर सगळे पुढच्या हिरवळीवर निवांत गप्पा मारत होते.

अनुभव क्र. ३ : स्थळ - फूड बझार
अनोळखी ईसम (माझ्या सहकार्‍याला) - तुम्ही अमुक अमुक कंपनीत कामाला अहात का.
सहकारी - नाही.
ईसम - मी ढमुक ढमुक.. एबीसी कंपनीत बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे.
सहकारी - मी तमुक तमुक कंपनीत आहे.
ईसम - पण तुमचा चेहेरा खूपच फॅमिलीअर वाटतो! तुमचा मोबाईल नं काय.
(महान सहकार्‍याने मों नं दिला. आणि व्हिजिटिंग कार्ड पण!!!!! "कहर आहे याचा....." - मी मनातल्या मनात म्हटले.)
तर या पठ्ठ्याने लगेच त्याच्या मोबाईल वरून मिस्ड कॉल देउन पाहिले नंबर बरोबर आहे ना!
मला काहीतरी शंका आली. तर सहकारी म्हणतो "अगं, मला बरेच जण म्हणतात, तुझा चेहेरा ओळखीचा वाटतो म्हणून."

शुक्रवारी संध्याकाळी या ईसमाचा फोन.. "अरे मी तुला फ़ोन अशा करिता केला होता की actually मी आणि माझे ४ मित्र मिळून एक business सुरु करतोय.
शनिवारी संध्याकाळी अशा अशा ठिकाणी आमची पहिली "Kickoff Meeting" आहे!"-------- अगदी हेच!

सहकार्‍याने मी आत्ता बाहेरगावी आहे असे सांगून फोन कट केला..
आणि परत त्या नं वरून फोन आला तर तो आता फोन उचलतच नाही!!

मनस्वी

स्वयम्भू's picture

13 Mar 2008 - 9:46 pm | स्वयम्भू (not verified)

सद्ध्य मी सुद्धा बन्गलोर येथेच रहात असल्याने तुमचे हे अनुभव मला नक्किच कामी येतील. मला कुणी असा बिजनेस वाला भेटला तर आता (तुमच्या) अनुभवानी शहाणा झालेला मी त्यालाच एखादी ओफर देइन :-)

आपला,

स्वयंभू