राजा शिव छत्रपती शिर्षक गीत

नानबा's picture
नानबा in काथ्याकूट
13 Jul 2009 - 3:52 pm
गाभा: 

स्टार प्रवाह वाहिनीवर "राजा शिव छत्रपति" मालिका लागते, त्याच्या शिर्षक गीताचे शब्द हवे आहेत.... ही रचना माझ्या माहितीत कवि भुषण यांची आहे..... त्याचे शब्द अतिशय सुंदर आहेत पण जलद संगीतामुळे शब्द समजून घेण्यात अडचण होते.

प्रतिक्रिया

mamuvinod's picture

13 Jul 2009 - 3:56 pm | mamuvinod

"राजा शिवछत्रपती मालिकेचे शीर्षकगीत"

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सुअंभ पर ।
रावण सदंभ पर
रघुकुल राज है ॥

पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर ।
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है ॥

ह्र्दयात माऊली
रयतेस सावली ।
गडकोट राऊळी
शिवशंकर हा ॥

मुक्तीची मंत्रणा
युक्तीची यंत्रणा ।
खल दुष्ट दुर्जना
प्रलयंकर हा ॥

सुष्टांसी रक्षितो
शत्रू विखंडतो ।
भावंड भावना
संस्थापितो ॥

ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥

दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर ।
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है ॥

तेज तम अंस पर
कन्ह जिमि कंस पर ।
त्यों म्लेंछ बंस पर
सेर सिवराज है ॥

॥ जय भवानी, जय भवानी ॥
॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥

॥ जय भवानी, जय शिवाजी ॥

शिवभक्त मामु

संदीप चित्रे's picture

14 Jul 2009 - 9:30 am | संदीप चित्रे

धागा सुरू केल्याबद्दल प्रथमला आणि शीर्षक गीत दिल्याबद्दल मामुला धन्स.
माझ्या चार वर्षांच्या मुलाला हे गाणं अतिशय आवडतं आणि मी आत्ता गुगलून बघणारच होतो की नक्की ओळी काय आहेत. त्यातील हिंदी ओळी कवी भूषण ह्यांच्या आहेत हे माहिती होतं.

मराठी ओळी कुणी लिहिल्या आहेत माहिती आहे का?

अजय-अतुलने बेफाट संगीत दिलंय.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Jul 2009 - 4:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

हे घ्या करा डाउन लोड
http://www.4shared.com/file/107842035/eea4c1b7/Raja_Shivchatrapati.html

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

केळ्या's picture

14 Jul 2009 - 9:29 pm | केळ्या

धन्यवाद!

पाषाणभेद's picture

14 Jul 2009 - 7:39 am | पाषाणभेद

अंगावर रोमांच उभे करणारे काव्य आणि संगीत !

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अ-मोल's picture

14 Jul 2009 - 2:01 pm | अ-मोल

ऐसा युगे युगे
स्मरणीय सर्वदा ।
माता पिता सखा
शिवभूप तो ॥ :)

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jul 2009 - 6:15 pm | अविनाशकुलकर्णी

अप्रतिम रचना.१००/१००

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 3:14 am | बिपिन कार्यकर्ते

http://www.youtube.com/watch?v=i01GCCnk1Wo

बिपिन कार्यकर्ते

विशाल कुलकर्णी's picture

15 Jul 2009 - 3:27 pm | विशाल कुलकर्णी

इंद्र जिमि जंभ पर
बाडव सुअंभ पर ।
रावण सदंभ पर
रघुकुल राज है ॥

पुर्ण गीतासाठी धन्स. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आपला अभिजित's picture

17 Jul 2009 - 5:33 pm | आपला अभिजित

शिवराज्याभिषेकाच्या वेळचे आहे म्हणे!

बाय द वे,

अर्थ कुणी सांगेल का इथे??

ओ की ठो कळत नाहीये!!

प्रांजल वाघ यांनी त्यांच्या ब्लॉग मधे
शेर शिवराज है या पोस्टमधे इंग्रजी भाषांतर केलं आहे.

ठकू's picture

17 Jul 2009 - 7:54 pm | ठकू

जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वडवानल, तसाच गर्वोन्मत्त रावणाला रघुकुल राम शासन करतो,

मेघांपेक्षा जसं वादळ, रतिच्या मदनापेक्षा जसे शिव शंभू, तसाच सहस्रार्जुनापेक्षा (सहस्त्रबाहू) परशुराम श्रेष्ठ ठरतो.

वृक्षांना जसा वणवा, हरिणांच्या कळपाला जसा चित्ता, भूषण हत्तीला तसाच सिंह जीव नकोसा करतो.

अंधाराला नाश प्रकाशाने होतो, कंसाचा नाश जसा श्रीकृष्णाने केला, तसाच म्लेंच्छ्वंशीयांचा नाश नरसिंह भासणा-या शिवरायांकडून होतो.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

ठकू's picture

17 Jul 2009 - 8:11 pm | ठकू

ऐसा युगे युगे
स्वर्णीय सर्वदा ।

की

स्मरणीय सर्वदा?

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे