विडंबन

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 Mar 2008 - 2:27 am

हल्लीच सर्किट आणि बेसनलाडू यांनी विडंबनकारांना एक ओपन च्यालेंज दिले की - बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता ते करता येईल का, किंवा करुन दाखवावे!
आम्ही विडंबनकार वगैरे म्हणण्याइतके ह्या काव्यप्रकारात थोर नाही पण आमच्याच्याने रहावेना (खाज की काय म्हणतात ते:)) असे म्हणून आम्ही च्यालेंजच्या नियमात बसवून एक विडंबन सादर करत आहोत.

सूचना :- विडंबन वाचण्याआधी अश्विनी शेंडे यांचे अतिशय सुंदर मूळ गाणे, जे 'यंदा कर्तव्य आहे' ह्या मराठी सिनेमात आहे ते इथे वाचा आणि इथे ऐका. त्याखेरीज वाचकांना विडंबनाचा आनंद पूर्णपणे घेता येणार नाही असे वाटते.

कधी दूर दूर, कधी तू समोर, तनु कंपते आज का,
का हे असे, फोन तसे, हा घोर लागे जीवा,
कसा आवरु मी; सावरु रे मी आता,

अब्बास हा, अब्बास हा
छळतो मेला, छळतो मला!

क्षणात सारे पंटर ते रे, 'घोडे'च घेऊन येती
जरी दूर तू ही, जवळ भासे अन, काहीच नाही हाती,

मी रडतो-भेकतो; पायाही पडतो, पुन्हा तुला आठवतो
मग करुन फोन त्या पोलिसांस ही; तुझ्याचसाठी 'देतो'!

तू असताना नसल्याचा खेळ हा;
भासे स्वप्न का हे नसतानाही मला,

अब्बास हा, अब्बास हा,
छळतो मेला, छळतो मला!

मनात माझ्या हजार शंका, 'इंटरपोल' ते झोपे का रे,
तू कराचीत आहेस, दुबईत नाहीस, आहेस तू खरा कुठे रे

तू इथेच ये ना, मांडवली कर ना, हवाच आहेस इथे तू,
पण माहित नाही मलाही अजुनी कसे ते करशिल रे तू?

नवे मंत्री सारे, नवी 'खाती' हा खवा,
भासे स्वप्न का हे नसतानाही मला,
अब्बास हा, अब्बास हा,
छळतो मेला, छळतो मला!

चतुरंग

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

8 Mar 2008 - 2:46 am | केशवसुमार

गावच नाव राखलस रे चतुरंगा..एकदम चोक्कस विडंबन..
पण मला एक सांग सर्किट आणि बेसनलाडू यांनी विडंबनकारांना एक ओपन च्यालेंज दिले की - बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता ते करता येईल का, किंवा करुन दाखवावे!
हे कुठे म्हणाले रे.. अन मी कस वाचल नाय.. काल गावाला गेल्तो तेव्हा इथ लईच राडा झालेला दिसतोय.. एक- दोन दिस कुट जायाची सोय नाई बघ.. हे म्हणजे पुन्याच्या चितळेला तू बाकर वडी करू नको.. तात्याला शिव्या देऊनको, बिलगेट्ला 'खिडक्या' बंद कर म्हणल्या सारखे आहे की.. जाऊदे उगा मना ला लावून गेऊ नगसा..त्यांसनी काय करायचे ते करूद्या.. आपन काय करायचे ते आपन करावे कस..
(समजूतदार) केशवसुमार..

चतुरंग's picture

9 Mar 2008 - 12:11 am | चतुरंग

वाच हा च्यालेंजचा दुवा!
चतुरंग

स्वाती राजेश's picture

8 Mar 2008 - 3:23 am | स्वाती राजेश

चतुरंग विडंबन छान केले आहे.
बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप यांना न घेता खासच !!!!!

इनोबा म्हणे's picture

8 Mar 2008 - 3:28 am | इनोबा म्हणे

चतूरंगराव आवडले बरं का!
आता केशवा या कडीवर काही वरकडी करतोय का ते पाहायचं.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

बेसनलाडू's picture

8 Mar 2008 - 3:58 am | बेसनलाडू

क्या बात है! असे असावे विडंबन! मस्त!
(संतुष्ट)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 9:23 am | विसोबा खेचर

मनात माझ्या हजार शंका, 'इंटरपोल' ते झोपे का रे,
तू कराचीत आहेस, दुबईत नाहीस, आहेस तू खरा कुठे रे

वा वा! मस्त रे रंगा...

तात्या.

फटू's picture

8 Mar 2008 - 2:13 pm | फटू

एका हळूवार गीताचं तितकंच सुंदर विडंबन...

चतुरंग's picture

9 Mar 2008 - 12:15 am | चतुरंग

केशवसुमार, स्वाती-राजेश, इनोबा, बे.ला., विसोबा, सतीश सर्वांचे आभार!
चतुरंग

प्राजु's picture

9 Mar 2008 - 2:29 am | प्राजु

माफ करा प्रतिसाद द्यायला उशिर झाला.
पण या गाण्यावर इअतके सुंदर विडंबन होऊ शकेल असे वाटलेही नव्हते.
खूपच सुंदर. आणि बाई, बायको, दारू... हे काहिही नाहीये यात.. अभिनंदन.

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग's picture

9 Mar 2008 - 8:17 pm | चतुरंग

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 8:43 pm | सुधीर कांदळकर

आव्हान स्वीकारण्याव्ह्या वीजिगीषु वृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अशीच दुर्दम्या वृत्ती पाहिजे.

अभिनंदन. धन्यवाद.
शुभेच्छा.