काल रात्रीपासून डोक्यात एक नवा कथानायक घोळ घालत होता,तेवढा झटपट लिहून काढावा म्हणून आज सकाळी जरा लवकरच उठलो.घराचं दार उघडत नाही तो समोरचा नाना आम्हाला सामोरा(खरंतर पाठमोरा)गेला.नको तो अवयव खाजवत बसाययची लोकाना भारी खोड.च्यामारी!उद्या त्याला स्क्रबिंग ब्रशच घेऊन देतो(ओशाळला तर ठिक-नाहीतर ब्रशचे पैसे वाया जायचे)सकाळी सकाळी नको त्या गोष्टी नजरेस पडतात.
म्हटलं लवकर जाऊन प्रात:विधी उरकून घ्यावा,पण हे सालं चाळीतले आयुष्यच बेकार.एकवेळ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जागा वेळेवर मिळेल,पण सकाळी वेळेवर संडास रिकामं मिळेल याची खात्री नाही.प्रसंग निभाऊन नेला.दिवसेंदिवस आमच्या सहनशक्तीत कमालीची वाढ होतेय.काम फत्ते करताना भिंतीवरच्या मजकूराकडे सहज नजर गेली.प्राचिन मानवाने बनवलेल्या गुहेतील भित्तीचित्रेही इतकी रेखिव नसावित.शिवाय इतका मर्यादीत वाचक वर्ग असतानाही लोक आपली साहित्यविषयक आस्था सोडायला तयार नाहीत,हे त्या भिंतीवरचे मजकूर वाचून लक्षात यावे.(कोण म्हणते तरुण पिढीला साहित्याविषयी प्रेम नाही?) शिवाय चाळीत घडणा-या रोजच्या घटनांचे इतक्या परखड शब्दांत विश्लेषण.हे समाजोपयोगी काम विनामोबदला करणा-या त्या अज्ञात निर्भिड पत्रकाराचे मी मनातल्या मनात आभार मानले.
दूपार ही केवळ जेवण व वामकूक्षी घेण्याकरिता असते असा माझा समज होता,आपल्या हिंदूस्थानातील कित्येक महान तपस्वींनी त्यांची दूपार पहूडण्यातच घालवली असे मी कुठेसे वाचले होते.परंतू आधूनिक काळात मानवाला त्याच्या प्राचिन संस्कृतीचा विसर पडत चाललेला दिसतो असे आमच्या मातोश्रींच्या शब्दांवरुन जाणवले("कार्ट्या,लोळत पड दिवसभर,बाकी काही करु नको."-इति मातोश्री)दळण आणणे ह्यासारखे हलके काम माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाला सांगताना(तेही दूपारी)आमच्या मातोश्रींना काहीच वाटले नाही.जून्या पिढीला साहित्य व साहित्यीकांविषयी आदरच राहीला नाही.
संध्याकाळी काही वेळ प्रभात रोडच्या कमला नेहरु बागेत जाऊन फेरफटका मारला.नंतर बाहेर येऊन चहा ढोसला व सिगरेट फूकली.दहा रुपये धारातीर्थी पडले.आज काल महागाई कीती वाढली आहे नाही.माझ्यासारख्या नवसाहित्यीकांना(चिंतनाकरिता) सिगरेटचा धूर किती गरजेचा आहे हे सरकारला ठाऊक नाही काय? भाववाढीच्या नावाखाली जनतेची सर्रास लूट होतेय.सरकारचे हे धोरण राष्ट्राच्या तमाम साहित्यिक व साहित्याविषयीच्या उदासिन भूमिकेचा धडधडीत पुरावा आहे.माझे हे विचार मी आसपासच्या जनतेसमोर माझ्या ज्वलंत(सिगरेटसह)शब्दांत मांडले.मात्र त्यांनी ते फारसे मनावर घेतलेले दिसले नाही.समाजाला आजकाल साहित्य व साहित्यिकांविषयी आदर राहिला नाही.
रात्री जेवण करुन शतपावलीकरिता बाहेर पडलो तर नेमकी मांजरेकर मावशींची मांजर आडवी गेली,असल्या अंधश्रद्धा मी पाळत नाही.पण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले असल्यामूळे त्यांचे मन मोडवत नाही.पाच पाउलं मागे गेलो तर नेमका मागून येणा-या दोडके काकांना धक्का लागला.आधीच ऊसाच्या चिपाडासारखा दिसणारा तो कृश देह,सांडण्याच्याच बेतात होता.कसाबसा सावरला.भलताच भडकला-म्हणाला "हे सगळं तु जाणून बूजून करतोयस हे न जाणण्या इतपत मी मुर्ख नाही.तुझा लेख आमच्या वर्तमानपत्रात छापला नाही म्हणून असा सूड उगवतोयस होय चांडाळा.तुझा तो थर्डक्लास लेख शेंबड्या पोरांच्या वाचण्याचाही लायकीचा नव्हता.म्हणूनच छापला गेला नाही." चार पाच शिव्या हासडून बेणं गेलं एकदाचं.खरंतर 'आमच्या वर्तमानपत्रात' म्हणण्याएवढा तो दोडका काही मोठ्या हूद्द्यावर नाही.तो त्याच वृत्तपत्रसंस्थेत काम करतो एवढंच.शेजारधर्म म्हणून लेखाबरोबर जोडून संपादकाला लिहीलेल्या पत्रात मी याच्या नावाचा उल्लेख केला तर एवढा भाव वाढला याचा.आख्ख्या चाळीला "माझा वशिला लावला" म्हणून बोंब मारत फिरत होता."निंदकाचे घर असावे शेजारी" या तुकोबांच्या सांगण्यावर माझा विश्वास आहे.उद्या मी मोठा साहित्यीक झालो की माझ्या एखाद्या कथा-कादंबरीत याला खलनायक बनवणार आहे.मनाशी पक्का निर्धार करुन परत घरी गेलो आणि एका नव्या कथेची जुळवाजुळव करत सरळ अंथरुणात शिरलो.
माननीय मिपाकरी वाचक बंधू आणि त्यांच्या भगिनी हो!
हा आमचा ललित लेख लिहीण्याचा पहीलाच प्रयत्न आहे,तेव्हा चू.भू.द्या.घ्या.(उगाच आमची लक्तरे वेशीवर टांगू नये)
प्रतिक्रिया
8 Mar 2008 - 3:14 am | मुक्तसुनीत
तुमचा पहिला प्रयत्न असल्यास तो खरोखरच स्तुत्य आहे ! काही ठिकाणी मनापासून हसायला आले. संडासच्या वर्णनावर, कथानायकाच्या चाळीच्या काही वर्णनांवर, खुद्द त्याच्या लेखक बनण्याच्या खटपटीच्या वर्णनांवर "बटाट्याच्या चाळीची" छाया पडली आहे. कथानायकाच्या विसंगतींवर उत्तम बोट ठेवले आहे. नर्मविनोदी, खुसखुशीत लिखाण.
आणखी लिहा. कथानकाची ब्यांडविड्थ वाढवण्याचा प्रयत्न करा. स्टाईल आहे, सब्स्टन्स शोधा :-)
8 Mar 2008 - 3:28 am | स्वाती राजेश
पहिलाच पण छान जमला आहे.
चाळीचे वर्णन खासच ...
माझ्यासारख्या नवसाहित्यीकांना(चिंतनाकरिता) सिगरेटचा धूर किती गरजेचा आहे हे सरकारला ठाऊक नाही काय? भाववाढीच्या नावाखाली जनतेची सर्रास लूट होतेय.
सरकार तुमच्या तब्येतीच्या काळजीने करते.:)))
आणखी असाच खुसखुशीत लेखाची वाट पाहात आहोत..
8 Mar 2008 - 6:50 am | प्राजु
इनोबा,
खरंच छान झाला अहे लेख. पहिला प्रयत्न एकदम सफल. पुढचा लेख लवकरच येऊदे.
चाळीचे वर्णन एकदम छान.
एकवेळ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जागा वेळेवर मिळेल,पण सकाळी वेळेवर संडास रिकामं मिळेल याची खात्री नाही.प्रसंग निभाऊन नेला.
हे मस्तच..
-(सर्वव्यापी)प्राजु
8 Mar 2008 - 8:57 am | सहज
खरंच छान झाला आहे लेख. पहिला प्रयत्न एकदम सफल. पुढचा लेख लवकरच येऊदे.
हेच म्हणतो.
8 Mar 2008 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्यिक मित्रा,लेखन मस्त झालंय. लेख वाचतांना आमचा चेहरा जागोजागी हसरा होत होता :) ( आमच्या चेह-यावर हसू दिसणे म्हणजे उंबराच्या झाडाला फूल दिसण्यासारखे आहे. )लेका, यातच आपल्या लेखनीचे यश आहे. :)पुढील लेखनाकरीता शुभेच्छा !!!
8 Mar 2008 - 10:51 am | इनोबा म्हणे
प्रतिसाद दिलेल्या व न दिलेल्या(हे असं आजकाल म्हणावं लागतं-कमीतकमी पुढच्यावेळि तरी प्रतिसाद देतील लेकाचे) आमच्या मनाच्या तळापासून आभार!आपल्या प्रतिक्रीया वाचून खुप बरे वाटले.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
8 Mar 2008 - 4:05 pm | फटू
विशेषत: संडास आणि साहित्यविषयक आस्था यांची सांगड अतिशय योग्य शब्दांत घातली आहे...
मुंबईतले सार्वजनिक संडास अगदी असेच असतात... हाहाहा...
8 Mar 2008 - 8:41 pm | अभिज्ञ
नमस्कार.
माननीय मिपाकरी वाचक बंधू आणि त्यांच्या भगिनी हो!
हा आमचा ललित लेख लिहीण्याचा पहीलाच प्रयत्न आहे,तेव्हा चू.भू.द्या.घ्या.(उगाच आमची लक्तरे वेशीवर टांगू नये)
एकदम मान्य.
उत्तम प्रयत्न.
8 Mar 2008 - 10:31 pm | सृष्टीलावण्या
हिरवी पँट, हिरव्या पिवळ्या फुलांचा बुशशर्ट, डोक्याला गुलाम महमंद बक्षी छाप टोपी, खिशात लालभडक रुमाल....
असेच दर्जेदार साहित्य येऊ दे ह्यापुढे सुद्धा...
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
8 Mar 2008 - 11:08 pm | लिखाळ
अरे वा !!
फरच छान लेख. योग्य आणि बेताचा विनोद आणि सुटसुटीत लेखन.
उद्या मी मोठा साहित्यीक झालो की माझ्या एखाद्या कथा-कादंबरीत याला खलनायक बनवणार आहे.
अतिउत्तम !!
पुलेशु.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
9 Mar 2008 - 12:16 am | पिवळा डांबिस
परंपूज्य इनोबाम्हाराज,
तुम्चं ह्ये निरूपन अगदी झ्याक हाये! आमाला लई आवाडलं!!
आज शनिवार, आम्ची गिरन वंद असतीय. तवा जरा आरामात उटलो. आनि मि.पा. वर आलो. बघतो तर तुम्चं निरूपनच येकदम 'ढ्यांचिक' करून समोर आलं की!
तशे ३-४ ईशय येका ठिकानी वाचायला बरे वाटतात, पन मी काय म्हंतो, ह्यांच्यामधल्या येक-येक इशयावर सौतंत्र लेख हुईल की, राव! येकदम 'हुप्संपादक' बनून जाल की!! त्या परविण टोकेकराची ऐशी की तैशी!! त्यो "ब्रिटिश नंदी" तर तुम्ही "देशी पोळ"!! :)))
आनी संडासातल्या कवनांवर तर काय महाकाव्य लिवू शकाल की! मट्रीयलला काय तोटा हाय वो? निसतं येगयेगळ्या चाळीतल्या मित्रमंडळींकडे मधूनमधून 'बसायला' जायाचं, काय? मातुर वही-पेण्शिल लपवून आत न्या हो, नायतर लोकान्ला भलताच डौट यायचा!!:))
तुमच्या लेखणाचा फ्यान (चाहता याला मराठीत फ्यान म्हंत्यात!),
पिवळा डांबिस.
ता.क.: तुमी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आध्यक्ष जहाल्यावर तुम्चा वशिला लावून आम्च्या प्राजुला जरा तुम्च्या कवितासंमेलनात घ्याल ना?
9 Mar 2008 - 2:21 am | इनोबा म्हणे
त्यो "ब्रिटिश नंदी" तर तुम्ही "देशी पोळ"!! :)))
डांबीसकाका त्या प्रविण टोकेकराचा तर मी अगदी फ्यॅन होतो राव्,त्यांच्याशी बरोबरी करु नका माझी.
मातुर वही-पेण्शिल लपवून आत न्या हो, नायतर लोकान्ला भलताच डौट यायचा!!:))
हा हा हा!!! हे अगदी बरोबर बोललात.
तुमी आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आध्यक्ष जहाल्यावर तुम्चा वशिला लावून आम्च्या प्राजुला जरा तुम्च्या कवितासंमेलनात घ्याल ना?
बोंबला त्याच्यायला!आमी काय तिला संधी देणार.उलट देवाच्या इच्छेने तिच मोठी कवयित्री होऊन आमच्यासाठी वशिलेबाजी करेल.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
9 Mar 2008 - 8:07 am | पिवळा डांबिस
त्या प्रविण टोकेकराचा तर मी अगदी फ्यॅन होतो राव्,त्यांच्याशी बरोबरी करु नका माझी.
त्या लेखांचं पुस्तक कधी बाहेर येतंय याचीच वाट पहातोय! आल्याचं तुम्हाला कळलं तर मला लगेच कळवा..
9 Mar 2008 - 10:40 am | इनोबा म्हणे
त्या लेखांचं पुस्तक कधी बाहेर येतंय याचीच वाट पहातोय! आल्याचं तुम्हाला कळलं तर मला लगेच कळवा..
सध्या तरी ते येईल असे वाटत नाही,कारण टोकेकर 'सकाळ' सोडून लोकसत्ताकडे गेले आहेत.लेखांचे हक्क सकाळकडेच असावेत.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
10 Mar 2008 - 11:48 am | धमाल मुलगा
इनोबा, एकदम ज॑क्शन लेख. मजा आली वाचताना...
एकवेळ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जागा वेळेवर मिळेल,पण सकाळी वेळेवर संडास रिकामं मिळेल याची खात्री नाही.
)दळण आणणे ह्यासारखे हलके काम माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाला सांगताना(तेही दूपारी)आमच्या मातोश्रींना काहीच वाटले नाही.जून्या पिढीला साहित्य व साहित्यीकांविषयी आदरच राहीला नाही.
इ.इ. तर दे दणादण....
म्हाराज, लवकर पोथी काडा म्ह॑जी आमाला कामाधामावरुन आल्यावर कायतरी जीवाला शा॑त करनार॑ वाचाय मिळ॑ल.
10 Mar 2008 - 11:56 am | बेसनलाडू
मजा आली.
(वाचक)बेसनलाडू
11 Mar 2008 - 12:45 am | चतुरंग
तुमच्यातला विखारी आंदोलक पेंगायला लागून साहित्यिक जागा होतोय असे दिसते:))
इष्टाईल चांगली आहे. आणखी भरगच्च लिखाण येऊदेत.
चतुरंग
11 Mar 2008 - 12:48 am | प्राजु
तुमच्यातला विखारी आंदोलक पेंगायला लागून साहित्यिक जागा होतोय असे दिसते:))
चतुरंग.. हे एकदम सही..
- (सर्वव्यापी)प्राजु
11 Mar 2008 - 12:48 am | प्राजु
तुमच्यातला विखारी आंदोलक पेंगायला लागून साहित्यिक जागा होतोय असे दिसते:))
चतुरंग.. हे एकदम सही..
- (सर्वव्यापी)प्राजु
11 Mar 2008 - 1:14 am | इनोबा म्हणे
प्रतिसाद देणार्या आणि न देणार्या(तूमच्याकडं नंतर बघतो) सर्व मिपाकरी गाववाल्यांचे मनापासून धन्यवाद!
तुमच्यातला विखारी आंदोलक पेंगायला लागून साहित्यिक जागा होतोय असे दिसते:))
वर्मावर बोट ठेवायची तुमाला भारी खो ड बरं का रंगराव ...आणि प्राजू!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
11 Mar 2008 - 3:38 pm | केशवसुमार
प्रतिसाद देणार्या आणि न देणार्या ह्यो अमचा ओळ असा.. तुका ते रायल चहा का काय ते द्यवा लागेल रे इनोबा..काय समजले..
बाकी लेख एकदम फक्कड खरडलास हं.. अभिनंदन..
चालू द्या.. पण ते चहाच विसरु नको..
(रायल)केशवसुमार
11 Mar 2008 - 4:17 pm | इनोबा म्हणे
पण ते चहाच विसरु नको..
नाही विसरणार्.कधी येताय तेवढं बोला.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
11 Mar 2008 - 3:23 am | व्यंकट
मजेशीर आहे, संडासातली साहित्य सेवा तर झकास एकदम.
व्यंकट
11 Mar 2008 - 7:46 am | विद्याधर३१
प्रतिसाद देणार्या आणि न देणार्या(तूमच्याकडं नंतर बघतो) सर्व मिपाकरी गाववाल्यांचे मनापासून धन्यवाद
वा... मस्त.... अजुन एक येउद्या......
दिला प्रतिसाद सुटलो बुवा एकदाचे....
विद्याधर
21 Dec 2008 - 6:58 pm | सखाराम_गटणे™
मस्त मौज वाटली,
छानच आहे.
लिहीत जा, तुझे लिखान चांगले आहे.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 5:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आज जुने लेख वर उचकटून आणायची खोड कुणाला लागल्ये? देव त्याचं भलं करो, चॉईसतरी बरा आहे त्याचा!
इनोबा, आमी इथे पडीक होन्याआदी आपन फार्फार उत्तम लिखान करत होतात असं दिसतंय. तेव्हा आता पुन्हा एकदा जरा मनावर घ्या राव आन लिवा काहीतरी दनकून!
21 Dec 2008 - 5:18 pm | टारझन
इन्याचा हा लेख म्हणजे ओपणिंगला शेंचूरी आहे !!
रिकामा वेळ (चांगले) जुणे लेख उकरून वर काढायला बेष्ट आहे ,पण हल्ली कंपणी आमच्याकडून भरपूर काम करून घेते !!
इन्या तो गोरखपुरचा कृष्णाचा लेख कधी लोवतोय रे ? तात्याची रोशनी-६ णंतर प्रसिद्ध करीन अशी प्रतिज्ञा णकोस करू बाबा !!
- इनोफॅण ) इन्याडॉण
21 Dec 2008 - 5:21 pm | विनायक प्रभू
आमचे आण्खी एक भविष्य खरे झाले. आपणाला भेट्ल्यावर आपण एक निद्रिस्त ज्वालामुखी आहात. लवकरच स्फोट होणार असे भाकित होते. झाला. आण्खी हास्य लाव्हा येउ द्यात.
आपला कुड्मुड्या जोती शी
वि.प्र.
21 Dec 2008 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका, स्फोट आधीच झाला आहे. तुम्हाला आज दिसलाय!
अदिती ज्यो(ति)शी
22 Dec 2008 - 11:47 am | ब्रिटिश
बंगाली बाबा की जय हो !!!
ईस्फोट जाल्यानंतर भाकीत येतय राव (ह.झ्या.)
ईनोबाजी
>>>नेमकी मांजरेकर मावशींची मांजर आडवी गेली
लय भारी
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
21 Dec 2008 - 5:26 pm | विनायक प्रभू
आधी कधी लिखाण वाचल्याचे स्मरणात नाही. आणि लेखकाने पहिलटकरणी चा दुवा दिला आहे की.
21 Dec 2008 - 6:08 pm | यशोधरा
इनूभाव, मस्त लिहिले आहेस! जागा झालेला साहित्यिक परत पेंगलाय का सद्ध्या?? उठव त्याला लवकर!
21 Dec 2008 - 6:26 pm | शितल
बुध्दी एवढी सुपिक असताना साहित्यीक पिक घेणे का बरे थांबवलेस. :)
21 Dec 2008 - 10:01 pm | इनोबा म्हणे
>>आज जुने लेख वर उचकटून आणायची खोड कुणाला लागल्ये?
ह्म्म, पहायला हवं. असो.
प्रतिक्रीयांबद्दल डझनभर धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
22 Dec 2008 - 9:53 am | आनंदयात्री
हे आम्ही आधी वाचलेच नव्हते की !!
>>काल रात्रीपासून डोक्यात एक नवा कथानायक घोळ घालत होता,तेवढा झटपट लिहून काढावा म्हणून आज सकाळी जरा लवकरच उठलो
व्यक्तीचित्र का ? (लै खोडकर ब्वॉ तुम्ही !!)
>>नेमकी मांजरेकर मावशींची मांजर आडवी गेली,असल्या अंधश्रद्धा मी पाळत नाही.पण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले असल्यामूळे त्यांचे मन मोडवत नाही.पाच पाउलं >>मागे गेलो तर नेमका मागून येणा-या दोडके काकांना धक्का लागला.आधीच ऊसाच्या चिपाडासारखा दिसणारा तो कृश देह,सांडण्याच्याच
=)) =)) =))
येउद्या फुडला भाग !!
(फुडल्या भागात एखादी स्वादुरसाने थबथबलेली रेशिपी किंवा अश्रुत बुडालेली कविता खपवुन दाखवा राव!)
22 Dec 2008 - 11:48 am | मनस्वी
मजा आली वाचून.
22 Dec 2008 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
खुसखुशीत आणी झक्कास आहे बुव्वा डायरीचे हे पान ! आता बाकिच्या पानांवरचा मजकुर हि लवकरात लवकर येउ दे !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
22 Dec 2008 - 12:08 pm | अनिल हटेला
इनू भाउ ...
डायरी अपडेट करत रहा ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Dec 2008 - 3:10 pm | अवलिया
डायरी हरवली का?
(साला ज्यांच्या ज्यांच्या डाय-या हरवल्या आहेत त्यांच्याकडे पहायलाच हवे. तात्याला पहिले घ्यायचे की शेवटी हे ठरवतो अन सुरु करतो)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 7:14 pm | जयेश माधव
जयेश माधव
च्याआयला,एकदम झ्याक झाल॑ की हो!!
राव्,पुढ्च्या लेखाची वाट बघतोय.
2 Jun 2009 - 11:19 am | विजुभाऊ
अरे हे वाचलेच नव्हते मी........
काय मस्त लिहिले आहेस रे इन्या
डायरीचे एकच पान लिहुन बास का केलेस्......पुढचे पान येउ दे की
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही