पुन्हा पेशवाई?

विकास's picture
विकास in काथ्याकूट
10 Jul 2009 - 5:58 am
गाभा: 

काय चाललयं काय महाराष्ट्रात आणि ते ही पुंण्यात? पाण्याचे निमित्त करत पेशवाई आणायचा घाट घालणे चालले आहे असे वाटू लागले आहे...तसे वाटायचे कारण काय? आजच्या म.टा. मधील ही बातमी: पेशवाई पाणी योजना पुण्याला तारतील? आता ती बातमी पूर्ण तेथे वाचता येईलच पण नजरेखालून घालता यावेत म्हणून काही मुद्दे देत आहे:

पुणेकरांना प्रथमच पाणीकपातीला सामोरे जावे लागत असताना पेशवेकाळातील पाणीपुरवठ्याच्या योजनांचा शोध आता पालिकेने सुरू केला आहे. नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून शनिवारवाड्यापर्यंत, नाना फडणीस यांनी नऱ्हे आंबेगाव येथून नाना वाड्यापर्यंत, रास्ते सरदारांनी कोंढव्यातून रास्तेवाड्यापर्यंत आणि पेशव्यांचे बांधकाम कंत्राटदार रुपराम चौधरी यांनीही कोंढव्यातून पाणी आणले होते. या योजनांचा अभ्यास करून पुणेकरांवरील पाणीकपातीची नामुष्की टाळण्याचा उपाय इतिहास संशोधकांनी पालिकेला सुचवला आहे.
...
नानासाहेब पेशवे यांनी कात्रजहून शनिवारवाड्यापर्यंत आणलेल्या पाण्याच्या योजनेबाबत (नळ) १९१४ मध्ये ल. रा. गोखले यांनी अभ्यास करून तत्कालीन पुणे नगरपलिकेला प्रकल्प अहवाल दिला होता. या अहवालात त्यांनी या नळाचे महत्त्व आणि सद्यस्थितीविषयी माहिती दिली होती. तसेच योजनेची उपयुक्तता कशी वाढवता येईल, याच्या सूचना केल्या होत्या. १७४९-५० मध्ये हा नळ बांधण्यात आला. त्यावेळी २५ एकर जागा कात्रजच्या तलावाने व्यापली होती. तसेच पाच मैल लांबीचा हा नळ होता. या तलावात गाळ खाली बसून स्वच्छ पाणी पुढे जाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. नळामध्ये हवा खेळती राहाण्यासाठी बांधलेल्या उस्वासातून गाळ काढता येतो, असे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.
....
नाना फडणीस यांनी १७७२ मध्ये आंबेगाव येथून नानावाड्यापर्यंत नळ आणला होता. या योजनेचे अनेक दिवस काम सुरू होते. त्यासाठी सुभेदार नारो अप्पाजी यांनी २१ हजार २७० रुपये खर्च केल्याची नोंद सापडते. या योजनेचाही अभ्यास करता येईल, असे ते म्हणाले.
...
सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी १७७८ मध्ये कोंढवे गावातून एका पाटलाच्या जमिनीतून नळ घालून पुण्यात रास्ते वाड्याजवळ पाणी आणले होते. या नळाचे पाणी इंग्रजांनी लष्करासाठी वापरले होते. त्याबदल्यात सरदार रास्ते यांना पाच हजार गॅलन शुद्ध पाणी देण्याचा करार इंग्रजांनी केला होता. या योजनेबाबत संशोधनकरून पाण्याचा मार्ग काढता येऊ शकेल, असे बलकवडे यांनी सांगितले.
....

मला सांगा याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पेशवाईमधे काय झाले हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, फारतर त्यात भर अभिषेक (देवघरातील अथवा देवळातील देवावर, बच्चन नाही!)... नाना फडणविसाने तर काय फक्त बावनखणीतच आयुष्य काढले त्याला कसला आलाय वेळ आंबेगावाहून नानावाड्यापर्यंत नळ आणायला?

प्रतिक्रिया

सहज's picture

10 Jul 2009 - 6:08 am | सहज

प्रक्षोभक शिर्षक :-)

अवांतर - दुसर्‍या बाजीराव संबधी हा एक लेख जरुर वाचा.

मिसळभोक्ता's picture

10 Jul 2009 - 6:10 am | मिसळभोक्ता

घरी पाणी असेल तर नाना बावनखणीत कशाला जाईल ?

-- मिसळभोक्ता

सुहास's picture

10 Jul 2009 - 7:25 am | सुहास

अहो पण, हे पाणी सध्या वापरण्यायोग्य नाही असा रिपोर्ट आहे.. मनपाने कुठेतरी याला मैला वाहून नेणारी पाईप जोडलीयते..."लोकसत्ता" म्हणते... (नक्की दुवा सापडत नाही.. मिळाल्यास देईन..)

आनंदयात्री's picture

10 Jul 2009 - 7:54 am | आनंदयात्री

हा हा हा !! लै भारी विकासराव .. शेवटचा पॅरा वाचुन हहपुवा.

पाषाणभेद's picture

10 Jul 2009 - 8:41 am | पाषाणभेद

केवळ २१ हजार २७० रुपये खर्च होत असतील तर मनपा ने सुभेदार नारो अप्पाजी यांना काँन्ट्र्याक्ट का दिले नाही अजून? नक्कीच यात काहीतरी पैसे खाण्याचा डाव दिसतो आहे.

मला तर यात काँन्ट्र्याक्टर सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांची व स्रि. नाना फडणीस यांची हातमीळवणी झाली असल्याची खबर मनपा चे आयूक्तांच्या खाजगी सचीवाच्या घरी काम करणार्‍या बायकोच्या धाकट्या बहीणीने सारसबागेत संध्याकाळी आम्ही फिरावयास गेलो होतो तेव्हा सांगीतले होते हे आठवते.

हेच मी सकाळला सांगीतले होते व त्यांनी तिसर्‍या पानावर छापले पण होते. (पहा:''लाल्या पुन्हा शाकाहारी झाला' या बातमीशेजारची बातमी. शेजारी नसा टणक ( आपले कडक हो. ) होण्याची जाहीरात आहे. )

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.

मनपा प्रेमी - व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विकास's picture

10 Jul 2009 - 9:10 am | विकास

=))

याला म्हणतात जागृक नागरीकाचे कर्तव्यपालन! लगे रहो!

अवलिया's picture

10 Jul 2009 - 9:12 am | अवलिया

हा हंत ! हा हंत !
अतिशय दुर्देवी बातमी आहे.
यामुळे देश एकविसाव्या शतकात जात नसुन मनुवाद्यांच्या ताब्यात गेला आहे हे अतिशय शरमेची गोष्ट आहे. मी मनापासुन धिक्कार करतो !!

सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवतो, मोठा प्रतिसाद झाल्यास लेख स्वरुपातच टाकतो.

(पुरोगामी) अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विजुभाऊ's picture

10 Jul 2009 - 9:46 am | विजुभाऊ

एकुणच अवांतर धागा...........................
यातून कोणाला कसला बोध अथवा मनोरन्जन झाले असेल असे वाटत नाही. हे असले लिखाण उदंड झाले. कन्टाळा आला य आता या असल्या निरर्थक लिखणाचा
एकूणच इतिहासाकडे खास करून पुण्याच्या इतिहासाकडे पहाण्याचा तथाकथीत प्रदूषीत पुरोगामी दृष्टीकोन ठळकपणे जाणवतो.

विशाल कुलकर्णी's picture

10 Jul 2009 - 10:04 am | विशाल कुलकर्णी

काय ते धागे आणि काय ते प्रतिसाद? कंटाळा आला या सर्वांचा!
तात्या, मिपाचा मुळ उद्देश भरकटल्यासारखा नाही वाटत या असल्या निरर्थक धाग्यांमुळे?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

अ-मोल's picture

10 Jul 2009 - 10:30 am | अ-मोल

मराठेशाहीकडून काही बोंब पडली नाही
त्यामुळे पेशवाईचा आसरा घ्यावा लागला.
येता जाता पेशवाईच्या नावाने खडे फोडणार्यांना
फक्त नानाचा भोगविलासच दिसतो हे दुर्दैव.
एकूणच सर्वत्र झुंडशाहीचे दिवस आहेत.
मिपा तरी याला अपवाद कसे असेल?

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 11:17 am | नितिन थत्ते

>>मराठेशाहीकडून काही बोंब पडली नाही
>>त्यामुळे पेशवाईचा आसरा घ्यावा लागला.

आम्हाला वाटत होते पेशवाई हा मराठेशाहीचाच भाग होता. पण ते वेगळे होते असे दिसते. :?

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

अ-मोल's picture

10 Jul 2009 - 11:32 am | अ-मोल

मराठेशाहीचाच भाग होता.
पण मराठेशाहीलाच पेशवाई अस्पृश्य वाटू लागली हे सर्वज्ञात आहे.

कपिल काळे's picture

10 Jul 2009 - 11:33 am | कपिल काळे

लय भारी हो विकासराव. मस्त धागा.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2009 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

श्श्या !!
मुड ऑफ झाला साला @!@#!@$!$

मला वाटले पेशवाई क्रिएशन मधल्या बायकांचे फोटु वगैरे डकवले असतील. तर कसले काय ??

ह्या 'अविकसीत' धाग्याच निषेध.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 5:30 pm | नितिन थत्ते

=))

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 6:15 pm | लिखाळ

दोनदा हसायला आले :)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 6:13 pm | लिखाळ

मला वाटले पेशवाई क्रिएशन मधल्या बायकांचे फोटु वगैरे डकवले असतील. तर कसले काय ??

ही ही ही :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विकास's picture

11 Jul 2009 - 1:36 am | विकास

ही ही ही :-)

छॅ! आता "लिखाळा आवडे विनोद" असे म्हणायची वेळ आली...कुठे चाललयं हे सगळं? ;)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 6:09 pm | लिखाळ

मजेदार. वरती अमित अभ्यंकर म्हणतात ते विचार करण्यासारखे. जेवणावळींसाठी पाण्याची व्यवस्था केली असे असावे. :)

महत्वाच्या विरंगुळ्यात कमी महत्वाची माहिती :) -
पुण्यात कात्रज पासून आलेल्या भूअंतर्गत नळांतून जे उच्छ्वास आहेत त्यावरच बहुधा बदामी हौद, काळा हौद, पुष्करिणी (?) इत्यादी आहे अशी माझी लहानपणासूनची माहिती आहे. खरी खोटी पेशवे जाणोत !
तसे असेल तर त्या पाण्याचा उपयोग जनसामान्यांच्या घरातील जेवणावळीत सुद्धा होत असावा :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2009 - 7:05 pm | llपुण्याचे पेशवेll

लिखाळराव खरे आहे तुमचे म्हणणे.. काळा हौद, फडके हौद, बदामी हौद, पुष्करणी इ. २७ हौद पुण्यामधे होते. त्यातील काळा हौद, फडके हौद(विठ्ठलदास नारायणदास सुगंधी हे दुकान ज्या इमारतीत आहे त्याच्याखाली) इ. अजूनही आहेत. त्यात अजूनही ते पाणी अखंड चालू आहे. तसेच शनिवारवाड्यातल्या विहीरीत (ज्यात भुयारासारखा एक बोगदा दिसतो) देखील एक नळ येतो.
जनसामान्यांसाठीच त्या उच्छावासांवर हौद बांधले होते. सरदारांच्या वाड्यात हे पाणी वेगळे नळ हौदापासून काढून वाड्यांमधल्या विहीरीत नेऊन सोडले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विकास's picture

10 Jul 2009 - 7:28 pm | विकास

"नळ स्टॉप" आणि या सगळ्या नळांचा काही संबंध आहे का?

(वरील प्रश्न माहीतीसाठी विचारला आहे, विरंगुळा म्हणून नाही, तेंव्हा कृपया, तो वाचून विनोद समजून हसू नये :) )

टारझन's picture

10 Jul 2009 - 8:17 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आगायाया !! हसल्याबद्दल सॉरी शक्तिमान !!!

(वरील प्रश्न विकास ह्यांनी माहीतीसाठी विचारला आहे, विरंगुळा म्हणून नाही, तेंव्हा कृपया, तो वाचून विनोद समजून हसू नये ,गंभीर समजून हसू शकता असा सुचक इशारा दिल्याचं सुज्ञांच्या लक्षात आलंच असेल ;) )

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2009 - 8:35 pm | llपुण्याचे पेशवेll

नळ स्टॉप आणि नळाचा संबंध आहे. नळस्टॉपच्या चर्चच्या दरवाजाजवळ कुठेतरी एक मोठे नळ कोंडाळे होते. किर्लोस्करांच्या कोथरुडच्या फॅक्टरीत सायकलींवरून जाणारे कामगार त्या कोंडाळ्यावर पाणी प्यायला थांबत. त्याच्याच आसपास कुठेतरी फिनोलेक्सची पण फॅक्टरी पूर्वी होती. तेथील कामगारही या नळ स्टॉपवर पाणी प्यायला थांबत. तूर्तास इतकी माहीती आहे. पुढील माहीती मिळवून सांगीन.
पण हा नळस्टॉप पेशवेकालीन नाही :) अलिकडचा आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

Nile's picture

10 Jul 2009 - 11:58 pm | Nile

सहमत आहे. मी ही असे ऐकुन आहे. त्यावेळी नळ स्टॉप पुढे पुणे नव्हतंच.

कर्वे राहायचे पण ते पायी जायचे, म्हणुनच तो कर्वे रोड. :)

लिखाळ's picture

10 Jul 2009 - 8:24 pm | लिखाळ

पुण्याच्या पेशव्यांनी तत्परतेने उत्तर दिले त्याबद्दल आभारी आहे.
मराठीच्या पुस्तकात जुन्या बखरीमधला एक धडा होता असे अंधुक आठवते आहे. त्यामध्ये कात्रज येथील तलाव पाणीपुरवठ्यासाठी निवडला त्याची कथा होती. काही दिवस सतत त्या तलावातले पाणी उपसून तो पुन्हा किती जलद वेगाने भरतो आहे अश्या तर्‍हेची परिक्षणे करुन मगच तो वापरासाठी घेण्याचे ठरवले. मग त्यातून नळ काढले, उच्छ्वास काढले इत्यादी.

कात्रज तलावाचे वैशिष्ठ्यापूर्ण बांधकाम.
हा लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीमधला कात्रज तलाव कसा बांधला, गाळ खाली बसण्यासाठी काय योजना केली वगैरे वर्णकरणारा लेख वाचा. लेख बरीच माहिती देणारा आहे.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

Nile's picture

10 Jul 2009 - 11:55 pm | Nile

खरी खोटी पेशवे जाणोत !

खरंच पेशवे जाणतात की! पहा त्यांनी उत्तर दिलेच ;)

नीधप's picture

10 Jul 2009 - 6:15 pm | नीधप

>>पेशवाईमधे काय झाले हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, फारतर त्यात भर अभिषेक (देवघरातील अथवा देवळातील देवावर, बच्चन नाही!)... नाना फडणविसाने तर काय फक्त बावनखणीतच आयुष्य काढले त्याला कसला आलाय वेळ आंबेगावाहून नानावाड्यापर्यंत नळ आणायला?<<

थोडासा अभ्यास केलात तर तुमच्या विधानातला फोलपणा तुम्हालाच लक्षात येईल.

नाना फडणविसाने कात्रजहून पुण्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या योजना राबवल्या होत्या ही कागदोपत्री पुराव्यानिशी माहीत असलेली बाब आहे.

कधीतरी भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन वाचा संदर्भ. कधी मनातली जळमटं सारून जमलं तर निनाद बेडेकरांशी चर्चा करा या विषयावर. थोडा उजेड पडेल.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अवलिया's picture

10 Jul 2009 - 6:22 pm | अवलिया

हा हा हा
प्रतिसाद आवडला. ;)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 10:09 am | विशाल कुलकर्णी

नीधप यांच्याशी पुर्णपणे सहमत.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

विकास's picture

10 Jul 2009 - 6:44 pm | विकास

>>कधीतरी भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन वाचा संदर्भ. कधी मनातली जळमटं सारून जमलं तर निनाद बेडेकरांशी चर्चा करा या विषयावर. थोडा उजेड पडेल.<<

तुमचा वरील मुद्दा (जो विस्तारलेला नाही, फक्त दुव्याविना संदर्भ आणि तज्ञाचे नाव सांगितले आहे), तो मला जे काही अधोरेखीत करायचे आहे त्याच्या बाजूने आहे की विरुद्ध हे न समजल्याने मी अगदी confused झालो आहे. 8|

ते एकदा कळले की मग जळमटे कुठे आहेत आणि ती कशी काढायची ते ठरवता येईल. :-)

नीधप's picture

10 Jul 2009 - 9:42 pm | नीधप

तुमच्या वाक्यांना फोलपणाची वाक्ये म्हणल्यावरही तुम्हाला कळलं नाही का?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विकास's picture

10 Jul 2009 - 9:57 pm | विकास

तुमच्या वाक्यांना फोलपणाची वाक्ये म्हणल्यावरही तुम्हाला कळलं नाही का?

नाही कळलं. फक्त तुम्ही नीट वाचून उत्तर दिले नाही इतके मात्र जरूर कळले. असो.

Nile's picture

11 Jul 2009 - 12:00 am | Nile

हा हा हा!

विकास रावांची फजीती झाली की! असो! ;)

सुनील's picture

10 Jul 2009 - 7:07 pm | सुनील

मिपाकरांच्या विनोदबुद्धीबद्दलच्या माझ्या कल्पना फारशा अवास्तव नव्हत्या तर!!

असो, चालू ध्या!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

10 Jul 2009 - 7:12 pm | सहज

नीधप, विशाल व इतर

अरे बाबांनो विकासराव पर्यावरण / पाणी या क्षेत्रात काम करतात. नुस्ती मटाची रंजक बातमी फक्त दुवा द्यायच्या ऐवजी अशी धमाल केली. विरंगुळा ह्या सदराखाली ही बातमी आहे हे बहुदा वाचले नसावेत.

फ्रायडे अफ्टरनून सिड्रोम म्हणुन आता तरी चालवून घ्या. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2009 - 7:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव, तुमच्या कमेंट्समुळे मजा आली वाचायला!

जर हे नळ, पाणीयोजना पुन्हा वापरात आणायचे असतील तर, आता त्या नळांवर जी बांधकामं असतील त्याचं काय?

नीधप's picture

10 Jul 2009 - 9:29 pm | नीधप

हा आयडी अमुक तमुक क्षेत्रात काम करतो असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे ते कळायचा काही संबंध नाही. बर त्या क्षेत्रात काम करतो हा आयडी म्हणजे त्यांनी जी विधाने केली आहेत ती योग्य हे गणित काही कळलं नाही. विरंगुळा या सदराखाली का होईना एकाच पद्धतीने पेशवाईबद्दल बोंब मारण्याची तशीही फॅशन आहेच त्यामुळे आमचा गैरसमज (खरंच गैरसमज की काय कोण जाणे!) होणे शक्य आहे.

तुम्ही लोक एक करत जा आपापसातल्या या सो कॉल्ड चर्चांच्या धाग्यावर लिहीत जा वरती की इथे बोलणारे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो त्यामुळे आम्ही आमच्यापुरतं बोलणार आहोत. इतरांनी मधे यायचं कारण नाही. म्हणजे काय की मग असल्या धाग्यांकडे आम्ही ढुंकूनही बघणार नाही.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

च्यामारी १५० वर्ष झाली पेशवाई जाउन तरी पेशव्यांच्या नावाने खडे फोड्ण चालुच आहे.

त्यान्नी १५० वर्ष पुर्वी डोक लावुन आख्या पुण्यात पाणी आणल, तुम्ही खुप नाही पण निदान थोड डोक लावुन निदान तुमच्या परीसरात तरी पाणी आणा आणी मग पेशव्यांना बोला..

उगाच आपल वाटेल ते बोलायच..इकडुन तिकडुन धागे आणायचे आणी छापायचे...

सूहास's picture

10 Jul 2009 - 8:35 pm | सूहास (not verified)

<<<च्यामारी १५० वर्ष झाली पेशवाई जाउन तरी पेशव्यांच्या नावाने खडे फोड्ण चालुच आहे. >>>
खडे कसे फोडतात...? ते ह्या॑ना http://www.misalpav.com/user/2692 विचारा..

<<<त्यान्नी १५० वर्ष पुर्वी डोक लावुन आख्या पुण्यात पाणी आणल>>>
डोक का नळ लावुन...

<<<थोड डोक लावुन निदान तुमच्या परीसरात तरी पाणी आणा >>>
ते कस लावणार बुवा....

सुहास
(खदान-कामगार)

नितिन थत्ते's picture

10 Jul 2009 - 7:44 pm | नितिन थत्ते

विकासच्या या धाग्यावर पूर्णपणे अनपेक्षित प्रतिसाद पाहून करमणूक झाली.
(मी जनरली 'जुने जाउ द्या मरणालागुनी' म्हणणारा. पण लेख वाचताच उपहास हा उद्देश लक्षात आला होता. त्यामुळे त्यावर प्रतिसाद दिला नाही. पण आता राहवले नाही)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 8:46 pm | चतुरंग

==-०-०>
(हा मिपाकरांच्या विनोदबुद्धीला घातलेल्या साष्टांग नमस्काराच्या स्माईलीचा टॉप व्यू आहे!)

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jul 2009 - 12:10 am | llपुण्याचे पेशवेll

हाहाहाहाहाहा.....सही आहे स्माईली..
(:)) हा गालावर हात ठेऊन अय्या खरंच असे म्हणणारा स्माईली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

चंबा मुतनाळ's picture

11 Jul 2009 - 5:07 am | चंबा मुतनाळ

स्मायली एकदम शेप मधे आहे!
o-o

हरकाम्या's picture

10 Jul 2009 - 9:01 pm | हरकाम्या

विकासराव आपण दहावित ईतिहासात नापास झाला होता काय

परवाच त्यांची परीक्षा घेतली मी, अजून अभ्यास करा म्हटलं.
बघूया आता ऑ़क्टोबरला बसतील पुन्हा!! ;)

चतुरंग

विकास's picture

10 Jul 2009 - 10:03 pm | विकास

परवाच त्यांची परीक्षा घेतली मी, अजून अभ्यास करा म्हटलं. बघूया आता ऑ़क्टोबरला बसतील पुन्हा!!

तुम्ही मला प्रॉमिस केले होते की कुणाला सांगणार नाही म्हणून? >:P

हरकाम्या's picture

11 Jul 2009 - 11:01 pm | हरकाम्या

सरकारने आता A.T.K.T. दिलेली आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचेकारण
नाही .

अवलिया's picture

10 Jul 2009 - 10:50 pm | अवलिया

वा! मस्त !!
विचारप्रवर्तक धाग्याबद्दल विकास यांचे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

(हा प्रतिसाद फक्त जवळच्या मंडळींसाठी आहे, बाकीच्यांनी वाचु नये)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

ऋषिकेश's picture

10 Jul 2009 - 11:40 pm | ऋषिकेश

हा हा हा!!
लेख वाचून हसत होतो.. खालील काहि 'विषेश' प्रतिक्रीया वाचून फुटलोच
=)) =))

विकासराव, बोला असला धागा (आम्ही एकमेकांना ओळखत्तो असे न लिहिता) काढणार का परत? :) ;)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

अवलिया's picture

10 Jul 2009 - 11:48 pm | अवलिया

असला सोडा हो... गंभीर धागा काढायची पण हिम्मत होणार नाही त्यांची काही दिवस... :)
मग काही खास ओळखीच्या लोकांच्या आग्रहाखातर काढतील ते धागा.. पण वरती नीट लिहितील... गंभीर की उपहास ते ;)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विकास's picture

11 Jul 2009 - 12:11 am | विकास

असला सोडा हो... गंभीर धागा काढायची पण हिम्मत होणार नाही त्यांची काही दिवस...

उगाच वेडी आशा बाळगू नका ;) खरे झाले नाही तर लोकं तुम्हाला अंधश्रद्ध ठरवतील :-)

बाकी विरंगुळ्याचा "विनोद" कसा होवू शकतो हे मात्र नक्कीच समजले!

पक्या's picture

11 Jul 2009 - 7:46 am | पक्या

>>बाकी विरंगुळ्याचा "विनोद" कसा होवू शकतो हे मात्र नक्कीच समजले!

ह्या धाग्यात काय विरंगुळा आहे ते काही समजले नाही ब्वॉ.

विकास's picture

11 Jul 2009 - 1:03 am | विकास

विकासराव, बोला असला धागा (आम्ही एकमेकांना ओळखत्तो असे न लिहिता) काढणार का परत?

अहो लेखन हे प्रकट असते. कोणीही वाचा, वाचू नका, त्यावर हवे ते प्रतिसाद द्या... मात्र खरडवही ही ओळखत असलो तरच लिहायला वापरावी असे मात्र वाटते. त्यातविचार करा, जर एखाद्या लॉगईन नाव पुरूषाचे असलेल्याने व्यक्तिने एखाद्या लॉगईन नाव स्त्रीचे असलेल्या व्यक्तीच्या खरडवहीत अरेरावीने लिहीले तर काय म्हणले जाते/जाईल? आता तसेच उलटेपण होऊ शकते. नियम सर्वांना सारखे असावे असे किमान तुमच्या सारख्या पुरोगामी व्यक्तींना तरी नक्की पटेल अशी खात्री आहे. ;) .

थोडक्यात, माझे नवीनच लेखन येथे येईल... काळजी नसावी का असावी हे तुमचे तुम्ही ठरवा :-)

Nile's picture

11 Jul 2009 - 12:04 am | Nile

लई लई मजा आली वाचुन. =)) =)) =))

विकास राव जिओ!

काही प्रतिसाद म्हणजे अगदी Epic Fails आहेत! ;). (रसिकांनी shimpentoffail.com बघायला हरकत नाही ;)

धनंजय's picture

11 Jul 2009 - 1:33 am | धनंजय

एकदम खुसखुशीत :-)

क्षणभर घाशीराम कोतवाल या नाटकाचा अंधुक संदर्भ लागला. पुण्याच्या समृद्धतेने दूरदूरहून कोणीच आकर्षित होत नव्हते, आणि पुण्याची दौलत शून्य होती अशी काही सुरुवात होती. (अशीच सुरुवात आहे ना - कोणाला आठवते आहे का?)

मग "जाने भी दो यारों" नावाचा चित्रपट मनात आला. लहानपणी तो बघून मुंबईतले सरकार आणि बिल्डर १००% भ्रष्ट, ०% कार्यक्षम असल्याचा समज मला झाला होता. मुंबईत एकूणएक फ्लायओव्हर कोसळले होते असे चित्रपटात दाखवले होते. मग मुंबईत एकदा गेलो तेव्हा उभे असलेले कित्येक फ्लायओव्हर दिलले. चित्रपटातले मुंबईविषयी अज्ञान किती गाढ होते ते तेव्हा लक्षात आले. या चित्रपटवाल्यांना मुंबईच्या महापौरांना-बिल्डरांना हीनच करून दाखवायचे असते - चांगले काही काम बघायची दृष्टीच नसते. हा गमतीदार धागा बघून त्या विचित्र हास्यास्पद चित्रपटाची आठवण आली. पुन्हा हसलो.

नीधप's picture

11 Jul 2009 - 9:01 am | नीधप

श्रीयुत विकास हे इथलं जगप्रसिद्ध आणि महान व्यक्तिमत्व असल्याचं मला माहीत नसल्याबद्दल त्यांची व त्यांच्या चाहत्यांची मी माफी मागते.
त्यांनी लिहिलेले कुठले लेखही मी वाचले नसल्याबद्दलही क्षमस्व.
तसेच त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला केवळ वा वा छान छान असेच म्हणायचे असते हा नियमही माहीत नसल्याबद्दल क्षमस्व.
मूळ पोस्टमधली शेवटची वाक्ये मला फोलपणाची वाटली आणि त्याच्या बरोबर विरूद्ध माहीती माझ्या वाचनात आलेली होती ही पण माझीच चूक आहे.
या धाग्याच्या मूळ पोस्टमधे उपहास, विनोद इत्यादी काय काय ठासून भरलेले आहे जे बघायची दिव्यदृष्टी माझ्याकडे नाही त्याबद्दलही क्षमा.
इथे वाद होऊ नये म्हणून लिहिलेल्या खरडीला तुम्ही अरेरावी म्हणता म्हणजे ते तसेच असणार कारण आपण एवढे महान व्यक्तिमत्व आहात.

झालं समाधान?

मिसळभोक्ता's picture

11 Jul 2009 - 9:16 am | मिसळभोक्ता

आजवर मिसळपावावरचा हा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.

अज्जुकांचा विजय असो.

फोलपणाअचा विजय असो.

विरंगुळ्याचा विजय असो.

घाटपांड्यांनी ह्याविषयी लेख लिहावा अशी त्यांना विनंती.

-- मिसळभोक्ता

खालिद's picture

11 Jul 2009 - 11:24 pm | खालिद

पानिपत चं चौथं युद्ध आता चालू होणार तर

घाटपांडे काका वाचताय ना?

आणि हे आमच्यावर प्रतिसाद लिहीणारे नजीबखान!!!

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2009 - 4:16 pm | प्रकाश घाटपांडे

पानिपत चं चौथं युद्ध आता चालू होणार तर

ईकासरावांच्य ध्यानीमनी नसतानी हे चौथ युद्ध. आमाला काय ही भानगडच कळानी ब्वॉ. पन मुळ पोष्ट पेक्षा प्रतिसादच भारी !
चालुऽ दे चालूऽ देत काय गो तुझा हा नखरा- नाना
श्री गणराय नर्तन करी आमी पुन्याचे बामन हरी
(घाशीराम कोतवाल)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 12:11 pm | श्रावण मोडक

दंगा पाहून छान करमणूक झाली. आणि इतिहासाविषयी नव्याने काही दृष्टिकोन मिळाले. म्हणजेच ज्ञान आणि रंजन असा दुहेरी हेतू आज मिपाने साध्य केला म्हणता येईल. :)

प्रियाली's picture

12 Jul 2009 - 4:41 pm | प्रियाली

इतिहास, इतिहासाची पुनरावृत्ती, इतिहासातून काही नवे शिकण्याची वृत्ती ;) आणि या धाग्याला आता आलेले ७१ प्रतिसाद वाचून धन्य वाटले.

ऍडीजोशी's picture

13 Jul 2009 - 11:14 am | ऍडीजोशी (not verified)

पेशवाईच्या नावाने खडे फोडणार्‍यांची कीव कराविशी वाटते. पेशवाईत फक्त जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, इत्यादी बेसलेस विधानं करणार्‍यांसाठी ही माहिती.

सदर भाग एक मिपाकर आणि माझा मित्र सौरभ वैशंपायन ह्याने लिहिलेल्या 'आम्ही चित्पावन' या लेखातील आहे. त्याच्या ब्लॉगवरून इथे कॉपी पेस्ट करतोय. कारण शाळेतली इतिहासाची पुस्तकंही न वाचणारे ब्लॉग वरचा लेख शोधून वाचतील अशी अपेक्षा नाहिये. आता पुन्हा ब्राम्हणानेच ब्राम्हणाची स्तुती करावी असा बिंडोक सूर ज्यांना आळवायचा असेल त्यांनी तो ब्लॉग बघावा त्यात संदर्भ कुठून कुठून घेतले त्याची यादी दिली आहे. (www.sahajsuchalamhanun.blogspot.com)

बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदय्पुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.

दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द गढीत बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.

या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.

चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.
बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.

बाजीरावाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खर्‍या अर्थाने शहराचे रुप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरुन बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणुन यानेच "कात्रज" वसवले.
नानासाहेबाने खर्‍या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे."

बाजीरावापासुन राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटुन काढले. सदाशिवराव भाऊ ने हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करुन सोडले. दिल्लीचे सिंहासन मरठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क पेशव्यांनीच प्रस्थापित केला. इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते - मराठी घोडे ज्या मार्गाने अटकेवर चालुन गेले आज बरोबर त्याच्या अलीकडचा भाग "हिंदुस्थान" आहे. बाकीचा "पाकीस्तान", एखाद्या घटनेचे खुप दुरवर कसे पडसाद उमटतात याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे.

नीधप's picture

13 Jul 2009 - 12:00 pm | नीधप

आदी,
काही उपयोग नाही. हे लोक असं बोलणार आधी आणि मग मी तर उपहासाने म्हणत होतो अशी पलटी मारणार. आणि तुम्हालाच मुर्खात काढायचा प्रयत्न करणार.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ऍडीजोशी's picture

13 Jul 2009 - 12:15 pm | ऍडीजोशी (not verified)

जाऊ दे गं. त्यांनी नंतर काहिही म्हटलं तरी त्यांच झापड लाऊन पहाणं आणि बुद्धीमांद्यत्व लपून थोडंच रहाणार.

नितिन थत्ते's picture

13 Jul 2009 - 12:47 pm | नितिन थत्ते

विकासरावांचा लेख उपहासात्मक असल्याचे (सुरुवातीसच) लक्षात आल्याने काही सिरिअस प्रतिसाद दिले नव्हते.
पण इथे पेशवाईचा मुद्दा घेऊन बरेच सिरिअस लेखन होत आहे ते पाहून खराटा हाती घ्यावा काय असा प्रश्न मनात आला. :?

नितिन थत्ते