इथे पुष्क्ळ लोक फार्मा कंपन्यांशी रिलेटेड ज्ञानी लोक आहेत असे दिसले...
माझ्या मनात अनेक दिवस शंका होत्या...त्या मला फेडायची संधी मिळते आहे...( एक भीती वाटत आहे, प्रश्न कदाचित बावळट असतील... असूद्यात... थोडी थट्टा करा पण उत्तरे द्या म्हणजे झाले..)
माझ्या प्रश्नांची पार्श्वभूमी...
मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे, गेली १० वर्षे प्रॅक्टीस करत आहे.. ९९ % वेळा औषधे देतो ती ५ दिवसांच्यावर नसतात...फारतर एखाद-दुसरा दिवस अजून...
(म्हणजे वर्षानुवर्षे सतत दिल्या जाणार्या रक्तदाब, दमा, मधुमेह , संधीवात यावरच्या औषधांसारखे नसते ) आणि आम्ही दातावर सर्जिकली काही उपचार करेपर्यंत नुसत्या फक्त गोळ्या औषधे यांचा फार कमी उपयोग असतो, सर्वसामान्यपणे दातांवर केल्या जाणार्या उपचारांना पूरक म्हणूनच आम्ही औषधे देतो.... मी वैयक्तिकरित्या ही गोष्ट कटाक्षाने पाळतो की अत्यावश्यक औषधे तेवढीच पेशंटला दिली जावीत...
काही शंका..
१. सुमारे १९९९ साली एक रोफेकॉक्सिब नावाचे औषध बाजारात दाखल झाले, ते अगदी वंडर ड्रग असल्यासारखा त्याचा उदो उदो झाला, सगळ्या दुनियेने ते काही वर्षे वापरले, आम्हीही सुखाने वापरले , कधीही कोणाही पेशंट ला त्रास झाला नाही, मग एकदम त्याविषयी ऐकू यायला लागले की त्यामुळे कोरोनरी हार्ट डिसीज वाढत आहे....त्याविषयी अधिक वाचन केले तर कळले की खरेतर त्याच्या क्लिनिकल ट्रायल चालू असतानाच त्यावर हे सगळे आक्षेप असतानाही ते तसेच बाजारात आणले गेले आणि एफ डी ए ने ही त्यावर वेळेत ऍक्शन घेतली नाही म्हणून अजून काही वर्षे ते चालले.... आता यात नक्कीच कंपनीचा फायदा असणार, पेशंट मेले तर गेले उडत असा द्रुष्टीकोण पाहून आम्ही हादरलो होतो....आता हेच विषासमान औषध आम्ही काही काळ वापरले हा विचार मनात आला की फार वाईट वाटते ( तरी आम्ही बरे ५ दिवस देणार फार तर... ऑर्थॉपेडिक लोक तर महिनोन्महिने ही ...अरे देवा.....).
.......त्यानंतर " क्लिनिकल ट्रायल " " सेफ्टी ऑफ ड्रग " वगैरे मोठे मोठे शब्द आम्ही चिमूट्भर मिठासोबत स्वीकारतो....
२ निमेसुलिड नावाच्या औषधाचेही तसेच..... आधी गवगवा, अनेक वर्षे चालले, मग एकदम त्यावर बॆन करा अशी मागणी , त्याचे अनेकानेक साईड इफ़ेक्ट्स यांच्या चर्चा.... त्या गदारोळाच्या काळात आम्ही ते औषध बंद केले... इंटर्नेट वर तर इतकी उलट सुलट माहिती त्या काळात वाचली, की डोके काम करणे बंद झाले...आम्ही आपली इतर जुनी औषधे वापरत राहिलो... नंतर असे समजले की प्रतिस्पर्धी कंपनीने तो उडवलेला धुरळा होता, त्यांचे प्रॊडक्ट लॊंच होईपर्यंत..खरे खोटे ईश्वराला ठाउक... त्या काळात एन्डीटीव्ही न्यूज वर वी दी पीपल नावाचा बरखा दत्त चा कार्यक्रम असायचा त्यात निमेसुलिड वर तावातावाने चर्चा ऐकल्या पण एकूण अर्थबोध / निर्णय काहीच झाला नाही... . इतक्या क्लिनिकल ट्रायल घेऊनही असले गोंधळ का उडतात?
३. जेनेरिक असा उल्लेख केला जाणारी औषधे म्हणजे औषधच्या मूळ नावाने विकली जाणारी औषधे ना ?..
(While generic drugs may be cheaper than brand-name drugs, they aren't inferior. In fact, they're "bioequivalent." हे वाक्य बरोबर आहे का? ).... स्वस्त मिळणारी जेनेरिक औषधे दर्जाने तीच असतात काय? ही जेनेरिक औषधे मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्तात मिळतात काय? ही औषधे मी प्रिस्क्राईब केली तर त्यात पेशंट चे भले आहे काय?
प्रतिक्रिया
7 Mar 2008 - 2:43 am | कोलबेर
१. व्हायॉक्स (रोफेकॉक्सीब) ने खूपच गदारोळ उडवला होता.मर्क नावाच्या प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने हे औषध बाजारात आणले होते. एखादे औषध बाजारात आणण्यापूर्वी औषध कंपन्यांचा ते औषध अनेक फेजेस मधून बर्याच कसोट्यांमधून न्यावे लागते. ह्यातल्या काही चाचण्यांमध्ये मर्कने गडबड केली होती असे ऐकले होते. एखाद्याला डॉक्टर बनण्यासाठी जसे खूप कष्ट आणि परिक्षा पास व्हाव्या लागत असल्या तरी एखाद्या धनाढ्य बापाचा मुलगा आपल्या बापाचे वजन वापरुन ह्या परिक्षा उत्तिर्ण होतो तसेच काहीसे व्हायॉक्स चे झाले असावे. बहुतांश डॉक्टर हे सगळ्या परिक्षा कष्टाने उत्तिर्ण झाले असले तरी एखादा असा डॉक्टर असतोच.
२. निमुसुलाइड ह्या औषधाच्या वादाला अंत नाही. तरी इतकेच सांगू शकतो की ह्या औषधाला पाश्चात्य देशांमध्ये कुठेही मान्यता नाही. (ह्याचा अर्थ ते गुणकारी नाही असे नाही)
३. While generic drugs may be cheaper than brand-name drugs, they aren't inferior. In fact, they're "bioequivalent." हे वाक्य १००% बरोबर आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे जेनेरिक वापरले गेले पाहिजे. इतर वस्तुंच्या बाबतीत आपण ब्रँडनेम साठी काटेकोर असतो पण औषधांचे तसे नाही. एकदा का एखाद्या औषधाचे (त्यात वापरलेल्या मूख्य रसायनाचे: औषध = मूख्य रसायन + इतर घटक )पेटंट (मार्केट एक्स्क्लुजीव्हीटी) संपले की तेच मूख्य रसायन (मेन इन्ग्रेडीअंट) वापरुन कोणतीही कंपनी त्याचे उत्पादन करु शकते. अर्थात ते बाजारात आणण्यासाठी त्यांना देखिल एफडीए चे अप्रुव्हल घ्यावे लागते त्यामुळे दर्जाबाबत ते ब्रँडेड औषधासारखेच असते.(bioequivalent)
होय
पेशंटचे बरेच पैसे वाचू शकतात.
7 Mar 2008 - 4:05 am | सर्किट (not verified)
क्लिनिकल ट्रायल करण्याची जबाबदारी औषध निर्मात्या संस्थेचीच असते. एफ डी ए त्यांचा रिपोर्ट वाचून एखादे औषध मंजूर करायचे की नाही ते ठरवते.
एफ डी ए ही स्वतंत्र चाचण्या घेत नाही.
त्यामुळे एखाद्या कंपनीने ट्रायल घेताना गडबड केली, तरी एफ डी ए ला त्यांचा रिपोर्ट प्रमाण मानणे ह्यापेक्षा इतर पर्याय नसतो.
अर्थात नंतर कधी तरी ही गोष्ट उघडकीला येते, आणि मग मर्क वर व्हायॉक्स च्या बाबतीत घडले तसे हजारो खटले भरण्यात येतात.
ह्या खटल्यांच्या भीतीने तरी कंपन्या प्रामाणिकपणे ट्रायल्स घेतील असा विश्वास आहे. (पण बुश साहेबांनी अशा "क्लास-ऍक्शन-लॉसूट्स" मध्ये दिल्या जाणार्या भरपाईवर कॅप आणण्याचे धोरण जाहीर केले आहे, त्यामुळे ह्या भरपाईचा वचक कमी झाला आहे.)
असो, मी माझ्या डॉक्टर ला नेहमीच जेनेरिक साठी प्रिस्क्रिप्शन द्यायला लावतो.
- सर्किट
7 Mar 2008 - 5:07 am | पिवळा डांबिस
१. माझ्या माहितीप्रमाणे व्हायॉक्स (रोफेकॉक्सीब) या मर्कच्या ड्रगच्या फेज ३ क्लिनिकल ट्रायलमध्ये त्यांना काही कॉरोनरी सेफ्टी सिग्नल्स मिळाले होते पण कंपनीने ते नॉन-सिग्निफिकंट ( व नॉन ड्रग रिलेटेड) म्हणून दुर्लक्षिले होते. व्हायॉक्स (रोफेकॉक्सीब) मार्केटमधून काढून घ्यावे लागले आणि त्यामुळे मर्कच्या शेअरमध्ये (आणि मॅनेजमेंटमध्ये:) बरीच पडझड झाली होती. आता कंपनी स्थिरावली आहे.
२. निमुसुलाईडबद्द्ल मला फारशी माहिती नाही. अधिक जाणून घ्यायला आवडेल.
३. जेनेरिक असा उल्लेख केला जाणारी औषधे म्हणजे औषधच्या मूळ नावाने विकली जाणारी औषधे ना ?..
-होय. त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सारखाच असतो.
(While generic drugs may be cheaper than brand-name drugs, they aren't inferior. In fact, they're "bioequivalent." हे वाक्य बरोबर आहे का? )....
लिटरली घेतले तर होय. बट दे आर नॉट टेस्टेड टू बी सुपिरियर आयदर! मोअर इंपॉर्टंटली, दे आर बेसड ऑन द रिसर्च दॅट इज ऍट लिस्ट फिफ्टीन इअर्स ओल्ड. विकसनशील देशांत त्यामुळे फारसा फरक पडत नाही कारण यु. एस., युरोप, जपान करीत करीत विकसनशील देशापर्यंत यायला पेटंटेड ड्रगलाही ५-७ वर्षे लागतातच. पण तुम्ही जर वरील विकसित भागात रहात असाल तर (बेसड ऑन द डिसिज इंडीकेशन) इट मे मॅटर...
स्वस्त मिळणारी जेनेरिक औषधे दर्जाने तीच असतात काय?
होय.
ही जेनेरिक औषधे मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्तात मिळतात काय?
होय.
ही औषधे मी प्रिस्क्राईब केली तर त्यात पेशंट चे भले आहे काय?
ते डॉक्टर व पेशंटवर अवलंबून आहे. नवीन अधिक उपयुक्त औषध हवे की जुने पण स्वस्त औषध चालेल यावर ते अवलंबून आहे. नवीन औषध महाग असले तरी बहुतेक वेळा त्यासाठी काहितरी कारण असते जसे की, अधिक एफिकसी, सेफ्टी, पेशन्ट कन्व्हेनिअन्स वगैरे...
अवांतरः तात्याच्या ह्या अस्सल मराठी साईटवर खच्चून इंग्रजीमिश्रित मराठी लिहितांना काय आसुरी आनंद होतोय म्हणून सांगू!!! :)))) तात्या, ह. घ्या.
तुमचाच,
पिवळा डांबिस
7 Mar 2008 - 2:34 pm | भडकमकर मास्तर
धन्यवाद कोलबेर, सर्किट,आणि पि.डांबिस...
आपल्या माहितीचा उपयोग झाला...
.... एखादे पेटंटेड औषध किती वर्षांनी जेनेरिक उत्पदित होईल हे ठरलेले असते का, ( १५ की २० की अजून काही?)की प्रत्येक औषधाप्रमाणे हा काळ बदलत असतो?
7 Mar 2008 - 10:30 pm | टिउ
एक औषध ड्रग डिस्कव्हरी पासुन ते सर्व क्लिनिकल ट्रायल पुर्ण होउन एफ.डि.ए कडुन प्रमाणित होउन बाजारात यायला साधारण १२ ते १४ वर्षाचा काळ लागतो. प्रत्येक ट्रायल ही २ ते ४ वर्ष चालते आणि प्रत्येक ट्रायल नंतर एफ.डि.एचं अप्रुव्हल घ्यावं लागतं.
ह्या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. एफ.डि.ए च्या एका एन.सी.वर (नॉन कंप्लायंस) सगळं काम बंद करावं लागतं. केवळ रिपोर्ट वाचून एखादे औषध मंजूर करायचे की नाही ते ठरवणं इतकंच एफ.डि.एचं काम नसतं. एफ.डि.ए ऑडिट्स बरेच स्ट्रिंजन्ट असतात.
त्यामुळे गडबड करायचा स्कोप नसतो. शिवाय मर्क ही एक चांगल्यापैकी विश्वासार्ह कंपनी आहे. त्यामुळे ट्रायल घेतांना गडबड केली असेल हे पटत नाही. गडबड झाली हे कारण असु शकतं.
ड्रग डिस्कव्हरी नंतर कंपन्या पेटंट फाइल करतात. पेटंट हे २० वर्षांचं असतं. पण त्यातले साधारण १४ वर्ष हे रिसर्च, ट्रायल, उत्पादन, प्रि-लाँच मार्केटिंग यात जातात. त्यामुळे झालेला खर्च भरुन काढणे आणि नफा मिळवणे या साठी फक्त ६-७ वर्ष राहतात. याच कारणामुळे branded औषधांच्या किमती भरमसाठ असतात. पेटंट एक्सपायर झालं की १७६० जेनेरिक औषधं कमी किमतीत बाजारात येतात.
बर्याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचले नाहीत त्याबद्दल क्षमस्व!
7 Mar 2008 - 10:41 pm | कोलबेर
मलाही असंच वाटतं!
त्याचबरोबर व्हायॉक्स वर एफडीए ने अजुनही बंदी आणलेली नाही तर मर्कनेच ते स्वतःहून बाजारातुन काढून घेतले आहे. इथले बरेचसे डॉक्टर्स तेव्हा मर्कवर चिडले होते कारण त्यांच्या पेशंट्स ना व्हायॉक्सने खूप चांगला गुण येत होता पण बाजारातुन हे औषध काढुन घेतल्याने त्यांना ते प्रिस्क्राईब करता येत नाही.
बाकी माहिती छानंच!
7 Mar 2008 - 10:57 pm | भडकमकर मास्तर
माहितीसाठी धन्यवाद
7 Mar 2008 - 10:55 pm | भडकमकर मास्तर
त्याचबरोबर व्हायॉक्स वर एफडीए ने अजुनही बंदी आणलेली नाही तर मर्कनेच ते स्वतःहून बाजारातुन काढून घेतले आहे. इथले बरेचसे डॉक्टर्स तेव्हा मर्कवर चिडले होते कारण त्यांच्या पेशंट्स ना व्हायॉक्सने खूप चांगला गुण येत होता पण बाजारातुन हे औषध काढुन घेतल्याने त्यांना ते प्रिस्क्राईब करता येत नाही.
मलाही माझ्या पेशंट साठी या औषधाचा चांगला गुण येत होता... :))
पण मर्क ने आपणहून हे औषध काढून घेतले यात कौतुक काय? ते वाईट होते म्हणून तर काढून घेतले ना !!!
पण या औषधावर एफ डी ए ने अजूनही बंदी आणली नाहीये म्हणजे ते झोपले आहेत की काय?
म्हणजे औषध तरी चांगले आहे किंवा एफ डी ए तरी झोपली आहे.... यापैकी एक सत्य आहे...
..जितका विचार करू तेवढा विरोधी विचारांचा गुंता तयार होतो...... :(
8 Mar 2008 - 4:58 am | पिवळा डांबिस
त्यामुळे एखाद्या कंपनीने ट्रायल घेताना गडबड केली, तरी एफ डी ए ला त्यांचा रिपोर्ट प्रमाण मानणे ह्यापेक्षा इतर पर्याय नसतो....
....त्यामुळे ट्रायल घेतांना गडबड केली असेल हे पटत नाही. गडबड झाली हे कारण असु शकतं.
मर्क सारख्या कंपनीने मुद्दाम गडबड केली असेल हे मलाही पटत नाही. कारण अशी गडबड उघडकीस आल्यास कंपनीची सगळी विश्वासार्हताच पणाला लागते याची सर्व निर्णय घेणार्या लोकांना जाणीव असते...
माझ्या मते हा त्या क्षणी उपलब्ध असलेल्या माहितीवर बेसड घेतलेल्या निर्णयाचा अचूकपणा असतो. माझ्या अनुभवावरून सांगतो की कधीकधी काही सेफ्टि फाईंडिंग्ज खरोखरच नॉन्-सिग्निफिकंट वा नॉन-ड्र्ग रिलेटेड म्हणून बाजूला सारावी लागतात. इट डिपेन्ड्स ऑन द पर्सन मेकिंग द कॉल...
व्हायॉक्सच्या बाबतीत तो निर्णय घेणारी व्यक्ती माझ्या परिचयाची आहे. त्या एका चुकीच्या (म्हणजे नंतर चूक ठरलेल्या) निर्णयामुळे ही अत्यंत बुद्धिमान (खरोखर जिनियस!) व्यक्ती करियरमधून अक्षरशः उठली आहे.
पण मर्क ने आपणहून हे औषध काढून घेतले यात कौतुक काय? ते वाईट होते म्हणून तर काढून घेतले ना !!!
पण या औषधावर एफ डी ए ने अजूनही बंदी आणली नाहीये म्हणजे ते झोपले आहेत की काय?
डॉक्टर असून इतका उतावीळपणा!! :)) ह. घ्या.
एकदा औषधाच्या वापराने काही पेशंट्सना वाईट परिणाम होतो हे लक्षात आल्यावर एथिकली ते औषध विकणे बरोबर नाही असा विचार करून मर्कने ते औषध काढून घेतले. याबद्द्ल मर्कचे कौतुकच केले पाहिजे. अशा निर्णयाचे फिस्कल परिणाम जाणूनसुद्धा एथिकली योग्य निर्णय घ्यायला वाघाची छाती लागते...
हा वाईट परिणाम फक्त हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या पेशंट्सवर झाला होता, सार्वत्रिक नव्हता. म्हणून एफ डी ए ने त्यावर बंदी घातली नाही. आणि अगोदरच मर्कने औषध काढून घेतल्याने ती वेळही आली नाही.
अशी उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत. ऍमजेन ने त्यांच्या जिडिएनएफ ची डेव्हलपमेंट अगदी लास्ट स्टेजला थांबवली होती. ते तर अल्सहायमरवरचे औषध होते, ज्या रोगावर दुसरे औषधच अस्तित्वात नव्हते... त्यावेळीही डॉक्टरांनी व पेशंट ऍडव्हकसी ग्रूप्सनी बरीच आरडाओरड केली होती. पण एथिकली वागायचे तर एकदा सेफ्टी सिग्नल्स मिळाल्यावर कंपनीकडे दुसरा पर्याय नव्हता.
8 Mar 2008 - 2:54 pm | भडकमकर मास्तर
डॉक्टर असून इतका उतावीळपणा!! :)) ह. घ्या.
..एकदम मान्य...च्यायला ते वाक्य उतावीळपणाचंच होतं... सॉरी...
काय होतं खरंच इतक्या डीटेल्स मध्ये माहिती नसते , त्यामुळे बोललो...चूकच झाली... ( बर्याचदा डॉक्टर्च्या काही निर्णयावर पेशंट सुद्धा शिव्या घालतात , कमी माहितीवर ..तसेच झाले माझे..)
सगळीकडे एक अधिक एक बरोबर दोन होत नाही, मान्य आहे....
एक तर औषध तरी चांगले आहे किंवा एफ डी ए तरी झोपली आहे ..दोन्ही वाक्ये चूकच आहेत... सत्य दोन्ही वाक्यांच्या मध्ये कुठेतरी आहे... नाही का?
8 Mar 2008 - 8:25 am | टिउ
एकदा औषधाच्या वापराने काही पेशंट्सना वाईट परिणाम होतो हे लक्षात आल्यावर एथिकली ते औषध विकणे बरोबर नाही असा विचार करून मर्कने ते औषध काढून घेतले. याबद्द्ल मर्कचे कौतुकच केले पाहिजे.
सहमत आहे.
शिवाय व्हायॉक्स हे ब्लॉकबस्टर ड्रग होतं. लाखो लोक त्याचा वापर करत होते. औषध काढुन घेतल्यावर एफ.डि.एने औषध पुन्हा बाजारात आणायला हरकत नाही असा निर्वाळा दिला होता. तरी सुद्धा मर्कने व्हायॉक्स बाजारात परत आणलं नाही.
8 Mar 2008 - 2:59 pm | भडकमकर मास्तर
माझ्या अनुभवावरून सांगतो की कधीकधी काही सेफ्टि फाईंडिंग्ज खरोखरच नॉन्-सिग्निफिकंट वा नॉन-ड्र्ग रिलेटेड म्हणून बाजूला सारावी लागतात. इट डिपेन्ड्स ऑन द पर्सन मेकिंग द कॉल...
हे खूप इंट्रेस्टिंग आहे...अधिक उदाहरणाने स्पष्ट कराल का प्लीज ?
8 Mar 2008 - 11:11 pm | पिवळा डांबिस
माझ्या अनुभवावरून सांगतो की कधीकधी काही सेफ्टि फाईंडिंग्ज खरोखरच नॉन्-सिग्निफिकंट वा नॉन-ड्र्ग रिलेटेड म्हणून बाजूला सारावी लागतात. इट डिपेन्ड्स ऑन द पर्सन मेकिंग द कॉल...
हे खूप इंट्रेस्टिंग आहे...अधिक उदाहरणाने स्पष्ट कराल का प्लीज ?
उदाहरणार्थः
ड्र्ग ह्युमन ट्रायल्समध्ये इन्ट्रोड्युस करण्यापूर्वी ऍनिमल ट्रायल्स घेतल्या जातात हे तुम्हाला माहिती असेलच. कधीकधी या ट्रायल्समध्ये अनपेक्षित सिग्नल्स मिळतात. कधी कधी ते मेक्यनिझम ऑफ ऍक्शन रिलेटेड असतात तर कधी बायोमार्कर रिलेटेड. अशा वेळी, हे सिग्नल्स खरोखर ड्र्ग रिलेटेड आहेत, की ऑफ टार्गेट मेक्यानिझममूळे मिळाले आहेत की केवळ स्पीशीज डिफरन्स (ऍनिमल व्हर्सेस ह्युमन) हे ठरवावे लागते. अशा वेळी ह्युमन डेटा तर उपलब्ध नसते आणि मोजकीच ऍनिमल डेटा (बहुतेक एकाच स्टडीची, ज्यातून हे सिग्नल्स मिळाले तो) उपलब्ध असते. अशा वेळी आणखी ऍनिमल स्टडीज करायचे (पैसा आणि वेळ) की सरळ ड्रग ह्युमन्समध्ये ईंट्रोड्यूस करायचे (रिस्क) हा निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय कधीकधी अंगाशी येऊ शकतो. उदा. टीजेनेरो!
अवांतरः सतलजराव, उतावीळपणाबद्दल आम्ही कॉमेंट केली म्हणून वाईट वाटून घेऊ नका. सॉरी वगैरेची गरज नाही हो! होतं काय, की ज्या विषयाबद्दल आपण पॅशनेट असतो ना, त्याविषयीच असं लिहिलं जातं याची आम्हाला जाणीव आहे. पण कधीकधी त्यामुळे चर्चा ही वादात रुपांतरीत होते म्हणूनच सावध केलं. राग नसावा...:))
9 Mar 2008 - 11:49 am | भडकमकर मास्तर
सरळ ड्रग ह्युमन्समध्ये ईंट्रोड्यूस करायचे (रिस्क) हा निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय कधीकधी अंगाशी येऊ शकतो. उदा. टीजेनेरो!
टी जी एन १४१२ नावाचे औषध टीजेनेरो नावाची जर्मन कंपनी बनवत होती, र्हुमेटोईड अर्थ्रायटीस, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि काही ल्युकेमिआ यासारखे ऒटो इम्यून आजार बरे करण्यासाठ्यी... गिनीपिग आणि माकाडांच्या ट्रायल्स मध्ये काही वाईट आढळले नाही पण जेव्हा मानवावर पहिली ट्रायल करायला घेतली तेव्हा इम्यून सिस्टीम सुपर ऍक्टिव्हेट झाली......आणि सवांना ड्रग रीआक्शन आल्या.....सर्व पेशंट्स आय सी यू मध्ये ऍड्मिट झाले...असे काहीसे वाचल्याचे आठवत होते.... आज त्याबद्दल अजून वाचले जालावर शोधाशोध करून , बरे वाटले....
म्हणूनच सावध केलं. राग नसावा...:))
:) :)
10 Mar 2008 - 12:34 am | पिवळा डांबिस
टिजेनेरो हा डांबिसमास्तरांनी गृहपाठ दिला होता. तो प्रामाणिकपणे केल्याबद्दल शाबासकी!!! :))
अधिक माहिती: टीजेनेरोची ही केस युके मध्ये झाली. माणसांना ड्रग देण्यापूर्वी एम्.एच्.आर.ए. (त्यांचं एफ्.डी.ए) ने ह्युमन ट्रायल साठी आय्.एम्.पी.डी. (त्यांचं आय. एन. डी) ऍप्रूव्ह केलं होतं. तरी हे झालं. या घटनेमुळे यु.के. मधे एम्.एच्.आर्.ए.ची मोठीच पुनर्रचना झाली. आता त्यांची आय.एम्.पी.डी. प्रोसेस जास्त कठीण आणि वेळखाऊ झाली आहे...
9 Mar 2008 - 6:25 am | सुधीर कांदळकर
नॅनोटेक्नॉलॉजी या विषयातील संशोधनामुळे लाही नवीन ड्रग्ज आली असल्यास कृपया कुतूल म्हणुन माहिती द्याल का?
10 Mar 2008 - 1:28 am | भडकमकर मास्तर
२. निमुसुलाइड ह्या औषधाच्या वादाला अंत नाही. तरी इतकेच सांगू शकतो की ह्या औषधाला पाश्चात्य देशांमध्ये कुठेही मान्यता नाही. (ह्याचा अर्थ ते गुणकारी नाही असे नाही)
यावर आपले मत लिहा...म्हणजे निमेसुलाईड बद्दल ....
मला स्वत:ला मस्त उपयोग होतो हं त्या गोळीचा... क्वचित घेतो मी डोकेदुखीसाठी....
10 Mar 2008 - 1:54 am | कोलबेर
माझ्या माहितीनुसार निमुसुलाईडच्या लिव्हर टॉक्जीसीटी मुळे ते बर्याच देशांमधून निलंबीत केले आहे... (तसेही हेपॅटो टॉक्जीसीटी हा सर्वच NSAID चा कॉमन साईड इफेक्ट असतो तरीही निमुसुलाईडच का निलंबीत केले असावे ह्याची कल्पना नाही.) विकीवरील माहितीवरुन अमेरिकेत ह्या औषधासाठी एफडीए कडे कधी अर्जच करण्यात आला नाही त्यामूळे अमेरिकन बाजारपेठेत हे औषध कधीच आले नाही.. युरोपमधे EMEA (युरोपचे एफडीए) च्या अहवालानुसार रिस्क टू बेनेफिट रेषो फेव्हरेबल दिला आहे..तरीही बर्याचश्या युरोपियन देशांमध्ये हे औषध निलंबीत केले आहे.. तेव्हा हे वापरायचे का नाही हा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय ठरावा.. मी भारतात असताना हे औषध भरपूर वेळा (डोकेदुखी/अंगदुखी/दाढदुखी) ह्यासाठी घेतले आहे पण अमेरिकेत आल्यावर (उपलब्ध नसल्याने) ते घेतलेले नाही.
माझ्या मते दरवेळी निमुसुलाइडवरच अवलंबुन न राहता अधुन मधुन ते घ्यायला हरकत नसावी.. कुणी अजुन माहिती दिल्यास नक्कीच आवडेल!
11 Mar 2008 - 12:16 am | चतुरंग
प्रिस्क्रिप्शनसह आयुर्वेदिक औषधे भारतातून अमेरिकेत पोस्टाने/कुरियरने मागविता येतात का?
त्यासाठी काही वेगळ्या परवानगीची गरज असते का?
चतुरंग
11 Mar 2008 - 12:37 am | धनंजय
ही औषधांची आयात मानली जाईल, आणि यासाठी सरकारची अनुमती लागेल.
प्रवाशाच्या बरोबर असलेली औषधेही खरे तर आयातच आहे, पण सोयीसाठी याच्याकडे डोळेझाक करतात.
आयुर्वेदिक औषधे न्यूट्रास्युटिकल (खाद्य पदार्थ) असतील तर नियम थोडा शिथिल असू शकतो. फार्मास्यूटिकल आणि न्यूट्रास्युटिकल यांचे लेबल वेगळे असावे लागते.
न्यूट्रास्युटिकल उपचारासाठी वापरता येते, असे कुठलेही वाक्य चालत नाही.
11 Mar 2008 - 1:04 am | चतुरंग
चतुरंग
15 Mar 2008 - 8:32 pm | अभिज्ञ
नमस्कार.
भडकमकर साहेब,
आपण एक डेन्टिस्ट आहात असे वाचनात आले.
मला काहि शंका विचारायच्या आहेत.
१.आयुर्वेदाचा ह्या शाखेत कितपत उपयोग होतो ?हि शाखा ALOPATHY ची असूनही
बरेच डॉक्टर CLOVE OIL वगैरे वापरा म्हणून सान्गतात.
२.आजकाल ब-याच आयुर्वेदिक टुथपेस्ट बाजारात आल्या आहेत.
त्याचा कितपत फ़ायदा होतो?
३.ब-याच टुथपेस्ट कम्पन्या ह्या आपलि टुथपेस्ट हि calcium युक्त आहे असा दावा करतात.
माझ्या माहितीप्रमाणॆ calcium हे शरिरात योग्यप्रमाणात असणॆ आवश्यक आहे.हे असे बाहेरून
घेतलेले/लावलेले calcium कितपत फ़ायदेशीर ठरते?
आपल्याकडुन फुकट माहिती घेत आहे त्याबद्दल माफ़ि.))ह.घ्या.
अबब.
17 Mar 2008 - 11:46 am | आंबोळी
ब-याच टुथपेस्ट कम्पन्या ह्या आपलि टुथपेस्ट हि calcium युक्त आहे असा दावा करतात.
माझ्या माहितीप्रमाणॆ calcium हे शरिरात योग्यप्रमाणात असणॆ आवश्यक आहे.हे असे बाहेरून
घेतलेले/लावलेले calcium कितपत फ़ायदेशीर ठरते?
कोलगेट ही पुर्वी हाडान्ची (प्राण्यान्च्या आणि माणसान्च्या) भुकटी पेस्ट म्हणून विकाय्ची असे ऐकले होते ते कितपत खरे आहे?
(मोतीओन्सी चमक असणारा) आम्बोळी