(दृष्टी भ्रम)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 8:29 am

आमची प्रेरणा श्वास स्वतीचा यांची कवितादृष्टी भ्रम

(दृष्टी भ्रम)

.

गेले कित्येक दिवस
मला मी ....
जरा बरा वाटत होतो.
मग
गुत्यात चमकणारे दिवे.

आता पाहतो तर,
वाढलेले कान.

उद्या कदाचित!!
शेपटी ही दिसेल.
आणि पुढे,
खूर आलेले हात.
किंवा मग
आणखीन काही...
अस्पष्टसं.....
ढोस

केशवसुमार ................ ०६-०३-२००८

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

6 Mar 2008 - 8:43 am | सृष्टीलावण्या

उद्या स्वातीताईंना कळलं तर तुमची खैर नाही. त्यांच्या रागाला सुमार राहणार नाही. तुमच्या केशाचे त्या वपन (तुमची हजामत) करतील.

मग
गुत्यात चमकणारे दिवे.

आता पाहतो तर,
वाढलेले कान.

गुत्त्यातील दिवे चमकायच्या ऐवजी दिवसा तारे चमकतील आणि कान खेचले
गेल्याने लंबकर्ण व्हाल.

बाकी जा. ह. डो. पा. (जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे). ही धुंदी ताक पिऊन पण
उतरायची नाही.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सर्किट's picture

6 Mar 2008 - 8:46 am | सर्किट (not verified)

लावण्यामावशी,

धुंदी उतरायला मीठ टाकून लिंबू पाणी प्या.. ताक पिऊन उपयोग नाही..

स्वानुभव,

- सर्किट आजोबा

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 9:35 am | विसोबा खेचर

किंवा मग
आणखीन काही...
अस्पष्टसं.....
ढोस

हे लै भारी...

तात्या.

केशवसुमार's picture

7 Mar 2008 - 9:43 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार