गाभा:
आज अखेर वांद्रे वरळी सागरी सेतु वापरण्यासाठी खुला झाला. बरीच वर्ष हे काम चालु होत. पण आज अशी बातमी आहे कि या सेतुला स्व. राजी व गांधी यांचे नाव देण्यात येत आहे. माझ्या माहीती प्रमाणे हया सेतुची पायाभरणी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाली होती आणी ह्याचे नाम करण स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतु असे त्यावेळी करण्यात आले होते. मग आज अचानक राजी व गांधी यांचे नाव कसे पुढे आले. आणी हे नाव पुढे करणारे पहिले शरद पवार आणी हि घोषणा करणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हे कोंग्रेस वाले त्यांचा सावरकर द्वेष कधी थांबवणार आहेत? की म्याडमपुढे स्वःताचा लाळ्घोटेपणा दाखवताना त्याना सावरकरां पेक्शा राजीव गांधी जास्त कर्तुत्ववान वाटतात..
जाहिर निषेध..........
प्रतिक्रिया
30 Jun 2009 - 11:28 pm | विसोबा खेचर
निषेध..!
आपला,
(सावरकरभक्त) तात्या.
1 Jul 2009 - 4:14 pm | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो. हा लाळघोटेपणा कधी संपणार आहे कुणास ठाऊक?
जाहीर निषेध ! X(
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
1 Jul 2009 - 1:13 am | llपुण्याचे पेशवेll
हो शरदराव आणि सोनियाबाईंच्या हस्ते उदघाटन झाले. आणि राजीव गांधींचे नाव द्यायचा प्रस्ताव शरदरावांचाच म्हणे. आणि चव्हाण साहेबानी लगेच त्याला अनुमोदन दिले. काँग्रेसने आघाडी न करण्याचा विचार करायला सुरुवात केल्याबरोबर शरदरावानी लगेच मखलाशी चालू केलेली दिसतेय.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
1 Jul 2009 - 6:59 am | सुनील
हाजीर तो वजीर.
काँग्रेसचे राज्य आहे म्हणून राजीव गांधींचे नाव दिले गेले, सेना-भाजपाचे असते तर त्यांनी त्यांना हवे त्यांचे दिले असते.
तसेही कॅडल रोडला सावरकरांचे आणि मरीन ड्राइवला नेताजींचे नाव आहे, पण कोण शिंचा वापरतोय ते? अगदी कमला नेहेरूंचे नाव देऊनही हँगिंग गार्डन ही हँगिंग गार्डनच राहीली आहे!
तेव्हा नावाचे सोडा हो.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Jul 2009 - 8:10 am | प्रशु
सुनीलराव मुळ मुद्दा हा नावाचा नसुन मराठी नेत्यांच्या दिल्लीश्वरांपुढं लोटंगण घालण्याच्या परंपरेचा आहे. कधी खंडीत होणार आहे ती?जेवढं नुकसान परप्रांतीय करत नाहीतय त्यापेक्शा जास्त हि बिनकण्याची गांडुळं करतायतं.............
1 Jul 2009 - 9:23 am | मराठी_माणूस
योग्य वर्णन
1 Jul 2009 - 8:38 am | मराठी_माणूस
प्रचलीत नावे बदलली तर तीच रहतात हे बरोबर असले तरी , इथे हेच पहीले नाव असणार आहे आणि तेच प्रचलीत होणार आहे. त्या मुळे इथे नावाला महत्व आहे.
1 Jul 2009 - 8:47 am | नितिन थत्ते
>>काँग्रेसचे राज्य आहे म्हणून राजीव गांधींचे नाव दिले गेले, सेना-भाजपाचे असते तर त्यांनी त्यांना हवे त्यांचे दिले असते.
सहमत. चौकांना मीनाताई ठाकरे आणि निर्मलादेवी दिघे यांची नावे दिली गेली आहेत.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 9:13 am | प्रशु
ठाकरे आणी दिघे हे महाराष्ट्राला दिल्लीत्ल्या गांधी पेक्शा जास्त जवळ्चे आहेत.
1 Jul 2009 - 9:17 am | नितिन थत्ते
जवळचे असतील हो. पण चौकांना नाव देण्यासारखे काही कार्य आहे काय?
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 9:47 am | प्रशु
बरोबर, या व्यक्तींचे कर्तुत्व नसेलही पण राजीव गांधीचे कर्तुत्व काय सावरकरांच्या पेक्शा जास्त आहे का कि त्यामुळे पवारांना त्यांचे नाव बद्लावेसे वाट्ले? नविन नाव देणे वेगळे आणी असलेले नाव बदलणे वेगळे ते सुद्धा म्यड्म समोर खुशामती साठी....
सामान्य माणसांच्या कामासाठी पवार साहेब येवढं तत्परता दाखवतील का?
1 Jul 2009 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल उद्घाटनाच्या बातम्यानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांवर चर्चा सुरुच झाली होती.
भाजपसेनेचे कोणीतरी नेते म्हणाले आमचे सरकार आले की, स्वा.सावरकर सेतू असे नाव देऊ...!
>>चौकांना मीनाताई ठाकरे.....
नावं देण्यापूर्वी लोकांनी विचारले पाहिजे की, यांचे समाजासाठी किती योगदान आहे. म. गांधीचा पुतळा उभारण्यास कोणत्या देशातील गोष्ट आहे, कोणास ठाऊक तिथे त्याला विरोध झाला होता. ते म्हणाले आमच्यासाठी त्यांचे कोणतेच योगदान नाही. त्यांचा पुतळा काय करायचा..त्यांची भुमिका मला आवडली होती.
शरद पवारांनी सुचविले म्हणून नव्हे, तर ज्या माणसाने 'आधुनिक धोरणाद्वारे भारताला तंत्रज्ञानाच्या नव्या युगात' नेले त्या माणसाच्या नाव देत असतील तर एक भारतीय म्हणून बॉ आम्हाला ती आनंदाची गोष्ट वाटते.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2009 - 10:12 am | प्रशु
'आधुनिक धोरणाद्वारे भारताला तंत्रज्ञानाच्या नव्या युगात' नेले
मग सावरकर काय तुम्हाला मध्य युगात नेत होते?
बोफोर्स चे काय??????? मारुति चे काय????????
1 Jul 2009 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतिहासातील थोर व्यक्तीबद्दल आदर आहे,आपल्या मताबद्दलही आदर आहे. इतिहासातील व्यक्ती आपल्या प्रेरणा आहे, प्रेरणा देत असतात हेही मान्य.
उद्या सावरकर हे नाव कोणाला तरी आवडणार नाही. कोणाला मौलाना आझादाचे नाव द्यावे वाटेल.कोणाला तरी सेंट जॉन पॉल असे सुचेल. मुळात वादांनी माणसात दुफळी निर्माण होत असेल, राजकारणात मतांसाठी उपयोग होत असेल, किंवा अन्य कोणतेही कारण असेल तर.. अशा गोष्टींपासून आपण अंतर आपण ठेवायला पाहिजे असे वाटते.
अवांतर : सावरकरांचे विचार सर्वांनाच पटणारे होते असे काही नाही. इतिहासात त्यांच्या विचारांविषयी भले बुरे चिंतन खूप झाले आहे, असे वाटते. (चुभुदेघे)
अतिअवांतर : पुढे चर्चेसाठी हार्दिक शुभेच्छा ! :)
-दिलीप बिरुटे
1 Jul 2009 - 11:31 am | मराठी_माणूस
बिनतोड मुद्दा
1 Jul 2009 - 9:21 am | विकास
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे हा युतीच्या काळात चालू झाला आणि काँग्रेसच्या राज्यात पूर्ण झाला. त्याच सुमारास पुलंचे निधन झाले. त्याचा म्हणलंतर राजकीय फायदा घेत, पण बाळासाहेबांनी जाहीरपणे विनंती केली की कुठल्यातरी काँग्रेसच्या नेत्याचे (ते ही नेहरू घराण्यातील) नाव देण्याऐवजी महाराष्ट्राच्या लाडक्या लेखक-बहुगुणी कलाकाराचे अर्थात पुलंचे नाव त्याला द्या. अर्थात काँग्रेसकडून ते घडणे नव्हते म्हणून आजही त्या महामार्गाला कुणाचेच नाव नाही! (निदान मला तरी माहीत नाही)...
बाकी हजीर तो वजीर हा मुद्दा एकदम मान्य. पण पहीले नाव ठेवणे आणि नामांतर करून वेगळे नाव ठेवणे यात फरक आहे असेही नक्कीच वाटते त्यामुळे त्या अर्थाने ती उदाहरणे पटली नाहीत.
तरी मुंबईतील अनेक रस्त्यांच्या नावासंदर्भात सेनापती बापट नशिबवान म्हणले पाहीजेत कारण त्यांचे नाव सारखे घेतले जाते. बाकी आहेतच एमजी, एसव्ही, व्हिएस, एलबीएस वगैरे वगैरे...
आपल्या देशात गांधीजींच्या नावाने इतके "गांधी रोड" आहेत की गांधी "रोडा"वलेत असे म्हणावेसे वाटते.;) त्यांचे नाव लावून आपल्या नेत्यांनी (बहुतांशी स्वतःला नावापुरते गांधीवादी म्हणवणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी) गांधीजींना "रस्त्यावर" आणले आणि स्वतःचे जीवन "मार्गी" लावून घेतले असेही वाटते. असो.
2 Jul 2009 - 5:10 am | Nile
ह. ह. पु वा.
काय नाव द्यायच द्या, आम्ही त्याला वरळी सी लिंक असेच म्हणणार! ;)
10 Jul 2009 - 9:21 am | विजुभाऊ
वांद्रे वरळी हा पूल आहे म्हणून त्याला पुलंचे नाव देणे कितपत योग्य आहे. उगाच श्लेश साधायचे. असे असेल तर शरदपवारांचे नाव एखाद्या खड्ड्यासच द्यावे लागेल
1 Jul 2009 - 9:31 am | अमोल केळकर
राज साहेब, तुम्ही (मनसे ) देखील मागे राहू नका या वादात.
येऊ दे तुमच्या कडून ही एखादे नाव.
खरं म्हणजे स्वा. सावरकरांचे नाव पुलास देण्यास आपली हरकत नसावी. चला सुरवात करु या विधानसभा निवडणुकीची .
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
1 Jul 2009 - 9:42 am | शाहरुख
नाव काय द्यायचे याची चर्चा करण्यापेक्षा येणार्या पावसाळ्यात पडणारे खडडे कसे बुजवायचे याची चर्चा करा म्हणावं या राजकारण्यांना !! युजलेस ब*र्स !!
1 Jul 2009 - 11:19 am | कलादालन
पावसात खड्डे अन तुंबणारी वाहतूक या वरील मुद्दे महत्वाचे .
नको तिथे गद्द्यांची भाषा अन महत्वाचे मुद्दे राहीले बाजूला
आपण मराठी माणसे फक्त भांडतच राहणार का ? :-(
1 Jul 2009 - 5:48 pm | यन्ना _रास्कला
रुप्यांमधे आप्ल्या तुप्ल्या १६५० गावामधे कमसे कम १ तरी बिरिज झाला
आस्ता. पावसाल्यात त काय काय गावाची हालत लई बेक्कार व्हते.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
1 Jul 2009 - 9:59 am | मैत्र
विदेशी मुद्द्यावरून वेगळी चूल मांडणारे महाराष्ट्राचे नेते आणि लोकसभा निकालाच्या अखेरच्या जागा स्पष्ट होई पर्यंत जे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते :?
त्या शरद पवारांचा त्यांचेच मुखपत्र असलेल्या 'सकाळ' मध्ये सोनिया गांधींबरोबर हास्य विनोद करताना आलेला फोटो गमतीशीर वाटला.
आधी जाहीर झालेले नाव वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी सर्व नीतिमत्ता गुंडाळून ऐन वेळी बदलणे केवळ अप्रतिम.
सकाळ च्या छापील आवृत्तीत असा उल्लेख आहे की राजीव गांधी यांचा जन्म मुंबई इथे झाला होता त्यामुळे ते इथले 'भूमिपुत्र' आहेत असं विधान शरद पवार यांनी केलं. हसावं का रडावं हे कळेना या वाक्प्रचाराचा अर्थ मला इतका व्यवस्थित आजवर समजला नव्हता!
गेले काही महिने सकाळ मधून काँग्रेस वर आडून शरसंधान चालू होतं. आता नवीन पवित्रा बघायला मिळेल. 'वाटचाल' हे प्रतापरावांचं पुस्तक वाचून कोणाचंही मत होईल की अत्यंत सभ्य आणि सरळमार्गी लोक आहेत. बुद्धिमत्ता आणि सुशिक्षितता याचा अर्थ विचाराची, राजकारणाची सभ्यता आणि नीतिमत्ता असलीच पाहिजे असा होत नाही. ही बातमी वाचून शरद पवारांनी त्यांच्या प्रत्यक्षात नसलेल्या पण सोयीच्या राजकारणासाठी जी तत्त्वे बाळगल्याची प्रतिमा उभी केली होती त्या तत्त्वांना तिलांजली दिली आहे हे स्पष्ट झाले.
अवांतरः तो एक तेलगी नावाचा माणूस होता त्याने इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा केला होता. त्यात कमिशनर दर्जाचे काही लोक निलंबित झाले आणि तुरुंगात गेले. पण त्याने नार्को चाचणीत ज्यांची नावे घेतली ते लोक आता गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्रि आहेत.
त्या केसचे पुढे काय झाले कल्पना नाही. http://en.wikipedia.org/wiki/Sharad_Pawar#The_criminal-politician_nexus
10 Jul 2009 - 9:24 am | विजुभाऊ
गेले काही महिने सकाळ मधून काँग्रेस वर आडून शरसंधान चालू होतं
याला शरदसन्धान म्हणतात
1 Jul 2009 - 10:06 am | टारझन
चला !! अजुन एक गांधी अमर झाले :)
- टारात्मा गांधी
1 Jul 2009 - 11:05 am | नम्रता राणे
नशिब समजा भारतमातेच!
राजीव गांधींचच नाव दिल काँग्रेसवाल्यांनी.
क्वॉत्रोची (बोफोर्स दलाल), कसाब, अफजलगुरु
यांची नाव दिली नाहीत.
धन्यवाद शरदराव. सोनियाऑंटी
1 Jul 2009 - 11:30 am | पाषाणभेद
"भदु पागा वरळे" नाव द्यावे ही 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाची मागणी कोण लक्षात घेईल?
श्री. भदु पागा वरळे हे १७ व्या शतकात वरळी किल्याचे किल्लेदार होते.
त्यांनी पोर्तूगीजांशी दिलेला लढा लक्षात घेता या पुलास "भदु पागा वरळे" हेच नाव द्यावे.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
1 Jul 2009 - 11:44 am | नितिन थत्ते
पूर्वी एका धाग्यावरील चर्चेत मी लोक काँग्रेसला ठोकण्यासाठी सावरकरवादी, नेताजीवादी आणि इतर असतात असे म्हटले होते. ते आज पुन्हा अधोरेखित झाले. पुलाच्या नावावरून चर्चा सुरू झाली ती 'कणाहीन मराठी नेते' मार्गे क्वात्रोची, कसाब आणि अफजल गुरू पर्यंत पोचली.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
1 Jul 2009 - 12:02 pm | प्रशु
काँग्रेसचे खरे रुप समोर आणले तर तुम्हाला का बुवा मिर्ची झोंबली?
1 Jul 2009 - 12:25 pm | नितिन थत्ते
काँग्रेसचे नेते कणाहीन असतील तर कुठल्याही प्रकारचे कार्य नसलेल्या निर्मलादेवी दिघे यांचे नाव देताना ठाण्यातील नगरसेवकांनी आणि महापौरांनी कोणता ताठ कणा दाखवला म्हणायचा?
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
10 Jul 2009 - 5:53 pm | विशाल कुलकर्णी
निर्मलादेवी दिघेंचं नाव त्या स्व. आनंद दिघेंशी संबंधीत असल्याने दिले गेले आहे. (नक्की नाते माहीत नाही) पण ठाण्यात आनंद दिघेंचे तेवढे कार्य नक्कीच आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
1 Jul 2009 - 12:09 pm | मैत्र
सावरकरांचे नसते दुसर्या कोणाचे असते किंवा अजून ठरले नसते तरीही कणाहीन आणि संधिसाधू राजकारणाचे समर्थन होत नाही.
त्यात सावरकरवादाचा संबंध नाही.
चर्चा कुठे गेली हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण फायद्यासाठी पार कोलांटी उडी मारणे हे धक्कादायक आहे.
आत्ता राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला ७-८ जागा मिळाल्या असत्या तर हा पवित्रा घेतला असता काय? राजीव गांधी यांची हत्या झाल्याला १८ वर्षे झाली त्यानंतर दुसर्या पक्षाने घेतलेल्या एका निर्णयाला तडीस नेऊन बांधलेल्या पुलाला त्यांचे नाव देण्याचा काय संबंध?
नावावर राजकारण करणे आणि स्वार्थासाठी सगळे मुद्दे बदलणे हे चीड आणणारे आहे आणि तथाकथित सावरकरवाद्यांनी चर्चा दुसरीकडे नेली तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही.
1 Jul 2009 - 11:45 am | चिरोटा
पुलाना,रस्त्यांना कायम राजकारणी लोकांचीच नावे का? विशेष करुन महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आढळते.बेंगळुरुत तर बर्याच रस्त्यांना कन्नड कवी,साहित्यिकांची,संगीतकारांची नावे आहेत.(महाकवी कुवेंपु रोड/द.रा.बेंद्रे मार्ग,चौदैय्या मार्ग वगैरे)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Jul 2009 - 12:03 pm | सुनील
असे काय म्हणता? मुंबईत "गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर चौक" ह्या नावाचा एक चौक आहे की! आता सगळे मुंबईकर त्या चौकाला "ऑपेरा हाऊस" ह्या सुटसुटीत नावाने ओळखतात ते वेगळे!
असो, ह्या वांझोट्या चर्चेतला माझा हा शेवटचा प्रतिसाद. बाकी चालू द्या!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Jul 2009 - 12:23 pm | चिरोटा
राजीव गांधी ह्यांचे नाव मुंबईत पुर्वी नक्कीच काही सरकारी इमारतीना दिले असेल. सावरकर मार्ग्(आधिचा कॅडल रोड,बरोबर)आहेच.
पाषाणभेद ह्यांचा मुद्दा योग्य आहे.
वास्तुचे/रस्त्याचे नाव त्या परिसरातिल एखाद्या क्षेत्रातिल मान्यवर,ऐतिहासिक व्यक्तिचे असावे.बर्याच देशात असेच आढळून येते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Jul 2009 - 12:48 pm | पाषाणभेद
आवसे संघ, किल्ले वरली यांना भेन्डि बाजार यांनी अनूमोदन दिल्याबद्दल आभार.
किमानपक्षी त्या भागातील भौगोलीक स्थानमहात्म लक्षात घेवून काही नाव ठेवायला हवे.
उदा. सागरी किल्ला (वरळी किल्ला= वरळी ब्रिज), झाडे (पाम झाडे= पाम ब्रिज/ रोड) , चिंच बन = चिंच बन रोड इ.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
1 Jul 2009 - 12:38 pm | पाषाणभेद
भदु पागा वरळे किंवा BPV Bridge नाव दिले तरी चालेल. पण सद्याचे नाव नको.
बघा - वरळी नाव हे वरळे या आडनावावरून आलेले आहे.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
10 Jul 2009 - 8:51 am | पाषाणभेद
भदु पागा वरळे हे ग्रुहस्थ जालींदर बाबांचे भाऊच आहेत बर का.
त्यांचा ईतिहास आम्हीच खोदुन काढला वरलीच्या किल्ल्यावरून.
त्यांच्या नावाचा आपण सेतूला नाव देण्याचा विचार केल्या बद्दल 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाकडून आभार.
या 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाची स्थापना आम्हीच केली व यात आम्हीच एकमेव सभासद आहोत.
सभासद भरती चालू आहे. सध्ध्या भरती चालू असल्याने किल्ले वरळी वर येता येत नसल्याने समूद्र किनारी सभासद अर्ज घेतलेले कबूतरे ठेवलेले आहेत. ओहोटित आपण किल्यात येवू शकतात.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
1 Jul 2009 - 12:51 pm | मराठी_माणूस
चर्चेचा मुद्दा हा कोणते नाव योग्य हा नसुन ज्या घॄणास्पद लाचारीचे प्रदर्शन झाले त्या बद्दल आहे
1 Jul 2009 - 1:15 pm | घाटावरचे भट
'वांद्रे-वरळी सागरी सेतू' हे नाव कसे वाटते?
1 Jul 2009 - 1:32 pm | नितिन थत्ते
एकदम फिट्ट.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
2 Jul 2009 - 2:00 am | विकास
अहो ज्याचे राज्य त्याचे नाव देणार. नंतर बदलतापण येतात. त्यासाठी आधी कष्ट करा, लोकांना पचेल असे राजकारण आणि समाजकारण करा, तुम्ही नुसतेच विरोधक असलात तरी किमान मतदानाचे कर्तव्य करा आणि इतरांना करायला लावून नेतॄत्व बदल घडवून आणा.
पण मूळ मुद्दा वाहतुक कोंडी शिथील करायचा होता तो पूर्ण झाला का? विशेषतः भरपूर टोल द्यावा लागत असताना? :-)
शिवाय ज्यांना करायचे असते ते असे देखील करू शकतातः
कॉंग्रेस आघाडी सरकारने मुंबई-महाराष्ट्राशी गद्दारी केल्याची टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शेकडो शिवसैनिकांनी 'शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत मंगळवारी मध्यरात्रीच 'वांद्रे-वरळी सागरी सेतू'वर श्रीफळ वाढवून 'वीर सावरकर वांद्रे-वरळी सेतू मार्ग' असे नामकरण केले. (दुवा)
2 Jul 2009 - 4:12 am | शाहरुख
>>शेकडो शिवसैनिकांनी 'शिवसेना झिंदाबाद'च्या घोषणा देत मंगळवारी मध्यरात्रीच 'वांद्रे-वरळी सागरी सेतू'वर श्रीफळ वाढवून 'वीर सावरकर वांद्रे-वरळी सेतू मार्ग' असे नामकरण केले.
हा हा हा..अंमळ मौज वाटली..येत्या निवडणूकीसाठी शिवसेनेचा एक गुण (अजुन) कमी :-)
2 Jul 2009 - 4:33 am | llपुण्याचे पेशवेll
पुल बांधायला ज्या ज्या लोकानी योगदान दिले त्यांच्यापैकी कोणाचे तरी नाव द्यायला पाहीजे होते.. किंवा नुसते सागरसेतू म्हटले असते तरी काही बिघडले नसते. पण शरदरावानी जी हीन आणि लाचार राजकिय खेळी त्यातून केली त्याचे वाईट वाटते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
2 Jul 2009 - 6:13 am | सुहास
खर्या मुंबैकराचे नाव द्यायला हवे होते... अगदी फिरोजशहा मेहता, जेआरडी, ते गावस्कर, तेंडुलकर, कुणीही चालले असते...! (अनिल कुंबळे आणि श्रीनाथ च्या नावाने बंगलोरात चौक आहेत..)
--सुहास
अवांतरः- पवारांचा मूळ हेतु साध्य होताना दिसतोय.. शिवसेना या मुद्द्याला हवा देतेयच, तसेच वीज दरवाढ, पाऊस, आणि लिबरहान कमिशन ने युतीला हात दिला तर सत्तेसाठी आसुसलेले राष्ट्रवादी युतीच्या सोबत मुंबैत "पुणे प्याटर्न" राबवण्याची शक्यता आहे..! (ही एक शक्यता वाटते कारण पक्षांतर्गत आणि बाहेरून कितीही टीका झाली तरी युतीने अजुनही राष्ट्रवादीला काडीमोड दिला नाही..!)
2 Jul 2009 - 12:00 pm | पाषाणभेद
"भदु पागा वरळे" नाव द्यावे ही 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाची मागणी कोण लक्षात घेईल?
श्री. भदु पागा वरळे हे १७ व्या शतकात वरळी किल्याचे किल्लेदार होते.
त्यांनी पोर्तूगीजांशी दिलेला लढा लक्षात घेता या पुलास "भदु पागा वरळे" हेच नाव द्यावे.
मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
9 Jul 2009 - 7:00 pm | बेभान
अहो नसता उपद्व्याप..जर लोक आधीच मुंबई-वांद्रे-वरळी सागरी सेतु(सी लिंक) म्हणुन ओळखत असतील तर त्यात कशाला अजुन वादाची भर. च्या आयला बटर बापाला ..इथे पाणी आणि विजेच्या नावाने बोंबाबोंब...आणि ते ही जाऊद्या हो..किती शिवसैनिक सावरकरांचे आदर्श, उपदेश आचरणात आणतात. आता जरी उद्या तुम्ही मुंबईहुन पुण्याला गेलात तर एक्सप्रेस वे नी आलो म्हणणार की यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने आलो म्हणुन सांगणार. यावरुन आयडिया सेल्युलरची अभिषेक बच्चनची जाहीरात आठवली, सरळ द्या ना नंबर. नाहीतरी एक्स्प्रेस हायवेला आम्ही NH-09 म्हणुनच ओळखतो. असो आपण या वादात न येता सरळ जुना पुणे-मुंबई मार्ग वापरावा. नाहीतरी तुकारामांनी म्हणलेच आहे , नावांत काय आहे..?
10 Jul 2009 - 9:31 am | विजुभाऊ
तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा.
तुकारामानी हे असे म्हंटलेले आहे