भांडा सौख्यभरे!!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
29 Jun 2009 - 12:50 am
गाभा: 

गोष्ट जरा नाजुक आहे. अडचणीची आहे. खासगीतली आहे. पण सांगणं मनोरंजक आहे. शेअरिंगनं दुःख हलकंच होणार आहे. मनावरचा ताण कमी होणार आहे. खटके कमी होण्याची संधी मिळणार आहे.
घरात भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग काही नवे नाहीत. नव्याची नवलाई संपल्यानंतर, कधी संपायच्या आधीच, तर कधी सुरूही व्हायच्या आधी घरात या वाक्‌युद्धाला सुरवात होते. चूक कोण, बरोबर कोण, याला अर्थ नसतो. भांडण्याची खुमखुमी जिरवणं महत्त्वाचं असतं. आपल्या भांडण्याच्या मुद्द्याला काही विशेष अर्थ नाही हे कळत असतं, पण आयत्या वेळी माघार घेणं परवडणारं नसतं. मग कधीतरी टिपलेली निरीक्षणांची हुकमी अस्त्रं बाहेर काढली जातात. टॉवेल जागेवर न ठेवणं, चहा पिण्याची पद्धत, कुठलाही मुद्दा मग वणवा पेटवणारी ठिणगी ठरू शकतो.
तुम्ही भांडता तुमच्या नवऱ्याशी/बायकोशी कचाकचा? काय काय असतात कारणं? "सीरिअस' भांडण किती दिवस/तास टिकतं? हे "शेअर' करावंसं वाटत असेल, तर त्यासाठी हा धागा. मागे तात्यांनी मिपाच्या सुना-जावयांची माहिती घेणारा एक धागा सुरू केला होता. आता हा त्यांच्या भांडणकौशल्याची माहिती जाणून घेण्यासाठीचा त्याच्या पुढचा प्रयत्न...अर्थातच, काही हलकेफुलके, गमतीदार किस्से ऐकायला मिळावेत, हा शुद्ध आणि निखळ हेतू. कुणाची मनं दुखावण्याचा किंवा कुणाच्या घरात आग लावून गंमत बघण्याचा उद्देश अजिबात नाही!

आमच्या घरी भांडणाला...आपलं...भांड्याला भांडं लागण्याची कारणं ः
माझ्या दृष्टीने ः
1. फोन घेण्यातली "तत्परता' ः आपण काही उत्साहानं सांगायला जावं आणि सहधर्मचारिणीनं फोनच उचलू नये, हा कित्ती आनंददायी अनुभव नाही? मग काही मिनिटांनी/तासांनी तिचा पुन्हा फोन आल्यावर "सांगत नाही ज्जा!' म्हणून फणकाऱ्यानं फोन न उचलण्यानं अस्सा काही भडका उडतो म्हणून सांगू!
2. टापटीपीच्या व्याख्या ः तिच्या दृष्टीनं टापटिपीची व्याख्या म्हणजे तरातरा, वसवस करीत सगळा ओटा-टेबल आवरणं. मग नवऱ्याला वेळ देणं, पेपर-बिपर गेलं खड्ड्यात! माझ्या दृष्टीनं माझं पेपरवाचन, निवांतपण, फोन, सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर वेळ उरला, तर कचरा, आवराआवरी यांच्याकडे लक्ष द्यायचं! बरं, या "टापटीपसम्राज्ञी'ला आंघोळीचा टॉवेल उचलायला मात्र ऑफिसातून परत येईपर्यंत वेळ नसतो बरं का! मग मीही तो रागंरागं तसाच पाडून ठेवायचा आणि वर मी न केलेल्या चुकीसाठी संध्याकाळी शिव्या खायच्या!
3. इतर फुटकळ मुद्दे ः आमच्या स्वयंपाकघरात चमच्याचा एक स्टॅंड आहे. त्यात कात्री ठेवायच्या जागी इतर काहीही ठेवलेलं मला खपत नाही. त्यामुळं कात्री चटकन हाती येत नाही. सगळा स्टॅंड हलतो. आणि कात्री नसली, की दोन-तीन चमचे तरी तिथे खोचून ठेवणं हा गृहस्वामिनीचा आवडता छंद! नवऱ्याला छळल्याचा विकृत आनंद तिला त्यातून मिळत असावा!! बाकी, पाण्याचा तांब्या भरून न ठेवणं, पेपर वेळच्या वेळी न आवरणं वगैरे गहन आणि गंभीर प्रश्‍न आहेतच!!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Jun 2009 - 1:02 am | विसोबा खेचर

अभिजितराव,

मजेशीर धागा! :)

तुम्ही भांडता तुमच्या नवऱ्याशी/बायकोशी कचाकचा?

अविवाहीत...! ;)

आपला,
तात्याबिहारी वाजपेयी! :)

टारझन's picture

29 Jun 2009 - 1:29 am | टारझन

हाहाहा !! मजा आया !! लय भारी :)

आपण काही उत्साहानं सांगायला जावं आणि सहधर्मचारिणीनं फोनच उचलू नये, हा कित्ती आनंददायी अनुभव नाही? मग काही मिनिटांनी/तासांनी तिचा पुन्हा फोन आल्यावर "सांगत नाही ज्जा!' म्हणून फणकाऱ्यानं फोन न उचलण्यानं अस्सा काही भडका उडतो म्हणून सांगू!

=)) =)) =))

फ्लॅट-फ्लॅट मधे एल.पी.जी.च्या शेगड्या

- टारझन
आपल्याला 'रसिक व्हायचंय' ? ,"तात्या आगे बढो" म्हणून धागा काढा.

विजुभाऊ's picture

6 Jul 2009 - 1:26 pm | विजुभाऊ

मला घरात प्रत्येक ठीकाणी पुस्तके हवी असतात. हीला ती आवरून ठेवायची असतात.
नातेवाईक हा आणखी एक मह्त्वाचा घटक असतो भांडणात.
सगळे मुद्दे संपले की मग एकदम बीनतोड मुद्दा म्हणून हीच्या भावाचा स्वभाव हा विषय काढायचा.
मग तुमच्या बहीणींचे स्वभाव काढले जातात. मॅच एकदम रंगात येते.
(अवांतरः ह्या मॅचेस शक्यतो दिवसाच्या दुसर्‍या प्रहरापर्यन्त उरकून घ्याव्यात. धमाल्या अनुभव लक्षात घे रे.)
आणखी एक्.........मला अजुनपर्यन्त हा योगायोग कळालेला नाहिय्ये.
मी बासरी वाजवायला लागलो की ही अगदी प्रेमळपणे काहितरी खायला नाहितर चहा घेउन येते.

ही तर तुमच्या बासरीची कमाल आहे!!!
(चहा-पोहे देते पण बासरी आवर!!! ;))

(तबला)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jun 2009 - 8:34 am | प्रकाश घाटपांडे

भांडण शब्दच मुळी भांड्यापासुन आला. भांडण शब्दाला बौद्धिक परिमाण द्यायचे असेल कि त्याला मतभेद म्हणायची सोय आहे. संतुलन बिघडु नये म्हणुन स्वतःशीच किती संघर्ष करावा लागतो नाहि? मग वाद नको म्हणुन संवादच नको अशी भुमिका पुढे येते. पण आंतरिक किडा स्वस्थ बसु देत नाही. मग चालु होतो अंतर्नाद ! असो
मौनीप्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

29 Jun 2009 - 9:49 am | ऋषिकेश

:) मस्त धागा आहे.. लोकांची भांडणे वाचायला बसलो आहोतच ;) येऊद्या ;)
अजून सोत्ताला काय अणुभव नाय बॉ ;)

(अविवाहित)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

धमाल मुलगा's picture

29 Jun 2009 - 6:58 pm | धमाल मुलगा

नक्की वाच! तेव्हढाच होमवर्क होईल :P

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

श्रावण मोडक's picture

6 Jul 2009 - 2:07 pm | श्रावण मोडक

धम्या आज तारीख किती? उद्या किती? परवा किती? काही आठवतंय का?
अवांतर - हे प्रश्न अवांतर, वैयक्तिक गप्पा-टप्पांचे वाटतील. पण तसे नाही. त्यांचा या धाग्याशी नितांत जवळचा संबंध आहे.

मस्त कलंदर's picture

29 Jun 2009 - 8:17 pm | मस्त कलंदर

होमवर्क साठी वही पेन घेऊन बसलेय. येऊंद्यात एक-एक अनुभव!!!!
=D> =D> =D>

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

Nile's picture

29 Jun 2009 - 11:23 pm | Nile

मी पण वाट पहातो!

पण प्रतीसादांची संख्या पाहता मिपा च्या सुन-जावयांमध्ये, आपली भांडणं या धाग्यावर टाकायची की नाही? कोणती टाकायची? यावरुन भांडण लागले असेल तर नवल नाही. ;)

रामदास's picture

29 Jun 2009 - 11:02 am | रामदास

भांडं तापावं लागतं.
टिपेला पर्फेक्ट लागलं की मजा येते.
बाकी टापटीप म्हणाल तर माझ्या बायकोला फोल्डींगचा नवरा मिळाला असता तर फारच आनंद झाला असता,छत्रीसारखा हवा तेव्हा उघडायचा .

लिखाळ's picture

29 Jun 2009 - 10:54 pm | लिखाळ

हा हा .. फोल्डिंगचा नवरा ही कल्पना एकदम आवडली.
कल्पनेतच ती बरी..प्रत्येक्षात नको :(

अभिजीतराव,
लेख छान आहे. माझ्याकडून भर घालण्यासारखे अद्याप काही नाही.
(असे लिहावे हेच बरे ;))
तुम्ही धाडसी आहात.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

चतुरंग's picture

29 Jun 2009 - 10:59 pm | चतुरंग

लेख छान आहे. माझ्याकडून भर घालण्यासारखे अद्याप काही नाही.
(असे लिहावे हेच बरे )

हो असेच म्हणावे नाहीतर ताबडतोब भर घालण्यासारखे काही घडायचे! :D

(अनुमोदक)चतुरंग

लिखाळ's picture

29 Jun 2009 - 11:30 pm | लिखाळ

अनुमोदनासाठी आभार !

प्रपंच म्हणजे बुद्धीबळाचा पटच आहे. राणीला सर्वाधीकार असतात तर राजा नुसताच नामधारी.
--(येता जाता जीवनावर भाष्य करणारा) लि. खु. काळे ;)

या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्रमोद देव's picture

29 Jun 2009 - 11:35 pm | प्रमोद देव

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

चतुरंग's picture

30 Jun 2009 - 12:14 am | चतुरंग

राणीला सर्वाधिकार असले तरी राजाखेरीज राणीला महत्त्व नाही आणि राणीखेरीज राजाचा निभाव लागणे अवघड, त्यामुळे कधी हत्तीची सरळ, कधी उंटाची तिरकी तर कधी घोड्याची दुडकी चाल खेळावी लागतेच आणी तरीही शेवटी आपण नियतीच्या हातचे प्यादेच असतो हे विसरता कामा नये!!!

(खुद के साथ बातां : हे वाक्य उगीचच लई भारी झालं आहे असं नाही वाटत रंगा तुला?टाळ्या! टाळ्या!! ;) )

(प्यादे)चतुरंग

Nile's picture

30 Jun 2009 - 12:22 am | Nile

नियतीच्या हातचे प्यादे की राणी च्या हातचे प्यादे म्हणायचे आहे तुम्हाला? ;)

खातोय आता शिव्या!

लग्न होऊनही कळले नसेल तर देव तुझे रक्षण करो!! ;)

चतुरंग

Nile's picture

30 Jun 2009 - 12:29 am | Nile

हे तुमचं असं असतं बघा. एकीकडे "शहाणा असशील तर लग्ना-बिग्नाच्या भानगडीत पडु नकोस" असं म्हणायचं, अन दुसरीकडे अशी रहस्य निर्माण करायची! ;)

शादी वो लड्डू है जो खाए वो पछताए और ना खाए वोभी पछताए!

शेवटी पछतावा आहेच तर मग निदान लाडू तरी का खायचा नाही! ;)

(लाडू बहाद्दर)चतुरंग

Nile's picture

30 Jun 2009 - 12:42 am | Nile

छे हो! नव्हतं माहीतं अजुन लाडवाला पुष्कळ अवकाश आहे ना. पण बरं झालं सांगीतलंत, आता कारण मिळालं लाडु खायला! :D

लिखाळ's picture

30 Jun 2009 - 12:30 am | लिखाळ

वा वा.. तुमच्या या वाक्याची नोंद आम्ही आमच्या आगामी पुस्तकात जरूर घेऊ !
पुस्तकाचे नाव आहे

बुद्धीबळातून प्रपंचविज्ञान
प्रपंचाची घडी नीट बसवण्यासाठी बुद्धीबळाचा पट उघडा
-- लि. खु. काळे
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

आपला अभिजित's picture

29 Jun 2009 - 6:31 pm | आपला अभिजित

फोल्डींगचा नवरा

ही कल्पना लय भारी!

लगे रहो रामदासभाई!
बाय द वे,
तुम्ही `रामदास' असूनही त्या रामदासांपासून काही बोध घेतला नाहीत का?

धमाल मुलगा's picture

29 Jun 2009 - 7:01 pm | धमाल मुलगा

वेगळं काय लिहु?
वरचे लेख+प्रतिक्रियेतले सगळे मुद्दे जसेच्या तसे उतरवून काढावे लागतील :)

रामदासकाका, फोल्डिंगचा नवरा??? ख्यॅ ख्यॅ ख्यॅ!!! मला टॉम & जेरीमधल्यासारखं फोल्डींगचा माणूस नजरेपुढं आला. :)

बाकी, घरोघरच्या चुलींची ठेवण, मांडणी, अगदी मातीसुध्दा इतकी कशी सारखी ह्या आश्चर्याच्या धक्क्यातूनच अजुन सावरलो नाहीय्ये :(

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आपला अभिजित's picture

30 Jun 2009 - 12:45 am | आपला अभिजित

खूप झाली!
खर्रीखुर्री कारणं येऊ द्यात आता!!!

भाग्यश्री's picture

30 Jun 2009 - 2:25 am | भाग्यश्री

आमच्याकडे दोघंही तितकेच 'कष्ट-टाळू' असल्याने टापटीपीवरून वगैरे भांडणे होत नाहीत..
जमेल तितका पसारा घालायचा व एकदा दोघांनी मिळून आवरून टाकायचा असा सोपा कारभार!

भांडणाची - सभ्य भाषेत चर्चेची - कारणे अशी असतात..
मुव्ही कुठला पाहायचा..
फ्रायडे इव्हीनिंग जेवणाचा मेनू काय? आणि सगळ्यात महत्वाचे 'कोणी' बनवायचा! :) ..
विकेंडला कुठे भटकायचे..
मला पुस्तक विकत घ्यायचे असते तर याला मुव्हीज किंवा गेम्स! ?
विकेंड जास्त मिळावा म्हणून तो तेव्हा भल्या पहाटे ८ला वगैरे उठतो !! :|
अशी काही गंभीर कारणं असतात चर्चेची फेरी झडायला! :)

http://www.bhagyashree.co.cc/

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2009 - 1:38 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्याकडे दोघंही तितकेच 'कष्ट-टाळू' असल्याने टापटीपीवरून वगैरे भांडणे होत नाहीत..

वा वा हेच सुत्र आम्ही वापरावे म्हण्तो. सारख आपल पडदे बदल, उश्यांचे आभ्रे बदल्,चादरी बदल, रोज पाणी प्यायची भांडी घासायला टाक.यातच कष्ट वाया जातात. खरतर रोज रोज अंघोळी करण्यात देखील पाणी आणि कष्ट वाया जातात असे आमचे मत आहे. शेवटी आपल्यासाठी घर कि घरासाठी आपण?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मृदुला's picture

30 Jun 2009 - 3:24 am | मृदुला

खणखणाट तर होतो, पण नक्की सुरुवात कशी होते त्याचा गेली ५ मिनिटे विचार करते आहे पण अजून लक्षात आलेले नाही. बहुतेक भांडणाचा होण्याचा मूड असल्यावर काहीही बोलल्यावर (किंवा न बोलल्यावर) ते होत असणार.

रेवती's picture

30 Jun 2009 - 4:09 am | रेवती

वरची निष्फळ चर्चा वाचली. सौ. भाग्यश्रीने त्यात भर घालायचा छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल तिचे अभिनंदन! बहुतेक सगळेजण रणछोडदास असावेत असा अंदाज (नक्की माहित नाही)!
मंडळी, आमच्याकडे मला भांडायची खुमखुमी असली तरी नवर्‍याला अजिबात इंटरेस्ट नसतो असल्या गोष्टीत! तरी उकरून मी भांडण काढतेच. निमित्त म्हणाल तर्...........कोण म्हणतं भांडायला निमित्त लागतं? माझी बडबड सुरू झाली की नवरा ठार बहिरा होतो........तात्पुरता! ;)
समोर ल्यापटॉप ठेवून त्यावर कुड्कुड असं टंकत असतो. मधूनच 'माझं चुकलं', किंवा 'असं झालं होय?' असं म्हणत असतो. दोनचार वेळा 'माझं चुकलं' असं ऐकल्यावर तो नाटकं करतोय हे लक्षात न येण्याइतकी मी काही निर्बुद्ध नाही. हे त्याच्या लक्षात येताच तो प्रतिसाद बदलतो. नंतर सुरू होतं 'तुझं बरोबर आहे'. साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी मी बोलून दमते......हा फ्रेश! आजकाल नवर्‍याचा विचार चाललाय्.......क्लासेस काढण्याचा...........'तात्पुरता बहिरेपणा कसा आणावा?' तसा आमचा संसार सुरळीत चाललाय म्हणायला हरकत नाही.
(सुरळीत)रेवती

Nile's picture

30 Jun 2009 - 4:24 am | Nile

छे हो! लवंगी फटाका! दमदार येउद्या की काहीतरी! O:)

भाग्यश्री's picture

30 Jun 2009 - 4:51 am | भाग्यश्री

रेवती हा तर युनिव्हर्सल आणि बाय डिफॉल्ट येणारा मुद्दा!!
सोयिस्करपणे ऐकणे व बहिरे होणे !! :))

सहज's picture

30 Jun 2009 - 6:50 am | सहज

अहो युनिवर्सल आहे तर काहीतरी तथ्थ असेल हो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, बोलून बोलून प्रॅक्टिसने बायकांच्या बोलण्याला एक धार चढते पण ऐकुन ऐकुन आम्हा नवर्‍यांचे कान खरेच पार बधीर होतात. बघा तुमची तयारी असेल तर एक महिना प्रयोग करा उलटा. कोणाचेही चुकले तरी तुमच्या मिस्टरांना सांगा तुम्ही बोला मी ऐकते. (बाय द वे, ह्या प्रयोगाच्या साइड इफेक्ट्सला मी जबाबदार नाही. )

अवांतर- लिखाळकाकांच्या पुस्तकातुन / नवमानसशास्त्राला अनुसरुन लग्न झाल्यावर बायकोला सहजीवनात माझ्याकडून काय अपेक्षा आहेत असे हौसेने (हौसेने =सांग सांग विचारले असता, बर बुवा तुम्ही म्हणताय म्हणुन हो. बघा जमेल का? मी=अग हो ग. तु मनमोकळेपणाने बोल. अश्या संवादानंतर) बायकोने केलेली पहीलीच चाल अर्थात संसारात मला शिकवलेला पहिला धडा "मला बोलायचे नाही."

पुतण्यांनो नोंद घेतलीत का?

गंमत सांगतो, लेकरु ही स्ट्रटेजी वापरायला लागले आहे.

काहीतरी गडबड केली व बोलायला जावे तर एका सेकंदात उत्तर येतं, सॉरी माझं चुकलं. मी पुन्हा असं नाही करणार. केल तर मला शिक्षा करा.

झालं मी कितीही चांगला वागलो असेन त्या दिवशी तरी लेकराच्या ह्या उत्तराने परत मीच दोषी ठरतो, बोलणी खातो. लो प्रोफाइल ठेवणे / अंडर द रडार हे शिकण्यामागे अनुभव आहे हो.

पुतण्यांनो नोंद केलीत का?

विनायक प्रभू's picture

30 Jun 2009 - 11:03 am | विनायक प्रभू

श्री रेवती च्या क्लासेस ला अमाप विद्यार्थी मीळतील

संदीप चित्रे's picture

30 Jun 2009 - 9:23 pm | संदीप चित्रे

>> माझी बडबड सुरू झाली की नवरा ठार बहिरा होतो........तात्पुरता! समोर ल्यापटॉप ठेवून त्यावर कुड्कुड असं टंकत असतो.
रेवती,
आमच्या घरातला सीन तू कसा काय लिहिलास ? बायको शेवटी म्हणते, "अरे ! मी काय भिंतीशी बोलतीय का? " !! :)

तशी बायकोने 'भिंत बोलवली' असे शेवटी होत असेल नाही! ;)

(द वॉल)चतुरंग

रेझर रेमॉन's picture

6 Jul 2009 - 1:04 am | रेझर रेमॉन

स्थितप्रज्ञस्य का भाषा?
कानांचा उपयोग निरनिराळे निरर्थक आवाज टाळण्यासाठी करता यायला हवा.
- रेझर

अवलिया's picture

30 Jun 2009 - 9:22 am | अवलिया

मजेशीर धागा आणि चर्चा :)

-- अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2009 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मजेशीर धागा आणि चर्चा :)

नितिन थत्ते's picture

30 Jun 2009 - 10:58 am | नितिन थत्ते

आम्ही महिन्यातून एकदाच ३-४ दिवस घरी जातो. त्यामुळे बहुधा नवरा घरी आल्याचे थोडे कौतुकच असते. त्यामुळे जास्त अनुभव नाही.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

रामदास's picture

30 Jun 2009 - 12:46 pm | रामदास

बहुतेक प्रतिक्रिया लिहीणार्‍यांची मुलं बाळं अजून बाळंच आहेत.
मुलं मोठी झाल्यावर एक मोठ्ठा वाद अस्तो तो म्हणजे..
"तुम्ही मुलांचीच बाजू घेता. नाहीतरी आजकाल बघत्येय मी तुम्हाला नकोशीच झालेय.मी एकदा मरतेच मग घाला गोंधळ हवा तेव्हढा. नंतर हाक मारलीत तरी येऊ शकणार नाही वगैरे वगैरे."
हा वाद सर्वसाधारणपणे मुलं आईच्या सोबत बारशाला किंवा तत्सम समारंभाला जाण्यासाठी नकार देतात त्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी होतो.
"यावेळी अगं यावेळी नाही तर नाही दुसरं मुल होईल तेव्हा मी येईन तुझ्यासोबत असं उत्तर दिलं तर उपाशी रहावं लागतं ."
डिप्लोमसीचा जास्तीत जास्त वापर करून उत्तर द्यावे.

अगदी, अगदी असेच डायलॉग होतात रामदास, म्हणजे अजून आमच्याकडे झालेले नाहीत, पण मी ऐकलेले नक्की आहेत! ;)

(डिप्लोमॅट)चतुरंग

अश्विनीका's picture

30 Jun 2009 - 12:51 pm | अश्विनीका

आमच्याकडे नवर्‍याचे टिव्ही बघणे (त्यात फूट्बॉल चा सिझन असेल तर आणखीनच भर) आणि माझे आंतरजालावर भ्रमण करणे ह्यावरून एकमेकांना टोमणे मारले जातात.

बा़की बारिक सारीक गोष्टींवरून भांडण नाही पण हलके वाद व्हायचे अधूनमधुन (आता होत नाही कारण एकमेकांचे स्वभाव आणि सवयी अंगवळणी पडल्याने) उदा.
चहा केला तर गाळणीत चहा पावडर तशीच ठेवून भांडे नळाखाली भिजत न घालणे (वाळून गेल्यावर नंतर घासायला किती त्रास होतो), भाज्या चिरणे, खोबरे किसणे अशी कामात मदत केलीच तर काम झाल्यावर हातासरशी ते सामान उचलून न ठेवणे, किचन मधील कॅबिनेट मधून काही सामान काढले तर दारे तशी च उघडी ठेवणे, एखादी गोष्ट सांगत असताना आधी लक्ष न देणे आणि मग नंतर काय म्हणत होतीस असे म्हणून तीच गोष्ट रिपीट करायला लावणे......वगैरे ह्या त्याच्या गोष्टी
आणि माझ्या म्हणाल तर्...उशिरा उठणे, मोबाईल फोन जागेवर न ठेवणे , शॉपिंग ला भरपूर वेळ घेणे .... :)

मस्त कलंदर's picture

30 Jun 2009 - 4:27 pm | मस्त कलंदर

एका मैत्रिणीच्या घरी गेले होते.. नवरा-बायको दोघेही माझे चांगले मित्र... त्यांच्या घरी कामाची वाटणी म्हणजे.. मी पसारा करतो.. तू आवर.. तू स्वयंपाक कर.. मी खातो या प्रकारातली.. चहा कुणी बनवायचा याचा चेंडू एकमेकांवर फेकून फेकून शेवटी मी हार पत्करली अन चहा केला.. चहा झाल्या झाल्या नवरोबा आले नि त्यांनी समोरच्या भरल्या कळशीवरची झाकणी उचलली नि चहाच्या पातेल्यावर ठेवली...
मी भडकले त्याच्यावर.. "अरे जरा तरी अक्कल वापर... पाण्यात काही पडलं म्हणजे?? हजारो प्लेट्स असतील अजून घरात.. चार पावले चालून एखादा खण उघडून दुसरी झाकणी ठेवायची ना... नि सारखा मारे बायका कशा अक्कलशून्य अशा बाता मारत असतोस.. आता सांग कोण माठ आहे ते!!!"

माझी मैत्रीण स्थितप्रज्ञासारखी शांत.. नवर्‍याच्या या वागण्यावर मुळीच रागावली नाही.. फक्त म्हणाली.. "काही अडचण नाही. लग्न होऊन एखादे वर्ष झाले.. की कळेल.. अशा त्राग्याचा काही उपयोग नसतो ते..!!!"

परवाच मी तीला गुजरातीत रिकामटेकड्या माणसाला "नवरा" म्हणतात म्हणून सांगितलं... तर ती तितक्याच शांतपणे म्हणते कशी.. "त्यात काय विशेष? समानार्थी शब्दच तर आहे!!!"

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

श्रावण मोडक's picture

30 Jun 2009 - 5:25 pm | श्रावण मोडक

परवाच मी तीला गुजरातीत रिकामटेकड्या माणसाला "नवरा" म्हणतात म्हणून सांगितलं... तर ती तितक्याच शांतपणे म्हणते कशी.. "त्यात काय विशेष? समानार्थी शब्दच तर आहे!!!"
सलाम या स्थितप्रज्ञतेला. :)

मस्त कलंदर's picture

30 Jun 2009 - 8:10 pm | मस्त कलंदर

मटाच्या हसा लेको मध्ये वाचलेला नवराबायको वरचा विनोद..

नवर्‍याची तक्रार आहे की कसेही वागले... तरी बायको चिडायची ती चिडतेच...

**गप्प बसलं तर.... मुखदुर्बळच आहेस.. जरा तोंड उघडून बोलत जा.. चारचौघात घुम्यासारखं बसत जाऊ नकोस...!!

**बोलत राहिलं.... जरा इतरांना पण बोलू देत जा.. किती स्वतःचाच शहाणपणा पाजळायचा तो... लाज आणतोस चार लोकांत...!!!

**भेटवस्तू आणल्या नाहीत तर.. घरात बिनपगारी मोलकरीण मिळालीय ना... इतकं राब राब राबायचं... एखादी वस्तू न सांगता आणली तर सगळी इस्टेट्च जणू संपून जाणार आहे...!!!

***आणल्या तर.... कुठंतरी शेण खाऊन आला असाल.. चुकीचं परिमार्जन म्हणून बायकोला काहीतरी आणलं असेल...!!!

** प्रेमानं बोललं नाही तर... बाहेर कुठंतरी लफडं चालू असेल... बायकोशी चार शब्द बोलायला वेळ कसा असेल???

** प्रेमानं बोललं तर... "दुसरं" काही सुचतच नाही का?? इथं बायको मरमर मरतेय कामानं... पण यांना काय!!!!

बिच्चारा (विनोदातला) नवरा!!!

अवांतरः:: हे असले विनोद नेहमी स्त्रियांवरच का असतात??? बायकांनी नवर्‍यावर केलेले विनोद सहसा वाचनात येत नाहीत...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धमाल मुलगा's picture

30 Jun 2009 - 8:55 pm | धमाल मुलगा

"मांजर आणि नवरा, कुठेही नेऊन सोडले तरी संध्याकाळी बरोब्बर घरी हजर"

काय हो अभिजीतराव तुमच्या ग्रॅफिटीची झाईरात केली, काही मोबदला देताय की नाही? ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आपला अभिजित's picture

1 Jul 2009 - 2:04 am | आपला अभिजित

ग्राफिटीचं पुढचं पुस्तक तुम्हाला अर्पण!!

चतुरंग's picture

30 Jun 2009 - 9:14 pm | चतुरंग

अवांतरः:: हे असले विनोद नेहमी स्त्रियांवरच का असतात??? बायकांनी नवर्‍यावर केलेले विनोद सहसा वाचनात येत नाहीत...

काँप्लेक्स नंबरचे दोन भाग असतात एक रिअल आणि दुसरा इमॅजिनरी नवर्‍यांनी बायकांवर केलेले विनोद हा त्यातला रिअल पार्ट असतो आणि बायकांनी नवर्‍यांवर केलेले विनोद हा इमॅजिनरी; त्यामुळे तसे विनोद दिसणे अवघडच! :B :D

(काँप्लेक्स)चतुरंग

विजुभाऊ's picture

6 Jul 2009 - 1:37 pm | विजुभाऊ

एक कुठेतरी वाचलेले.............
नवरा : एका सर्व्हे नुसार पुरुष सर्वसाधारणतः दिवसातून २००० शब्द बोलत असतील तर स्त्रीया ६००० शब्द बोलतात.
बायको: खरे आहे हो. तुम्हाला एकच गोष्ट तीनतीनदा सांगावी लागते तेंव्हा कुठे डोक्यात उतरते